क्रिकेट

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in क्रिडा जगत
1 Oct 2015 - 12:59 pm

क्रिकेटवर मी पूर्वी ३-४ धागे काढले होते. प्रत्येक धागा एका विशिष्ट मालिकेसाठी/स्पर्धेसाठी होता. ती मालिका/स्पर्धा संपल्यावर धाग्याचे आयुष्य संपले. विश्वचषक स्पर्धा मार्च २०१५ मध्ये संपली. परंतु वर्षभर जगात कोठे ना कोठे तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने होतच राहतात. त्यासाठी हा एक कॉमन धागा आहे. सध्या चालू असलेले सामने/स्पर्धा/मालिका इ. विषयी इथे लिहिता येईल.

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

7 Mar 2016 - 6:09 pm | गामा पैलवान

बक्कीने फक्त ३ स्वैर टाकले. बांदेकरांनी तर एकही स्वैर टाकला नाही. या ३ सोडल्यास दोन्ही संघांत मिळून ० अतिरिक्त धावा निघाल्या. हा विक्रम असेल काय?
-गा.पै.

150 प्रतिसाद झाले. वर्ल्ड कप निमित्ताने नवीन धागा काढावा ही विनंती...

श्रीगुरुजी's picture

9 Mar 2016 - 11:13 pm | श्रीगुरुजी

प्रयत्न करतो.

सध्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी ९ व्या व १० व्या संघाचे पात्रता फेरीचे सामने सुरू आहेत. काल झिंबाब्वे आणि अफगाणीस्तानने आपापले सामने जिंकले. आज बांगलादेश विरूद्ध नेदरलँड्स आणि आयर्लंड विरूद्ध ओमान हे सामने होते. दोन्ही सामने चुरशीचे झाले. बांगलादेशाने नेदरलँड्सला फक्त ८ धावांनी हरविले. आयर्लँडने ओमानविरूद्ध १५४ धावा केल्यावर ओमानने चांगली सुरूवात करून पहिल्या विकेटसाठी ८.३ षटकात ६९ धावांची सलामी दिली. नंतर त्यांचे ४ फलंदाज ओळीने बाद होऊन १४ षटकात ५ बाद ९० अशी परिस्थिती झाली. परंतु त्यानंतर जतिंदर सिंग व अमीर अलीने ४.१ षटकात ४७ धावा करून विजयासाठी ११ चेंडूत १७ धावा असा विजय जवळ आणला. परंतु १९ व्या षटकात २ गडी बाद झाले व फक्त ४ धावा निघाल्या. शेवटच्या ६ चेंडूत १४ धावा हव्या होत्या व ७ गडी बाद झाले होते. सामना आयर्लँडच्या बाजूने झुकला होता. परंतु २० वे षटक टाकणार्‍या सोरेन्सनने अत्यंत खराब गोलंदाजी केली. त्याचा पहिलाच चेंडू नोबॉल होता व त्यावर चौकार मिळाल्याने ५ धावा झाल्या. आता ६ चेंडूत ९ धावा हव्या होत्या. पुढील ३ चेंडूत १ चौकारासह ६ धावा निघाल्या. आता फक्त ३ चेंडूत ३. ४ थ्या चेंडूवर १७ चेंडूत ३२ धावा करणारा अमीर अली बाद झाला. आता २ चेंडूत ३ धावा पाहिजेत आणि ८ बाद झालेत. ५ वा चेंडू सोरेन्सनने मूर्खासारखा पुन्हा एकदा नोबॉल टाकला व त्यावर पुन्हा एकदा ५ धावा मिळाल्याने ओमान जिंकले. आयर्लँडचे २० षटक सोरेन्सनने अत्यंत खराब टाकल्याने जिंकता जिंकता आयर्लँड हरले. आज नेदरलँड्स व आयर्लँड जिंकावे अशी माझी इच्छा होती, पण ती अपूर्ण राहिली.

आयर्लँडचे २० षटक सोरेन्सनने अत्यंत खराब टाकल्याने जिंकता जिंकता आयर्लँड हरले

विकेटकीपरच्या पायामधून गेला की शेवटचा बॉल..ती तर विकेटकीपरची चूक ना?

