लोकमान्य टिळकांचे अग्रलेख विकीमध्ये टंकण्यात साहाय्य हवे

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
8 Sep 2015 - 7:31 pm

मराठी विकिस्रोत प्रकल्पात टिळकांचे केसरीतील लेख भाग ४ संकीर्ण लेख संग्रह (सामाजिक धार्मिक वाङमय विषयक) ग्रंथ उपलब्ध केला आहे. या ग्रंथाची पाने वाचण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ग्रंथातील पानांचे युनिकोडात टंकनासाठी सामुदायीक टंकन योगदानाची गरज आहे.

शिवाय लोकमान्य टिळकांच्या श्रीमद्भवद्गीतारहस्य च्या टंकनाचेही काम अद्याप बाकी आहे.

(टंकन करताना कृपया मूळ लेखनात र्‍हस्व दीर्घाचाही बदल करू नये जसे आहे तसे टंकावे प्रूफ रिडींग झाल्याचे पानावर नोंदवल्या नंतर विकिस्रोत प्रकल्पात पाने संपादनापासून सुरक्षीत करण्याची प्रचालकांना सुविधा असते.)

भूमिका:

नमस्कार,

मि.पा. वाचकांना माझे वेगवेगळे धागे बर्‍याच वेगाने आल्याने जरासा जाच होत असणार त्यात अजून एक धागा जोडताना मन द्विधा असलेतरी हाताशी आलेल्या विषयात रस असलेल्यांची संख्यापण बरीच असेल म्हणून धागा लेख लगेच प्रकाशित करण्याचा विचार करत आहे.

लोकमान्य टिळकांच्या (राजकारणेतर) सामाजिक विषयावरील अग्रलेखांचा भाग असलेला खंड उस्मानीया विद्यापीठाच्या संकेतस्थळावर होता. उस्मानीया विद्यापीठाचे संकेतस्थळ एकतर बहुतांश वेळा न उघडणे आणि सुयोग्य पद्धतीने शोध घेण्याची सुविधा नसल्यामुळे लोकमान्य टिळकांच्या बहुचर्चित अग्रलेख आंजावर उपलब्ध असूनही सापडत नव्हते. आज योगा योगाने जेवढ्यावेळासाठी उस्मानीयाचे संकेतस्थळ उघडले त्यात तो ग्रंथ मराठी विकिस्रोतावर स्थानांतरीत करून घेतला.

लोकमान्य टिळकांचे सामाजिक विषयांवरील अग्रलेखातील मत प्रदर्शनाबद्दल मतमतांतरे असू शकतात पण अद्यापिही त्यांच्या मतांबद्दल चर्चा होते. पण दुर्दैवाने आंतरजालावरील बहुतांश चर्चा मूळ संदर्भांचे दाखले नमुद न करता लोकमान्य टिळक त्यांच्या अग्रलेखातून प्रत्यक्षात काय म्हणाले याचे वाचन आणि दाखले न देताच तेच ते दळण सातत्याने दळले जाताना दिसते. एवढे करून प्रत्यक्षात मूळ व्यक्ती मूळ स्वरुपात काय म्हणाली म्हणू इच्छित होती याचा बोध होत नाही. प्रत्यक्षात संबंधीत ग्रंथ युनिकोडातून शोधण्यास आणि संदर्भ सुलभ झाल्यास सर्वांनाच उपयूक्त ठरू शकेल. काम चालू करताना मोठे वाटेल पण प्रत्येकाने परिच्छेद दोन परिच्चेद जरी मराठी विकिस्रोत प्रकल्पात टंकन करून दिले तर काम पार पाडणे अशक्यही नसावे. सामाजिक-राजकीयदृष्ट्या विवाद्य विषयांपलिकडे सुद्धा लोकमान्यांनी बरेच काही संदर्भ मुल्य असलेले लेखन केले आहे. पण युनिकोडात टंकण्याची मेहनत केल्याशिवाय संदर्भ सुलभ होऊन अधिकाधीक लोकांच्या वाचनातही येणार नाही.

विकिस्रोतात इतरही लेखकांचे प्रताधिकारमुक्त साहित्य टंकनासाठी आणि अनुवाद करून देण्यासाठी उपलब्ध आहे.

(*तळटिप: मराठी विकिस्रोत प्रकल्पाबद्दल अधिक माहिती या ऑनलाईन सादरीकरणात सुद्धा उपलब्ध आहे.) )

माझ्या लेख धाग्यांच्या वाढलेल्या संख्येबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व

माझे लोकमान्य टिळक विषयक यापुर्वीचे मिपा धागालेख

१) लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य
२) लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या; श्री. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या गौरवपर अग्रलेखाचा इंग्रजीते मराठी अनुवाद
३) लोकमान्य टिळक आणि अनुवाद

*मराठी विकिस्रोत प्रकल्पात
**टिळकांचे केसरीतील लेख भाग ४ संकीर्ण लेख संग्रह (सामाजिक धार्मिक वाङमय विषयक)
**श्रीमद्भवद्गीतारहस्य

वाङ्मयसाहित्यिकमाहितीसंदर्भप्रतिभा

प्रतिक्रिया

मी एक अग्रलेख टंकित करून देईन. तो टिळकांच्या धार्मिक विवेचनासंदर्भात असेल तर जास्तच आवडेल. ही अट नाही.

