गुढ (एक रहस्य कथा-भाग १)

चेतन677's picture
चेतन677 in जनातलं, मनातलं
25 Nov 2014 - 7:21 pm

गुढ
इयत्ता सातवीचा निकाल लागला होता. अजिंक्य वर्गाबाहेर थांबलेल्या मुलींच्या घोळक्याकडे पाहात उभा होता. तेवढ्यात त्याच्या कानावर काहीतरी ऐकु आले आणि तो थेट पळाला ते शिवमच्या घरी.....
"शिवम....ए शिवम...लवकर बाहेर ये..." तो ओरडला.
" व्वा,मित्रा आलास तु!! आणला का माझा निकाल?लवकर दे.आई यायच्या आत,लपवुन ठेवतो."
" शुभम,तु फक्त माझ्यासोबत चल." अजिंक्य अजुनही धापा टाकत होता.
"अरे पण कुठे ते तरी सांगशील?आणि निकाल कुठे आहे माझा?" शिवम.
पण अजिंक्य त्याचं काही ऐकायलाच तयार नव्ह्ता.तो त्याला ओढत घेऊन गेला ते थेट अमृताच्या घराकडे.....
बालवडीपासुन अमृता शिवमच्या वर्गात होती.शिवमला कधीची ती आवडली होती.पण एवढ्या वर्षांत त्याने कधी तिच्याशी बोलायची हिम्मतच नव्ह्ती केली.आणि आज ती हे गाव सोडुन चालली होती.कुठे ते शिवमला माहित नव्ह्तं....
..........................................................................................................................................................

आता या गोष्टीला बरीच वर्षे लोटली.शिवमने कॉम्प्युटर इंजिनिअरींग केले होते आणि नशीब आजमवण्यासाठी तो पुण्याला जायचे ठरवले.त्याचा जिवलग मित्र अजिंक्य सुद्धा पुण्यात जॉब करत होता.
पुण्यातल्या तळेगाव मध्ये अजिंक्य आता राहायला होता.अजिंक्यच्या मदतिने त्याने सगळीकडे रिस्युम दिले.पण जवळ जवळ एक ते दिड महिना झाला तरी काहिच झाले नाही.
"चिल, मिळेल रे....." आपल्या मित्राची समजुत काढत अजिंक्य म्हणाला.
"यार अजुन किती प्रयत्न करायचे?किती बेरोजगारी वाढली आहे." हताश होत शिवमने उत्तर दिले.
"चल आपण मस्त सिंहगडावर जाउन येऊत म्हणजे तुझा मूड पण ठिक होईल" अजिंक्य.
यावर शिवमने नाराजिनेच होकार दिला.
जायचे तर सिंहगडावर होते पण अजिंक्य हा आपल्या मित्राला पुर्ण पुणेदर्शन करायचे या दॄष्टीने निघाला.दुपारचे चार वाजत होते.सगळे लोक सिंहगड उतरत होते आणि हे शहाणे वरती चढत होते.परत यायला त्यांना अंधार पडणार होता.
दुपारचे चार वाजत होते.सगळे लोक सिंहगड उतरत होते आणि हे शहाणे वरती चढत होते.परत यायला त्यांना अंधार पडणार होता.शेवटी एकदाचे ते गडावर पोहोचले.सोबत आणलेली मिसळपाव त्यांनी खाल्ली.
" शिवम,असं म्हणतात की मेलेल्या लोकांचे आत्मा अश्या गडावर भटकत असतात.जरा लक्ष असु दे हा." अजिंक्य हसत म्हणाला.
"माझा अश्या फालतु गोष्टींवर विश्वास नाही.आता थोडा वेळ आराम करुयात." शिवम.
पंधरा-विस मिनिटे झाली असतील.इतक्यात आपल्या बाजुला अजिंक्य नाही हे पाहुन शिवम दचकलाच.
"अजिंक्य? अजिंक्य" शिवम त्याला इकडे तिकडे शोधायला लागला.
इतक्यात पाठिमागुन कुणितरी त्याच्या खांद्यावर हात टाकला.
"अजिंक्य, हा काय पोरखेळ चालवलाय" असं म्हणत शिवम मागे वळाला तर तिथे अजिंक्य नव्ह्ताच!!! अचानक त्याच्या समोर एक केस विस्कट्लेला चेहरा आला.शिवम खुप घाबरला आणि मोठ्याने किंचाळला.
"शिवम,शिवम अरे जागा हो आपल्याला उशिर होतोय." अजिंक्य त्याला झोपेतुन जागे करत होता.
"अजिंक्य तु?? तु कुठे गेला होतास आणि ती??" शिवमला काय बोलावे तेच समजत नव्ह्ते.
"अरे काय बोलतोस शिवम?मी कुठे जाणार? मी तर इथेच झोपलो होतो ना.आणि कोण मुलगी?" अजिंक्य जरा वेळ बोलायचे थांबला आणि अचानक हसायला लागला.
"शिवम,तुला काय अमृताची आठवण आली कि काय!!!" अजिंक्य अजुनही हसत होता.
'ते स्वप्न होते तर...' शिवम मनातच म्हणाला आणि त्याने सुट्केचा निश्वास टाकला.
"बाय द वे शिवम्, अमृता कुठे गेली काय माहिती आहे का तुला?"गड उतरताना अजिंक्यने विचारले.
"माहित नाही यार..तिच्या वडिलांची बदली झाली आणि ती कुठे गेलि काय माहित.." शिवम.
"खुप प्रेम करायचास ना तिच्यावर?" अजिंक्य ने पुन्हा प्रश्न केला.
त्यावर शिवम एकदम शांत झाला.आणि त्याने उत्तर दिले...
"माहित नाही. मे बी तिला दुसर कुणि मिळालं असेल"
रात्रीचे आठ वाजत आले होते.आज दोघेही खुप दमले होते.म्हणुन एकदम गाढ झोपी गेले.
सकाळी शिवमला एक मेल आला.एका कंपनीने त्याला इंटरव्हुसाठी बोलावले होते.शिवम लगेच तयारीला लागला. आणि लगेच कंपनीत कॉल करुन इंटरव्हुसाठी वेळ पक्की केली.
"Excuse me, मी इंटरव्हुसाठी आलोय" reception जवळ येत शिवम म्हणाला.
" तुम्ही थोड्या वेळ वेट करा" असं म्हणत receptionist ने शिवमला बसायला सांगितले.
शिवम तसाच खाली बसला.वर डोकवुन पाहिले तर काय तिथे कोणिही नव्हते.ते पाहुन शिवम दचकला.थोड्यावेळापुर्वी असलेले सगळेजण अचानक कुठे गायब झाले? याच शिवमला आश्चर्य वाटत होते.
तो उभा राहिला.तेवढ्यात शेजारच्या ऑफिसमध्ये कुणितरी असल्याचा त्याला भास झाला.तो तसाच त्या रुममध्ये गेला.कुणाच्यातरी रडण्याचा आवाज येत होता.
खोलित पुर्ण अंधार होता.तो त्या रडणार्या व्यक्तीजवळ गेला.शिवमने त्या व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवला तोच त्याला केस विस्कटलेला चेहरा दिसला.शिवम खुप घाबरला.
" Excuse me,hello??" या आवाजाने शिवमचे लक्ष वेधले.
" काय झालं? ए.सी. चालु असंताना तुम्हाला एवढा घाम कसा काय सुटला??" ती receptionist होती.
'पुन्हा भास झाला.' शिवम मनातल्या मनात पुट्पुटला. आपल्यासोबत असे का होत आहे.
सिंहगडावरुन आल्यापासुन काहितरी वेगळंच शिवम सोबत घडत होतं.सारखं तिच केस विस्कट्लेली तरुणी त्याला दिसत असे...
घरी गेल्या गेल्या त्याने ही हकिकत अजिंक्यला सांगितली.तो मोठ्याने हसायलाच लागला.
"यार ती सिंहगड्वाली आयटम तुझा पिच्छा सोडत नाहिये वाटतं." अजिंक्यच हसणं काही थांबत नव्हतं.
" तर मेन लोच्या असा आहे की तुझ्यावर प्रेम करणारं आपला माणुस पाहिजे" फिल्मी स्टाइल मध्ये अजिंक्य शिवमला म्हणाला.
" काय यार चुकिच्या वेळेला चुकीचे डायलॉग नको रे मारुस..." शिवम शांतपणे म्हणाला.
" अरे खरं तेच सांगतोय मी.अरे तुला जे भास होतात ना त्याचा अर्थ असा आहे की तुला कुणीतरी हवं आहे.तुझ्यावर प्रेम करणारं.तुझी काळजी घेणारं.." अजिंक्य शिवमला समजावत होता.
" पण त्याच्यासाठी एवढे भयानक भास???" शिवम एकदम शांत झाला.
" आता जाऊ दे ना...चल जेवण करुत.." अजिंक्यने विषय बदलला.

