स्प्लेंडर : शतशब्द-सत्यकथा

उद्दाम's picture
उद्दाम in जनातलं, मनातलं
4 Sep 2013 - 1:36 pm

माझी स्प्लेंडर होती. कोरी करकरीत होती. बरीच वर्षे गावात वापरली.

मग अखेर एक दिवस मुंबई गाठली. तिथेही छान करियर मिळाले. पण मुंबईची लोकल, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी , वेळोवेळी कंपनीने घडवलेल्या विमानयात्रा .... यात स्प्लेंडर घरीच धूळ खात बसली. चार पावसाळेही पाहिले तिने -- माझ्याशिवाय.

आणि एक दिवस मग ठरवलं.

"आता मला स्प्लेंडरची अजिबात गरज नाही. "

होना! लोकल, ट्याक्सी, विमान .... आता स्प्लेंडर कशाला हवी?

.. स्प्लेंडर विकली.

त्यानंतर चारच दिवसात अपघात झाला. माझा डावा पाय चार ठिकाणी फ्रॅक्चर झाला. कोणतीही दुचाकी चालवायला आता मी असमर्थ आहे.

आता मला स्प्लेंडरची अजिबात गरज नाही.

माझ्या त्या 'वाक्याचा' नियतीनं 'हा' अर्थ लावला होता, हे आठवून आजही अस्वस्थ होतं.

कलावाङ्मयकथाप्रतिभा

प्रतिक्रिया

पैसा's picture

4 Sep 2013 - 2:21 pm | पैसा

थोडक्यात, तरी संपूर्ण कथा लिहायला जमली!

स्पंदना's picture

5 Sep 2013 - 5:33 am | स्पंदना

गुड!

चिगो's picture

6 Sep 2013 - 7:53 pm | चिगो

कथा जमलीय..

हायकु या काव्य प्रकाराची आठवण झाली. कमी शब्दांत मोठा आशय. मस्त कथा.

अर्धवटराव's picture

7 Sep 2013 - 9:00 pm | अर्धवटराव

नियतीची एण्ट्री साफ चुकली या कथेत.

प्यारे१'s picture

7 Sep 2013 - 9:42 pm | प्यारे१

:(

arunjoshi123's picture

7 Sep 2013 - 10:02 pm | arunjoshi123

अशी सक्रीय नियती असेल तर लवकर आपला आयडी बदला. साधे उपद्रवहिन बाईक विकणे जर अशा शिक्षेस पात्र आहे तर नामधारी किंवा कसा उद्दामपणा फारच महागात पडू शकतो.

विटेकर's picture

8 Sep 2013 - 11:42 am | विटेकर

प्लुस १

अन्यथा, तसे आमचे वरिजिनल नाम गजानन आहे.

मुक्त विहारि's picture

7 Sep 2013 - 10:06 pm | मुक्त विहारि

छान

lakhu risbud's picture

8 Sep 2013 - 12:34 pm | lakhu risbud

चच्।हन सुन्दर् !

प्रसाद गोडबोले's picture

10 Sep 2013 - 12:39 pm | प्रसाद गोडबोले

छान