मला हे हे पाहीजे !

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
26 Sep 2014 - 11:35 am

माझी गरज !

सध्याच्या काळात कोणता मोबाईल खालील गरजा पूर्ण करू शकतो...

• डुअल सिम
• साधी सोपी पिन असणारा चार्जर(कुठेही उपलब्ध होइल असा)
• की पॅड
• एफ एम ट्रान्समिटर असेल तर उत्तम
• २जी, ३जी वगैरे
• वाय फाय
• एफ एम रेडीयो अँटेनाविना असेल तर उत्तम
• बरा कॅमेरा
• ब्लु टूथ
• कंप्यूटरवरून डेटा ट्रान्सफरसाठी यूएसबी
• नवे नवे प्रॉग्रॅम्स टाकण्याची, डेव्हलप करण्याची सोय
• मराठी टाईप करण्याची सोय(शक्यतो ऑफलाइन)
• दिशादर्शक, तापमापक, हवेचा दाब या गोष्टी दाखवणार असेल तर उत्तमच
• बर्‍यापैकी स्पीड, नेट वापरताना विशेषतः
• पंचांगासारखी अ‍ॅप्लिकेशन्स असतील तर उत्तम

अनेकदा नवा हायफाय मोबाईल आपण घेतो तेव्हा गृहीत धरतो की बॅकवर्ड काँपॅटिबल असेल. पण मागची अनेक उपयुक्त फीचर्स काढून टाकलेली असतात. का काही कळत नाही.

टचस्क्रीनचा एक अनुभव - परवा हापिसातली ताई सांगत होती. टचस्क्रीन मुलींसाठी अजिबात चांगला नाही. कुठलेही हात मोबाईलला टच करतात. (म्हणजे स्वयंपाक करताना फोन आला तर वगैरे !)

नोकीया-एक्स पाहण्यात आला. उत्तम फीचर्स आहेत. पण कीपॅड
नाही. टचस्क्रीन आहे. नवे प्रॉग्रॅम्स टाकणे अवघड आहे.

नोकीया २०८ हा बरा आहे. पण दोन गोष्टी खटकल्या कॅमेरा १.३ MP आणि वाय फाय नाही.

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

काळा पहाड's picture

26 Sep 2014 - 11:45 am | काळा पहाड

कुठलाही अँड्रॉईड घ्या. अँड्रॉईड वन हा नवीन आलेला आहे. बाकी २ गोष्टी कळल्या नाहीत.
१. तुम्ही आणि पंचांग?
२. हवेचा दाब कशासाठी मोजायचा आहे?

आशु जोग's picture

26 Sep 2014 - 10:06 pm | आशु जोग

पंचांग आजची तिथी इ पहायला.
नोकीयाच्या पूर्वीच्या एका मॉडेलमधे होते हे फीचर.

हवेचा दाब इ
बाहेर फिरायला जाताना, ट्रेकींगच्यावेळी या गोष्टी उपयोगाला येतील. या गोष्टी ऑप्शनल आहेत.

विलासराव's picture

26 Sep 2014 - 11:41 am | विलासराव

बाकी या विषयात आपण अज्ञानीच हावोत.

विजुभाऊ's picture

26 Sep 2014 - 11:51 am | विजुभाऊ

काही फोन /घड्याळे ही पाण्याखाली ४० मिटर खोलीवरही देखील काम करतात म्हणे
मला प्रश्न पडतो की पाण्याखाली तुम्ही पोहताना कोण येणार आहे वेल विचारायला?
आता त्या तशा जागेत एखाद्या क्रेडीट कार्डवाल्या अप्सरेचा किंवा लोन हवेय का विचारणार्‍या यक्षाचा फोन येणे शक्य आहे.
पण तुम्ही पाण्याखाली पोहत असताना किंवा बुडत असताना रीप्लाय करणार कसे त्याना?

दिपक.कुवेत's picture

26 Sep 2014 - 1:02 pm | दिपक.कुवेत

तुमच्या गरजा तुर्तास मोबाईलवरच थांबल्या आहेत. जाणकार मिपाकरांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

दिपक.कुवेत's picture

26 Sep 2014 - 1:08 pm | दिपक.कुवेत

हे कळलं नाहि. म्हणजे आम्हि तरी जेवण डाव, पळी वापरुन करतो अपवाद फक्त पोळ्या करताना. पण तरीसुद्धा डाव्या हाताने ट्चस्क्रिन अनलॉक करुन मोबाईल स्पीकर वर टाकून बोलू शकतो.

