क्रिकेट

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in क्रिडा जगत
1 Oct 2015 - 12:59 pm

क्रिकेटवर मी पूर्वी ३-४ धागे काढले होते. प्रत्येक धागा एका विशिष्ट मालिकेसाठी/स्पर्धेसाठी होता. ती मालिका/स्पर्धा संपल्यावर धाग्याचे आयुष्य संपले. विश्वचषक स्पर्धा मार्च २०१५ मध्ये संपली. परंतु वर्षभर जगात कोठे ना कोठे तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने होतच राहतात. त्यासाठी हा एक कॉमन धागा आहे. सध्या चालू असलेले सामने/स्पर्धा/मालिका इ. विषयी इथे लिहिता येईल.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

17 Oct 2015 - 6:01 pm | श्रीगुरुजी

पाकड्यांचा ८ वा खेळाडू सुद्धा बाद झाला. हातात फक्त ९३ धावा आहेत, ८ गडी बाद झालेत आणि दिवस संपायला अजून अंदाजे २३ षटके शिल्लक आहेत.

श्रीगुरुजी's picture

18 Oct 2015 - 11:24 pm | श्रीगुरुजी

अगदी सहज जिंकत असलेला सामना कसा हरावा ते भारताकडून शिकावे. २७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ३१ वे षटक संपले तेव्हा भारत २ बाद १५४ अशा सुस्थितीत होता. उर्वरीत १९ षटकात फक्त ११७ धावा हव्या होत्या, फक्त २ खेळाडू बाद झाले होते, धोनी नाबाद २६ (२६ चेंडूत) आणि कोहली नाबाद ४६ (५७ चेंडूत) हे स्थिरावलेले खेळाडू मैदानात होते, गोलंदाजीत व खेळपट्टीत फारसा दम नव्हता आणि अजून रहाणे व रैना हे दोन प्रमुख फलंदाज शिल्लक होते.

३२ व्या षटकापासून धोनी व कोहलीने अचानक नांगर टाकला. पुढील १० षटकात १, १, ३, ३, ३, ६, २, ५, ७, २ अशा फक्त ३३ धावा निघाल्या, मात्र एकही खेळाडू बाद झाला नाही. त्यामुळे उर्वरीत ९ षटकात ८४ धावा असे काहीसे अवघड लक्ष्य झाले. तरीसुद्धा अजून ८ खेळाडू बाद व्हायचे असल्याने हे लक्ष्य फारसे अवघड नव्हते. हे दोघे अचानक कसे संथ झाले हे एक गूढच आहे.

नंतर सांगण्यासारखे फारसे काही नाही. धोनी, कोहली, रैना आणि रहाणेने दडपणाखाली एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. रैना पुन्हा एकदा शून्यावर बाद झाला. मागील ३ डावात त्याने फक्त १ धाव केली आहे. कोहली, रैना आणि रहाणे या तिघांनीही एकाच गोलंदाजाच्या गोलंदाजीवर एकाच जागेवर एकच प्रकारचा फटका मारून एकाच क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल दिला (फिक्सिंग?). त्यापूर्वी धोनीसुद्धा अत्यंत सोपा झेल देऊन बाद झाला. रोहीत शर्मा नेहमीप्रमाणे अर्धशतक करून स्थिरावलेला असताना अचानक सोपा झेल देऊन बाद झाला. धवन पुन्हा एकदा अपयशी ठरला.

जो सामना २-३ षटके राखून भारत अगदी सहज जिंकत आहे याची खात्री वाटत होती, तोच सामना भारत १८ धावांनी हरला. धवन आणि रैना पूर्ण अपयशी आहेत. रोहीत शर्मा चांगला खेळून आयत्यावेळी अगदी सोपा झेल देऊन बाद होतो. पुढील सामन्यात रैनाच्या जागी गुरकीरत सिंग मान या नवीन खेळाडूला संधी मिळावी. तो अष्टपैलू असल्याचाही फायदा होईल.

मुंबई तामिळनाडु रणजी सामन्यात मुंबईचा अफलातुन विजय झाला.

सेहवागची आंतराष्ट्रीय क्रिकेट मधुन निवृत्ति

श्रीगुरुजी's picture

20 Oct 2015 - 12:07 pm | श्रीगुरुजी

आपण निवृत्त होत असल्याच्या बातमीचे स्वतः सेहवागनेच खंडन केले आहे. तो पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना दिसावा अशी मनोमन इच्छा आहे.

