क्रिकेट

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in क्रिडा जगत
1 Oct 2015 - 12:59 pm

क्रिकेटवर मी पूर्वी ३-४ धागे काढले होते. प्रत्येक धागा एका विशिष्ट मालिकेसाठी/स्पर्धेसाठी होता. ती मालिका/स्पर्धा संपल्यावर धाग्याचे आयुष्य संपले. विश्वचषक स्पर्धा मार्च २०१५ मध्ये संपली. परंतु वर्षभर जगात कोठे ना कोठे तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने होतच राहतात. त्यासाठी हा एक कॉमन धागा आहे. सध्या चालू असलेले सामने/स्पर्धा/मालिका इ. विषयी इथे लिहिता येईल.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

1 Oct 2015 - 1:00 pm | श्रीगुरुजी

सुरूवात भारत वि. दक्षिण आक्रिका या मालिकेने होते आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ मोठ्या मालिकेसाठी भारतात आला आहे. त्याचे वेळापत्रक असे आहे.

(१) ट-२० सामने - २ ऑक्टोबर, ५ ऑक्टोबर आणि ८ ऑक्टोबर (सर्व सामने संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील)

(२) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने - ११ ऑक्टोबर, १४ ऑक्टोबर, १८ ऑक्टोबर, २२ ऑक्टोबर, २५ ऑक्टोबर (सर्व सामने दुपारी १:३० वाजता सुरू होतील)

(३) कसोटी सामने - (सर्व कसोटी सामने सकाळी ९:३० वाजता सुरू होतील)
पहिला कसोटी सामना: ५-९ नोव्हेंबर
दुसरा कसोटी सामना: १४-१८ नोव्हेंबर
तिसरा कसोटी सामना: २५-२९ नोव्हेंबर
चौथा कसोटी सामना: ३-७ डिसेंबर

२०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला तर द. आफ्रिकेला उपांत्य फेरीत न्यूझीलँडने हरविले. त्यानंतर भारत मे महिन्यात बांगलादेशाच्या दौर्‍यावर गेला होता. त्यातील ३ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा १-२ असा लाजिरवाणा पराभव झाला. पण नंतर प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत झिंबाब्वे दौर्‍यावर गेलेल्या भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली तर दोन ट-२० सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

मागील महिन्यात श्रीलंकेच्या दौर्‍यावर गेलेल्या भारतीय संघाने ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला त्यांच्याच भूमीवर २-१ असे हरवून मोठ्या कालखंडानंतर परदेशात विजय मिळविला.

द. आफिके विरूद्ध भारतात घरच्याच मैदानावर खेळणार असल्याने भारत ही मालिका सहज जिंकेल असा अंदाज आहे. तीनही प्रकारच्या सामन्यात भारत विजयी होईल असे वाटते. अर्थात आफ्रिकेचा संघ तगडा आहेच. परंतु तरीसुद्धा भारतच भारतात वरचढ आहे.

भारत ही मालिका सहज जिंकेल असा अंदाज आहे.

गुरुजींशी असहमत
मालिका जोरदार होईल.
भारताला सहजासहजी विजय मिळेल असे वाटत नाही. ट-२० आणि कसोटीमधे तर झुंजायला लागेल खुपच.

बादवे आजपासुन रणजीदेखिल सुरु झाली.
आसामने कर्नाटकला १८७ धावात बाद करुन धक्का दिला.
गहुंजेला महाराष्ट्र - हरियाणा सामना चालु आहे.
पहिल्या दिवसाअखेर हरियाणा २०७/५. सेहवाग यावेळी हरियाणाकडुन खेळत आहे. तडाखेबंद ९२ धावा (१२९ चेंडु) फटाकावुन बाद झाला.
सेहवागचे कसोटी संघात आज ना उद्या पुनरागमन व्हावे अशी इच्छा आहे पण बहुतेक अपुर्णच राहणार.

