ओळख - उचलगिरी करणाऱ्यांची

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
4 Jul 2015 - 10:03 am

मराठी सृष्टीवर ‘तुमच्या मनातल्या लेखकाला जागे करा” हे आव्हान स्वीकारून मी मराठी लेखन करायला सुरुवात केली. आधी ‘मराठीसृष्टी’ किंवा ;मी मराठी’ वर लेख टाकल्या नंतर नंतर आपल्या ब्लॉगवर टाकीत असे. कालांतरानंतर ‘मी मराठी’ वेबसाईट बंद पडली. ‘प्रेम म्हणजे काय’ हा लेख प्रथम मराठी सृष्टीवर (१३.७.२०१०) टाकला होता आणि नंतर आपल्या ब्लॉग वर.

ऐसीअक्षरे सुरवात म्हणून मला स्वत:ला आवडलेला हा लेख ऐसी अक्षरे वर ८.१२.२०१३ टाकला. श्री राजेश घासकडवी यांनी मला जाब विचारला आणि माझी दांडीच उडाली. मी कधीही आपल्या लेखांचे प्रिंट घेतले नव्हते. (कार्यालयात इंटरनेटवर बंदी असल्या मुळे). सुदैवाने मराठीसृष्टी सुरु होती. लेख सापडला. मूळ लेखकालाच आपण चोर नाही हे सिद्ध करण्याची पाळी आली. पण मी शहाणा झालो. आता पहिले आपल्या ब्लॉग वर आणि नंतर मिसळपाव आणि ऐसी अक्षरे वर टाकतो. (दोन तीन ठिकाणी लेख टाकल्यामुळे कुणी चोरी करणार नाही असे वाटले). तसा प्रेम म्हणजे काय हा कमीत कमी ७-८ लोकांनी आपल्या नावानी टाकला असेल. यातल्या ४ लोकांनी किमान खेद तरी व्यक्त केला. असो.

अंतर्जालावर दुसर्यांचे लेखन आपल्या नावाने काही लोक बेहिचक जसेच्या तसे आपल्या नावाने खपवितात. यातले काही पकडल्या गेल्या वर किमान खेद तरी व्यक्त करतात किंवा पुढे असे करणार नाही याचे आश्वासन तरी देतात. पण काही त्यांना जाब विचारल्यावर त्याचे उत्तर ही देत नाहीत. मूळ लेखकाला कळले आहे तरी बेशर्मीने सारखे तोच कित्ता गिरवीत राहतात. एकच उपाय सर्वांनी आपले लेख एकदा तरी तपासून बघितले पाहिजे. अश्यांची माहिती अंतर्जालावर लिहिणार्यांना कळली पाहिजे. कमीत कमी थोडी लाज वाटून ते असे करणे सोडण्याची शक्यता.

शिवाजी राव शिंदे : हे मराठी अड्डावर नियमित लिहित राहतात. बहुतेक पुण्यात राहतात यांनी केलेला पराक्रम
१. तपश्चर्येचे फळ (२.६.२०१५) शिवाजी राव शिंदे यांनी २३.६.२०१५ ला आपल्या नावानी
1. http://marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:1136352
मराठी बाणा / मोडेन पण वाकणार नाही (१९.३.२०११)
2. शिवाजी राव शिंदे यांनी २४.७.२०११ ला आपल्या नावानी http://marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:611726
वसंत पंचमी एक आनंदोत्सव(२५.१.२०१५):
3. शिवाजी राव शिंदे यांनी २६ जनवरी २०१५ला http://marathiadda.com/m/blogpost?id=2437740%3ABlogPost%3A1122770
4. रस्त्यावर वाहन चालविणारे (6.9.2014) शिवाजी राव शिंदे यांनी दुसर्याच दिवशी अर्थात ७.९.२०१४ http://marathiadda.com/profiles/blogs/ 2437740:BlogPost:1097323?xg_source=activity
5. वरुण राजाला साकडं: (१.९.२०१४) शिवाजी राव शिंदे यांनी ३.९.२०१४http://marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:1096709

किरण खंडागळे(मराठी कविता आणि बरच काही), हे ठाण्यात राहतात.

पुन: एकलव्य : नियतीचा खेळ (१६.६.२०१३) यांनी १०.८.२०१३ http://marathikavee.blogspot.in/2013/08/blog-post_9124.html
प्रेम आणि गालावरचे खड्डे (२८.७.२०१३) यांनी
http://marathikavee.blogspot.in/2013/08/blog-post_26.html
प्रेम म्हणजे काय: (१३.७.२०१०)
http://marathikavee.blogspot.in/2013/02/blog-post_6744.html

तुझ माझ मराठी (रणजीत मांगे) यांनी तर कमाल केली.

१. रामायण कथा सीता: (६.४.२०१५) तुझ माझ मराठी (फेसबुक वर त्याच दिवशी अर्थात ६.४.२०१५)
२. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।: (७.१२.२०१४) तुझ माझ मराठी वर यांनी त्याच दिवशी ७.१२.२०१४ला.
३. म्हातारी ग मैना: (१.२.२०१५) तुझ माझ मराठी वर त्याच दिवशी.
४. बंदुकीची गोळी आणि ती: (२७.१२.२०१४) तुझ माझ मराठी वर त्याच दिवशी
५. झुंज - अंधाराच्या राक्षसांशी(६.१२.२०१४) तुझ माझ मराठी वर त्याच दिवशी
६. बळी (२४.११.२०१४) तुझ माझ मराठी वर त्याच दिवशी
आणखीन प्रयत्न करणे सोडून दिले.

पुरोगामी विचारांचे एकमत नावाच्या ई-वर्तमान पत्र यांनी नाव न देता प्रेम म्हणजे काय हा लेख ७.१.२०१५ छापला. संदेश पाठविल्यावर उत्तर ही मिळाले नाही. http://www.dainikekmat.com/Yuva-53--151.html#.VZYY21Ipr7E. शिवाय अनिल काळगे (तुझी आठवण), युवराज मोहिते, गोविंद पवार, नितीन ठाकूर (या चौघांनी खेद व्यक्त केला). प्रसाद म्हैसे, आणि अनेक फेसबुक माझा एकटेपणा (योगेश), I miss you इत्यादी.

या शिवाय माझे इतर लेख उदा: एखाद दुसर्याने उचलगिरी केलेली आहे. एफ डी आई सुंदरी, भ्रष्टाचार / काचेचे घर, मराठी बाणा / मोडेन पण वाकणार नाही: समलैंगिकता - सृष्टीच्या विनाशाचा मार्ग. पण सध्या त्यांचे नाव देत नाही आहे. कदाचित हा लेख वाचून ते पुढे असे करणार नाही ही अपेक्षा.

समाजआस्वाद

प्रतिक्रिया

आनंदराव's picture

4 Jul 2015 - 10:13 am | आनंदराव

नवीन च दिसतय हे !
अशा उचलेगिरी करणर्‍यांवर तुम्ही कारवाई केली का?
तेही लिहा.

dadadarekar's picture

4 Jul 2015 - 10:29 am | dadadarekar

हे फार जुने आहे.

मायबोली उचलेगिरी ..

http://www.maayboli.com/node/25685

प्रकाश घाटपांडे's picture

4 Jul 2015 - 10:45 am | प्रकाश घाटपांडे

मला ही माझ्या ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी या पुस्तकाची चक्क उचलेगिरी माझ्याशी संपर्क न करता व संदर्भ न देता केलेली आढळली; हे पुस्तक मी उपक्रमवर लेखमाला स्वरुपात २००७ ला टाकले होते. http://mr.upakram.org/node/1065
ओंकार पुरंदरे नावाच्या माणसाचा पुरंदरचा वाघ सरदार अशा नावाचा ब्लॊग आहे
http://purandarchawaghsardar.blogspot.in/2010/07/blog-post_7882.html

मिसळपाव शिवाय इतर साईटवर मी जास्त जात नाही. त्यामुळे माझा एखादा लेख जर कोणी ढापला असेल तर कसे कळाणार ?

dadadarekar's picture

4 Jul 2015 - 12:03 pm | dadadarekar

तुमच्या लेखातील एक वाक्य क्वापी करुन गुगल सर्च मध्ये पेस्ट करा व सर्च करा... तो लेख कुठे कुठे आहे ते समजेल

विवेकपटाईत's picture

4 Jul 2015 - 4:35 pm | विवेकपटाईत

आपल्या लेखातला एखाद्या वाक्याला इंटरनेट वर टाका, ते वाक्य जेवढ्या लेखांत असेल कळेल. अश्या रीतीने २-३ वाक्य टाकल्या वर कळू शकते.

मृत्युन्जय's picture

4 Jul 2015 - 11:43 am | मृत्युन्जय

काय थर्ड क्लास लोक आहेत साले.सहज बघितले तर माझेही लेख चोरी केले गेले आहेतः

https://marathikida.wordpress.com/2015/06/10/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8...

मराठी किडा वर कोणीतरी माझ्या हम तो तेरे आशिक है ची चोरी केलेली दिसते आहे

http://misalpav.com/node/31285

आता बाकीच्या लेखांबद्दल शोधणे आले.

मृत्युन्जय's picture

4 Jul 2015 - 11:58 am | मृत्युन्जय

आणि रजनीकांत रडला - धूम ३ हा माझा लेख चेपुवर चोरला आहे . खाली लिंक दिलेली आहे

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=440299226099515&id=197...

या चोरांचे काय करावे कळत नाही.

पैसा's picture

4 Jul 2015 - 12:16 pm | पैसा

जेवढ्याना शक्य होईल तेवढ्यांनी त्याच्या वॉलवर बोंबाबोंब करून मूळ लेखाची लिंक द्यायची आणि शिव्या पण.

उचलेगिरी करणार्‍यांवर नेमका आजच धागा यावा हा काय विलक्षण योगायोग आहे!

किंवा कदाचित हा योगायोग नसेल....?

(लेखाचा विस्तार बघता योगायोगच असावा म्हणा...)

