Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गवि on Mon, 10/21/2013 - 13:39
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
"अब इसे मारना है की छोडना है, आपकी मर्जी. लेकिन ये खिडकी कभी नही खोलिये.. और उसका नाम मुह से बिलकुल मत बोलिये. हमारे यहां होता तो स्साला मार ही डालते थे तुरंत.." खिडकी खाडकन बंद करत एसी टेक्निशियन म्हणाला. नवीन फ्लॅट भाड्याने घेतला. मालकांनी बराच कचरा मागे सोडला होता. शिंकत खोकत मी ते घर राहण्यायोग्य बनवण्याचा प्रयत्न करत होतो. एका बेडरुमच्या खिडकीत जुन्या विंडो एसीचं धूड चढवायचं होतं. ते काम करता करता असं दिसलं की सात अंडी खिडकीखालचा सज्जा की काय म्हणतात त्या वळचणीत पडलेल्या कचर्‍यात आणि डबरात पडलेली, की घातलेली म्हणा, दिसत होती. घरटं वगैरे बांधण्याचे कष्ट घेतले नव्हते. मुंबईत पेस्ट कंट्रोलचा विषय बनलेली कबुतरं माझ्याही आजूबाजूला पुरेशा संख्येने घुमत असल्याने त्यातलंच एक तिथे माझ्याआधी जागा बिनभाड्याने घेऊन बसलं आहे असं परिस्थितीजन्य पुराव्यावरुन दिसत होतं. पण खिडकी मोकळी सोडली आणि जो काही प्रकार त्या अंड्यांवर येऊन बसला तो जरा अनपेक्षित होता. तेच ते.. अपशकुनी, भयानक, रात्री संचार करणारं भुताळी घुबड... मग घरात कामासाठी आलेल्या प्रत्येकाने, पक्षी प्लंबर, रंगारी, सुतार वगैरेंनी माझ्या पोराला भयंकर भयंकर कहाण्या सांगितल्या. सुरक्षिततेचे उपाय आणि शक्यतो ही बला मारुन टाका असं जनहितार्थ बजावूनच ते गेले. आता मुळात म्हणजे हा पक्षी एकदम बिचाराच आहे.. अपशकुनी वगैरे तर जाऊदेच, लोक म्हणतात तसा खूंखार आणि आक्रमकही वाटला नाही. फोटो काढूया म्हणून मोबाईलचा कॅमेरा खिडकीबाहेर काढला तर चक्क घाबरुन उडाला आणि समोरच्या झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. लक्ष मात्र प्राणपणाने अंड्यांकडे. खिडकी बंद केली की श्रीमती घुत्कर परत अंड्यांवर. असं पुन्हापुन्हा झाल्यावर मग मात्र माझ्या लक्षात आलं की असे फोटो काढून त्याला उडवण्यात अर्थ नाही. चारपाच दिवस असेच गेले. पण घुबडाला काही माझा भरोसा वाटेना. मग मी खिडकी उघडणं बंद केलं आणि गुप्तपणे त्याला कसं बघावं असा विचार करत बसलो. घुबडाची जोडी आयुष्यभर, किमान सीझनपुरती एकनिष्ठ असते. त्यांची कोर्टशिप म्हणजे नराने मादीला घरट्याची जागा दाखवायची आणि उंदीरबिंदीर मारुन ऑफर करायचा. तिने तो घेतला आणि खाल्ला तर जमली जोडी. काश हमारा भी.. बरं. तर मग त्याचं असंही आहे, की बरीचशी घुबडं आपल्या आयुष्यात एकदाही ब्रीडिंग करु शकत नाहीत. आणि जी घुबडं ते करु शकतात ती आयुष्यात एकदाच करु शकतात. त्यांचं आयुष्यच तितकं असतं. दोन तीन वर्षं. म्हणजे शरीराची क्षमता पंधरावीस वर्षं जगण्याची असूनही केवळ अत्यंत जास्त संख्येने असलेल्या संकटांमुळे आणि शत्रूंमुळे दोन वर्षंही जगायला मिळणं हे खूप ठरतं. कावळे आणि इतर पक्षी (शिकारी पक्षी) घुबडांची अंडी आणि पिल्लं खातात. माणसं हीसुद्धा मोठी शत्रूफळी. आता आयुष्यात मिळून एकदा पिल्लं निर्माण करण्याची संधी