खग्रास सूर्यग्रहण

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
20 Mar 2015 - 8:53 pm

आज (२० मार्च २०१५) खग्रास सूर्यग्रहण झाले.

जगात अनेक ठिकाणी या घटनेला बरेच बरेवाईट (जास्त करून वाईट) संदर्भ असले तरी शास्त्रज्ञांच्या दृष्टीने ही एक दुर्मिळ पर्वणी असते. खंडग्रास सूर्यग्रहणाच्या मानाने खग्रास सूर्यग्रहण कमी वेळा होते. या प्रकारात चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकत असल्याने खंडग्रास सूर्यग्रहणात शक्य नसलेले अनेक शास्त्रीय प्रयोग या काही मिनिटांच्या काळात आटपण्यासाठी त्यांची लगबग चाललेली असते. त्याशिवाय, सूर्याचे अनेक अवस्थेतली प्रकाशचित्रे काढण्यासाठी त्या विषयातल्या तज्ज्ञ आणि हौशी लोकांनाही ही पर्वणीच वाटते. म्हणून हे सर्व लोक, ती काही मिनिटे पकडण्यासाठी, अनेक महिन्यांचे व्यवस्थापन करून, अनेक सहस्र किलोमीटरचा प्रवास करून, योग्य जागा पकडून, तळ ठोकून बसलेले असतात.

आजच्या ग्रहणाचे एक विशेष म्हणजे आजचा चंद्र "महाचंद्र (सुपरमून)" होता. चंद्र त्याच्या कक्षेत फिरताना जेव्हा पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो तेव्हा अर्थातच आकाशात दिसणार्‍या त्याचा आकार मोठा असतो. अशी अवस्था पौर्णिमा अथवा अमावास्येला आली तर तिला महाचंद्रावस्था म्हणतात. अर्थातच, अमावास्येचा महाचंद्र (त्याच्या मोठ्या दृश्य आकारामुळे) सूर्याला जास्तीत जास्त झाकतो. अश्या अवस्थेचे महत्त्व शास्त्रज्ञ आणि हौशी लोकांना फार असले तर नवल काय ?

आजचे सूर्यग्रहण उत्तर धृवाच्या जवळील ६४.४उत्तर ६.६पश्चिम या स्थलाच्या भोवतीच्या ४६३ किमीच्या चिंचोळ्या पट्टीत खग्रास स्वरूपात २ मिनिटे आणि ४६.४७ सेकंदासाठी दिसले. त्याची सर्वोच्च अवस्था ०९:४६:४७ (UTC) वाजता होती.

हे ग्रहण खग्रास अवस्थेत उत्तर अटलांटिक समुद्र, आर्क्टिक समुद्र, ग्रीनलंड, आईसलँड, आयर्लंड, युके, फॅरो बेटे, उत्तर नॉर्वे आणि मुरमान्स्क ओब्लस्ट येथे दिसले. उत्तर-पश्चिम आफ्रिकेच्या आणि युरोपच्या विशाल भूभागावर ते लहान-मोठ्या खंडग्रास स्वरूपात दिसले.

ग्रहण पृथ्वीवर कोणत्या भूभागात कसे दिसले हे दाखवणारे मानचित्र (जालावरून साभार)...

आणि तेच दाखविणारे हे दाखवणारे चलत्मानचित्र (जालावरून साभार)...

.

अश्या या निसर्गाच्या अप्रुपाची काही तज्ज्ञ, हौशे, नवशे आणि गवश्यांनी काढलेली काही प्रकाशचित्रे (जालावरून साभार)...


बर्लिनमध्ये दिसलेल्या सूर्याच्या (चंद्राप्रमाणे दिसणार्‍या) कला

.


खग्रास सूर्यग्रहणाची परमोच्च अवस्था (स्लावबार्ड)

.


खग्रास सूर्यग्रहणाची परमोच्च अवस्था संपून ते सुटायला लागल्यावर दिसणारी "हिर्‍याची अंगठी" (स्लावबार्ड)

.


बर्फाच्छादित भूमी आणि पर्वतशिखरांच्या पार्श्वभूमीवर "दिवसा झालेली रात्र" (स्लावबार्ड)

.


सूर्याची कोर (उत्तर इंग्लंड)

.


ग्रहणाचे कलात्मक प्रकाशचित्र : १

.


ग्रहणाचे कलात्मक प्रकाशचित्र : २

.

या बी बी सी च्या संस्थळाच्या दुव्यावर विमानउड्डाण चालू असताना पाहिलेले खग्रास ग्रहण, फॅरो बेटावर पाहिलेले खग्रास ग्रहण आणि बेलफास्ट (उत्तर आयर्लंड) मध्ये पाहिलेले खंडग्रास ग्रहण, असे तीन मस्त लघूचलत्चित्रपट आहेत.

भूगोलविज्ञानमौजमजाछायाचित्रणबातमीसंदर्भ

प्रतिक्रिया

यसवायजी's picture

20 Mar 2015 - 9:11 pm | यसवायजी

छान माहिती.
कलात्मक फोटो तर जहबरी

अत्रुप्त आत्मा's picture

20 Mar 2015 - 9:42 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

मंदार कात्रे's picture

20 Mar 2015 - 9:12 pm | मंदार कात्रे

उत्तम फोटो !
आभार्स

सूड's picture

20 Mar 2015 - 9:19 pm | सूड

छान माहिती!

