(तनःशांती!)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
21 Jul 2008 - 11:27 pm

ॐकारशेठचा 'मनःशांती' चा शोध वाचला आणि आम्हाला पूर्वीचे अथक प्रयत्न आठवले! ;)

तनःशांतीचा शोध घेत होतो
रात्रंदिवस
'फिटनेस'वर शोधले,
'वेटलॉस'वर आलो जाऊन
'बुलवर्कर' धुंडाळले
'टर्बो बॅग' काढली बुकलून

'केक' पाहिले बदलून
'लो कॅलरी'ही शोधत राहिलो
'ट्रेडमिल' झाले फिरवून
'स्पिनिंग' करत फिरलो

निवांत क्षणी एका
लकाकले डोळे, फिटली भ्रांती
'लॅपटॉप' वर कोक-बर्गर आला
सापडली तनःशांती!

'भार'नियमनाचा मला कळलेला
हा एकमेव फायदा
बाकी तीच झोप, तेच घोरणे
आणि तोच वायदा

चतुरंग

कविताविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

21 Jul 2008 - 11:33 pm | बेसनलाडू

वा रंगराव,
झकास विडंबन. आवडले.
('तन्'दुरुस्त)बेसनलाडू

सर्किट's picture

21 Jul 2008 - 11:37 pm | सर्किट (not verified)

'लॅपटॉप' वर कोक-बर्गर आला
सापडली तनःशांती!

कोक-बर्गरचा लॅपटॉपशी संबंध कळला नाही, रंगाशेठ.

बाकी 'भार' नियमन हा श्लेष आवडला.

- सर्किट

चतुरंग's picture

21 Jul 2008 - 11:44 pm | चतुरंग

चतुरंग

प्राजु's picture

22 Jul 2008 - 12:00 am | प्राजु

एकदम सह्ही...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वरदा's picture

22 Jul 2008 - 12:04 am | वरदा

चतुरंग सह्हीच्...
'भार'नियमनाचा मला कळलेला
हा एकमेव फायदा
बाकी तीच झोप, तेच घोरणे
आणि तोच वायदा


हा हा हा...मस्तच
('भार' नियमनाची सतत काळजी करणारी)
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

संदीप चित्रे's picture

22 Jul 2008 - 12:41 am | संदीप चित्रे

ॐकारशेठ माफ करा पण चतुरंगसाहेबांच विडंबन मूळ कवितेपेक्षा जास्त छान जमलंय असं मला तरी वाटलं :)

--------------------------
www.atakmatak.blogspot.com

कोलबेर's picture

22 Jul 2008 - 5:37 am | कोलबेर

मस्त भारनियमनाचा श्लेष आवडला.
स्वगत: 'तनःशांती' म्हंटल की जरा वेगळाच किडा डोक्यात येतो .. :P पण रंगाशेठनी लिहीले आहे म्हणजे काहीतरी वेगळे असणार अशी खात्री होती..('तनःशांती' एक्सपर्ट धनंजयाने देखिल ह्यावर एक 'खरपूस' विडंबन करावे का? ह. घ्या!)

'क्षुधाशांती' अधिक चपखल बसतो का? पण मग पहिल्या काही कडव्यांमध्ये गोंधळ होतोय.. ~X(

-कोलूशेठ :)

चतुरंग's picture

22 Jul 2008 - 6:46 am | चतुरंग

आधी काही सूचक ओळी सुचल्याही होत्या पण पुढेपुढे ते फारच भडक आणि बीभत्स होत गेले त्यामुळे वेगळा बाज देऊन निराळे विडंबन केले पण 'तनःशांती' म्हणजे काय काय 'किडे' होतात हे लक्षात घेऊन नाव तसेच ठेवले! :P
क्षुधाशांती? छ्या, अशा विडंबनाचे नावही कसे झटका देणारे हवे! :D
चतुरंग

चेतन's picture

22 Jul 2008 - 11:05 am | चेतन

केसु सरांचा वारसा समर्थपणे चालवताय रावं

भार'नियमन सहीच्

नियमित भार'नियमन करणारा चेतन

केशवसुमार's picture

23 Jul 2008 - 11:36 am | केशवसुमार

रंगाशेठ,
एकदम झकास.. आवडल.. चलू द्या..
(निवृत्त) केशवसुमार
स्वगतः लॅपटॉप..तन:शांती ह्या रंग्याचे नक्की काय चलंय?... :?