एकुलता एक डॉन's picture

4 Jul 2015 - 3:58 pm | एकुलता एक डॉन

उचलेगिरी करणार्‍यांवर नेमका आजच धागा यावा हा काय विलक्षण योगायोग आहे!

dadadarekar's picture

4 Jul 2015 - 4:08 pm | dadadarekar

...

आदूबाळ's picture

4 Jul 2015 - 7:56 pm | आदूबाळ

हब्यास दरेकर हब्यास...

एस's picture

4 Jul 2015 - 9:16 pm | एस

सर्व लाजलज्जा, शरम गुंडाळून अशी माणसे उजळ माथ्याने समाजात वावरायला मोकळी होतात याची जबरदस्त चीड येते. दुर्दैवाने बहुतांश लोकांना त्यांच्या पराक्रमाची माहिती नसते. निदान नंतरतरी हे असे करण्यास धजावणार नाहीत एवढी अपेक्षा ठेवणे वावगे ठरू नये.

एकुलता एक डॉन's picture

4 Jul 2015 - 9:33 pm | एकुलता एक डॉन

ते जाउ द्या
योगा योग कसा हे तुम्हि विचारुन पण साण्गत नाही

ज्यांच्याकडे रोख आहे त्यांना समजले तरी पुरेसे आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका.

dadadarekar's picture

5 Jul 2015 - 1:34 pm | dadadarekar

एखादे भूत जहाजावर कब्जा करते तसे वांगमयचोर दुसर्‍याच्या कलाकृतीवर कब्जा करतात.

असंका's picture

6 Jul 2015 - 9:48 am | असंका

:-))

रच्याकने, करणारे सगळं उघड उघड करतात , आणि ज्यांनी काहीच केलेलं नाही ते मात्र आडून आडून बोलत रहातात... ही कसली भिती म्हणायची?

आदूबाळ's picture

7 Jul 2015 - 5:49 pm | आदूबाळ

सौजन्य.

रुपी's picture

4 Jul 2015 - 7:38 pm | रुपी

सहमत आहे!

एकुलता एक डॉन's picture

4 Jul 2015 - 4:34 pm | एकुलता एक डॉन

स्वॅप्स यान्च्या प्रतिसादाला प्रश्न आहे हा

विवेकपटाईत's picture

4 Jul 2015 - 4:47 pm | विवेकपटाईत

काल ३ जुलै होती. गेल्या वर्षी याच दिवशी डॉक्टरांनी हृदयावर शास्त्र चालविले होते. का, मला सकाळी थोडे ठीक वाटत नव्हते. सुट्टी केलील. गेल्या (प्रधानमंत्री कार्यालयातून गच्छन्ति झाल्या मुळे, आता सुट्टीकरताना जास्त विचार करावा लागत नाही). टाईम पास म्हणून आपल्या ब्लॉग मधल्या जुन्या लेखांतील स्पेलिंगच्या चुका दुरुस्ती करणे सुरु केले. सहज म्हणून ४० कथा आणि लेखांच्या ओळी इंटरनेटवर टाकून पहिल्या. डोक चक्रावून गेले. २० एक लेखांची उचलगिरी झालेली होती. मनात आल आपण यांच्या विरुद्ध काही करू शकत नाही. इंटरनेटवर लिहिण्याचा मोबदला मिळत नाही. कार्यवाही करण्यासाठी पैसा कोण खर्च करेल. शिवाजीराव शिंदे सारखे याचाच फायदा उचलतात. ४-५ लेखांबाबत आधीच माहिती होती. उदा: प्रेम म्हणजे काय. काहीना जाब विचारला होता. काहींनी खेद व्यक्त केला.
काहींनी उत्तर देण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यांचेच नावे मी दिली आहे. काहींनी फक्त एकच लेख किंवा कथेची उचलगिरी केली आहे. तूर्त त्यांचे नावे दिली नाहीत. जवळपास १५-१६ लोकांनी उचलगिरी केली आहे.

मधुरा देशपांडे's picture

4 Jul 2015 - 4:51 pm | मधुरा देशपांडे

प्रचंड मनस्ताप, चिडचिड होते असे काही दिसले की.

लेख चोरतात, फोटो चोरतात. हाईट म्हणजे प्रवासवर्णन पण चोरतात. म्हणजे कुठे फिरायला गेलो की स्वतःच्या डोळ्यांनी बघायचे नाही, तेही ढापायचे. फेसबुकवर एक पेज सापडले मागच्याच महिन्यात, अंतर्नाद नावाचे, माझ्या ब्लॉगवरुन प्रवासवर्णनातील कित्त्येक वाक्य जशीच्या तशी घेतली होती, काहीही बदल न करता आणि काही ठिकाणी फक्त शब्द इकडचे तिकडे केले होते. माझ्या लेखातली एका परिच्छेदातली चार वाक्य तिकडे एकाच लेखात फक्त चार परिच्छेदात. जिथे मी जर्मनी लिहिले होते कारण आमचा प्रवास जर्मनीतुन सुरु झाला, ते बदलुन नेदरलँड्स केले होते. तिथे जेव्हा याबद्दल लिहुन आले, तेव्हा जनाची नाही पण निदान मनाची वाटली असावी, पुढच्या तासाभरात पेज उडवले गेले होते. त्यापुर्वी मी स्नॅपशॉट्स घेऊन ठेवले होते त्यामुळे माझ्याकडे काहीतरी पुरावा आहे. तिथेच इतरही काही ठिकाणांबद्दल लिहिले होते, तेही दुसर्‍या कुठल्या ब्लॉगवरुन ढापलेले नसेल हे कशावरुन? कारण त्या केस मध्ये फक्त मी ज्यावर आक्षेप घेतला तेवढ्या पोस्ट्स उडवता आल्या असत्या. हे पेजही सहज दिसले म्हणुन, अजुन कुणी काय काय ढापले असेल माहिती नाही.

ब्लॉग वरुन टेक्स्ट कॉपी करता येणार नाहीत अशी स्क्रिप्ट आहे, ज्याचा त्यातल्या त्यात उपयोग होऊ शकतो. हे काम माझेही राहिले आहेच कधीचे, आता करायलाच हवे. पण हे करुनही चोरणारे महाभाग आहेतच. :(

काळा पहाड's picture

7 Jul 2015 - 1:32 pm | काळा पहाड

तुमच्या इमेजेस ना वाटरमार्क टाका.

माहितगार's picture

4 Jul 2015 - 5:00 pm | माहितगार

आंतरजालीय आणि वृत्तपत्रीय मराठी लेखकांची एखादी स्वतंत्र कॉपीराइट फालोअप सोसायटीची आवश्यकता आहे जी जागरूकताही निर्माण करेल, लेखकांच्या कॉपीराईट बद्दल फालोअप घेऊन त्यांना उत्पन्नही मिळवून देईल आणि ज्यांना त्यांचा मजकुर मुक्त स्वरूपात उपलब्ध करावयाचा आहे त्यांनाही साहाय्य करेल.

अर्थात लेखकांनीसुद्धा प्रतीलेख दोन परिच्छेद अथवा ४००० बाइट या पैकी जे कमी असेल तो मजकुर मूळ लेख आणि लेखकाचा संदर्भ देऊन वापरू देण्याबद्दल विचार करावा असे वाटते. ज्यामूळे लेखकांचे लेखन अधीक लोकांपर्यंतही पोहोचेल आणि समाजपयोगीही होण्यास मदत होऊ शकेल.

चुकलामाकला's picture

4 Jul 2015 - 5:01 pm | चुकलामाकला

मी देखिल माझ्या कविता बघितल्या . "विसरलो नाही मी तळव्यावरची जांभळी खूण - गुर्जी " ही कविता तर अगणित ठिकणी फेसबुक्वर पोस्ट झाली आहे . राधा ही कथा देखिल!

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Jul 2015 - 5:10 pm | ज्ञानोबाचे पैजार

च्यायला खरे आहे. माझे लेख किंवा कविता कोण चोरणार असा जबरदस्त कॉन्फिडन्स असल्या मुळे हा उद्योग कधी केला नव्हता.पण तुमचा लेख वाचल्यावर उत्सुकता म्हणून मी पण थोडे गुगलून पाहिले. आणि माझ्या हाताला हे लागले...

माझी वेडा बाबा ही कविता इकडे जशीच्या तशी डकवली आहे. (हे चेपु पान माझे नाही)

आणि त्यांना त्यांच्या मुलाला सचिन तेंडुलकरच करायचय हि कविता मी इकडे पाडल्याच्या दुसर्‍याच दिवशी इकडे कॉपी पेस्टवण्यात आली. कोणीतरी दिपक ढमढेरे नावाचा मनुष्य दिसतो आहे इकडे.

साला काय वेळ आली आहे लोकांवर... माझ्या सारख्या फुटकळ सुपारीबाज कवीच्या कविता पण चोरतात? मग त्या मिका, गणेशा आणि विशालच्या कवितांचे काय होत असेल?

पैजारबुवा,

सतीश कुडतरकर's picture

7 Jul 2015 - 2:46 pm | सतीश कुडतरकर

माझ्या सारख्या फुटकळ सुपारीबाज कवीच्या कविता पण चोरतात?

:-) :-) :-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jul 2015 - 6:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

लोकांच्या निर्लज्जपणाची कमाल आहे !!!

प्यारे१'s picture

4 Jul 2015 - 8:16 pm | प्यारे१

+111.
पण हे आवरायला उपाय नेमका काय?