विकास's picture

20 Mar 2015 - 9:23 pm | विकास

महाचंद्र संदर्भातील माहिती आवडली!

सानिकास्वप्निल's picture

20 Mar 2015 - 9:26 pm | सानिकास्वप्निल

छान माहिती :)

आजच्या ग्रहणाचा काढलेला हा फोटो .

.

मधुरा देशपांडे's picture

20 Mar 2015 - 9:33 pm | मधुरा देशपांडे

माहितीपुर्ण लेख. आवडला.

कंजूस's picture

20 Mar 2015 - 9:50 pm | कंजूस

मिपाकर सानिकास्वप्निल फोटोसाठी +१.
१५ जानेवारी २०१० ला कन्याकुमारी येथून कंकणाकृती पाहायला गेलो होतो. त्यानिमित्ताने केरळवारी झाली होती. फोटो काढले नव्हते म्हणून पेपरातील कात्रणे ठेवली आहेत. -एक आठवण.
इ॰एक्का धन्यवाद.

मस्त लेख ! आवडला नेहेमीसारखाच. फोटो तर एक नंबर आलेत. आमच्याकडे दिसलं नाही हे ग्रहण :(

मी लाईव फीड बघत होते बराच वेळ पण झोप लागून गेली.

अर्धवटराव's picture

20 Mar 2015 - 10:14 pm | अर्धवटराव

:)

म्हणून हे सर्व लोक, ती काही मिनिटे पकडण्यासाठी, अनेक महिन्यांचे व्यवस्थापन करून, अनेक सहस्र किलोमीटरचा प्रवास करून, योग्य जागा पकडून, तळ ठोकून बसलेले असतात.

प्रकाश-वक्रीभवनाचा सिद्धांत तपासायला तत्कालीन शास्त्रज्ञांनी काय काय दिव्य केले याबद्द्ल एक धागा मिपावरच आला होता का? आता आठवत नाहि... पण लय भारी प्रकरण होतं ते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Mar 2015 - 11:44 am | डॉ सुहास म्हात्रे

२०१० साली झालेले खग्रास सूर्यग्रहण पहायला हे लोक अंटार्क्टिकावर दक्षिण धृवावर जाऊन बसले होते !

स्वाती दिनेश's picture

20 Mar 2015 - 10:18 pm | स्वाती दिनेश

फोटो मस्त.. सानिका, तू काढलेला फोटो पण सुरेख! सूर्यकोर आवडली, :)
आमच्या कडे इतकं ढगाळं वातावरण होतं आज,त्यामुळे... :(
स्वाती

प्रचेतस's picture

20 Mar 2015 - 11:53 pm | प्रचेतस

मस्त लेख.
आतापर्यंत ८५% सूर्य ग्रस्त झाल्याचे पाहिले आहे. पण कंकणाकृती अथवा सम्पूर्ण कधीही नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Mar 2015 - 12:18 am | डॉ सुहास म्हात्रे

चंद्र पृथ्वीपासून दूर असताना (महाचंद्र अवस्थेच्या विरुद्ध) त्याचा दृश्य आकार लहान असतो आणि तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही म्हणून कंकणाकृती सूर्यग्रहण होते. कंकणाकृती आणि खग्रास ग्रहणासाठी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकदम सरळ रेषेत यावे लागतात. हे होणे विरळ असल्याने या दोन प्रकारची ग्रहणे विरळ असतात.

श्रीरंग_जोशी's picture

21 Mar 2015 - 12:24 am | श्रीरंग_जोशी

उत्तम माहिती व फोटो.

यावरून ऑक्टोबर १९९५ मध्ये जे खंडग्रास सुर्यग्रहण भारतात झाले होते त्याबद्दल शाळा शाळांमधून केलेली जागॄती आठवली.

माझ्या पोरीला शाळेत दाखवले, ती फार खुश झाली

जुइ's picture

21 Mar 2015 - 1:43 am | जुइ

फोटोही झकास आहेत एकदम.

कौलारू आणि शाकारलेली घरं असतात त्यात वरच्या बारीक छिद्रांतून सूर्यकिरणे खाली येऊन आत गोल गोल कवडसे सकाळी दहा ते दोन वाजेपर्यँत पडतात. ग्रहणात सूर्याची कोर झाल्यास आणि याच मध्यान्ही असल्यास कवडसे गोल न पडता कोरीचेच दिसतात असा एक छान फोटो त्यावेळी (१६जाने २०१० इंडिअन एक्सप्रेस) ति॰पुरमच्या पेपरात आलेला जपून ठेवला आहे. (कॉपिराइटमुळे टाकत नाही).

त्यावेळी संक्रांतीनिमित्त सांस्कृतिक मेळावा कोळ्हीकोड येथे होता आणि आदिवासींची झोपडी बनवून त्यात मातीने सारवलेल्या जमिनिवर एक परकरातील मुलगी रांगोळी घालत असतानाच तिच्या अंगावर, भिंतिँवर, खाली असंख्य कोरकवडसे पडले होते.

स्वाती दिनेश's picture

22 Mar 2015 - 9:13 pm | स्वाती दिनेश

कंजूस राव, माहिती फार छान आहे. आवडली आणि ते दृश्य डोळ्यासमोर आले.
स्वाती

माहिती आवडली आणि सानिकाची हसरी सूर्यकोरही!

पॉइंट ब्लँक's picture

22 Mar 2015 - 9:59 pm | पॉइंट ब्लँक

झकास फोटू आणि माहिती.