नात्यातले लहान मोठे

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
3 Sep 2015 - 11:12 am

कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वयाने मोठा असतो त्याचेकडून सतत कर्तृत्वाची आणि कर्तव्याची अपेक्षा केली जाते. केवळ वयाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व हौसे मौजेला मुरड घालावी लागते. पण हाच मोठा असलेला व्यक्ती जेव्हा लहानाला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र त्याचे लहान जर त्याचे ऎकत नसतील आणि मोठ्यांना योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल. आणि तेव्हा मग जर का मोठ्यांनी लहानांसारखे वागले तर त्यांना पुन्हा ऎकून घ्यावे लागते की "लहानांना मोठे होऊन मोठ्यांना समजवावे लागते आणि कर्तव्याची जाणीव करून द्यावी लागते"
वयाने लहान असल्याचा प्रत्येक नात्यात गॆरफायदा घेतला जातो.
"हा नियम सगळ्या नात्यांना सारखाच लागू होतो"
मग ते कोणतेही नाते असो:
पिता-पुत्र, पिता-पुत्री, सासरे-जावई, सासू-सून, पती-पत्नी, भाऊ-बहीण, भाऊ-भाऊ, बहीण-बहीण, नणंद-भावजय, मेहुणा-साळा.
आणि याला कारणीभूत असते परंपरागत चालत आलेली अंधपणाने पाळली जात असलेली मोठ्यांना बळीचा बकरा बनवणारी दांभिक शिकवण. मान आणि मोठेपणा न देता कर्तव्याची अपेक्षा कशी बरे करणार? आणि मोठयांची आज्ञा पाळायची वेळ लहानांवर आली की जर का असा विचार समोर येत असेल की "जमाना बदलला अाहे आता. कसले लहान आणि कसले मोठे? सर्व समान! ज्याचा अनुभव महान तो मोठा!" मग जर असे असेल तर मग कर्तव्य आणि हक्क सुद्धा दोघांनी समसमान वाटून घेतले पाहिजे. पण वरिल सर्व नात्यातील जर लहान हे मोठ्यांना योग्य मान देत असतील आणि आज्ञा पाळत असतील तर ते नाते अधिक दृढ होते यात शंकाच नाही.

समाजजीवनमानविचारलेखअनुभव

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

3 Sep 2015 - 11:30 am | अत्रुप्त आत्मा

https://lh3.googleusercontent.com/-Qs_JMSkRsiQ/TzZIfMTJ4LI/AAAAAAAAAsI/IRPwI8J_ThA/s640-Ic42/Photo-0012.jpg
.
.
.
.
.
https://lh3.googleusercontent.com/-Qs_JMSkRsiQ/TzZIfMTJ4LI/AAAAAAAAAsI/IRPwI8J_ThA/s640-Ic42/Photo-0012.jpg

मांत्रिक's picture

3 Sep 2015 - 11:31 am | मांत्रिक

मांजरू फार गोंडस आहे हो बुवा.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Sep 2015 - 11:35 am | अत्रुप्त आत्मा

व्हय जी.
फकस्त एक लहान आहे,आणि दुसरे मोठे ;)

नाखु's picture

3 Sep 2015 - 2:19 pm | नाखु

चावट पणा चालणार न्हाही एक ए४ वत दुसरे अ३ वर अन म्हणे ल्हान मोटा !!!

लहान्लेकरांबरुबर्ल्हान्राहूनल्हान्होणारामोट्टाबालक नाखु

निमिष सोनार's picture

3 Sep 2015 - 11:57 am | निमिष सोनार

अप्रतिम!

नाव आडनाव's picture

3 Sep 2015 - 12:08 pm | नाव आडनाव

स्वतःच्याच लेखावर प्रतिसाद देऊन अप्रतिम म्हणताय ? विनोदी स्वभाव दिसतोय तुमचा :)

मांत्रिक's picture

3 Sep 2015 - 12:09 pm | मांत्रिक

नै हो ते मांजरूला म्हणाले असावेत.

