मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्प्लेंडर : शतशब्द-सत्यकथा

उद्दाम · · जनातलं, मनातलं
माझी स्प्लेंडर होती. कोरी करकरीत होती. बरीच वर्षे गावात वापरली. मग अखेर एक दिवस मुंबई गाठली. तिथेही छान करियर मिळाले. पण मुंबईची लोकल, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी , वेळोवेळी कंपनीने घडवलेल्या विमानयात्रा .... यात स्प्लेंडर घरीच धूळ खात बसली. चार पावसाळेही पाहिले तिने -- माझ्याशिवाय. आणि एक दिवस मग ठरवलं. "आता मला स्प्लेंडरची अजिबात गरज नाही. " होना! लोकल, ट्याक्सी, विमान .... आता स्प्लेंडर कशाला हवी? .. स्प्लेंडर विकली. त्यानंतर चारच दिवसात अपघात झाला. माझा डावा पाय चार ठिकाणी फ्रॅक्चर झाला. कोणतीही दुचाकी चालवायला आता मी असमर्थ आहे. आता मला स्प्लेंडरची अजिबात गरज नाही. माझ्या त्या 'वाक्याचा' नियतीनं 'हा' अर्थ लावला होता, हे आठवून आजही अस्वस्थ होतं.

वाचने 3430 वाचनखूण प्रतिक्रिया 12

arunjoshi123 07/09/2013 - 22:02
अशी सक्रीय नियती असेल तर लवकर आपला आयडी बदला. साधे उपद्रवहिन बाईक विकणे जर अशा शिक्षेस पात्र आहे तर नामधारी किंवा कसा उद्दामपणा फारच महागात पडू शकतो.