क्रिकेट

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in क्रिडा जगत
1 Oct 2015 - 12:59 pm

क्रिकेटवर मी पूर्वी ३-४ धागे काढले होते. प्रत्येक धागा एका विशिष्ट मालिकेसाठी/स्पर्धेसाठी होता. ती मालिका/स्पर्धा संपल्यावर धाग्याचे आयुष्य संपले. विश्वचषक स्पर्धा मार्च २०१५ मध्ये संपली. परंतु वर्षभर जगात कोठे ना कोठे तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने होतच राहतात. त्यासाठी हा एक कॉमन धागा आहे. सध्या चालू असलेले सामने/स्पर्धा/मालिका इ. विषयी इथे लिहिता येईल.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

31 Jul 2016 - 2:15 pm | श्रीगुरुजी

६३ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर ओकीफने चौकार मारून ऑसीजच्या धावसंख्या १६१ वर नेली. त्यानंतर ८९ व्या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा डाव १६१ धावांवरच संपला. म्हणजे ऑस्ट्रेलियाने शेवटची २५.४ (१५४ चेंडू) सलग षटके निर्धाव खेळून काढली. हा एक जागतिक विक्रम आहे.

हा सामना गतवर्षी भारत वि. श्रीलंका यांच्यात झालेल्या गॅले येथील पहिल्या सामन्यासारखाच झाला. त्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना फक्त १८३ धावा केल्या होत्या. प्रत्त्युत्तरादाखल भारताने पहिल्या डावात ३७५ धावा करून तब्बल १९२ धावांची आघाडी घेतली. श्रीलंकेचा दुसरा डाव कोसळला. सुरवातीला ३ बाद ५ व नंतर ५ बाद ९५ अशी वाईट अवस्था झाल्यावर चंडिमलने नाबाद १६२ धावा करून श्रीलंकेला ३६७ धावा गाठून दिल्या. भारताल विजयासाठी फक्त १७६ धावा करायच्या होत्या. वेळ भरपूर होता. परंतु हेराथच्या फिरकीसमोर भारताचा डाव कोसळून भारत तो सामना ६३ धावांनी हरला. हेराथने ७ बळी घेऊन भारताचे कंबरडे मोडले.

या सामन्यातही श्रीलंकेचा पहिला डाव कोसळला होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ८६ धावांची आघाडी मिळविली होती. दुसर्‍या डावात श्रीलंकेची सुरवातीला २ बाद ६ व नंतर ४ बाद ८६ अशी वाईट अवस्था असताना कुसल मेंडिसने १७६ धावा करून श्रीलंकेला ३५३ अशी समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. विजयासाठी भरपूर वेळ असताना व २६८ धावा करायच्या असताना ऑस्ट्रेलियाचा डाव फक्त १६१ धावात संपला. हेराथने पहिल्या डावात ४ व दुसर्‍या डावात ५ बळी घेऊन ऑसीजला नमविले.

या दोन्ही सामन्यात बरेच साम्य आहे. मागील वर्षी त्या मालिकेतील पहिला सामना हरल्यानंतर भारताने उर्वरीत दोन सामने जिंकून कसोटी मालिका २-१ अशी जिंकली होती. या मालिकेत ऑस्ट्रेलिया तसाच कमबॅक करेल का ते पहायचं.

बेकार तरुण's picture

1 Aug 2016 - 6:50 am | बेकार तरुण

आता बहुतेक टेस्ट मधे रनर घेता येत नाही, नवीन नियमावली नुसार (एकदा खात्री करुन घेतली पाहिजे)
कांगारू हरले, मजा आली.

श्रीगुरुजी's picture

1 Aug 2016 - 2:30 pm | श्रीगुरुजी

आता कोणत्याच सामन्यात रनर घेता येत नाही. एखादा फलंदाज जखमी असेल तर फलंदाजी न करणे किंवा जायबंदी अवस्थेत फलंदाजी करणे हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. परंतु क्षेत्ररक्षण करताना फक्त क्षेत्ररक्षणासाठी राखीव खेळाडू जखमी खेळाडूच्या जागी क्षेत्ररक्षण करू शकतो.

श्रीगुरुजी's picture

31 Jul 2016 - 2:18 pm | श्रीगुरुजी

विंडीज विरूद्ध दुसर्‍या कसोटीत विंडीजला पहिल्या डावात फक्त १९६ धावा करता आल्या. उत्तरादाखल पहिल्या दिवसाखेर भारताने १ बाद १२६ अशी भक्कम सुरूवात केली आहे. हा सामनासुद्धा भारत डावाने जिंकेल असा अंदाज आहे.

उडन खटोला's picture

1 Aug 2016 - 9:36 am | उडन खटोला

क्या डाव डाव करता है?
3w सोडा नंतरचे ambrose, walsh असताना स्वप्न तरी पडायचं का विंडीज ना त्यांच्या खेळपट्टयावर हरवायचं?
लिंबुटीम्बू कंपनी बरोबर जिंकायची मजा काय आहे?