उगा काहितरीच's picture

4 Jul 2015 - 8:01 pm | उगा काहितरीच

आजकाल तर व्हॉट्सॲप च्या सुळसूळाटामुळे अशी चोरी पकडने अवघड झाले . (आणि एक आम्ही साधी कॉमेंट टाकायची दुसरीकडे तर तिनतिनदा विचारतो )

चित्रगुप्त's picture

4 Jul 2015 - 10:32 pm | चित्रगुप्त

माझे याबद्दलचे मत जरा वेगळे आहे.
अर्थातच असे कॉपी-पेस्ट करणे हे अनैतिक आणि चुकीचे आहे, आणि त्यावर योग्य ती उपाययोजना झाली पाहिजे हेही खरेच, तरीपण असे म्हणावेसे वाटते, की आपले लेखन चोरी होत असलेले बघून प्रचंड मनस्ताप, चिडचिड वगैरे करून घेऊ नये. सर्जनशील व्यक्तीचे काम त्याला सुचत जाणार्‍या नवनवीन कल्पनांना मूर्त स्वरूप देणे हे असते, आणि त्यातच तिने आपली शक्ती, परिश्रम आणि वेळ घालवणे चांगले.
नवीन तंत्रज्ञानामुळे जशी सर्जनशील व्यक्तीना आपली निर्मिती जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी लाभली आहे, तशी ती चौर्य करणारांना पण लाभत आहे. परंतु सृजनक्रियेतला मूळ निखळ आनंद, ती धुंदी, चौर्यकर्मात कुठून लाभणार ? त्यामुळे आपले साहित्य चोरी होत आहे, त्याचे श्रेय दुसरेच कोणी घेत आहे, हे विचार आपल्या सृजनशीलतेला मारक तर ठरत नाहीत ना, हे आत्मपरिक्षण करणे आवश्यक आहे. तसे जर घडत असेल, तर एकतर आपल्यापुरते लिहीत राहून स्वतः प्रकाशित करणे बंद करावे, किंवा चौर्य वगैरेंची चिंता सोडून आपल्या सृजनशीलतेत मस्त, व्यग्र रहावे. ज्यांना शक्य असेल, त्यांनी हवेतर असे चौर्य हुडकणे, त्यावर कारवाई करणे वगैरेंसाठी वेगळा माणूस नेमावा, पण स्वतः व्यथित होऊन आपल्या सृजनशीलतेवर त्याचा विपरित परिणाम होऊ देऊ नये. आपल्याला अजून कितीसे आयुष्य जगायचे आहे ? ते मनस्तापात घालवायचे, की निर्मितीच्या आनंदात ?

dadadarekar's picture

4 Jul 2015 - 11:35 pm | dadadarekar

आअपण मजेत रहावे.

पापपुण्य वगैरे चित्रगुप्तावर सोडुन द्यावे.

आणि समजा उदा तुमच्यावरच कोणी चौर्याचा आरोप केला किंवा लोकांचा तसा समज झाला तर?

मधुरा देशपांडे's picture

5 Jul 2015 - 3:24 am | मधुरा देशपांडे

आपल्याला अजून कितीसे आयुष्य जगायचे आहे ? ते मनस्तापात घालवायचे, की निर्मितीच्या आनंदात ?

काहीतरी गैरसमज होतोय असे वाटते. आपला एक लेख चोरलेला दिसला आणि त्रास झाला म्हणुन लगेच त्यासाठी कुढत बसत नाहीये, आणि त्यातुन नवीन लेखन होणारच नाही असेही नाही. रोज रोज कुणी माझे लेखन दिसतेय का कुठे चोरलेले म्हणुन शोधत नाही. बरेचदा हे प्रकार अपघाताने दिसतात, कधी कुणा मित्र-मैत्रिणीकडुन कळतं आणि मग शोध घेतला तर अजुन काही दिसतं एवढंच. चोरीच्या भितीने कुणी लिहिणे बंद करेन असे वाटत नाही. पण जिथे शक्य आहे, तिथे उपाययोजना करायला हव्यात, आणि असे प्रकार दिसले तर निषेधही नोंदवायलाच हवा. आणि हाच मला या धाग्याचा उद्देश दिसतो आहे, की असे प्रकार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे. निर्मितीचा आनंद आणि मनस्ताप यात चोरणारे मुळ लेखकाचा आनंद हिरावुन घेऊ शकत नाही हे खरे आहे, पण या प्रत्येक लेखामागे त्या त्या लेखकांचे कौशल्य आहे, अनुभव आहेत, ते लेखस्वरुपात यावे म्हणुन त्यांनी वेळ दिला आहे, या मेहनतीचे काय. उदा. म्हणुन गुर्जींचा जो एक लेख चोरला गेला, त्यासाठी केवळ तेवढे दोन-चार तासांचे टंकनश्रम लागले नसतील, त्याआधीचा त्यांचा कित्त्येक वर्षांचा अभ्यास आणि अनुभव देखील होता. मग कुणी जेव्हा एका सेकंदात ते स्वतःचे म्हणुन दाखवतात, कौतुक करवुन घेतात तेव्हा राग येतो. शिवाय उद्या मुळ लेखकालाच तुम्ही चोरी केली असे म्हटले जाते ते वेगळेच, असे आरोप झाले तर त्रागा होणारच. म्हणुन व्यथित होऊन कुणी लेखन सोडले आहे असे नाही.

आणि अजुन होतं काय, इथल्याच नाही, इतरही अगदी नावाजलेल्या लेखकांच्या केवळ ब्लॉग/मिपा शिवायही, पुस्तकांमधुन पण लेखन चोरी होते आणि राजरोसपणे ते स्वतःचे म्हणुन खपवले जाते.तेव्हा ते शक्य तिथे इतरांच्या निदर्शनास आणुन दिल्याने जर काही प्रमाणात आळा बसला तर ते चांगलेच. एवढे करुनही पुन्हा पुन्हा हे प्रकार होतातच, त्याबद्दल काही बोलायला नकोच.

माहितगार's picture

6 Jul 2015 - 12:48 am | माहितगार

@मधुरा देशपांडे,

मी आपल्या उपरोक्त प्रतिसादातील एक वाक्य या विषयावरच्या पटाइत यांच्याच धाग्यावर, पण ऐसी अक्षरेवरील एका प्रतिसादास उत्तर म्हणून आपल्या संदर्भासहीत उधृत केले आहे. कॉपीराइटच्याच विषयावर चर्चा चालू आहे तेव्हा आपणास कल्पना द्यावी असे स्वाभावीकपणे वाटले.

धन्यवाद.

श्रीगुरुजी's picture

4 Jul 2015 - 11:17 pm | श्रीगुरुजी

गुगलवर सहज शोध घेतला.

मी २८/०२/२०१३ या दिवशी "राशीमेलन" हा विविध राशींची गुणवैशिष्ट्ये सांगणारा लेख मिपावर लिहिला होता.

त्याची लिंक - http://www.misalpav.com/node/24104

आताच सापडलं. फेसबुकवर (https://www.facebook.com/ubalenitu/posts/1619879334918700 या लिंकवर) कोणीतरी नितू अनिल उबाळे नामक व्यक्तीने संपूर्ण लेख जसाच्या तसा आपल्या पेजवर ६/६/२०१५ या दिवशी टाकला आहे. लेखाच्या शेवटी "निवृत्ती उबाळे.9860395985 कृष्णमूर्ति ज्योतिष मार्गदर्शक , कणकवली" असा पत्ता दिला आहे.

काय म्हणावे या वाङ्मयचौर्याला?

श्रीगुरुजी's picture

4 Jul 2015 - 11:23 pm | श्रीगुरुजी

माझ्या लेखातील १ शब्द सुद्धा न बदलता या चोरट्याने हा लेख स्वतःच्या नावावर टाकला आहे.

हा चोरटा म्हणे इतरांचे भविष्य सांगतो.

याच्याविरूद्ध कोठे तक्रार करता येईल का?

काळा पहाड's picture

7 Jul 2015 - 1:23 pm | काळा पहाड

१. ज्यांनी तिथे प्रतिसाद दिलाय त्याच्या पोस्ट वर त्यांच्या फेसबुक पोस्ट वर तुमची मिपा ची लिंक डकवा. आणि तिथे हे पण लिहा की उबाळे चोर आहे.
२. शिवाय उबळेच्य फेसबुक पोस्ट वर तर लिहाच. तो उडवेपर्यन्त तरी लोक वाचतील.
३. उबाळेच्या मोबाईल वर रात्री अपरात्री एस टी डी बूथ मधून फोन करा.
४. त्याचा मोबाईल तुमचा म्हणून शेअर करा, विशेष करून टेलिमर्केटिङ्ग वाल्यांना.

श्रीगुरुजी's picture

7 Jul 2015 - 2:38 pm | श्रीगुरुजी

माझा लेख त्याने स्वतःचा म्हणून टाकला आहे. त्या लेखावर एकूण १५-१६ जणांनी कौतुकाच्या कॉमेंट्स दिल्यात, ९७ जणांनी लाईक केलंय आणि १६ जणांनी लेख शेअर केलेला आहे.

मी त्याच्या मित्रयादीत नसल्याने त्या लेखावर किंवा त्याच्या इतर कोणत्याच लेखावर कॉमेंट्स टाकू शकत नाही. त्यामुळे त्याला व लेख लाईक केलेल्या काही जणांना फेसबुकच्या माध्यमातून प्रायव्हेट मेसेज पाठविला आहे. परंतु त्यापैकी कोणाच्याही मित्रयादीत मी नसल्याने माझ्या मेसजचे नोटिफिकेशन त्यांना मिळत नाही व माझा मेसेज इनबॉक्स ऐवजी 'आदर मेसेजेस' मध्ये जाऊन पडलेत. फेसबुक 'आदर मेसेजेस' साठी लाल रंगात नोटिफिकेशन देत नसल्याने ते मेसेजेस लगेच वाचले जाण्याची शक्यता फार कमी आहे. तरीसुद्धा त्यापैकी ४ जणांनी माझा मेसेज वाचून मला रिप्लाय केलेला आहे.