येस मलाही असंच वाटतं. दादानूं (सौरव) आणि वीरू जबरदस्त अ‍ॅटिट्यूडवाले लोक्स आहेत. असे लोक वाईट टेंपारमेंटल असतात.

श्रीगुरुजी's picture

1 Oct 2015 - 7:49 pm | श्रीगुरुजी

>>> आसामने कर्नाटकला १८७ धावात बाद करुन धक्का दिला.

गतउपविजेत्या तामिळनाडूला बडोद्याने फक्त १२५ धावात गुंडाळून धक्का दिला. मागील वर्षीचे विजेते आणि उपविजेते पहिल्याच सामन्यात अडचणीत आलेत.

>>> पहिल्या दिवसाअखेर हरियाणा २०७/५. सेहवाग यावेळी हरियाणाकडुन खेळत आहे. तडाखेबंद ९२ धावा (१२९ चेंडु) फटाकावुन बाद झाला.

हरयाणा दिवसअखेर ६ बाद ३०३. महाराष्ट्राला जरा अवघडच दिसतंय.

>>> सेहवागचे कसोटी संघात आज ना उद्या पुनरागमन व्हावे अशी इच्छा आहे पण बहुतेक अपुर्णच राहणार.

+१

सेहवाग आणि युवराजला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना बघायची इच्छा आहे. ही इच्छा पूर्ण व्हावी हीच आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!

फारएन्ड's picture

2 Oct 2015 - 2:27 am | फारएन्ड

सेहवाग व युवी बद्दल आमेन. (तेवढ्यापुरता हा शब्द तुम्हाला चालावा गुरूजी :) )

फारएन्ड's picture

1 Oct 2015 - 5:34 pm | फारएन्ड

धाग्याबद्दल.

अजून क्रिकइन्फो पाहिले नाही. दोन्ही संघ 'फुल कपॅसिटी' मधे असायला हवेत कसोटी करता तरी. चेक करतो.

श्रीगुरुजी's picture

1 Oct 2015 - 7:53 pm | श्रीगुरुजी

कसोटीसाठी अजून भारतीय संघाची निवड झालेली नाही. ट-२० सामन्यांसाठी आणि पहिल्या ३ एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ निवडलेला आहे.

ट-२० सामन्यात श्रीनाथ अरविंद हा नवीन खेळाडू आहे. परंतु संघात हरभजनची निवड धक्कादायक आहे.

पहिल्या ३ एकदिवसीय सामन्यासाठी गुरकीरत सिंग मान हा नवीन खेळाडू आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Oct 2015 - 5:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

पाकिस्तानी क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या अध्यक्षांनी स्वतःच्याच थोबाडीत मारून घेतली आहे ही सद्या सर्वात जास्त रोचक बातमी आहे ;) :)

उगा काहितरीच's picture

1 Oct 2015 - 7:07 pm | उगा काहितरीच

बोर झालंय क्रिकेट .

याॅर्कर's picture

1 Oct 2015 - 7:53 pm | याॅर्कर

फास्ट गोलंदाजांनी माझ्या आयडी नावाचा वापर भेदकपणे करावा.

श्रीगुरुजी's picture

2 Oct 2015 - 2:01 pm | श्रीगुरुजी

पुढील वर्षी चँपोयन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी बांगलादेशाला संधी मिळाली आहे आणि दुर्दैवीरित्या वेस्ट इंडिजला बाहेर जावे लागले आहे. या स्पर्धेसाठी तत्कालीन ८ सर्वोत्तम देशांच्या संघांना संधी मिळते. बांगलादेशाने अलिकडेच घरच्या मैदानावर लागोपाठ ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिका जिंकून सध्या ७ वे स्थान मिळविले आहे. पाकडे ८ व्या स्थानावर व विंडीज ९ व्या स्थानावर आहेत. विंडीज संघ बेभरवशाचा असला तरी स्पर्धेत हवा होता.

श्रीगुरुजींनी धागा काढल्या काढल्या रोहित शर्माची सेंच्युरी!!!

वा!!

