भाग २ गावातील गुढ(भयकथा)

दिनु गवळी's picture
दिनु गवळी in जनातलं, मनातलं
15 Sep 2015 - 10:33 am

रवीचे लक्ष झाडावर गेले. पण रवीला तिथे काहीही दिसले नाही.तो पर्यंत ती असुरी शक्ती झाडाच्या पालवीत गुडूप(लपली) झाली होती.
******************"***********************************************
अचानक समोरच्या बोळातुन कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आला.
रवी पळत पळत त्या बोळात आला पण तो येईपर्यंत तिथे त्या कुत्र्याचे मेलेल शरीरच त्याला दिसले.त्या कुत्र्याने काहीतरी भयानक पाहीले होते.हे मात्र नक्की... !
रवीने आजुबाजूला खुप शोध घेतला पण त्याला काहीच मिळालं नाही.
**********
*********************************
१ वाजला होता . अजुनही रवी गावात इकडे तिकडे भटकत होता. आकाशातुन एक लुकलुकणारे विमान जात होते. रवी काही क्षण आकाशात बघत होता.ते विमान दृष्टी आड होताच तो पुढे निघाला. अजुनही ती असुरी नजर रवीच्या मागे लक्ष ठेवुन होती.अचानक सोसाट्याचा वारा सुटला वडाचे झाड पारंब्या सोबत हलु लागले. रवी ने अंगावरील शाल घट्ट पकडली . अचानक रवीच्या कानावर हसण्याचा आवाज आला अशा भयाण वातावरणात कोण हसत असेल हा विचार रवीच्या मनात आला त्याने आजुबाजूला बघितले . आणि अखेर रवी ज्याचा शोध घेत होता ती गोष्ट अखेर त्याला दिसली. रवीपासुन थोड्याच अंतरावर एक काळी आकृती ऊभी होती. रवीला फक्त त्या असुरी शक्तीचे लाल लाल डोळे दिसले. पहिल्यांदाच रवीने असा प्रकार बघितला होता. त्याने हातातली काठी मजबुत पकडली. मनातल्या मनात हनुमानाचा जप सुरु केला. आणि तो त्या आकृतीच्या दिशेने धावला... तो पर्यत ती असुरी शक्ती अंधारात कुठेतरी गायब झाली .रवी पुन्हा हताश झाला.