धनावडे's picture

20 Oct 2015 - 12:23 pm | धनावडे

तशी इच्छातर माझी पण आहे

श्रीगुरुजी's picture

22 Oct 2015 - 10:06 pm | श्रीगुरुजी

४ था सामना जिंकला. कोहलीचे जबरदस्त शतक आणि त्याला रहाणे व रैनाने दिलेली उत्कृष्ट साथ यामुळे २९९ धावा करता आल्या. नेहमीप्रमाणे भारत शेवटच्या ५ षटकात ढिला पडला. ४५ वे षटक संपल्यावर भारत ३ बाद २७० होता. पण पुढील ५ षटकात फक्त २९ धावा करता आल्या आणि ५ गडी गमाविले. सुदैवाने गोलंदाजी उत्तम झाली. एबीडी ने अजून एक शतक केले, पण ते वाया गेले. रैनाला सूर गवसला, परंतु धवन पुन्हा एकदा अपयशी ठरला. मालिकेत २-२ अशी बरोबरी आहे. ५ वा व शेवटचा सामना येत्या रविवारी दुपारी १:३० वाजता मुंबईत आहे. पहिल्या चारही सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकलेला आहे.

दुसरीकडे इंग्लंड वि. पाकड्यांच्या दुसर्‍या कसोटीत दिवसअखेर पाकड्यांनी ४ बाद २८२ धावा केल्या आहेत. ३७ वर्षे ११ महिने वय असलेल्या युनुस खानने अर्धशतक केले तर ४१ वर्षे ५ महिने वय असलेल्या मिसबाहने नाबाद शतक केले.

विंडीज वि. श्रीलंका सामन्यात विंडीजने श्रीलंकेला २०० धावात गुंडाळल्यावर दिवसअखेर १ बाद १७ धावा केल्या.

श्रीगुरुजी's picture

22 Oct 2015 - 10:10 pm | श्रीगुरुजी

रणजी स्पर्धेत सेहवागने १७० चेंडूत १३६ धावा केल्या तर जडेजाने पुन्हा एकदा डावात ५ बळी मिळविले.

श्रीगुरुजी's picture

25 Oct 2015 - 6:11 pm | श्रीगुरुजी

बाप रे! आफ्रिका ५० षटकांत ४ बाद ४३८! आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना तुडवतुडव तुडवले. पाटा खेळपट्टी, जवळ असलेली सीमारेषा आणि त्यात भर म्हणून अत्यंत खराब आखूड टप्प्याची गोलंदाजी आणि सुटलेले झेल!

या एकाच डावात तब्बल तिघांनी शतक केले. एका डावात तिघांनी शतक करण्याची ही फक्त दुसरी वेळ. आफ्रिकन्सने एकूण २० षटकार व ३८ चौकार मारले (म्हणजे तब्बल २७२ धावा फक्त चौकार-षटकारांच्या सहाय्याने झाल्या).

भारत सामना हरलेला आहेत. निदान किमान ३०० धावा करून काहीसा सन्मानमीय पराभव होऊ दे.

द-बाहुबली's picture

25 Oct 2015 - 6:56 pm | द-बाहुबली

जाम मज्या आली अफ्रिकेची फटकेबाजी बघताना. २०-२० सामना चाल असल्याचा भास होत होता. मजा आली.

श्रीगुरुजी's picture

25 Oct 2015 - 9:42 pm | श्रीगुरुजी

फारच वाईट हरलो. रहाणे आणि धवन वगळता बाकीच्यांचा आनंदच होता. धवन आणि रैनाने ५ पैकी फक्त १ सामन्यात चांगली फलंदाजी केली. उरलेले सर्व सामने ते अपयशी ठरले. रोहीत शर्माने २ सामन्यात चांगली फलंदाजी केली व भारत ते दोन्ही सामने हरला. रहाणेने बर्‍यापैकी सातत्य दाखविले. गोलंदाजी बरी झाली अर्थात आजचा सामना अपवाद ठरला. ट-२० मालिका हरले आणि एकदिवसीय सामन्यांची मालिकाही हरले. आता कसोटी सामन्यात काय होतं ते बघायचं.

श्रीगुरुजी's picture

5 Nov 2015 - 8:42 pm | श्रीगुरुजी

भारत-आफ्रिका कसोटी मालिका आजपासून सुरू झाली. पहिलाच दिवस रंगतदार झाला. दिवसअखेर भारत सर्वबाद २०१ व आफ्रिका २ बाद २८ अशी स्थिती आहे. खेळपट्टी फिरकीला खूपच अनुकुल वाटत आहे. हीच स्थिती कायम राहिली तर ४ थ्या डावात आफ्रिकेला फलंदाजी करणे अत्यंत अवघड होऊन भारत जिंकू शकेल.

