मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अँड्राईड अ‍ॅप बनवणारे मिपावर कुणी आहेत का?

मुक्त विहारि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कठीण समय येता, कोण कामासी येतो? ह्याचे उत्तर निदान आम्हाला तरी मिळाले आहे. त्यामुळेच हा धागा प्रपंच. मला आणि माझ्या एका मित्राला एक अँड्रॉईड अ‍ॅप बनवुन हवे आहे. आमची २०,००० रुपयांपर्यंत खर्च करायची तयारी आहे. आपल्या मिपावर, कुणी ह्या प्रकारात तज्ञ असेलच असे आमची मनोदेवता सांगत आहे.

वाचने 3473 वाचनखूण प्रतिक्रिया 16

टवाळ कार्टा 14/09/2014 - 00:05
मी अजुन कधी बनवले नाही...पण जर कोणी पुढाकार घेणार असेल तर संघ-सदस्य बनायला आवडेल आणि हो...मी पयला :)

धन्या 14/09/2014 - 17:35
मी एकदा सम आणि विषम संख्या ओळखणारे अ‍ॅप बनवले होते. मात्र व्यावसायिक पातळीवरचे अ‍ॅप बनवून शकेन का याबद्दल साशंक आहे. :) असो या धाग्याच्या निमिताने अँड्रॉईड प्रोग्रामिंगची मदत कुणाकडे मागायची हे कळेल.

In reply to by धन्या

आदूबाळ 16/09/2014 - 18:43
एक गरीब प्रश्नः सम आणि विषम संख्या ओळखायला अ‍ॅप कशाला लागतं? अ‍ॅप डेव्हलपमेंटचा सराव म्हणून केलं होतं का?

उपास 16/09/2014 - 17:43
डिझाईन लेव्हल वर आणि टेक्नोलॉजी साठी (उदा. एंग्युलर जे एस, फोन गॅप) मदत करु शकेन, अ‍ॅप डेव्हलप करायला वेळ गाठीशी आहे असे वाटत नाही. डिझाईन रेडी झाले की elance.com, guru.com वा तत्सम ठिकाणांवरुन डेव्हलप करुन घेता येईल. व्यनि केलात तर सविस्तर बोलता येईल. शुभेच्छा!

In reply to by उपास

सुधीर 16/09/2014 - 20:39
वेब-बेस्ड अ‍ॅप्/सॉफ्टवेअर (पिएचपी-मायएसक्यूअल वा जावा बेस्ड) बनवून देणार्‍या आणि कुठल्या वेबसाईट्स आहेत का? जिथे पुण्या-मुंबईतले डेव्हलपर्स काम करून देऊ शकतील. जेणे करून प्रत्यक्ष भेटून बोलता येईल. मुविंना धाग्यसाठी धन्यवाद!

In reply to by सुधीर

उपास 17/09/2014 - 20:59
नमस्कार सुधीर, तुम्हाला व्यनि केला आहे.. मुवी, तुम्हाला नेमकं काय हवं आहे ते कळलं तर पुढे जाता येईल, व्यनि करु शकाल का? विमे, तुम्ही तत्सम काम स्वतः करता काय, भेटावयास आवडेल (समानशीले व्यसनेषु सख्यम..) :)