वेडा बाबा

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
28 May 2014 - 11:27 am

उशी भिजली आसवांनी, हुंदका दाटुन येतो
काय झाले माझ्या परीला, बेचैन मी हैराण होतो
तु हमसत रडत असते, पाहुन मी अस्वस्थ होतो
तुझे साश्रु नयन पाहता, गलबलाट काळजात होतो

अजून सांगू किती वेळा? काही झाले नाही मला,
छळु नको मज उगा सारखा , जरा एकटी सोड मला
दुरुत्तरे तुझी अशी ऐकुनी, राग क्षणभर येई मला
पण तुझी ती तडफड पाहुनी, राग माझा येई मला

तेच सारखे पुसतो राणी, तुझ्या काळजी पोटी गं
तळमळताना तुला पाहुनी, काळीज तीळ तीळ तुटते गं,
बोललीस तू नाहीस जर तर, मला कसे उमजावे गं
घुटमळतो लाचार होउनी , प्रश्र्ण सारखे पुसतो गं

फुलण्याचे तव दिन हे असती, नसती शंका मनात येते
दुष्ट विचारही घेरुन येती, पाल मनीची चुकचुकते
कुठुनशी तुझी मग आई येते, मजला खुणवुन बाजुस नेते,
तीला पोटभर रडु दे म्हणते, बायकांचे हे असेच असते,

निमुटपणे मी बाहेर जातो, झोप काही पण लागत नाही
गरगर पंखा पहात बसतो, विचार चक्रे तुटतच नाही
सकाळी मात्र तु खुदकन हसते, जणु काही घडलेच नाही
म्हणती हसत मला मायलेकी, वेड्या, तुला काही कळतच नाही

कविता

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 May 2014 - 11:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता. शेवटच्या चार ओळींनी अधिक स्पष्ट झाली कविता.
नै तर माझ्या मनात दुसरंच सुरु झालं होतं. :(

-दिलीप बिरुटे

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 May 2014 - 3:03 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त पैजारबुवा... झक्कास कविता...

मुक्त विहारि's picture

28 May 2014 - 3:21 pm | मुक्त विहारि

झक्कास...

चिगो's picture

28 May 2014 - 3:55 pm | चिगो

सुदर कविता, पैजारबुवा..

सस्नेह's picture

28 May 2014 - 10:40 pm | सस्नेह

वात्सल्यपूर्ण .

विकास जाधव's picture

29 May 2014 - 1:41 pm | विकास जाधव

छान..

म्हैस's picture

30 May 2014 - 11:27 am | म्हैस

वात्सल्यपूर्ण