सोशल नेटवर्किंग (भाग १)

लाडू.'s picture
लाडू. in जनातलं, मनातलं
31 Dec 2015 - 10:51 am

हल्लीच अंधेरी-विलेपार्ले भागात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित कथा. पण सर्व पात्रे काल्पनिक आहेत.
(कथा अन्यत्र पूर्वप्रकाशित)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मयंक सकाळी उठतो तो बेडवर कुठेतरी असलेला फोन चाचपडतच. ही त्याची नेहमीची सवय. रात्री डोळे आपोआप बंद होईपर्यंत फोन वर chat. मग फोन पडतो कुठेतरी. तो सकाळी उठल्या उठल्या हातात घेऊन मग बाकीची कामे. दिवसभर २४ तास मोबाईल हातात हवाच. चार्जिंग करणार तेव्हाही त्या फोनला आराम म्हणून नाही. online असण्याच जणू व्यसनच लागल होत. जगभरातली latest apps त्याच्या फोन मध्ये नसतील तरच नवल. whatsapp आणि facebook तर दळणवळणाची मुख्य साधन. त्याशिवाय BBM, snapchat, instagram हेही सगळ होतच भरीला. सगळ्यावर chat च करायचं पण पद्धत वेगळी. त्यानुसार त्या त्या app वरच्या माणसांची categery वेगळी. IQ वेगळा. विषय वेगळे. आणि काय काय देवच जाणे. म्हणजे instagram वर फक्त photos विषयी बोलायचं. तर snapchat वर photos वापरून बोलायचं, BBM वर अनोळखी मुलींशी flirting आणि असच काहीतरी. सामान्य माणसाच्या आकलनापालीकडेच सगळ.

मयंक कॉलेजला जाणारा एक साधासुधा मुलगा. शैक्षणिक प्रगती यथातथाच. पण कॉलेज कट्ट्यावर जबरदस्त फेमस. दिसायला देखणा, हातात बाईक, त्यामुळे पोरीही सतत आजूबाजूला. त्यात सध्या सोशल नेटवर्किंग वर शक्तिप्रदर्शनाची हौसच अख्ख्या तरुणाईला. म्हणजे कोणाचा डिस्प्ले पिक्चर किती चांगला? किती महागड्या लोकेशन वर काढलेला, त्यात मुली किती, किम्बहुना hot babes किती, त्यासाठी दिवसभर कॅमेरा हवा आपला स्वतःचा, म्हणून बाबांच्यामागे भुणभुण करून एक DSLR घेतलाच. आणि self declared फोटोग्राफर झाला. आता आणखीनच लोक मागेपुढे. याच्या कॅमेरातून आपले फोटोशूट व्हावे या इच्छेने. मयंकचा एक मित्र, फोटोग्राफर सिद्धांत. म्हणजे मासमिडिया वैगरे करून फोटोग्राफीच शास्त्रशुध्द ट्रेनिंग वैगरे. तोही बऱ्याचदा मॉडेल म्हणून मयंकला वापरायचा. facebook वर आपले फोटो प्रसिध्द करायला त्यालाही तशाच handsome आणि फेमस कॉलेज गोअरची गरज होतीच. आणि त्याच्या इच्छेप्रमाणेच घडत होत.