म्हणे डावाने विजय. अरे ह्याट्ट! (हलकं घ्या ;) )

श्रीगुरुजी's picture

1 Aug 2016 - 2:28 pm | श्रीगुरुजी

सध्याची विंडीज टीम म्हणजे लिंबूटिंबूंचा भरणा आहे. त्यांना हरविण्यात तशी मजा नाही. भारताने खरं तर विंडीजच्या दौर्‍यावर आपला दुय्यम संघ पाठवायला हवा होता ज्यात श्रेयस अय्यर, केदार जाधव इ. खेळाडू घ्यायला हवे होते. अर्थात तरीही भारतच जिंकला असता.

बेकार तरुण's picture

1 Aug 2016 - 3:59 pm | बेकार तरुण

अगदीच मान्य आहे !!
बघवत नाही विंडीजची अवस्था, त्यात कॉमेंट्री करायला किंग रिचर्ड्स !! बिचारा !!
परवा उमेश यादव विंडीजच्या नं १० -११ फलंदाजांना खुन्नस देत होता बाउन्सर टाकुन, २५-३० वर्षापुर्वी कोणी असं केलं असतं तर बहुतेक त्याच्याच टीम मेंबर्सनी धरुन धुतला असता (अपवाद बहुतेक फक्त डेनीस लिलीचाच)

सध्या बहुतेक विंडीज बोर्ड कोच आणी कॅप्टन यांना फक्त पगार देउन ईतर १० लोक टीमबस मधे पहिले जो पोचेल त्याला बिनापगार खेळायला मिळेल तत्वावर टीम निवडतात बहुतेक !

उडन खटोला's picture

3 Aug 2016 - 12:09 pm | उडन खटोला

अरे गुरुजी, खरंच डाव होतोय बहुतेक. ;)

पुन्हा डावाने विजय होणार.

विंडीज १९६ऑल आऊट आणि ४८/४
भारत ५००/९ घोषित.
(उरलेला एक दिवस क्लबात)

श्रीगुरुजी's picture

2 Aug 2016 - 3:44 pm | श्रीगुरुजी

भारत ९ बाद ५००. एकूण ३०४ धावांची आघाडी.

श्रीगुरुजी's picture

2 Aug 2016 - 11:29 pm | श्रीगुरुजी

पडझड सुरु झाली. विंडीज ३ बाद ४३. सामना आजच संपणार बहुतेक.

अभिदेश's picture

2 Aug 2016 - 11:33 pm | अभिदेश

झालेत...

कबीरा's picture

3 Aug 2016 - 10:49 am | कबीरा

जम्बोबाबा खुश असतील.प्रशिक्षकपदाची कारकीर्द विंडीज दौऱ्यापासून सुरु झाली हे बरे. इंग्लंड,ऑस्ट्रेलिया दौरा असता तर.....झाकली मूठ सव्वा लाखाची.

भारत वेस्ट इंडिज मालिकेबद्दल मुंबई क्रिकेटच्या भाषेत बोलायचं तर A डिव्हीजनच्या संघाचा सामना G डिव्हीजनच्या संघासोबत सुरू आहे.आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये २ डिव्हीजन करणे आवश्यक आहे.तरच कसोटी क्रिकेट बघायला मजा येईल.

बाळ सप्रे's picture

3 Aug 2016 - 12:30 pm | बाळ सप्रे

पाउस विचका करणार की काय?? :-(

श्रीगुरुजी's picture

3 Aug 2016 - 2:46 pm | श्रीगुरुजी

पावसामुळे पंचाईत झाली आहे. आजही पाउस कायम राहिला तर सामना अनिर्णित राहील. ४ बाद ४८ वरून भारताला सामना जिंकण्यासाठी अजून ६ बळी घेणे आवश्यक आहे व त्यासाठी किमान ३ तास तरी खेळ व्हायला हवा.

विंडीजची फलंदाजी इतकी वाईट होत आहे याचे वाईट वाटत आहे. सध्याच्या संघातील त्यातल्या त्यात बरा खेळाडू म्हणजे डॅरेन ब्राव्हो. काही महिन्यांपूर्वी भारतात ट-२० विश्वकरंडकाची स्पर्धा होती. त्यावेळी विंडीज संघात डॅरेन ब्राव्होचा समावेश केला होता. आपल्याला कसोटी सामन्यांवर जास्त लक्ष केंद्रीत करायचे आहे असे सांगून त्याने ट-२० च्या संघातून माघार घेतली होती. दुर्दैवाने पहिल्या २ कसोटीतील चारही डावात तो अपयशी ठरला आहे. फिरकी गोलंदाज नरिनेला का खेळविले जात नाही ते समजत नाही. मालिका सुरू होण्याआधी काही दिवस त्यातल्या त्यात बरा गोलंदाज असलेल्या जेरमी टेलरने अचानक निवृत्ती जाहीर केली. लेंडल सिमन्स, गेल इ. खेळाडू कसोटीपासून दूर आहेत. सॅमी देखील संघात नाही. त्यामुळे विंडीजचा संघ अत्यंत दुर्बल झाला आहे.

श्रीगुरुजी's picture

3 Aug 2016 - 11:23 pm | श्रीगुरुजी

विंडीज अनपेक्षितरित्या सामना वाचवताना दिसताहेत. ५ बाद २१८. अजून ५८ षटके शिल्लक आहेत.

बेकार तरुण's picture

4 Aug 2016 - 6:52 am | बेकार तरुण

वाचवला सामना विंडीजनी!