काउबॉय's picture

26 Sep 2014 - 1:09 pm | काउबॉय

हे खरय.

साती's picture

26 Sep 2014 - 1:56 pm | साती

साधा सॅमसंग ड्युओ.
१०००० ला येतो.
तुम्ही म्हणताय त्या सगळ्या सुविधा आहेत.
नविन प्रोग्रॅम डेव्हलप होतात की नाही ते फक्तं माहित नाही.
एकदा हात बसल्यावर मराठी टाईप करायला सोप्पं आहे पण फाँट एवढा चांगला नाही.

आणि टच स्क्रीनला हात लावण्याचे म्हणाल तर स्वयंपाक करणारे काय फ्रीजच्या दरवाज्याची दांडी पण खराब करतात.
त्यावर कसं खास प्लॅस्टिकचं गुंडाळणं येतं तसं स्क्रीन गार्ड बसवायचं २०-२५ रु त.

साती's picture

26 Sep 2014 - 2:00 pm | साती

Samsung Galaxy S Duos 2 GT-S7582 (Black)
फ्लिपकार्डवर ८००० च्या आतही मिळतो.

माम्लेदारचा पन्खा's picture

26 Sep 2014 - 2:07 pm | माम्लेदारचा पन्खा

"" टचस्क्रीनचा एक अनुभव - परवा हापिसातली ताई सांगत होती. टचस्क्रीन मुलींसाठी अजिबात चांगला नाही. कुठलेही हात मोबाईलला टच करतात. (म्हणजे स्वयंपाक करताना फोन आला तर वगैरे !) ""

हापिसात ताई कशी येऊ शकते ????

एफ एम ट्रान्समिटर असेल तर उत्तम

????

त्यांना त्यांचं स्वत्ताचं स्टेशन काढायचं असेल. हजारो ख्वाइशें ऐसी...

नन्दादीप's picture

26 Sep 2014 - 2:22 pm | नन्दादीप

नोकिया x2

तुषार काळभोर's picture

26 Sep 2014 - 2:27 pm | तुषार काळभोर

इ स २०१७-१८ या आर्थिक वर्षाचं प्लॅनिंग दिसतंय!!

मिपावर मोबाईलसाठी अनेक धागे आले आहेत. प्रत्येकजण आपापल्या गरजेनुसार नविन धागा कशाला काढतो हे समजत नाही.

एकाच धाग्यावर सर्व मोबाईल फोनची चर्चा करणे सोपे नाही का? त्यामुळे एकाच ठिकाणी, एकाच धाग्यावर सर्व माहिती मिळू शकेल.
उदा. अ‍ॅन्ड्रॉईडसाठी हा धागा, ब्राउजर एक्स्टेंशन्ससाठी हा धागा.
स्मार्ट्फोनसाठी या एकाच धाग्यावर सर्व चर्चा करणे अवघड आहे का?
हे सर्व मिपाकारांना ऊद्देशुन लिहिले आहे. कृपया कोणीही वैयक्तिकरित्या गैरसमज करून घेऊ नये हि विनंती.

आशु जोग's picture

26 Sep 2014 - 9:25 pm | आशु जोग

यातल्या काही धाग्यांना मी प्रतिसादही दिले आहेत. पण मला जे पाहीजे ते त्यात नव्हते.

एफ एम ट्रान्समिटर - हो मला स्वतःचे रेडीयो केंद्र चालवायचे आहे. मोबाईलमधे गाणी आहेत. रेडीयोला स्पीकर आहे. दोघांमधे लिंकींग कसे करणार. त्यासाठी एफ एम ट्रान्समिटर.

नोकीया x2-02 मधे हे फीचर आहे. त्यावर मी धागा टाकला आहे.

टच स्क्रीन - कीपॅड इतका त्यामधे टाईप करताना स्पीड येत नाही. टच स्क्रीनवर अकारण टचकन कुठल्याही बटनाला टच होवू शकते. तो धोका घ्यायचा नाहीये.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Sep 2014 - 6:08 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

ब्लॅक बेरी घेवून पहा.किंवा तो तुझा आय-फोन ५.

भाते's picture

26 Sep 2014 - 8:10 pm | भाते

करवंद आणि पाचवा माझा भ्रमणध्वनी!

