क्रिकेट

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in क्रिडा जगत
1 Oct 2015 - 12:59 pm

क्रिकेटवर मी पूर्वी ३-४ धागे काढले होते. प्रत्येक धागा एका विशिष्ट मालिकेसाठी/स्पर्धेसाठी होता. ती मालिका/स्पर्धा संपल्यावर धाग्याचे आयुष्य संपले. विश्वचषक स्पर्धा मार्च २०१५ मध्ये संपली. परंतु वर्षभर जगात कोठे ना कोठे तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने होतच राहतात. त्यासाठी हा एक कॉमन धागा आहे. सध्या चालू असलेले सामने/स्पर्धा/मालिका इ. विषयी इथे लिहिता येईल.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

15 Jan 2016 - 2:05 pm | कपिलमुनी

शेवटच्या १० षटकामध्ये भारतीय फलंदाजी चाचपडताना दिसत आहे. २०० च्या आसपास धावा आणि २ बाद अशा परीस्थितीमधून ३३०-३५० निघायला हव्यात.
भारताकडे पिंच हिटरची कमतरता आहे. धोनीचे टायमिंग पूर्वीसारखे राहिले नाही आणी धावा निघत नाहीत, जडेजाला उपखंडाबाहेर धावा निघत नाहीत. ५-६ क्रमांकासाठी वेगवान ३०-४० धावा जमवणार्‍या फलंदाजाची ( युवराज- रैना) उणीव भासते आहे.
सध्याची गोलंदाजी बघता ३०८ धावा पुरेश्या नाहीत .

नवीन नियमच फटका आहे तो मुनी .
शेवटच्या १० मध्ये ५ खेळाडू राहू शकतात इनर सर्कल बाहेर .

अद्द्या's picture

15 Jan 2016 - 4:30 pm | अद्द्या

आज पुन्हा २०-३० रन कमी पडले .

आणि बोलिंग पण . .

आणखी एक हरले

श्रीगुरुजी's picture

15 Jan 2016 - 8:52 pm | श्रीगुरुजी

- शिखर धवन मागील ७ पैकी ६ सामन्यात अपयशी आहे. अजून त्याला किती संधी द्यायची? त्याच्याऐवजी रहाणे/कोहली/मनीष पांडे सलामीला येऊ शकतात.

- ईशांत शर्माचे क्षेत्ररक्षण अत्यंत वाईट आहे. आज त्याने शॉन मार्शचा एक अत्यंत सोपा झेल सोडला. त्याच्या अत्यंत सुस्त हालचालीमुळे त्याच्याकडे चेंडू मारला हमखास १ धाव जास्त निघते. गोलंदाजीतही त्याने एकट्याने ८ वाईड चेंडू टाकले.

- धोनी एकंदरीत अत्यंत निरूत्साहाने खेळताना दिसतो. त्याचे टायमिंग पूर्वीसारखे जमत नाही. दोन्ही सामन्यात २ बाद २००+ धावा व ५ पेक्षा जास्त धावगती असल्यामुळे किमान ३३० धावा व्हायला पाहिजे होत्या. परंतु शेवटच्या २० षटकात वेग फारसा वाढताना दिसत नाही.

- अश्विन व जडेजा परदेशात फारसे यशस्वी होताना दिसत नाहीत. अश्विनचे क्षेत्ररक्षणही चांगले नाही.

- दुर्दैवाने रोहीत शर्माची दोन्ही शतके वाया गेली.

पुढील सामन्यांसाठी इशांत व धवन ऐवजी गुरकीरत सिंग मान व भुवनेश्व्र्र्/ऋषि धवन यांना खेळवून पहावे.

गेल्या सामन्यात त्याने सर्वात कमी धावा दिल्या होत्या. आज त्याच्या जागी ईशांतला बघून जाम आश्चर्य वाटले खरे तर.

अद्द्या's picture

16 Jan 2016 - 4:26 pm | अद्द्या

भुवनेश्वर जखमी आहे न ?

फेरफटका's picture

15 Jan 2016 - 9:30 pm | फेरफटका

कालच्या मॅच मधे आपण लवकर acceleration सुरु केलं हा बदल सुखावह होता. रोहित, कोहली आणी रहाणे मस्त खेळले (रहाणे चा खेळ बघत रहावा असा असतो, एकदम क्लासी!). धोनी is nearing end of his prowess. he is unable to play those big shots in slog overs and his timing is patchy. पण बॉलिंग ला मात्र जबरदस्त makeover ची गरज आहे. If Ashwin (out of subcontinent), Jadeja are the best bowlers we have, then our definition of best needs to be looked at.