दुसरीकडे ऑस्ट्रेलिया-किवीज च्या पहिल्या कसोटीतल्या पहिल्याच दिवशी ऑसीजने २ बाद ३८९ अशी जबरदस्त धावसंख्या उभारली.

तिसरीकडे पाकड्यांनी इंग्लंडला कसोटी मालिकेत २-० असे हरवून मालिका जिंकली.

श्रीगुरुजी's picture

6 Nov 2015 - 8:03 pm | श्रीगुरुजी

पहिला कसोटी सामना चांगलाच रंगलेला आहे. खेळपट्टी फिरकीला जोरदार साथ देत असल्याने भारताला पहिल्या डावात १७ धावांची आघाडी मिळाली आहे. दुसर्‍या डावात २ बाद १२५ धावा केल्यामुळे भारताकडे १४२ धावांची आघाडी आहे. उद्या अजून १२५ धावा झाल्या तर भारत मजबूत स्थितीत जाऊन सामना भारताकडे झुकेल.

दुसरीकडे किवींची ऑसीजसमोर वाट लागलेली आहे. ऑसीज ४ बाद ५५६ वि. किवीज ५ बाद १५७.

श्रीगुरुजी's picture

6 Nov 2015 - 8:11 pm | श्रीगुरुजी

Cricket All-Stars Series


अमेरिकेत सचिनचा संघ वि. शेन वॉर्नचा संघ यात ३ ट-२० सामन्यांची मालिका अमेरिकेत खेळली जाणार आहे. उद्या ७ तारखेला पहिला सामना न्यूयॉर्कमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी १ वाजता (भारतात रात्री ११:३० वाजता) खेळला जाईल.

सचिनच्या संघात खालील खेळाडू आहेत.

Sachin Tendulkar (c)
Sir Curtly Ambrose
Sourav Ganguly
Carl Hooper
Mahela Jayawardene
Lance Klusener
Brian Lara
VVS Laxman
Glenn McGrath
Moin Khan (wk)
Muttiah Muralitharan
Shaun Pollock
Virender Sehwag
Shoaib Akhtar
Graeme Swann

शेन वॉर्नच्या संघात खालील खेळाडू आहेत.

Shane Warne (c)
Ajit Agarkar
Allan Donald
Matthew Hayden
Jacques Kallis
Ricky Ponting
Jonty Rhodes
Kumar Sangakkara (wk)
Saqlain Mushtaq
Andrew Symonds
Michael Vaughan
Daniel Vettori
Courtney Walsh
Wasim Akram

हे सामने भारतात स्टार स्पोर्ट्स २ व ३ वर दाखविले जातील.

बर्‍याच कालावधीनंतर सचिन, शेन वॉर्न, लारस, सेहवाग, अ‍ॅम्ब्रोस, गांगुली, मॅक्ग्रा, वॉल्श इ. दिग्गजांचा खेळ बघायला मिळेल.

श्रीगुरुजी's picture

7 Nov 2015 - 1:29 pm | श्रीगुरुजी

भारत-आफ्रिका कसोटी सामना जोरदार सुरू आहे. आफ्रिकेला जिंकायला २१८ हव्यात पण आता ४ बाद ३२ अशी वाईट अवस्था आहे. आमला, फाफडू आणि एबी हे तिघेही बाद झाले आहेत. एबीला दोन्ही डावात मिश्राने त्रिफळाबाद केले. याच मैदानावर २०१३ मध्ये धवनने पदार्पणात १८७ धावा केल्या होत्या. या सामन्यात तो दोन्ही डावात शून्यावर बाद झाला.

भारत आतातरी सामना जिंकण्याच्या परिस्थितीत आहे.

अरे! काय विकेट पडतायत!! भारत ऑल डाउन आणि आफ्रिका हाफ डाउन झालासुद्धा?

श्रीगुरुजी's picture

7 Nov 2015 - 1:51 pm | श्रीगुरुजी

५ बाद ४५

श्रीगुरुजी's picture

7 Nov 2015 - 8:39 pm | श्रीगुरुजी

अपेक्षेप्रमाणे जिंकलो. तिसर्‍या दिवशीच सामना संपला. सामन्यात काय होणार हे पहिल्या दिवशी स्पष्ट झाले होते. उर्वरीत ३ सामन्यातही फिरकीला अनुकूल खेळपट्टी असल्यास ४-० अशी मालिका जिंकता येईल.

आज रात्री ११:३० वाजता सचिनचा संघ वि. शेन वॉर्नचा संघ हा सामना आहे. त्याचीच आतुरतेने वाट बघतोय.

श्रीगुरुजी's picture

14 Nov 2015 - 3:18 pm | श्रीगुरुजी

दुसर्‍या कसोटीतही भारताने आफ्रिकेला २१४ धावात गुंडाळले. अमित मिश्रा व यादवला वगळून त्यांच्याजागी बिन्नी व इशांत शर्माला घेण्याचे लॉजिक समजले नाही.

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलँड यांच्यातील दुसर्‍या कसोटीत वॉर्नरने द्विशतक केले. लागोपाठ तिसर्‍या डावात त्याने शतक केले आहे. ऑस्ट्रेलिया ९ बाद ५५९ आणि किवीज २ बाद १२४.

असंका's picture

25 Nov 2015 - 1:05 pm | असंका

११६/५ भारत...
पहिल्याच दिवशी...
:(

बीच वॉलीबॉलसारखं बीच क्रिकेट आहे का हे? इतके धडाधड कसे आउट होताहेत साउथ आफ्रिकन्स?

अद्द्या's picture

26 Nov 2015 - 1:24 pm | अद्द्या

धवन पेटला म्हणायचा

३०० च टार्गेट देतील का

पिच खरंच इतकं बेकार आहे का?

अद्द्या's picture

26 Nov 2015 - 5:07 pm | अद्द्या

पीच "बेकार" नाहीये .

स्पिन ला मदत करतंय .
ज्यात आपले हि फलंदाज ढेपाळत आहेत. फरक इतकाच कि आपले अश्विन आणि जडेजा , मिश्रा त्यांच्या स्पिनर पेक्षा चांगले आहेत .

न्यूझीलंड / ऑस्ट्रेलिया मध्ये हिरवेगार पीच असतात ते बेकार असतात का ?

नया है वह's picture

26 Nov 2015 - 5:41 pm | नया है वह

आपले आजचे फलंदाज स्पिन चांगले खेळत नाहीत.

स्पार्टाकस's picture

26 Nov 2015 - 10:40 pm | स्पार्टाकस

अनेकांनी विकेटवर टीका केली, परंतु ती अनाठायी वाटते. विकेटवर खेळणं अगदीच अशक्यं वगैरे आहे अशातला प्रकार अजिबात नाहीये. जो बॅट्समन शांत डोक्याने खेळू शकतो तो या विकेटवर निश्चित रन्स काढू शकेल.

आजच्या २० विकेट्सचं अ‍ॅनालिसीस केलं तर एक एबी डिव्हिलियर्सची विकेट सोडली तर बाकीच्या विकेट्स या बॉलर्सची करामत, चुकीचे शॉट सिलेक्शन किंवा इनसाईड एज याचा परिपाक होते.

एल्गर - इनसाईड एज लागून बॉल स्टंपवर खेचला.
अमला - स्वीपचा शॉट अति उतावीळपणे मारला. अमलाकडून ही अपेक्षा नाही.
डिव्हिलियर्स - बॉल विकेटमधे थांबून आला. ही एकच विकेट पीचमुळे गेली.
डुप्लेसी - चुकीच्या लाईनवर बॉल खेळला
विलास - जाडेजाचा बॉल निव्वळ अप्रतिम! अशाच बॉलवर मायकेल क्लार्कही बोल्ड झाला होता मागे.
हार्मर - पायाला लागून कॅरम बॉल स्टंपवर गेला.
डुमिनी - एल बी ड्ब्ल्यू. लाईन जजमेंट चुकीचं.
मॉर्केल - कॉट & बोल्ड.

विजय - ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला बॅट लावली.
पुजारा - टॉपस्पिनरला बॅकफूट्वर खेळला
धवन - रिव्हर्स स्वीप हा या विकेटवर आत्मघाती शॉट!
कोहली - बॉल हवेत उचलला.
रहाणे - लूज शॉट.
सहा - अनलकी. विकेटकिपरच्या बुटांवरुन कॅच उडाला, पण बॉल दाबण्याचा प्रयत्न विचित्रं होता.
जाडेजा - प्लेड ऑन. मुख्य म्हणजे बॉल कट करण्याच्या दृष्टीने खूप जवळ होता.
अश्विन - मॉर्केलचा बॉल फुल आणि स्टंप्सवर जाणारा.
रोहीत - तासभर लवकर खेळलेला शॉट
मिश्रा - फ्लिपर.

आता या सगळ्यात पीचला दोष द्यायचा तर फक्तं डिव्हीलियर्सबद्द्लच देता येईल.
भारताचं नशिब इतकंच की अश्विन आणि जाडेजा दक्षिण आफ्रीकेकडून खेळत नाहीत!