शेवटी रविवारी त्याच्याशी व्हाटस््अ‍ॅप वरून संवाद साधला. सुरवातीपासून तो मराठीत बोला म्हणून मागे लागला. माझ्या चतुर भ्रमणध्वनीवर मराठी टंकलेखनाची सोय नसल्याने मी इंग्लिश मध्ये लिहीत होतो. माझ्या मिपावरील लेखाची व त्याने फेसबुकवर टाकलेल्या लेखाची लिंक देऊनसुद्धा फेबुवरील लेख सापडत नाही असा त्याने बराच वेळ आव आणला. बोलताना मध्येच म्हणाला की काही चांगले लेख दिसले तर ते मी शेअर करतो. परंतु लेखाबरोबर लेखकाचे नाव देण्याऐवजी स्वतःचे नाव का दिले व लेख टाकण्यापूर्वी लेखकाची परवानगी का घेतली नाही व लेखकाच्या नकळत गुपचूप लेख का टाकला असे विचारल्यावर तो म्हणाला की मिपावरील लेखावर लेखकाचे नाव नसते. मी त्याला लेखकाचे नाव कोठे असते हे सांगितल्यावर तो म्हणाला की काही किरकोळ लेखन मी कधीकधी फेबुवर टाकतो.

शेवटी पुन्हा एकदा दोन्ही लेखांच्या लिंक दिल्यावर त्याला लेख सापडला व तो लेख फेबुवरून डिलीट केला आहे असे त्याने २ मिनिटांनी सांगितले. परंतु तो लेख डीलीट केलेला नसून अजूनही त्याच्या पेजवर आहे.

असो. मला जेवढे करता येणे शक्य होते तेवढे मी केले. याव्यतिरिक्त फार काही करता येईल असे वाटत नाही. त्याने टाकलेला लेख डीलीट करणे मला शक्य नाही. आपली चोरी पकडली गेली आहे हे त्याच्या व त्याच्या मित्रयादीतील काही जणांना समजले आहे इतके पुरेसे आहे.

मिपा इत्यादी मराठी संकेतस्थळांची संपादक मंडळी प्रताधिकारीत मजकुर हटवण्यात मदत करतात तशी फेसबुक कडे काही सुविधा आहे का ?

श्रीरंग_जोशी's picture

7 Jul 2015 - 5:48 pm | श्रीरंग_जोशी

फेसबुकवर जिथेही आपले किंवा आपल्या ओळखीच्यांचे लेखन कुणी स्वतःच्या नावावर खपवत आहे असे दिसले तर त्या पोस्टच्या उजव्या कोपर्‍यातील ^ (याच्या उलट) चिन्हावर क्लिक करून Report post हा पर्याय निवडावा.

नंतर पुढच्या दोन सूचनांचे पालन करावे.

  • Select I don't like this post
  • Select I think it shouldn't be on Facebook and follow the on-screen instructions
  • पुढच्या पायरीमध्ये तुम्हाला असे का वाटते हा प्रश्न येतो तेव्हा हे वाङ्मयचौर्य आहे हे तिथे लिहिता येईल.

    फेसबुक कशी व किती वेळात कारवाई करेल याबाबत मी अनभिज्ञ आहे.

    या लेखाच्या आशयाशी सहमत.

वॉल्टर व्हाईट's picture

7 Jul 2015 - 11:27 pm | वॉल्टर व्हाईट

इथे फेसबुक वापरणार्या सगळ्यांनी मिळुन जर रिपोर्ट केले तर कारवाई होईल असे वाटते. अर्थात या अश्या कारवाया ह्युमन एडमिन करत नसून मशीन करते असे ऐकून आहे. (त्यामुळे किती जण रिपोर्ट करतात हे महत्वाचे आहे.)

श्रीरंग_जोशी's picture

7 Jul 2015 - 11:38 pm | श्रीरंग_जोशी

यापूर्वी मी स्पॅम वाटतील अशा फेसबुक पोस्ट्स रिपोर्ट केल्या आहेत. काही वेळा एक दोन दिवसांनी त्या हटवल्या गेल्याचे नोटीफिकेशन फेसबुककडून आले तर काही वेळा त्यांच्या पॉलिसिजचे उल्लंघन झालेले नाहीये म्हणून न हटवल्याचेही नोटिफिकेशन आले आहे.

आजवर मी वाङमयचौर्य मात्र रिपोर्ट केलेले नाही.

दमामि's picture

9 Jul 2015 - 3:01 pm | दमामि
दमामि's picture

9 Jul 2015 - 3:02 pm | दमामि

मला आत्ता WhatsApp वर हा फाॅरवर्ड आलाय. तुमचाच लेख चोरलाय का?

आई च्या विविध राशींची

विविध राशीच्या आईचा स्वभाव व त्यांच्यात राशी स्वामीनुसार असणारे गुण-दोष वेगवेगळे असतात. पण, आपल्या मुलांसाठी ती सदैव झटून, त्यांच्यावर योग्य संस्कार करण्याचा प्रयत्न करतेच. राशीस्वामीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती ती स्वीकारते पण... मुलामुलींचे कल्याण व्हावे, ते सुखी व्हावे यासाठीच ती नेहमी प्रयत्नशील असते. खरोखरच आईच्या महानतेचं, त्यागाचं वर्णन करणे कठीणच आहे. पाहूया विविध राशींची आई कशी असते ते!
मेष राशीची आईः
अतिशय बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी असणारी मेष राशीची आई प्रेमळ, मायाळू उदारही असते. मात्र, तिचे हे गुण तिच्या मुलांच्या अनुभवाला तसे कमीच येतात. त्यांच्या वाट्याला येतो तो शिस्तीचा बडगा! आपल्या मुलांनी हुशार असावे, नाव कमवावे, त्यांचे कौतुक व्हावे, अशी तिची जबरदस्त महत्त्वाकांक्षा असते आणि त्याकरता रात्रंदिवस कष्ट घेण्यासाठी ती मागेपुढे पाहात नाही. मुलांवर मेहनत घेते. त्यांना काय हवे नको ते सर्व पाहते, आणि तिच्या मनाप्रमाणे न घडल्यास ‘जमदग्नी’चा अवतारही धारण करते.वाद झाल्यास माघार घेणे, हे तर तिच्या रक्तातच नसते. पण मोठमोठ्याने आरडाओरड करून बोलल्याशिवाय ती शांत होत नाही. मुलांचा अभ्यास घेताना, त्यांना समजावून सांगताना तिचा मानसिक तोल किती वेळ टिकून राहील याचा भरवसा नसतो आणि एकदा मानसिक तोल ढळला की, मग मात्र त्या पोरांची खैर नसते.
मुलांच्या बाबतीत एकदा जर तिने काही ठरवले, तर त्यात यश मिळविण्यासाठी ती आपली बुद्धी, श्रम, पैसा पणाला लावेल परंतु ती त्यासाठी कोणाकडेही हाजीहाजी मात्र करत नाही. ती स्वतःच्या आवडीनिवडी मुलांवर लादण्याचा प्रयत्न करते. इतर मुलांशी तुलना करते, तशी मुलांसाठी त्यांच्या भल्यासाठीच ती सर्व करते, मुले नाराज झालीत तर त्यांची समजूत घालतेे, त्यांच्या भावना जपणे हे तिच्या अखत्यारित बसत नाही. घरातील तिच्या वर्चस्वामुळे आपल्या स्वातंत्र्याला थोडी बाधा आल्याचे मुलांना वाटते.
मुलींनी स्वतंत्र व्हावे, धीट असावे, गृहकृत्यदक्ष असावे, मुलांनी विविध स्पर्धेत भाग घ्यावा, धडाडीने वागावे असे तिला वाटते. मुलांचे लाड करणे हे तिच्या स्वभावात बसत नाही. मुलांना गरजेपेक्षा जास्त स्वातंत्र्य देणे तिला पटत नाही. त्यामुळे मुले थोडी नाराज असतात. तशी ती आदर्श आई ठरू शकेल. तशी मेष स्त्री/आई साधी असते. त्यामुळे मुलांच्या हौशींनाही मर्यादा असतेे. या सर्वांचा परिणाम म्हणजे मोठेपणी मुला-मुलींमध्ये आणि या आईत दरी उत्पन्न होण्याची शक्यता असते. मुलांनी अशा कर्तव्यनिष्ठुर पण कष्टाळू आईचे व तिने घेतलेल्या श्रमांचे जरूर स्मरण ठेवावे.

वृषभ राशीची आईः
ही आई मुलांच्या बाबतीत थोडी हळवी असते. शांत व प्रेमळ असल्याने मुलांवर ओरडणे त्यांना मारणे हे तिला जमत नाही. मुलांनी हौसमौज करावी, आनंदात राहावे, कपडालत्ता चांगला वापरावा, आकर्षक दिसावे. नीटनेटके राहावे, असे तिला नेहमीच वाटते. मुलांसाठी बाजारात आलेल्या नवीन नवीन गोष्टी, वस्तू ती आणते. अभ्यास, कला, क्रीडा याबाबतीत मुलांच्या आवडीनिवडीचा विचार करून त्यांना त्यासाठी ही आई सहकार्य करते. त्यांच्या मित्रमैत्रिणींचे अगत्याने स्वागत करणे तिला आवडते. चार माणसात मुलांचा पाणउतारा न करता, त्यांच्या समस्या सोडवण्यास ती मदत करते. त्या स्त्रीची मुले शांत स्वभावाची, मर्यादशील व विनयी निपजतात. आईवर त्यांचे प्रेम असते. मुलांनी कोणाच्या वाटेला जाऊ नये, वादविवाद टाळावेत, आपापसात प्रेमाने वागावे व वडीलधार्‍याला मान द्यावा, यासाठी ती प्रयत्नशील असते.
हिची मुले थोडी भित्रीच होतात, त्यांच्यात धाडस, समयसूचकता समस्यांना तोंड देण्याचे सामर्थ्य येत नाही. आर्थिक परिस्थिती बिघडल्यास ही आई मुलांना खंबीरपणे वाढवू शकत नाही.