माहितगार's picture

8 Sep 2015 - 8:48 pm | माहितगार

"विकिस्रोत पान १० ते पान १५ ग्रंथातील अनुक्रमणिका पान १ ते ५ आहेत त्यावर ग्रंथातील संबंधीत लेखांचे पृष्ठ क्रमांक सापडतील. आपण कोण्त्याही पृष्ठ क्रमांकापासून चालू करू शकता. अर्थात अनुक्रमणिका भाग आधी टंकून मिळाल्यास सर्वांनाच हीती पाने शोधणे सोपे जाऊ शकेल असे वाटते.

ग्रंथातील पृष्ठ क्रमांक ४४७ उघडे पर्यंत +१५ करावेत उदाहरणार्थ विकिस्रोतातील पान ४६२ उघडल्यास ग्रंथातील पान ४४७ मिळेल. त्यानंतर हा फरक १७चा आहे. या फरकास अंशतः ग्रंथातील पृष्ठ क्रमांकनही तसे असण्याची शक्यता आहे.

मी देखील एका लेखाचं टंकन करून देउ शकेन.

माहितगार's picture

8 Sep 2015 - 8:57 pm | माहितगार

अवश्य, आपल्या आवडीच्या कोणत्याही लेखाचे टंकन केले तरी हरकत नाही. केवळ ते मूळ ग्रंथात आहे तसेच टंकावे, मूळ ग्रंथातील मजकुरात कोणताही बदल करू नये एवढेच पथ्य पाळावयाचे आहे.

पैसा's picture

8 Sep 2015 - 8:53 pm | पैसा

उत्तम प्रकल्प आहे. मात्र सध्या तरी विकि वर काही संपादन करू शकत नाहीये. त्यामुळे अजून काही करणे सध्या तरी शक्य दिसत नाही. प्रकल्पाला मनापासून शुभेच्छा!

माहितगार's picture

8 Sep 2015 - 8:59 pm | माहितगार

शुभेच्छांसाठी धन्यवाद. काही हरकत नाही. आपल्या सवडीनुसार भेट द्या. कुठे एखाद्या कॉम्याचे एखाद्या फुलस्टॉपचे प्रूफरीडींग करत गेले तरी मोठी मदत होऊ शकते.

पिशी अबोली's picture

8 Sep 2015 - 10:09 pm | पिशी अबोली

शुभेच्छा!
बाकी शीर्षक खतरनाक ambiguous आहे.

माहितगार's picture

8 Sep 2015 - 10:26 pm | माहितगार

:) पुन्हा वाचल्यावर लक्षात आले. पण तुम्हीच बदल सुचवा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Sep 2015 - 10:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

"लोकमान्य टिळकांचे अग्रलेख विकीमध्ये टंकण्यात साहाय्य हवे"

हे जास्त योग्य होईल.

पिशी अबोली's picture

8 Sep 2015 - 11:53 pm | पिशी अबोली

अरे बापरे, डॉक्टरांनी सूचना करून तुम्ही बदललंत पण!

मला ते चुकीचं नव्हतं वाटलं, गंमत वाटली होती फ़क्त.. :-D

माहितगार's picture

25 Sep 2015 - 9:23 am | माहितगार

मंडळी, विकिस्रोतात उपरोक्त विषयावर दोन मिपाकरांचे साहाय्य लाभले आहे, अर्थात एकुण कामाचा आवाका पहाता अजून दोन-चार लोक्स त्यांना जॉइन होऊ शकले तर हवेत; कारण एकत्रितपणे काम करताना काम करणार्‍यांना आपण एकटे-दुकटेच आहोत ही भावना राहात नाही, आणि कामात सातत्य तसेच मोठे काम सहज सोपे होण्यात मदत होऊ शकेल.

लाल टोपी's picture

25 Sep 2015 - 11:17 am | लाल टोपी

मी देखील एक दोन लेखांचे टंकन करुन देण्यास तयार आहे परंतु दोन आठवडे व्यस्त आहे त्यानंतर हे काम करुन देऊ शकेन.

माहितगार's picture

18 Oct 2015 - 1:21 pm | माहितगार

या प्रकल्पात बर्‍यापैकी प्रगती होते आहे. सहभागी सदस्यांचे आतापर्यंत केलेल्या मेहनतीसाठी आभार. अजून इतर सदस्यांनी सुद्धा या उपक्रमात सहभागी होण्याचे या निमीत्ताने आवाहन.