श्रीगुरुजी's picture

10 Mar 2016 - 7:32 pm | श्रीगुरुजी

बरोबर. पण तो नोबॉल सुद्धा होता. तो फुल्टॉस बॉल इतका वेगवान होता की फलंदाज व यष्टीरक्षकालाही तो अडविता आला नाही (कंबरेच्या वर टाकल्याने नोबॉल दिला का पाय पुढे दिल्याने नोबॉल दिला हे समजले नाही). नोबॉल दिल्याने १ धाव मिळून २ चेंडूत २ धावा असे प्रमाण झाले असते व पुढचा चेंडू फ्रीहिट असल्याने ओमान जिंकण्याची शक्यता एकदम वाढली होती.

भलताच विनोदी शेवट झाला. मी तर पडून पडून हसत होतो. तरी हा आणखी विनोदी भाग माझ्या नजरेतून सुटलाच.

इराणी करंडकाच्या सामन्याला शेवटच्या दिवशी अत्यंत नाट्यमय कलाटणी मिळुन मुंबईचा हाताशी आलेला विजय शेष भारत संघाने हिरावला.

बेकार तरुण's picture

11 Mar 2016 - 11:25 am | बेकार तरुण

१ ल्या डावाच्या शेवटी आता फक्त शिष्टाचार (फोर्मॅलिटी) राहिली आहे असं वाटत होतं मुंबईच्या विजयातील !!
मुंबईचा दुसरा डाव कोलमडला तेव्हाही वाटत नव्हत मुंबई हरतील असं !! पण !!!!!

बाळ सप्रे's picture

11 Mar 2016 - 12:15 pm | बाळ सप्रे

मुंबइने जिद्दीने खेळ केलाच नाही असे वाटते. विकेट्सची गरज असताना. श्रेयस अय्यरसारख्या पार्ट टायमर्सनी गोलंदाजी करणे. संधू, नायर वगैरेंनी फारच कमी गोलंदाजी करणे. सोडलेले झेल यावरून असा निष्कर्श काढावासा वाटला.
बहुधा रणजी करंडकाइतकी प्रतिष्ठा नसल्याने इराणी करंडक तितक्या जिद्दीने लढला जात नसावा.

श्रीगुरुजी's picture

12 Mar 2016 - 6:27 pm | श्रीगुरुजी

ट-२० विश्वचषक स्पर्धेसाठी ९ व्या व १० व्या संघांसाठी खेळल्या गेलेल्या पात्रता फेरीतून आज अफगाणिस्तानचा प्रवेश नक्की झाला. स्कॉटलंड, हाँगकाँग आणि आज झिंबाब्वेवर विजय मिळवून त्यांनी आपला विजय नक्की केला. दुसर्‍या गटात नेदरलँड्स व आयर्लँड आधीच अपात्र ठरले आहेत. उद्या बांगलादेश व ओमान या संघातील विजेता पात्र ठरेल. जर सामना खेळला गेला नाही तर धावगतीवर निर्णय होईल. सामना झाला तर बांगलादेश ओमानवर सहज विजय मिळवेल असा अंदाज आहे.

श्रीगुरुजी's picture

6 Apr 2016 - 8:40 pm | श्रीगुरुजी

आयपीएलसाठी नवीन धागा सुरू करावा का? किती जणांना आयपीएलमध्ये इंटरेस्ट आहे?

viraj thale's picture

6 Apr 2016 - 8:54 pm | viraj thale

ipl चा धागा चालू करा

अजयिन्गले's picture

6 Apr 2016 - 10:31 pm | अजयिन्गले

धागा चालू करावा, मी एक बघितल मिपा वर वाचक क्रिकेट वर जास्त प्रतिसाद देत नाही. मला वाट क्रिकेट अवड्नार्यांची संख्या कमी असावी किवा आवडून प्रतिसाद न देणे हे पण आशु शकत. सर्वात जास्त आणि चांगले प्रतिसाद वाचण्यास्ठी मी बरेचद पाकिस्तान न्यूस पापर DAWN वर जातो, दोन्ही देशांचे प्रतिसाद वाचायला मझा येते. मिपा वर नेहमीच हिरमोड होतो.

श्रीगुरुजी's picture

14 Jul 2016 - 9:08 pm | श्रीगुरुजी

१) आजपासून लॉर्ड्सवर इंग्लंड वि. पाकिस्तान हा कसोटी सामना सुरू झाला आहे. तब्बल ४२ वर्षे व ४७ दिवस वय असलेला मिसबाह उल हक पाकिस्तानचे नेतृत्व करीत आहे. आज पहिल्याच दिवशी त्याने अर्धशतक झळकावले असून तो नाबाद ५८ या धावसंख्येवर खेळत आहे. स्पॉट फिक्सिंग मुळे ५ वर्षांची बंदी सहन करावा लागलेला वेगवान गोलंदाज महम्मद अमीर पुन्हा एकदा संघात आला आहे.

