खर म्हणजे मी खूप थकलो होतो. १०० किलोमीटर पेक्षा आज जास्त सायकल चालवली होती. त्याचे मी लगेच ऐकला आणि दुकानाच्या पायर्यावर बसलो. बाकीचे लोक म्हणायला लागले कि इथे नको बसू आत जाउन खुर्ची वर बस. मी नाही म्हंटला इथेच ठीक आहे. मग सगळे जवळ आले. खूप गप्पा मारल्या. दिल्ली वरून आलोय, मनाली वरून सुरु केलं होतं आणि आज इथे संपवतोय. ते खूप लक्ष्य देऊन ऐकत होते. त्यांनी त्यांच्या घरी यायचे निमंत्रण दिला. मी सरळ नाही म्हणून सांगितले. मला आशा नव्हती कि काश्मीर मध्ये एवडे प्रेम मिळेल ते. पण हे गाव होतं त्यामुळे असेल कदाचित. शहराची गोष्ट वेगळी आहे. अर्धा तास थांबल्यानंतर तेथून निघालो. मग हजरतबल च्या समोरूनच लालचौकात आलो. मला इथेच थांबायचे होते कारण लालचौक पासूनच जम्मूला जाणाऱ्या गाड्या मिळतात. उदया निघताना जास्त चालावे लागू नये म्हणून. आज सर्वात जास्त १२६ किमी सायकल चालवली.
दिवस एकविसावा
![]() |
| सायकल गाडी वर टाकल्यावर |
![]() |
| दिल्ली चा लोखडाचा पुल |
वाचने
3773
प्रतिक्रिया
5
मिसळपाव


प्रतिक्रिया
वाचते आहे
वाचतोय!
अफाट जिद्दी आहे हा माणूस
हं...................
संपत आला प्रवास.