श्रीगुरुजी's picture

4 Aug 2016 - 2:05 pm | श्रीगुरुजी

विंडीजच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी काल उत्कृष्ट व वेगवान फलंदाजी करून सामना वाचविला. भारत डावाने अगदी सहज विजय मिळवेल हा अंदाज चुकीचा ठरला. विंडीजच्या काही खेळाडूंना सूर गवसला ही आनंदाची गोष्ट आहे. या सामन्याप्रमाणेच पुढील सामनेही एकतर्फी होऊ नयेत ही सदिच्छा. ७० आणि ८० च्या दशकातील प्रबळ विंडीज संघ परतावा अशी इच्छा आहे.

श्रीगुरुजी's picture

4 Aug 2016 - 2:06 pm | श्रीगुरुजी

काल इंग्लंड वि. पाकडे यांच्यातील तिसर्‍या कसोटीत पाकड्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली व इंग्लंडचा डाव २९७ धावात संपविला. एकंदरीत पाकडे इंग्लंडमध्ये यजमानांना चांगली झुंज देत आहेत.

श्रीगुरुजी's picture

4 Aug 2016 - 8:46 pm | श्रीगुरुजी

श्रीलंका वि. ऑसीज, पहिल्या दिवसअखेर लंका सर्वबाद २८१, ऑसीज २ बाद ५४.

इंग्लंड वि. पाकडे, दुसर्‍या दिवशी आतापर्यंत इंग्लंड सर्वबाद २९७, पाकडे १ बाद १६०.

श्रीगुरुजी's picture

6 Aug 2016 - 3:20 pm | श्रीगुरुजी

लंकेने ऑसीजची दुसर्‍या कसोटीतही दाणादाण उडविली. सामन्याच्या तिसर्‍याच दिवशी ऑसीजचा दुसरा डाव लंकेने फक्त १८३ धावात संपवून तब्बल २२९ धावांनी विजय मिळविला. ऑसीजना एकंदरीत फिरकीसमोर काहीही करता येत नाही असं दिसतंय. भारताविरूद्ध ४, पाकड्यांविरूद्ध २ आणि आता लंकेविरूद्ध २ कसोटी सामने हरल्यामुळे ऑसीज आता आशियायी संघाविरूद्ध उपखंडात लागोपाठ ८ कसोटी सामने हरलेले आहेत.

श्रीगुरुजी's picture

10 Aug 2016 - 3:28 pm | श्रीगुरुजी

कालपासून विंडीजविरूद्धचा तिसरा कसोटी सामना सुरू झाला. दुसरा सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळाल्यामुळे विंडीजचा आत्मविश्वास बर्‍यापैकी वाढलेला दिसतो. काल नाणेफेक जिंकून विंडीजने चक्क क्षेत्ररक्षण पत्करले व सुरवातीला भारताला जोरदार धक्के देऊन ४ बाद ८७ अशी वाईट अवस्था केली. अल्झारी जोसेफ नामक १९ वर्षीय मध्यमगती गोलंदाजाने पदार्पणातच चक्क कोहलीला उसळत्या चेंडूवर फक्त ३ धावांवर बाद केले. शेवटी पुन्हा एकदा अश्विन तळपला व दिवसाखेर संथ फलंदाजी करून भारताने ५ बाद २३४ धावा केल्या.

बाळ सप्रे's picture

10 Aug 2016 - 4:30 pm | बाळ सप्रे

रोहीत शर्माच्या निवडीचा उल्लेख पण नाही!! ;-)

श्रीगुरुजी's picture

11 Aug 2016 - 12:20 am | श्रीगुरुजी

उल्लेखनीय कामगिरी केली असती तर नक्की उल्लेख केला असता.

श्रीगुरुजी's picture

11 Aug 2016 - 12:19 am | श्रीगुरुजी

५ बाद ३३९ वरून सर्वबाद ३५३. भारताची फलंदाजी मूळपदावर आलेली दिसते.

श्रीगुरुजी's picture

13 Aug 2016 - 2:56 pm | श्रीगुरुजी

भारत वि. विंडीज तिसरा कसोटी सामना - ४ थ्या दिवसाखेर भारत ३ बाद १५७. भारताकडे एकूण २८५ धावांची आघाडी. भारताच्या पहिल्या डावातील ३५३ धावांचा पाठलाग करताना एकवेळ विंडीजची स्थिती ३ बाद २०२ इतकी मजबूत होती. पण अचानक भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर त्यांचा डाव कोसळला व सर्वबाद २२५ अशी वाईट अवस्था झाली. पावसामुळे एक दिवस पूर्ण वाया गेला आहे. आज साधारणपणे ३२५ धावांचे लक्ष्य ठेवून भारत डाव घोषित करेल. उर्वरीत ५ तासात विंडीजचा डाव संपविणे तितकेसे अवघड नाही.

पाकडे वि. इंग्लंड ४ था कसोटी सामना - इंग्लंड पहिला डाव ३२८, पाकडे दुसर्‍या दिवसाखेर ६ बाद ३४०

श्रीलंका वि. ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना - पहिल्या दिवशी श्रीलंकेची ५ बाद २६ इतकी दारूण अवस्था होती. परंतु नंतर डाव सावरून चहापानापर्यंत लंका ५ बाद १४१.

भारत २१७/७ डाव घोषित. रोहित शर्मा ४१ (५९) तीन षटकारांसह.

