कालचक्र

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
30 Sep 2015 - 8:27 pm

कोण्या एका काळी एका दुरदेशी एक महान तपस्वी एका निबिड अरण्यात एकाकी भटकत होता.
त्याची गृहस्थी सर्वदुर प्रदेशात एका कुटित आपल्या मुलांना घेऊन त्याची वाट पाहत अश्रुंचे ताटवे फुलवत राहीली.

दऱ्या डोंगरे चिखल दलदल आणि ऊष्ण वाळवंट तुडवणारा तपस्वी आता या दिशाहीन प्रवासाला थकला होता.
एके दिवशी एका चवदार तळयाकाठी त्याला एक बंदिस्त शुभ्र मडके सापडले.
वैफल्याने ग्रासलेल्या आपल्या मळकट झोळीत त्याने ते ठेऊन दिले.
एका अवाढव्य शिळेवर चढुन त्याने ते खोलुन पाहिले. या चमत्कारी मडक्यात त्याला त्याचे भविष्य दिसले.
तो महान तपस्वी हा अनमोल ठेवा घेऊन परतीच्या वाटेवर आपल्या गृहस्थीकडे निघाला.
वाटेत भेटणाऱ्या असंख्य वाटसरुंना त्यांचे तंतोतंत भविष्य सांगुन चकित केले. याकामी बऱ्याच मुद्रा मिळवुन तो घरी परतला.

त्याची महती सर्वदुर पसरली. दुरदूरच्या प्रदेशातील लोक आता त्याच्या कुटीबाहेर भविष्य जाणण्यासाठी भल्याथोरल्या रांगा लावु लागले. त्याची गृहस्थी प्रसन्न हसली. त्याच्या मुलाबाळांनी सोन्याचे दिवस पाहिले. मिळणाऱ्या अखंड मुद्रेतुन त्याने एक रुबाबदार वाडा बांधला. हळुहळु त्याचे रुपांतर राजवाड्यात झाले. नगरातल्या प्रजेने त्याचा उदोउदो केला. हा महान तपस्वी आता या नगरीचा एक बलाढ्य राजा झाला.

कोण्या एका सर्वदुर प्रदेशातील एका महान राजाने या महान तपस्वीचे बंदिस्त शुभ्र मडके पळविण्यासाठी भलामोठा फौजफाटा पाठवला.
तपस्वी नेस्तनाबुत झाला. त्याचा अनमोल ठेवा लुटला गेला. त्याला दुर अज्ञातवासात पाठवले गेले. परंतु झालेल्या घनघोर रणसंग्रामात त्या चमत्कारी मडक्याचे तुकडे तुकडे झाले.

महान राजाच्या वैभवाचे दिवस आता उलटे फिरु लागले. कपटनीतीने त्याचे सिंहासन भरडले गेले. दुर अज्ञातवासात त्याला सोडुन दिले गेले.
हा महान राजा एका निबिड अरण्यात एकाकी भटकत राहिला.
त्याची गृहस्थी सर्वदुर प्रदेशात एका कुटित आपल्या मुलांना घेऊन त्याची वाट पाहत अश्रुंचे ताटवे फुलवत राहीली.
दऱ्या डोंगरे चिखल दलदल आणि ऊष्ण वाळवंट तुडवणारा राजा आता या दिशाहीन प्रवासाला थकला होता.
एका चवदार तळयाकाठी त्याला एक बंदिस्त कुट्ट मडके सापडले.
एका अवाढव्य शिळेवर चढुन त्याने ते खोलुन पाहिले. या चमत्कारी मडक्यात त्याला त्याचा भुतकाळ दिसला. त्याला दिसले एक महान तपस्वी एका अवाढव्य शिळेवर एका चमत्कारी मडक्यात आपले भविष्य पाहत आहे.

एक महान तपस्वी आणि एक महान राजा एका अवाढव्य शिळेवर एका चमत्कारी मडक्यात एकमेकांना कुतुहलाने पहात आजही एकाकी ऊभे आहेत.

कथाप्रकटनलेखप्रतिभा

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

30 Sep 2015 - 9:05 pm | कविता१९७८

मस्त , कथा आवडली

सानिकास्वप्निल's picture

30 Sep 2015 - 9:54 pm | सानिकास्वप्निल

छान आहे कथा.

बाबा योगिराज's picture

30 Sep 2015 - 10:10 pm | बाबा योगिराज

जव्हेर भौ,
आवड्यास. येक लम्बर.
मस्तच.

सिध्दार्थ's picture

30 Sep 2015 - 10:41 pm | सिध्दार्थ

अप्रतिम

द-बाहुबली's picture

30 Sep 2015 - 10:47 pm | द-बाहुबली

हीच गोष्ट टाइम मशीनच्यानुशंगाने लिहुन अजुन खोदकर करता येउ शकते. पण मस्त आहे. आवडली.

जव्हेरगंज's picture

30 Sep 2015 - 11:11 pm | जव्हेरगंज

येस, पुन्हा आत जायचा विचार होता. पण ऊगाच बोर वगैरे मारेल म्हणुन आवरती घेतली. :)

सर्व प्रतिसादकांचे आभार :):):):):)

वगिश's picture

30 Sep 2015 - 10:49 pm | वगिश

आवडेश

पैसा's picture

30 Sep 2015 - 11:13 pm | पैसा

कथा आवडली!

जव्हेरगंज's picture

30 Sep 2015 - 11:50 pm | जव्हेरगंज

नवीन शीर्षक सुचवल्याबद्दल पैसाताईंचे आभार :):):)

उगा काहितरीच's picture

1 Oct 2015 - 12:45 am | उगा काहितरीच

मस्त बॅटिंग चालू आहे. आवडली ही पण कथा हेवेसांनलगे

राघवेंद्र's picture

1 Oct 2015 - 2:10 am | राघवेंद्र

कथा आवडली!!!

इशा१२३'s picture

1 Oct 2015 - 3:01 pm | इशा१२३

छान कथा!

मस्त आहे. भाषेमुळे अजुनच मजा आला.

जव्हेरगंज's picture

1 Oct 2015 - 7:52 pm | जव्हेरगंज

:):):) आभारी आहे.
तुमचा आयडी मत्तच्च.!!:-D