गॅरी ट्रुमन's picture

3 Sep 2015 - 2:10 pm | गॅरी ट्रुमन

वयाने लहान असल्याचा प्रत्येक नात्यात गॆरफायदा घेतला जातो.

'लहान' च्या ऐवजी 'मोठा' हा शब्द ठेऊन हेच वाक्य इतर काही लोकही बोलत असतीलच. तेव्हा असे जनरलायझेशन करू नका. सगळे लहान गैरफायदा घेत नसतात आणि सगळे मोठेही गैरफायदा घेत नसतात.

पण वरिल सर्व नात्यातील जर लहान हे मोठ्यांना योग्य मान देत असतील आणि आज्ञा पाळत असतील तर ते नाते अधिक दृढ होते यात शंकाच नाही.

पृथ्वी फिरते म्हणून काळ पुढे जात असतो आणि त्यामुळेच लहान-मोठे वगैरे गोष्टी निर्माण होतात.कोणालाही तो/ती काही वर्षे/महिने/दिवस/तास मोठा/मोठी याच एका कारणावरून मान देण्याला माझा तर प्रखर विरोध आहे. मान हा मागून कधीच मिळत नसतो तर तो कमवावा लागतो--- respect cannot be demanded.It has to be commanded. कोणाही व्यक्तिने आपल्या वर्तणुकीतून त्यांच्याविषयी आपोआप आदर वाटावा असे चित्र उभे केले तर त्याला/तिला मान द्यायला माझी नक्कीच हरकत नाही.पण यात वयाचा काही संबंध नाही. मी इतर कोणापेक्षा काही वर्षे/महिने/दिवस/तास उशीरा जन्माला आलो याच एका कारणावरून मी आयुष्यभर इतरांच्या आज्ञा ऐकत नक्कीच राहणार नाही.

अनेकदा मोठे लोक डबल गेम खेळतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे. हा अनुभव कितपत प्रातिनिधीक आहे माहित नाही. म्हणजे मोठ्यांनी 'तुझ्या हिताचे' म्हणून सांगितलेले ऐकले आणि त्याचा उपयोग झाला तर मोठी माणसे 'बघ मी सांगितले होते' असे म्हणत त्याचे श्रेय घेतात. आणि समजा तसे ऐकणे बॅकफायर झाले तर तीच मोठी माणसे 'तुझे नशीब' म्हणून पळून जातात आणि जे काही होत आहे त्याचे परिणाम आपल्यालाच भोगायला लागतात. असला ढोंगीपणा माझ्या तरी प्रचंड डोक्यात जातो. असे अनेक अनुभव आल्यामुळेच मला वाटते की 'आपला हात जगन्नाथ. तेव्हा आपल्याला योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा.तो जर योग्य ठरला तर त्याचे श्रेय आपलेच आणि अयोग्य ठरला तर त्याचा दोषही आपलाच.' यावर तुमचे काय म्हणणे आहे?

भारतीय संस्कृतीची नात्यांची विरोधाभासी शिकवण: टेबल सूत्र स्वरूपात!! :- लेखक मिपाप्रिय थोर विचारक श्रीश्री णिसो सर

भारतीय संस्कृतीची नात्यांची शिकवण विरोधाभासी आणि नात्यापरत्वे, कालपरत्वे बदलत जाणारी आहे असे मला ठामपणे वाटते. खाली दिलेली सूत्रे (फौर्मुले) वाचा - टेबल स्वरूपात !!