२) भारत सध्या वेस्ट इंडीजच्या दौर्‍यावर असून पहिला कसोटी सामना २१ जुलैला सुरू होणार आहे.

स्पार्टाकस's picture

14 Jul 2016 - 11:59 pm | स्पार्टाकस

मिसबाहने सेंच्युरी ठोकली लॉर्ड्सवर आणि दिवसाअखेरीस नॉटआऊट आहे तो. असद शफीकबरोबर १४८ रन्सची पार्टनरशीप करुन त्याने पाकीस्तानला बर्‍यापैकी सुस्थितीत आणलं आहे. अर्थात इंग्लंडच्या फिल्डर्सनी अनेकदा त्याच्यावर मेहेरबानी केली हा भाग वेगळा. असद शफीक आणि शेवटच्या बॉलवर नाईटवॉचमन राहत अली आऊट झाला. (नाईटवॉचमन अशासाठी की विकेटकीपर सर्फराज अहमद हा चांगला बॅट्समन असून राहत अली त्याच्या आधी आला होता)! इंग्लंडसाठी क्रिस वोक्सने ४ विकेट्स काढल्या आहेत.

बेकार तरुण's picture

15 Jul 2016 - 7:29 am | बेकार तरुण

सुरुवातीला तरी मिसबाह जाम चाचपडत खेळत होता.
एक दोनदा एल बी पण वाचला. चांगला खेळलेला दिसतो नंतर गडी.

बादवे - लॉर्ड्स वर मॅच म्हणजे ब्रिटिश कॉमेंट्रेटर्स तिथल्या प्रत्येक गोष्टीच कौतुक करतात, टाय बांधुन बसलेले मख्ख चेहर्‍याचे म्हातारे, चढ उतार असलेली खेळपट्टी अगैरे
असो, क्रिकेटच्या पंढरीचे आषाढी एकादशीच्या दिवशी एवढे कौतुक बास :)

स्पार्टाकस's picture

15 Jul 2016 - 8:55 am | स्पार्टाकस

हॅम्पशायर आणि इंग्लंडचा ओपनिंग बॅट्समन मायकेल कारबरी याला कॅन्सर(Cancerous Tumour) झाल्याचे निदान झाले आहे. इंग्लंडच्याच जेम्स टेलर पाठोपाठ गंभीर आजाराचे निदान झालेला कारबरी हा दुसरा क्रिकेटर! २०१३ च्या अ‍ॅशेस सिरीजमध्ये (मिचेल जॉन्सनच्या अ‍ॅशेस) तो इंग्लंडचा ओपनर म्हणून खेळला होता, पण अनेक इनिंग्जमध्ये चाळीसपेक्षा जास्तं रन्स करुनही केवळ एकदाच तो पन्नाशीपार मजल मारु शकला. त्या अ‍ॅशेस सिरीजनंतर केविन पीटरसनप्रमाणेच इंग्लंडने कारबरीचीही गच्छन्ती केली!

गेट वेल सून मायकेल कारबरी!

viraj thale's picture

15 Jul 2016 - 7:36 pm | viraj thale

फिक्सिमीर ची इंग्लीश फलंदाजंकडून धुलाई ,हफिज कडून दोन झेल सुटले .

स्पार्टाकस's picture

15 Jul 2016 - 8:11 pm | स्पार्टाकस

माझ्या अंदाजाप्रमाणे इंग्लंडची मिडल ऑर्डर कोलमडली आहे.

अ‍ॅलेक्स हेल्स लवकर गेल्यावर कूक - रुट यांची पार्टनरशीप चांगली झाली, पण रूटने वेडगळपणाने आपली विकेट फेकली आणि त्याच्यापाठोपाठ व्हिन्स आणि बॅलन्स अपेक्षेप्रमाणे लेगस्पिनर यासिर शहाच्या गळाला लागले आहेत. आता कूक आणि बॅरीस्टोव्ह काय करतात ते बघायचं!

श्रीगुरुजी's picture

15 Jul 2016 - 10:47 pm | श्रीगुरुजी

इग्लंड ७ बाद २३९, पाकडे ३३९.

श्रीगुरुजी's picture

17 Jul 2016 - 3:02 pm | श्रीगुरुजी

पाकडे वि. इंग्लंड यांच्यातला पहिला कसोटी सामना रंगतदार अवस्थेत आहे. तिसर्‍या दिवशी पाकड्यांकडे २८१ धावांचे आधिक्य आहे व अजून २ गडी बाद व्हायचे आहेत. या खेळपट्टीवर फलंदाजी अवघड दिसते. ४ थ्या डावात इंग्लंडला फलंदाजी अवघड जाणार आहे. आता तरी सामन्यावर पाकड्यांचे वर्चस्व दिसते.

४२ वर्षीय मिसबाहने पहिल्या डावात शतक केले, पण दुसर्‍या डावात केवळ दुसर्‍या चेंडूवर तो शून्यावर बाद झाला!

श्रीगुरुजी's picture

17 Jul 2016 - 10:28 pm | श्रीगुरुजी

पाकड्यांविरूद्ध इंग्लंड पहिल्या कसोटीत ४ थ्या दिवशी पराभवाच्या मार्गावर -

पाकडे पहिला डाव - ३३९, इंग्लंड पहिला डाव - २७२
पाकडे दुसरा डाव - २१५, जिंकण्यासाठी २८३ धावांचा पाठलाग करताना इंग्लंड दुसर्‍या डावात २०४/८

आज अजून ११ षटके शिल्लक आहेत व उद्याचा पूर्ण दिवस शिल्लक आहे. अजून वोक्स खेळतोय. परंतु उर्वरीत ७९ धावा करणे अवघड आहे.

श्रीगुरुजी's picture

17 Jul 2016 - 10:56 pm | श्रीगुरुजी

इंग्लंड सर्वबाद २०७. ७५ धावांनी पाकडे जिंकले. या सामन्यात वोक्स (११ बळी), यासिर शाह (१० बळी), असाद शफिक (७३ व ४९ धावा), मिसबाह (११४ व ० धावा) यांची कामगिरी उल्लेखनीय झाली.

बेकार तरुण's picture

18 Jul 2016 - 7:14 am | बेकार तरुण

यासिरनी चांगली गोलंदाजी केली काल.
सामनावीर तोच ठरला आहे का???

श्रीगुरुजी's picture

18 Jul 2016 - 7:03 pm | श्रीगुरुजी

यासिर शाह हाच सामनावीर ठरला.

श्रीगुरुजी's picture

18 Jul 2016 - 7:09 pm | श्रीगुरुजी

SC accepts Lodha proposals on administrative changes in BCCI

The Supreme Court has accepted major recommendations of the Lodha Committee on reforms in the Board of Control for Cricket in India, including a bar on ministers and civil servants and those above 70 from becoming its members, but left it to Parliament to decide whether it should come under RTI and betting on the game should be legalised.

http://www.rediff.com/cricket/report/sc-accepts-lodha-proposals-on-admin...

७५ वर्षीय पवार मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. हे पद बीसीसीआय चा सदस्य असे समजले जाते का? तसे असेल तर त्यांना जावे लागेल.

श्रीगुरुजी's picture

21 Jul 2016 - 7:20 pm | श्रीगुरुजी

First test between India and West Indies is about to start in 10 minutes from now. India has won the toss and elected to bat on a flat pitch.

श्रीगुरुजी's picture

21 Jul 2016 - 10:00 pm | श्रीगुरुजी

India's slow start. 72/1 in 27 overs at lunch.

स्पार्टाकस's picture

22 Jul 2016 - 1:30 am | स्पार्टाकस

विराट कोहलीची सेंच्युरी!

श्रीगुरुजी's picture

22 Jul 2016 - 2:28 pm | श्रीगुरुजी

दिवसअखेर ४ बाद ३०२. कोहली नाबाद १४६. भारत सामना बहुतेक डावाने जिंकणार. भारत मालिकेतील सर्व सामने डावाने जिंकणार.

भारत सामना बहुतेक डावाने जिंकणार.
भारत मालिकेतील सर्व सामने डावाने जिंकणार.

मौज वाटली

स्पार्टाकस's picture

22 Jul 2016 - 9:55 pm | स्पार्टाकस

विराट कोहली २००!

अश्विन पण मस्तं खेळतोय!