असंका's picture

4 Dec 2015 - 4:47 pm | असंका

एस ए ऑल डाउन १२१...

फॉलो ऑन देत नैयेत म्हणे...

अद्द्या's picture

4 Dec 2015 - 5:09 pm | अद्द्या

२१३ चा लीड . . आणि अजून एक २००-२५० काढून ४०० च्या आसपास टार्गेट देतील बहुदा

आज एस ए वाल्यांनी करून दाखवले...

बहात्तर ओवर बहात्तर रन!!

श्रीगुरुजी's picture

8 Jan 2016 - 9:12 pm | श्रीगुरुजी

मागील ३-४ आठवडे द्विशतकांमुळे गाजले. न्यूझीलंडच्या रॉस टेलरने ऑस्ट्रेलियाविरूद्ध दणदणीत २९० धावा केल्या. नंतर विंडीजविरूद्ध व्होजेसने द्विशतक केले. याच आठवड्यात इंग्लंडच्या बेन स्टोक्सने आफ्रिकेविरूद्ध द्विशतक केल्यावर त्याच सामन्यात आमलानेही द्विशतक केले.

१२ तारखेपासून ऑस्ट्रेलियात भारत ऑस्ट्रेलियाशी ५ एकदिवसीय सामने व ३ ट-२० सामने खेळणार आहे.

भारताचा एकदिवसीय संघ - धोनी (कर्णधार), अश्विन,ऋषि धवन, शिखर धवन , गुरकीरत सिंग मान, जडेजा, कोह्ली, मोहम्मद शमी, मनिष पांडे, अक्षर पटेल, रहाणे, ईशांत शर्मा, रोहीत शर्मा , बरिंदर स्रन, उमेश यादव

या संघात ऋषी धवन, बरिंदर स्रन हे नवीन चेहरे आहेत.

भारताचा ट-२० संघ - धोनी (कर्णधार), अश्विन, शिखर धवन , हरभजन सिंग, जडेजा, कोह्ली, भुवनेश्वर सिंग, मोहम्मद शमी, रहाणे, हार्दिक पंड्या, आशिष नेहरा, सुरेश रैना, रोहीत शर्मा , उमेश यादव , युवराज सिंग

या संघात हार्दिक पंड्या हा नवीन चेहरा आहे. ३६ वर्षीय नेहराचे पुनरागमन आश्चर्यकारक आहे.

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ - स्टीव्हन स्मिथ, जॉर्ज बेली, स्कॉट बेलँड, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, जॉश हॅझलवूड, मिचेल मार्श, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, जोएल पॅरिस, केन रिचर्डसन , मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर

विश्वचषकात खेळलेले शेन वॉटसन, मिचेल स्टार्क, मिचेल जॉन्सन , नेथन लायन, मायकेल क्लार्क इ. खेळाडू या संघात नाहीत.

सामन्यांचे वेळापत्रक -

एकदिवसीय सामने -

(१) मंगळवार १२ जानेवारी भाप्रवे सकाळी ८:५० वा पर्थ येथे
(२) शुक्रवार १५ जानेवारी भाप्रवे सकाळी ८:५० वा ब्रिस्बेन येथे
(३) रविवार १७ जानेवारी भाप्रवे सकाळी ८:५० वा मेलबोर्न येथे
(४) बुधवार २० जानेवारी भाप्रवे सकाळी ८:५० वा कॅनबेरा येथे
(५) शनिवार २३ जानेवारी भाप्रवे सकाळी ८:५० वा सिडने येथे

ट-२० सामने -

(१) मंगळवार २६ जानेवारी भाप्रवे दुपारी १:०८ वा पर्थ येथे
(२) शुक्रवार २९ जानेवारी भाप्रवे दुपारी २:०८ वा मेलबोर्न येथे
(३) रविवार ३१ जानेवारी भाप्रवे दुपारी २:०८ वा सिडने येथे

सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स-१ व स्टार स्पोर्ट्स-३ या वाहिन्यांवर आहे.

श्रीगुरुजी's picture

10 Jan 2016 - 8:28 pm | श्रीगुरुजी

आज श्रीलंकेविरूद्धच्या दुसर्‍या ट-२० सामन्यात श्रीलंकेच्या १४२ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने केवळ १ गडी गमावून फक्त १० षटकांमध्येच हे लक्ष गाठले. गप्टीलने केवळ १९ चेंडूत अर्धशतक केल्यावर कॉलिन मुन्रोने केवळ १४ चेंडूत अर्धशतक केले. त्यात १ चौकार व षटकार मारले. २००७ च्या विश्वचषकात युवराज सिंगने इंग्लंडविरूद्ध केवळ १२ चेंडूत अर्धशतक केले होते. तो विक्रम मोडता मोडता वाचला.