गामा पैलवान's picture

14 Aug 2016 - 12:42 am | गामा पैलवान

जिंकले हो, बक्की (=BCCI) जिंकले एकदाचे. वेस्ट इंडीज पारंच ढेपाळले. तीनआकडी धावसंख्या कशीबशी गाठली.
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

14 Aug 2016 - 7:00 pm | श्रीगुरुजी

विंडीजची फलंदाजी अत्यंत बेभरवशाची आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. विंडीजच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी झुंझार फलंदाजी करून दुसरा कसोटी सामना वाचविला होता. तिसर्‍या कसोटीतही ३ बाद २०२ अशी भक्कम स्थिती होती. अचानक डाव कोसळून सर्वबाद २२५ अशी दारूण अवस्था झाली. सामन्याचा एक संपूर्ण दिवस पावसाने वाया गेला होता. सामन्याच्या शेवटच्या दिवशी विंडीजला फक्त ५ तास टिकूण राहणे आवश्यक होते. पण तेही जमले नाही. भारताने ४ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. विंडीजमध्ये प्रथमच भारताने एकापेक्षा जास्त कसोटी सामने जिंकले आहेत. २०१४ मध्ये इंग्लंडविरूद्ध भारताचे लागोपाठ ३ डाव ४५ षटकांच्या आत म्हणजे जेमतेम ३ तासात संपले होते. त्या दारूण पराभवांची यानिमित्ताने आठवण झाली.

दुसरीकडे पाकड्यांविरूद्धच्या ४ थ्या कसोटीत इंग्लंड जवळपास हरल्यातच जमा आहे. पहिल्या डावात २१४ धावांनी मागे पडलेल्या इंग्लंडची दुसर्‍या डावात ८ बाद २१७ अशी ४ थ्या दिवशीच दारूण अवस्था आहे. इंग्लंडचा पराभव नक्की आहे. मालिका २-२ अशी बरोबरीत सुटणार.

श्रीलंकेविरूद्ध दुसर्‍या दिवसाखेर ऑसीजने १ बाद १४१ अशी चांगली सुरूवात केली आहे. तत्पूर्वी लंकेने ५ बाद २६ अश्या गंभीर परिस्थितीतून सर्वबाद ३५५ अशी भक्कम धावसंख्या गाठली. ३ सामन्यांच्या मालिकेत लंका २-० या फरकाने आघाडीवर आहे.

श्रीगुरुजी's picture

17 Aug 2016 - 2:31 pm | श्रीगुरुजी

मूर्ख ऑसीज लंकेविरूद्ध तिसरा कसोटी सामनाही हरले. लंकेने त्यांना स्वतःच्या भूमीवर ३-० असा व्हाईट वॉश दिला. यापूर्वी ते भारतात ४ सामन्यांची मालिका ४-० अशी हरले होते व काही महिन्यांपूर्वी त्यांना पाकड्यांनी २-० असे हरविले होते. आशियायी संघाविरूद्ध आशियात ते लागोपाठ ९ कसोटी सामने हरले आहेत.

तिसर्‍या कसोटीतही दोन्ही डावात गोलंदाजांनी चांगली सुरूवात देऊनही लंकेच्या मधल्या फळीने ऑसीजच्या नाकात दम आणला. लंकेची पहिल्या डावात ५ बाद २६ अशी अत्यंत वाईट अवस्था असताना लंकेने तब्बल ३५५ पर्यंत मजल मारली. नंतर ऑसीजने बर्‍यापैकी फलंदाजी करून ३७९ धावा करून २४ धावांची आघाडी मिळवून लंकेची दुसर्‍या डावात ४ बाद ९८ अशी वाईट परिस्थिती केली होती. परंतु पुन्हा एकदा लंकेने डाव सावरून ८ बाद ३४७ पर्यंत मजल मारून पाचव्या दिवशी १ तास खेळ करून ऑसीजना विजयासाठी ५ तासात ३२४ धाव करायचे आव्हान दिले. ऑसीजला ते आव्हान पेलविले नाही व त्यांचा दुसरा डाव जेमतेम ४४.१ षटकात संपला व लंकेने तब्बल १६० धावांनी विजय मिळविला. या सामन्यात हेराथने पहिल्या डावात ३३ धावा केल्या व गोलंदाजीत पहिल्या डावात ६ व दुसर्‍या डावात ७ बळी मिळविले. त्याने संपूर्ण मालिकेत एकूण २८ बळी मिळवून ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले.

श्रीगुरुजी's picture

27 Aug 2016 - 3:39 pm | श्रीगुरुजी

२०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत विंडीजने ३१० अशी धावसंख्या उभारल्यावर पाकिस्तानची केवळ ४ थ्या षटकात ४ बाद १ अशी दारूण अवस्था झाली होती.

आज इंग्लंडविरूद्ध दुसरा एकदिवसीय सामना खेळताना पाकड्यांची अवस्था ३.१ षटकात ३ बाद २ अशी दारूण झालेली आहे.

लोकहो,

एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने पाकविरुद्ध ४४४/३ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. जुना विक्रम श्रीलंकेच्या नेदरल्यांडविरुद्ध ४४३ धावांचा होता. अलेक्स हेल्सने १७१ धावा काढून ग्लेन टर्नरच्या धावसंख्येशी बरोबरी केली. जर टिकला असता तर रोहित शर्माचा विक्रम धोक्यात आला असता.

