गुढ (एक रहस्य कथा-भाग ४ अंतिम भाग)

चेतन677's picture
चेतन677 in जनातलं, मनातलं
28 Nov 2014 - 7:48 pm

मागील भाग

..........................................
गुढ (एक रहस्य कथा-भाग १)
गुढ (एक रहस्य कथा-भाग २)
गुढ (एक रहस्य कथा-भाग 3)

........................................................................................................................................
गुढ (एक रहस्य कथा-भाग ४ अंतिम भाग)
घरी गेल्या गेल्या शिवमचे विचारचक्र सुरु झाले.अजिंक्य अजुन आला नव्हता.
" हॅलो अजिंक्य?कधी येणार आहेस तू?" अजिंक्यला फोन करत शिवमने विचारले.
"अरे मला उशीर होईल तु जेवण करुन घे." अजिंक्यने उत्तर दिले.
" अरे ऐक ना...रद्दीचे पेपर कुठे ठेवलेत तु?" शिवमने विचारले.
" अरे मागच्या रुममध्ये कोपर्यात असतील बघ.पण तुला काय करायचय? रद्दीला देतोस का पेपर्?सकाळी येणारा रद्दीवाला सायंकाळी कसा काय उगवला??" अजिंक्यची बडबड सुरु झाली.
पण तोपर्यंत शिवमने फोन ठेवला होता.
शिवमने मागचे पेपर चाळायला सुरुवात केली.आणि गुढ उकलायला सुरुवात झाली.शैलजाने सांगितले त्याप्रमाणेच त्या कंपनीतल्या त्या चौघांच्या मृत्युची बातमी होती.कंपनीत जॉइन झाल्याच्या दर २० दिवसानंतर त्यांचा मृत्यु झाला होता.आणि तेही भीतीने ह्र्दय बंद पडुन.पण त्यांनी नेमकं काय पाहीलं होतं याचं उत्तर अजुन शिवमला मिळाले नव्हते.
जॉबला लागुन आता शिवमला आठवडा झाला होता.स्वरांजलीसोबत हळुहळु त्याची मैत्री वाढत होती.स्वराला तिच्या त्या मैत्रिणीबद्द्ल कधीही विचारायचे नाही असं शिवमने ठरवले होते.कदाचित स्वरांजली शिवमला आवडत होती.पण शिवम ते मान्य करायला तयार नव्हता.कारण आधीच त्याला कुणितरी आवडले होते ती म्हणजे त्याची अमु---अमृता.पण तिला नेमक शोधायचं तरी कसं आणि कुठं? हा पण खुप मोठा प्रश्न होता. शिवमला जॉबही चांगला लागला होता आजपर्यंत केलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे शिवमला वाटत होते.
रात्री नेहमीप्रमाणे शिवम घरी आला.त्याला कोणाचातरी फोन आला होता.तो त्याच्या गावावरुन होता.शिवमची आई खुप आजारी असल्याचे त्याला समजले.जाणे भाग होते. अजिंक्यने त्याची समजुत काढली.
शिवम गावाला गेला.खुप दिवसांनंतर शिवमला पाहुन त्याच्या आईला खुप आनंद झाला.शिवमने त्याच्या आईची चांगली काळजी घेतली. पाच दिवसांत ती बरी झाली.शिवमला लगेचच आपल्या जॉबवर परतायचे होते आणि लवकरच तो पुण्याला निघाला.
"शिवम, अरे अमृता भेटते का तुला?" आईने जाता जाता शिवमला विचारले.
" ती मला कसं भेटेल?" आश्चर्याने विचारले.अरे खुप दिवसांपुर्वी तिचे वडिल आले होते गावात.त्यांच काहीतरी काम होतं.मला शाळेजवळ भेटले.त्यांची जागा कायतरी विकणार होते.म्हणत होते की आता अमृताच्या लग्नाला पैसे नकोत का?सध्या पुण्यालाच असतात म्हणे आणि अमृतापण मोठ्या आयटी कंपनीत कामाला आहे म्हणे." आई सांगत होती. ते ऐकल्यावर शिवमचा चेहरा खुलला.
"कधी आले होते ते? एक महिन्यापुर्वी का? कि...." शिवम खुप उत्सुकतेने विचारत होता.
"अरे एवढी काय उत्सुकता तुला? त्याला आता एक वर्ष झालं असेल?"
"काय?" शिवम ओरडलाच. "मग तु आता एवढ्या उशीरा का सांगत आहेस मग? आणि मी कुठे होतो तेव्हा?"
" अरे पण तुला का एवढी माहिती हवी आहे.आणि तेव्हा तु जॉब शोधत होतास ना.पण तुला नेमकं काय करायचं होतं? बाई त्या पोरीच्या मागावर तर नव्ह्तास ना!!!" आई.
" अगं कायपण तुझं...चल मी जातो आता..आणि परत आजारी नको पडुस." स्मितहास्य करत शिवम म्हणाला.
शिवम कधी ही आनंदाची बातमी अजिंक्यला सांगु असं त्याला झालं होतं.
तीन तासांत शिवम पुण्यात आला.आज रविवार होता.अजिंक्य घरीच होता.
"च्या मारी!!!!याला म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा!!!!" अजिंक्य जोरात किंचाळलाच.
" अजिंक्य अरे ती पुण्यात आहे एवढ्च समजलं." शिवमचा चेहरा उतरला होता.
" अरे उसमे क्या आगे का पता हम ढुँढ लेंगे." अजिंक्य म्हणाला.
"यार पण एवढ्या मोठ्या पुण्यात कसं काय शोधणार तिला?" शिवम
" किसी चीज को अगर....." अजिंक्यचे फिल्मी डायलॉग सुरु झाले. पण शिवमने त्याला मध्येच थांबवलं.
" बर ते जाउदे. तु आल्याच्या खुशिमध्ये आपण आता खाउयात मस्त पुणेरी मिसळ पाव". अजिंक्य.
................................................................................................................................................................................
सकाळी नेहमीप्रमाणे शिवमचं रुटीन चालु झालं.आज जरा लवकरच तो कामाला गेला. तिथे गेला तेव्हा त्याच्या डोळ्यांवर विश्वास राहिला नाही. संदीप आणि स्वरांजली हातात हात घालुन बसले होते.अजुन कोणिही आले नव्हते.
शिवमला पाहताच स्वराने हात बाजुला घेतला.क्षणभर शांतता पसरली.आणि स्वरा तिथुन निघुन गेली.शिवम रागाने संदीपकडे पाहात होता.
" काय राव आमच्या पाखरावर नजर होती तुमची!!!!" संदीप.
" काय म्हणायचं काय आहे नेमकं?" शिवमने शांतपणे विचारले.
"मग एवढ्या दिवस हालचाली ठीक दिसत नव्ह्त्या तुझ्या.आता तुझा पता कट!!" संदीप.
"मॅनेजरचा होणारा जावई आहेस ना तु?" शिवम .
" कोण म्हणालं? ती शैलजा म्हणाली वाटतं.मॅनेजरच्या पोरीसोबत एक दिवस बाइकवर काय पाहिलं, शैलजाने मला मॅनेजरचा जावई बनवला.." संदीप हसत म्हणाला.
" हे तु ठीक करत नाहीयेस.मॅनेजरच्या मुलीसोबत आणि स्वरांजली सोबत..." शिवम.
इतक्यात त्यांना मॅनेजर आत येताना दिसले.
" थांब आत्ताच तुझे प्रताप मॅनेजरना सांगतो.की तुमच्या मुलीला फसवतोय हा" शिवमचा रागाचा पारा चढला होता.
" नक्किच जा सांग." हसत संदीपने उत्तर दिले.
शिवमही मॅनेजरकडे निघाला.
" गुड मॉर्नींग सर..." शिवम.
" ओह. मि शिवम. तुम्ही आज कंपनीत कसे?" मॅनेजरने सवाल केला.
" सॉरी मी समजलो नाही काही." शिवम
"अरे तु आता इथे जॉबला नाहीस.तुला काढुन टाकण्यात आलंय" मॅनेजरने सांगितले.
"पण कारण समजु शकेल का की काय चुकलय माझं" शिवम.
" सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझा performance नीट नाही आणि अजुन बरंच काही संदीपने सांगितलय मला सगळं.." असं म्हणत मॅनेजर आत निघुन गेला.
"अजुन काय काय सांगितलस बॉस ला?" शिवमला आता आपला राग अनावर होत होता.
"हेच की गेले चार पाच दिवस तु नशेत पडला होता आता नीट झाला" असं म्हणत संदीप हसायला लागला.