आई वडीलांसाठी-त्यांच्या-मुलगा-पेक्षा-त्यांची-मुलगी-श्रेष्ठ-(हक्क मागतांना)
आई वडीलांसाठी-त्यांच्या-मुलगी-पेक्षा-त्यांचा-मुलगा-श्रेष्ठ-(कर्तव्य बजावतांना)
आई वडीलांसाठी-त्यांच्या-मुलगा-पेक्षा-त्यांचा-जावई-श्रेष्ठ-(हक्क मागतांना)
आई वडीलांसाठी-त्यांच्या-जावई-पेक्षा-त्यांचा-मुलगा-श्रेष्ठ-(कर्तव्य बजावतांना)
आई वडीलांसाठी-त्यांच्या-पहिल्या अपत्या-पेक्षा-त्यांचे-दुसरे अपत्य-श्रेष्ठ-(हक्क मागतांना)
आई वडीलांसाठी-त्यांच्या-दुसऱ्या अपत्या-पेक्षा-त्यांचे-पहिले अपत्य-श्रेष्ठ-(कर्तव्य बजावतांना)
जावयासाठी-त्यांच्या-आई वडील-पेक्षा-त्यांची-पत्नी-श्रेष्ठ-
जावयासाठी-त्यांच्या-बहिण-पेक्षा-त्याची-पत्नी-श्रेष्ठ-
बहिणीसाठी-तिच्या-पती-पेक्षा-तिचा-भाऊ-श्रेष्ठ-
भावासाठी-त्याच्या -पत्नी-पेक्षा-त्याची-बहिण-श्रेष्ठ-
मुलासाठी -त्याच्या -सासू - सासरे -पेक्षा-त्याचे -आई वडील-श्रेष्ठ-
मुलासाठी -त्याच्या -पत्नी-पेक्षा-त्याचे -आई वडील-श्रेष्ठ-
मुलासाठी -त्याच्या -पत्नी-पेक्षा-त्याची-बहिण-श्रेष्ठ-
मुलीसाठी-तिच्या-सासू सासरे -पेक्षा-तिचे-आई वडील-श्रेष्ठ-
मुलीसाठी-तिच्या-नणंद-पेक्षा-तिची-बहिण/भाऊ-श्रेष्ठ-
मुलीसाठी-तिच्या-सासू सासरे -पेक्षा-तिचा-पती-श्रेष्ठ-
सुनेसाठी-तिच्या-आईवडील-पेक्षा-तिचे-सासू सासरे -श्रेष्ठ-
सुनेसाठी-तिच्या-पती-पेक्षा-तिचे-सासू सासरे -श्रेष्ठ-
सुनेसाठी-तिच्या-बहिण/भाऊ-पेक्षा-तिची-नणंद-श्रेष्ठ-

आला का लक्षात विरोधाभास ?

कुठंतरी वाचलंय असं वाटतंय... कुठं बरं ??

भारतीय संस्कृतीची नात्यांची विरोधाभासी शिकवण: टेबल सूत्र स्वरूपात!! :- लेखक मिपाप्रिय थोर विचारक श्रीश्री णिसो सर

निमिष सोनार's picture

3 Sep 2015 - 3:48 pm | निमिष सोनार

कमीत कमी हा विषय चर्चिला तरी जातोय यातच माझा आनंद सामावलेला आहे.

'मी' पण हे माझे
बरवे हो साचे ।
दुज्याचे ते सारे
व्यर्थ असे ॥

माझे ते चारित्र्य
मूर्त हे पावित्र्यं ।
दुज्याचेच मात्रं
भ्रष्टं असे ॥

तुझे अनाचार
(ते)माझे सदाचार ।
कारण विचार
त्यात असे ॥

करितो बचत
मी असे शहाणा ।
कंजुसी बहाणा
तुझा असे ॥

माझे परिपक्वं
विचारांचे सत्वं ।
तुझे ते कवित्वं
मूढ असे ॥

माझीया विचारा
सोन्याची झळाळी ।
तुझी काजळाली
मती असे।।

मी एक शहाणा
दृढ माझा बाणा ।
बाकीचे ठणाणा
करीतसे ॥

निमिष सोनार's picture

3 Sep 2015 - 4:49 pm | निमिष सोनार

...