मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मला हे हे पाहीजे !

आशु जोग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार

माझी गरज !

सध्याच्या काळात कोणता मोबाईल खालील गरजा पूर्ण करू शकतो... • डुअल सिम • साधी सोपी पिन असणारा चार्जर(कुठेही उपलब्ध होइल असा) • की पॅड • एफ एम ट्रान्समिटर असेल तर उत्तम • २जी, ३जी वगैरे • वाय फाय • एफ एम रेडीयो अँटेनाविना असेल तर उत्तम • बरा कॅमेरा • ब्लु टूथ • कंप्यूटरवरून डेटा ट्रान्सफरसाठी यूएसबी • नवे नवे प्रॉग्रॅम्स टाकण्याची, डेव्हलप करण्याची सोय • मराठी टाईप करण्याची सोय(शक्यतो ऑफलाइन) • दिशादर्शक, तापमापक, हवेचा दाब या गोष्टी दाखवणार असेल तर उत्तमच • बर्‍यापैकी स्पीड, नेट वापरताना विशेषतः • पंचांगासारखी अ‍ॅप्लिकेशन्स असतील तर उत्तम अनेकदा नवा हायफाय मोबाईल आपण घेतो तेव्हा गृहीत धरतो की बॅकवर्ड काँपॅटिबल असेल. पण मागची अनेक उपयुक्त फीचर्स काढून टाकलेली असतात. का काही कळत नाही. टचस्क्रीनचा एक अनुभव - परवा हापिसातली ताई सांगत होती. टचस्क्रीन मुलींसाठी अजिबात चांगला नाही. कुठलेही हात मोबाईलला टच करतात. (म्हणजे स्वयंपाक करताना फोन आला तर वगैरे !) नोकीया-एक्स पाहण्यात आला. उत्तम फीचर्स आहेत. पण कीपॅड नाही. टचस्क्रीन आहे. नवे प्रॉग्रॅम्स टाकणे अवघड आहे. नोकीया २०८ हा बरा आहे. पण दोन गोष्टी खटकल्या कॅमेरा १.३ MP आणि वाय फाय नाही.

वाचन 7387 प्रतिक्रिया 40