श्रद्धा

अर्धवटराव's picture
अर्धवटराव in जनातलं, मनातलं
19 Aug 2013 - 2:38 am

नमस्कार मंडळी.

आज आम्हि एका कुलीन स्त्रीची फर्याद घेऊन मिपा दरबारी हजर झालो आहोत. या बयेचं नाव आहे श्रद्धा. हिच्या बद्दल आम्हाला अपार सहानुभुती, आदर, प्रेम आणि आपुलकी आहे (... नाहि, 'ति' श्रद्धा वेगळी आहे हो... एव्हाना ति लग्न वगैरे करुन सुखाने नांदत असेल.)

हिचं गार्‍हाणं असं आहे कि येऊन जाऊन लोकं हिला उगाच टपली मारुन जातात. विचारवंत (अस्सल, आणि खरे अस्सल) हिला "त्या" गल्ली बोळातली असल्यासारखं तुच्छ समजतात, तर अविचारवंत (अस्सल आणि निव्वळ अस्सल) हिच्या नावाने काय वाटेल ते खपवतात. मग हि बिचारी न्याय मागायला इकडे तिकडे वणवण भटकते, तर वैज्ञानीक विचारांची मंडळी (अस्स्ल, स्युडो अस्सल आणि उरले सुरले सगळे) हिचा जीव घ्यायला, हिला संपवायला टपलेले दिसतात.

हिचं रूप कसं, हिचा रंग कसा, हिची चालढाल कशी याबद्दल प्रत्येकाचं एक स्वतंत्र मत आहे (आणि ते फारसा विचार न करता बनवण्यात आलं आहे). त्यामुळे होतं काय, कि जेंव्हा केंव्हा माणासाला भांडायची, लुबाडणुक करायची, आणि इतर नसत्या उठाठेवी करायची गरज पडते तेंव्हा तो अपोझीशन पार्टीला हिच्या मांडीवर बसवतो आणि मग गावकुसाबाहेरच्या या अछुत काफिराला दगड मारायला सर्वांना पर्मीट मिळतं.

तसं बघितलं तर हि ब्रह्मदेवाची कन्या. माणसाला, फॉर दॅट मॅटर कुठल्याही प्राणिमात्राला घडवताना ब्रह्मदेवाने प्रथम त्याला हिच्या मांडीवर बसवलं, हिचं स्तनपान करवलं. त्यामुळे सजीव पृथ्वीतलावर अवतरला तो हिने दिलेल्या अन्नदानातुन घडलेले वैचारीक शरीर घेऊनच. पण माणुस मुळातच कृतघ्न. नो रिस्पेक्ट फॉर द लेडी, यु सी.

आता हरिदासाच्या मूळपदावर येऊ.
श्रद्धा म्हणजे नेमकं काय?? माणसाच्या ज्ञानलालसेमागे त्याची अपूर्णत्वाची जाणिव आहे, आणि माणसाच्या कर्मसंकल्पामागे त्याची पूर्णात्वाची जाणिव आहे. या दोन जाणिवांमधला डेल्टा म्हणजे श्रद्धा. ज्ञानलालसा जेव्हढी तीव्र, आणि/किंवा कर्मसंकल्प जेव्हढा बळकट, तेव्हढा श्रद्धेचा व्हॉल्युम जास्त, डेफ्थ जास्त. या व्हॉल्युम मधेच कर्माची पायाभरणी होते व ज्ञानाच्या मुळांना पोषक तत्व आत्मसात करायला स्कोप मिळतो. श्रद्धा (सो कॉल्ड) देवा-धर्माच्या वळचणीला जात नाहि... देवा-धर्मालाच श्रद्धेच्या नावाखाली खुंटीला टांगण्यात येतं... माणुस आपली विवेकबुद्धी गहाण ठेवतो आणि हिला बिचारीला "अंध" म्हणुन चाबकाचे फटके खावे लागतात. वास्तवीक पाहता, दृष्टीचे आवश्यक असे तिन्ही घटक, कोणि-काय-कसे बघावे, हे श्रद्धेच्याच उबदार पंखाखाली नांदत असतात... मग हिला आंधळी कसे म्हणता येईल?

असो... सांगायचं तात्पर्य हे, कि इतःपर श्रद्धेवर पत्थरफेक करायची उर्मी आलीच तर एकवार पुन्हा विचार करा.

दॅट्स ऑल मिलॉर्ड.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

प्लासेबो ईफेक्ट कसा काम करतो माहित नाहि. पण असतो एव्हढं नक्कि. पण म्हणून;
- दर वेळेला प्लासेबो ईफेक्ट वर विसंबून रहाता येत नाहि
- प्रत्येक बाबतीत प्लासेबो ईफेक्ट असेलंच असं नाहि
- ब्लाईंड ग्रूप जो असतो, त्यात प्रत्येकाला प्लासेबो ईफेक्टचा अनुभव येईलंच असं नाहि.