त्याला मिळणार आणि त्यातही मी त्याची अंडी फेकून द्यायची हे काही बरोबर नव्हे. अंडी घालताना ती दोनतीन दोनतीन दिवसाच्या अंतराने एकेक अशी घालतात. त्यामुळे अर्थातच पिल्लंही तशीच अंतरा अंतराने बाहेर येतात. शेवटचं पिल्लू बाहेर येईपर्यंत पहिलं चांगलंच मोठं झालेलं असतं. आणि त्यावेळी एकाच घरट्यात उतरंडीसारखी उंचीसे कतार म्हणावी अशी वेगवेगळ्या वयाची पिल्लं दिसतात. त्यातली मोठी (अर्थात आधी जन्मलेली) एकदोन पिल्लं शक्तिमान असल्याने ती बापाने (हो बाप भरवतो सरपटणारे, धावणारे इत्यादि वेगळाले प्राणी मारुन. आई म्हणजे झेड सिक्युरिटीच्या ड्यूटीवर २४ तास) आणून दिलेलं अन्न बकाबका हिसकावतात. लहान पिल्लं जिवंत राहण्याची शक्यता नगण्य. अन्नपाण्याची ददात अगदीच नसेल तरच आठातली चारपाच जगतात. मी दुकानात जाऊन एक वेबकॅम आणला. विशिष्ट रचना करुन तो खिडकीखाली लपवला. घुबड काही मूर्ख नसणार, त्याला नवीन वस्तू कळलीच असणार, पण त्याला हरकत दिसली नाही. कारण कॅमेरा काही फ्लॅश मारणं किंवा हालचाल करणं अशा गोष्टी करत नाही. आता मोशन डिटेक्शन मोडमधे व्हिडीओज बनताहेत. मीही मोकळ्या वेळात समोर बसून लाईव्ह मॉनिटरिंग करतो आहे. प्रकार रोचक आहे. अधिक माहिती किंवा निबंध लिहीत नाही. व्हिडीओ WMV असल्याने ते इथे कसे द्यायचे कळत नाही. तोपर्यंत खूफिया कॅमेर्‍यातून येणार्‍या प्रतिमा आणि जे काही निरीक्षण नोंदवता येईल ते नोंदवत जाईन. कालच कॅमेरा लपवला आहे. बघू काय होतं.. कोण जन्मतं आणि कोण जगतं. नुसतीच अंडी. पक्षी नाहीच. First श्रीमती घुत्कर: B पहिला छोटू घुत्कर बाहेर आलेला आहे. कापसाचा थरथरता शुभ्र लालसर गोळा. वळवळ कम धडपड चालू आहे. बाकी सहाजण अभीतक अंडेमें. म्हणजे शेवटी जगणारा लकी वन असण्याची याची शक्यता जास्त. D पहाटे घुबडं झोपतात असं म्हणायला हरकत नाही. पण अत्यंत सावध झोप. E अत्यंत तिखट कान असतात असं दिवसभरात दिसलं. दूरवरही कुठे खुट्ट झालं की दचकल्याप्रमाणे अंग काढून लगेच दक्ष पोझिशन घेते. फोडतेय कॅमेरा वाटतं: F बाकी सर्व लाईव्ह चालू आहे. काही वेगळं वाटलं की मधूनच अपडेट करीन. आत्तापर्यंत दिसलेलं: - एकच घुबड (लॉजिकली मादी) दिसली आहे. गेल्या पाच दिवसात अधूनमधून पाहात असतो तरी दोन घुबडं (नर आणि मादी) दिसले नाहीत. ही एकटी पडली आहे का अशी शंका आहे. व्हिडीओ कॅमेरा अर्थातच काय ते दाखवेलच यात शंका नाही. - काल पहिलं पिल्लू जन्मल्यापासून मोशन डिटेक्ट व्हिडीओ आणि माझं मॉनिटरवर निरीक्षण यामधे पक्षी शांत आहे. पिसं साफ करतो. बसतो. झोपतो. रिलॅक्सही होतो. मधेच कावळा येतो मग घुबड त्याला पळवतं. पण या सर्वामधे नवीन पिल्लाला खायला काहीही दिलेलं मी पाहिलं नाही. मध्यरात्री दिलं असेल तर माहीत नाही. पण वाचलेल्या माहितीनुसार दिवसातून दहावेळा तरी खाणं आणतात वडील. इथे मुळात वडीलच दिसत नाहीत. काळानुसार उलगडा होईलच. व्हिडीओज जास्त रोचक असूनही इथे जोडता येत नाहीयेत. बघत राहू..आत्ताच तर सुरुवात आहे. सी यू सून.
  • Log in or register to post comments
  • 45287 views