याॅर्कर's picture

18 Oct 2015 - 2:39 pm | याॅर्कर

कारण त्यांचे काही विवादित अग्रलेख सुद्धा आहेत?

माहितगार's picture

18 Oct 2015 - 6:25 pm | माहितगार

आपण विकिस्रोत बद्दलचे सादरीकरण (पॉवरपाँईट) पूर्ण वाचलेत आहेत का ? नसल्यास ते एकदा वाचून घ्यावे अशी विनंती आहे. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास विकिस्रोत हे कॉपीराइट फ्री ग्रंथांचे/ दस्तएवजांचे ऑनलाईन ग्रंथालय/वाचनालय आहे. यात कॉपीराइट फ्री झालेल्या कोणत्याही मराठी (बोलीभाषांसह) साहित्यिकांची (पुर्वप्रकाशित) पुस्तके हस्तलिखीते, बखरी, पोथ्या, ऐतिहासिक पत्रव्यवहार इत्यादी असू शकतात, इतर भाषी कॉपीराइट फ्री ग्रंथांचे छाया अनुवादही करता येतात. कोणत्याही ग्रंथालयास जसे ग्रंथाच्या आत काय लिहिले आहे याच्याशी देणे घेणे नसते तसे विकिस्रोतासही ग्रंथाच्या आत काय लिहिले आहे याच्याशी देणे घेणे नाही. कोणत्याही सर्वसामान्य वाचकासाठी अथवा संदर्भ देऊ अथवा पडताळू इच्छित अभ्यासकास युनिकोडात शक्यतो मूळाबरहुकूम स्वरुपात कॉपीराइट ग्रंथांची उपलब्धता करण्यावर विकिस्रोत उपक्रमांचा भर असतो. जसे इथे टिळकांच्या ग्रंथा बद्दलचे आवाहन केले आहे तसे नरके सरांना त्यांच्या फेसबूक खात्यात व्यनिने महात्मा फुल्यांचे साहित्य मिळावे अशी विनंती मी स्वतः केली होती त्यांच्या स्वतःच्या याचे महत्व लक्षात आले असेल नसेल पण त्यांच्या कडून काही रिस्पॉन्स आला नाही. २०१७-१८च्या आसपास डॉ.आंबेडकरांची पुस्तके कॉपीराइट फ्री होतील त्या संबंधाने एका मराठी विकिपीडियनना आंबेडकरांचे साहित्य त्यांच्या कॉपीराइट धारकांना आत्तापासून स्कॅन करून ठेवण्याची विनंती करावी कॉपीराइट मुक्त झाल्यावर ते लगेच विकिस्रोतावर घेता येईल. आणि मी कार्यरत असेन तर त्या वेळी मिपावर अशीच त्यांच्या साहित्या बद्दल सुद्धा आवाहने दिसू शकतील. खरेतर प्रत्येकाने केवळ आपापल्या आवडत्या साहित्यिकाच्या लेखनाच्या युनिकोडीकरणात सहभाग घ्यावे असे नाहीतर कोनत्याही तटस्थ संपादका प्रमाणे शक्यत्या प्रत्येक लेखनाच्या टंकनात तसेच मुद्रीत शोधनात सहभाग घेतल्यास ऑनलाईन मराठीस छापिल पुस्तकांमध्ये अथवा पिडीएफस्वरुपात बंदीस्त असलेला, मराठी साहित्याचा समृद्ध खजीना वाचन, अभ्यास, संशोधन, संदर्भ अशा सर्वच कारणांसाठी उपयूक्त ठरु शकेल.

विकिस्रोत हे काय विवाद्य आहे आणि काय विवाद्य नाही या बद्दल चर्चेचे व्यासपीठ नाही ते केवळ एक ऑनलाईन संदर्भ ग्रंथालय आहे. विवाद्यते बद्दल चर्चेसाठी मिपासारखी मराठी संस्थळे आहेतच. त्यामुळे विकिस्रोतावर टंकन, वाचन, मुद्रीत शोधन या मध्ये मनमोकळेपणाने सहभागी व्हावे असे आवाहन आहे.

याॅर्कर's picture

18 Oct 2015 - 8:04 pm | याॅर्कर

.

मंडळी बर्‍याच जणांना सुट्ट्या लागून आल्या आहेत तेव्हा या धागालेखात सांगितलेल्या उपक्रमासाठी वेळ काढण्यासाठी अवश्य प्रयत्न करावेत ही विनंती.

मी पण एखादा देईन टाइप करुन, उद्या सुट्टीच आहे. व्यनि करुन ठेवलात तर बरं होईल.