✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(पडुन आहे गात्र कुजुनि)

म — मेघवेडा, गुरुवार, 11/11/2010 - 04:57
प्रियालीतैंच्या "भयंकर, भेसूर आणि अमानवी काव्य" या धाग्यावर केलेलं विडंबन आहे. तेव्हा दोनच कडवी लिहिली होती. आता पूर्ण काव्याचं विडंबन देतो आहे. सुरेश भट साहेबांच्या या अजरामर कलाकृतीचं हे बीभत्स विडंबन केल्याबद्दल त्यांची माफी मागतो. सिच्युएशन अशी आहे : प्रेयसीला सोडून प्रियकर एकटाच जळाला आहे. तिला प्रेत आणि आत्मा यांच्या वेशीवर सोडून तो एकटाच सुटला आहे. पडुन आहे गात्र कुजुनि, राजसा जळलास का रे? सोडुनि मज प्रेतरूपी, एकटा पळलास का रे? अजुनही विझल्या न मसणि तव चितेच्या उग्र ज्वाला अजुन मी जळले कुठे रे हाय तू शिजलास का रे? आग या मसणात पडलेल्या शवाला लाव ना तू कुजतसे अंगांग माझे, येत आहे वास का रे? बघ जरा कुजतोच आहे, दक्षिणेचा हात माझा नाक आणि कान कुजले, एवढा उरला घसा रे उसळती पोटात माझ्या आम्लपित्ताच्याच लाटा आतडे फुटले बिचारे, यकृताचीही दशा रे गोठलेले थंड सारे, गात्र करि हे बंड सारे विझुन गेलेल्या चितेवर अजुनही मज भरवसा रे ****************************************************************** मूळ गीत. तरूण आहे रात्र अजुनि

प्रतिक्रिया द्या
6618 वाचन

💬 प्रतिसाद (20)

वाह वाह! वाह वाह!!

प्रियाली
गुरुवार, 11/11/2010 - 05:04 नवीन
असे म्हणायलाच पाहिजे ना. ;)
अजुन मी जळले कुठे रे हाय तू शिजलास का रे?
हाय तू विझलास का रे? असे सुद्धा चालेल.
आग या मसणात पडलेल्या शवाला लाव ना तू कुजतसे अंगांग माझे, येत आहे वास का रे?
हाहाहाहाहा!!!!! अरे काय हा भयंकरपणा. ;)
  • Log in or register to post comments

व्यॉSSSSक!!

असुर
गुरुवार, 11/11/2010 - 05:10 नवीन
व्यॉSSSSक!! अ‍ॅबसोल्यूटली घाण!!! :D बीभत्स रसाची परिसीमा गाठल्याबद्दल मेघवेडा यांचे अजीर्ण होईपर्यंत अभिनंदन! मेव्या, *ड्या, तुझ्या घाणेड्रं लिहीण्याला काय लिमिट?? =)) =)) किमान एका व्यक्तीस तरी हे विडंबन वाचून भडभडून उलटी करावीशी वाटली तर या कवितेच्या जन्माचे सार्थक झाले असे म्हणेन!!! ;-) * = ग! भलते अर्थ काढू नयेत!!! --असुर
  • Log in or register to post comments

अगदी

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 11/11/2010 - 10:20 नवीन
मेव्या, बीभत्स रसातलं काहीही साहित्य कधीही वाचावं लागेल असं वाटलं नव्हतं; पण तू हा समज खोटा ठरवलास! झक्कास, ए१ जमलं आहे विडंबन आणि प्रियालीच्या सुचवणीशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

+१

सूड
गुरुवार, 11/11/2010 - 13:38 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

+२

नंदन
Fri, 11/12/2010 - 03:24 नवीन
सहमत आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

+३

प्रभो
Fri, 11/12/2010 - 20:04 नवीन
सहमत आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

:-)

सहज
गुरुवार, 11/11/2010 - 06:45 नवीन
हा हा!
  • Log in or register to post comments

अति कुजकट झाले आहे

बेसनलाडू
गुरुवार, 11/11/2010 - 07:10 नवीन
पण अजुनही विझल्या न मसणि तव चितेच्या उग्र ज्वाला अजुन मी जळले कुठे रे हाय तू शिजलास का रे? हे आवडले. शिजलास ऐवजी विझलास ही प्रियालीताईंची सुचवणी योग्य वाटते. (जागृत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

ख त र ना क !!!