प्रतिक्रिया

Submitted by शैलेन्द्र on Mon, 10/21/2013 - 13:44

Permalink

भन्नाट..

भन्नाट..
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्कर जोशी on Mon, 10/28/2013 - 07:13

In reply to भन्नाट.. by शैलेन्द्र

Permalink

खरच भारी ... जमल्यास विदेओ ओं

खरच भारी ... जमल्यास विदेओ ओं टाका कि हो ... you tube वर ... windows movie maker, format factory वगैरे मदत करू शकतील ..
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Mon, 10/21/2013 - 13:51

Permalink

वेगळाच विषय हाताळायला मिळतोय

वेगळाच विषय हाताळायला मिळतोय गवि अभिनंदन आणि शुभेच्छा. वेळो वेळी डिटेल्स मिळत जातीलच याची खात्री आहे. वेबकॅमची कल्पना पण भारीच.
  • Log in or register to post comments

Submitted by Mrunalini on Mon, 10/21/2013 - 13:57

Permalink

सहि.... पुढचे अपडेट्स पण देत

सहि.... पुढचे अपडेट्स पण देत रहा. :)
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Mon, 10/21/2013 - 13:58

Permalink

प्रचंड उत्कंठावर्धक आणि

प्रचंड उत्कंठावर्धक आणि सस्पेन्सही जबरदस्त. पाच पिल्ले पडद्यावर उतरायची आहेत. त्यातली कोणती टिकतील? कोणती गळतील? अगदी बिग बॉस स्टाइल रिअ‍ॅलिटी शो. 'आगे पर्देपर' ची वाट पहातो आहोत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 10/23/2013 - 08:29

In reply to प्रचंड उत्कंठावर्धक आणि by राही

Permalink

असेच म्हणतो.

+१ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Mon, 10/21/2013 - 13:59

Permalink

आयला

भारी कल्पना आहे... लगे रहो, पुढचे अपडेस् वाचायला उत्सुक.
  • Log in or register to post comments

Submitted by मनिम्याऊ on Mon, 10/21/2013 - 14:00

Permalink

अपशकुनी????..... नव्हे भाग्यवान

गवि, भाग्यवान आहात तुम्ही. सहसा अत्यंत दुर्मिळ पक्ष्याने (चकवा-चांदण) तुमच्या घरी वस्ती केली आणि तुमचे अस्तित्व लक्षात येऊन देखील घरट्याची जागा बदलली नाही किवा अन्डी फोडुन टाकली नाहीत हे महत्वाचे. (बंगालमधील समजुतीनुसार या पक्ष्याच्या घरट्या खाली गुप्तधन सापडते म्हणतात) या लेखावरून 'श्री मारुती चितमपल्ली' यांच्या 'उलुक वेळ' या अत्यंत सुंदर लेखाची आठवण झाली. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by ग्रेटथिन्कर on Mon, 10/21/2013 - 14:06

Permalink

हा पिंगळा नावाचा पक्षी आहे

हा पिंगळा नावाचा पक्षी आहे घुबड नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 10/21/2013 - 14:15

In reply to हा पिंगळा नावाचा पक्षी आहे by ग्रेटथिन्कर

Permalink

पिंगळा, spotted owlet वेगळं.

पिंगळा, spotted owlet वेगळं. छोटं ठिपकेवालं असतं. तोही घुबडाचाच प्रकार. हे घुबड बार्न आऊल आहे. मराठीत गव्हाणी घुबड.
  • Log in or register to post comments

Submitted by ग्रेटथिन्कर on Mon, 10/21/2013 - 14:19

In reply to पिंगळा, spotted owlet वेगळं. by गवि

Permalink

मी तुमचे नॉलेज तपासत होतो

मी तुमचे नॉलेज तपासत होतो
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 10/21/2013 - 15:08

In reply to मी तुमचे नॉलेज तपासत होतो by ग्रेटथिन्कर

Permalink

अद्याप आपण...

नथूगुग्गुळ घेतलेले दिसत नाही... असो... हा असा स्वतःहून तोंडावर पडायचा ठेका आपण घेतलाच आहे....तर आम्ही तरी काय करणार? मुद्दाम हून जास्त गहन विचार केला की असे होणारच..... नळी फुंकली सोनारे अन पालथ्या घड्यावर पाणी. मुद्दाम गहन विचार करूनी टंकती ट्रोल वाणी..... (स्मॉल पेगर)
  • Log in or register to post comments

Submitted by रुस्तम on Mon, 10/21/2013 - 19:00

In reply to अद्याप आपण... by मुक्त विहारि

Permalink

+११११११११११११११११११११

+११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 10/22/2013 - 14:33

In reply to मी तुमचे नॉलेज तपासत होतो by ग्रेटथिन्कर

Permalink

११:४५ ला गविंचा प्रतिसाद आणि

११:४५ ला गविंचा प्रतिसाद आणि ११.४९ ला तुमची सारवासारवी... म्हणजे वारंवार करायला लागल्याने अश्या सारवासारवीची चांगलीच सवय झालेली आहे हे सिद्ध झालेय ! :) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by nishant on Mon, 10/21/2013 - 14:07

Permalink

मस्त! पुढिल छायाचित्र पाह्ण्यास उत्त्सुक.

"कोमन बार्न आउल" आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 10/21/2013 - 14:09

In reply to मस्त! पुढिल छायाचित्र पाह्ण्यास उत्त्सुक. by nishant

Permalink

हो. बार्न आऊल. गव्हाणी घुबड

हो. बार्न आऊल. गव्हाणी घुबड.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Mon, 10/21/2013 - 15:29

In reply to हो. बार्न आऊल. गव्हाणी घुबड by गवि

Permalink

हेच घुबड महिनाभरापूर्वी

हेच घुबड महिनाभरापूर्वी आमच्या घराजवळ पाहिले होते. अगदी कमी उन्चीवरुन स्मोरुनच उडत गेलं. उत्सुकतेनी आम्ही त्याच्याकडे बघत उभे राहिलो तर लाजून या झाडावरुन त्या झाडावर पळत ( उडत) होतं... शेवटी कुठेतरी लांब पळालं.... :( अवांतरः घरातल्या पाली पकडून त्यांना दिल्या तर खातायत का चेक करा.. :P
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Mon, 10/21/2013 - 14:11

Permalink

रोचक.

समोरच्या घराच्या भिंतीवर बसलेली ३-४ घुबडे रोज रात्रि पाहतोय, अगदी जमिनीपासुन ५ फुट उंचीच्या कट्यावर आरामात बसलेली असतात. @मनिम्याऊ क्या बात है! सच हय किया ? वर उल्लेखलेल्या घुबडाचे घरटे माझ्या मित्राच्या घरावरच आहे, सांगुन टाकतो त्याला आजच खोदकाम सुरु कर म्हणुन!
  • Log in or register to post comments

Submitted by मनिम्याऊ on Mon, 10/21/2013 - 14:26

In reply to रोचक. by अग्निकोल्हा

Permalink

ं मानो या ना मानो...

ं मानो या ना मानो... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Mon, 10/21/2013 - 14:20

Permalink

व्हिडीवो यु ट्युब वर टाकुन

व्हिडीवो यु ट्युब वर टाकुन लिंक द्या..
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प on Mon, 10/21/2013 - 14:28

Permalink

उत्तम

मागोवा अजुन पुढील माहिती साठी प्रतिक्षा करत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 10/21/2013 - 14:28

Permalink

क्या बात! क्या बात!! लैच्च्च

क्या बात! क्या बात!! लैच्च्च जब्री. पुढे काय होतंय ते पाहण्याची अत्यंत उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 10/21/2013 - 14:38

In reply to क्या बात! क्या बात!! लैच्च्च by बॅटमॅन

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Mon, 10/21/2013 - 14:50

Permalink

*****

काही तरी वेगळ पहायला मिळणार .
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Mon, 10/21/2013 - 14:56

Permalink

मस्त उद्योग

उद्योग आवडला. त्या घुबडीणीची पिल्ल जेवत नसली की ती त्यांना सांगत असेल. "गुपचुप खा गविकाका बघतायत" आणि घुबडबुवा आले की गाणं म्हणेल "इथ नको तिथ जाउ आडोशाला उभ राहु" घुबडबुवा :- का? घुबडकाकु :- गवि बघत्यात स्वगतः- च्यायला ह्या टेक्नॉलॉजी मुळे माणसाची प्रायव्हसी तर हरवलीच आहे आता पक्षांनापण प्रायव्हसी दुर्मिळ ठरणार.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 10/21/2013 - 19:01

In reply to मस्त उद्योग by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

+ १

च्यायला ह्या टेक्नॉलॉजी मुळे माणसाची प्रायव्हसी तर हरवलीच आहे आता पक्षांनापण प्रायव्हसी दुर्मिळ ठरणार.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Mon, 10/21/2013 - 15:00

Permalink

मस्त...

एक वेगळीच कल्पना आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 10/21/2013 - 15:14

Permalink

अच्छा तर या घुबडा बद्धल

अच्छा तर या घुबडा बद्धल तुम्ही बोलला होतात तर ! :) काय म्हणातात ते.. हं. क्युट आहे हो. ;) जाता जाता :- तंत्र-मंत्र प्रकारात घुबडाचा बळी दिला जातो, यांच्या नखांनाही या उलट्या उध्योगाय मागणी असते. मला वाटतं बहुतेक हिंदुस्थानात तांत्रीक विधीसाठी सर्वात जास्त ठार मारला जाणारा हा पक्षी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 10/21/2013 - 15:17

In reply to अच्छा तर या घुबडा बद्धल by मदनबाण

Permalink

पहिले कोंबडी (उलट्या पाखाची) आणि नंतर हा...

असे मला वाटते...
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 10/21/2013 - 15:20

In reply to पहिले कोंबडी (उलट्या पाखाची) आणि नंतर हा... by मुक्त विहारि

Permalink

हो...बरोबर, पण माझ्या माहिती

हो...बरोबर, पण माझ्या माहिती नुसार काही तांत्रिक विधींना घुबडच लागते. कोंबडीचा बळी दिला जातो पण अनेकदा ती प्रथा किंवा उतारा किंवा इतर कोणत्या कारणासाठी दिला जातो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 10/21/2013 - 15:26

In reply to हो...बरोबर, पण माझ्या माहिती by मदनबाण

Permalink

आता दिवाळी जवळ आली, तेव्हा या

आता दिवाळी जवळ आली, तेव्हा या घुबडांचा लयं डिमांड होणार ! आपली दिवाळी आणि यांची मरण यात्रा आत्ताच वाचलेले काही दुवे :- India's secret shame: Owl sacrifice mars Hinduism's biggest holiday India’s Festival of Lights darkens the future for owls
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 10/21/2013 - 15:33

In reply to आता दिवाळी जवळ आली, तेव्हा या by मदनबाण

Permalink

आयला हे काय चालले आहे तरी काय?

दिवाळी = घुबडांचे प्राण धोक्यात दसरा = वन वर्यावरण धोक्यात होळी = पाण्याचा गैर वापर गणपती = प्रदूषण गरबा = ध्वनी प्रदूषण थोडक्यात काय तर, पाकीस्तान आणि बांगला देशात जशी सामाजीक सुधारणा केली आहे तशीच भारतात पण करायचे ठरलेले दिसते... असो.... हातात घड्याळ कशाला प्रार्थनेची वेळ लक्षांत ठेवायला
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 10/21/2013 - 15:27

In reply to हो...बरोबर, पण माझ्या माहिती by मदनबाण

Permalink

थोडक्यात काय तर...

उतारा वेगळा आणि तांत्रीक विधी वेगळे.... म्हणजे लिंबू तेच पण आधी जीन्/व्होडका ह्यांत घालायचे आणि मग जास्त झाली की. उतरावलायला वापरायचे..... असो.... आपण आपले घुबड आणि घुबडी बघू या...
  • Log in or register to post comments

Submitted by म्हैस on Mon, 10/21/2013 - 15:29

Permalink

अत्यंत वेगळा आणि छान लेख अहे.

अत्यंत वेगळा आणि छान लेख अहे. पुढे काय होतंय ह्याची उत्कंठा लागली अहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 10/21/2013 - 15:38

Permalink

नेहमीप्रमाणे....

गवि रॉक्स आणि मिपाकर टॉक्स.... हे असे वेगळे विषय असतात म्हणूनच इथे येण्यात मजा आहे. (मुद्दाम पाव्/अर्धा नॅनो मेंदू खाजवून ट्रोलिंग करणार्‍यांना असे काहीतरी कधीच देता येणार नाही....)
  • Log in or register to post comments

Submitted by कानुन के लंबे हाथ on Mon, 10/21/2013 - 15:39

Permalink

पुढे काय झाल?

पुढे काय झाल?
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Mon, 10/21/2013 - 17:03

Permalink

वेब कॅमची आयडीया अतिशय आवडली.

वेब कॅमची आयडीया अतिशय आवडली. त्यामुळे तुमची पहायची उत्सुकता अन घुबडाला सुरक्षीततेची हमी. पण सिक्सथ सेन्सने जाणवत असणार कुणीतरी पहातय ते. एक बाहेर आलय पिल्लु तेंव्हा बाकिची दोन अंडी उघडायला सुरवात झाली आहे. नशिबवान आहात गवि.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 10/21/2013 - 17:14

In reply to वेब कॅमची आयडीया अतिशय आवडली. by स्पंदना

Permalink

नशिबवान आहात गवि.

आपण सगळे पण असेच भाग्यवान आहोत.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 10/21/2013 - 17:42

Permalink

छान कल्पना! बघुया पुढं काय

छान कल्पना! बघुया पुढं काय होतय.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 10/21/2013 - 18:42

Permalink

घुबडाचा एक एन्ट्री व्हिडिओ

घुबडाचा एक एन्ट्री व्हिडिओ आणि कावळ्यांची पहिली चाहूल.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 10/21/2013 - 18:53

Permalink

21 Oct evening update

राग आला किंवा शिव्याशाप द्यायचे झाल्यास गळ्याखालच्या भागाची हालचाल करून घुबडीण काहीतरी पुटपुट करताना दिसते घुबडीण. या व्हिडिओमध्ये पहा: आज दिवसभरात आणखी पिल्लू बाहेर आलेलं दिसलं नाही पण आहे ते जिवंत आहे इतकंच . बाकी अधुनमधून घुबडाची सर्वांगाची साफसफाई चालू आहे. पिल्लाच्या वरच घुबडीण बसत असूनही ते दबत कसं नाही कोण जाणे.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Tue, 10/22/2013 - 09:01

In reply to 21 Oct evening update by गवि

Permalink

व्हिडिओ मध्ये पाण्याच्या

व्हिडिओ मध्ये पाण्याच्या प्रवाहासारखा आवाज येतोय
  • Log in or register to post comments

Submitted by जॅक डनियल्स on Tue, 10/22/2013 - 09:43

In reply to 21 Oct evening update by गवि

Permalink

मला तरी वाटते ती कावळ्याला

मला तरी वाटते ती कावळ्याला उत्तर देते आहे. हा चिडण्याचा आवाज नाही या बाबतीत मी खात्री देतो. त्या पिल्लाला तिने तिच्या पाया मध्ये घेतले असेल असे मला वाटते, घुबडाचे पाय (म्हणजे त्यांच्या पंजा खूप मोठा असतो.) त्या पोकळी मध्ये ते पिल्लू निवांत असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by उपास on Mon, 10/21/2013 - 19:06

Permalink

मस्त..

गवि अतिशय स्तुत्य.. तुमचं मनापासून अभिनंदन.. केवळ तिथे त्यांची अंडी आहेत म्हणून घुबडासारखा प्राणी घरात आलाय अन्यथा इतक्या सहज घुबड घरात येत नाही, दरम्यान त्याच्या मुलांना लगेच काही खाणं मिळायची सोय करु शकाल (म्हणजे उंदीर किंवा तत्सम काही जवळ ठेवणं वगैरे..) शिवाय पक्षीमित्र (सर्प मित्रांच्या चालीवर) किंवा एखाद्या संस्थेला सांगून जास्तित जास्त सुकर होईल त्या घुबडांचं हे पाहाता येईल का.. जर बाबा-घुबड येत नसेल/येऊ शकत नसेल आणि आई-घुबड शिकार करण्यापेक्षा संरक्षणावरच सगळा वेळ देत असेल तर पिल्लांची उपाशी पोटी तडफड बघवणार नाही.. त्यांच्या नैसर्गिक गोष्टीमध्ये ढवळाढवळ नकोय हे कळतय पण ते घरात आलेत अंडी घालायला तेव्हा काहीतरी करणं (नुसतं बघत बघण्यापेक्षा) प्राप्य वाटतं.. !
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 10/21/2013 - 19:20

In reply to मस्त.. by उपास

Permalink

आज चिकन ब्रेस्टचा कच्चा

आज चिकन ब्रेस्टचा कच्चा बोनलेस तुकडा दिला. पण तिला कळलंच नाही . बघितलाच नाहीन. शिवाय गव्हाणी घुबड हा काही तितका एन्डेन्जर्ड पक्षी नसावा माझ्या मते. मुंबईत तरी पुष्कळ असावीत. त्यामुळे त्याचा conservation group असेल असे वाटत नाही
  • Log in or register to post comments

Submitted by आदित्य पाध्ये on Sun, 10/27/2013 - 23:04

In reply to आज चिकन ब्रेस्टचा कच्चा by गवि

Permalink

फेसबुक ग्रुप

फेसबुका वरच्या एका ग्रुप चि लिन्क देतो तिथे मदत आणि माहिती दोन्ही मिळेल. https://www.facebook.com/groups/indianbirds/?fref=ts
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Mon, 10/21/2013 - 19:26

In reply to मस्त.. by उपास

Permalink

+१

अगदी हेच विचार मनात आले होते. आता गवि कुठे उंदीर मारत बसणार म्हणुन थोडं बोनलेस चिकन (जर गवि मांसाहारी असतील तर) घरात आणुन ठेवावं असा आगावू सल्लाही दिला होता. :P
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 10/22/2013 - 11:44

In reply to +१ by गणपा

Permalink

थोडं बोनलेस चिकन (जर गवि

थोडं बोनलेस चिकन (जर गवि मांसाहारी असतील तर)
मेल्या माझ्या शेजारी बसून माझ्यासोबत एकाच वाडग्यातून कालिमिरी मुर्ग, पहाडी कबाब, चिकन आफताब आणि बेवडा चिकन हे सर्व पदार्थ एकाच वेळी खाल्लेस ना एकेकाळी? तरी तुला असली शंका? (आपण दोघे सोडून बाकीचे सर्व भुकेले राहिले होते ते.. आठवलं का आता? ) पुराव्याने शाबीत करीन.. कुठे गेला तो विमें? नाहीतर साक्षात श्री.रा.रा. नीलकांत होते की बाजूला..
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 10/22/2013 - 12:31

In reply to थोडं बोनलेस चिकन (जर गवि by गवि

Permalink

बेवडा चिकन?

ही कसली डिश हो गविसर्कार? चिकन 'देशी'त घोळवतात की म्यारिनेट वैग्रे करतात की अजून कै =)) (जाणण्यास उत्सुक टी-टोटलर) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Mon, 10/28/2013 - 10:44

In reply to बेवडा चिकन? by बॅटमॅन

Permalink

ते जाणून घ्यायला मुंबईत यावे

ते जाणून घ्यायला मुंबईत यावे लागेल. कसें !!! :-)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com