असंका's picture

16 Jan 2016 - 5:05 pm | असंका

If Ashwin (out of subcontinent), Jadeja are the best bowlers we have, then our definition of best needs to be looked at.

कसलं भारी भारी लिहिलंयत हो!! वा!! एकदम डौलदार विंग्रजी!!

आम्हाला कधी जमेल असलं टकाटक लिवायला... :(

कपिलमुनी's picture

16 Jan 2016 - 5:46 pm | कपिलमुनी

एवढा इंग्रजीचा भडिमार का ? पहिल्या दोन वाक्यावरुन मराठी टंकता येता हे दिसतय मग पुढचे आंग्लाळलेले ओंगळेपण का ??

फेरफटका's picture

18 Jan 2016 - 9:51 pm | फेरफटका

कपीलमुनी आणी असंका, तुमच्या प्रतिसादातला उपरोध वगळून, हे मराठी संकेतस्थळ असल्यामुळे मराठीत लिहावं हा मुद्दा मान्य आहे.

गामा पैलवान's picture

16 Jan 2016 - 6:31 pm | गामा पैलवान

जोहानसबर्गात इंग्लंडने दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेची ७ बाद ६४ अशी हालत केलीये. पहिल्या डावात १० धावांची नाममात्र आघाडी मिळवल्यावर दुसऱ्या डावात भयंकर कत्तल आरंभली. दाफ्रिकेचा नागपूरचा ७९ हा नीचांक पार होणार का?

-गा.पै.

गामा पैलवान's picture

16 Jan 2016 - 6:32 pm | गामा पैलवान

घ्या! वरचं लिहिस्तोवर ८ बाद ६७.
-गा.पै.

गामा पैलवान's picture

16 Jan 2016 - 7:33 pm | गामा पैलवान

दाफ्रिका सर्वबाद ८३. इंग्लंडला जिंकायला फक्त ७४ हवेत. आजून ३५ षटके खेळ बाकी आहे. आजंच निकाल लागणार.
-गा.पै.

गामा पैलवान's picture

17 Jan 2016 - 12:20 am | गामा पैलवान

कळविण्यास अत्यंत आनंद होतो की इंग्लंडने दाफ्रिकेचा ७ गाडी राखून पराभव केला आहे. अत्यानंदाचे कारण म्हणजे दाफ्रिका कसोटी सामन्यांच्या क्रमवारीतल्या पहिल्या स्थानावरून घसरली असून ते स्थान आता भारताला (किंवा बीसीसीआयला) मिळाले आहे.

-गा.पै.

पैसा's picture

17 Jan 2016 - 8:30 am | पैसा

हे नंबर म्हणजे कॉमिक प्रकार आहे. भारताचे कोहली धवन आणि धोनी पहिल्या १० त बघून ड्वाले पाणावले!

श्रीगुरुजी's picture

17 Jan 2016 - 8:48 pm | श्रीगुरुजी

प्रथम क्रमांकावर जाण्यासाठी भारतीची कामगिरी उंचावलेली नसून आफ्रिकेची कामगिरी खालावली हे मुख्य कारण आहे. आपली रेष वाढलेली नसून आफ्रिकेची रेष लहान झालेली आहे.

आफ्रिकेची अवस्था बघून वाईट वाटते. स्वत:च्या देशात इतकी दारूण अवस्था व्हावी हे पाहवत नाही.

इंग्लंडने गेल्या काही वर्षात भारत व आफ्रिकेला त्यांच्याच भूमीवर नमविले आहे व स्वत:च्या भूमीवर ऑस्ट्रेलियाला नमविले आहे. कसोटी सामन्यात इंग्लंडची कामगिरी इतर देशांच्या तुलनेत चांगली वाटते. आयपीएल मध्ये इंग्लंडचा एकही खेळाडू नसल्याने त्यांचे कसोटी खेळण्याचे तंत्र बिघडले नसावे.

आयपीएल मध्ये इंग्लंडचा एकही खेळाडू नसल्याने त्यांचे कसोटी खेळण्याचे तंत्र बिघडले नसावे

?

इओन मोर्गन?

श्रीगुरुजी's picture

18 Jan 2016 - 2:23 pm | श्रीगुरुजी

मॉर्गन फक्त एकदिवसीय व ट-२० सामन्यात खेळतो. तो कसोटी संघात नसतो.

पैसा's picture

17 Jan 2016 - 8:49 pm | पैसा

भरत ऑस्ट्रेलिया पुन्हा अ‍ॅक्शन रिप्ले. खेळणारे बदलतात. शेवट तेच ते.