अवलिया
गुरुवार, 11/11/2010 - 12:47 नवीन
ख त र ना क !!!
  • Log in or register to post comments

मस्त!

राजेश घासकडवी
गुरुवार, 11/11/2010 - 12:48 नवीन
बीभत्स रसाच्या परिसीमेची खूण म्हणजे 'और आने दो' वगैरे म्हणावंसं वाटत नाही... तसंच झालंय. खरं म्हणजे अजून येऊ देत, पण एवढ्यात नको :)
  • Log in or register to post comments

+१

अस्मी
Sat, 11/13/2010 - 12:22 नवीन
सह्ही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

भयानक! बीभत्स रसाला छान छान

यशोधरा
गुरुवार, 11/11/2010 - 12:51 नवीन
भयानक! :D बीभत्स रसाला छान छान कसं म्हणायचं म्हणून फक्त! भारी भयानक जमलय मात्र!
  • Log in or register to post comments

इनो घ्यावंसं वाटतंय !!

सूड
गुरुवार, 11/11/2010 - 13:46 नवीन
इनो घ्यावंसं वाटतंय !! Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त अमोल

अमोल केळकर
गुरुवार, 11/11/2010 - 18:01 नवीन
मस्त :) अमोल
  • Log in or register to post comments

कळस!

पैसा
गुरुवार, 11/11/2010 - 20:14 नवीन
बीभत्स रसाचा कळस गाठलास, तो पण मात्रेत जराही ओढाताण न करता. याहून भयानक (आणि तरी विनोदी) लिहिता येणं कोणालाही अशक्य आहे!
  • Log in or register to post comments

मस्त रे मेव्या :

प्रीत-मोहर
गुरुवार, 11/11/2010 - 21:47 नवीन
मस्त रे मेव्या :
  • Log in or register to post comments

भय रसाच्या ऐवजी बीभत्स रसात

अविनाशकुलकर्णी
Fri, 11/12/2010 - 06:53 नवीन
भय रसाच्या ऐवजी बीभत्स रसात काव्य रचना झाल्याने झंडु बाम झाला
  • Log in or register to post comments

खल्लास तरूण आहे रात्र अजुनि

नरेशकुमार
Fri, 11/12/2010 - 08:25 नवीन
खल्लास तरूण आहे रात्र अजुनि हे गाने आयुश्यात ऐकुन जानार नाहि आता. ह्याचिच आठवन येतिल. ------------------------------------------------------------------------------------- सहि एक रिप्लाय द्या मझ्या ब्लोग वर. ग्लोगलगाय च्या.
  • Log in or register to post comments

जबराट ... गोठलेले थंड सारे,

फ्रॅक्चर बंड्या
Fri, 11/12/2010 - 13:33 नवीन
जबराट ... गोठलेले थंड सारे, गात्र करि हे बंड सारे विझुन गेलेल्या चितेवर अजुनही मज भरवसा रे आवडले ..
  • Log in or register to post comments

वॅक्क ! वॅक्क्क्क्क

मितान
Sat, 11/13/2010 - 15:30 नवीन
वॅक्क ! वॅक्क्क्क्क !!!! भयानक घाण आहे हे सारं ! झोपेत आठवले तर ओकत उठेन मी !!!!! घाणेरडा आहेस ! आता आशाबाईंच्या आवाजात हे शब्द ऐकू येतील !!! आता तुझ्या एखाद्या आवडत्या गाण्याची वाट लावलीच पाहिजे मला ! हे सुरांनो चंद्र व्हा.....
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा