(पडुन आहे सार्त्र अजुनी)

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
14 Nov 2014 - 12:54 pm

पडुन आहे सार्त्र अजुनी भावड्या निजलास का रे?
एवढ्यातच त्या कम्यूवर तू असा थकलास का रे?

अजुनही रचल्या न थप्पी रँडतैच्या पुस्तकांच्या
अजुन ’भू’ खचली कुठे रे? हाय! तू खचलास का रे?

सांग, ह्या बाख्तीनदाच्या भाविकाला काय सांगू?
नच कळे आम्हास ते जे आणि तू रुसलास का रे?

बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा फ़्रांत्स काफ़्का,
’रातपारीला बनूनी कीट वळवळलास का रे?’

उगवती डोक्यात माझ्या ’जागतिक’च्या पायवाटा
तू बिचार्‍या वाचकांना एवढा छळलास का रे?

-- स्वामी संकेतानंद

हझलविडंबनगझलसाहित्यिक

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

14 Nov 2014 - 12:56 pm | टवाळ कार्टा

=))

सतिश गावडे's picture

14 Nov 2014 - 12:59 pm | सतिश गावडे

जबरा रे स्वाम्या.

रच्याकने माझ्याकडे मराठी "अ‍ॅटलास श्रग्ड" पडून आहे. कुणाला वाचावयाचे असल्यास परत करण्याच्या बोलीवर देऊ शकेन.

स्वामी संकेतानंद's picture

14 Nov 2014 - 1:13 pm | स्वामी संकेतानंद

तुहं 'सात सक्कं त्रेचाळीस' म्या अजुनही वापिस केलो नाही. तवा दोन्ही एकाच येरी वापिस कराच्या बोलीवर घेऊन जातो... का मन्तस? ;)

सतिश गावडे's picture

14 Nov 2014 - 1:25 pm | सतिश गावडे

असं नाही चालायचं गडया. ते पुस्तक दयायचं आणि दुसरं पुस्तक न्यायचं. हा फंडा मी पुस्तक देताना सगळ्यांच्याच बाबतीत वापरतो.
हाडाचा वाचक माझं आधीचं पुस्तक परत करतो कारण त्याला माझ्याकडील दुसरे पुस्तक न्यायचे असते. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2014 - 1:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

हाडाचा वाचक माझं आधीचं पुस्तक परत करतो...
म्हणजे तुम्ही फक्त वेताळ वेग्रेंना पुस्तके देता होय. ठीकाय, मग मी नाही येणार ;)

सतिश गावडे's picture

14 Nov 2014 - 1:41 pm | सतिश गावडे

काका, थोडक्यात काय तर तुमच्यातल्या डॉक्टर अधून मधून डोकावतो. :)

बॅटमॅन's picture

14 Nov 2014 - 1:02 pm | बॅटमॅन

हा हा हा =)) एकच नंबर =))

सूड's picture

14 Nov 2014 - 1:04 pm | सूड

ह्याची सर नाही आली.

आतिवास's picture

14 Nov 2014 - 1:04 pm | आतिवास

विडंबन चांगलं जमलंय.
पण आपल्या भारतीय विचारवंतांना विसरलात याबद्दल निषेध! :-)

स्वामी संकेतानंद's picture

14 Nov 2014 - 1:14 pm | स्वामी संकेतानंद

ते विषयांतर झालं असतं... :)

जेपी's picture

14 Nov 2014 - 1:07 pm | जेपी

=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2014 - 1:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

जबरा जमलय ! :)

पण, तिकडे पाऊस पडला की इकडे छत्री उघडणार्‍या भार्तिय इचारवंतांना इसार्ल्याबद्दल दण्कून णीशेद ;)

स्वामी संकेतानंद's picture

14 Nov 2014 - 2:12 pm | स्वामी संकेतानंद

त्यांचा सत्कार वेगळ्या धाग्यावर केला जाईल.. ;)

हे आश्वासन लक्षात ठेवा. आम्ही यथावकाश आठवण करून देऊच!

स्वामी संकेतानंद's picture

14 Nov 2014 - 2:45 pm | स्वामी संकेतानंद

डन!

पैसा's picture

14 Nov 2014 - 1:22 pm | पैसा

जबरदस्त! या सगळ्या बुकांचे रद्दी म्हणून किती पैशे येतील स्वाम्या?

स्वामी संकेतानंद's picture

14 Nov 2014 - 2:09 pm | स्वामी संकेतानंद

माझा तरी वर्षाचा खर्च निघेल ब्वा !

सविता००१'s picture

14 Nov 2014 - 1:51 pm | सविता००१

:)

अनुप ढेरे's picture

14 Nov 2014 - 2:35 pm | अनुप ढेरे

हा हा, भारी!

अत्रुप्त आत्मा's picture

14 Nov 2014 - 3:13 pm | अत्रुप्त आत्मा

स्वामिज्ज्जीईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif

@बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा फ़्रांत्स काफ़्का, http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif

राजेश घासकडवी's picture

15 Nov 2014 - 8:58 am | राजेश घासकडवी

विडंबन आवडलं.

तिमा's picture

15 Nov 2014 - 10:30 am | तिमा

विडंबन आवडलं. एक चांगला प्रयत्न. काही शब्द मात्र गेयतेच्या आड येतात.

स्वामीजी
सार्त्र विषयी तुमचं विडंबन बाह्य मत काय आहे
जाणुन घ्यायला आवडेल
तुम्ही त्याच्या विचारांविषयी काय विचार करता ?
विडंबना ची झकास भट्टी जमलेली आहे हे वेगळ सांगायला नको

स्वामी संकेतानंद's picture

17 Nov 2014 - 10:11 am | स्वामी संकेतानंद

दोनतीन महिन्यांनी कळवेन माझे मत. सार्त्रविषयी सविस्तर लिहायला हरकत नाही.