शिवमला आता जाण्याशिवाय काही पर्यायच नव्हता. शिवम तिथुन बाहेर आला.इतक्यात त्याच्या मागुन कोणितरी हाक मारत असल्याच त्याला जाणवलं.ती शैलजा होती.
" मला माहीत आहे शिवम की तुझी काहीच चुक नाही.सगळं त्या संदीपमुळे झालंय.तुला स्वरांजली खुप आवडायची ना म्हणुन त्यानं तसं केलंय.काय जादुटोणा केलाय त्याने तिच्यावर काय माहीत.त्याच्या ताब्यातच आलीये ती आता.
अमृतालापण असंच जाळ्यात ओढलं होतं त्याने.."
" काय म्हणालीस कोण ती?" शैलजाच बोलणं मध्येच थांबवत शुभम ने विचारले.
"अरे अमृता साने.मस्त मुलगी होती रे.स्वराची बेस्ट फ्रेंड." शैलजा बोलतच होती.आणि शिवमच्या डोळ्यांतुन पाणी वाहु लागले.
कारण ती तीच होती.शिवमची लाडकी अमु.. ती इथेच कामाला होती हे आज शिवमला समजलं.ती आपल्या कामात एकदम हुशार होती.आणि तिची बढतीही होणार होती.पण अचानक तिचा मृत्यु झाला आणि सगळंच संपलं.
" पण तिचा मृत्यु कसा झाला?" शिवम ने पुन्हा सवाल केला.
" त्याच काय झालं...." शैलजा काहीतरी बोलणार तेवढ्यात तिला आतुन बोलावणे आले.
" सॉरी मला जायला हवं"
" अगं पण ती कसं काय......" शिवम अजुन काही विचारणार तेवढ्यात शैलजा आत निघुन गेली.
शिवम थोड्यावेळ तसाच स्तब्ध उभा राहीला आणि परतीच्या वाटेवर निघाला.
" उशीरा कसं काय?? कधीची वाट पाहतोय तुझी. आणि तुझा मोबाइलपण स्विच ऑफ आहे..काय झालंय चेहरा का उतरलाय तुझा?" अजिंक्य.
"अरे एक सांगायचं होतं तुला...." शिवम
"काय झालंय नीट सांगशील!!!" अजिंक्य
" अरे अमु सापडली.." शिवम.
" व्वाव ग्रेट न्युज आहे यार.पण कसं काय अचानक भेट झाली वाटतं हो ना??" अजिंक्य उत्सुकतेने विचारायला लागला.
" यार....." शिवम बोलायचं थांबला.
" अरे लवकर सांग!!!!" अजिंक्यला राहवत नव्हते.
" यार अमृता नाहीये आता या जगात.." असं म्हणत शिवमने त्याला घडलेली हकीकत सांगितली.
" पण कसं काय घडलं हे? काही माहीत आहे का तुला?" अजिंक्य.
यावर शिवमने नकारार्थी मान हरवली.
" यार खुप उशीर झालाय मी आता झोपतो असं म्हणत तो तिथुन निघुन गेला.
काहीवेळ तो तसाच अमृताचा विचार करत बेडवर बसला होता.तेवढ्यात एक वार्याची झुळुक आली आणि एक पेपर त्याच्याजवळ आला.तो खुप जुना पेपर होता.
"यार हा अजिंक्य पेपर तर वाचत नाही मग आणतोच कशाला.उगीच रद्दी जमवुन ठेवलीये." मनात असं म्हणत त्याने तो पेपर उचलला.त्यात जे लिहले होते त्यावर त्याचा विश्वास बसेना.त्यात अमृताच्या मृत्युची बातमी होती.
अमृता साने हीचा सिंहगडावरुन पडुन मृत्यु झाला होता!!!!!!!!!! आणि विशेष म्हणजे तुच्यासोबत कोणीही नव्हते.
'असं कसं?? कोणिही सिंहगडावर एकटं कसं काय जाईल? नक्कीच स्वरांजलीच काम असणार हे..कदाचित स्वराला संदीप आधिपासुन आवडत असंणार...म्हणजे तिच ते उदास होणं वगेरे सगळं खोट होतं की काय???' शिवम स्वतःच वेगवेगळे तर्क करत होता.तेव्हा अचानक त्या पेपरमधुन हात आले आणि त्यांनी शिवमचा गळा दाबला.शिवम डोळे फाडुन बघतच होता.पुन्हा त्याला तोच केसांनी विखुरलेला चेहरा दिसला आता मात्र शिवमची शुद्ध हरपली.आणि शिवम बेशुद्ध झाला.
जेव्हा शुद्ध आली तेव्हा तो चक्क सिंहगडावर होता. शिवमला धक्यांवर धक्के बसत होते.तिथे कोणीही नव्हते. तो फक्त एकटाच होता.अचानक त्याला कुणाच्या तरी पावलांचा आवाज आला तो त्या दिशेने धावला.पण तिथे कोणिही नव्हते. शिवमचे शरीर घामाने ओलेचिंब झाले होते.आणि तो मागे वळाला तोच तो मागे वळाला.अचानक त्याला पुन्हा तोच चेहरा दिसला. कोण आहेस तु? आणि मला का सतावत आहेस.तेवढ्यात कुठुनतरी वार्याची झुळुक आली. आणि तिच्या चेहर्यावरचे केस दुर झाले.आता शिवम तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता.शिवमने नीट पाहिले...
" अमृता!!!!" शिवम आश्चर्याने ओरडलाच..एवढ्या वर्षांनंतरही शिवम तिला ओळखु शकला.
" हे सगळं काय आहे?" शिवम
" तिला वाचव शिवम.." अमृता.
" तिला कोणाला?"
" स्वराला वाचव त्याच्यापासुन..नाहीतर जसं त्याने मला मारले तसं तो तिलाही मारेल.." अमृता.
" कोण?? मला सांग कोण आहे तो? का आणि कसं मारले त्याने तुला??" शिवम मोठ्याने ओरडला.
तेवढ्यात अमृताने आपला हात पुढे केला.आणि शिवमला त्याचा हात आपल्या हातावर ठेवण्याचा इशारा केला.
शिवमने तिच्या हाताला स्पर्श केला तोच त्याला करंट बसल्याचे जाणवले.त्याने डोळे उघडले तेव्हा तो तिथे एकटाच होता. अमृताची आत्मा तिथुन गायब झाली होती. इतक्यात त्याला कुणाचातरी बोलायचा आवाज आला...
" हॅपी बर्थडे टु यु.....हॅपी बर्थडे टु यु.....हॅपी बर्थडे डियर अमृता....हॅपी बर्थडे टु यु"
त्याने नीट पाहिले तर तो संदीप होता आणि त्याच्या सोबत होती ती अमृता!!!
"यार काय सरप्राइज दिलंय तु मला खरंच खुप आनंद झालाय!!!"अमृता संदीपला सांगत होती.
" मग म्हटलं की आपण मोठ्ठ सरप्राइज द्यावं...म्हणुन घेउन आलो मी तुला इथं सिंहगडावर...आता फक्त आपण दोघेच आहोत...." संदीप हसत म्हणाला.
" जानु मी खरच खुप खुश झाले...आय लव यु सो मच..." अमृता खुप खुश होती.
" चल तिथे कडावर जाउन टायटनिक पोझमध्ये एक फोटो काढुयात" संदीप.
त्यावर अमृता तयार झाली.
अमृता एकदम कडेला उभी राहिली. तेवढ्यात संदीपने तिला खाली ढकलले.
अमृता हवेत अधांतरी लटकत होती आणि तिचा फक्त एक हात संदीपच्या हातात होता.
" संदीप हे काय करतोस तु?काय आहे नेमकं तुझ्या मनात??" अमृताने घाबरत विचारले.
" फक्त वीस दिवस झालेत आपली लव्हशीप सुरु होउन आणि लगेच लग्नाचं विचारत होती तु मला सारखी...." संदीपचे डोळे लालभडक होते.
" संदीप प्लीज नको करु असं..." अमृता त्याला विनंती करत होती.
" यार तसंपण आता तुझं जे प्रमोशन होणार होतं ना ते आता माझं होणार...तुला काय वाटलं मी खरंच प्रेम करतो तुझ्यावर? अगं पोरी असतात कशाला टाइमपास करायला.."
असं म्हणत संदीपने अमृताचा हात सोडला...तिच्या किंकाळीने सिंहगडावरची ती शांतता भंग पावली..
" अमृता.........................." ते सगळं पाहुन शिवम मोठ्याने ओरडला.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" शिवम शांत हो.डॉक्टर शिवमला शुद्ध आली." असं म्हणत अजिंक्य डॉक्टरला बोलवायला पळाला.
" आली शुद्ध तुला.." शिवमला चेक करत डॉक्टर म्हणाला.
" पंधरा दिवस झालेत तु कोमात होतास शिवम.बरं झालं लवकर बाहेर आलास कोमातुन.डॉक्टर तर म्हणत होते की अवघड आहे...पण बघ आता सगळं ठीक झालय."
