डोंबिवलीला, फूलपाखरांच्या बागेत, मिपा कट्टा करायचा का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
19 Apr 2015 - 10:03 am

नमस्कार मिपाकर मंडळी

फूलपाखरू.. निसर्गाचं ‘पंखधारी रत्न’च जणू. आपल्यासारख्या सर्वसामान्यांना या सुंदर, छोट्याशा जीवांबद्दल माहिती व्हावी आणि त्यांच्याविषयी अभ्यासाला चालना मिळावी, या हेतूने डोंबिवलीच्या रोटरी क्लबने रविवारी, दि. २६ एप्रिल, २०१५, सकाळी ९ ते १२ या वेळात रोटरी उद्यान, पेंढरकर कॉलेजसमोर, डोंबिवली (पू.) या ठिकाणी ‘डोंबिवली फूलपाखरू महोत्सव’ आयोजित केला आहे. ‘पाणीवाले बाबा’ राजेंद्र सिंहजी यांचं बीजभाषण (keynote speech), आयझॅक किहीमकर यांचं दृक-श्राव्य सादरीकरण, चर्चासत्र (panel DISCUSSION – सहभाग असद रहमानी (बी.एन.एच.एस.चे संचालक) आणि इतर मान्यवर तज्ज्ञ), मुलांसाठी विविध स्पर्धा असा भरगच्च कार्यक्रम आहे.

या कार्यक्रमाला जोडूनच एक खादाडी कट्टा पण करायचा का?

आयोजक सुधांशू नुलकर आणि मुवि

खर्च आपापला.

ज्यांनी नक्की यायचे आहे, त्यांनी मला किंवा सुधांशू नुलकर ह्यांना व्य.नि. करावेत ही विनंती.

शिक्षणमौजमजाप्रकटनविचार

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

19 Apr 2015 - 11:29 am | पिवळा डांबिस

डोंबोलीत डासांना फुलपाखरं म्हणायला लागलेत काय हल्ली? :)
(सॉरी, सॉरी! पण आयुष्यातला काही काळ डोंबिवलीत प्रत्यक्ष वास्तव्य झालेले असल्याने हा विनोद करायचा मोह आवरला नाही!!! तरी कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा!!)

टवाळ कार्टा's picture

19 Apr 2015 - 11:34 am | टवाळ कार्टा

=))

शैलेन्द्र's picture

19 Apr 2015 - 3:04 pm | शैलेन्द्र

लैच भारी..

(कट्टर डोंबिवलीकर)

चुकलामाकला's picture

19 Apr 2015 - 11:56 am | चुकलामाकला

फुल्पाख्रे डोंबिवलीत नस्त्यात कै, ती पश्चिम रेषेवर अस्त्यात .किंवा दादरहून फुडं!

टवाळ कार्टा's picture

19 Apr 2015 - 12:05 pm | टवाळ कार्टा

ती सगळीकडेच अस्तात ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Apr 2015 - 8:18 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

फुलपाखरं असतात. पण नजर शोधक हवी ;)

चुकलामाकला's picture

19 Apr 2015 - 12:19 pm | चुकलामाकला

रस्त्यात असत्यात, बागेत असत्यात
बशीत असत्यात, रिक्शीत असत्यात
लेडीज डब्ब्यात तर झुंडीने असत्यात .
बँकेत असत्यात , हाफिसात असत्यात
शाळेत असत्यात , कालेजात असत्यात
तर कधी कुणाच्या कलेज्यात असत्यात.
फुल्पाख्रे सगळीकडेच असत्यात
फकस्त नजर पायजे , जिगर पायजे
मग फुल्पाख्रे सगळीकडेच दिसत्यात

शैलेन्द्र's picture

19 Apr 2015 - 3:05 pm | शैलेन्द्र

मस्त हाणलायेस गड्या..

भाते's picture

19 Apr 2015 - 8:10 pm | भाते

रविवारी किती वाजता (साडे आठ, पावणे नऊ) आणि कुठे (रोटरी उद्यान, पेंढरकर कॉलेज) यायचे ते फक्त कळवा. या कट्टयाला हजेरी लावायला नक्की आवडेल.

मुवि / नुलकर काका,
शनिवारी गरज लागल्यास आधी अवश्य कळवा. मदत करायला नक्की हजर होईन.

मी आणि विनोद, त्या वेळी तिथे नक्कीच आहोत.