तिकडे अ‍ॅलिस्टर कूक सेंच्युरी मारुन आऊट झाला, पण जो रुट सेंच्युरी मारुन खेळतोय!

स्पार्टाकस's picture

23 Jul 2016 - 12:09 am | स्पार्टाकस

रविचंद्रन अश्विनची सेंचुरी!

अश्विनची ही तिसरी टेस्ट सेंचुरी. गंमत म्हणजे त्याच्या तीनही सेंचुरी वेस्ट इंडीजविरुद्ध काढलेल्या आहेत!

अद्द्या's picture

23 Jul 2016 - 11:49 am | अद्द्या

तिकडे रूट आणि इकडे कोहली .

मज्जाच मज्जा

श्रीगुरुजी's picture

23 Jul 2016 - 1:53 pm | श्रीगुरुजी

अश्विनने शतक केले आणि अमित मिश्रानेही अर्धशतक केले. पण मुरली विजय, पुजारा व रहाणे अपयशी ठरले. गंमत आहे. अर्थात भारत सहज सामना जिंकेल असा अंदाज आहे.

श्रीगुरुजी's picture

23 Jul 2016 - 11:10 pm | श्रीगुरुजी

दुस-या दिवसअखेर इंग्लंड ८ बाद ५८९ व पाकडे ४ बाद ५७. जो रूटने २५४ धावा केल्या.

भारताविरुद्ध विंडीज ५ बाद ११२. शमीचे ४ बळी. साहाने ३ झेल घेतले व १ यष्टिचित केला.

स्पार्टाकस's picture

24 Jul 2016 - 2:08 am | स्पार्टाकस

वेस्ट इंडीजला फॉलो ऑन.
उद्या पाकिस्तानवरही अशीच वेळ येण्याची शक्यता.

श्रीगुरुजी's picture

24 Jul 2016 - 7:56 pm | श्रीगुरुजी

भारताला पहिल्या डावात ३२३ धावांचे आधिक्य मिळालेले आहे. फॉलोऑन मिळाल्यावर दुसर्‍या डावात विंडीजची दुसर्‍या डावातही वाईट सुरूवात झाली असून त्यांनी आतापर्यंत २ बाद ३३ इतकी मजल मारलेली आहे. विंडीजच्या पहिल्या डावात सलामीचा फलंदाज क्रेग ब्रेथवेटने ७४ धावा केल्या पण दुसर्‍या डावात तो स्वस्तात गेला. पदार्पणातच यष्टीरक्षक डाऊरिचने ५७ धावा करून कारकीर्दीची चांगली सुरूवात केली. भारतातर्फे यादव व शमीने प्रत्येकी ४ बळी घेतले तर साहाने यष्टीमागे ५ झेल व १ यष्टीचित अशी उत्तम कामगिरी केली. विंडीज अजून २९० धावांनी मागे आहेत. सामना बहुतेक आजच संपेल व भारत डावाने जिंकेल असा अंदाज आहे.

इंग्लंड वि. पाकड्यांच्या दुसर्‍या कसोटीत पाकड्यांचे हाल झाले आहेत. आज तिसर्‍या दिवशी पाकड्यांची अवस्था ९ बाद १७९ इतकी वाईट असून ते अजून ४१० धावांनी मागे आहेत. ४२ वर्षीय मिसबाहने या कसोटीतही अर्धशतक काढले.

श्रीगुरुजी's picture

24 Jul 2016 - 11:09 pm | श्रीगुरुजी

संपत आला सामना. विंडीज ७ बाद १२३.

गामा पैलवान's picture

25 Jul 2016 - 1:07 am | गामा पैलवान

श्रीगुरुजी, थोडा धीर धरावा लागेल. ७ बाद १३२ वरून ८ बाद २२०. शेपूट फार वळवळतंय. बक्कीसंघाची हीच समस्या आहे.
आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

26 Jul 2016 - 3:14 pm | श्रीगुरुजी

अपेक्षेप्रमाणे भारत डावाने जिंकला. इंग्लंडने देखील प्रचंड मोठ्या फरकाने पाकड्यांना हरवून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

बाळ सप्रे's picture

26 Jul 2016 - 4:23 pm | बाळ सप्रे

लंका - ऑसीमध्येही टेस्ट मॅच चालू आहे..
मुरली, संगा, जयवर्धने यांच्यानंतर फार बिकट अवस्था आहे .. या वर्षभरात सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यात ते केवळ एक टी२० सामना जिंकू शकले आहेत.

श्रीगुरुजी's picture

27 Jul 2016 - 6:17 pm | श्रीगुरुजी

तसाही श्रीलंका हा काही फार बलाढ्य संघ कधीच नव्हता. मुरली २०११ मध्ये निवृत्त झाला व जयवर्धने आणि संगक्कारा २०१५ मध्ये निवृत्त झाले. मलिंगाने कसोटी क्रिकेट कधीच सोडले. दिलशानने अधिकृत निवृत्ती जाहीर केली नसली तरी तो निवृत्त झाल्यासारखाच आहे. श्रीलंकेचे नवीन खेळाडू फारसे प्रतिभाशाली नाहीत. गोलंदाजीत तर फारच बिकट अवस्था आहे. त्यांची गोलंदाजी अजूनही ३६ वर्षीय हेराथवरच अवलंबून आहे. २०१५ मध्ये भारताने श्रीलंकेला त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत २-१ असे पराभूत केले होते.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटीत घरच्या मैदानावर श्रीलंकेची बिकट अवस्था आहे. पहिल्या डावात फक्त ११७ व दुसर्‍या डावात १ बाद ६. ऑसीजने पहिल्या डावात २०३ धावा करून ८६ धावांची आघाडी घेतलेली आहे.

बेकार तरुण's picture

28 Jul 2016 - 2:40 pm | बेकार तरुण

मेंडीस कोण आहे? २२९ पैकी १४१ एकट्यानेच केल्या आहेत !
मॅच चांगली होईल असे एकुण वाटत आहे.
ऑसीज हरले पाहिजेत, ते हरलेले पहाताना का माहित नाही पण मजा येतेच :)

श्रीगुरुजी's picture

28 Jul 2016 - 8:58 pm | श्रीगुरुजी

श्रीलंका ६ बाद २८२. लंकेकडे १९६ धावांचे आधिक्य आहे. खेळपट्टी प्रत्येक डावागणुक सुधारत चालली आहे. त्यामुळे लंकेला २५० धावांची आघाडी मिळाली तरी पुरेशी नाही.

श्रीगुरुजी's picture

29 Jul 2016 - 2:57 pm | श्रीगुरुजी

लंकेने दुसर्‍या डावात ३५३ धावा करून ऑसीजना विजयासाठी २६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आतापर्यंत ऑसीजने ३ बाद ८१ धावा केल्या आहेत. ऑसीजना सामना जड जातोय का अशी शंका यायला लागली आहे.

गामा पैलवान's picture

30 Jul 2016 - 2:03 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

तुमच्या शंकेचं खात्रीत रुपांतर होतंय. श्रीलंका विजयाच्या उंबरठ्यावर आहे. लक्ष्य २६८ असून ऑस्ट्रेलीय ८ बाद १६१ वर गचके खाताहेत. आजून ४६ षटके बाकी आहेत.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

30 Jul 2016 - 2:21 pm | श्रीगुरुजी

ऑसीज ८ बाद १६१ (७५ षटकांत). षटक क्रमांक ६४ ते ७५ अशी लागोपाठ १२ षटके निर्धाव गेली. सामन्यात आतापर्यंत ३८ पैकी १४ जण पायचित झाले आहेत.

श्रीगुरुजी's picture

30 Jul 2016 - 2:44 pm | श्रीगुरुजी

काय चाललंय समजत नाहीय्ये. अजून ८ षटके निर्धाव गेली. लागोपाठ २० षटके निर्धाव गेली आहेत. गतवर्षी आफ्रिकन्स भारतात आले होते. त्यावेळी भारताची फिरकी खेळताना डीव्हिलअर्स आणि आमला असाच नांगर टाकून खेळले होते त्याची आठवण आली.

गामा पैलवान's picture

30 Jul 2016 - 11:00 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

ओकीफ जखमी असल्याने धावू शकत नव्हता. पर्यायी धावक (रनर) घेणं अधिक जोखीमचं होतं. म्हणून एकामागून एक षटकं निर्धाव जात होती. शेवटच्या साडेतेहेतीस षटकांत अवघ्या ८ धावा निघाल्या. आदल्या षटकातला १ निर्धाव चेंडू जमेस धरला तर २०२ चेंडूंत फक्त ८ धावा काढल्या. त्यापैकी दोन चौकार होते. म्हणजे २०० चेंडूंत ० धावा !

आ.न.,
-गा.पै.