श्रीगुरुजी's picture

11 Jan 2016 - 8:08 pm | श्रीगुरुजी

उद्या भारताचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिला एकदिवसीय सामना पर्थ येथे भारतीय वेळेनुसार सकाळी ८:५० वाजता सुरू होईल. पर्थमध्ये त्यासुमारास पावसाची ५४% शक्यता आहे व पाऊस २-३ तास असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित सामना थोडा उशीरा सुरू होउ शकतो. परंतु नंतर उर्वरीत दिवस पावसाची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे उशीर झाला तरी सामना सुरू होऊन कदाचित कमी षटकांचा सामना खेळविला जाईल. जर सामना वेळेवर सुरू होऊन मध्येच पाऊस येऊन सामना थांबला व नंतर काही काळाने सामना परत सुरू झाला तर डकवर्थ-लुईस नियम येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ बहुतेक प्रथम गोलंदाजी स्वीकारेल असे वाटते.

या मैदानावर भारताने आजतगायत एकही एकदिवसीय सामना जिंकलेला नाही. २००८ मध्ये एक कसोटी सामना जिंकलेला होता. त्यामुळे इतिहास भारताच्या बाजूने नाही.

श्रीगुरुजी's picture

12 Jan 2016 - 1:03 pm | श्रीगुरुजी

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत ३ बाद ३०९. रोहीत शर्माने जबरदस्त शतक झळकावले. कोहलीनेही ९१ धावा कुटल्या. मिचेल जॉन्सन निवृत्त झालाय व मिचेल स्टार्क जायबंदी असल्याने बाहेर आहे. त्यांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजी अत्यंत दुबळी वाटतेय. ऑसीजचे नवीन गोलंदाज जोएल पॅरिस आणि स्कॉट बोलॅंड अजिबात प्रभाव पाडू शकले नाहीत. पर्थमध्ये सामना असूनही खेळपट्टी आश्चर्यकारक रित्या निर्जीव आहे. ऑस्ट्रेलियाने स्टार्कच्या अनुपस्थितीत पीटर सिड्ल किंवा जेम्स पॅटिन्सनला घ्यायला हवे होते. नेथन लायनलाही का बाहेर ठेवले ते समजले नाही.

या निर्जीव खेळपट्टीवर ३०९ धावा पुरतील का याविषयी मनात शंका आहे. ऑस्ट्रेलियाकडे वॉर्नर, फिंच, स्मिथ, बेली, मॅक्सवेल, मिचेल मार्श, फॉकनर आणि मॅथ्यू वेड असे ८ तगडे फलंदाज आहेत. त्यामुळे हे लक्ष वाचविण्यासाठी भारतीय गोलंदाजांना जीवापाड प्रयत्न करावे लागतील. भुवनेश्वर कुमार फारसा प्रभावी पडणार नाही असे वाटते. नवीन गोलंदाज स्रन कसा आहे याविषयी अजून माहिती नाही. उमेश यादवकडे वेग असला तरी तो स्वैर मारा करतो. २०१२ मध्ये याच मैदानावर कसोटीत त्याने एका डावात ५ बळी घेतले होते. एकंदरीत अश्विन व जडेजावरच भारतीय गोलंदाजी अवलंबून राहणार आहे.

श्रीगुरुजी's picture

12 Jan 2016 - 8:38 pm | श्रीगुरुजी

मनात जी कुशंका आली होती, तीच दुर्दैवाने खरी ठरली. ३०९ ही मोठी धावसंख्या होती. परंतु निर्जीव खेळपट्टी व ऑस्ट्रेलियाची तगडी फलंदाजी यामुळे ही धावसंख्या पुरेशी ठरली नाही. खरं तर भारताच्या गोलंदाजाची सुरेख सुरूवात झाली होती. आपल्या पदार्पणातच बरिंदर स्रनने पहिल्या दोन फलंदाजांना बाद केले तेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ४.४ षटकात फक्त २१ होती. मुख्य म्हणजे धोकादायक वॉर्नर बाद झाला होता. पुढच्याच चेंडूवर बेली आपल्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला होता. परंतु दुर्दैवाने पंचांनी त्याला नाबाद ठरविले आणि डीआरएस ला आंधळा विरोध असल्याने भारताला तृतीय पंचाकडे दाद मागता आली नाही. पहिल्याच चेंडूवर बाद असताना नाबाद दिलेल्या बेलीने शतक झळकावून स्मिथबरोबर द्विशतकी भागीदारी केली आणि तिथेच भारताने सामना गमाविला. जर डीआरएस ची सोय असती तर ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद २१ झाली असती व भारताला विजयाची जास्त संधी मिळाली असती.