लवकरच मयंकचा फोटोग्राफर म्हणून सिद्धांतच अंधेरी पार्ल्यात नाव झालं. त्याच्या फोटोंना किंमत आली. आपल्या फोटोखाली फोटोग्राफर म्हणून सिद्धांतच नाव असाव हे बऱ्याच मुलामुलींच स्वप्न झालं. मयंकचे फोटो सिद्धांतच्या skill मुळे चांगले येतात. त्याने फोटोसाठी निवडलेली ठिकाणे, पोज, प्रकाशयोजना निव्वळ अप्रतिम असते. हे अस सगळ पसरू लागल. यात सिद्धांतचा फायदा होताच. पण मयंकच नुकसानही नव्हत. त्याला हवी ती प्रसिद्धी त्यालाही मिळत होती. कॉलेज कट्ट्यावर त्याच्या नावाची कुजबुज व्हायला लागली होती. आणि फक्त त्याच्याच नाही तर इतरही कॉलेज मध्येही त्याच्या फोटोंची चर्चा चालू झाली होती. facebook वर मुलींच्या friend requests तुडुंब भरून वाहू लागल्या होत्या. कुठल्याही पिकनिक किंवा प्लान्स साठी मयंक असण अत्यावश्यक झालं होत. मयंकचे टी-शर्टस, जीन्स, शूज सगळ्या सगळ्याची चर्चा असे सगळीकडे. आणि हे सगळ असच कायम असाव हीच इच्छा होती मयंकची. आपल्या वरची लाईम लाईट कमी होईल याची कल्पनाच करू शकत नव्हता तो कधी. निदान कॉलेज लाईफ अशी असावी हेच त्याच स्वप्न होत. आणि ते तो पुरेपूर जगत होता. आई बाबांचं कानी कपाळी अभ्यासासाठी ओरडण सोडलं तर बाकी त्याच्या छोट्याश्या जगाचा राजकुमार होता तो.

पण अशा ह्या सगळ्यांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या मुलाचं relationship status अजून single होत. किती खर किती खोट कोणालाच माहित नव्हत. पण मयंकच्या आतल्या गोटातले त्याचे जीवाभावाचे मित्र मैत्रिणी सुद्धा मान्य करत होते कि त्याला गर्ल फ्रेंड नाही. मयंक त्याच्या स्वप्नातल्या परीच्या शोधत होता. त्याला ती तशीच हवी होती. स्वर्गातून अचानक येणारी अप्सरा वैगरे. तिच्यासाठी मखमली पायघड्या. त्यामुळे वास्तवात दिसणाऱ्या मुली त्याला आपल्या गर्लफ्रेंडच्या रुपात सहनच करता येत नव्हत्या. कितीतरी मुलींचे प्रपोजल्स त्याने क्षणात धुडकावले होते. पण तरीही त्याच मुलींबरोबर तो flirt सहजच करायचा. मुली स्वतःहून बोलायला येतात तर मी का नको बोलू? हा त्याचा बचाव असायचा. कुठल्याच मुलीशी कमीटमेंट वैगरे त्याने हेतुपुरस्सर टाळली होती. हल्लीच कोणाच्या तरी संदर्भाने त्याच्या facebook-wall वर दिसलेला एक फोटो मात्र त्याच्या विशेष लक्षात राहिला होता. त्याच्या मनातलं आणि मेंदूतल त्याच्या परीच वर्णन अक्षरशः साकार करणारी ती मुलगी होती - श्रावणी. गुजराती असलेली ही मुलगी, पार्ल्यातल्याच गुजराती मायनोरीटी कॉलेज मध्ये शिकत होती. relationship status तिचं ही single. मयंक मनातल्या मनात खुश झाला होता. मयंकला नाही म्हणेल अशी मुलगी अजून पर्यंत तरी मयंकला भेटली नव्हती. त्यामुळे आत्मविश्वास तर त्याच्या नसानसात ठासून भरला होता. आणि त्याचं flirting skill तर त्याच आत्मविश्वासावर आधारलेलं होत. कुठलीही मुलगी तिच्याही नकळत सहज मयंककडे ओढली जात असे. आजवर मयंकने या skill चा फक्त facebook वर वेळ घालवायला वापर केला होता. पण श्रावणीकडे तो खूप गांभीर्याने बघत होता. खूप विचार करून मयंक ने तिच्या फोटोच्या शेजारी असलेल्या add friend बटणावर क्लिक केले.
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

लालगरूड's picture

31 Dec 2015 - 1:41 pm | लालगरूड

आवडीचा विषय.... पुलेशु

DEADPOOL's picture

1 Jan 2016 - 10:01 am | DEADPOOL

vachliy bhau
mabovar