श्रीगुरुजी's picture

2 Oct 2015 - 10:32 pm | श्रीगुरुजी

अरेरे! पहिल्याच सामन्यापासून अंदाज चुकायला लागलाय. आफ्रिकन्स विजयाच्या मार्गावर आहेत. ७ चेंडूत फक्त ११ धावा हव्यात.

श्रीगुरुजी's picture

2 Oct 2015 - 10:42 pm | श्रीगुरुजी

पहिलाच सामना हरलो. रोहीत शर्माचं धडाकेबाज शतक वाया गेलं. फाफडू वगळता आफ्रिकेचे सगळेच फलंदाज जोरदार खेळले.

माझा लेप्टॉप पारच गंडलाय ....स्क्रीनवर मला असं दिसतंय की श्रीगुरुजींनी रोहित शर्माच्या शतकाला धडाकेबाज लिहिलंय!!

हे कसं शक्य आहे? काय उपाय करावा या समस्येवर?

श्रीगुरुजी's picture

3 Oct 2015 - 8:17 pm | श्रीगुरुजी

उपहास समजला. नोंद घेतलेली आहे.

रोहित शर्माचे शतक धडाकेबाज होतंच. त्यात अजिबात शंका नाही.

अर्थात रोहीत शर्मा भारतात खेळत आहे हे विसरून चालणार नाही. विश्वचषक स्पर्धेत एक नवीन प्रमेय आकाराला येत होतं. ज्या सामन्यात रोहीत शर्मा अपयशी ठरायचा ते सर्व सामने भारताने जिंकले होते. या मालिकेतही तेच प्रमेय सिद्ध होतंय का ते बघू या. पुढील सामन्यांचा अंदाज मी रोहीत शर्माची त्या सामन्यातील कामगिरी बघून मगच व्यक्त करणार आहे. म

काय बोलू ??? हिरमोड झाला

chetanlakhs's picture

3 Oct 2015 - 6:47 am | chetanlakhs

आता पुन्हा धोनी ऐवजी विराट कसा योग्य आहे अशी मिडियाला खाज सुटेल
त्यात धोनीने रहाणेला बाहेर बसवून ह्या माकडांच्या हातात कोलित दिले

श्रीगुरुजी's picture

3 Oct 2015 - 8:19 pm | श्रीगुरुजी

तामिळनाडू वि. बडोदा रणजी सामना जबरदस्त चुरशीचा झाला. पहिल्या डावात जेमतेम १२५ धावा केलेल्या व ३४ धावांनी मागे पडलेल्या तामिळनाडूने दुसर्‍याही डावात फक्त १५५ धावा केल्या, परंतु बडोद्याला ११४ डावात गुंडाळून फक्त ७ धावांनी सामना जिंकला.

श्रीगुरुजी's picture

5 Oct 2015 - 9:18 pm | श्रीगुरुजी

लागोपाठ दुसर्‍या सामन्यात वाट लागली. धवन, रायडू, अक्षर पटेल दोन्ही सामन्यात अपयशी ठरले. रहाणेला का बाहेर ठेवले जात आहे आणि हरभजनला संघात का घेतले आहे हे अनाकलनीय आहे.

श्रीगुरुजी's picture

5 Oct 2015 - 11:14 pm | श्रीगुरुजी

दुसराही सामना हरलो. खूप वाईट पद्धतीने हरलो. भारत हरताना बघून निराश व संतप्त झालेल्या प्रेक्षकांनी पाण्याच्या बाटल्या मैदानात फेकल्याने २-३ वेळा सामना थांबवावा लागला व आफ्रिकेच्या विजयाला हुल्लडबाजीचे गालबोट लागले.

भारतात प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीने सामना थांबवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.

