मी,मिपा आणी कोकणी धसका...

जेपी's picture
जेपी in जनातलं, मनातलं
11 Jan 2015 - 10:31 am

(सुचना - सदरिल लेखातील घटना दिं.११/०२/२०१४ रोजी घडलेली आहे. हा लेखही त्याच सुमारास लिहीला होता. प्रकाशित करण्यास विलंब झाला.घडलेली घटना काहिशी गंभीर होती पण मजा आली.)

बरेच दिवस झालते शेतात जाऊन..ऊस तोडणी चालु असल्याच माहित होत.,पण ठेकेदार ओळखिचा अस्ल्यामुळे फारशी काळजी नव्हती..एके दिवशी सांच्याला रानात चक्कर टाकण्यासाठी गेलो.गाडी लावली,भागीण कुठे दिसला नाही.पण जे पाहील त्यांने डोकच सटकल.
१० दिवसापासुन ऊस तोड चालु होती,पण अजुन निम्म रान पण संपल नव्ह्त..आधिच अवकाळी पावसाने ऊसाच नुकसान
झालत..त्यामुळे राहीलेला ऊस लवकरात लवकर कारखान्याला घालुन मोकळ व्ह्यायच होत..पण सगळाच गोंधळ होता.
शिल्लक ऊस पाहुन तिथे असलेल्या ऊस तोड कामगारांची हजेरी घ्यायचा विचार होता.
यामुळे त्यांच्याकडे मोर्चा वळवला तर सारे काम थांबवुन स्वदेशी चा जागर करत बसले होते.त्यातल्या त्यात एकाला पकडुन
विचारल, तर त्यांने चक्क कन्नड मध्ये बोलायला चालु केल..आता मला कन्नड कळत नाय हे त्याला मराठीत सांगायचा
प्रयत्न केला तर त्यांने मला फाट्यावरच मारल..मराठी माणसावर असा अन्याय..चिडुन राज सायबाला फोन लावायचा विचार केला..पण ते सध्या टोल प्रश्नात व्यस्त होते,आणी आमचा प्रश्न होता ऊसाचा..साहजीकच आमचा स्वाभिमान जागृत झाला..आणी आमी या सगळ्यासाठी जबाबदार असलेल्या विकासला फोन लावला( विकास्=मामाचा मुलगा+ऊस तोड टोळीचा मालक+ माझा समवयीन).फोनवर यथेच्छ ख्याली खुशालीची देवाण-घेवाण झाल्यावर..त्यांने थोड्याच वेळात येण्याच आश्वासन दिल.
तोपर्यंत मी मोबाईल वरुन हॉटेलात येऊन बसलो..अचानक मोजींच "गावातल भुत" आठवल.त्यावर बॅट्या आणी यसवायजीने
बराच कन्नडी दंगा केलता,बॅट्यातर माझ्या एका धाग्यावर 'भाळछंद' म्हणुन गेलता..त्या सगळ्या कन्नडचा अर्थ या कामगारांना विचारावा का ? असा विचार डोक्यात चमकुन गेला..पण त्यांच्याकडचे दिडफुट लांबिचे कोयते पाहुन तो नाद सोडला आणी गपचुप वाचत बसलो.
थोड्याच वेळात विकास आला आणी त्याच्यासोबत बोलने सुरु झाले..तेवढ्यात जोरदार कानडी कल्ला चालु झाला.
काय झाल हे पहाव म्हणुन गेलो तर एक जण पाय पकडुन बोंबलत होता..बाकीचे त्याच्या भोवती जमुन मजा घेत होते.
एकाला काय झाल अस इशारा करुन विचारल तर त्यांने 'बाबाजी का ठुल्लु' करुन दाखवला. समजुन गेलो की काय तर सापाची भानगड आहे.बारकाईने पाहील्यावर एक फुरस कोयत्या खाली मरुन पडल होत.त्यांने मरायच्या आधी एका कामगाराला हिसका दाखवला होता.
क्षणभर गोंधळुन गेलो की नेमक काय कराव,हा कामगार ईथे मेला तर गळ्याला फास होता..विचार करतच होतो की
अचानक ...
.
.
.
दिमाग की बत्ती जल गयी..फुरस मंजे..कोकणी धसका... मिपावर जॅक डॅनियल यांची सापाबद्दल लेखमाला चालुच होती की.
भराभर सगळी सुत्रे हातात घेतली,त्या कामगाराचा पाय पाहिला..खरचटल्यासारख दिसत होत..नेमक विष अंगात गेलय का?
हे कळायला मार्ग नव्हता..सोबत असलेल्या विकासला काय करायला पायजे हे थोडक्या शब्दात समजावुन सांगितल.
गाडी काढली..त्या कामागाराला मध्ये बसवला, त्याच्या मागे विकास बसला.आणी निघालो..
गाडीच्या चाकासोबतच डोक्यातल चाक फिरत होत..शेतापासुन गावातल प्राथमीक आरोग्य केंद्र १.५ किमी..पण तिथे मदत
मिळायची शक्यता कमी होती..पुढे रेणापुर..६ किमी..जर तिथे मदत नाही मिळाली तर लातुर..१४ किमी..टोटल २२ किमीचा
प्रवास..अंधार पडत होता..गाडीचा कान शक्य होईल तेवढा पिळला..मागे बसलेला विकास फोनवर ईतरांना झाल्या
प्रकाराची माहीती देत होता.गरज पडल्यास आणखीन कुमक हवी होती.
अपेक्षेप्रमाणे गावात आणी तालुक्यात मदत मिळाली नाही..लातुरात पोहचताच ट्रिपल सिट मुळे ट्रफिक वाल्याला चुकवत..
गल्ली बोळातुन रस्ता काढत..सिव्हील गाठल..आता त्या कानडी कामागाराच मराठी प्रेम जागृत झाल..त्याला आलेल
मराठी प्रेमाच भरत पाहून मि पण त्याच्या सात पिढ्याचा उद्धार करायला चालु केला.
आम्हाला पाहुन आधिच तिथे आलेल्या ताज्या रसदेने त्या कामगाराचा ताबा घेतला.मी आता उगाच तकतक करण्यापेक्षा
शांत राहणे पंसद केले..
तिकडे रानात एक जिव मरुन पडला होता पण दुसरा वाचवण्यात यश आलत.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हे सगळ घडत असताना लक्षात आल की जर मी मिपावर नसतो तर हे सगळ करण शक्य होत का.?.कदाचीत नाही.
मी साप भरपुर पाहीलेत.नाग,धांमण,येरुळा,फुरस ओळखु शकतो..पण कधि यापलीकडे संबध आला नाही.
ईथे थेट सर्पदंशा चा मामला होता.
जॅक डॅनीयल यांचे लेख,त्यावर डॉ.सुबोध खरे यांचे वेद्यकीय प्रतिसाद..इतर मिपाकरांनी प्रतिसादातुन टाकलेली मोलाची भर यातुन बरच काही शिकता आल..आणी योग्य वेळी..योग्य ठिकाणी वापरता आल.
हि घटना घडत असताना एकदा खरडफळ्यावर येऊन आंनद व्यक्त केलता..त्यावेळेस आदुबाळ..शिद..आणी काही
मिपाकरांनी हा लेख लिहायला भाग पाडल..
या लेखा निमित्त मिसळपावचे ..आणी सर्व मिपाकरांचे आभार आणी अभिनंदन !!!!!!
-----------------------------------------------------------------------------------------

मुक्तकशुभेच्छाअभिनंदन

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jan 2015 - 11:18 am | डॉ सुहास म्हात्रे

बघा, गमतीगमतीत एखाद्याला जीवदान देणारे ज्ञानही मिळते ते असे ! धन्यवाद, हा तुमचा अनुभव आमच्याशी वाटून घेतल्याबद्दल.

माहितीचा समयोचित उपयोग. छान.

क्या बात है! हॅट्स ऑफ टू यू, जेडी आणि मिपा!

साती's picture

11 Jan 2015 - 11:23 am | साती

हे पण 'भाळ छंद' आहे.
मिपाचा भारी उपयोग झाला.
शाब्बास!

शिद's picture

11 Jan 2015 - 11:34 am | शिद

तुम्ही दाखवलेल्या प्रसंगावधानामूळे एका माणसाचे प्राण वाचवल्याबद्दल तुमचं खरंच कौतुक.
मिपा म्हणजेच जेडी ह्यांच्या लेखाचा फार चांगला उपयोग करून घेतला तुम्ही. :)

हि घटना घडत असताना एकदा खरडफळ्यावर येऊन आंनद व्यक्त केलता..त्यावेळेस आदुबाळ..शिद..आणी काही मिपाकरांनी हा लेख लिहायला भाग पाडल..

धन्यवाद.

आदूबाळ's picture

11 Jan 2015 - 12:35 pm | आदूबाळ

+१ असंच म्हणतो.

जेपीभाव - लेख आवडला.

यानिमित्ताने जेडीलाही आठवण/चिमटा. लिहीत जा बाबा.