पुढच्याच चेंडूवर बेली आपल्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला होता. परंतु दुर्दैवाने पंचांनी त्याला नाबाद ठरविले आणि डीआरएस ला आंधळा विरोध असल्याने भारताला तृतीय पंचाकडे दाद मागता आली नाही.

हेच लिहायला आलो होतो
डीआरएस ला इतका विरोध का बीसीसीआयचा कळत नाही राव..

फेरफटका's picture

12 Jan 2016 - 9:22 pm | फेरफटका

बीसीसीआय चा डीआरएस ला विरोध जितका अनाकलनीय आहे तितकाच आयसीसी ची बीसीसीआय ला मनमानी करू देणं बिनडोकपणाचं आहे. उद्या बीसीसीआय ने 'आम्ही नाही ५० ओव्हर्स टाकणार, आमचा त्याव्र विश्वास नाही. आम्ही फक्त ४० च ओव्हर्स बॉलिंग करणार' म्हटलं तर चालेल का? डीआरएस हा खेळाचा एक भाग आहे, तुमचा विश्वास नसला तर तुम्ही दाद मागू नका, पण समोरच्या टीम ला अडवणारे तुम्ही कोण अशी भुमिका घेऊन डीआरएस राबवयला हवं असं माझं मत आहे. ज्या आयसीसी स्पर्धांमधे डीआरएस असते, तिथे भारतीय संघ वापरतोच ना! हा शुद्ध दुटप्पीपणा आहे.

श्रीगुरुजी's picture

13 Jan 2016 - 2:54 pm | श्रीगुरुजी

भारताचा डीआरएस ला का विरोध आहे हे एक गूढच आहे. हा विरोध प्रत्यक्ष खेळाडूंचा आहे का हातात कधीही बॅटबॉल न धरलेल्या बीसीसीआयच्या ढेरपोट्या वयस्करांचा आहे हे समजत नाही. परंतु बीसीसीआयच्या दडपणामुळे कोणताही वर्तमान खेळाडू डीआरएसच्या बाजूने बोलत नाही असे दिसते.

जर धावबाद, यष्टीचित, नोबॉल इ ठरविण्यासाठी तृतीय पंचाची मदत घेतली जाते तर पायचित, झेलबाद इ. साठी तृतीय पंचाकडे दाद मागण्यास विरोध का हे समजत नाही. डीआरएस नसल्याचा फटका भारताला अनेकवेळा बसलेला आहे. धोनी काल मुलाखतीत डीआरएसला विरोध करण्याची जी कारणे सांगत होता ती अत्यंत हास्यास्पद आहेत. तंत्रज्ञानाची मदत उपलब्ध असताना निव्वळ पूर्वग्रह्दूषित कारणे डोक्यात ठेवून विरोध करणे हा मूर्खपणा आहेत. जगात क्रिकेट खेळणार्‍या सर्व देशांपैकी डीआरस ला विरोध असणारा भारत हा एकमेव देश आहे.

गामा पैलवान's picture

13 Jan 2016 - 8:20 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी, मला संशय आहे की पुनर्विचारपद्धती आणल्यास सट्टेबाजांची पकड सैल पडेल की काय.
आ.न.,
-गा.पै.

पैसा's picture

12 Jan 2016 - 8:46 pm | पैसा

तरी स्मिथ आणि बेली हे दोघे ज्या प्लॅन आणि सिस्टिमॅटिक वेगाने खेळले त्याचे क्रेडिट त्यांना द्यायलाच हवे. सतत एकेरी धावा काढून धावफलक हलता ठेवणे आणि भारतापेक्षा सरस धावगती ठेवने यात ऑस्ट्रेलिया यशस्वी ठरली. भुवनीश सोडता भारतीय गोलंदाज संपूर्ण निष्प्रभ वाटले. बेली आणि स्मिथ मस्तच खेळले.

श्रीगुरुजी's picture

13 Jan 2016 - 2:56 pm | श्रीगुरुजी

सहमत

फेरफटका's picture

12 Jan 2016 - 9:25 pm | फेरफटका

भारताची बॅटींग बघितली. बघताना एक फील येत होता की acceleration लांबवतायत आणी ३२५+ ची शक्यता कमी कमी होतीये. ३० ओव्हर्स नंतर १४९/१, ४० ओव्हर्स नंतर २१६/१ आणी ५० ओव्हर्स नंतर ३०९/3, ह्यात १५-२० रन्स कमी पडले असं वाटलं. दुसरी एक जाणवलेली बाब म्हणजे sustained attack नाही करू शकले शर्मा आणी कोहली. एखाद्या ओव्हर मधे एखाद-दुसरी बाऊंड्री बसल्यावर परत डॅब्स, शफलिंग (स्लॉग ओव्हर्स मधे) मुळे momentum मिळत नव्हतं.

Anyway, well played Australia!

श्रीगुरुजी's picture

13 Jan 2016 - 2:56 pm | श्रीगुरुजी

सहमत. भारताने अजून किमान २५-३० धावा करायला हव्या होत्या.

अजयिन्गले's picture

13 Jan 2016 - 5:00 pm | अजयिन्गले

जो परेंत आपण ‘डीआरएस’ घेत नाही तो पर्यंत आपण बाहेरच्या देशात हरतच राहू जरी जिंकलो तरी series जिंकू शकणार नाही. जेव्हा ‘डीआरएस’आले होते तेव्हा त्याला विरोध करणारे क्रिकेट पटूच होते आणि त्याचं आईकून मग भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ने विरोध करणे सुरु केले. विरोध करणारे खेळाडू जे होते ते, गावस्कर, गांगुली, रवी शास्त्री, संजय मांजरेकर , धोनी आणि सचिन सुधा. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ला हे अजून पण का नाही समझत कि ९९.९% प्रेक्षकांना ‘डीआरएस पाहिजे आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ला या लोन्कांचा प्रतिसाद समजायला हवा. दुसरी गोष्ठ असि कि धोनी ने जितक इंडिया ला समोर नेले तितकेच मागील पांच वर्षात मागे आणले आहे. जर इंडिया ला खरच सर्व format मध्ये नंबर १ बनायचे असेल तर धोनी ला घरी बसवावे आणि रवि शास्त्री ला पण कॉमेंट्री कडे पाठवावे, डीआरएस न घेणे म्हणझे आपणच आपला हक डावलतो आहे. मोहिंदर अमरनाथ खूप वर्षा पूर्वी एक टिपणी केली होती " Bcci is bunch ऑफ जोकर्स.

विराटप्रेमी's picture

13 Jan 2016 - 11:06 pm | विराटप्रेमी

विश्वचषकाचे उर्मट शिरोमणी - पुष्प पाचवे सहावे सातवे लींक हवी आहे.

श्रीरंग_जोशी's picture

13 Jan 2016 - 11:38 pm | श्रीरंग_जोशी

मिपाकर मृत्युन्जय यांनी चौथ्या भागानंतर या मालिकेतले पुढचे लेख अजुन लिहिले नाहीत असे दिसते.

श्रीगुरुजी's picture

14 Jan 2016 - 2:10 pm | श्रीगुरुजी

विश्वचषकाचे उर्मट शिरोमणी

ही मक्तेदारी फक्त कांगारूंची नाही. कोहली, ईशांत शर्मा, गंभीर इ. भारतीय देखील या बहुमानाला शोभतात.

पैसा's picture

15 Jan 2016 - 12:49 pm | पैसा

अ‍ॅक्शन रिप्ले.

श्रीगुरुजी's picture

15 Jan 2016 - 1:05 pm | श्रीगुरुजी

लागोपाठ दुसर्‍या सामन्यात रोहीत शर्माचे शतक, कोहलीचे अर्धशतक आणि भारताची ३००+ धावसंख्या. भारत ८ बाद ३०८. शेवटच्या ५ षटकांत भारताने ५ गडी गमाविले. भारत किमान ३३० धावा करेल अशी एकवेळ परिस्थिती होती. परंतु पुन्हा एकदा २०-२५ धावा कमी झाल्या. जवळपास पहिल्याचे सामन्याची पुनरावृत्ती झालेली आहे. निकाल देखील तसाच लागेल का? या मैदानावर ३०८ धावा पुरेश्या वाटताहेत. आज वॉर्नर सामन्यात नाही. त्यामुळे भारत जिंकेल असं वाटतंय.

सिरुसेरि's picture

15 Jan 2016 - 1:44 pm | सिरुसेरि

शिखर धवन परत अपयशी . त्याला संघातून विश्रांतीची गरज आहे . किंवा मग एक बदल आणी एक शेवटची संधी म्हणून त्याचा फलंदाजीचा क्रम बदलून ५ ,६ केला पाहिजे .

सिरुसेरि's picture

15 Jan 2016 - 1:45 pm | सिरुसेरि

अजिंक्य राहणेला धवन च्या जागी सलामीला पाठविले पाहिजे .