(१) १९७५ मध्ये नव्याने झालेल्या वानखेडे स्टेडियमवरील पहिल्याच भारत वि. वेस्ट इंडिज या कसोटी सामन्यात दुसर्‍या दिवशी चहापानाच्या आधी एक प्रेक्षक मैदानात घुसल्यावर पोलिसांनी त्याला जबरदस्त मारहाण केली. दूरदर्शनवर थेट प्रक्षेपित केलेला हा पहिलाच सामना. मालिकेतल्या पहिल्या ४ कसोटी सामन्यात २-२ अशी बरोबरी झाल्याने हा सामना ६ दिवसांचा होता. त्या प्रेक्षकाला मारहाण होत असताना बघून प्रेक्षक संतापले आणि त्यांनी स्टेडियममध्ये जाळपोळ सुरू केली. शेवटी त्या दिवसाचा चहापानानंतरचा खेळ रद्द केला गेला.

(२) १९८४ मध्ये भारत वि. इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामना पुण्यात नेहरू स्टेडियममध्ये खेळला गेला. हा सामना मी पॅव्हेलियनच्या बरोबर विरूद्ध दिशेला असलेल्या क्लब ऑफ महाराष्ट्रच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून बघितला होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करून ४५ षटकात २१५ धावा केल्या होत्या. त्यात वेंगसरकरचे शतक व श्रीकांतचे अर्धशतक होते. रवी शास्त्री, चेतन शर्मा, यशपाल शर्मा इ. खेळाडू भारतीय संघात होते.

इंग्लंडच्या सुरवातीच्या विकेट्स भरभर गेल्या. ६ बाद १४० अशा धावसंख्येवरून इंग्लंडने जोरदार फलंदाजी सुरू केली. माईक गॅटिंग जबरदस्त खेळत होता. भारत सामना हरतो आहे हे बघून हीराबाग स्टँडमधील प्रेक्षकांनी बीअरच्या तपकीरी बाटल्या मैदानात फेकायला सुरूवात केली. गॅलरीतून बघताना बाटल्यांचा अक्षरशः वर्षाव होता. सुमारे १५-२० मिनिटे सतत बाटल्या फेकल्या जात होत्या. किमान ५००-६०० बाटल्या मैदानात फेकल्या गेल्या असाव्यात. एक बाटली खूप आत पडून स्क्वेअर लेग अंपायरच्या जवळ जाऊन पडल्यावर सामना थांबविण्यात आला. स्टँडमध्ये पोलिस पाठविण्यात आले व मैदानातील बाटल्या साफ केल्यावर जवळपास अर्ध्यापाऊण तासाने सामना परत सुरू होऊन इंग्लंडने सामना जिंकला. गॅटिंगने नाबाद शतक झळकावले.

(३) १९९६ मधील विश्वचषकाच्या कलकत्त्यातील उपांत्य सामन्यात श्रीलंकेच्या २५० धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव १ बाद ८८ वरून ८ बाद ११२ असा कोसळला. अंतिम फेरीचे तिकिट हुकताना बघून संतापलेल्या प्रेक्षकांनी दंगल केल्याने सामना थांबवून श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आले.

(४) १९९९ मध्ये कलकत्त्यातील भारत वि. पाकिस्तान कसोटी सामन्यात सचिन तिसरी धाव घेत असताना शोएब अख्तर यष्टीसमोर त्याच्या मार्गात येऊन थांबला. सचिनने यष्ट्या व क्रीज नीट दिसत नसतानाही त्याच्या पायातून बॅट घालून क्रीजमध्ये टेकविली. त्यानंतर वेगात धावत येऊन थांबल्याने बॅट क्रीजमध्ये टेकविल्यानंतर काही क्षणाने किंचित उचलली गेली आणि नेमक्या त्याच क्षणी क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू यष्ट्यांवर आदळल्याने सचिनला धावबाद देण्यात आले. शोएब अख्तरने मुद्दाम मध्ये थांबून सचिनला धावबाद केले या समजूतीने संतापून प्रक्षकांनी दंगल सुरू केली व त्यामुळे सामना थांबविण्यात आला. सचिनने नंतर मैदानात फेरी मारून प्रेक्षकांना शांततेचे आवाहन केले. नंतर दुसर्‍या दिवशी एकाही प्रेक्षकाला स्टेडियममध्ये प्रवेश न देता सामना पुढे खेळविला गेला व त्यात पाकिस्तानचा विजय झाला.

