जम्मू- कश्मीर मदत कार्य अनुभव- १

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
29 Oct 2014 - 4:51 pm

सर्वप्रथम मिपा संस्कृतीला मन:पूर्वक अभिवादन! मिपा टीम आणि मिपावरील सर्व मान्यवर लेखक- वाचकांना मन:पूर्वक नमस्कार. आज मिपावर लिहायला सुरूवात करताना आदराची भावना मनात आहे. आजवर मिपावर असंख्य दर्जेदार, अभ्यासपूर्ण आणि रंजक लेख वाचले. अशा मिपावर लेखन करताना सर्वांना पुनश्च अभिवादन करावसं वाटत आहे. हे लिहिण्याची सुविधा दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद किंवा मिपा भाषेत धन्स! :)

पूरग्रस्त जम्मू- कश्मीरमध्ये मदत कार्यात थोडा सहभागा घेता आला; त्याबद्दल काही लिहू इच्छितो. जम्मू- कश्मीरच्या 240 हून अधिक गावांमध्ये एकल विद्यालये आणि अन्य प्रकल्प चालवणा-या सेवा भारती जम्मू- कश्मीर संस्थेने तिथे मोठं मदतकार्य केलं आहे. त्यामध्ये 15 दिवस सहभाग घेतल्याचे हे अनुभव हिंदीमध्ये ब्लॉगवर प्रकाशित करत आहे आणि इथे त्याचा सारांश देत आहे. सेवा भारती जम्मू- कश्मीरसोबत मदत कार्यासाठी देशभरातून 200 पेक्षा जास्त डॉक्टर्स आणि व्हॉलंटिअर्स अनेक टप्प्यांमध्ये तिथे आले होते. मदत कार्याचा मुख्य भर आरोग्य शिबिरांवर होता. आता पुढच्या टप्प्यात उपजीविका आणि घरांसाठी सहाय्य असा प्रयत्न केला जात आहे.

. . जम्मूहून श्रीनगरला जाताना बनिहालमार्गे असलेला मुख्य रस्ता काही ठिकाणी बंद असल्यामुळे जातानाच राजौरी व पुलवामासारख्या प्रसिद्ध भागातून तिथे जावं लागलं. श्रीनगरपर्यंतच्या प्रवासात सोबत असलेले कश्मिरी लोक फारसे बोलत नव्हते. 5 ऑक्टोबरला ईदच्या रात्री श्रीनगरला पोहचलो तेव्हा पूराच्या खुणा लगेचच दिसत नव्हत्या. उलट लोक परत सामान्य स्थितीत आहेत, असं वाटत होतं. काही रस्त्यांवर कचरा होता आणि काही ठिकाणी तुंबलेलं पाणी अजूनही दिसत होतं. संस्थेच्या कार्यालयाकडे जाण्यासाठी रिक्षात बसण्यापूर्वी रिक्षावाल्याने हिंदु का मुसलमान असं विचारलं! संस्थेच्या मगरमल बाग़ चौकाजवळ दोन एँब्युलन्स संस्थेद्वारे केले जाणारे मदत कार्य दर्शवत होत्या.

सेवाभारती जम्मू कश्मीरच्या मदत कार्याचा व्हिडिओ

अधिक माहितीसाठी:
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १

क्रमश:

सर्वांना पुनश्च धन्यवाद.:)

समाजविचार

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

29 Oct 2014 - 4:54 pm | बॅटमॅन

साहेब, जरा अजून विस्ताराने लिहा की हो. लै जबराट विषय अन तुमचे अभिनंदन.

आदूबाळ's picture

29 Oct 2014 - 5:02 pm | आदूबाळ

पुभाप्र!

जाहिरात करा हो ब्लॉगची हर्कत इल्ले.
पण इथेही लेखन द्या. हाफिसातून ब्लॉग्ज उघडत नाहीत.

गिरीश मांधळे's picture

29 Oct 2014 - 5:34 pm | गिरीश मांधळे

अखेर मार्गी आला !

जरा विस्तारानं सविस्तर वर्णन वाचण्यास उत्सुक.

बाकी तुम्ही केलेल्या मदत कार्याबद्दल धन्यवाद व अभिनंदन.

प्रसाद१९७१'s picture

29 Oct 2014 - 6:23 pm | प्रसाद१९७१

कॉमेंटी राखुन ठेवण्यात आल्या आहेत.

बोका-ए-आझम's picture

29 Oct 2014 - 7:02 pm | बोका-ए-आझम

पुभाप्र. ब्लाॅगची लिंक द्याल का?

विकास's picture

29 Oct 2014 - 7:19 pm | विकास

मिसळपाव संस्थळावर आपले स्वागत आहे! पूरग्रस्तांना केलेल्या सेवाकार्याबाबत आपण आपले अनुभव कथन करत आहात त्याबद्दल आभार!

आपण पुढच्या भागात काही फोटो टाकले तसेच काही प्रसंगावर अधिक विस्ताराने लिहीले तर वाचकांना अजून आवडू शकेल.

पुढच्या भागासाठी शुभेच्छा!

विवेकपटाईत's picture

29 Oct 2014 - 8:07 pm | विवेकपटाईत

आवडला. विस्ताराने लिहिले तर वाचायला अधिक आनंद येईल.

मार्गी's picture

30 Oct 2014 - 4:58 am | मार्गी

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! इथून पुढे अगदी सविस्तर लिहेन. सारांश न लिहिता इथे पूर्ण लिहेन. पुढचा भाग लवकरच लिहेन. :)

देवदत्त परुळेकर's picture

30 Oct 2014 - 9:04 am | देवदत्त परुळेकर

सुरवात उत्तम. सविस्तर लिहा.

पैसा's picture

30 Oct 2014 - 5:34 pm | पैसा

सविस्तर वाचायला आवडेल!

सुहास..'s picture

30 Oct 2014 - 6:37 pm | सुहास..

गुड !!

अर्धवटराव's picture

1 Nov 2014 - 1:20 am | अर्धवटराव

लाख मोलाचं कार्य आहे.

संस्थेच्या कार्यालयाकडे जाण्यासाठी रिक्षात बसण्यापूर्वी रिक्षावाल्याने हिंदु का मुसलमान असं विचारलं!

याचा काहि संदर्भ लागला का पुढे ?