पाकिस्तान कसं प्रत्युत्तर देतंय ते बघूया.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

30 Aug 2016 - 11:01 pm | श्रीगुरुजी

वहाब रियाझने १० षटकात ११० धावा दिल्या. हा पण विक्रम असावा.

श्रीगुरुजी's picture

22 Sep 2016 - 2:05 pm | श्रीगुरुजी

आजपासून भारत वि. न्यूझीलँड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूर येथे सुरू झालाय. हा भारताचा ५०० वा कसोटी सामना आहे. या मालिकेत एकूण ३ कसोटी सामने आहेत. आतापर्यंत भारताच्या ३ बाद १८५ धावा झालेल्या आहेत.

भरगच्च मोसमात घरच्या मैदानावर १३ कसोटी सामने आहेत. न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया असे तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहेत. एक कसोटी बांगलादेशाविरुद्धही आहे. त्यांची भारतातील पहिलीच.

१३ पैकी ८-९ सामने तरी जिंकावेत अशी अपेक्षा आहे.
मुख्य म्हणजे पुणे इंदोर सारख्या शहरात कसोटी सामने होण्याची पहिलीच वेळ आहे.

लक्षवेधी कामगिरी करण्याची सर्वच खेळाडूंना सुवर्ण संधी आहे.. पाहूया कोण त्याचे सोने करतो ते.

श्रीगुरुजी's picture

23 Sep 2016 - 12:31 am | श्रीगुरुजी

भारत दिवसाखेर ९ बाद २९१. १ बाद १५४ इतक्या भक्कम अवस्थेतून बरीच पडझड झाली.

श्रीगुरुजी's picture

24 Sep 2016 - 11:34 pm | श्रीगुरुजी

तिसर्‍या दिवसाखेर भारत दुसर्‍या डावात १ बाद १९१. पहिल्या डावात ५६ धावांची आघाडी मिळवून भारताकडे एकूण २४५ धावांची आघाडी आहे. पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारत जोरात होता. परंतु पहिल्या दिवसाची उर्वरीत २ सत्रे व नंतर दुसर्‍या दिवसाची पहिली २ सत्रे किवीजने उत्तम कामगिरी केली. परंतु तिसरा दिवस पूर्णपणे भारताच्या नावावर लागला. जर पावसाने वेळ वाया गेला नाही तर भारत हा सामना अगदी सहज जिंकेल.

श्रीगुरुजी's picture

26 Sep 2016 - 3:54 pm | श्रीगुरुजी

भारताच्या फिरकी गोलंदाजांपुढे पुन्हा एकदा परदेशी संघांनी नांगी टाकली. भारत पहिल्या कसोटीत १९७ धावांनी विजयी. अश्विनचे सामन्यात १० तर जडेजाचे ६ बळी. गेल्या ३-४ वर्षात इंग्लंडचा अपवाद वगळता भारत सर्व मालिकात अपराजित आहे. ऑस्ट्रेलियाला ४-० अशी मात, विंडीजला २-० अशी मात, न्यूझीलँडला पूर्वीच्या मालिकेत २-० अशी मात आणि आता १-० अशी आघाडी आणि आफ्रिकेवर ३-० अशी मात करून भारत पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. अर्थात परदेशात भारत इतका प्रभावी ठरत नाही. अलिकडच्या काळात परदेशात भारताने फक्त श्रीलंका व विंडीजला हरवले आहे. आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलँड व ऑस्ट्रेलियाकडून भारत परदेशात पराजित झालेला आहे.

सिरुसेरि's picture

27 Sep 2016 - 5:52 pm | सिरुसेरि

अमित मिश्राला खेळवले असते तर किवीजचा डाव अजुन लवकर संपला असता असे वाटते .

श्रीगुरुजी's picture

28 Sep 2016 - 3:28 pm | श्रीगुरुजी

सांगता येत नाही.

श्रीगुरुजी's picture

28 Sep 2016 - 3:32 pm | श्रीगुरुजी

(१) गंभीर संघात परत येतोय.

(२) बीसीसीआयच्या ढेपेला चिकटलेले राजकारणी मुंगळे सर्वोच्च न्यायालयाने जाण्याचा आदेश देऊनसुद्धा ढेप सोडायला व संघटनेत बदल करण्यास तयार नाहीत. शेवटी सर्वोच्च न्यायालयाला पुन्हा एकदा त्यांना झापावे लागले.

http://www.loksatta.com/krida-news/sc-slams-bcci-over-lodha-report-bette...

नाखु's picture

28 Sep 2016 - 3:34 pm | नाखु

गंभीरला घेतलेय अता त्याने गंभीरपणे खेळावे पुन्हा संधी मिळणे कठीण दिसते.एक्दा २०-२५ षटके टिकला की गडी रंगात येतो तो पर्यंत संयम हवा (आय पी एल ने) उगा रग दाखवायच्या वृत्तीला खत-पाणी घातले आहे.

श्रीगुरुजी's picture

30 Sep 2016 - 2:15 pm | श्रीगुरुजी

न्यूझीलँडविरूद्ध दुसरा कसोटी सामना आजपासून कलकत्त्यात सुरू झालाय. सुरवातीला भारताची अवस्था ३ बाद ४६ अशी झाली होती. धवन, मुरली विजय आणि कोहली अपयशी ठरले. कोहलीने मागील ६ कसोटी डावात फक्त ८७ धावा केल्या आहेत (सर्वाधिक ४४). आता जरा परिस्थिती बरी आहे (३ बाद १३६). पुजाराचे अर्धशतक पूर्ण झाले असून रहाणे ४७ धावांवर नाबाद आहे.

श्रीगुरुजी's picture

4 Oct 2016 - 3:18 pm | श्रीगुरुजी

भारताने न्यूझीलँडबरोबरील मालिकेतील दुसरा सामनासुद्धा जिंकून मालिका २-० अशी जिंकली. या विजयामुळे भारत कागदोपत्री कसोटी क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांकाचा देश बनला आहे.

दुसरीकडे आफ्रिकेने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात ऑसीजला मोठ्या फरकाने हरविले तर पाकड्यांनी विंडीजला त्यांच्याच भूमीवर ३ ट-२० सामन्यात व पहिल्या २ एकदिवसीय सामन्यात जोरदार मात दिली.

भारतात सध्या बीसीसीआय व सर्वोच्च न्यायालय यांच्यातील वाद गंभीर वळणावर पोहोचला आहे. २ वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये फिक्सिंगची प्रकरणे सापडल्यावर सर्वोच्च न्यायालयाने सफाईच काम हाती घेऊन न्यायमूर्ती मुद्गल व लोढा यांच्या अध्यक्षतेखाली २ वेगवेगळ्या समित्या नेमून प्रकरणांची चौकशी केली. सर्वात प्रथम फिक्सिंगचे आरोप सिद्ध होऊन चेन्नई सुपर किंग्ज व राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर २ वर्षांची बंदी घालण्यात आली. दोन्ही संघाच्या पदाधिकार्‍यांना क्रिकेटशी कोणत्याही स्वरूपाचा संबंध ठेवण्यात तहहयात बंदी घालण्यात आली.

नंतर बीसीसीआयचा कारभार सुधारून पारदर्शक होण्यासाठी लोढा समितीने अनेक शिफारशी केल्या व सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या १८ जुलैला आदेश देऊन त्यांच्या अंमलबजावणीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदत दिली. परंतु बीसीसीआय अजूनही आपल्या ताठ्यात आहे. कोणत्याही स्वरूपाच्या नवीन नेमणुका न करता फक्त शिफारशींच्या अंमलबजावणीबद्दल न्यायालयाला वेळोवेळी माहिती देऊन सुद्धा बीसीसीआयने नवीन निवड समिती नेमली व अजय शिर्केंची चिटणीसपदी नेमणूक केली.

लोढा समितीने ज्या महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या होत्या त्या सर्व बीसीसीआयने धुडकावून टाकल्या आहेत.

१) निवड समितीत ५ ऐवजी ३ खेळाडू असावेत - बीसीसीआयने ही सूचना धुडकावून ५ खेळाडूंची नवीन निवड समिती नेमली. आश्चर्य म्हणजे निवड समितीत अत्यल्प क्रिकेट खेळलेले खेळाडू आहेत. ५ ही सदस्यांनी एकत्रित फक्त १३ कसोटी सामने खेळलेले आहेत.

२) दोन स्पर्धांमध्ये किमान १५ दिवस अंतर असावे - २०१७ ची आयपीएल स्पर्धा मे च्या शेवटच्या आठवड्यात संपणार असून इंग्लंडमध्ये चँपियन्स ट्रॉफी १ जूनला सुरू होणार आहे. त्यामुळे ही सूचना देखील धुडकावली जाणार.

३) ज्या राज्यात एकापेक्षा जास्त स्थानिक क्रिकेट संघटना आहेत त्या राज्याला कितीही संघटना असल्या तरी एकच मत देता येईल. सर्व संघटना आलटून पालटून मत देतील. महाराष्ट्रात मुंबई, महाराष्ट्र व विदर्भ अशा ३ संघटना आहेत. गुजरातमध्ये गुजरात, बडोदा व सौराष्ट्र व आंध्रात आंध्र प्रदेश व हैद्राबाद अशा २ संघटना आहेत. बाकी सर्व राज्यात एकच संघटना आहे. ही शिफारस सुद्धा बीसीसीआयने फेटाळून लावली आहे.

४) कोणत्याही पदाधिकार्‍याला ३ वर्षाच्या टर्मनंतर ३ वर्षांचा कूलिंग पिरियड व एकूण कारकीर्द ९ वर्षांपेक्षा जास्त नसावी. - इतरांना संधी मिळण्याच्या दृष्टीने ही शिफारस होती. परंतु बीसीसीआय मधील अनेक धेंडे अनेक दशके खुर्च्या अडवून बसली आहेत आणि खुर्ची सोडण्याची इच्छा नसल्याने ही शिफारस सुद्धा बीसीसीआयने धुडकावून लावली.