***********************
***************************
*************************
आता रवी पण खुप थकला होता.त्याला खुप झोपही लागली होती शेवटी निराश होऊन तो घरी आला . मागच्या खिडकीतुन आत जाऊन तो अंथुरणावर पडला. त्याच्या मनात अजुनही तेच विचार चालले होते .मेलेलं कुत्र आणि ती काळी आकृती ही भानगड नक्की काय आहे .हे कोडं रवीला पडल होतं. पहाटे पहाटे कुठे त्याचा डोळा लागला.
*****************************
सकाळी ८ वाजता रवी निवांत ऊठला. सर्व विधी ऊरकुन त्याने गावात फेरफटका मारला. गावातील लोकं मंदिरासमोर त्या पाटला विषयी बोलत होते. कुणी म्हणे मी पाटील पाहीला तर कुणी म्हणे मी .
जो तो मिरची मसाला लावुन आपआपली बाजु मांडत होता.रवीला त्याच्या बोलण्याच हसु येत होतं . रात्रीतर सारे घरात घोरत पडले होते आणि आता काय खोट बोलतात .रवी मनातल्या मनात म्हणाला .. आपल्याला कुणाची तरी मदत घ्यायलाच हवी अस रवीला वाटले त्याने पटकन आपल्या एका मित्राला फोन लावला.आणि त्याला सर्व माहीती दिली. हा मित्र पुण्याचाच होता. रवीचा अगदी जीलवग मित्र ( निल ) रवीचा त्याच्यावर खुप विश्वास होता .कारण तो रवीप्रमाणेच धिट होता.
तो नेहमी अशा चित्रविचीत्र गोष्टींचा शोध घ्यायचा आज ती संधी त्याला चालुन आली होती.त्याने रवीला फोनवर मी येतोय असे सांगितले. रवीला पण आता एक प्रकारचा धीर आला .
बघता बघता ६ वाजले ऱवी चा मित्र निल अजुनही आला नव्हता. अचानक दारात निल ची बाईक येऊन थांबली. रवीने आपल्या आईला आवाज दिला आई माझा मित्र निल आलाय. निलला घेऊन रवी घरात आला.निल म्हणाला अरे रवी तुझ घर शोधत शोधत आलो रे खुप मोठं गाव आहे रे !
गप्पा मारुन झाल्यावर रवीच्या आईने दोघांनाही जेवायला वाढले. निलला जेवण खुपच आवडले. जेवण होताच दोघांनी पुढची तयारी केली .बँटरी व मजबुत काठ्या बाजुला काढुन ठेवल्या. ११ वाजेनंतर गावात शोध घ्यायचा दोघांनी ठरवले .तो पर्यत त्यानी एक झोप काढुन घेतली .११ वाजता मोबाईलचा अलार्म वाजला तसे रवीला जाग आली.त्याने निलला ऊठवले. दोघांनी बँटरी व काठ्या हातात घेतल्या अंगावर शाली टाकल्या व खिडकीतुन अलगद खाली उतरले.
**************"*"""""""************
आज रवीच्या सोबत निल होता .म्हणुन रवीला धीर आला होता. कालपेक्षा आज मात्र सारं काही शांत होतं . गावात स्मशान शांतता पसरली होती आज एकही कुत्र किंवा मांजर दिसत नव्हत ना त्यांचा आवाज ...
सगळीकडे निरव शांतता पसरली होती. रवी आणि निल अलगद पावलांनी गावात फिरत होते फिरत फिरत ते दोघेही वडाच्या झाडापाशी आले.अचानक झाडाच्या पालवीतुन सळसळण्याचा आवाज आला. दोघांनी पटकन त्या झाडावर टाँर्च मारली.पण तो पर्यत ती असुरी शक्ती दोघांनाही चकवा देऊन झाडावरुन ऊतरुन समोरच्या बोळात गेली. मात्र हे निलच्या नजरेतुन सुटले नाही .त्याने रवीला हातानेच ईशारा केला व दोघेही त्या दिशेने धावत गेले. शेवटी दोघांनीही त्या असुरी शक्तीला बघितले रवी आणि निलने त्यावर
टाँर्च मारली. ती भयाण नजर त्यांच्याकडे रोखुन बघत होती. रवीने तो चेहरा नीट बघितला आणि त्याला पण नवल वाटले तो चेहरा पाटलाचाच होता. पण अतिशय विचीत्र कमकुवत काळजाच्या माणसाने जर बघितल तर तो जागीच गतप्राण होईल असं ते दृश्य होतं.
****************
निल आणि रवी दोघेही एकमेकांकडे पहात होते.त्यांना पण आता हा भलताच प्रकार आहे हे लक्षात यायला वेळ नाही लागला
. रवी निलला म्हणाला मित्रा हे तर प्रकरण वेगळच आहे आपल्या सामान्य माणसांच हे काम नाही तरी पण आपण आता इथं थांबन चुकीच आहे चल ईथुन यावर आपल्याला विचार करावा लागेल दोघांनीही बँटरीज बंद केल्या. ती शक्ती तोपर्यंत निघुन गेली. दोघेही बोलत बोलत घरी आले रवी म्हणाला अरे निल आपल्याला एखादया मांत्रिकाची मदत घ्यायला हवी तरच तो पाटील संपेल त्याचा आत्मा अजुनही मुक्त झालेला नाही. जोपर्यत त्याला मुक्ती मिळत नाही तोपर्यत गावात असच भितीचं वातावरण राहीलं. याचात विचार करत दोघेही घरी येऊन झोपले.
क्रमशः************

कथामौजमजाविचारलेख

प्रतिक्रिया

लहान मुलांची गोष्ट वाचल्याचा फील येतोय.
खास चम्पक / फुलबाग / ठकठक स्टाईल मस्त जमलीये

मांत्रिक's picture

15 Sep 2015 - 10:43 am | मांत्रिक

मस्त लिहिलंय! पण काही ठिकाणी मोजींची आठवण आली. उदा. बॅटरी हा शब्द!
असो, पण रवि आणि नील खिडकीतून का ये जा करतात मांजरासारखे?

दिनु गवळी's picture

15 Sep 2015 - 10:47 am | दिनु गवळी

रवी आपल्या आईला न सांगता बाहेर पडतोय जर तिला कळल तर ती त्यांना बाहेर पडु देणार नाही

मांत्रिक's picture

15 Sep 2015 - 10:50 am | मांत्रिक

अच्छा, असं आहे का?
पण, आपण तर फॅन तुमच्या लेखनाचे! तुम्ही मिपा गाजवणार नक्कीच!

दिनु गवळी's picture

15 Sep 2015 - 10:53 am | दिनु गवळी

गरिबाच्या लेखनाला नका हसु रावं कथा जमवण्याचा प्रयत्न करतोय

मांत्रिक's picture

15 Sep 2015 - 10:57 am | मांत्रिक

अहो, असं कुजकट शेरे मारणे हा माझा स्वभाव नव्हे. मला आवडलं नाही तर मी सरळ दुर्लक्ष करतो. पण टोमणे मारत बसत नाही. मी मला खरंच आवडली स्टाईल हे संगितलं.

रवी आणि नील ला या मांत्रीकाचा नंबर दया..... :-D :-D

द-बाहुबली's picture

15 Sep 2015 - 1:08 pm | द-बाहुबली

गरिबाच्या लेखनाला नका हसु रावं कथा जमवण्याचा प्रयत्न करतोय

दिनुजी... तुम्ही लिहीत रहा. या जगात दुर्लक्ष करायची क्षमता प्रत्येकाकडे असतेच असे नाही. काहींना ती नसतेच. काहींना इंजेक्शन मिळाल्यावर येते.

आपण आपले नदी सारखे असावे. वाटेतील वेडीवाकडी वळणे, दगड, धोंडे, पापी पुण्यवानांचा स्पर्श... सगळीकडे समद्रुष्टीने पहात आप्ल्या ध्येयाकडे वाटचाल करत रहायचे. असेच लिहीत राहा.

विजुभाऊ's picture

15 Sep 2015 - 11:00 am | विजुभाऊ

दिनुभाव्.ल्ह्या ओ बिंदास........

दिनु गवळी's picture

15 Sep 2015 - 11:00 am | दिनु गवळी

आभारी आहे .सर थँक्स तुमचा आशिर्वाद हीच आमची संपत्ती

मांत्रिक's picture

15 Sep 2015 - 11:17 am | मांत्रिक

तुम्हाला व्यक्तिगत संदेश पाठवलाय. कृपया चेक करा. उजव्या हाताला आवागमन मध्ये ३ क्रमांकाला आहे पर्याय.

आणि आता दिनु गवळी 'मांत्रिका'च्याच शोधात आहेत

मांत्रिक's picture

15 Sep 2015 - 11:14 am | मांत्रिक

ओ, मी नै येणार अजिब्बात!
मी तर घाबरतो भुतांना!

बाबा योगिराज's picture

15 Sep 2015 - 12:41 pm | बाबा योगिराज

ख्या ख्या ख्या....

चांदणे संदीप's picture

15 Sep 2015 - 8:21 pm | चांदणे संदीप

वारल्या गेलो आहे! :=)

दिनु गवळी's picture

15 Sep 2015 - 11:18 am | दिनु गवळी

कथा संपली की लवकरच एक नवीन कथा घेऊन येतोय मी ( दिनु) एका नव्या स्टाईलने लवकरच .....

पहिल्या भागाचं नाव 'गावातील भय ' आणि दुसर्या भागाचं नाव 'गावातील गूढ '. काय राव ?

अन्या दातार's picture

15 Sep 2015 - 5:12 pm | अन्या दातार

भयाची जागा आता गूढतेने घेतली आहे. कळले का मूढ??

(दिङ्मूढ) अन्या

दिनु गवळी's picture

15 Sep 2015 - 1:42 pm | दिनु गवळी

चुकुन झालं राव

सत्य धर्म's picture

15 Sep 2015 - 2:05 pm | सत्य धर्म

वाचताना मस्त फील येतोय बर का.......

दिनु गवळी's picture

15 Sep 2015 - 5:49 pm | दिनु गवळी

मामा येतोय त्या पाटलाला मुक्ती दयायला

ईश्वरसर्वसाक्षी's picture

15 Sep 2015 - 7:22 pm | ईश्वरसर्वसाक्षी

माझ्या मिपा च्या सुरुवातिच्या दिवसात एक लेखक बाया-बापड्यांच्या भाषेत लेख लिहायचे त्यांचा फॅन क्लब स्थापन झाला मोजि फॅन क्लब..नंतर नंतर एक लेखक ज्याना आपण अष्टपैलु लेखक म्हणु शकतो ते म्हणजे निसो सर, ललित साहित्य, गंभिर साहित्य , भय कथा, गुढ कथा, वैचारिक लेखन, अति वैचरिक लेखन, ह्यांचा निसो फॅन क्लब स्थापन झाला.

चांदणे संदीप's picture

15 Sep 2015 - 8:18 pm | चांदणे संदीप

हा मित्र पुण्याचा'च' होता.

हे वाचून अंमळ मौज वाटली.

दिनु गवळी's picture

15 Sep 2015 - 8:25 pm | दिनु गवळी

अहो तो पण कॉलसेंटर मध्येत कामाला असेल हे समजुन घ्या ना

चांदणे संदीप's picture

15 Sep 2015 - 8:32 pm | चांदणे संदीप

मनाला लावून घेऊ नका हो.
सहज गंमतीत विचार आला डोक्यात. बाकी काही नाही.
लिहिते रहा!

विजुभाऊ's picture

15 Sep 2015 - 8:51 pm | विजुभाऊ

पुण्याचे लोक लै म्हंजे लैच स्पेषल अस्त्यात हो!

दिनु गवळी's picture

16 Sep 2015 - 12:38 pm | दिनु गवळी

खरयं

असंका's picture

16 Sep 2015 - 1:03 pm | असंका

चांगलंय.

सुधारायला बराच वाव आहे....

दिनु गवळी's picture

18 Nov 2015 - 9:37 am | दिनु गवळी

सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय

मांत्रिक's picture

18 Nov 2015 - 9:54 am | मांत्रिक

ओ साहेब इतके दिवस कुठे गायब होतात?

DEADPOOL's picture

18 Nov 2015 - 5:11 pm | DEADPOOL

होऊ द्या खर्च !!!!!!!

दिनु गवळी's picture

30 Nov 2015 - 12:47 pm | दिनु गवळी

पेपर चाले होते