मी,मिपा आणी कोकणी धसका...
(सुचना - सदरिल लेखातील घटना दिं.११/०२/२०१४ रोजी घडलेली आहे. हा लेखही त्याच सुमारास लिहीला होता. प्रकाशित करण्यास विलंब झाला.घडलेली घटना काहिशी गंभीर होती पण मजा आली.)
बरेच दिवस झालते शेतात जाऊन..ऊस तोडणी चालु असल्याच माहित होत.,पण ठेकेदार ओळखिचा अस्ल्यामुळे फारशी काळजी नव्हती..एके दिवशी सांच्याला रानात चक्कर टाकण्यासाठी गेलो.गाडी लावली,भागीण कुठे दिसला नाही.पण जे पाहील त्यांने डोकच सटकल.
१० दिवसापासुन ऊस तोड चालु होती,पण अजुन निम्म रान पण संपल नव्ह्त..आधिच अवकाळी पावसाने ऊसाच नुकसान
झालत..त्यामुळे राहीलेला ऊस लवकरात लवकर कारखान्याला घालुन मोकळ व्ह्यायच होत..पण सगळाच गोंधळ होता.
शिल्लक ऊस पाहुन तिथे असलेल्या ऊस तोड कामगारांची हजेरी घ्यायचा विचार होता.
यामुळे त्यांच्याकडे मोर्चा वळवला तर सारे काम थांबवुन स्वदेशी चा जागर करत बसले होते.त्यातल्या त्यात एकाला पकडुन
विचारल, तर त्यांने चक्क कन्नड मध्ये बोलायला चालु केल..आता मला कन्नड कळत नाय हे त्याला मराठीत सांगायचा
प्रयत्न केला तर त्यांने मला फाट्यावरच मारल..मराठी माणसावर असा अन्याय..चिडुन राज सायबाला फोन लावायचा विचार केला..पण ते सध्या टोल प्रश्नात व्यस्त होते,आणी आमचा प्रश्न होता ऊसाचा..साहजीकच आमचा स्वाभिमान जागृत झाला..आणी आमी या सगळ्यासाठी जबाबदार असलेल्या विकासला फोन लावला( विकास्=मामाचा मुलगा+ऊस तोड टोळीचा मालक+ माझा समवयीन).फोनवर यथेच्छ ख्याली खुशालीची देवाण-घेवाण झाल्यावर..त्यांने थोड्याच वेळात येण्याच आश्वासन दिल.
तोपर्यंत मी मोबाईल वरुन हॉटेलात येऊन बसलो..अचानक मोजींच "गावातल भुत" आठवल.त्यावर बॅट्या आणी यसवायजीने
बराच कन्नडी दंगा केलता,बॅट्यातर माझ्या एका धाग्यावर 'भाळछंद' म्हणुन गेलता..त्या सगळ्या कन्नडचा अर्थ या कामगारांना विचारावा का ? असा विचार डोक्यात चमकुन गेला..पण त्यांच्याकडचे दिडफुट लांबिचे कोयते पाहुन तो नाद सोडला आणी गपचुप वाचत बसलो.
थोड्याच वेळात विकास आला आणी त्याच्यासोबत बोलने सुरु झाले..तेवढ्यात जोरदार कानडी कल्ला चालु झाला.
काय झाल हे पहाव म्हणुन गेलो तर एक जण पाय पकडुन बोंबलत होता..बाकीचे त्याच्या भोवती जमुन मजा घेत होते.
एकाला काय झाल अस इशारा करुन विचारल तर त्यांने 'बाबाजी का ठुल्लु' करुन दाखवला. समजुन गेलो की काय तर सापाची भानगड आहे.बारकाईने पाहील्यावर एक फुरस कोयत्या खाली मरुन पडल होत.त्यांने मरायच्या आधी एका कामगाराला हिसका दाखवला होता.
क्षणभर गोंधळुन गेलो की नेमक काय कराव,हा कामगार ईथे मेला तर गळ्याला फास होता..विचार करतच होतो की
अचानक ...
.
.
.
दिमाग की बत्ती जल गयी..फुरस मंजे..कोकणी धसका... मिपावर जॅक डॅनियल यांची सापाबद्दल लेखमाला चालुच होती की.
भराभर सगळी सुत्रे हातात घेतली,त्या कामगाराचा पाय पाहिला..खरचटल्यासारख दिसत होत..नेमक विष अंगात गेलय का?
हे कळायला मार्ग नव्हता..सोबत असलेल्या विकासला काय करायला पायजे हे थोडक्या शब्दात समजावुन सांगितल.
गाडी काढली..त्या कामागाराला मध्ये बसवला, त्याच्या मागे विकास बसला.आणी निघालो..
गाडीच्या चाकासोबतच डोक्यातल चाक फिरत होत..शेतापासुन गावातल प्राथमीक आरोग्य केंद्र १.५ किमी..पण तिथे मदत
मिळायची शक्यता कमी होती..पुढे रेणापुर..६ किमी..जर तिथे मदत नाही मिळाली तर लातुर..१४ किमी..टोटल २२ किमीचा
प्रवास..अंधार पडत होता..गाडीचा कान शक्य होईल तेवढा पिळला..मागे बसलेला विकास फोनवर ईतरांना झाल्या
प्रकाराची माहीती देत होता.गरज पडल्यास आणखीन कुमक हवी होती.
अपेक्षेप्रमाणे गावात आणी तालुक्यात मदत मिळाली नाही..लातुरात पोहचताच ट्रिपल सिट मुळे ट्रफिक वाल्याला चुकवत..
गल्ली बोळातुन रस्ता काढत..सिव्हील गाठल..आता त्या कानडी कामागाराच मराठी प्रेम जागृत झाल..त्याला आलेल
मराठी प्रेमाच भरत पाहून मि पण त्याच्या सात पिढ्याचा उद्धार करायला चालु केला.
आम्हाला पाहुन आधिच तिथे आलेल्या ताज्या रसदेने त्या कामगाराचा ताबा घेतला.मी आता उगाच तकतक करण्यापेक्षा
शांत राहणे पंसद केले..
तिकडे रानात एक जिव मरुन पडला होता पण दुसरा वाचवण्यात यश आलत.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हे सगळ घडत असताना लक्षात आल की जर मी मिपावर नसतो तर हे सगळ करण शक्य होत का.?.कदाचीत नाही.
मी साप भरपुर पाहीलेत.नाग,धांमण,येरुळा,फुरस ओळखु शकतो..पण कधि यापलीकडे संबध आला नाही.
ईथे थेट सर्पदंशा चा मामला होता.
जॅक डॅनीयल यांचे लेख,त्यावर डॉ.सुबोध खरे यांचे वेद्यकीय प्रतिसाद..इतर मिपाकरांनी प्रतिसादातुन टाकलेली मोलाची भर यातुन बरच काही शिकता आल..आणी योग्य वेळी..योग्य ठिकाणी वापरता आल.
हि घटना घडत असताना एकदा खरडफळ्यावर येऊन आंनद व्यक्त केलता..त्यावेळेस आदुबाळ..शिद..आणी काही
मिपाकरांनी हा लेख लिहायला भाग पाडल..
या लेखा निमित्त मिसळपावचे ..आणी सर्व मिपाकरांचे आभार आणी अभिनंदन !!!!!!
-----------------------------------------------------------------------------------------
वाचन
13854
प्रतिक्रिया
0