श्रीगुरुजी's picture

17 Jan 2016 - 8:58 pm | श्रीगुरुजी

तिसरा एकदिवसीय सामनाही हरलो. हा सामना सुद्धा पहिल्या दोन सामन्यांची पुनरावृत्ती होती. भारताची प्रथम फलंदाजी, संघाची ३०० च्या आसपास धावसंख्या, पहिल्या चारातील तीन खेळांडूंच्या भरपूर धावा, ४० षटकापर्यंत जेमतेम २ गडीच गमाविलेले व ५ च्या आसपास धावगती, मधल्या षटकांत धावगती वाढविण्यात आलेले अपयश, एका भारतीय फलंदाजाचे शतक, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या ४-५ फलंदाजांनी धावांचा रतीब टाकणे आणि मोठी धावसंख्या हातात असूनसुद्धा अत्यंत वाईट गोलंदाजी व वाईट क्षेत्ररक्षणामुळे झालेला पराभव हे या सामन्यात सुद्धा दिसून आले.

भारतीय संघाची इतकी वाईट गोलंदाजी पाहिली नव्हती. पूर्वी श्रीनाथ, झहीर खान, कुंबळे असे हमखास बळी मिळविणारे गोलंदाज होते. सध्याच्या संघात हमखास बळी मिळवू शकेल असा एकही गोलंदाज नाही.

ईशांत शर्माचे क्षेत्ररक्षण म्हणजे एक विनोद आहे. तो नक्की कोणत्या कारणामुळे संघात आहे ते समजतच नाही. अत्यंत वाईट क्षेत्ररक्षण, सोपे झेल सोडणे, वाईट थ्रो, सुस्त हालचाली, चेंडू अडविण्यासाठी फारसे खाली न वाकणे, सर्वसाधारण गोलंदाजी, वाईट फलंदाजी ... असे अनेक मुद्दे असून सुद्धा तो संघात कसा हे एक गूढच आहे. आज प्रेक्षक त्याच्या क्षेत्ररक्षणाची टिंगल उडवित होते.

ईशांतच्या वाईट क्षेत्ररक्षणाचे हे एक उदाहरण -

34.6 Yadav to MR Marsh, 2 runs, shows the full face of the bat and plays it down to Ishant, who makes a mess of that at mid-on, what was meant to be a dot ball is two instead. He took his eyes off the ball. Very, very poor. Kohli is livid and he has every right to be.

धोनीची प्रतिक्रिया अशी होती.

MS Dhoni: It's tough to take. We didn't field well tonight. There were at least three boundaries we should have easily stopped.

असो. उर्वरीत २ सामनेही आपण हरणार हे गृहीत धरलेले आहे.

पैसा's picture

17 Jan 2016 - 9:05 pm | पैसा

धोनीने आमचे गोलंदाज अननुभवी आहेत असे म्हटले. "There is some encouragement, it is tough when you lose games but you have to realise the bowling attack is largely inexperienced. It’s good to see Ishant bowl well in the middle, but when there’s a bit of pressure, the fast bowlers leak runs.” त्याला वसिम अक्रमने तिथेच खोडून काढले. यादव, इशांत आणि जडेजा हे काय अननुभवी का?

श्रीगुरुजी's picture

17 Jan 2016 - 9:11 pm | श्रीगुरुजी

आधीच्या सामन्यात खेळलेले अश्विन आणि भुवनेश्वर हे देखील अनुभवी आहेत.

चिनार's picture

18 Jan 2016 - 9:43 am | चिनार

to be or not to be is the question..

खेळाव की न खेळाव हा एकच सवाल आहे...या मैदानाच्या उकीरड्यावर खरकट्या ग्लोव्ह्स चे तुकडे घेउन खेळाव बेशरम लाचार कर्णधार होउन की फेकुन द्यावे हे बॅट बौल त्यात गुण्डाळलेल्या धावांसह ह्या पीचच्या काळ्याशार भेगान्मध्ये आणी करावा शेवट सर्वांचा एका षटकाराने..माझा..तुझा..ह्या सामन्याचा..

बॅटच्या मध्यभागाने चेंडुला डंख मारावा तसा एक षटकार खेचुन विश्वकप जिंकवला मी..पण आज समोर दिसतोय तो फक्त पराभव...पण त्या एका विजयाची स्वप्न आजही पडतात..इथच तर मेख आहे..परदेशी पीचवर पाय रोवुन उभे राहण्याचा धीर होत नाही म्हणुन आम्ही सहन करतो आमच्या गोलंदाजांवर होणारे अत्याचार...आणी उभे राहतो खालच्या मानेनी या निर्दयी मीडीया समोर..

विधात्या तु इतका कठोर का झालास?..एका बाजुला आम्ही ज्यान्ना बॅट पकडायला शिकवली ते आमचे कर्णधार पद हिसकावुन घेतात आणी दुसर्या बाजुला ज्यान्नी आम्हाला खेळायला शिकवले ते आता समालोचक बनुन आमचेच वाभाडे काढतात..!

