भीमाशंकर

ॐकार's picture
ॐकार in जनातलं, मनातलं
22 Aug 2008 - 1:30 am

दोन आठवड्यांपूर्वीच्या तुफान पावसात भीमाशंकर आणि आसपासच्या गावात भटकंती चालू होती. त्यावेळी कॅमेर्‍यात पकडलेले काही क्षण...





त्वं मूलाऽधारस्थितोसि नित्यम




वाटाड्या ( वय - ७७ वर्षे फक्त(!) )



प्रवासभूगोलआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

22 Aug 2008 - 1:35 am | प्रियाली

धुके, पाणी, हिरवाकंच निसर्ग, सहस्त्र हात पसरून उभं ठाकलेलं ते झाड, तो दाढीवाला म्हातारा मस्त!!!!

पावसाळी दिवस बघून असं वाटलं की इथे आमच्याकडेही काळोख भरून आलेला असावा आणि विजांचा लखलखाट सुरू व्हावा आणि मुसळधार पाऊस कोसळावा.

भाग्यश्री's picture

22 Aug 2008 - 1:54 am | भाग्यश्री

अगदी अगदी!! पावसाळा सुरू झाल्यापासून अगदी असंच वाटत होतं.. ढग येतात पण पाऊस काही पडत नाही..
मात्र परवा, रात्री ढगांचा गडगडाट , विजा चमकून पाऊस पडला तर मी दचकलेच! :) अर्थात दुसर्या दिवशी परत कोरडं ठक्क..!

असे फोटो पाहीले की पळत जावसं वाटतं तिथे! हिरवागार निसर्ग अप्रतिम आलाय ओंकार.. मला ते झाड, आणि धबधब्याची नक्षी खूप आवडली!!

प्राजु's picture

22 Aug 2008 - 1:37 am | प्राजु

काय फोटो आहेत..!! कोणतं सगळ्यात चांगलं चित्र आणि कोणतं नंतर हे सांगणं कठीण आहे.
१० नंबरचे चित्र :

हिरवाईचा पल्लव पसरून काठावरी
मोहक कटी मिरवी ती सरीता तटावरी..
मस्त..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

कोलबेर's picture

22 Aug 2008 - 1:43 am | कोलबेर

वाटाड्याचा सगळ्यात जास्त आवडला!
कृष्णधवल करुन बघीतला आहे का?

भडकमकर मास्तर's picture

22 Aug 2008 - 9:34 am | भडकमकर मास्तर


______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग's picture

22 Aug 2008 - 10:27 am | चतुरंग

काळं-पांढरं लईच खास दिसतंय चित्र! :)

चतुरंग

चतुरंग's picture

22 Aug 2008 - 1:46 am | चतुरंग

नभ पेलणारे झाड, ही वाट दूर जाते, कातळावरुन वाहणारे फेसाळ पाणी, निसर्गात रमलेला वाटाड्या - सगळीच प्रकाशचित्रे सुंदर!

(श्रावणात घन निळा बरसला! :) प्रभाकर जोगांचे व्हायोलिन ऐका आणि तृप्त व्हा! :)

चतुरंग

धनंजय's picture

22 Aug 2008 - 2:39 am | धनंजय

मी भीमाशंकराच्या जत्रेला ठणठणीत कोरड्या हवामानात गेलो आहे. त्यावेळी हे लोभस हिरवेगार रूप मी बघितलेले नव्हते. धन्यवाद.

(पहिल्या तीन चित्रांत क्षितिजरेषा क्षितिजसमांतर [हॉरिझाँटल] असती तर चित्रे अधिक आवडली असती.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Aug 2008 - 10:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> (पहिल्या तीन चित्रांत क्षितिजरेषा क्षितिजसमांतर [हॉरिझाँटल] असती तर चित्रे अधिक आवडली असती.)
अहो, उतारावरून काढले असतील तीनही फोटो! ;-)

संदीप चित्रे's picture

22 Aug 2008 - 2:50 am | संदीप चित्रे

फक्त क्र. ८ चे चित्र आधी पहा नि मग क्र. ७ चे चित्र पहा.