(५) २००२ मध्ये भारत वि. वेस्ट इंडिजमध्ये ७ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली गेली. माझ्या आठवणीप्रमाणे त्यातील २-३ सामने प्रेक्षकांनी बाटल्या फेकल्यामुळे थांबविण्यात येऊन डकवर्थ-लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल लावला गेला.

(६) आणि हा आजचा प्रसंग. एकंदरीत भारतीयांना पराभव पचविणे अवघड जाते असे दिसत आहे.

फारएन्ड's picture

6 Oct 2015 - 2:35 am | फारएन्ड

गुरूजी #३ मधे एक बाद ९८ :). काहीकाही आकडे वर्षानुवर्षे डोक्यातून जात नाही. ते सचिन चे अर्ध्या सेमीने झालेले स्टंपिंग व नंतरचे क्लूलेस फलंदाज, सगळे लक्षात आहे.
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/65190.html

श्रीगुरुजी's picture

6 Oct 2015 - 9:13 am | श्रीगुरुजी

दुरूस्तीबद्दल धन्यवाद! वरील यादीपैकी हा एकमेव सामना पाहिलेला नव्हता. त्यामुळे आकडा अंदाजे लिहिला होता.

avyakta's picture

6 Oct 2015 - 7:32 am | avyakta

गुरूजी,
क्र. १ मध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपित केलेला हा पहिलाच सामना असेल असे वाटत नाही. मला स्वता:ला ७२-७३ मधे वाडेकर-लुईस यांच्या संघातला सामना(ब्रेबोर्न स्टेडियम) दूरदर्शनवर पाहिल्याचे आठवत आहे. उदा. विश्वनाथचे शतक झाल्यावर टोनी ग्रेगने त्याला उचलून घेत्ले होते तो क्षण. अजून एक कारण म्हणजे ज्यांच्याकडे दूरचित्रवाणी संच होता, ते कुटुंबीय आम्हा मित्रमंडळींकडून दिवसाचे १-२ रू. घेत असत.

श्रीगुरुजी's picture

6 Oct 2015 - 9:33 am | श्रीगुरुजी

नरोत्तम पुरींच्या खालील लेखानुसार भारतात सर्वात पहिल्यांदा दूरदर्शनवर दाखविलेला सामना २० डिसेंबर १९६६ या दिवशी खेळला गेला होता. त्यावर्षी गॅरी सोबर्सच्या नेतृत्वाखाली विंडीज संघ भारताचा दौरा करीत होता. दिल्लीत एकही कसोटी सामना आयोजित केलेला नसल्याने पंतप्रधान-११ वि. वेस्ट इंडीज हा सामना दिल्लीत खेळला गेला आणि त्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर करण्यात आले होते.

http://m.ibnlive.com/cricketnext/news/india-first-live-cricket-telecast-...

तुम्ही म्हणता तो ७२-७३ मधील कसोटी सामना दूरदर्शनवर दाखविल्याचे आठवत नाही. भारतात दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण केलेला सर्वात पहिला कसोटी सामना कोणता हे गुगलवर शोधून सुद्धा सापडले नाही. ज्या लि़ंक्स येत आहेत त्यात या ७२-७३ मधील सामन्याचा किंवा ७५ मधील सामन्याचा उल्लेख नाही.

मझ्या मते मुंबई दूरदर्शन केंद्र तेव्हा नुकतेच चालू झाले होते व त्यची प्रक्षेपण क्षमता जास्त नव्हती. फार-फार तर वरळी केंद्रापासून ५० कि.मी. पर्यंत असेल(असा माझा अंदाज, जाणकार यावर अधिक माहिती देउ शकतील).याशिवाय दूरदर्शनकडे archiving ची सोय त्या वेळेस असेल का याबाबत शंका आहे, जरी असली तरी आता ते जतन केले असेल कि नाही हा प्रश्न आहेच.

श्रीगुरुजी's picture

8 Oct 2015 - 10:50 pm | श्रीगुरुजी

तिसरा ट-२० सामना पावसामुळे रद्द झाला. ३ सामन्यांची मालिका द. आफ्रिकेने २-० अशी जिंकली.

आता रविवारी ११ तारखेला पहिला एकदिवसीय सामना दुपारी १:३० वाजता सुरू होईल. निदान एकदिवसीय सामन्यात तरी भारताची कामगिरी सुधारावी हीच सदिच्छा!

श्रीगुरुजी's picture

9 Oct 2015 - 1:40 pm | श्रीगुरुजी

एक दुरूस्ती. पहिला एकदिवसीय सामना सकाळी ९ वाजता सुरू होईल. उर्वरीत सामने दुपारी १:३० वाजता सुरू होतील.

असंका's picture

11 Oct 2015 - 12:10 pm | असंका

धन्यवाद श्रीगुरुजी....आप्ल्यामुळे मॅच बघाय्चं प्लान करता आलं..

ए बी डीविलीयर्स काय खेळतोय!!! डोळ्याचं पारणं फिटतंय.....

माझीही शॅम्पेन's picture

11 Oct 2015 - 12:34 pm | माझीही शॅम्पेन

south Africa चे ३०३ झाले AB Devillers शतक झाले

ए बी डीविलीयर्स ला पब्लिक सपोर्ट!!! ९८ वर स्ट्राइक मिळाल्यावर टाळ्या... यादवच्या डॉट बॉलला टाळ्या पडल्या नाहीत...वर यादवला सिक्सर पडून सेंच्युरी झाल्यावर परत उभे राहून टाळ्या!!!

मैं कहां हूं!!

खटपट्या's picture

11 Oct 2015 - 7:26 pm | खटपट्या

चांगल्या क्रिकेट ला टाळ्या मिळतायत.

फूल्ल-बॉटल, लेमन-वॉटर पिवून, नाना प्रकारे गहनविचार आणि हितोपदेश रेकणारे न आल्याने अंमळ निराशाच झाली.

श्रीगुरुजी's picture

11 Oct 2015 - 8:20 pm | श्रीगुरुजी

खूपच चांगला सामना झाला. एबीडी च्या तडाखेबंद शतकाला त्याच्यापेक्षाही जास्त तडाखेबंद शतक झळकावून रोहीत शर्माने त्याच्यावर मात केली (रोहीत शर्माचं कौतुक करावं लागतंय!). रोहीत शर्मा खरोखरच जबरदस्त खेळला. परंतु अगदी मोक्याच्या वेळी विकेट फेकून अगदी सॉफ्ट पद्धतीने बाद झाला.

४० व्या षटकापर्यंत भारत अगदी सहज जिंकतो आहे अशी परिस्थिती होती. सामना संपूर्णपणे भारताच्या हातात होता. परंतु शेवटच्या १० षटकात माती खायची परंपरा भारताने अबाधित राखली. २०११ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ३९ व्या षटकात १ बाद २६९ अशी जबरदस्त स्थिती असलेल्या भारताचा संपूर्ण डाव ५० व्या षटकाच्या आधीच २९६ वर संपून शेवटी सामना गमावला होता. २०१५ च्या विश्वचषकात पाकडे आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ४० व्या षटकापर्यंत खूप चांगला धावफलक असलेल्या भारताला शेवटच्या १० षटकात अनेक बळी गमावून तुलनेने खूपच कमी धावा करता आल्या होत्या. आजही तसेच झाले आणि भारत जेमतेम ५ धावांनी हरला. दुर्दैव!