नाखु's picture

12 Jan 2015 - 8:55 am | नाखु

यानिमित्ताने आदू+जेडीलाही आठवण/चिमटा. लिहीत जा बाबांनो.

पैसा's picture

11 Jan 2015 - 2:45 pm | पैसा

चांगलं प्रसंगावधान दाखवलंस! आपल्या नकळत अशी बरीच माहिती मिपावरून डोक्यात गोळा होत असते! लौ यू मिपा!

तुषार काळभोर's picture

11 Jan 2015 - 3:56 pm | तुषार काळभोर

आयला मीपण लौ यु मिपा!!
(संपादकांचं लौ, लौ.. आमचं लौ ....??)

कंजूस's picture

11 Jan 2015 - 3:13 pm | कंजूस

चला जीव भांड्यात पडला.

विवेकपटाईत's picture

11 Jan 2015 - 3:36 pm | विवेकपटाईत

एक जीव वाचविला, त्या साठी मन:पूर्वक धन्यवाद. बाकी 'वाचाल तर वाचाल' सत्यच आहे.

बोका-ए-आझम's picture

11 Jan 2015 - 3:56 pm | बोका-ए-आझम

एक जीव वाचवण्याच्या समाधानापुढे बाकी सगळं क्षुल्लक आहे.

काळा पहाड's picture

11 Jan 2015 - 4:15 pm | काळा पहाड

पण नक्की काय शिकला तुम्ही मिपामुळे? कारण तुम्ही कामगाराला डायरेक्ट हॉस्पिटल मधे घेवून गेलात. बाकी ठिकाणी हेच करत नाहीत का?

जेपी's picture

11 Jan 2015 - 4:36 pm | जेपी

थांबा.
मागे खफ वर एक सर्पमित्राची लिंक दिलती.
ती शोधतो आणी देतो.
नेमक काय शिकलो ते कळेल.
अवांतर-मी मागे खफवर लातुरातील स्वंयघोषित सर्पमित्राची लिंक दिलती.कुणाला सापडल्यास इथे द्यावी.

सुबोध खरे's picture

11 Jan 2015 - 8:34 pm | सुबोध खरे

@काळा पहाड
साप म्हणू नये धाकला.
कोणताही साप चावला तर पहिल्यांदा जवळचे सरकारी रुग्णालय गाठायचे आणि मग पहायचे कि साप खरंच विषारी होता का?
दहा खेपा फुकट गेल्या तरी चालतील अकराव्या खेपेला एक जीव तर वाचेल.
बहुतांशी हा जीव त्या घरातील कमावता/ महत्त्वाचा जीव असतो

काळा पहाड's picture

11 Jan 2015 - 8:47 pm | काळा पहाड

खरेजी, धन्यवाद. मीही लक्षात ठेवीन.

टवाळ कार्टा's picture

11 Jan 2015 - 9:25 pm | टवाळ कार्टा

मला पण हेच माहिती आहे...जेप्याला यात मिपा कुठे दिसले देव जाणे :)

जेपी's picture

11 Jan 2015 - 9:55 pm | जेपी

लेख नीट बाच ना बे...
*beee*
.
आधी सापाबद्दल फारशी शास्त्रोक्त माहिती नव्हती मला.
आमच्या गावाकड साप,विंचु चावला तर आधी भगताकड नेऊन मंत्र मारतात.

टवाळ कार्टा's picture

11 Jan 2015 - 10:02 pm | टवाळ कार्टा

आधी सापाबद्दल फारशी शास्त्रोक्त माहिती नव्हती मला.
आमच्या गावाकड साप,विंचु चावला तर आधी भगताकड नेऊन मंत्र मारतात.

अच्छा...मग ठिकाय

मुक्त विहारि's picture

11 Jan 2015 - 4:51 pm | मुक्त विहारि

मिपा तेथे काय उणे?

मिपावर पडिक असण्याचे फायदे असा धागाच काढायला हवा!!
एकाचा जीव वाचवण्यासाठी, तिसर्याचा लेख वाचुन मिळालेल्या प्रॆरणेने, दुसर्याने धावपळ केली!मिपा आणि मिपाकर्स _/\_

जीवदान देण्याच्या प्रयत्ना बद्धल दिल से अभिनंदन ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Beatbox brilliance | Tom Thum | TEDxSydney

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jan 2015 - 12:21 am | अत्रुप्त आत्मा