मिथुन राशीची आईः
ही एक प्रेमळ आई असते. आपल्या मुलांवर तिचे कटाक्षाने लक्ष असते. आपली मुले इतरांच्या मानाने कुठेच मागे पडू नयेत म्हणून ती सतत प्रयत्न करते. कष्टाला कमी पडत नाही. चारचौघात वागण्यात, चालीरितीत मुले कुठे कमी पडू नयेत. यासाठी वळण लावण्याचा प्रयत्न करते. ही आई उत्तम गृहिणी असल्यामुळे मुलांची खाण्यापिण्याची चंगळ असते. सणसमारंभ, लग्नकार्य, वाढदिवस इत्यादीत मुलांसह भाग घेते. त्यामुळे मुलांना पुढील आयुष्यात एकटेपणा जाणवत नाही. पण अनिश्‍चितता आणि काहीसा धरसोडपणा या तिच्या अवगुणांचा मुलांवर परिणाम होतोच. यामुळे मुलांना योग्य सल्ला देणे तिला जमत नाही. कारण तिचे सारखे विचार बदलत जातात, याबाबत तिने तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा, ही आई परोपकारी, दयाळू, वर्तणुकीने शालीन असल्यामुळे, या गुणांचा वारसा मुलांना पुढील आयुष्यात पदोपदी उपयुक्त ठरतो.

कर्क राशीची आईः
ही आई मुलांच्या बाबतीत अतिशय भावनाप्रधान असते. मुलांना काही लागले, थोडे जरी बरे नसले तर तिचे कुठेही लक्ष लागत नाही. आपल्या परिवारापासून, मुलांपासून ती दूर राहूच शकत नाही. प्रत्येक मुलाच्या बाबतीत त्याला काय हवे, काय नको याची तिला पूर्ण कल्पना असते. स्वतःच्या स्वभावात थोडा चंचलपणा असूनही मुलांच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेताना ती गंभीर, निश्‍चयी आणि धोरणी बनते. मुलांवर कडक शिस्तीची बंधने न घालता ती त्यांना थोडे फार स्वातंत्र्य देते, पण त्यांच्या प्रत्येक कृतीवर तिचे लक्ष असते. मुलांची, सतत काळजी, काल्पनिक विचाराने अस्वस्थ होणे हा स्वभाव तिच्या प्रकृतीला त्रासदायक ठरतो. मुलांची लग्न झाल्यावर त्यांच्यावरील अतीव प्रेमासाठी ती काहीशी बेचैन होते. तिच्या उतारवयात मुले या सर्व गोष्टींची परतफेड करून आनंद देतात. हेच तिच्या आईच्या भूमिकेला पडलेले उत्तम गुण होत.

सिंह राशीची आईः
सर्वांत हुशार मूल आपलं असावं. बुद्धिमान मूल आपले असावे, सुंदर मूल आपले असावे, जिथे जाल तिथे आपलेच मूल उठून दिसावे, ही तिची जबरदस्त तळमळ असते. त्यामुळे त्यांना घडवण्यात ती आपलं सर्वस्वपणाला लावते. सगळ्यात अद्ययावत, आधुनिक असे जे शिक्षण ते आपल्या मुलांना मिळावे, ही तिची तळमळ. मुलांनी धीट बनावे, वडिलधार्‍यांचा मान ठेवावा, समाजोपयोगी कार्य करावे, कोणीही नावे ठेवू नयेत, असे सांभाळून वागावे, अशी तिची शिकवण असते. तिला पाळणाघर ही संकल्पना मुळीच पटत नाही. प्रत्येक मुलाच्या बाबतीत ती स्वतः निर्णय घेते. कोणाचेही नियंत्रण किंवा सल्ला तिला चालत नाही. परंतु योग्य सल्ल्याचा ती आदरच करते. लबाडीने वागणे, लोकांना फसविणे, फुकटचा बडेजाव, लोकांची हाजीहाजी मुलांनी करू नये यासाठी ती प्रयत्न करते. मुलांनी मित्रांचा गोतावळा जमवून चकाट्या पिटणे, पार्ट्या करणे हे तिला आवडत नाही. स्वतःची इच्छा, दृढ निश्‍चयच, प्रयत्न, परमेश्‍वरातील दृढ श्रद्धा व योग्यता याच्या जोरावर ती मुलाला अव्वल स्थान मिळवून देतेच.

कन्या राशीची आईः
खरे पाहता या स्त्रियांना मुलांची विशेष आवड नसते. मुलांच्या खस्ता काढणे त्यांना नको वाटते. यांच्या अपत्यात मुलांपेक्षा, मुलीच जास्त असतात. त्यांनाही मुलीच जास्त आवडतात. काल्पनिक संकटांची काळजी करण्याची सवय असल्याने मुलांच्याही बाबतीत नको ते विचार त्या करतात. यामुळे मुलांना आपल्यापासून दूर करणे म्हणजे त्यांना एक शिक्षाच वाटते. या स्वभावामुळे मुलांच्या प्रगतीत मात्र बाधा येते. मुलांनी अभ्यासात हुशार असावे, लोकांनी त्यांचे कौतुक करावे, याकरता या राशीच्या स्त्रिया नक्कीच भरपूर कष्ट घेतात. मुलांना कणखर व स्वतंत्र त्यांनी बनवावेे, त्यांचा आत्मविश्‍वास वाढवावा, नाहीतर त्यांना सतत दुसर्‍याच्या ओंजळीने पाणी पिण्याची सवय लागेल असे ज्योतिषांना वाटतं.

तुळ राशीची आईः
तुळेच्या स्त्रियांना मुलांची आवड थोडी कमीच असते. कष्टाची , त्रासाची कामे करणे या शुक्राच्या तुळेला जरा आवडतच नाही. लहान मुलांना सांभाळणे, त्यांचे कपडे बदलणे, त्यांचे दूध खाणे-पिणे त्यांचे औषधपाणी, त्यांच्यासाठी जागरण करणे या गोष्टीचा या माउलीला थोडा कंटाळाच येतो. ही कामे आर्थिक सुबत्ता असल्यास, त्या दुसर्‍याकडूनच करून घेतात. मुलांना सांभाळायला बाई, शिकवणी लावण्याकडे यांचा कल असतो. ही कामे स्वतः न करता स्वतः आरामात राहून त्या दुसर्‍यांकडून करवून घेतात. यासर्व गोष्टींमुळे मध्यम किंवा गरीब परिस्थिती असल्यास मुलांना स्वतःची प्रगती स्वतःच करावी लागते, त्यांनी आईकडून खूप अपेक्षा करू नये. हाती पैसा भरपूर असल्यास या राशीच्या आया मुलांचे अव्वाच्या सव्वा हट्ट पुरवतात. मुले जे मागतील ते देऊन स्वतःचे समाधान करून घेतात. या सर्वांमुळे त्यांची मुले बिघडण्याची शक्यता असते.
सुसंस्कृत, आकर्षक, हुशार, रसिक, दिलदार, बोलक्या, दुसर्‍यांना सहकार्य करणार्‍या अशा अनेक चांगल्या गुणांनी युक्त असणार्‍या या स्त्रियांनी मुलांच्या संगोपनाबाबतीतले हे राशीगुण लक्षात घेऊन त्यावर मात करणेच श्रेयस्कर!

वृश्‍चिक राशीची आईः
मंगळाच्या अधिपत्याखालील या राशीच्या स्त्रियांमध्ये सहनशीलता, विनय, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, माया हे संततीच्या बाबतीत आवश्यक असणारे स्त्रीसुलभ गुण अभावानेच असल्याने किंवा अशा गुणांचा विकास होऊ शकत नसल्याने त्यांच्याकडून संततीच्या बाबतीत या गुणांची अपेक्षा न करणे उत्तमच. घमेंड, गर्व, द्वेषभाव या त्यांच्या स्वभावामुळे सध्या जगात चालू असलेल्या स्पर्धेत मुलांनी मागे राहू नये, असे त्यांना मनापासून वाटते. त्यासाठी त्या निश्‍चितच प्रयत्नशील राहतात. त्यासाठी त्या कडक धोरण स्वीकारण्याची शक्यता असते. वागण्यात जिव्हाळा नसला तरी, खाण्यापिण्यात त्या काही कमी पडू देत नाहीत. नोकरी, व्यवसायामुळे मुलांना तशीही आईची ओढ कमीच होते. ते यामुळे आईशी मनमोकळा संवाद साधू शकत नाही. बाहेरच्या गोष्टी आईला सांगितल्या जात नाही. यांचा मूड कधी जाईल, कधी या चिडतील याचा भरवसा नसतो. स्वभावही चिडखोर असल्याने मुले काहीशी बिथरून जातात. मुलांना शिस्त लावणे, शहाणपणाच्या चार गोष्टी त्यांना सांगणे, त्यांचा अभ्यास घेणे, त्यांच्या आवडी-निवडी, भवितव्याचा विचार करणे या गोष्टींसाठी कामांमुळे त्यांना फार वेळ देणे शक्य नसते. आईच्या स्वभावाचा, तिच्या वागणुकीचा अंदाज असल्याने मुले स्वतःच जबाबदारीने वागून यश मिळवतात; नाहीतर भरकटले जातात.

धनु राशीची आईः
संततीच्या बाबतीत धनु राशीच्या स्त्रिया या अत्यंत दक्ष असतात. आपली मुले सर्व दृष्टीने गुणी व्हावी यासाठी सतत धडपडणार्‍या या स्त्रिया मुलांना शिस्तीत वाढवतात. मुलांच्या तब्येती चांगल्या राहाव्या, ती निर्व्यसनी असावीत, आज्ञाधारक असावीत, त्यांनी थोरामोठ्यांचा मान ठेवावा, ती अभ्यासाप्रमाणे इतर विषयातही हुशार असावीत, असा त्यांचा प्रयत्न असतो. विशेष म्हणजे मुलेही अशीच निपजतात. सत्कर्माची आवड, ईश्‍वरावर श्रद्धा असते. भूतदया, परोपकार, दुसर्‍याला मदत करणे, प्रसंगी धावून जाणे या गोष्टी यांच्यात संस्कारित झालेल्या दिसून येतात. या स्त्रियांचे आपल्या मुलांच्या प्रत्येक कृृतीवर लक्ष असते. त्यांचे खाणपिणे, आवडीनिवडी पुरवतात. या स्त्रिया मुलांच्या बाबतीत अत्यंत हळव्या असतात. मुलांकडून थोडाही अपमान झाल्यास त्यांना त्रास होतो, त्यांना हा अपमान सहन होत नाही. मुलांवर प्रेमाने का होईना पण हुकमत चालू असते. गुरुची रास असलेली धनूराशीची आई, स्वतःत थोडा बदल केल्यास एक आदर्श आई होऊ शकते, यात शंका नाही.

मकर राशीची आईः
प्रेमळ स्वभाव हा गुण त्यांच्या कोषात सापडणे कठीणच! त्यामुळे त्यांची मुलांशी विशेष जवळीक असणे शक्यच नाही, परंतु शिस्तीच्या बाबतीत मात्र त्या जागरूक असतात. मुलांची फारशी दयामाया न करता त्या त्यांच्या वागण्यावर लगाम ठेवतात. त्यांचे भलते सलते लाड त्या खपवून घेत नाहीत. खाण्यापिण्याचेही विशेष चोचले पुरवत नाहीत. पण जे आवश्यक असेल ते करण्याचा प्रयत्न जरूर करतात. त्यांचा काटकसरीपणा, कंजूषपणा याचा परिणाम थोडाफार मुलांवर होतोच. प्रेमाच्या पोटी किंवा निष्कारण काळजीच्या पोटी त्यांना सतत आपल्याजवळ जखडून ठेवणे, हा प्रकार त्यांच्याजवळ नसतो. शनीच्या अमलाखालील या स्त्रिया न्याय निष्ठूर असल्याने मुलांच्या दोषावर पांघरूण घालत नाहीत, परंतु मुलांच्या बाबतीत कर्तव्यात मुळीच कसूर होऊ देत नाहीत. हेच यांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

कुंभ राशीची आईः
कुंभेची स्त्री स्वतंत्र विचारांची असते. मठ्ठ वा मंद माणसाबरोबर तिला बोलणे सुद्धा आवडत नाही. तिची प्रत्येक गोष्ट ही बुद्धीशी निगडित असते. आईच्या भूमिकेला त्या उत्तम न्याय देतात यात शंकाच नाही. स्वतः सुविद्य व सुविचारी असल्याने आपल्या पाल्याला त्या तसेच घडवण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्यात त्या यशस्वी होतातही. मुलांवर चिडणे, आरडाओरड करणे, मारणे या गोष्टी त्यांच्या स्वभावात नसतात. तरीही मुले त्यांच्या धाकात राहतात. मुलांवर यांचे पूर्ण लक्ष असते. मुलांचे खाणे-पिणे, त्यांची प्रकृती, त्यांच्या गरजा, याबाबत जास्त गाजावाजा न करता, त्या त्यांचे कर्तव्य प्रेमाने व दक्षतेने पूर्ण करतात. बोलण्यापेक्षा आणि उपदेश करण्यापेक्षा आपल्या वर्तणुकीने त्या मुलांवर संस्कार घडवतात. त्यांच्या स्वभावातील उत्तमोत्तम गुण, मुलांच्यात उतरतात. खोटे बोलणे, चहाड्या करणे, अफरातफर करणे, एखाद्याची निंदा करणे, थापा मारणे या गोष्टी घरात कधीही न घडल्याने मुले या सर्वांपासून अलिप्त राहतात. या स्त्रियांना संतती कमी असते. त्यामुळे मुलांवर लक्ष देणे त्यांना सहज शक्य आणि सोपे होते.

मीन राशीची आईः
‘आई’ या भूमिकेबद्दल मीनेच्या स्त्रियांना फार गुण मिळण्याची शक्यता कमीच म्हणायला हवी. यांच्या संततीमध्ये अंतर फार कमी दिसून येते. साहजिकच लागोपाठ गर्भारपण, बाळंतपणामुळे त्यांना स्वस्थता लाभत नाही. याच्या जोडीला स्वभावातील आळशीपणाही असतोच. या सगळ्यांचा परिणाम मुलांच्या वाढीवर, प्रगतीवर होतो. त्यांना शिस्त लावणे, त्यांच्यावर उत्तमोत्तम संस्कार करणे, त्यांचा अभ्यास घेणे, त्यांना जपणे या गोष्टी त्यांच्याकडून अभावानेच घडतात. पदरचे मोडून इतरांना मदत करणे, आल्या-गेल्याचा पाहुणचार करणे, शांत राहून सगळ्यांशी व्यवहार करणे, या आपल्या स्वभावातील चांगल्या गोष्टींचे संस्कार मुलांवर आपोआप होतील, त्यांना तसेच वळण लागेल असे त्यांना वाटते. मुलांना घडवण्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागते हे त्यांच्या लक्षात येत नाही. यातून मुलांकडे नकळत दुर्लक्ष होते. परिणाम व्हायचा तो होतोच! मुलांना चुकीचे वळण लागून ते बिघडण्याची भीती असते. अशी मुलं व्यसनी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कोणाबरोबर चुरस, स्पर्धा हा त्यांचा स्वभाव नसल्यामुळे त्यांच्या मुलांमध्येही तशी ईर्ष्याही दिसून येत नाही. मुलांवर त्यांचे अतिशय प्रेम असते, त्यांच्यासाठी करण्यात येणार्‍या त्यागाची कमतरता असते.

आईपण निभवताना त्या स्त्रीमधील राशीच्या गुणदोषांचा परिणाम होतोच. खरे आहे, ‘स्त्री ही क्षणाचीच पत्नी असून अनेक काळाची माता आहे’ ते!
निवृत्ती उबाळे. 9860395985
कृष्णमूर्ती ज्योतिष मार्गदर्शक , कणकवली

श्रीगुरुजी's picture

11 Jul 2015 - 2:18 pm | श्रीगुरुजी

वर दिलेला लेख (विविध राशींची आई) माझा लेख नाही. माझा लेख वेगळा होता (सर्वात पहिल्या प्रतिसादात लिंक दिलेली आहे).

वरील लेखाच्या शेवटी ज्याचे नाव आहे (निवृत्ती उबाळे) त्यानेच माझ्या नकळत माझा लेख ढापून त्याखाली स्वतःचे नाव टाकून फेबुवर टाकला होता. वरील लेख देखील कोणाचातरी ढापलेला असण्याची दाट शक्यता आहे.

हो, असला अचरटपणा लोक करतात. मध्यंतरी अत्रुप्त गुर्जींच्या लेखांची चोरी झाली हे त्यांनी सांगिनले होते. त्यांना मनुष्यही समजला व फोन झाला म्हणाले. त्यावेळी माझ्या नवर्‍याने लिहिलेल्या लेखाबद्दल आणि माझी व गणपाची पाकृ चोरली गेल्याची कथा त्यांना सांगितली होती. गंमत तर त्याहून भारी, की हे असे झालेय म्हटल्यावर आमच्या ओळखीचे म्हणणार्‍यांनी आम्हालाच टारगेट केले व ते लेख आम्ही चोरले नसतील कशावरून असाही कांगावा केला. त्यावरून फेसबुकावर निषेध वगैरे केले. सकाळ पेप्राकडे याबाबत तक्रार केल्यास हाती काही लागले नाही. मी व गणपाने मात्र त्या वेबसायटीवर जाऊन आमच्या पाकृ चोरल्याचा निषेध केला होता. आता माजे लेखन हे चोरी करण्याजोगे नसते म्हणून फारशी भीती नाही पण त्या दर्जाचेही कॉपी केले जात असल्यास चोर धन्य आहेत.
तुमचे मात्र बरेच लेखन चोरी झाले आहे त्याबद्दल खेद वाटतो.

चित्रगुप्त's picture

4 Jul 2015 - 11:36 pm | चित्रगुप्त

पटाईत साहेब, तुम्ही निर्धास्तपणे रोज नवीन काहीतरी लिहित रहा हो, ही पोलीस-पाटीलकी करण्यात वेळ घालवू नका, आणि मनस्ताप तर अजिबात करून घेऊ नका. आपली सृजनशीलता आणि तब्येत जपा. जय हो.

विवेकपटाईत's picture

5 Jul 2015 - 9:41 am | विवेकपटाईत

चित्रगुप्त साहेब, आजकाल मी टेन्शन घेण सोडून दिले आहे. हा लेख फक्त मिसळपाववर लिहिणार्यांना, काय चालले आहे, हे कळावे म्हणून. बाकी दर ५वा लेख माझा चोरी झालेला आहे.

एक सावधगिरीची सूचना म्हणून, कळत नकळत आपण आरोप करतो तेव्हा गरज पडल्यास (प्रतिपक्षाने आव्हान दिल्यास) साधार सिद्ध करण्याची तयारी सुद्धा असावी लागते. आणि प्रताधिकार उल्लंघन साधार सिद्ध करण्यासाठी काय काळज घ्यावी याची सुद्धा चर्चा कलेली बरी पडेल.

संदीप डांगे's picture

5 Jul 2015 - 12:47 pm | संदीप डांगे

जालावरून जालावर केल्या जाणारे चौर्यकर्म सोप्या पद्धतीने पकडले जाऊ शकते. जालावरून प्रिंटमीडीयामधे व प्रिंटमधून जालावर होणारे पकडणे फारफार कठीण आहे. ते नशिब असेल तर उघडकीस येईल.