स्नायू दुखापतीमुळे अश्विनला पूर्ण षटके टाकता न आल्याचाही भारताला फटका बसला. आफ्रिकेने शेवटच्या ६ षटकांत ८६ धावा केल्या. अश्विन असता तर किमान १०-१५ धावा कमी झाल्या असत्या. फलंदाजी करताना धवनही पंच विनीत कुलकर्णींच्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला. याच विनीत कुलकर्णींनी पहिल्या ट-२० सामन्यात भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर १७ व्या षटकात ड्युमिनी व्यवस्थित पायचीत असताना त्याला नाबाद देण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता आणि हाच ड्युमिनी आफ्रिकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

असो. श्रीलंकेत भारत जिंकल्याने व २ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाला भारताने भारतात ४-० असे चारीमुंड्या चीत केल्याने भारत भारतात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सहज जिंकेल असे वाटले होते. परंतु अजूनतरी विजय भारतापासून दूरच आहे. परंतु मालिका एकतर्फी न होता खूपच चुरशीची होईल असे दिसत आहे.

मी क्रिकेट पहात नाही तरी पेपरात वाचुन एक मत बनवलय-
दक्षिण आफ्रीका भारतात खेळलेला सराव सामना हरली होती म्हणे(चालु दोर्यावार).
पुढे काय झाल.bcci वाले गाफील राहिले.
मानसिकतेचा विजय असो.

श्रीगुरुजी's picture

13 Oct 2015 - 8:18 pm | श्रीगुरुजी

उद्या १:३० वाजता इंदूर येथे दुसरा एकदिवसीय सामना आहे. अश्विन स्नायुदुखीमुळे उर्वरीत सामने खेळणार नाही. त्याच्याऐवजी हरभजनला घेतले आहे.

सौंदाळा's picture

14 Oct 2015 - 5:24 pm | सौंदाळा

भारत ५० षटकात २४७/९
धोनी नाबाद ९२
काही खरे नाही या सामन्यात पण

श्रीगुरुजी's picture

14 Oct 2015 - 5:45 pm | श्रीगुरुजी

धोनी जबरदस्त खेळला. भारत २०० तरी करेल का नाही अशी एकवेळ परिस्थिती होती. परंतु धोनीने एक बाजू लावून ठेवून धावा केल्या आणि दुसर्‍या बाजूने धोनीला अक्षर पटेल, भुवनेश्वर व भज्जीने उपयुक्त साथ दिल्यामुळे भारत २४७ पर्यंत पोहोचला. आता गोलंदाजांवर सामना अवलंबून आहे. आमला, एबीडी आणि ड्यूमिनीला लवकर काढता आले तर सामना भारत जिंकू शकतो.

संघ निवडीबद्दल धोनीला नक्कीच शिव्या बसणार. अमित मिश्राऐवजी अक्षर पटेलला घेणे फारसे पटलेले नाही. बघूया काय होतंय ते.

रैना, धवन व कोहलीचे अपयश चिंताजनक आहे.

धोणीने टीकाकारांची तोंडे चांगलीच बंद केली म्हणायला पाहिजे....

श्रीगुरुजी's picture

14 Oct 2015 - 6:24 pm | श्रीगुरुजी

२ बळी गेल्यामुळे सामन्यात काहीशी रंगत आली आहे. आमला फारसा टिकला नाही. सामना अगदीच एकतर्फी होत नाहीय्ये. आता एबीडी आणि ड्युमिनीला स्वस्तात काढले तर सामना भारताच्या बाजूला झुकेल.

सौंदाळा's picture

14 Oct 2015 - 6:31 pm | सौंदाळा

+१
तिसरी, चौथी विकेट लवकर मिळायला हवी.

अद्द्या's picture

14 Oct 2015 - 6:31 pm | अद्द्या

थोड्या थोड्या वेळानी विकेट जात राहिल्या तर जबरा रंगत येईल .

Lets hope for the best

एबीडी गेला...आता मजा येणार असं दिसतंय..

श्रीगुरुजी's picture

14 Oct 2015 - 10:55 pm | श्रीगुरुजी

जिंकलो शेवटी. दुर्दैवाने आफ्रिकेची फलंदाजी बघायला मिळाली नाही. खूप दिवसांनी जुना धोनी पहायला मिळाला.