आता शिवमला संपुर्ण गुढ उकलले होते.त्याच्या स्वप्नांमध्ये जी मुलगी येत होती ती अमृता होती.ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती.शिवम खुपच हताश झाला होता.सायंकाळचे नऊ वाजत होते.
" शिवम कसा आहेस?" या आवाजाकडे शिवमचे लक्ष गेले.ती शैलजा होती.
"ठीक" शिवमने मोजकेच उत्तर दिले.
" सॉरी मी एकटीच आले.." शैलजा
" इट्स ओके. स्वरा कशी आहे?" शिवमने विचारले.
" अरे बरं आठवण केली आज रात्री बाराला तिला बर्थडे विश करेन.
"काय आज तिचा बर्थडे आहे!!!" शिवमचे विचारचक्र सुरु झाले.
तो अचानक उठुन उभा राहिला.
" अजिंक्य चल माझ्याबरोबर..." शिवम.
" कुठे..अरे आता कुठं तु शुद्धीवर आलास" अजिंक्य.
" सिंहगडावर" शिवम शांतपणे म्ह्णाला.
" तुला वेड लागलंय का? एवढ्या रात्री तिथे जाउ देतील का?" जाताना रस्त्यात अजिंक्य शिवमला समजावुन सांगत होता.पण त्याकडे शिवमच लक्षच नव्हतं.. त्याने गाडी सिंहगड रोडला घेतली. पायथ्यापासुन दहा मिनिटांत ते वरती गेले.
शिवम घाई घाईत स्वराला शोधायला लागला.तोच त्याला त्याच्या स्वप्नातली जागा आठवली जिथे अमृता पडली होती. आणि तो त्या दिशेने धावला.
तिकडे संदीप आणि स्वराच बर्थडे सेलेब्रेशन चालु होतं...
" खरंच इतकं प्रेम करतोस माझ्यावर?" स्वरा संदीपला म्हणाली.
"हो गं माझी जान...चल आपण तिकडे कडेला एक मस्त पिक घेऊ"संदीप.
" का?तिकडे का? जसं अमृताला मारलं तसंच मला मारायचा विचार आहे का?" स्वराच्या या बोलण्याने संदीप दचकला.
"हे तुला कसं माहित?" त्याने विचारले.
" अच्छा म्हणजे तुच तिला खाली ढ्कलुन दिलंय तर....." स्वरा म्हणाली.
तिने त्याला अमृता आणि तिच्यामधलं व्हाट्सअॅिप संभाषण दाखवलं.बरोबर बारा वाजता स्वराने अमुला बर्थडे विश केलं होतं. आणि त्यावर अमुने रिप्लाय दिला होता की आम सेलेब्रेटींग बर्थडे विथ माय लव्ह...त्या वेळी स्वरा एका मिटिंगसाठी पंधरा दिवस बंगलोरला गेली होती.
"तुला काय वाट्लं की मी तिकडे लांब गेले तर मला काहीच नाहि समजणार...जेव्हा मी पेपर मध्ये बातमी वाचली की अमुची एकटीचीच बॉडी तिथे सापडली तेव्हा मला शंका आली.पण मला माहित नव्हते कि तिचं प्रेम कोण आहे.मी इतक्या जवळची असुन पण तिने कधी तुझ्याबद्द्ल सांगितले नाही.त्या दिवशी ती मला तु आणि तिच्या नात्याबद्दल सांगणार होती.पण......का केलं तु असे सांग" स्वरा संदीपची कॉलर पकडत रागाने म्हणाली.
संदीपने कॉलर झटकली आणि तो मोठ्याने हसायलाच लागला.
"हो मीच मारलं तिला.कारण माझ्याऐवजी तिच प्रमोशन होणार होतं..आणि......" पुढे संदीप काही बोलणार तोच त्याला मागुन आवाज ऐकु आला....
"फक्त वीस दिवस झालेत रिलेशन सुरु होउन आणि तु सारखं लग्नाचं विचारतेस.....अगं पोरी असतात कशाला टाइमपास करायला...." हा शिवमचा आवाज होता.
" हे तु......तुला कसं माहित हे मी फक्त अमृताला बोललो होतो.तेव्हा इथं फक्त आम्ही दोघेच होतो..." संदीप खुप घाबरला होता.
" अमृताने सांगितलं" पुढे येत शिवम म्हणाला.
" ए कायपण नको बडबडु...आणि पुढे नको येऊस नाहितर स्वराला पण खाली टाकेन.." संदीप बोलता बोलता मागे सरकत होता.अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पड्ला. हळुहळु सरकत कडेपाशी आला जिथे अमृता पडली होती.आता तोही अधांतरी हवेत लटकत होता..कसेबसे त्याने एका दगडाला पकडले होते.
" वाचवा वाचवा.." संदीप मोठ्याने ओरडायला लागला..
" वाचवेन पण आधी कबुल कर की तुच अमृताला मारलेय..." शिवम
" शिवम हे काय करतोय?? जाउदे त्याला तसंच खाली." स्वरा म्हणाली.
" नाही स्वरा त्याला आता कोर्ट्च शिक्षा करेल" असं म्हणत शिवमने मोबाइल मध्ये रेकॉर्डींग चालु केलं
" हो मीच मारलं तिला....." संदीपचे सगळे बोलणे शिवमने रेकॉर्ड केले.
" आता तरी वर घ्या मला...मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे..." संदीप ओरडला.
शेवटी स्वरा आणि शिवमने त्याला वर खेचले.
शिवमने स्वराला घट्ट मिठी मारली.दोघांच्याही डोळ्यांत पाणी होते. मोबाइल शिवमच्या हातात होता.तोच अचानक संदीपने बेसावध असलेल्या शिवमच्या हातातला मोबाइल हिसकुन घेतला आणि काय होतंय ते कळण्याच्या आत तो खाली दरीत टाकुन दिला.आणि स्वराच्या गालावर एक जोरदार ठोसा लगावला.त्यामुळे स्वरा खाली कोसळली आणि बेशुद्ध झाली.
" आता कोण शिक्षा करणार मला??कोण देणार पुरावा??हा हा हा.........." संदीप मोठ्याने हसायला लागला.
" तुला शिक्षा करायला पुराव्याची काय गरज आहे??" शिवमच्या मागुन आवाज आला.
संदीप तिकडे डोळे वटारुन पाहायला लागला.
" हे कसं शक्य आहे...!!!! तु......" संदीप घाबरला होता. कारण शिवमच्या मागे अमु होती.
" शिक्षा तर तुला होणारच....आठव तु मला कसं मरण्यासाठी सोडुन दिलंस....खाली पडले तरीही दहा मिनिटं जिवंत होते मी...." अमु चा चेहरा भयानक दिसत होता.
" नाही मला नको मारुस...प्लीज" असं म्हणत संदीप मागे मागे सरकायला लागला आणि अचानक त्याचा तोल गेला.
एक आर्त किंकाळी ऐकु आली आणि पुन्हा एकदा भयाण शांतता पसरली.
" शिवम....मी आता चालंलेय.खुप वाईट वाटतं की तु मला शोधायचा प्लॅन करत होतास आणि मी.....
अजुन एक प्रश्न पडलाय ना तुला की ते चार लोक जे तुझ्या आधी कामाला होते त्यांना मी का मारलं???कारण ते संदीपचे तट्टु होते. तुझ्यासोबत जे काही घडायचं त्याबद्द्ल स्वराला काहीही नको सांगुस नाहीतर ती मला कधीही विसरु शकणार नाही.स्वरा खुप आवडते ना तुला तिला लवकर प्रपोज मार मग..नाहीतर ती दुसर्या कोणाची तरी होईल...चल निघते मी आता....माझ्या आत्म्याला आता शांती लाभेल...काळजी घे..." असं म्हणत अमृता अदृश्य झाली.
तेवढ्यात स्वरा शुद्धीवर आली.
"शिवम,संदीप कुठे आहे???" तिने विचारले.
" संदीपला त्याच्या पापाचे प्रायश्चित मिळाले." शिवम शांतपणे म्हणाला.आणि क्षणभर शांतता पसरली.
" शिवम...शिवम कुठे आहेस तु?? दम लागला यार तुला शोधुन आणि तु??" या आवाजाने ती शांतता भंग पावली.तो अजिंक्य होता.
" शिवम चल लवकर.यार तु म्हणत होता ते खंर आहे वाटतं.खरंच आत्मा वगेरे असंत वाटतं.यार कालच न्युज वर भारतातले दहा हॉन्टेड प्लेस दाखवत होते आणि कदाचित त्यात हे देखील असेल प्लीज चल लवकर"
त्याच्या या बोलण्यावर शिवम हसायला लागला आणि पुन्हा सिंहगडावर भयाण शांतता पसरली
..................... समाप्त................