तुर्तास माझ्यामते जालावर प्रकाशनाची वेळ सर्वप्रथम ज्याची आहे त्याचा प्रताधिकार मान्य करायला काय हरकत आहे? दुसरं असं की मधुराताईंनी म्हटल्याप्रमाणे कॉपी-विरोधी स्क्रिप्ट वापरावी. तिसरा महत्त्वाचा मुद्दा माहितगार यांनी सांगितल्या प्रमाणे. एखादी ऑटोनॉमस संस्था किंवा संघटना वा व्यक्ति जी अशा चौर्यकर्माचा पाठपुरावा करून चोराकडून मजबूत नुकसानभरपाई घेईल. त्यातून आपले शुल्क वळते करून घेईल व मूळ लेखकाला त्याचे मानधनही देईल. दोनचार अशा घटना घडल्या की हे प्रकार चटकन बंद होतील असे वाटते. नुसती प्रताधिकार कायद्यांतर्गत नुकसानभरपाईची नोटीस पाठवेल अशी धमकी देऊन तर बघावी. ओळखीच्या वकिलमित्रांनी अशा दोनचार केसेस सहज विरंगुळा म्हणून, मदत म्हणून लढवाव्या. काहीतरी सकारात्मक होईल असे वाटते.

हे भुरटे चोर फार पळपुटे असतात. त्यांच्यात खटला निभावून न्यायची हिंमत नसते. बरेचदा आपण काही फार चुकीचे करतोय असे यांना वाटतच नसते. चार मित्रांमधे वाहवा मिळवून कोषात स्वतःचे लाड करून घेणारे हे विकृत असतात. त्यांना जरा सत्याचे दर्शन करवले तर सरळ येतील. बाकी याविषयात ज्यांना खरंच मनस्ताप झालाय त्यांच्या अनुभवाबद्दल मी खात्रीलायक सांगू शकणार नाही.

याच प्रकाराच्या धास्तीतून माझ्या सुमारे शंभर कविता मी गेल्या १२-१५ वर्षांपासून अप्रकाशित ठेवल्या आहेत. फक्त ओळखीच्या लोकांना वाचायला देतो. पुढे शक्य झाले तर मोठ्याच प्रमाणावर प्रकाशन करेन. भले मी चार ओळीच खरडत असेल, पण त्या माझ्या अस्तित्वाच्या त्या क्षणाचा पुरावा असतात. ते आपलं अपत्यच असतं. त्यावर कुणी ऐरागैरा सहज आपला हक्क सांगू लागला तर होणारा त्रास शब्दात व्यक्त होऊ शकत नाही.

जालावरून जालावर केल्या जाणारे चौर्यकर्म सोप्या पद्धतीने पकडले जाऊ शकते. जालावरून प्रिंटमीडीयामधे व प्रिंटमधून जालावर होणारे पकडणे फारफार कठीण आहे. ते नशिब असेल तर उघडकीस येईल.

उघडकीस येण्यास अंशतः नशीबाची साथ लागत असेल, नाही असे नाही. जालावरून प्रिंटमीडीयामधे व प्रिंटमधून जालावर होणारे हे जालावरून चटकन लक्षात येणार नाही पण पुस्तक (प्रिंट अथवा इलेक्ट्रॉनीक) विकत अथवा वाचनालयातून वाचणारा वाचक आंतरजालाशी जेवढा जोडलेला असेल तेवढेच उचलगिरी ओळखली जाण्याची शक्यता वाढेल. दुसरे जालावरून प्रिंटमीडीयामधे व प्रिंटमधून जालावर होणारे हे लक्षात येण्यास वेळ लागला तरी प्रताधिकार कायद्याचे उल्लंघन करणारी व्यक्ती अधीक प्रताधिकार उल्लंघनाचे अधिक पुरावेही निर्माण करण्याची शक्यता आहे.

तुर्तास माझ्यामते जालावर प्रकाशनाची वेळ सर्वप्रथम ज्याची आहे त्याचा प्रताधिकार मान्य करायला काय हरकत आहे?

वाक्याचा उत्तरार्धात : ".....त्याचा प्रताधिकार असण्याची शक्यता प्रथमदर्शनी गृहीत धरण्यास काय हरकत आहे?" अशा प्रकारचा बदल अधीक सुयोग्य असेल का ते पहावे असे वाटते.

*ब्लॉग वरुन टेक्स्ट कॉपी करता येणार नाहीत अशी स्क्रिप्ट आहे, ज्याचा त्यातल्या त्यात उपयोग होऊ शकतो. हे काम माझेही राहिले आहेच कधीचे, आता करायलाच हवे. पण हे करुनही चोरणारे महाभाग आहेतच. :( ~ मधुरा देशपांडे
...मधुराताईंनी म्हटल्याप्रमाणे कॉपी-विरोधी स्क्रिप्ट वापरावी ~संदीप डांगे

२०१२च्या अमेंडमेंटने कॉपीराइट उल्लंघन होऊ नये म्हणून काही टेक्नॉलॉजीकल पद्धती वापरली असेल आणि कुणी ती ब्रेक केल्यास अधीक शिक्षा देणारे भारतीय प्रताधिकार कायद्यात एक नवे उप कलम घातले आहे ते असे :

65A. (1) Any person who circumvents an effective technological measure applied for the purpose of protecting any of the rights conferred by this Act, with the intention of infringing such rights, shall be punishable with....पुढे वाचा Indian_Copyright_Law

नुसती प्रताधिकार कायद्यांतर्गत नुकसानभरपाईची नोटीस पाठवेल अशी धमकी देऊन तर बघावी.

या बाबत एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी भारतीय प्रताधिकार कायद्याचे कलम ६० वाचा Indian_Copyright_Law प्रताधिकार कायद्यांतर्गतच्या गोष्टी न्यायालया समोर याव्यात कायदेशीर कारवाईचा उल्लेख चुकीच्या ब्लॅकमेलींगसाठी केला जाऊ नये या बाबतही बर्‍यापैकी कठोर आहे.

(माझे व्यक्तीगत मत) एखाद्या कृतीवर प्रताधिकार असेल आणि इतरांकडून उल्लंघन होत असेल तर.. १) कायदेशीर कारवाई करा अथवा न करा पण पुरावे निश्चितपणे गोळाकरून ठेवा नाहीतर प्रताधिकार उल्लंघनकरणाराच पहिला प्रताधिकार माझा म्हणून तुमच्या वर केस टाकेल तर तुम्ही पुराव्यानिशी तयार असलेले बरे. २) पुरावे निटसे गोळा केल्या नंतर प्रताधिकार उल्लंघनाबाबत पर्याय आहेत अ) दुर्लक्ष करणे ( हा पर्याय बरेच जण चर्चांमधून सुचवताना दिसतात, अगदी कायदेशीर कारवाई करावयाची नसली तरीही १ला मुद्दा लक्षात घेतला तर हा सर्वोत्तम पर्याय आहे का या बद्दल साशंक आहे आ) कलाकृतीवर प्रताधिकार आपला आहे हे उल्लंघन करणार्‍यास कळवून पर्याय आ.१) केवळ प्रताधिकार उल्लंघन होत असल्याचे कळवून उल्लंघन होणारी/करणारी कृती थांबवण्यास सांगावे अथवा आ.२) - आ.१ ने केलेल्या विनंती सोबत आर्थीक मोबदल्याची विनंती करावी.

अथवा आ.३) आ.१ अथवा आ.२ सोबत अथवा नंतर आपण कायदेशीर कारवाई करण्याची शक्यता असल्याचे सुचीत करावे, पण शक्यतोवर कायदेशीर कारवाईची शक्यता नमुद करण्या अगोदर वकीलांचा सल्ला घेतलेला केव्हाही उचीत कारण एकदा कायदेशीरकारवाईचा उल्लेख केला की सहसा कायदेशीर प्रक्रीयेतील पुढील पावले उचलणे कलम ६०नुसार कायद्यास अभिप्रेत असावे असे वाटते. (चुभूदेघे)

उत्तरदायकत्वास नकार

विवेकपटाईत's picture

5 Jul 2015 - 5:01 pm | विवेकपटाईत

आपण कविता लिहिलेल्या आहेत पण त्या लोकांपर्यंत पोहचल्या नाहीत. पुस्तक प्रकाशित केल्यावर ही ते किती लोक वाचतील यात ही शंकाच असते. अंतर्जालावर किमान १००० वाचक तरी वाचतात आणि त्यात १०० हून जास्ती प्रतिक्रिया ही लगेच मिळतात. आता १०-१५ कविता चोरल्या जातील. पण काही ही म्हणा कविता जास्तीसजास्त लोकांपर्यंत पोहचतात. हे ही खर आहे.

नाखु's picture

6 Jul 2015 - 9:07 am | नाखु

भावनेशी तीव्र सहमत : या उच्ल्यांना खरंच काही लाज-लज्जा-भीड-खंत-चाड असेल असे वाटत नाही पण खोटी वाह्व्वा मिळन्यासाठी असले उप्द्व्याप करण्यात आपली अक्कल वाया घालवतात हेच खरे!

जाता जाता आप्लया हिंदी शब्दांसाठी मराठी सुलभ आणि वापरातील शब्द

बेहिचक+= बेमुर्वतखोर

बेशर्मीने = निलाजरेपणे = निर्ल्लजपणे

कुड्मुडे पण अस्सल आणि
फक्त स्वान्त सुखाय खरडणारा

याचकांची पत्रेवाला नाखुस मिपाकर**

** आमचे आधारकार्ड फक्त इथेच आहे.

सुबोध खरे's picture

6 Jul 2015 - 10:00 am | सुबोध खरे

मी चित्रगुप्त यांच्याशी सहमत आहे. गम्मत म्हणून कुणी आपल्या लिखाणाची चोरी केली आहे हे पाहणे ठीक आहे. ज्याअर्थी चोरी केली त्या अर्थी तुमचे लेखन तितक्या उच्च दर्जाचे आहे हि वस्तुस्थिती आहे मग हे फुकटात मिळणारे समाधान का सोडा. चोर चोरी करत राहणार मग तुम्ही त्यांच्या मागे लागा किंवा नाही. भुरटे चोर, जबरी चोर, दरोडेखोर हे लोक समाजातून एवढ्या शिक्षा असूनही नाहीये झाले का?
मग अशा लोकांच्या मागे लागून आपली मनस्थिती का बिघडवून घ्या?
आपण मूर्ती घडवा. मग ती चोराच्या घरी स्थापना होते कि मंदिरात काय फरक पडतो? उत्तम चित्रकाराचे चित्र जसे स्मगलरच्या दिवाणखान्यात दिसून येते. सृजनाचा आनंद घ्या.
जाता जाता -- माझे लष्करातील अनुभव कुणी स्वतःचे म्हणून खपवले आहेत का याचे मला कुतूहल लागून राहिले आहे? म्हणजे माझ्या लेखनाची लायकी किती आहे ते पण कळेल( फार नाही हे गृहीत तर आहेच).

