गुढ (एक रहस्य कथा-भाग 3)

चेतन677's picture
चेतन677 in जनातलं, मनातलं
26 Nov 2014 - 1:45 pm

आता शिवमदेखिल स्वरासोबत त्यांच्या टीम मधला एक मेंबर होता.
" मस्त हॉट आहे ना स्वरांजली...." या आवाजाकडे शिवमचे लक्ष गेले.
"Excuse me???" शिवम.
तोच समोरुन एक तरुण त्याच्याकडे येत होता.त्याचे डोळे लाल झाले होते.बहुतेक तो रोज निदान एकतरी बियर घेत असेल यात अजिबात शंका नव्ह्ती.आणि कदाचित कालची त्याची अजुन उतरली नव्हती.
"प्लीज तुम्ही जरा नीट बोला.." शिवम जरा मोठ्यानेच म्हणाला.
तोच एक तरुणी शिवमच्या कानात कुजबुजली.
"तो संदीप आहे.आपला टीम लीडर...जरा सांभाळुन नाहीतर बॉस कडे तक्रार करेल तो तुझी."
"का? बॉसचा काय जावई आहे का तो?" शिवमने रागातच विचारले.
"सांगायला वाईट वाटतं...पण होणार आहे तो आपल्या मॅनेजरचा जावई..." ती तरुणी म्हणाली.
" इथेच आमची एक मैत्रीण होती.आमच्यासोबत काम करायची बिचारी खुप प्रेम करायची संदीपवर पण....गेली ती..." तरुणीचे डोळे भरुन आले.
" ए काय चाललय तुमचं आणि जरा कामाला लागा..चला..." संदीप.
शिवमने आतापर्यंत सगळ्यांची ओळख करुन घेतली.आता बाकी होती ती फक्त स्वरांजली.स्वराच्या जागेशेजारीच शिवमची जागा होती.शिवम हळुच तिथे गेला.
" हाय मी शिवम...आजच जॉइन झालोय." शिवमनेच सुरुवात केली.
"हिम्मत कशी झाली माझ्या मैत्रिणीची जागा घ्यायची?ही जागा तिची आहे.." ती मोठ्याने ओरडली.
सगळे शिवम आणि स्वराकडे पाहत होते.शिवम आपले काही चुकले का याचा विचार करत होता.
" आय अॅ म सॉरी.मला असं बोलायचं नव्हतं" असं म्हणत स्वरा तिथुन निघुन गेली.
संध्याकाळ झाली होती.शिवमने दिलेले काम आटोपले.आणि तो आता घरी जायच्या तयारीत होता.
" तिच्या अशा वागण्याचा जास्त विचार नको करुस.तुझी काही चुकी नव्हती." मघाचीच ती तरुणी शिवमकडे येत होती.
" हाय मी शैलजा" तिच्या या बोलण्यावर शिवमनेही हाय केला.ती खुप वेळेपासुन शिवमला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती.पण कामाच्या नादात सांगत नव्ह्ती.
" पण तु इथे येऊन खुप मोठी चुक केलीये.." तिच्या तोंडुन असं ऐकल्यावर मात्र शिवम काळजीत पडला.इथं नेमकं काय चाललय हे जाणुन घ्यायची शिवमला देखील उत्सुकता होती.
"तु पेपर नाही वाचत का?" शिवमच्या कपाळावरच्या आठ्यांकडे पाहात शैलजा म्हणाली.
" का? वाचतो ना रोज कुठे जॉब आहेत ते कायम शोधत असायचो.पेपर आणि इंटरनेट वापरतो म्ह्णुन तर या कंपनीत vaccancy असल्याचे समजले ना...म्हणुन तर हा जॉब मला मिळालाय.." शिवमने एकदम खुशित उत्तर दिले.
" पण तुझ्याच अगोदर याच कंपनीत याच जागेवर आतापर्यंत ४ जण येउन गेलेत.त्यांच काय झालं माहित आहे का तुला?" शिवमच बोलणं मध्येच थांबवत शैलजा म्हणाली.
" जरा समजेल अश्या भाषेत काहीतरी सांगशील का?" शिवम आता पुरता वैतागला होता.
आणि त्यानंतर त्याला शैलजाकडुन जे काही समजले ते ऐकुन शिवमला धक्काच बसला.
ज्या निधन झालेल्या तरुणीच्या जागेवर शिवम आला होता त्या जागेवर आधीही कोणितरी होते. ते ४ तरुण ज्यांचा एकानंतर एक असा मृत्यु झाला होता.त्यांनी आत्म्हत्याही केली नव्हती की कोणि त्यांना मारले नव्हते. त्यांचा मृत्यु नेमका कशामुळे झाला हे कुणालाच समजले नव्ह्ते. पण मरताना सगळ्यांच्या बाबतीत एक गोष्ट सारखीच होती ते म्हणजे त्यांचे डोळे आणि तोंड उघडे होते.कदाचित त्यांनी काहीतरी भयानक पाहिले होते.
" सगळेजण असे म्हणतात की तिच्याच आत्माने त्या सर्वांना मारलेय.आता ती तुलाही नाही सोडणार." शैलजा पुढे म्हणाली.
" तिचा मृत्यु नेमका कसा झाला? आणि नाव काय होतं तिचं??" मध्येच शिवमने विचारले.
" अरे शिवम, शैलजा तुम्ही अजुन इथेच?ओव्हरटाइम करायचा विचार आहे काय?" या आवाजाकडे दोघांचे लक्ष गेले.
ते त्यांचे मॅनेजर होते.
" सर मी निघालेच" असं म्हणत शैलजा निघुन गेली.
"सर मी तुम्हाला एक विचारु?" हळु आवाजात शिवम म्हणाला.
" अरे शिवम आज तुझा पहिलाच दिवस ना जा जरा घरी जाउन आराम कर.." असं म्हणत मॅनेजर निघुन गेला.
शैलजा सांगत होती की आपल्याला जसे स्वप्न पडायचे तसेच स्वप्न त्या चार तरुणांना पडत असे. आपल्याला पडणारे स्वप्न, त्या चौघांचा मृत्यु तसेच त्या आधी झालेला त्या तरुणीचा मृत्यु या सर्वांमध्ये काहीतरी गुढ लपले होते.कशाही परिस्थीतीत हे गुढ सोडवायचे असे शिवमने मनात पक्के केले आणि तो त्या तयारीला लागला.................
(क्रमशः)

कथा

प्रतिक्रिया

चेतन677's picture

26 Nov 2014 - 2:00 pm | चेतन677

या कथेचा शेवटचा भाग लवकरच

मृत्युन्जय's picture

26 Nov 2014 - 2:12 pm | मृत्युन्जय

आतापर्यंत तरी ही कथा उत्तम चालु आहे. सगळे भाग लव्कर टाकुन संपवलेत तर मजा येइल. मेलेली मुलगी अमृता असेल आणि ती शिवमला मारणार नाही (किंवा दोघे मरणोपरांत हमेशा के लिये एक दुजे के हो जायेंगे) असा फील येतो आहे एव्हाना. पण पुढे वाचायला आवडेल.

मुक्त विहारि's picture

26 Nov 2014 - 10:36 pm | मुक्त विहारि

पुभाप्र...

स्पंदना's picture

27 Nov 2014 - 3:42 am | स्पंदना

वाचतेय!!
छान लिहीता आहात.

खटपट्या's picture

27 Nov 2014 - 8:50 am | खटपट्या

चांगली चालली आहे,
येवुद्या अजुन. संपवण्याची घाई करु नका !!

संचित's picture

28 Nov 2014 - 10:47 pm | संचित

आता जाम रंगात आली ष्टोरी :).