इंग्लंड-पाकिस्तान पहिल्या कसोटीत पाकड्यांनी ५२३/८ वर डाव घोषित केल्यावर इंग्लंडने नाबाद ५६ धावा केल्यात. संघात परतलेल्या शोएब मलिकने द्विशतक काढले. एकीकडे सानिया मिर्झा हिंगीसच्या साथीत टेनिस कोर्ट गाजवत आहे तर दुसरीकडे क्रिकेटमध्ये तिचे यजमान भरात आलेत.

श्रीलंका-विंडीज पहिल्या कसोटीत लंकेने संथ फलंदाजी करून दिवसअखेर २५०/२ अशी धावसंख्या रचलेली आहे.

सौंदाळा's picture

15 Oct 2015 - 10:24 am | सौंदाळा

जिंकलो
१३४/२ बघुन आफ्रिका सामना सहज जिंकेल वाटत होते. पण नंतर ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेले.
आता या विजयापासुन प्रेरणा घेऊन भारतीय संघ पुढील सामन्यांमधे अशीच कामगिरी करो हीच इच्छा.

अद्द्या's picture

15 Oct 2015 - 10:26 am | अद्द्या

+1

धनावडे's picture

15 Oct 2015 - 4:12 pm | धनावडे

http://m.esakal.com/details.aspx?sid=28&sn=ताज्या बातम्या#5735453585640318540
झहिर खानची आंतराष्ट्रीय क्रिकेट मधुन निवृत्ति

श्रीगुरुजी's picture

15 Oct 2015 - 11:00 pm | श्रीगुरुजी

अरेरे! एक चांगला खेळाडू निवृत्त झाला. २०११ ची विश्वचषक स्पर्धा जिंकण्यामध्ये झहीरचा सिंहाचा वाटा होता. ९ सामन्यात २१ बळी ही कामगिरी जबरदस्त होती. एका अर्थाने तो त्या स्पर्धेत भारताचे ब्रह्मास्त्र होता. अत्यंत आक्रमक गोलंदाजी व भेदक यॉर्कर ही त्याची प्रमुख अस्त्रे होती.

बिचारा २०११ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर दुखण्याने हैराण झाला. कमी सामने खेळता आल्याने गोलंदाजीची लय बिघडली व भेदकताही कमी झाली. वाढत्या वयाचाही परीणाम झाला. परीणामी संघातील स्थान गमाविले व आता तो परत संघात येण्याची शक्यता जवळपास शून्य आहे. त्यामुळे निवृत्तीचा योग्य तोच निर्णय घेतला.

भविष्यात त्याने गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करून उत्तम गोलंदाज घडवावेत अशी इच्छा आहे.

श्रीगुरुजी's picture

17 Oct 2015 - 5:58 pm | श्रीगुरुजी

श्रीलंकेने विंडीजला पहिल्या कसोटीत १ डाव व ६ धावांनी हरविले.

दुसरीकडे पाकडे वि. इंग्लंड कसोटी सामना अनिर्णित अवस्थेत संपल्यातच जमा आहे. ज्या सामन्यात पहिल्या ४ दिवसात २० खेळाडू सुद्धा बाद होत नाहीत व ज्यात २ द्विशतके, १ शतक व ४ अर्धशतके होतात, तिथे असाच निर्णय लागतो. अर्थात हा सामना ५ व्या दिवशी अचानक जिवंत झाला आहे. इंग्लंडला पहिल्या डावात ७५ धावांची आघाडी मिळाल्यावर पाकड्यांची अवस्था ७ बाद १६८ झाली आहे. अजून जवळपास २३ षटके शिल्लक आहेत आणि पाकड्यांकडे फक्त ९३ धावांची आघाडी आहे. जर इंग्लंडला पाकड्यांचे उर्वरीत ३ गडी लवकर बाद करता आले आणि १५-१८ षटकात अंदाजे १०० धावांचे लक्ष्य असेल, तर इंग्लंड जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.