हिरवी हिरवी नेसून वस्त्रे
वाट जातसे कुठे ?
पसरूनी बाहू अधीरतेने
प्रियकर भेटे जिथे !

(प्राजुकडून स्फूर्ती घेऊन हा एक प्रयत्न ! ) :)

अनामिक's picture

22 Aug 2008 - 5:33 am | अनामिक

हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती
फुलराणी ती खेळत होती....

व्वा! एकदम झकास!!!

(पावसाळ्याच्या आठवणींमधे रमलेला) अनामिक

विसोबा खेचर's picture

22 Aug 2008 - 6:55 am | विसोबा खेचर

सर्व चित्रे क्लास! म्हातारा सहीच आहे! :)

शितल's picture

22 Aug 2008 - 7:58 am | शितल

सगळेच फोटो मस्त.
पण मातीने लाल होऊन वाहणार्‍या नदीचे फोटो तर केवळ लाजबाब. :)

अनिल हटेला's picture

22 Aug 2008 - 8:31 am | अनिल हटेला

वाटाड्या आजोबाचा सगळ्यात क्लास !!!

भीमा शंकर ला भटकलोये पण फोटो च नव्हते घेतले...

आता काही क्षणासाठी मन जाउन आले !!!!

मन वढाय वढाय !! दुसर काय ?
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

घाटावरचे भट's picture

22 Aug 2008 - 10:17 am | घाटावरचे भट

ॐकार राव,

उत्तम छायाचित्रे दिल्याबद्दल धन्यवाद. इथे तिकडचा पाऊस लैच मिस करतोय.
असो, आता मियां मल्हार ऐकायलाच हवा...

http://www.esnips.com/doc/7a7d1ee0-f764-4592-8480-b29d78a40fac/Pt-Channu...
ऐका बनारसचे प्रसिद्ध गायक पं. छन्नुलाल मिश्र यांचा मियां मल्हार. त्यांची मध्यलय त्रितालातील खास फर्माईशी बंदिश जरूर ऐका. पावसाळ्यातल्या विविध नादांवर आधारित या चिजेचे शब्द असे आहेत...

आली उमड घन घुमड बरसे, बूंदनी पडत फुहारे
जो सनननननननन थररर कापें मनवा लरझे
झिंगूर बोलत झननन झननन, आली उमड घन.....

पपीहा करत अलाप दादुर देत थाप(?)
छत्रक(?) चकोर जन बाजत सितार
मोर नाचत सुनी पडत शोर
ततछुम ततछुम छुमछननननन
दारादिरदिरदारदारदिर दारादिरदिरदारदारदिर
दारदिरदिरदार तननननननन, आली उमड घन....

आणि पाऊस ओसरल्यानंतर ढगांमागून जे सोनेरी उन्हाचे कवडसे पडतात, त्याचा आनंद घेताना ऐका अभिषेकीबुवांचा सूर मल्हार...ही पण द्रुत त्रितालातली एक अत्यंत सुंदर बंदिश, नादांवरच आधरलेली

घघघत घननन घोरघोर घोरघोर गरजत आये बादरवा छाये
चमकत बिजुरी बरसत मेहा पवन चलत सननननननननन

आयी ऋत बरखा सोच समझ बिन पवन चलत पुरवैय्या
सननननननन सनननननननन, घघघत घननन घोर घोर

http://www.esnips.com/doc/75f55b4a-3cc8-4b81-806b-19b113edf1b9/Sur-Malhar

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

वैद्य's picture

22 Aug 2008 - 11:54 am | वैद्य (not verified)

जियो भटसाहेब !!!

मझा आ गया !

