अँड्राईड अ‍ॅप बनवणारे मिपावर कुणी आहेत का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
14 Sep 2014 - 12:02 am

कठीण समय येता, कोण कामासी येतो?

ह्याचे उत्तर निदान आम्हाला तरी मिळाले आहे.

त्यामुळेच हा धागा प्रपंच.

मला आणि माझ्या एका मित्राला एक अँड्रॉईड अ‍ॅप बनवुन हवे आहे.

आमची २०,००० रुपयांपर्यंत खर्च करायची तयारी आहे.

आपल्या मिपावर, कुणी ह्या प्रकारात तज्ञ असेलच असे आमची मनोदेवता सांगत आहे.

जीवनमानसल्ला

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

14 Sep 2014 - 12:05 am | टवाळ कार्टा

मी अजुन कधी बनवले नाही...पण जर कोणी पुढाकार घेणार असेल तर संघ-सदस्य बनायला आवडेल
आणि हो...मी पयला :)

मुक्त विहारि's picture

14 Sep 2014 - 12:12 am | मुक्त विहारि

हम ठाणे में आनेवाले हय, उस टाइम भी तुम पयलाच मंगता हय...

बाद में दात दुखी का बहाणा नहीं बोलणेका..

टवाळ कार्टा's picture

14 Sep 2014 - 12:41 am | टवाळ कार्टा

फिकर नॉट...मय हय इद्दरईच

मुक्त विहारि's picture

14 Sep 2014 - 12:59 am | मुक्त विहारि

चला आता जास्त दंगा नको करायला...

नाहीतर पराशेठ म्हणतील, धाग्याचा खरडफळा केला, म्हणून...

सुखी's picture

14 Sep 2014 - 12:39 pm | सुखी

व्यनि केला अाहे

सुखी's picture

14 Sep 2014 - 12:39 pm | सुखी

व्यनि केला अाहे

विश्वनाथ मेहेंदळे's picture

14 Sep 2014 - 5:30 pm | विश्वनाथ मेहेंदळे

भारतात असाल तर फोन करा. नाहीतर व्यनि आहेच.

मी एकदा सम आणि विषम संख्या ओळखणारे अ‍ॅप बनवले होते. मात्र व्यावसायिक पातळीवरचे अ‍ॅप बनवून शकेन का याबद्दल साशंक आहे. :)

असो या धाग्याच्या निमिताने अँड्रॉईड प्रोग्रामिंगची मदत कुणाकडे मागायची हे कळेल.

एक गरीब प्रश्नः सम आणि विषम संख्या ओळखायला अ‍ॅप कशाला लागतं?

अ‍ॅप डेव्हलपमेंटचा सराव म्हणून केलं होतं का?

डाउनलोड लिंक डाक्वायला विसरु नका.

थोडीफार मदत करू शकेन. एकट्याने अ‍ॅप बनवण्याइतका वेळ मिळेल का याबाबत साशंक आहे.

उपास's picture

16 Sep 2014 - 5:43 pm | उपास

डिझाईन लेव्हल वर आणि टेक्नोलॉजी साठी (उदा. एंग्युलर जे एस, फोन गॅप) मदत करु शकेन, अ‍ॅप डेव्हलप करायला वेळ गाठीशी आहे असे वाटत नाही. डिझाईन रेडी झाले की elance.com, guru.com वा तत्सम ठिकाणांवरुन डेव्हलप करुन घेता येईल. व्यनि केलात तर सविस्तर बोलता येईल. शुभेच्छा!

सुधीर's picture

16 Sep 2014 - 8:39 pm | सुधीर

वेब-बेस्ड अ‍ॅप्/सॉफ्टवेअर (पिएचपी-मायएसक्यूअल वा जावा बेस्ड) बनवून देणार्‍या आणि कुठल्या वेबसाईट्स आहेत का? जिथे पुण्या-मुंबईतले डेव्हलपर्स काम करून देऊ शकतील. जेणे करून प्रत्यक्ष भेटून बोलता येईल.
मुविंना धाग्यसाठी धन्यवाद!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Sep 2014 - 12:20 am | विश्वनाथ मेहेंदळे

व्यनि केलाय.

विलासराव's picture

17 Sep 2014 - 12:21 am | विलासराव

माझं काम कधी करताय?

उपास's picture

17 Sep 2014 - 8:59 pm | उपास

नमस्कार सुधीर,
तुम्हाला व्यनि केला आहे..
मुवी, तुम्हाला नेमकं काय हवं आहे ते कळलं तर पुढे जाता येईल, व्यनि करु शकाल का?
विमे, तुम्ही तत्सम काम स्वतः करता काय, भेटावयास आवडेल (समानशीले व्यसनेषु सख्यम..) :)