✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

गुढ (एक रहस्य कथा-भाग २)

च
चेतन677 यांनी
Wed, 11/26/2014 - 08:44  ·  लेख
लेख
तीन दिवस झाले होते.कोणत्याच कंपनीचा काहीच रिप्लाय आला नव्ह्ता.ज्या कंपनीत इंटरव्हु दिला तिथुनही काहीच कळाले नव्हते.शेवटी शिवमने आपले बाडबिस्तर बांधले. "शिवम,अरे कुठे चाललास? पुन्हा पिकनिकला जायचय का आपल्याला!!! व्वा मस्त..पण मग मला सांगितलं का नाही?" अजिंक्यने विचारले. शिवम एकदम शांत झाला. "अजिंक्य, एवढ्या दिवस तु माझ्यासाठी जे काही केलंस त्याबद्द्ल धन्यवाद!!मी गावाला चाललोय परत." शिवम. " तुला नेमक म्हणायचं काय?" कपाळावर आठ्या आणत अजिंक्यने विचारले. " अजुन काय म्हणु....तीन दिवस झाले त्या कंपनीत इंटरव्हु देऊन त्याचा काहिच रिप्लाय नाही.जिथे रिस्युम दिलेत त्यांचा तर पत्ताच नाही. दोन वर्ष झालेत यार बी.ई. होऊन वाटल पुण्यात तरी जॉब मिळेल पण काय ऊपयोग त्या फस्ट क्लास डिस्टिंक्शन मार्कस मिळवुन....." शिवम एकदम शांत झाला. "झालं तुझ बोलुन्??की अजुन काही बाकी आहे?अरे काय तु तुला आठवतं लहानपणी तुला झाडावर चढता येत नाही म्हणुन सगळी मुलं तुला चिडवायचे तेव्हा किती जिद्दीने तु प्रयत्न करायचास.आणि कोणत्याही गोष्टीत जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत धडपड करत राहायचास....आणि आता??" अजिंक्य त्याला समजावुन सांगत होता.पण त्याचे भाषण थांबले ते शिवमला आलेल्या फोनमुळे. "हॅलो...." असं म्हणत शिवम एकदम शांत झाला "शिवम काय झालं? कुणाचा फोन होता?" अजिंक्यने सवाल केला. " याहू................त्या दिवशी इंटरव्हु दिलेल्या कंपनीत माझ सिलेक्शन झालंय..." शिवम आनंदाने ओरडला. आणि ते उदास वातावरण अचानक सुखमय झाले. सोमवारपासुन शिवमला कंपनीत बोलावले होते. शेवटी तो दिवस आला.कंपनीत सगळ्या फॉरम्यालिटीज झाल्यानंतर त्याला डेव्हलोपमेंट डिपार्टमेंट देण्यात आले. तिथल्या मॅनेजरने शिवमचे स्वागत केले. "वेलकम मि. शिवम चला मी तुम्हाला तुमच काम समजुन देतो." मॅनेजर. असं म्हणत तो शिवमला काहीतरी सांगत होता.इतक्यात एका मंजुळ आवाजाने शिवमचे लक्ष वेधले. "सॉरी सर जरा उशीर झाला." ती तरुणी म्हणाली. तिचे केस वार्‍यावर भुरभुर उडत होते.तिचे नाक पोपटासारखे लांबट होते चेहरा निमुळता होता.तिच्या निळ्या डोळ्यांकडे सारखे पाहावेसे वाटे. तिच्या गुलाबी गालाकडे शिवम पाहातच राहीला.ती तरुणी स्वर्गातुन आलेली अप्सराच वाटत होती. "शिवम मी तुमची ओळख करुन देतो.ही स्वरांजली तुमच्याच टीममध्ये काम करेल.आणि स्वरा,हा शिवम.आजच नविन आलेत" मॅनेजर ओळख करुन देत म्हणाला. "हाय" शिवम लगेच बोलायला पुढे सरसावला. पण स्वरा तशीच निघुन गेली. "शिवम, तिच्या वागण्याचं वाईट नको वाटुन घेऊस.तशी ती एकदम फ्री आहे.पण त्या घटनेनंतर ती अशी झालीये."मॅनेजर. "अशी कोणती घटना घड्लीये तिच्यासोबत??" शिवमने सवाल केला. " अ‍ॅक्चुअली तिची एक मैत्रीण होती.इथेच काम करत होती.जिच्या जागेवर आता तु काम करणार आहेस." "तिचं काय झालं?" मॅनेजरचे बोलणे पुर्ण व्हायच्या आत न राहवुन शिवम ने प्रश्न केला. " ती नाहीये या जगात.एका दुर्दैवी घटनेत तीच निधन झालं.तिच नाव........" इतक्यात मॅनेजरला कुणाचा तरी फोन आला. आणि तो तसाच निघुन गेला....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा

प्रतिक्रिया द्या
12296 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

दोन वर्ष झालेत यार बी.ई. होऊन

टवाळ कार्टा
Wed, 11/26/2014 - 09:19 नवीन
दोन वर्ष झालेत यार बी.ई. होऊन वाटल पुण्यात तरी जॉब मिळेल पण काय ऊपयोग त्या फस्ट क्लास डिस्टिंक्शन मार्कस मिळवुन
कंची युनीर्शीटी म्हन्हायची ही? महाराष्ट्रातल्या कोणत्याही इंजिनीरींग कॉलेजमधे फस्ट क्लास डिस्टिंक्शन मिळवणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतात be realistic बाकी चालूदे :)
  • Log in or register to post comments

आणि फस्ट क्लास डिस्टिंक्शन हि

टवाळ कार्टा
Wed, 11/26/2014 - 09:20 नवीन
आणि फस्ट क्लास डिस्टिंक्शन हि द्विरुक्ती झालीय...का आणखी कोणत्या टाईपचे डिस्टिंक्शन असते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

नाय नाय

तुषार काळभोर
Wed, 11/26/2014 - 11:39 नवीन
"फर्स्ट क्लास विथ डिस्टिन्क्शन" असं असतंय त्ये...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मला म्हणायचे होते

टवाळ कार्टा
Wed, 11/26/2014 - 14:15 नवीन
मला म्हणायचे होते डिस्टिन्क्शन लिहिले की त्यातच फर्स्ट क्लास आलाच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

नाय नाय नाय

तुषार काळभोर
Wed, 11/26/2014 - 17:14 नवीन
हॉपिशियली सर्टिफिकेटवर "फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन" असंच असतंय.. (रस्त्याच्या कडं-कडंनं, अर्थ बघितला तर तुम्ही बरोबर म्हणताय, पण फ्याक्ट असं हाये)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

फस्ट क्लास विथ डिस्टिंक्शन

कपिलमुनी
Wed, 11/26/2014 - 13:52 नवीन
@टवाळ कार्टा
महाराष्ट्रातल्या कोणत्याही इंजिनीरींग कॉलेजमधे फस्ट क्लास डिस्टिंक्शन मिळवणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतात
आजकाल भरपूर मार्क्स वाटतात . सध्या फस्ट क्लास विथ डिस्टिंक्शन एकाच कॉलेजमधे १०-१५ जण सहज असतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

(No subject)

टवाळ कार्टा
Wed, 11/26/2014 - 14:16 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

इंजिनीरींग मध्ये बेरोजगारी वाढ्ली आहे.

चेतन677
Wed, 11/26/2014 - 09:32 नवीन
आजकाल चांगले मार्कस असुनसुद्धा कंपनी घेत नाहीत.कारण त्यांना नो बॅकलॉग स्टुडंट पाहिजे असतात. पण एखाद्या तरी सेमेस्टरला बॅकलॉग राहतोच.मी मुद्दाम इथे computer engineering चा उल्लेख केलाय कारण त्याची सध्या अशीच परिस्थीती चालु आहे.आणि ktc सारख्या बर्‍याच कंपन्या खोट्या निघाल्या आहेत. I am realistic.आणि ६५ पेक्षा जास्त मार्कस मिळवणारे बरेच आहेत. बोटावर न मोजता येणारे....
  • Log in or register to post comments

एखाद्या तरी सेमेस्टरला बॅकलॉग

टवाळ कार्टा
Wed, 11/26/2014 - 10:25 नवीन
एखाद्या तरी सेमेस्टरला बॅकलॉग राहतोच
याबाबतीत असहमत...कोणत्याही इंजिनीअरींगच्या विषयात पास होण्याइतपत गुण तो विषय समजून घेतला तर नक्कीच मिळतात...फक्त "समजून घेणे" याच्या व्याख्या प्रत्येक विद्यार्थ्याप्रमाणे बदलतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन677

तुमच्या मताबद्दल आदर आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 11/26/2014 - 13:19 नवीन
तुमच्या मताबद्दल आदर आहे. पुणे युनिव्हर्सिटीच्या गलथान कारभाराचा फटका कदाचित तुम्हाला माहित नसावा. मी स्वतः युनिव्हर्सिटी रँकर आहे. एका एम-३ मुळे वाय डी झालो मी. ७ व्या प्रयत्नाला निघाला. आक्ख्या ईंजिनिअरिंगमधे लागलेली एकमेव के.टी. आणि गमतीची गोष्ट अशी की माझं स्वतःचं गणित अतिशय उत्तम आहे. लायनीनी ६ अट्टेंम्प्ट्स मधे २७ मार्क्स होते. २६ नाही की २८ नाही. किती गलथान कारभार आहे ते फक्त अश्या अनुभवामधुन गेल्यावर कळतं फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

भेंडी...आयमाय स्वारी तुमच्या

टवाळ कार्टा
Wed, 11/26/2014 - 14:17 नवीन
भेंडी...आयमाय स्वारी तुमच्या भावना दुखावल्याबद्दल :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

आयला!!!!