कथा

प्रतिक्रिया

जेपी's picture

28 Nov 2014 - 8:09 pm | जेपी

भर थंडीत घाम फुटला.
चान कथा.
पुस्तकासाठी शुबेच्छा.

कविता१९७८'s picture

28 Nov 2014 - 8:31 pm | कविता१९७८
कविता१९७८'s picture

28 Nov 2014 - 8:31 pm | कविता१९७८

मस्तच

एस's picture

28 Nov 2014 - 10:23 pm | एस

कशी काय सुचली ब्ब्वॉ?

चेतन677's picture

29 Nov 2014 - 11:24 am | चेतन677

खर तर....एकदा रात्री झोपलो असताना स्वप्नामध्ये कथा सुचली...लगेच लेखणी घेउन लिहुन काढली

स्वप्नज's picture

29 Nov 2014 - 6:52 pm | स्वप्नज

मस्त. झोपेत असताना सुचलीय होय..! ग्रेट आहात तुम्ही. झोपेतदेखील इतकी सुंदर कलाकृती साकारताय, मग जिवंतपणी (जागेपणी हो) तर तुमच्या लेखणीला अजून पंख फुटतील...
लिवा लिवा अजून

स्वप्नज's picture

29 Nov 2014 - 6:52 pm | स्वप्नज

मस्त. झोपेत असताना सुचलीय होय..! ग्रेट आहात तुम्ही. झोपेतदेखील इतकी सुंदर कलाकृती साकारताय, मग जिवंतपणी (जागेपणी हो) तर तुमच्या लेखणीला अजून पंख फुटतील...
लिवा लिवा अजून

योगी९००'s picture

1 Dec 2014 - 10:23 am | योगी९००

+१
अगदी हेच वाटले मला...

छान वर्णन . खिळवून ठेवलं अगदी.

अर्धवटराव's picture

28 Nov 2014 - 11:47 pm | अर्धवटराव

सुबोध भाईजान कार मधे आपली लव्हस्टोरी सांगतोय आणि मागे बसलेला समीर छातीमे खंजर खुपसल्यासारखं करतोय..

मुक्त विहारि's picture

29 Nov 2014 - 12:37 am | मुक्त विहारि

आवडली...