कथा

प्रतिक्रिया

गुढ या कथेचा पहिला भाग मी येथे प्रकाशित करत आहे.जर हा भाग तुम्हाला आवडला तर पुढ्चे ही भाग लवकर प्रकाशित करेल. त्यासाठी कथा वाचुन नक्की comment करा.

जेपी's picture

25 Nov 2014 - 8:14 pm | जेपी

नव्या प्रथेप्रमाणे-
भयानक लिहील आहे.
मिपावर स्वागत.
पुभाप्र(पुढील भागाच्या प्रतिक्षेत)जेपी

आनन्दा's picture

25 Nov 2014 - 8:57 pm | आनन्दा

भयानक लिहील आहे.
मिपावर स्वागत.
पुभाप्र(पुढील भागाच्या प्रतिक्षेत) आनन्दा

आनन्दा's picture

25 Nov 2014 - 9:13 pm | आनन्दा

जेपींची प्रथा आहे, पाळलीच पाहिजे :)

स्वप्नज's picture

25 Nov 2014 - 9:13 pm | स्वप्नज

जुने मिपा मोड अॉन
पूर्ण कथा वाचू न शकल्याने जास्त प्रतिसाद देऊ शकत नाही.
मोड अॉफ

नवीन प्रथेनुसार - छान छान. लिखाणाच्या शैलीवर थोडीशी मेहनत घ्या..

आनन्दा's picture

25 Nov 2014 - 9:14 pm | आनन्दा

.

अहो, तुम्हाला पण हितेशभौंचा गुण लागला की काय?

स्वप्नज's picture

25 Nov 2014 - 9:33 pm | स्वप्नज

अहो आनंदाजी, मुळात हितेशमाई, हितेशनाना की हितेशभाऊ हे अजून ठरायचेय. त्यासाठी संमंनी त्रिस्तरीय समिती नेमलीय असे कळाले.. खरे खोटे देवालाच माहित..

चेतन677's picture

25 Nov 2014 - 10:08 pm | चेतन677

मित्रांनो भावना समजु शकतो...पण मराठी टाईप करायला खुप वेळ लागतो...म्हणून टप्याटप्याने लिहीत आहे...

संचित's picture

25 Nov 2014 - 10:24 pm | संचित

छान. पु. भा. प्र.

पुभाशु.

४ वाजता गडावर गेले पोट्टे. ८ च्या आगोदर दमुन लवकर झोपले? कंच्या गावचे म्हणायची हि फुलपाखरे...

पुढील भागासाठी शुभेच्छा.

बदल सुचविल्याबद्दल धन्यवाद...मी अजुन नविन लेखक आहे थोड्या फार चुका अपेक्षित धरुनच कथा वाचा!!!!

खटपट्या's picture

26 Nov 2014 - 5:27 am | खटपट्या

चांगलंय !!
पु.भा. प्र.

बदल सुचविल्याबद्दल धन्यवाद...मी अजुन नविन लेखक आहे थोड्या फार चुका अपेक्षित धरुनच कथा वाचा!!!!

मुक्त विहारि's picture

26 Nov 2014 - 8:31 am | मुक्त विहारि

पुभाप्र

अजया's picture

26 Nov 2014 - 11:09 am | अजया

वाचतेय.पुभाप्र.