मग झालेल्या पराभवाच ओझ घेउन हे करुणाकरा आम्ही कर्णधारान्नी कोणाच्या माथ्यावर खापर फोडायच...???
कुणी स्पिनर देता का स्पिनर?..या वेड्या कर्णधाराला कोणी स्पिनर देता का स्पिनर ???
by chinar

पैसा's picture

18 Jan 2016 - 10:59 am | पैसा

लै भारी!

श्रीगुरुजी's picture

18 Jan 2016 - 2:22 pm | श्रीगुरुजी

LOL

नया है वह's picture

18 Jan 2016 - 3:35 pm | नया है वह

सही चिनार भाऊ!

कपिलमुनी's picture

18 Jan 2016 - 3:37 pm | कपिलमुनी

फुल्लटू बॅटींग !!

नाखु's picture

18 Jan 2016 - 3:45 pm | नाखु

मस्त रे (आणी अताशा चेसुकी ही बंद आहे) करावं तरी काय ???

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2016 - 12:51 pm | श्रीगुरुजी

४ थ्या सामन्यात थोडासा बदल झाला. भारताने प्रथम फलंदाजी करण्याऐवजी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली आणि ३४८ धावांचा डोंगर उभा केला. भारताने पहिल्या तीनही सामन्यात अपेक्षेपेक्षा २५-३० धावा कमी केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने मात्र व्यवस्थित फलंदाजी करून जवळपास साडेतीनशेचा टप्पा गाठला. भारतीय गोलंदाजांची कत्तल नेहमी प्रमाणेच सुरू राहिली. फिंच, वॉर्नर, स्मिथ आणि मॅक्सवेलने पुन्हा एकदा चंगळ केली.

आता भारत काय करतो बघू या. खेळपट्टी निर्जीव आहे. भारताने पहिल्या तीनही सामन्यात चांगली फलंदाजी केली आहे. ऑस्टेलियाची गोलंदाजी फारशी चांगली नाही. मैदान छोटे आहे. अशा परिस्थितीत ३४९ धावा करणे अगदीच अशक्य नाही.

सौंदाळा's picture

20 Jan 2016 - 7:00 pm | सौंदाळा

हरलो
काळ धोनीचा सूड घेतोय.
गांगुली, सेहवाग, लक्ष्मण ज्या धोनीमुळे गेले आज तीच वेळ धोनीवर येऊन ठेपली आहे.

विराटप्रेमी's picture

20 Jan 2016 - 9:08 pm | विराटप्रेमी

७० चेंडूत ७० धावा............. ७ खेळाडू शिल्लक..................आणि हरलो आपण काय बोलायचं?

.. १०० करोड लोकसंख्या असलेल्या भारताला एक वेगवान गोलंदाज मिळू शकत नाही........हेच

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2016 - 11:27 pm | श्रीगुरुजी

इतक्या घाणेरड्या पद्धतीने दुसरा कोणताही देश हरला नसेल. सारे जग द. आफ्रिकेला चोकर्स मानते. पण खरे चोकर्स आपण आहेत. भारताने अनेक सामने विजयाच्या उंबरठ्यावरून हरून दाखविले आहेत.

- १९८७ साली पाकड्यांविरूद्ध ५ व्या कसोटीत विजयासाठी २२० धावांचा पाठलाग करताना गावसकर ९६ धावा करून ७ वा बाद झाल्यावर व जिंकण्यासाठी २५-३० धावा हव्या असताना पुढील काही क्षणातच उर्वरीत ३ खेळाडू बाद होऊन भारत १५ धावांनी सामना हरला.

- १९९९ साली पाकड्यांविरूद्ध ३ व्या कसोटीत विजयासाठी फक्त २० च्या आसपास धावा हव्या असताना व ५ गडी शिल्लक असताना प्रथम मोंगिया व नंतर पाठदुखीने अत्यंत त्रस्त झालेला सचिन शतक करून बाद झाल्यावर पुढील ४ धावात उर्वरीत ३ खेळाडू बाद होऊन भारत १५-२० धावांनी सामना हरला.

- यावर्षी अ‍ॅडलेडमध्ये ३७८ धावांचा पाठलाग करताना शेवटच्या १८ षटकात फक्त ६५ धावा हव्या होत्या व फक्त ५ बाद झाले होते. कोहली शतक करून नाबाद होता. अचानक साहा आत्मघात करून बाद झाला व पाठोपाठ कोहलीही बाद झाला व लगेच भारताने सामना गमाविला.

- २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदिवसीय सामन्यात ३५१ धावांचा पाठलाग करताना सचिनने तुफान फटकेबाजी करून १७५ धावा केल्या. शेवटच्या ४ षटकात फक्त २२ धावा हव्या होत्या व ४ गडी शिल्लक होते. अचानक सचिनने विकेट फेकली व भारत शेवटी ३ धावांनी हरला.

- २०११ च्या विश्वचषकात आफ्रिकेविरूद्ध भारत एक वेळ ३८.५ षटकात १ बाद २६९ इतक्या भक्कम परिस्थितीत होता. अचानक डाव कोसळला व भारत सर्वबाद २९६ करून शेवटी सामना हरला. त्याच विश्वचषकात इंग्लंडविरूद्धही अशीच पडझड झाली होती.

- २०१५ च्या विश्वचषकात पाकडे व आफ्रिकेविरूद्ध नेमकी शेवटच्या १० षटकात माती खाल्ली.

- आणि हा आजचा सामना.

खरे चोकर्स आपण आहोत.

श्रीगुरुजी's picture

26 Jan 2016 - 9:04 pm | श्रीगुरुजी

भारताने ५ वा एकदिवसीय सामना जिंकून थोडक्यात व्हाईटवॉश टाळला. आजचा पहिला ट-२० सामना मोठ्या फरकाने जिंकला. कोहली व रोहीत शर्मा या दौर्‍यात जोरदार खेळत आहेत. धोनीने ३ चेंडूत ११ धावा करून मजा आणली. नवोदीत बुमराह, पंड्या आणि बुजुर्ग नेहरूनेही चांगली कामगिरी केली. रैना बरा खेळला. युवराजनेही एक झेल घेतला. जडेजा व अश्विनने चांगली गोलंदाजी केली. एकंदरीत धवन वगळता सर्वजण चांगले खेळले.

दुसरीकडे द. आफ्रिकेने इंग्लंडने ४ था कसोटी सामना इ २८२ धावांच्या फरकाने जिंकून आपला विजयाचा दुष्काळ संपविला. भारत दौर्‍यात आफ्रिकेचा ०-३ असा पराभव झाला होता. आपल्याच प्रांगणात इंग्लंडविरूद्ध १-२ अशी मालिका गमवावी लागली. कर्णधार स्वीकारल्यावर आमलाची फलंदाजी ढेपाळली होती. पहिल्या कसोटीत पराभव झाल्यावर त्याने लगेच कर्णधारपद सोडले व पुढील ३ कसोटीत १ द्विशतक, १ शतक व एकदा ९६ धावा असे पुनरागमन केले. परंतु त्याच्याजागी एबी डीव्हिलिअर्स कर्णधार झाल्यावर त्याच्या फलंदाजीवर वाईट परीणाम झाला आहे. तिसर्‍या कसोटीतील दुसरा डाव, चौथ्या कसोटीतील दोन्ही डाव असे लागोपाठ ३ कसोटी डावात तो शून्यावर बाद झाला. इतका दर्जेदार फलंदाज स्वतःच्या देशात लागोपाठ ३ डावात भोपळा फोडू शकला नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे.

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2016 - 12:54 pm | श्रीगुरुजी

आज मेलबोर्नला दुपारी २:०८ वाजता दुसरा ट-२० सामना आहे. भारताने पहिला सामना जिंकल्यामुळे सुरूवात चांगली झाली आहे. पहिल्या सामन्यात बुमराहने बर्‍यापैकी गोलंदाजी केल्यावर भारताला आपला मलिंगा सापडला असा माध्यमांना शोध लागला. पहिल्या सामन्यात नेहरू व युवराज या वयस्करांनी चांगली कामगिरी केली. अजून हरभजनला संधी मिळालेली दिसत नाही. तिकडे श्रीलंकेने आपल्या ट-२० संघात ३६ वर्षीय दिलहारा फर्नांडोचा समावेश केला आहे. तो जवळपास साडेतीन वर्षांपूर्वी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ट-२० सामने हे तरूण खेळाडूंचे समजले जातात. परंतु वयस्कर खेळाडू या फॉर्मॅटमध्ये पुनरागमन करताना दिसत आहेत.

श्रीगुरुजी's picture

30 Jan 2016 - 1:05 pm | श्रीगुरुजी

दुसरा ट-२० सामना पण जिंकला. मार्चमध्ये ट-२० विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित केलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ उत्तम खेळत आहे.

श्रीगुरुजी's picture

31 Jan 2016 - 8:18 pm | श्रीगुरुजी

तिसरा सामना पण जिंकला. यावेळी धावांचा पाठलाग करून विजय मिळाला.

लीलाधर's picture

1 Feb 2016 - 10:17 am | लीलाधर

भारताची हीच तर खासियत आहे.
समोरच्या टीमला आयत्यावेळी संधी द्यायला बघतात.

सौंदाळा's picture

15 Feb 2016 - 11:35 am | सौंदाळा

श्रीलंके विरुद्ध ३ ट-२० सामन्यात भारताचा २-१ ने विजय.पहिला सामना खेळताना आपला संघ ऑस्ट्रेलियातल्या पाटा पिचेसवरुन मानसिकरित्या बाहेर आलाच नव्ह्ता असे वाटले. खराब फटके मारुन फलंदाज बाद झाले. बाकीचे दोन सामने मात्र आपण सफाईदारपणे जिंकले. ट-२० विश्वचषक स्प्रधेसाठी भारताचे पारडे चांगलेच जड वाटत आहे. मायदेशात स्पर्धा होण्याचासुद्धा फायदापण संघाला मिळेल.

रणजी स्पर्धेत मुंबई-म.प्र आणि आसाम - सौराष्ट्र असे उपांत्य सामने चालु आहेत. मुंबई आणि सौराष्ट्र यांच्यात अंतिम सामना होण्याची शक्यता वाटतेय. अंतिम सामना पुण्यात २४-२८ फेब्रु दरम्यान होणार आहे.

श्रीगुरुजी's picture

15 Feb 2016 - 10:15 pm | श्रीगुरुजी

(१) द. आफ्रिका मागील महिन्यात इंग्लंडविरूद्ध मायदेशात कसोटी सामने मालिका १-२ असे हरले. नंतर ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पहिले दोन सामने इंग्लंडने जिंकले. परंतु त्यानंतर जोरदार मुसंडी मारून आफ्रिकेने उर्वरीत तीनही सामने जिंकून मालिका ३-२ अशी जिंकली.

(२) न्यूझीलँड मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध २ कसोटींची मालिका खेळत आहे. पहिला कसोटी सामना ऑसीजने डावाने जिंकला. दुसरा कसोटी सामना खेळून न्यूझीलँडचा धडाकेबाज व अत्यंत आक्रमक कर्णधार व फलंदाज असलेला ब्रँडन मॅकलम् वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. मॅकलम् हा माझा अत्यंत आवडता खेळाडू. अतिशय सकारात्मक व आक्रमक खेळणारा हा खेळाडू वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षीच निवृत्ती घेत आहे याचे दु:ख आहे.

(३) १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धा विंडीजच्या संघाने प्रथमच जिंकली.

श्रीगुरुजी's picture

20 Feb 2016 - 10:47 pm | श्रीगुरुजी

*** धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान शतकाचा विक्रम रचला आहे. हा मॅक्क्युलमच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना असून यामध्ये त्याने अवघ्या ५४ चेंडूत शतकाला गवसणी घातली. याशिवाय, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही आपल्या नावावर नोंदविला आहे. मॅक्क्युलमने वेस्ट इंडीजचे महान फलंदाज सर व्हिव्हियन रिचर्ड्स व पाकिस्तानचा कसोटी संघाचा कर्णधार मिस्बा उल हक यांचा यापूर्वीचा ५६ चेंडूतील शतकाचा विक्रम मागे टाकला. यापूर्वी वेस्ट ईंडीजच्या विव्ह रिचर्डसने इंग्लंडविरूद्ध १९८५-८६ मध्ये ५६ चेंडूत व पाकिस्तानच्या मिसबाह उल हकने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध ५६ चेंडूत शतक केले होते. हा विक्रम आज मोडला गेला. मॅकलम् ने आपल्या शेवटच्या १०२ व्या कसोटीत अवघ्या ७९ मिनिटात ४ षटकार व १६ चौकार मारून हे विक्रमी शतक केले. ५३ चेंडूंनंतर तो ९६ वर नाबाद होता. त्यावेळी मैदानातील फलकावर विक्रमाबद्दल माहिती येऊ लागली. पुढच्याच चेंडूवर त्याने लाँगऑफला चौकार मारून विक्रमी शतक पूर्ण केले. २००६-०७ मध्ये इंग्लंडविरूद्ध गिलख्रिस्टने पर्थ मध्ये केवळ ५७ चेंडूत शतक केले होते.

न्यूझीलँडची धावसंख्या २० षटकानंतर ३ बाद ३२ असताना मॅकलम् मैदानात उतरला. आल्याआल्या त्याने चौफेर फटकेबाजी सुरू केली आणि बघताबघता सामन्याचे चित्र पालटले. तो ३९ धावांवर असताना गलीमध्ये मिचेल मार्शने त्याचा जबरदस्त झेल पकडला होता, परंतु रिप्लेमध्ये पॅटिन्सनने तो नोबॉल टाकल्याचे दिसल्याने मॅकलम् वाचला. तो शेवटी ७९ चेंडूत तब्बल १४५ धावा करून बाद झाला. त्यात त्याने २१ चौकार व ६ षटकार मारले होते.