माई (इतर सर्व डुआयडी समाविष्ट),

मुंबई/पुणे/सोलापूर/कोल्हापूर/सातारा/सांगली…
कुठे मिळेल आता मला 'पाचवा माझा भ्रमणध्वनी'? सफरचंद वाल्यांनी कधीच हा भ्रमणध्वनी बंद केला आहे.
माझा भ्रमणध्वनी पाच स उपलब्ध आहे.
माझा भ्रमणध्वनी सहा साठी लाखभर दमड्या मोजाव्या लागतील.
करवंद, एका वर्षात किंमत ४४ (हजार) वरून १८ (हजार) वर आणणारे! (झबल १०)
आता त्यांचा पारपत्र येईलच ४८-५० (हजार) ला! पुढल्या वर्षी १५ (हजार) ला!
यापैकी कुठलाही भ्रमणध्वनी मला फुकट भेट म्हणुन घ्यायला आवडेल! :)

जीआेनी पायोनियर पी४ घ्या...८५०० पर्यंत मीळेल.
लेटेस्ट सर्व सुविधा आहेत.

होकाका's picture

27 Sep 2014 - 12:09 am | होकाका

आशू, हा दुवा जरूर पहा. तुम्हाला नक्की काय काय हवंय ते यात टाकून पहा:

http://www.flipkart.com/mobiles/pr?p[]=facets.operating_system%255B%255D...

आशु जोग's picture

27 Sep 2014 - 12:31 am | आशु जोग

वोके

मला हेच प्रश्न पडले होते ते मी नोकिआचा X2-00 मार्च२०१०मध्ये घेऊन ८० टक्के सोडवले. उरलेले २०टक्के कार्बन K20+ने. गाणी रेकॉर्ड WAV फॉर्मटमध्ये म्युझिक फाईलकरतो. टिव्हीची गाणीपण साउंड रेकॉर्डीँग याच फॉर्मटमध्ये आणि कैलिंडर तिथीचेपण आहे.

ब्लुटुथ स्पिकर घ्या. JBL चा २४००रु अथवा SDK (३इँची छोटी डबी +मेमरी कार्ड स्लॉट लि० बैटरी १५००रु) मधून गाणी स्ट्रिमिंग करा. पिकनिकला उपयोगी दणाणा वाजतात.

आता डेडिकेटिड GPS युनिट घ्या ८०००रु. यात वेळ उंची ,आद्रता तापमान आणि GPS असते गुगलमैपवर नंतर तुमचा ट्रेल सिंक्रनाईज करता येतो. हे युनिट ग्रुपमध्ये एकाकडे असले की झाले. हे युनिट बिबळयाचे रिसर्च करणाऱ्या मुलाकडे मी पाहिले आहे.या सायंटिफिक युनिटची क्षमता ५मिटर अक्षांश रेखांश असते. १५मिटर वाल्याची किंमत कमी असते.

ही फिचर्स कैसिओच्या डिजिटल वॉचमध्येही आहेत ८०००रू. अथवा लैक्रोस LACROSE कंपनीचे घडयाळ २०००रू येते हेपण चांगले चालते.

सध्या भ्रमणध्वनी संयंत्रातून 'कळ-पट' नाहीसा झाला आहे. तुम्ही म्हणता तसे सर्व वैशिष्ठ्य समाविष्ठ असणारे भ्रमणध्वनी संयंत्र वाजवी किमतीत मिळणे दुरापास्त आहे. पंचांग म्हणत असाल तर आपणास भिंतीवरी जे असावे (नंतरच्या 'टिंग SSS ' आवाजा सह ) त्याचे 'संगणकीय कोमल संस्करण' मिळते. आपणाला 'विद्युत चुंबकीय लहरी' सोडणारे यंत्र वितरणासाठी बाजारपेठेत उपलब्ध असते पण त्याकरिता शासकीय परवानगी घ्यावी लागेल. अथवा अभियांत्रिकी महाविद्यालाकडून तसा वापराबाबत दाखला आणावा लागेल.

आशु जोग's picture

28 Sep 2014 - 2:12 am | आशु जोग

पण त्याकरिता शासकीय परवानगी घ्यावी लागेल.

भारतामधे त्याला परवानगी आहे. रेंज कमी असावी आणि मोबाईल डिव्हाएसची रेंज कितीशी असणार. रेडीयो केंद्राच्या टोवरची उंचीच पहा. त्यामानाने काहीच नाही.

सवंगडी's picture

28 Sep 2014 - 9:08 am | सवंगडी

त्याला परवानगी आहे ?

?? मग साधा वाकी -टाकी घ्यायला कंपन्यांना सर्टिफिकेट ची गरज का ?

आशु जोग's picture

4 Oct 2014 - 3:49 pm | आशु जोग

अहो वाकी टाकीची फ्रीक्वेन्सी काय असते

होय सर्व एकाच फोनमध्ये मिळणार नाहीत. एफ एम ट्रान्समिटरवाला यांचा X2- 02 फोन इकडे मिळत होता तो नोकिआ ने नंतर मागे घेतला. एफेम रेकॉर्डिँगही कॉपिराईटच्या अडण्यामुळे काढण्यात आले. कार्बन K52, K9 मिळाल्यास घेऊन टाका.

आशु जोग's picture

4 Oct 2014 - 3:52 pm | आशु जोग

कंजूसराव
X2- 02 फोन वापरलेला आहे... बेस्ट फोन. इंटरनेट उत्तमरित्या चालते. फेसबुक इ. ची अ‍ॅप्लिकेशन्स आहेत. त्यात पुन्हा ड्यूएल सिम. पण व्हॉट्स अप वगैरे नाही चालत

X2 -02चा तुमचा धागा वाचला आहे. आता ज्या गोष्टी बंद झाल्या आहेत त्यामागे लागण्यात काय अर्थ आहे? मार्केट बरोबर चालावे लागते. पूर्वी किचिबो कंपनीचे १०बैंड रेडीओ मिळायचे त्यात पोलीसांच्या वॉकीटॉकिचे सिग्नल पकडायचे. यांची फ्रि०७७ मेगा हटर्ज ते ८७ दरम्यान असते रेंज १० ते १०० मिटरस असते.

मोबाईल आणि आपला आयुष्याचा जोडीदार स्वत:च निवडा. दुसर्‍याचे ऐकून या गोष्टी निवडण्याचे दिवस गेले आता. :)

आदूबाळ's picture

27 Sep 2014 - 9:14 pm | आदूबाळ

आणि गंजीफ्रॉकही.

धर्मराजमुटके's picture

27 Sep 2014 - 9:19 pm | धर्मराजमुटके

गंजीफ्रॉक निवडण्यासाठी गंजीफ्रॉकच्या झैरातीतल्या ललनेची मदत घ्या.

आतापर्यँत दुसऱ्याचे ऐकून जोडीदार निवडत होते का ?निवडलेल्या जोडीदाराला घरच्यांकडुन विरोध होतो इतकेच.

सवंगडी's picture

28 Sep 2014 - 9:11 am | सवंगडी

गन्जीफ्राक ??? त्यात जर पद्मश्री श्री श्री सैफ अली खान राजे साहेबांची मदत घेतली तर ओ ??

प्रसाद गोडबोले's picture

28 Sep 2014 - 10:16 am | प्रसाद गोडबोले

तुमच्या लेखाला चोउकट कशी आली , काही हटमल कोड वापरला का ? मला तो कोड हवाय :ड

आशु जोग's picture

28 Sep 2014 - 9:23 pm | आशु जोग

हो ह्टमल

पिलीयन रायडर's picture

30 Sep 2014 - 10:00 am | पिलीयन रायडर

प्रतिसादाला पण येते आहे... माझ्याही प्रतिसादाला येतेय का ते पहायला टंकतये..

तुमच्या मुळ प्रश्नाशी संबंधित काहीही माहिती मला नाही...

कंजूस's picture

28 Sep 2014 - 11:21 am | कंजूस

हाईलाईट करता येते.

कंजूस's picture

29 Sep 2014 - 3:19 am | कंजूस

p{ border:1px solid red;}प्रत्येकाला आपल्या आवडीच्या गोष्टी मोबाईलमध्ये हव्याशा वाटतात. मला कैमरा बटण असलेले आवडते.

आशु जोग's picture

29 Sep 2014 - 7:09 pm | आशु जोग

आणखी एक -

मल्टिटास्किंग असायला हवे. जिथे नसेल तिथे वापरावर बंधने येतात. विशेषतः नेट बँकिंग