+++++१११११

लेखातून मिपाचा आणि जेपीचा नवा पैलू समजला..भावला *smile*

जॅक डनियल्स's picture

12 Jan 2015 - 12:25 am | जॅक डनियल्स

मस्त जेपी भाऊ. तुम्ही ही बातमी मागे व्यनी करून कळवली होती, तेंव्हाच भारी वाटले होते.
मी लिहिलेली माहिती सगळ्या नेटवर उबलब्ध आहे पण ती मिपामुळे आपल्या पर्यंत सोप्या शब्दात पोहचली.
"खरचटल्यासारख दिसत होत..नेमक विष अंगात गेलय का?" फुरस्याचे दात खुप छोटे असल्याने खूप वेळा हे समजत नाही आणि तो डिस्कवरी वरती दाखवतात तसा फोटोजेनिक पण चावत नाही. वरती डॉ. लिहिल्याप्रमाणे, सर्पदंश झाल्याझाल्या सरकारी इस्पितळ हाच एकमेव उपाय आहे.
धन्यवाद !

स्पंदना's picture

12 Jan 2015 - 7:06 am | स्पंदना

भारीच!!
इतका गंभीर प्रसंग, पण सांगायची इश्टाइल आवडली आहे जेपी भौ!!
तरीबी मी काय म्हणते...शेताकडे लय दिवस न जाऊन कस चाललं? रोजच्याला एक फेरी मारायचीच, अश्यान नुसता बांध पलिकडे टाकत शेत बळकावेल कुणीतरी, आनी समजायच पण नाही तुम्हाला.

श्रीरंग_जोशी's picture

12 Jan 2015 - 9:27 am | श्रीरंग_जोशी

मिपावरून मिळालेल्या ज्ञानाचा प्रसंगावधान दाखवून मोलाचा वापर केल्याबद्दल अभिनंदन.

खुसखुशीत लेखनशैली आवडली.

हि बातमी वाचा..फार जुनी नाही..या बातमी मुळेच मी हा जुना लेख टाकला.ग्रामीण भागात अजुन सापाबद्दल
किती निष्काळजी पणा आहे त्याचे एक उदाहरण..बातमी वाईट आहे..पण सांगणे जरुरी आहे.
लातुरात एका सर्पमित्राचा मृत्यु
या बातमीतिल मुला विषयी पुन्हा कधितरी.

वरच्या बातमीची लिंक गंडली आहे.लिंक पुन्हा देत आहे.
http://www.lokmat.com/storypage.php?catid=314&newsid=3813643

मराठी_माणूस's picture

13 Jan 2015 - 3:47 pm | मराठी_माणूस

रुग्णालयात दाखल करुन पण मृत्यु का झाला ?

उत्तम काम केलेत. प्रसंगावधान दाखवून तातडीने आवश्यक पाऊल उचललेत. तसे केले नसतेत तर कदाचित तो मनुष्य झाडपाला जखमेवर चोळत अथवा कसलातरी उतारा वगैरे तिथे बांधून वाट बघत बसला असता आणि जीव वाचवण्याचा वेळ आणखी कमी झाला असता.

हातून झालेल्या अश्या निस्वार्थी मदतींची तुम्हाला भविष्यात नेहमीच धन्यता वाटत राहील.

प्रचेतस's picture

12 Jan 2015 - 11:25 am | प्रचेतस

मस्तच रे जेप्या.

बॅटमॅन's picture

12 Jan 2015 - 1:16 pm | बॅटमॅन

वाह!!!!! हॅट्स ऑफ!!!

मी-सौरभ's picture

12 Jan 2015 - 6:41 pm | मी-सौरभ

लय भारी काम केलंत पाटील

सविता००१'s picture

13 Jan 2015 - 11:51 am | सविता००१

काम केलंय तुम्ही.. बेस्ट.

चिगो's picture

13 Jan 2015 - 2:08 pm | चिगो

चांगलं काम केलंत, जेपी.. आणि मिपा नुसतं दंगा-मस्तीचं ठिकाण नसून इथे मिळालेल्या माहितीमुळे कुणाचातरी जीवपण वाचू शकतो, हे पण खासच..

रेवती's picture

13 Jan 2015 - 2:51 pm | रेवती

छान हो जेपी.

यसवायजी's picture

13 Jan 2015 - 8:02 pm | यसवायजी

पण दुसरा वाचवण्यात यश आलत. >> वाह!! तुंबा झ्याक काम केलंस बघ.

बाकी, पायाला घट्ट करकच्चून दोरी वगैरे बांधावी (म्हणजे विष भिनत नाही) आणी थोडी जखम करुन रक्तही वाहू द्यावं असं ऐकलंय. (जा.प्र.टाकावा)