*** तसेच मॅक्क्युलमने षटकार मारण्याचा ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टचा विक्रम मोडला. त्याने आजपर्यंत कसोटीत एकूण १०१ षटकार मारले आहेत.

अत्यंत झंझावाती, आक्रमक व सकारात्मक क्रिकेट खेळणारा हा महान खेळाडू या कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे हे आपल्या सर्वांचेच दुर्दैव आहे.

बेकार तरुण's picture

22 Feb 2016 - 9:09 am | बेकार तरुण

काल अबड्याची (ए बी डी) फलंदाजी बघायला मजा आली. पण त्याहुन जास्ती मजा दुसर्‍या बाजुला अमलाची फलंदाजी बघायला आली. अबड्या मागल्या जन्मीचा (कसोटी मालिकेचा) सूड घेतल्यासारखा मारत सुटला होता तर अमला तंत्रशुद्ध कसे खेळावे चे धडे देत होता बहुतेक !!!

पैसा's picture

27 Feb 2016 - 7:50 pm | पैसा

पाकिस्तान ८ ओव्हर्स-६ विकेट्स-४२ रन्स.

पैसा's picture

27 Feb 2016 - 8:33 pm | पैसा

Pakistan innings: 83 / 10 (17.3)R/R: 5
Pakistan (PAK)
Batsman Status R B 4s 6s
Mohammad Hafeez c MS Dhoni b Ashish Nehra 4 4 1 0
Sharjeel Khan c Ajinkya Rahane b Jasprit Bumrah 7 5 1 0
Khurram Manzoor run out (Virat Kohli) 10 18 1 0
Shoaib Malik c MS Dhoni b Hardik Pandya 4 12 1 0
Umar Akmal lbw b Yuvraj Singh 3 4 0 0
Sarfraz Ahmed (W) b Ravindra Jadeja 25 24 3 0
Shahid Afridi (C) run out (Ravindra Jadeja) 2 2 0 0
Wahab Riaz lbw b Ravindra Jadeja 4 12 0 0
Mohammad Sami c Suresh Raina b Hardik Pandya 8 16 1 0
Mohammad Amir b Hardik Pandya 1 8 0 0
Mohammad Irfan not out 0 0 0 0
Extras : 15 (b - 0, w - 11, nb - 0, lb - 1, Penalty - 0)
Total83 (17.3)
Fall of wickets: 1-4 (Mohammad Hafeez, 0.4 ov), 2-22 (Sharjeel Khan, 3.3 ov), 3-32 (Khurram Manzoor, 5.5 ov), 4-35 (Shoaib Malik, 7 ov), 5-35 (Umar Akmal, 7.1 ov), 6-42 (Shahid Afridi, 8 ov), 7-52 (Wahab Riaz, 11.4 ov), 8-70 (Sarfraz Ahmed, 15.1 ov), 9-83 (Mohammad Sami, 17.2 ov), 10-83 (Mohammad Amir, 17.3 ov)
Bowler O M R Wkts W No
Ashish Nehra 3 0 20 1 2 0
Jasprit Bumrah 3 2 8 1 0 0
Hardik Pandya 3.3 0 8 3 0 0
Yuvraj Singh 2 0 11 1 0 0
Ravindra Jadeja 3 0 11 2 2 0
Ravichandran Ashwin 3 0 21 0 1 0

श्रीगुरुजी's picture

27 Feb 2016 - 11:19 pm | श्रीगुरुजी

नेहमीप्रमाणे जिंकलोच. पाकड्यांविरूद्ध आपण जिंकणार याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नव्हती. खेळपट्टी गोलंदाजीला अनुकूल होती. युवी धडपडत खेळला पण टिकून राहिला. त्यामुळेच कोहलीला मनसोक्त खेळता आले. ३ बाद ८ नंतर जर युवी किंवा कोहली लवकर बाद झाले असते तर मात्र अवघड होते.

श्रीगुरुजी's picture

3 Mar 2016 - 12:52 pm | श्रीगुरुजी

न्यूझीलंडचा धडाडीचा व आक्रमक माजी कर्णधार मार्टिन क्रो याचे अवघ्या ५३ व्या वर्षी lymphoma मुळे निधन झाले. अत्यंत आक्रमक फलंदाज व आक्रमक कर्णधार असलेल्या मार्टिन क्रो ची कारकीर्द गुडघ्याच्या दुखापतीमुळे झाकोळली गेली. दुखण्यामुळे ३३ व्या वर्षीच त्याला निवृत्ती घ्यावी लागली.