-- वैद्य

मदनबाण's picture

22 Aug 2008 - 9:55 am | मदनबाण

मस्त.. !! :)

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

डोमकावळा's picture

22 Aug 2008 - 10:15 am | डोमकावळा

खरच भटकंतीसाठी खूप छान जागा आहे ती...
तिथला नागफणीचा डोंगर म्हणजे ट्रेक साठी पर्वणीच आहे..
आम्ही मागे गेलो होतो तेव्हा भीमाशंकर पासून अलीकडे ५-७ किमी एक 'ब्ल्यू मॉरमॉन' नावाचं एक रेसॉर्ट आहे..
छान आहे. तिथला एक फोटो इथे देत आहे..

ॐकार's picture

22 Aug 2008 - 11:40 pm | ॐकार

तिथेच उतरलो होतो.... झोपाळ्याचेही फोटो आहेत...




ब्लू मॉरमॉन...

कोलबेर's picture

26 Aug 2008 - 9:38 pm | कोलबेर

मॉर्मन ही भानगड भारतातही आहे? आणि तेही भिमाशंकरला? :O

झकासराव's picture

22 Aug 2008 - 10:27 am | झकासराव

फोटो मस्तच आहेत.
मला विशेष आवडलेले ६, १० आणि त्या वाटाड्या आजोबांच :)
ब्ल्यु मॉर्मन मध्ये जावुन राहय्च आहे.
रात्रीच जंगल अनुभवायच आहे. बघु कस जमेल ते.
पण तिकडे मार्च एप्रिल मध्ये जाण्यात मजा आहे. रात्री पाणी पिण्यास बाहेर पडलेले प्राणी पहायला मिळतील.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

मिंटी's picture

22 Aug 2008 - 11:09 am | मिंटी

सगळेच फोटो मस्त आहेत....................
वाटाड्याचा तर फारच सुरेख..........:)

मनस्वी's picture

22 Aug 2008 - 11:13 am | मनस्वी

ॐकार, सगळेच फोटो छान!
तो ओहोळाचा आणि मातकट पाण्याचा काय मस्त आलाय!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

स्वाती दिनेश's picture

22 Aug 2008 - 12:03 pm | स्वाती दिनेश

सगळेच फोटो मस्त आहेत..मास्तरांचे काळेपांढरे काम तर लै झ्याक!
त्या जुन्या पावसाळी ट्रीपा आठवल्या..
स्वाती

बेसनलाडू's picture

23 Aug 2008 - 6:08 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

सूर्य's picture

23 Aug 2008 - 7:54 am | सूर्य

मस्त चित्रे आहेत.

-सूर्य

वाटाड्या...'s picture

26 Aug 2008 - 10:09 pm | वाटाड्या...

अहाहा...ॐकार शेठ..

लहानपणीच्या आठवणींनी मन आज भरून आलं. भीमाशंकर आणि पायथ्याच्या डिंभे गावात आमचं बालपणं गेलं. वडिलांची बदली डिंभे गावात झालेली..आणि आमचं बालपण तिथेचं गेलं जवळ जवळ ५ वर्ष. ती आमची शाळा, ते खेळायचं मैदान..मनसोक्त डोंगर दर्‍या हुंदडणं ..आणि कधि कधी शाळेची गाडी आली नाही म्हणुन ५ कि.मी. जवळच्या शिनोली गावापासूनच्या आमच्या शाळेपासून तुम्हाला सगळ्यांना वर दिसलेल्या पावसात भिजत घरी 'चालत' येणं..सगळंच रम्य...

आता सालं पाऊस पडायला लागला की पोरं तोंड वाकडी करतात तेव्हा हसावं का रडावं तेच कळत नाही..

पुन्हा एकदा धन्यवाद...

आपलाच..
मुकुल

(आता किशोरीताईंचा मेघ मल्हार ऐकलाच पाहीजे..)

अमेयहसमनीस's picture

29 Aug 2008 - 2:20 pm | अमेयहसमनीस

फोटो खूप छान आले आहेत. >:D<

अमेय

अमेयहसमनीस's picture

29 Aug 2008 - 2:20 pm | अमेयहसमनीस

फोटो खूप छान आले आहेत. >:D<

अमेय