जर लेखनाचा screenshot घेऊन, स्वत:च्या नावाचा watermark background ला टाकून, इमेज म्हणून post केलं तर या चोऱ्यांना आळा बसू शकेल काय? इतकं सगळं type करून post करण्या इतपत हे चोर उत्साही असतील का ते माहित नाही.

माझेही ब्लॉगवरचे लेखन चोरले गेले आहे. डच बालकथा सगळ्याच्या सगळ्या ! ओळीने ! मी आरडाओरडा केल्यावर साईटवरून उडवल्या. तेव्हा मिपावर धागा काढून चर्चा झाल्याचे आठवते.
एकूणच वॉटरमार्क टाका, कॉपीराइट्स ची धडपड करा अशा तांत्रिक गोष्टींचा भयंकर कंटाळा असल्याने ब्लॉगवर लिहिण्याचा उत्साहच कमी झाला. हे चूक आहे कळूनही...

अभिजीत अवलिया's picture

7 Jul 2015 - 11:43 pm | अभिजीत अवलिया

कृपया उचलेगिरी होत आहे म्हणून लिखाण थांबवू नये. मी आपल्या उत्तमोत्तम लेखांची नेहमीच वाट बघत असतो.

आमची पहिली परदेशवारी....१० | मिसळपाव
www.misalpav.com/node/13708 - Translate this page
Aug 8, 2010 - बस आगारातून येताना एकदा बस बदलावी लागली होती. एडीला बस आगारातून ४ वाजताची बस होती. मी माझ्याकडे १०० डॉलर वेगळे ठेवलेले होते. त्यातले ५० डॉलर बदलून मी रियाल घेतले ,काहीतरी ७२-७३ रियाल मिळाले. त्यातले ३० रियाल चे मी एडीला ...
स्वप्नातलं भविष्य - درباره ی ما
456sf.in/.../9c67d7702eda8191d56e074d10c78f05_4/ - Translate this page
बस आगारातून येताना एकदा बस बदलावी लागली होती. एडीला बस आगारातून ४ वाजताची बस होती. मी माझ्याकडे १०० डॉलर वेगळे ठेवलेले होते. त्यातले ५० डॉलर बदलून मी रियाल घेतले ,काहीतरी ७२-७३ रियाल मिळाले. त्यातले ३० रियाल चे मी एडीला विमान ...

श्रीरंग_जोशी's picture

8 Jul 2015 - 12:26 am | श्रीरंग_जोशी

तुमच्या लेखाचे शीर्षक वापरून शोध घेतला असता प्रथमदर्शनी तरी वाङ्मयचौर्य झालेले आढळत नाहीये.

विलासराव's picture

8 Jul 2015 - 12:50 am | विलासराव

धन्यवाद.
गम्म्मत म्हणून पाहिले.
बाकी काय म्हणता?

श्रीरंग_जोशी's picture

8 Jul 2015 - 1:02 am | श्रीरंग_जोशी

कधी कुणाला चोरावेसे वाटेल असे दर्जेदार लेखन करणे मला कधी जमू शकेल का हा विचार या धाग्यामुळे मनात आला :-).
असो दर्जेदार लिहिता येत नसलं तरी किमान दर्जेदार वाचता नक्कीच येतं :-) .

प्रभाकर पेठकर's picture

8 Jul 2015 - 3:11 am | प्रभाकर पेठकर

शोध घेतला असता माझ्या एकूणएक पाककृती (अगदी मनोगत पासूनच्याही) अनेकांनी चोरुन आपल्या फेसबुक पेजवर किंवा स्वतःच्या ब्लॉगवर टाकल्या आहेत. हे कसे रोखावे? की कांही इथलेच डू आयडी ही कृष्णकृत्ये करीत आहेत?

पाककृतींच्या बाबतीत हा उचलाउचलीचा प्रकार मी खूप वेळा पाहिला आहे. एखाद्या पदार्थाची पाककृती शोधताना निदान तीन-चार तरी दुव्यांवर शब्द न शब्द सारखे मिळतात. त्यामुळे फक्त इथलेच आयडी असे करीत असावेत ही शक्यता कमी वाटते.

हे रोखण्यासाठी काही वेबसाईट त्यातील content कॉपी करण्याची सुविधाच काढून टाकतात. येथे एक उदाहरण आहे. पण त्यात आणखी काही तांत्रिक अडचणी आहेत किंवा कसे माहित नाही. नाहीतर सगळ्यांनीच ते केले असते.

श्रीरंग_जोशी's picture

8 Jul 2015 - 5:08 am | श्रीरंग_जोशी

ही पद्धत वापरून वेबपेज वरून मजकूरा सिलेक्ट करणे, राइट क्लिकचा वापर करणे व मजकूर कॉपी करणे रोखता येईल.

पण ते वेबपेजच सेव्ह करता येईल की. सेव्ह केलेले पेज ब्राउझरमधून न उघडता नोटपॅड किंवा तत्सम टेक्स्ट एडिटींग टूलमधून ओपन केल्यास एचटीएमएल कोडसकट मजकूर मिळेल.

किंवा व्ह्यु सोर्स पाहून तिकडून थेट एचटीएमएल कोडसकट मजकूर मिळेल :-) .

उचलेगिरीकरणारी वक्ती फारशी तंत्र अवगत नसेल तर मात्र नाद सोडून देईल.

हा प्रकार म्हणजे जुन्या काळी कुलूप असणारी सीपीयू कॅबिनेटसारखा झाला. पुढून किल्लीशिवाय उघडता येणार नाही. पण मागून स्क्रू ड्रायव्हर वापरून मुक्त प्रवेश असेल ;-) .

माहितगार's picture

8 Jul 2015 - 6:59 am | माहितगार

सर्वसाधारण उचलेगिरी करणारी मंडळी सर्वसाधारणपणे तांत्रिक गोष्टींना वळसा घालण्याच्या फंदात पडत नाहीत.

कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन तांत्रिक बंधन सुविधांना वळसा घालून केले तर जास्तीच्या कठोर शिक्षेची तरतुद भारतीय प्रताधिकार कायद्यात आहे.
२०१२च्या अमेंडमेंटने कॉपीराइट उल्लंघन होऊ नये म्हणून काही टेक्नॉलॉजीकल पद्धती वापरली असेल आणि कुणी ती ब्रेक केल्यास अधीक शिक्षा देणारे भारतीय प्रताधिकार कायद्यात एक नवे उप कलम घातले आहे ते असे :

65A. (1) Any person who circumvents an effective technological measure applied for the purpose of protecting any of the rights conferred by this Act, with the intention of infringing such rights, shall be punishable with....पुढे वाचा Indian_Copyright_Law

श्रीरंग_जोशी's picture

8 Jul 2015 - 7:17 am | श्रीरंग_जोशी

कायद्यातील ही तरतूद चांगलीच गोष्ट आहे. परंतु ज्यांचे लेखन चोरीला जात आहे ते अधिकृत तक्रार करत नसल्याने अशा चोरांचे फावते.

माहितगार's picture

8 Jul 2015 - 8:34 am | माहितगार

मी आधीच्या प्रतिसादातून सुचवल्या प्रमाणे एखाद्या सोसायटीच्या माध्यमातून फालोअप देणे हा एक मार्ग आहे. दुसरा मार्ग टेक्नीकली मिसळपाव संकेतस्थळाचे मालक हे येथील लेखनाचे प्रकाशकही आहेत. लेखकांनी त्यांच्याशी रेव्हेन्यू शेअरींग करार केल्यास प्रकाशक स्वतःही प्रताधिकार विषयक फालोअप देऊ शकतील. मी आत्ताच मिपा मालकांना रेव्हेन्यू शेअरींग आणि मार्केटींग बद्दल एक टिप व्यनि केली आहे.

चित्रगुप्त's picture

8 Jul 2015 - 3:33 am | चित्रगुप्त

आपण प्रकाशित करत असलेले साहित्य खरोखर काही उपयोगी, महत्वाचे आहे, असे वाटत असेल तर चौर्याद्वारे का होईना, ते जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे, असे मानून उत्तमोत्तम निर्मिती घडवण्याकडे आपले लक्ष केंद्रित करणे श्रेयस्कर.
बाकी ज्यांना कायदेशीर कारवाई वगैरेची जात्याच खुमखुमी असते, त्यांनी तो छंद अवश्य जोपासावा.
अवांतरः इथे मला माझ्या चुलत मामांची आठवण आली. ते त्याकाळी इंदुरातले नामांकित डॉक्टर असून खुद्द महाराज तुकोजीराव होळकर त्यांना बोलवायचे. पण यांना मनापासून आवड कसली, तर काहीतरी खुसपट काढून लोकांवर कोर्टात केस करायची. त्यांना कोर्टात जाणे मनापासून आवडायचे, आणि डॉक्टरीत आपला वेळ फुकट जातो असे वाटायचे. त्यांनी आपल्या मुलाला जबरदस्तीने वकील केले, त्याने एक दिवसही वकिली केली नाही. त्याला भाषा शिकण्याची आवड होती, त्याप्रमाणे जगातील अनेक भाषा शिकून त्यात पुस्तके लिहीली.

माहितगार's picture

8 Jul 2015 - 7:12 am | माहितगार

संवेदनशीलतेचा आणि सर्जनाचा संबंध असतो. सर्जनशील व्यक्ती संवेदनशील असतात आणि त्यांच्या संवेदनशीलतेस कंगोरे अनेक असू शकतात !