१९९२ च्या विश्वचषक स्पर्धेत तो न्यूझीलंडच्या कर्णधार होता. फिरकीपटू दीपक पटेलला सलामीचा गोलंदाज म्हणून वापरण्याची त्याची चाल खूपच यशस्वी झाली होती. त्याच स्पर्धेत त्याने एक अभिनव प्रयोग राबविला आणि तो खूपच यशस्वी झाला. डावाच्या सुरवातीच्या १० षटकात जेव्हा सर्व क्षेत्ररक्षक जवळ असतात व ३० यार्डच्या बाहेर फक्त २ क्षेत्ररक्षक असतात तेव्हा त्याचा फायदा घेण्यासाठी सुरवातीच्या षटकात चेंडू उचलून लांब मारून भरपूर धावा घेण्याची त्याची योजना अत्यंत यशस्वी झाली होती. न्यूझीलंडचा सलामीचा आक्रमक फलंदाज मार्क ग्रेटबच सलामीला आल्यावर लगेचच टोलेबाजीला सुरूवात करून सुरवातीच्या षटकांचा फायदा उठवायचा. नंतर हीच योजना श्रीलंकेच्या कालुवितरणाने १९९६ च्या विश्वचषकात अत्यंत यशस्वीपणे राबविली. १९९२ च्या स्पर्धेत न्यूझीलंड उपांत्य फेरीत पोहोचले होते. परंतु उपांत्य फेरीत त्यांना पाकड्यांनि हरविले.

न्यूझीलंडकडून कसोटीत सर्वाधिक १७ शतके करण्याचा मान त्याच्याकडेच आहे. त्याने केलेल्या २९९ धावा या न्यूझीलंडतर्फे केल्या गेलेल्या सर्वोच्च धावा होत्या. अगदी अलिकडे म्हणजे २०१४ मध्ये ब्रेंडन मॅकलम् ने त्रिशतक झळकावून हा विक्रम मोडला.

१९८२ ते १९९५ अशी १३ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे अवघ्या ३३ व्या वर्षी निवृत्त झाला.

गामा पैलवान's picture

3 Mar 2016 - 1:01 pm | गामा पैलवान

मार्टिन क्रोस आदरांजली. १९८६ च्या बेन्सन हेजेस चषकाच्या वेळेस जेरेमी कोनी आणि मार्टिन क्रो यांचे धूर्त डावपेच अंधुकसे आठवतात. मार्टिन यास जेफ क्रो नावाचा भाऊही आहे बहुतेक.

-गा.पै.

बेकार तरुण's picture

3 Mar 2016 - 1:04 pm | बेकार तरुण

बहुतेक नाही, नक्कीच होता. जेफ त्याचा मोठा भाउ.
रसेल क्रो (ग्लॅडिएटर फेम) हा चुलत भाउ आहे त्यांचा.

बोका-ए-आझम's picture

3 Mar 2016 - 1:05 pm | बोका-ए-आझम

अत्यंत कंटाळवाणी फलंदाजी करायचा. त्यांचा चुलतभाऊ म्हणजे अभिनेता रसेल क्रो.

श्रीगुरुजी's picture

7 Mar 2016 - 1:23 pm | श्रीगुरुजी

ट-२० स्पर्धेचा आशिया चषक भारताने आरामात जिंकला. सर्व ५ सामन्यात भारत अपराजित राहिला. बांगलादेशाच्या मूर्ख प्रेक्षकांची चांगली जिरविली. हा सामना भारत हरेल असे संपूर्ण सामन्यात १ सेकंद सुद्धा वाटले नाही. भारताचे २ गडी बाद झाल्यावर भारताला विजयासाठी १४ चेंडूत २२ धावा हव्या होत्या. युवराज, रैना, पंड्या, जडेजा यापैकी कोणीही आला असता तरी भारताने सामना जिंकलाच असता. परंतु एक मूर्ख बांगलादेशीयाने काढलेल्या फालतू व्यंगचित्राचा राग धोनीच्या डोक्यात असावा. म्हणून तो स्वतःच फलंदाजीला आला आणि केवळ ६ चेंडूत २० धावा काढून सामना ७ चेंडू राखून जिंकून दिला. त्याचे त्वेषाने मारलेले दोन षटकार व १ चौकार निव्वळ लाजवाब होते.

आता काही दिवसातच ट-२० विश्वचषक स्पर्धा भारतात सुरू होईल. ही स्पर्धा भारत, दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यापैकीच कोणीतरी जिंकेल असा माझा अंदाज आहे.

श्रीगुरुजी's picture

7 Mar 2016 - 1:24 pm | श्रीगुरुजी