पुस्तकाच्या प्रतिक्षेत...

खटपट्या's picture

29 Nov 2014 - 12:38 am | खटपट्या

आवडली !!

चेतन677's picture

29 Nov 2014 - 1:21 pm | चेतन677

वरील (मागील भागांच्या) लिंक्स ओपन होत नाहीत.तरी त्यासाठी खाली क्लिक करा..
गुढ (एक रहस्य कथा-भाग १)

योगी९००'s picture

29 Nov 2014 - 6:37 pm | योगी९००

एकदम खिळवून ठेवणारी कथा... धनंजय वाचत होतो पण तो बाजूला ठेवला या कथेमुळे..!!

शिवम, स्वरा अशा नव्या प्रकारच्या नावांमुळे आणि वॉट्सअ‍ॅपच्या उल्लेखाने हल्लीच्या पिढीची ही कथा वाटली. संदिप हे नाव व्हिलनसाठी योग्य वाटले.

माझी कथा तुम्हा सर्वांना आवडली..पण माझ्या कथेपेक्षा चांगल्या कथेचं जाळं विणलं जाणारी कथा म्हणजे खोंड यांची पिंपळ ही कथा....कुणीतरी सांगा त्यांना की लवकर पुढील भाग प्रकाशित करा!!!!!

माझीही शॅम्पेन's picture

29 Nov 2014 - 9:16 pm | माझीही शॅम्पेन

जबरदस्त कथा , आवडली

तुम्ही स्व:ता सारख्या सारख्या प्रतिक्रिया देण टाळा .. लोकांना जरा तुमच कौतुक करू द्या

मुक्त विहारि's picture

30 Nov 2014 - 2:27 am | मुक्त विहारि

पहिलटकरणीचा आनंद आहे हा...

एकदा का परत परत बाळंतपणे व्हायला लागली की होईल सवय.

बघा पटत असेल तर, नाहीतर सोडून द्या...

अक्शु's picture

1 Dec 2014 - 6:12 am | अक्शु

कथेतील मागील भागानुसार शिवम आणि स्वरांजली या दोघांमध्ये फार चांगले वा घनिष्ट संबंध प्रस्थापित झाल्याचे जाणवत नाही. असे असून देखील शेवटच्या प्रसंगात संदीपने गुन्हा कबूल केल्यावर शिवमने स्वराला मिठी का बरे मारली असावी?

शिवमने स्वराला मिठी का बरे मारली असावी?
आवो नवीन पिढी हाये ही...उठसुट कोठल्याही कारणाला मिठी मारली जाते आणि साध्या गोष्टीमुळे break-up होतो.

बाकी नवीन शौकीन चित्रपट पाहीला का? त्यात अन्नूकपूर चा नव्या पिढीविषयी एक छान डायलॉग होता...(इथे देता येणार नाही मला तो..)

यात मला अजुन एक भर टिकायचीये...आय.टी कंपनीत फ्री वातावरण असते.तिथे पहीला दिवस जरि असला तरी मिठी मारतात.ते जास्त विचार करत नाहित

स्वप्नज's picture

1 Dec 2014 - 8:45 pm | स्वप्नज

खरं का? का उगाचच आपलं...?

-(२ वर्षे आयटीत राहूनही मिठीसुखापासून वंचित) स्वप्नज

टवाळ कार्टा's picture

1 Dec 2014 - 10:26 pm | टवाळ कार्टा

कंची कंपणी? ;)

स्वप्नज's picture

1 Dec 2014 - 10:43 pm | स्वप्नज

सांगा सांगा कंची कंपनी ?? पगार नसला तरी चालेल.

टवाळ कार्टा's picture

1 Dec 2014 - 10:51 pm | टवाळ कार्टा

पगार कंपनीला द्यायची पण तयारी आहे का? ;)

थॉर माणूस's picture

2 Dec 2014 - 9:58 am | थॉर माणूस

*ROFL* *ROFL* *ROFL*
क ह र...
कथा वाचून इथल्याच एका जुन्या लेखकाची आठवण झाली आणि ड्वाले पानावले.

पुस्तकासाठी खूप खूप शुभेच्छा.