५) कोणताही पदाधिकारी ७० वर्षांपेक्षा जास्त वयाचा नसावा व आताच्या ७० च्या पुढील पदाधिकार्‍यांनी डिसेंबर पूर्वी राजीनामा देऊन सन्मानपूर्वक बाहेर पडावे. - सध्याच्या संघटनेत पवार, श्रीनिवासन, निरंजन शाह व अजून एक जण असे चौघे जण ७० च्या पुढील वयाचे आहेत. परंतु त्यांना जाण्याची अजिबात इच्छा नाही. मागील वर्षी श्रीनिवासनला बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून सर्वोच्च न्यायालयाने हाकलल्यानंतर जराजर्जर वयोवृद्ध डालमियांना बीसीसीआयचे अध्यक्ष केले गेले. त्यांनी वृद्धापकाळामुळे व आजारांमुळे त्यावेळी बोलताना सुद्धा त्रास होत होता. पण खुर्चीची हाव कायम होती. अध्यक्ष झाल्यावर काही महिन्यातच त्यांचे देहावसन झाले.

राज्य क्रिकेट संघटना, बीसीसीआय व आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना अशी चढती भांजणी असते. पवार व श्रीनिवासन यापूर्वी बीसीसीयचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष या दोनही वरच्या पदांवर होते. परंतु आयसीसीच्या अध्यक्षपदाची मुदत संपल्यावर हे पुन्हा एकदा राज्य क्रिकेट संघटनेत घुसले. आयसीसीचे अध्यक्ष हे सर्वोच्च पद भूषविल्यानंतर राज्य क्रिकेत संघटनेत ठिय्या मारणे म्हणजे राष्ट्रपती मुखर्जींनी राष्ट्रपतीपदाची मुदत संपल्यानंतर कलकत्त्याचे महापौर होण्यासारखे आहे. परंतु ही मंडळी बीसीसीआयची ढेप सोडायला अजिबात तयार नाहीत. त्यामुळे ही सूचनासुद्धा बीसीसीआयने धुडकावून लावली.

लोढांच्या शिफारशी व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धुडकावून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) सदस्य क्रिकेट संघटनांना मोठ्या प्रमाणात निधी वाटप झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे लोढांनी‘बीसीसीआय’ची बँक खाती असलेल्या बँकांना खाती गोठविण्याची विनंती केली होती. त्यावर बीसीसीआयने लगेचच न्यूझीलँडबरोबरील मालिका रद्द करण्याची धमकी दिली.

एकंदरीत बीसीसीआयमध्ये घुसलेले हे राजकारणी व उद्योगपती सर्वोच्च न्यायालयाचे सर्व आदेश धुडकावून बीसीसीआयच्या ढेपेला चिकटून बसले आहेत. यातील बहुतेकांचा क्रिकेटशी दुरूनही संबंध नाही व तरीसुद्धा अनेक दशके ते तिथे घुसलेले आहेत.

या प्रकरणावरील पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला आहे. आपले आदेश धुडकावल्यामुळे सर्वोच्च न्यायालय संतापण्याची दाट शक्यता असून सध्याची संघटना ते बरखास्त करून या धेडांना कायमस्वरूपी हाकलून देतील अशी आशा आहे.

गामा पैलवान's picture

4 Oct 2016 - 5:08 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

चौकशी समितीचे अधिकारी या नात्याने न्यायमूर्तींनी केलेल्या शिफारसी आणि न्यायालयाचे आदेश या वेगवेगळ्या गोष्टी असाव्यात. पहिली सहज धुडकावून लावता येईल. मात्र दुसरीच्या बाबतीत तसं केल्यास न्यायालयाचा अवमान होऊ शकतो. बक्कीला याची जाणीव असेलंच म्हणा. माझी माहिती तुटपुंजी असल्याने चूभूदेघे.

आ.न.,
-गा.पै.

स्पार्टाकस's picture

6 Oct 2016 - 12:34 am | स्पार्टाकस

गुरुजी,

पाकिस्तान-वेस्ट इंडीज सिरीज वेस्ट इंडीजमध्ये सुरु नसून अमिरातीत सुरु आहे.
तुमच्या 'पाकड्यांनी विंडीजला त्यांच्याच भूमीवर ३ ट-२० सामन्यात व पहिल्या २ एकदिवसीय सामन्यात जोरदार मात दिली' या वाक्याने ती वेस्ट इंडीजमध्ये सुरु आहे अशी समजूत होते.

बाकी बीसीसीआय आणि स्टेट लेव्हल क्रिकेट असोसिएशन्समध्ये निर्लज्ज आणि निगरगट्ट राजकारणी भरलेत. आपली दुकानदारी बंद होणार हे पाहून त्यांची तडफड होणारच!

श्रीगुरुजी's picture

6 Oct 2016 - 2:33 pm | श्रीगुरुजी

बरोबर. ही मालिका विंडीजमध्येच सुरू आहे अशी माझी समजूत झाली होती. म्हणूनच विंडीज तीनही ट-२० सामने व पहिले तीनही एकदिवसीय सामने हरलेले आहेत. पाकड्यांच्या बाबर आझमने पहिल्या तीनही एकदिवसीय सामन्यात शतक झळकावून पाकड्यांना विजय मिळवून दिला आहे.

काल आफ्रिकेने ऑसीजविरूद्धचा तिसरा एकदिवसीय सामना जिंकताना पुन्हा एकदा इतिहास घडविला. पहिल्या सामन्यात आफ्रिकेने ऑसीजच्या २९४ धावांचा यशस्वी पाठलाग जेमतेम ४० षटकात केला होता. दुसर्‍या सामन्यात आफ्रिकेने ३६१ धावांचा डोंगर रचून ऑसीजवर १२५ हून अधिक धावांनी विजय मिळविला.

काल तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात ऑसीजने प्रथम फलंदाजी करताना ३७१ धावांचा डोंगर रचला. वॉर्नर व स्टिव्हन स्मिथ या दोघांनीही शतक केले व फिंचने अर्धशतक केले. आफ्रिकेने सुरवातीपासूनच वेगवान खेळ करून ४९.२ षटकातच ३७२ धावा करून सामना जिंकला. डेव्हिड मिलरने जोरदार नाबाद शतक केले. मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करून सामना जिंकताना आफ्रिकेने ३७१ ही दुसर्‍या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या पार केली. यापूर्वी २००६ मध्ये आफ्रिकेने ऑसीजविरूद्धच तब्बल ४३४ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. तिसर्‍या क्रमांकाच्या सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा मान भारताकडे आहे. भारताने २ वर्षांपूर्वी ऑसीजच्याच ३६० या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला होता.

श्रीगुरुजी's picture

9 Oct 2016 - 3:26 pm | श्रीगुरुजी

आजपासून न्यूझीलँडविरूद्ध तिसरा कसोटी सामना सुरू झाला. आज दुसर्‍या दिवशी भारताने आतापर्यंत ५ बाद ५०४ धावा केल्या आहेत. कोहलीने द्विशतक केले तर रहाणे १८८ वर बाद झाला. तब्बल २ वर्षांनंतर गंभीरला संधी मिळाली आहे. परंतु ती त्याने वाया घालविली. पहिल्या २७ धावा २७ चेंडूत केल्यावर गंभीरला पुढील २६ चेंडूत २ च धावा करता आल्या व तो २९ वर बाद झाला. दुसर्‍या डावात (जर झालात तर) जर त्याने किमान अर्धशतक केले नाही तर बहुतेक हीच कसोटी त्याच्या कारकीर्दीतील अखेरची कसोटी ठरेल.

आज अजून २ सामने सुरू आहेत. आफ्रिकेविरूद्ध ४ थ्या एकदिवसीय सामन्यात ऑसीजची पुन्हा एकदा वाट लागली आहे. २६ षटकात ते ५ बाद १०४ वर आहेत. दुसरीकडे मायदेशात इंग्लंडविरूद्ध पहिला एकदिवसीय सामना मूर्खासारखा हरल्यानंतर आजच्या दुसर्‍या सामन्यात बांगल आतापर्यंत १९ षटकांत ३ बाद ७४ अशा अवस्थेत आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या ३०९ धावांचा पाठलाग करताना एकवेळ बांगला ४२.२ षटकात ४ बाद २७१ इतक्या चांगल्या अवस्थेत होते. विजयासाठी ४६ चेंडूत फक्त ३९ धावा हव्या होत्या. पण अचानक डाव कोसळून सर्व बाद २८८ धावसंख्येवर त्यांचा डाव संपला.

श्रीगुरुजी's picture

17 Oct 2016 - 3:37 pm | श्रीगुरुजी

काल भारताने किवीजना पहिल्या एकदिवसीय सामन्यात अगदी सहज हरविले.

महाराष्ट्र वि. दिल्ली हा रणजी सामना अनेक विक्रमांनी गाजला. प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने तब्बल २ बाद ६३५ धावा केल्या. त्यात स्वप्नील गुगळे नाबाद ३५१ व अंकीत बावणे नाबाद २५८ यांनी तिसर्‍या विकेटसाठी तब्बल ५९४ धावांची नाबाद भागिदारी केली. दिल्लीने जोरदार प्रत्त्युत्तर दिले. ६३५ धावांचा पाठलाग करताना एकवेळ दिल्लीची स्थिती ६ बाद ५७७ इतकी मजबूत होती. परंतु याच धावसंख्येवर दिल्लीचा ऋषभ पंत ३०८ धावा करून बाद झाला व नंतर काही वेळातच दिल्लीचा डाव ५९० वर संपला. एकाच सामन्यात २ त्रिशतके व ३ जणांनी २५० हून अधिक धावा केल्या.

विंडीज वि. पाकडे यांच्यातील पहिला कसोटी सामना अत्यंत रंगतदार अवस्थेत आहे. हा सामना गुलाबी चेंडूवर दिवसरात्र असा खेळला जात आहे. ४ थ्या दिवसाअखेर विंडीजची धावसंख्या २ बाद ९२ असून त्यांना विजयासाठी ३४६ धावांचे लक्ष्य आहे. विंडीजच्या देवेंद्र बिशूने पाकच्या दुसर्‍या डावात केवळ ४९ धावात ८ बळी घेतले.

श्रीगुरुजी's picture

20 Oct 2016 - 8:51 pm | श्रीगुरुजी

भारताने ४ दिवसांपूर्वी न्यूझीलंडविरूद्ध पहिला एकदिवसीय सामना सहज जिंकला होता. आज दुसरा सामना सुरू आहे व भारत पराजयाच्या मार्गावर आहे. न्यूझीलंडच्या २४२ धावांचा पाठलाग करताना भारताची अवस्था ४१ षटकात ८ बाद १८४ इतकी बिकट झाली आहे.