तुषार काळभोर
Wed, 11/26/2014 - 17:22 नवीन
पुणे विद्यापीठ एस ई ला बाकी सगळं निघालं. एम३ राह्यला. टीईला पण सगळं निघालं. एम३ राह्यला. क्रिटीकल वायडी!! (एसईला २+ टीईला२ + वायडीत १=५ अटेम्प्ट्मध्यी नाय निघला. ६व्यांदा नसता निघाला तर आणखी एक वर्ष गेलं असतं.) मग सहाव्या अटेम्प्ट्ला पुस्तकच घेऊन बसलो!! च्यायला!! ४० पडले ना भाऊ!! (५अटेम्प्ट=३०,२६, २४, ०, १७)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

एम३

कपिलमुनी
Wed, 11/26/2014 - 18:01 नवीन
एम३ वर एक शतकी धागा निघेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

आता धागा इंजिनीयरींग कडे

जेपी
Wed, 11/26/2014 - 18:07 नवीन
आता धागा इंजिनीयरींग कडे झुकला आहे तर विचारतो. कराड इं. कॉलेज मधुन 2006 ते 2011 मधुन पास औट कुनी हाय का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

०?????

टवाळ कार्टा
Wed, 11/26/2014 - 19:20 नवीन
०?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

गैरहजर हो...

तुषार काळभोर
Fri, 11/28/2014 - 14:00 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

चायला लागोपाठ ३ फेल नंतर

टवाळ कार्टा
Fri, 11/28/2014 - 14:03 नवीन
चायला लागोपाठ ३ फेल नंतर डायरेक्ट गैरहजर...लैच डेरिंगबाज हाय वो तुमी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

लायनीनी ६ अट्टेम्प्ट २७...हैट

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 11/26/2014 - 21:46 नवीन
लायनीनी ६ अट्टेम्प्ट २७...हैट आहे. युनिव्हर्सिटीनी वर्ष खाल्लं एक. :(...!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

महान पुणे विद्यापीठ

कपिलमुनी
Wed, 11/26/2014 - 13:54 नवीन
बाकी सर्व विषय पास होउन गणितात ० मार्क्स देण्याचा पराक्रम केला होता. कोर्ट कचेरीपर्यंत वेळ आणली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हायला .... साष्टांग नमस्कार

टवाळ कार्टा
Wed, 11/26/2014 - 14:18 नवीन
हायला .... साष्टांग नमस्कार तुम्हाला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

भाग थोडे मोठे येउद्यात. !!!

खटपट्या
Wed, 11/26/2014 - 09:33 नवीन
भाग थोडे मोठे येउद्यात. !!! पु.भा. प्र.
  • Log in or register to post comments

बरं!

स्पंदना
Wed, 11/26/2014 - 10:22 नवीन
बरं! टाका पुढचा भाग. अन टका जरा गप्प बसा. आधी सांगू तरी द्या कथा.
  • Log in or register to post comments

गूढ

समीरसूर
Wed, 11/26/2014 - 11:44 नवीन
रहस्य चांगल्यापैकी विणलं जातंय. लिखाण थोडं तुटक वाटतंय. कथा लवकर संपवण्याची घाई तर नाहीये ना? :-) लिखाण थोडं मोकळं आणि विस्तृत होऊ द्यायला हरकत नाही. त्यामुळे कथेचा आनंद वाढेल. बाकी प्रसंगांची रचना जमली आहे. शुभेच्छा! :-)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चेतन677
Wed, 11/26/2014 - 11:55 नवीन
कथा संपवण्याची थोडीशी घाई आहे...कारण थोड्याच दिवसांत काॅलेज सुरु होणार आहे..तरीही कथा विस्ताराने लिहायचा नक्कीच प्रयत्न करेन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

कॉलेज सुरु होणार आहे. कॉलेजात

खटपट्या
Wed, 11/26/2014 - 12:06 नवीन
कॉलेज सुरु होणार आहे. कॉलेजात बसुन लीवा की !! कॉलेजची लायब्ररी तर उत्तम ठिकाण !! बगा कसं जमतंय ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन677

कथा आवडली

कविता१९७८
Wed, 11/26/2014 - 12:16 नवीन
पण खुपच लहान भाग टाकताय तुम्ही , जरा मोठे भाग येउ द्या.
  • Log in or register to post comments

कथा पण लहानच आहे

चेतन677
Wed, 11/26/2014 - 12:29 नवीन
मी प्रथमच काहीतरी लिहित आहे...म्हणुन सुरवात लहान कथेपासुन कराविशी वाटते....कथेचा अंतिम भाग लवकरच...ही कथा तुम्हाला आवडली तर लगेचच एका दुसरया मोठया कथेचे पुस्तक छापण्याचा विचारआहे!!!!!
  • Log in or register to post comments

कथा आवडली मस्तय..

कविता१९७८
Wed, 11/26/2014 - 12:34 नवीन
कथा आवडली मस्तय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन677

कथा पकड घेत आहे...

मुक्त विहारि
Wed, 11/26/2014 - 21:53 नवीन
पुभाप्र.
  • Log in or register to post comments

कथेचे उर्वरीत भाग

चेतन677
Sat, 11/29/2014 - 13:45 नवीन
गुढ (एक रहस्य कथा-भाग १) गुढ (एक रहस्य कथा-भाग 3) गुढ (एक रहस्य कथा-भाग ४ अंतिम भाग)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा