श्रद्धा म्हणजे...

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
21 Jun 2014 - 7:23 pm

श्रद्धा म्हणजे आधी असतो
कल्पनांचा भास
श्रद्धा म्हणजे नंतर होतो
त्यां'चाच पहिला श्वास

श्रद्धा म्हणजे आधी असतो
जाणिवांचा खेळ
श्रद्धा म्हणजे नंतर होतो
फुकट जाणारा वेळ

श्रद्धा म्हणजे कुणा तोंडी
दो वक्ताची रोटी
श्रद्धा म्हणजे काही तोंडी
सहज पडलेली बोटी!

श्रद्धा म्हणजे काहिंसाठी
pre plan जुगारी अड्डा
श्रद्धा म्हणजे कुणासाठी
स्वत:च पडायचा खड्डा

श्रद्धा म्हणजे कुणी करतात
ठरवून मोठ्ठी होळी
श्रद्धा म्हणजे कुणी मारतात
ठरवून छुपी अरोळी

श्रद्धा म्हणजे भोळं भाबडं
बिन रंगाचं कापड
श्रद्धा म्हणजे उघड्या डोळ्यांना
बंन्द करणारी झापड

श्रद्धा म्हणजे मी(ही) म्हणतो
क्रुतीवरचा विश्वास
क्रुतीच करणे हा श्रद्धेचा
एकच धर्म..खास!

श्रद्धा म्हणजे हेतू तिथला
इहलौकिकच हवा
नायतर होउन बसते..ती
फुग्यातली...नुसतीच हवा!

श्रद्धा म्हणजे... हेतू'तं हवे
नीतीचे अधिष्ठान
नाहितर ते जुनं आहे की...
हज्जारो वर्षांचे दुकान!

अता प्रश्न इतकाच की..
नवे कसे हे द्यावे?
का..जुन्या नावे..नव्याचे
हे ही दुकानच काढावे!?

अता कळते श्रद्धा म्हणजे
स्व...क्रुतीचा खेळ
बराच जड जातो की हो....
स्वत:वर येता वेळ!

जाउ दे ही कविताच समजा
म्हणजे "मी ही" ..सुटेन!
आलच परत डोक्यात 'वेड'
तर पुन्हा नक्की भेटेन!!!
================

वीररससंस्कृतीधर्मकवितासमाज

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

21 Jun 2014 - 7:43 pm | यशोधरा

आवडली.

प्रचेतस's picture

21 Jun 2014 - 9:21 pm | प्रचेतस

अतिशय सुंदर.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jun 2014 - 9:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त !

विकास's picture

21 Jun 2014 - 9:36 pm | विकास

खूपच छान!

मूकवाचक's picture

22 Jun 2014 - 2:51 pm | मूकवाचक

+१

आयुर्हित's picture

24 Jun 2014 - 11:13 pm | आयुर्हित

+२

धन्या's picture

21 Jun 2014 - 10:11 pm | धन्या

झक्कास !!!

चौकटराजा's picture

22 Jun 2014 - 10:45 am | चौकटराजा

कविराय ब्वॉ , फारच अर्थवाही कविता !
श्रद्धा म्हणजे पुनःपुनः येणार्‍या
अनुभवाचा पारिपाक
तिच्या शिवाय जग चालत नाही. व ती दरवेळा उपयोगाला येतेच असेही नाही.

आतिवास's picture

22 Jun 2014 - 10:49 am | आतिवास

:-)

जेनी...'s picture

22 Jun 2014 - 10:54 am | जेनी...

:)

एस's picture

22 Jun 2014 - 11:08 am | एस

बुवा, कविता आवडेश. पुढील वेडाच्या प्रतीक्षेत.

खटपट्या's picture

22 Jun 2014 - 12:27 pm | खटपट्या

चांगलीय !!!

कंजूस's picture

22 Jun 2014 - 12:43 pm | कंजूस

श्रध्दा महणजे
स्वकृतीचा खेळ
बराच जड जातो
स्वत:वर येता वेळ .

खरोखर कवीबुवा .

मंत्र ,जादू ,ज्योतिष ,वैद्यक या विद्यासुध्दा जाणणाऱ्यांना कधी तरी गोत्यात आणतात .

प्यारे१'s picture

22 Jun 2014 - 2:35 pm | प्यारे१

वीररसातली कविता आवडली!

सस्नेह's picture

22 Jun 2014 - 9:20 pm | सस्नेह

श्रद्धा म्हणजे वीररस ..???
वाट लागली..(बुवांची नव्हे, श्रद्धेची !)

स्पा's picture

22 Jun 2014 - 3:09 pm | स्पा

छान जुळलीयेत यमकं

प्यारे१'s picture

22 Jun 2014 - 3:23 pm | प्यारे१

+१ हो... हे सांगायचं र्‍हायलंवतं वर! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jun 2014 - 11:23 pm | अत्रुप्त आत्मा

@छान जुळलीयेत यमकं>>> अस्सं का!? ;) आपला प्रतिसादही नेहमी सारखाच जळून....आपलं..ते...हे,जुळून आलाय! :p

श्रद्धा म्हणजे ती खाल्ल्या आळितल्या जोश्याची पूतणी कायरे शिन्च्या...!! *crazy*

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jun 2014 - 11:54 pm | अत्रुप्त आत्मा

बालिके.... *beee*
छडी मारिन हं... :-/
नको तिथे कसला चाबरटपणा!*diablo*

:-/

चाबरटपणा काय ़केलाओ गुर्जि :-/

प्रचेतस's picture

22 Jun 2014 - 11:41 pm | प्रचेतस

श्रद्धा म्हणजे दांभिकांचं
कुरवाळायचं गाजर
भक्तांच्या भावनांना
भुलवायचं आगर.

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Jun 2014 - 12:18 pm | ज्ञानोबाचे पैजार

चालायचच,

अश्रध्दांना श्रध्द लाचार, केविलवाणे, बिचारे वाटतात तर
श्रध्दांना अश्रध्द उध्दट, हेकेखोर व आत्मकेंद्री वाटतात.

कारण

कुणाची श्रध्दे वर श्रध्दा असते तर
कुणाची अश्रध्देवर श्रध्दा असते.

कोणी श्रध्देने श्रध्देवर प्रहार करत असतो, तर
कोणी श्रध्देने अश्रध्दाला श्रध्द बनवायचा प्रयत्न करत असतो.

अश्रध्द श्रध्देने त्यांच्या अश्रध्देवर ठाम असतात, तर
श्रध्द अश्रध्दांच्या श्रध्दे विषयी साशंक असतात.

श्रध्द त्यांच्या श्रध्दे बद्दल अश्वस्त असतात तर
अश्रध्द श्रध्दांच्या श्रध्दे बद्दल चिंताग्रस्त असतात.

श्रध्दा अश्रध्देचा हा वाद आदिम आहे अशी माझी श्रध्दा आहे
यामधे तिसरी बाजु सापडत नाही हाच खरा वांदा आहे.

पैजारबुवा,

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jun 2014 - 12:59 pm | अत्रुप्त आत्मा

छान विवेचन!

स्पा's picture

23 Jun 2014 - 1:40 pm | स्पा

वा पैजार ब्वा ,मस्तच

बाकी आम्हाला बुवांच्या हा ... स रयाच कविता आवडतात

सस्नेह's picture

23 Jun 2014 - 2:18 pm | सस्नेह

दोन बुवांची जुगलबंदी...क्या केहेने !

प्रचेतस's picture

23 Jun 2014 - 2:24 pm | प्रचेतस

श्रध्दा अश्रध्देचा हा वाद आदिम आहे अशी माझी श्रध्दा आहे
यामधे तिसरी बाजु सापडत नाही हाच खरा वांदा आहे.

दुसरी ओळ थोडासा बदल करून लिहितो.

श्रध्दा अश्रध्देचा हा वाद आदिम आहे अशी माझी श्रध्दा आहे
यामधे दांभिकांचे मात्र फावते हाच खरा वांदा आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Jun 2014 - 2:34 pm | ज्ञानोबाचे पैजार

हा बदल पण समर्पक वाटतो.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jun 2014 - 3:55 pm | अत्रुप्त आत्मा

@यामधे दांभिकांचे मात्र फावते हाच खरा वांदा आहे.>>> +++१११

यशोधरा's picture

23 Jun 2014 - 4:11 pm | यशोधरा

परफेक्ट!

यशोधरा's picture

23 Jun 2014 - 4:10 pm | यशोधरा

खरं आहे.

श्रध्द त्यांच्या श्रध्दे बद्दल अश्वस्त असतात तर
अश्रध्द श्रध्दांच्या श्रध्दे बद्दल चिंताग्रस्त असतात.

अश्रद्धांना श्रद्धांच्या श्रध्देबद्दल चिंता नसती तर काय घडले असते याची एक छोटीशी झलकः

१. आजही लोक पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी असून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे मानत राहीले असते.
२. आजही स्त्रीया पतीच्या मृत्यूनंतर सती गेल्या असत्या.
३. आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगणारी स्त्री चूल आणि मुल यांतच अडकून पडली असती.
४. पुत्रप्राप्ती, धनप्राप्तीसाठी आजही सर्रास नरबळी जात राहिले असते.
५. आजही भारतीयांनी समुद्र ओलांडून जायचं धाडस केलं नसतं.
६. आजही सर्पदंशाने, विंचूदंशाने मांत्रिकांकडून विष उतरवण्याच्या नादात अनेक माणसे जीवाला मुकत राहीली असती.
७. अनेक साथीचे आजार देवीच्या कोपाने झाले असे मानून बळी जात राहीले असते.

असो... यादी न संपणारी आहे.

धनाजीपंत तुम्ही आणि वर बरेच जण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात गल्लत करत आहात असे वाटले.
बाकी चालु द्या

धन्या's picture

23 Jun 2014 - 8:09 pm | धन्या

सध्या अतिशय प्रसिद्ध असलेला "अंधश्रद्धा" हा शब्दच मुळी चुकीचा आहे. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात अंध आणि डोळस श्रद्धा असं काही नसते.

श्रद्धा म्हणजे एखादया व्यक्तीचा एखादया गोष्टीवरील ठाम विश्वास. ज्या गोष्टीवर माणसांची श्रद्धा असते त्या गोष्टी वास्तवात सत्य असतातच असं नाही. वर मी दिलेली उदाहरणे ही श्रद्धेचीच उदाहरणे आहेत, ज्यात काही तथ्य नव्हते.

जेव्हा विवेकवादी चळवळ सुरु झाली तेव्हा सुधारकांना लोकांच्या सार्‍याच श्रद्धांना थेट हात घालायचा नव्हता. म्हणून त्यांनी देव आणि धर्म याच्याशी निगडीत श्रद्धांना नुसतेच "श्रद्धा" म्हणण्यास सुरुवात केली. आणी उरलेल्या बाकी श्रद्धांना त्यांनी "अंधश्रद्धा" असे नांव दिले. सुधारणांचा गाडा पुढे सरकण्यासाठी ती आवश्यक गोष्ट होती.

स्पा's picture

23 Jun 2014 - 8:22 pm | स्पा

ठिके , पण सरसकट सगळ्या श्रद्धा तुम्ही एकाच क्याटेगरीत तोलता आहात. बरे अश्रद्ध म्हणजे काय?

स्पा's picture

23 Jun 2014 - 8:22 pm | स्पा

ठिके , पण सरसकट सगळ्या श्रद्धा तुम्ही एकाच क्याटेगरीत तोलता आहात. बरे अश्रद्ध म्हणजे काय?

धन्या's picture

23 Jun 2014 - 8:30 pm | धन्या

पण सरसकट सगळ्या श्रद्धा तुम्ही एकाच क्याटेगरीत तोलता आहात.

होय.

बरे अश्रद्ध म्हणजे काय?

ज्याची श्रद्धा नाही तो.

स्पा's picture

23 Jun 2014 - 8:33 pm | स्पा

धन्यवाद :-)

धन्या's picture

23 Jun 2014 - 8:49 pm | धन्या

आज ज्या प्रथांना आपण "अंधश्रद्धा" समजतो, त्या प्रथा शे-दोनशे वर्षांपूर्वी प्रचलित होत्या तेव्हा त्या धर्मश्रद्धाच होत्या. त्यांना अंधश्रद्धा हे नांव अगदी अलिकडच्या काळात विज्ञानाने त्यांचा फोलपणा सिद्ध केल्यावर चिकटले. न जाणो आज ज्या "श्रद्धा" आहेत त्या येणार्‍या काळात विज्ञानातील प्रगतीमुळे "अंधश्रद्धा" म्हणून मोडीत निघतील.

संयमीत प्रतिसादासाठी धन्यवाद. :)

विज्ञानातील प्रगतीमुळे "श्रद्धा" फलदायी व "अंधश्रद्धा" मोडीत निघाली.

हा पहा बेलर यूनिवर्सिटी चा शोधः
पूजा-पाठ करने और धार्मिक आयोजनों में शामिल होने से तनाव के स्तर में कमी आती है। बेलर यूनिवर्सिटी के शोधकर्ताओं की मानें तो इसका असर ऑफिस में इनसान के प्रदर्शन पर भी दिखता है। वह न सिर्फ काम में ज्यादा मन लगा पाता है, बल्कि उत्पादन क्षमता बढ़ने से उसके प्रमोशन और वेतन-वृद्धि की संभावनाएं भी बढ़ जाती हैं।

शोधकर्ताओं ने एक हजार से कर्मचारियों की कार्य क्षमता पर धर्म और आध्यात्म का असर आंका। उन्होंने पाया कि ईश्वर में यकीन रखने, नियमित रूप से पूजा-पाठ करने और धार्मिक आयोजनों में बढ़-चढ़कर हिस्सा लेने वाले लोग पेशेवर जीवन में ज्यादा सफल होते हैं। वे बॉस की नजरों में अच्छी छवि तो बना ही पाते हैं, साथ ही सहकर्मियों से उनके संबंध भी अच्छे होते हैं।

साभारः धर्म-कर्म में यकीन करने वाले ज्यादा सफल

Rodney Stark points out that religious individuals are more engaged in secular organizations than secular folks. This moves our conversation into the realm of civic (political) involvement, and again the data show that religiously-active individuals shine in this area as well, and this includes not only evangelical Protestants, but Catholics, Jews, and members of other faith traditions.
How Religion Benefits Everyone, Including Atheists

ज्ञानोबाचे पैजार
लय भारी

प्रभाकर पेठकर's picture

23 Jun 2014 - 8:42 pm | प्रभाकर पेठकर

श्रद्धा म्हणजे सावंतांची,
श्रद्धा म्हणजे देशपांड्यांची
श्रद्धा म्हणजे जीवाला त्रास,
(बाकी) कुळकर्ण्यांची श्रद्धा म्हणजे सगळ्यांमध्ये खास

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jun 2014 - 9:31 pm | अत्रुप्त आत्मा

=)) ख्रिस गेल! =))

सूड's picture

23 Jun 2014 - 9:44 pm | सूड

रावराण्यांची पण !! ;)

चौकटराजा's picture

25 Jun 2014 - 8:32 am | चौकटराजा

शाहीद अफ्रीदी , सनत जयसूर्या.....म्याकलम, युवराज, ........ रवी शास्त्री , गॅरी सोबर्स.......सगळ्यावर कडी.....पी हाटेलवाला !

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jun 2014 - 9:35 pm | अत्रुप्त आत्मा

=)) ख्रिस गेल! =))

आजही लोक पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी असून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे मानत राहीले असते.

हे मात्र आपल्याकडे नवतं हं . सुर्य पृथ्वी भोवती फिरतो हे पश्चात्याचं मत होतं . आपल्याकडे हे सत्य कितीतरी आधीपासून माहित आहे

आपल्याकडे हे सत्य कितीतरी आधीपासून माहित आहे

तसं असतं तर नवग्रहांमध्ये सूर्याच्या ऐवजी पृथ्वी असती. :)

आदित्यादी नवग्रहच म्हणतात ना त्याला =))

बॅटमॅन's picture

26 Jun 2014 - 6:56 pm | बॅटमॅन

वा! सहीच ओ बुवा. :)

पैसा's picture

26 Jun 2014 - 11:07 pm | पैसा

पण बुवा रागवू नका. खरं सांगते. यावेळी कविता उत्स्फूर्त वाटली नाही. यमके जुळवून केल्यासारखी वाटते आहे. त्यामुळे 'कोलोनियल कझिन्स'च्या काही पुरातन रचना उगाच आठवल्या.

तुम्ही तुमच्या प्रतिभेला यमकांचे कुंपण घालू नका. तिला मुक्तछंदात उधळू द्या!

तसं असतं तर नवग्रहांमध्ये सूर्याच्या ऐवजी पृथ्वी असती.

महाराज, सूर्याला नव्ग्रहन्मधे गणल जातं का ? अरे हो ,तुम्ही ञानेश्वरी वाचली नाहीये नाही का . ४ था अध्याय वाचलात तर कळेल.