मग प्लासेबो ईफेक्ट असा प्रकार आहे असं आपण मान्य करतो तर श्रध्दा मान्य करायला खळखळ का करतो?

(अंधश्रध्दा बाजूला ठेवा. अंधश्रध्दा चूकच आहे आणि अंधश्रध्दा = प्लासेबो ईफेक्ट अशी गल्लत तर अजिबात करू नका.)

अर्धवटराव's picture

19 Aug 2013 - 3:33 am | अर्धवटराव

ते प्लासेबो इफेक्ट म्हणजे नक्की काय ??

अर्धवटराव

काकाकाकू's picture

19 Aug 2013 - 4:51 am | काकाकाकू

या नुसत्या विश्वासापाई पेशंट बरा होतो - तो प्लासेबो ईफेक्ट.

सर्दि-पडसं झालेले १०० लोकं घ्या, सगळ्याना सांगा की 'एक नवं, फार गुणकारी वाटणारं औषध' तुम्हाला देणार आहोत. प्रत्यक्षात ५० जणांनाच ते औषध द्या. ज्या ५० जणांना ते औषध दिलं नाहिये (खरोखरच्या अशा चाचण्यांमधे नुसतेच फिलर्स असलेली, मुख्य औषधी द्रव्य अजिबात नसलेली, गोळी देतात अशा ग्रूपला) त्यातल्या काहि जणाना पण 'गुण येतो'! निव्वळ, "मला औषध दिलंय, त्यामुळे मला आता बरं वाटेल", या भावनेपोटी असा गुण येतो. अर्थात, मी वर सांगितलेले तीन मुद्दे दिसतात अशा ट्रायल्स मधे.

कवितानागेश's picture

19 Aug 2013 - 7:44 am | कवितानागेश

त्यातल्या काहि जणाना पण 'गुण येतो'! निव्वळ, "मला औषध दिलंय, त्यामुळे मला आता बरं वाटेल", या भावनेपोटी असा गुण येतो. नक्की केवल विश्वासामुळेच असा 'गुण' आला, की आपोआप गुण आला?
म्हणजे तो आजर औषधाशिवाय आपला आपण बरा होणारा होता की कसे?
की नेमकं काहीतरी 'घरगुती औषध' त्यांच्या खाण्यात आलं? ( (जसं सर्दीसाठी आलं/ मिरी..)
माझा असल्या प्रयोगांवर विश्वास नाही.
असा केवल प्लासिबो इफेक्टनी गुण यायला लागला तर फार्मा कम्पन्या बोम्बलतिल की..

काकाकाकू's picture

20 Aug 2013 - 5:44 am | काकाकाकू

त्यातला दुसरा आणि तिसरा बघ - तुझ्या "केवळ प्लासेबो....."चं उत्तर त्यात आहे. 'असले प्रयोग' फार्मा कंपन्याच औषधं पडताळून पहाण्यासाठि वापरतात.

तुझा घरगुती औषधाचा मुद्दा अगदि बरोबर आहे. पण तसं काहि टाळायची खबरदारी घेउनसुध्दा प्लासेबो ईफेक्ट दिसतो / दिसू शकतो.

कवितानागेश's picture

20 Aug 2013 - 6:38 am | कवितानागेश

हा सगळा फारच गमतीदार प्रकार आहे!
प्लासिबो इफेक्ट असतोच मुळी!!
पन श्रद्धा मात्र चुकीची असते!?:P

काकाकाकू's picture

20 Aug 2013 - 7:11 am | काकाकाकू

मी तेच तर म्हंटलंय माझ्या पहिल्या प्रतिसादात - "मग प्लासेबो ईफेक्ट असा प्रकार आहे असं आपण मान्य करतो तर श्रध्दा मान्य करायला खळखळ का करतो?"

रमेश आठवले's picture

20 Aug 2013 - 10:09 am | रमेश आठवले

होमिओपाथि च्या औषधाने गुण आला तर तो केवळ प्लासिबो इफेक्ट असतो असे बरेच शास्रवेत्ते मानतात.

सुबोध खरे's picture

20 Aug 2013 - 7:55 pm | सुबोध खरे

प्लासिबो इफेक्टयात मी जर एखाद्या रुग्णाला डोके दुखी साठी जीवनसत्वांची गोळी दिली तर आपळी डोकेदुखी बरी होणार आहे हे त्याच्या मनाने घेतल्यामुळे त्याची डोकेदुखी पळून जाते. या परिणामाला प्लासिबो इफेक्ट म्हणतात अर्थात या परिणामात सायको सोमाटिक आजार जास्त प्रमाणात बरा होतो.पण जर हाड मोडले असेल तर कितीही मनाला तयार केले तरी हाड काही जुळून येणार नाही. एवढेच होते कि या औषधाने हाड जुळून येणार आहे या मानसिकतेने तो माणूस त्याचे दुःख लवकर विसरतो आणि कामाला लागू शकतो.
जर आपण हाड जुळण्यासाठी होमियोपाथीचे औषध १०० रुग्णांना दिले आणि त्यापैकी पन्नास रुग्णांचे हाड चार ऐवजी तीन आठवड्यात जुळले. इतर ५० रुग्णांचे आणि औषध न घेतलेल्या १०० रुग्णांचे चार आठवड्यात जुळले तर ते औषध परिणाम कारक आहे असे म्हणता येते पण जर औषध घेतलेल्या शंभर पैकी दहा रुग्णांचे हाड तीन आठवड्यात जुळले आणि न घेतलेल्या आठ रुग्णांचे तीन आठवड्यात जुळले तर हा फरक (२ %) फारसा लक्षात घेण्यासारखा नाही. म्हणजे चार आठवडे ते औषध घेऊन पैसे फुकट घाल् वण्यासारखे आहे.
केवळ औषध घेऊन मला बरे वाटले हे म्हणणे म्हणजे प्लासिबो इफेक्ट आहे असे म्हणता येईल.
युरोपात अशा बर्याच आजारावर होमियोपाथीच्या औषधांची चाचणी घेतल्यावर त्याना असे लक्षात आले कि होमियोपथी ची औषधे घ्या किंवा तशाच साबुदाण्याच्या औषध नसलेल्या गोळ्या घ्या परिणाम सारखाच होतो. यात साबुदाण्याच्या गोळ्या देऊन प्लासिबो इफेक्ट रद्द केला गेला जातो. अशा फार मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेऊन आता युरोपात बहुसंख्य राष्ट्रे यांनी होमियोपथीची औषधे प्लासिबो पेक्षा चांगली नाहीत अशा निष्कर्षाला पोहोचून त्यानच्या औषधांना विम्याचे पैसे देणे बंद केले आहे.
http://www.thelancet.com/journals/lancet/article/PIIS0140-6736(05)67177-2/abstract

प्रभाकर पेठकर's picture

20 Aug 2013 - 4:28 pm | प्रभाकर पेठकर

या नुसत्या विश्वासापाई पेशंट बरा होतो - तो प्लासेबो ईफेक्ट.

ह्यालाच 'फेथ हिलींग' असेही म्हणतात. प्रत्येकाचे शरीर, नैसर्गिकरित्या, त्यातील व्याधीशी झटापट करून व्याधीमुक्त होण्याचे प्रयत्न करत असते. कांही सौम्य आजारात ह्याचा औषधा इतकाच प्रभाव पडून, व्याधीग्रस्त रुग्ण व्याधीमुक्त होतो. तर मोठ्या आजारात, डॉक्टरांच्या कौशल्यावार असलेल्या विश्वासाने, डॉक्टर देत असलेल्या औषधांना रुग्णाचं शरीर चांगला सकारात्मक प्रतिसाद देते आणि रुग्ण व्याधीमुक्त होतो.

मिपावरील माननिय डॉक्टर सदस्य योग्य तो प्रकाश टाकतीलच.

काकाकाकू's picture

20 Aug 2013 - 7:11 pm | काकाकाकू

फेथ हिलींग मधे "मी तुला याने बरं करीन" हा भाग आहे जो प्लासेबो ईफेक्ट मधे नाहि. "औषधाची गुणवत्ता ठरवताना नुसतंच औषध घेतलंय या कल्पनेने देखील काहि लोकाना थोडाफार गुण येऊ शकतो हे लक्षात ठेवा" एव्हढंच फार्मा-विज्ञान (ओढुन ताणून केलेला शब्द आहे कल्पना आहे) म्हणतं. "प्लासेबो ईफेक्ट वापरून आम्हि तुमची सर्दि बरी करू" असा प्रकार नसतो. तसं असतं तर मग हो, फेथ हिलींग = प्लासेबो ईफेक्ट असं म्हणता येईल.

श्रद्धेची व्याख्या आवडली. एकदा श्रद्धा काय हे कळलं की मुळात "अंधश्रद्धा" हा शब्दच चुकीचा अहे हे कळतं.

पण मला एक शंका आहे. तुम्ही श्रद्धेला ब्रम्हदेवाची कन्या म्हटलंय. तसंच कुठल्याही प्राणिमात्राला ब्रम्हदेवाने घडवलं असंही तुम्ही म्हणताय. ब्रम्हदेव कुठे असतात? तसेच शेषशायी भगवान विष्णूंचा क्षीरसागर कुठे आहे?

माझ्या कैलासाबद्दल मुळीच शंका नाहीत. उत्तरेला कैलास पर्वत नकाशावर दाखवता येतो. शंकरांचा एकंदरीत "गेटप" पाहता हा देव कुठून आला असेल याचे स्वतःपुरते का होईना तर्काला पटेल असेल उत्तरही मिळते.

आणि हो, मला शिव तांडव स्तोत्र खुप आवडते.

त्याच नकाशात ब्रह्मदेश दिसत नाही होय तुम्हाला?
काय तुम्ही?

पूर्वी होता. आता त्या देशाला म्यानमार म्हणतात. म्हणूनच तर तो प्रश्न विचारला. ;)

स्पंदना's picture

20 Aug 2013 - 7:36 am | स्पंदना

म्यानमार नाव ठेवल्यापासुन किती मारामारी चालु झाली तेथे पाहिलत ना?
तसही ब्रह्म देव आपल मुळच घर सोडुन कुठं जातील, जरा नव्या पिढीने फॅशनेबल नाव दिल इतकच. ते र्‍हात्याती तीतच.

म्यानमार नाव ठेवल्यापासुन किती मारामारी चालु झाली तेथे पाहिलत ना?

अगदी अगदी. एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत म्हणून मारामारी सुरू झाली म्हणून म्यान-मार असे नाव पडले.

पण सीरियसलि, एका म्यानात २ तलवारी राहत नाहीत तर म्यान जरा मोठे करता येत नव्हते काय? =))

स्पंदना's picture

19 Aug 2013 - 4:35 am | स्पंदना

श्रद्धा (सो कॉल्ड) देवा-धर्माच्या वळचणीला जात नाहि... देवा-धर्मालाच श्रद्धेच्या नावाखाली खुंटीला टांगण्यात येतं

बेस्टंम बेस्ट!

अर्धवटराव's picture

19 Aug 2013 - 4:41 am | अर्धवटराव

ब्रह्मदेवाच्या उल्लेखामागे कुठले पौराणीक संदर्भ नाहित. मी थोडं रूपक वगैरे वापरून लेखाला भारदस्तपणा देण्याचा प्रयत्न केला (फसला म्हणायचा च्या आयला :D )

मला सजीवांची कर्मप्रेरणा फार अपील करते. हि प्रेरणा सजीवांसोबत डेव्हलप झाली आणि सजीवांसोबतच ति नष्ट होणार हे मला मान्य नाहि. निसर्गात हि प्रेरणा आदिम आहे, सनातन आहे. त्यामुळे कुठलीच निर्मीती, घडण, "आपोआप" होते हे काहि आपल्याला पचत नाहि. निसर्गातली कुठलिही क्रिया निरुद्देश असेल पण त्यात अजाणतेपणा नसतो. ब्रह्मदेवाच्या रुपकामागे हाच विचार आहे.

अवांतरः "वीष्णूंचा" असा उल्लेख निरुद्देशी आहे कि अजाणतेपणी तसा तो होऊन गेलाय ? ;)

अर्धवटराव

ब्रह्मदेवाच्या उल्लेखामागे कुठले पौराणीक संदर्भ नाहित. मी थोडं रूपक वगैरे वापरून लेखाला भारदस्तपणा देण्याचा प्रयत्न केला (फसला म्हणायचा च्या आयला smiley )

अगदीच असं नाही. भारतीय धारणेनुसार ब्रम्हदेव हा सृष्टीचा कर्ता आहे. त्यामुळे मानवाबरोबरच मानवाच्या भावभावनांचे निर्मिकत्व ब्रम्हदेवाकडे दिले तर त्यात वावगे काही दिसत नाही. :)

मला सजीवांची कर्मप्रेरणा फार अपील करते. हि प्रेरणा सजीवांसोबत डेव्हलप झाली आणि सजीवांसोबतच ति नष्ट होणार हे मला मान्य नाहि. निसर्गात हि प्रेरणा आदिम आहे, सनातन आहे. त्यामुळे कुठलीच निर्मीती, घडण, "आपोआप" होते हे काहि आपल्याला पचत नाहि. निसर्गातली कुठलिही क्रिया निरुद्देश असेल पण त्यात अजाणतेपणा नसतो. ब्रह्मदेवाच्या रुपकामागे हाच विचार आहे.

+१
"एकोहं बहुस्याम", एक असलेल्या परमात्म्याला अनेक व्हायची ईच्छा झाली आणि हे विश्व आकाराला आले असे भारतीय समाजमन मानते.
ही धारणा बाजूला ठेवली आणि आजची बिग बँग थेअरी जरी विचारात घेतली तरी सजीव सृष्टीला जन्म देणारा महास्फोट झालाच का हा प्रश्न उरतोच.

अवांतरः "वीष्णूंचा" असा उल्लेख निरुद्देशी आहे कि अजाणतेपणी तसा तो होऊन गेलाय ?

ते आदरार्थी अनेकवचन आहे. "विष्णूचा" असा एकवचनी उल्लेख केल्याने कुण्याच्या भावना दुखवायला नकोत. :)
हेच पथ्य मी ज्ञानेश्वरांबद्दल लिहितानाही पाळतो. माझ्या मनात,
कैवल्याचा पुतळा, प्रगटला भुतळा,
चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानदेव माझा

असे असते. परंतू लिहिताना मात्र मी ज्ञानदेवांनी, ज्ञानदेवांचा असे आदरार्थी प्रत्यय वापरतो.

यशोधरा's picture

19 Aug 2013 - 7:19 am | यशोधरा

आवडलं.

कवितानागेश's picture

19 Aug 2013 - 7:47 am | कवितानागेश

हिचं रूप कसं, हिचा रंग कसा, हिची चालढाल कशी याबद्दल प्रत्येकाचं एक स्वतंत्र मत आहे (आणि ते फारसा विचार न करता बनवण्यात आलं आहे).
=))

"श्रध्दा ही सर्वमाझारी सर्व बाजूनी श्रेष्ठ असे" असं श्री गजाननविजय ग्रंथात म्हटलं आहे.

धमाल मुलगा's picture

20 Aug 2013 - 6:16 am | धमाल मुलगा

अश्रध्दांची आपल्या अश्रध्द असण्यावर इतकी प्रचंड श्रध्दा असते, की एका अश्रध्दाच्या ह्या श्रध्देपुढे दहा सश्रध्दांची श्रध्दा तोकडी दिसते. :)

>>विचारवंत (अस्सल, आणि खरे अस्सल) हिला "त्या" गल्ली बोळातली असल्यासारखं तुच्छ समजतात,
:) पण त्यांची स्वतःची आपल्या विचारांवर, त्यांच्या विचारांवर पगडा असलेल्यांवर असते ती काय असते असे विचारले की मात्र भयानक उसळतात. :)

>>तर अविचारवंत (अस्सल आणि निव्वळ अस्सल) हिच्या नावाने काय वाटेल ते खपवतात.
सर्वसामान्य जनतेला कोणत्यातरी सुपर-नॅचरल शक्तीचा आधार आपल्या पाठीशी आहे इतका विचार पुरेसा असतो रोजची लढाई पार करायला. ह्याच गोष्टीचा फायदा घेणारे दलाल काय काल-आजचे आहेत?

बाकी झकासच! विचार मस्त मांडलाय देवा. :)

जाताजाता : ते 'अस्सल आणि निव्वळ अस्सल' काय जबराट आहे. :) अगदी म्हणजे अगदीच आवडलं.

स्पंदना's picture

20 Aug 2013 - 7:34 am | स्पंदना

'अस्सल आणि निव्वळ अस्सल

व्हर्जीन आणी एक्स्ट्रा व्हर्जीन :))

सर्वसामान्य जनतेला कोणत्यातरी सुपर-नॅचरल शक्तीचा आधार आपल्या पाठीशी आहे इतका विचार पुरेसा असतो रोजची लढाई पार करायला.

काय लाख मोलाचं म्हटलंत धमालराव.

ह्याच गोष्टीचा फायदा घेणारे दलाल काय काल-आजचे आहेत?

या क्षणी असे दहा बारा जण तरी नजरेत आहेत. मेरा बस चले तो सबको पोकल बांबूके फटके दुंगा ;)

धमालरावांनी अगदी बलीवर्दाचा नेत्रभेद केलेला आहे. हे वायझेड विचारवंत लै डोक्यात जातात.

क्लिंटन's picture

20 Aug 2013 - 9:16 pm | क्लिंटन

अश्रध्दांची आपल्या अश्रध्द असण्यावर इतकी प्रचंड श्रध्दा असते, की एका अश्रध्दाच्या ह्या श्रध्देपुढे दहा सश्रध्दांची श्रध्दा तोकडी दिसते.

+१०००.अगदी लाख मोलाची बात केलीस धम्या.पण गंमत अशी की अशा मंडळींची आपल्या अश्रध्द असण्यावर प्रचंड श्रध्दा आहे या गोष्टीचा पत्ताच नसतो.

मला श्रध्दा कशाला म्हणावे आणि अंधश्रध्दा कशाला म्हणावे याचे उत्तर अजूनही सापडलेले नाही. उदाहरणार्थ:

१. एडिसनला वीजेच्या दिव्याच्या प्रयोगात हजारेक वेळा अपयश आले.तरीही तो प्रयत्न करत राहिला.आता असे प्रयत्न करत राहण्यामागे "आपल्या कल्पनेतील वीजेच्या दिव्याला आपण प्रत्यक्षात आणू शकतो" ही दृढ भावना असणारच अन्यथा वारंवार अपयश येऊनही असे प्रयत्न करत राहणे शक्य होईल असे वाटत नाही.आता एडिसनच्या या भावनेला श्रध्दा म्हणावे की अंधश्रध्दा? त्यावेळी वीजेच्या संदर्भातील शास्त्रीय तत्वांची बैठक तयार झाली होती की नाही याची कल्पना नाही.पण राईट बंधूंनी पहिले विमान उडविले १९०३ मध्ये आणि ज्याला एरोस्पेस इंजिनिअरींग म्हणतात त्याचे अगदी मूलभूत तत्व "बाऊंडरी लेअर" ची संकल्पना मांडली लुडविग प्रॅन्ड्टलने १९०४ मध्ये.तेव्हा राईट बंधूंनी विमानाचे उड्डाण केले तेव्हा विमानाच्या संदर्भातील शास्त्रीय तत्वांची बैठक तयार झाली नव्हती असे म्हणायला हरकत नसावी.मग आपल्या कल्पनेतील विमान आपण प्रत्यक्षात आणू शकतो या भावनेने राईट बंधूंना पछाडले असेल तर ती त्यांची श्रध्दा की अंधश्रध्दा?

२. अनेक वेळा अनेक लोक विविध शास्त्रीय तत्वांचा हवाला देऊन छातीठोक विधाने करत असतात.पण प्रत्यक्षात ती तत्वे पडताळून बघायला लागणारे प्रयोग किती लोकांनी केलेले असतात? तरीही ती तत्वे खरी मानणे म्हणजे इतर कोणीतरी केलेल्या प्रयोगावर विसंबून राहणे नाही का?मग अशा इतरांच्या प्रयोगांवर विसंबून राहणे म्हणजे श्रध्दा की अंधश्रध्दा?

३. बहुतेक वेळा एखादी भव्यदिव्य गोष्ट करताना आपल्याला यश यायची शक्यता फारच थोडी असते आणि आपल्याविरूध्द "ऑड्स" बरेच जास्त असतात. तरीही जे लोक अशा वेळी प्रयत्न करायचे सोडत नाहीत तेच यशस्वी होतात. कॉमन सेन्स सांगेल की अशा वेळी प्रयत्न करणे मूर्खपणाचे आहे.तरीही जे लोक प्रयत्न करणे सोडत नाहीत अशांचा आशावाद म्हणजे श्रध्दा की अंधश्रध्दा? मी तर असे म्हणेन की अशा वेळी प्रयत्न करायचे सोडून फालतूच्या प्रोबॅबिलिटीज काढत बसले (अनेकदा विचारवंत करतात त्याप्रमाणे) तर तो माणूस गंडलाच म्हणून समजा.जर खरोखरच काहीतरी करायची इच्छा असेल तर असल्या प्रोबॅबिलिटीजना पहिल्याप्रथम केराची टोपली दाखवावी असे माझे वैयक्तिक मत आहे.

तेव्हा श्रध्दा म्हणजे नक्की काय आणि अंधश्रध्दा म्हणजे नक्की काय?

कोणी लोकांच्या श्रध्देचा गैरफायदा उठवून त्यांना फसवून स्वत:चे खिसे भरत असेल तर अशा प्रवृत्तींना माझा अगदी जोरदार विरोध आहे.एखाद्याचा देवावर विश्वास आहे म्हणून मी सांगतो तशी पूजा करा म्हणजे तुमच्या मनासारखे होईल असे म्हणत स्वत:चे खिसे भरणे अगदी पूर्णपणे असमर्थनीय आहे.पण मुळातली देवावरची श्रध्दा (की विश्वास की आणखी काही) ही श्रध्दा की अंधश्रध्दा?

उपाशी बोका's picture

20 Aug 2013 - 9:12 am | उपाशी बोका

श्रद्धा: faith (http://dictionary.reference.com/browse/faith?s=t)
Dictionary प्रमाणे याचा अर्थ होतो: belief that is not based on proof

rational: having or exercising reason, sound judgment, or good sense (http://dictionary.reference.com/browse/rational?s=t)

श्रद्धा ही २ प्रकारची असू शकते.
१. अंध श्रद्धा (blind faith)
२. rational (मराठी?)

आता यातला फरक काय? तर खालील उदाहरण बघूया.
१. लोकहो, तुम्ही मला ५ वर्षांपासून ओळखता आणि तुम्हाला माहीत आहे, की मला नेहमी विमान उडवायला आवडते. मी व्हिडीयो गेमवर विमान उडवले आहे. या विषयावर नुकतेच मी १ पुस्तक पण वाचले. ते बघा: तिथे १ विमान उभे आहे आणि त्याची किल्ली पण तिथेच आहे. चला, मी तुम्हाला विमानात उडवून आणतो.

२. लोकहो, तुम्ही मला ५ वर्षांपासून ओळखता आणि तुम्हाला माहीत आहे, की मला नेहमी विमान उडवायला आवडते. मी विमान चालवायचे शिक्षण पूर्ण केले, हे बघा माझे सर्टिफ़िकेट. त्यानुसार मी सेसना विमानात १०० तास उडालो आहे. मी आपल्या क्लबमधून सेसना भाड्याने घेतो. चला, मी तुम्हाला विमानात उडवून आणतो.

आता या दोन्हीत फरक काय? दोन्ही प्रसंगात तुम्ही मला प्रत्यक्ष विमान उडवताना बघितले नाही. दोन्ही प्रसंगात तुम्हाला माझ्या कुवतीबद्दल श्रद्धा असावी लागेल. पण कोण मूर्ख पहिल्या प्रसंगात विमानात जाईल?

धार्मिक श्रद्धेचे पण थोडेफार असेच आहे. आजारपणात मी शिर्डीला जावून आलो, तर मी खडखडीत बरा होईन, अशी माझी श्रद्धा आहे. गणपतीची मूर्ती दूध पिते, यावर माझी श्रद्धा आहे. मी प्रत्येक xxx वारी उपास केला की मला मुलगा(च) होईल, यावर माझी श्रद्धा आहे. मी मंगळ असलेल्या मुलाशी/मुलीशी लग्न केले, तर माझे काही खरे नाही, यावर माझी श्रद्धा आहे. श्रावणात मी मांसाहारी खाल्ले, की मी नरकात जाणार, यावर माझी श्रद्धा आहे.

याउलट वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे rational विचार करतात, अनेक प्रश्न विचारतात, असंच का किंवा तसचं का हे विचारतात, एखादी गोष्ट सांगितली की पुरावा मागतात. मुख्य म्हणजे कशावरही आंधळा विश्वास टाकत नाहीत.

तिमा's picture

20 Aug 2013 - 5:02 pm | तिमा

कित्येकदा हे सश्रद्ध लोकच अंधश्रद्ध बनून एखाद्या चांगल्या विचारवंताला ठार मारतात.

चौकटराजा's picture

20 Aug 2013 - 5:42 pm | चौकटराजा

अगदी पुरातन कालापासून श्रद्धा आली की देव आलाच पाहिजे असा त्रिकलाबाधित फॉर्मुला मानवाने फिक्स केलेला आहे.
मी नास्तिक आहे. म्हणजे पावणारा ईश्वर अस्त्तिवात आहे यावर माझा विश्वास नाही. याचा अर्थ माझा श्रद्धा या विषयाशी काही संबंध नाही असे तो त्रिकालाबाधित फोर्मुला सांगतो. बरोबर ? पण मी एक माणूस आहे. माझ्या विचारशक्तीला, आठवणीला मर्यादा आहेत. सबब दरवेळी चिकित्सा करून मी निर्णय घेऊच शकत नाही. कारण चिकित्सेत फार गुंतागुंत व जबाबदारी असते. मग मी काही आडाखे अनुभवानुसार बनवतो. व त्या रेडीरेकनरला माझी " श्रद्धा" असे म्हणतो. तात्पर्य चिकित्सा व श्रद्धा या दोन मानसिक अवस्था असून त्यांच्या संकरानेच प्रत्येक प्राणिमात्र जीवन जगत असतो. त्याचा देवाशी धर्माशी राष्ट्राशी संस्कृतीशी काही संबंध नाही. या दोघींच्या तावडीतून सुटका फक्त
मरण्च देउ शकते. कारण मनाचा अंत तिथे होतो.

अर्धवटराव's picture

20 Aug 2013 - 6:05 pm | अर्धवटराव

>> तात्पर्य चिकित्सा व श्रद्धा या दोन मानसिक अवस्था असून त्यांच्या संकरानेच प्रत्येक प्राणिमात्र जीवन जगत असतो. त्याचा देवाशी धर्माशी राष्ट्राशी संस्कृतीशी काही संबंध नाही.
+१

अर्धवटराव

भ ट क्या खे ड वा ला's picture

20 Aug 2013 - 8:02 pm | भ ट क्या खे ड वा ला

खूप वर्षापूर्वी वाचलेले एक पुस्तक आठवले लेखक बहुदा "बाळ भागवत" पुस्तकाचे नाव "देव छे | परग्रहावरील अंतराळवीर "
जिज्ञासूनी अवश्य वाचावे.

म्हैस's picture

21 Aug 2013 - 10:24 am | म्हैस

ब्रह्मदेव कुठे असतात , भगवान विष्णूंचा क्षीरसागर कुठे आहे हे सांगता येत नसता. दुसर्याने सांगून ते पटतहि नसतं. त्यासाठी स्वताच प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी, भक्तियोग, न्यानयोग, कर्मयोग, राजयोग, सिद्धयोग असे अनेक मार्ग सांगितलेले आहेत. आपण कोणताही मार्ग निवडा आणि पहा ब्रह्मदेव, विष्णूं कुठे सापडताहेत का ते ... शुभेच्छा .

जरा सविस्तर सांगा की. अशी गोलमाल उत्तरे देऊ नका.

बरं ते जाऊ द्या. तुम्हाला माहिती आहे का ब्रह्मदेव कुठे असतात , भगवान विष्णूंचा क्षीरसागर कुठे आहे? हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला ते कुठल्या मार्गाने कळले? भक्तियोग, न्यानयोग, कर्मयोग, राजयोग की सिद्धयोग?

समजा तसे कळले असल्यास तुमचा तो मार्ग सविस्तर सांगाल का? की उगीच आपलं कुठल्यातरी शे पाचशे किंवा दोन चार हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या पुराणात लिहिलं आहे म्हणून तुम्ही तसं मानता?

अनिरुद्ध प's picture

22 Aug 2013 - 6:58 pm | अनिरुद्ध प

म्हैस ताईन्कडुन आपेक्शीत उत्तर मिळाले असेल असे वाटते.

त्यांच्या म्हणण्यानूसार हे सारं समजून घ्यायची माझी कुवत नाही. :D

म्हैस's picture

22 Aug 2013 - 6:10 pm | म्हैस

अहो काय सविस्तर सांग? हे मार्ग कोणत्या पुस्तकात लिहिलेत हे हि तुम्हाला माहित नाही का? वा रे हिंदू. गीता आणि ज्ञानेश्वरी मध्ये सगळा सविस्तर लिहिलंय . जर वाचायचे कष्ट घ्या न. मला कोणत्या मार्गाने समजलंय हे मी सांगितला असता पण ते समजून घ्यायची आत्ताच तुमची कुवत नाहीये. म्हणून तर अध्यात्मिक रहस्य अशी जगजाहीर करता येत नाहीत.
गीता प्रत्यक्ष भगवान श्री क्रीश्नांनी सांगितलेली असल्यामुळे त्याला सामान्य पुस्तक समजण्याची चूक आपण करणार नाही हि अपेक्षा.

मला कोणत्या मार्गाने समजलंय हे मी सांगितला असता पण ते समजून घ्यायची आत्ताच तुमची कुवत नाहीये.

अजून एक समोरच्याची लायकी काढणारे लेखक महोदय मिपावर अवतरलेत तर. :)

जोक्स अपार्ट, तुम्ही माझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देत नाही. फक्त पुडया सोडत आहात.

आधी तुमची अध्यात्माची व्याख्या काय आहे ते सांगा.

हे मार्ग कोणत्या पुस्तकात लिहिलेत हे हि तुम्हाला माहित नाही का? वा रे हिंदू. गीता आणि ज्ञानेश्वरी मध्ये सगळा सविस्तर लिहिलंय . जर वाचायचे कष्ट घ्या न.

हे दोन्ही ग्रंथ मी वाचले आहेत. पण मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. किंवा ती उत्तरे कळण्याची माझी कुवत नाही हे तुमचं म्हणणं बरोबर आहे.

मला कोणत्या मार्गाने समजलंय हे मी सांगितला असता पण ते समजून घ्यायची आत्ताच तुमची कुवत नाहीये.

हरकत नाही. तुम्ही सांगा तर खरं. नाही कळलं जरी मला तरी त्यात तुमचं नुकसान काही नाही.

म्हणून तर अध्यात्मिक रहस्य अशी जगजाहीर करता येत नाहीत.

हे असं म्हणणारे बहुधा तुम्ही पहिले असावेत. जर अध्यात्मिक रहस्य जगजाहीर केलं नाही तर जनांचा उद्धार होणार कसा?

गीता प्रत्यक्ष भगवान श्री क्रीश्नांनी सांगितलेली असल्यामुळे त्याला सामान्य पुस्तक समजण्याची चूक आपण करणार नाही हि अपेक्षा.

हिंदू कुटुंबात जन्माला आलेल्या प्रत्येक भारतीयाला जे भगवदगीतेबद्दल वाटतं तेच मलाही वाटतं. याचं सविस्तर उत्तर जरा निवांत देईन.

गंगाधर मुटे's picture

22 Aug 2013 - 6:57 pm | गंगाधर मुटे

------------------
श्रद्धा ही श्रद्धा असते
एकतर असते किंवा नसते
पण ती डोळस किंवा आंधळी
वगैरे कधीही नसते

- गंगाधर मुटे
------------------

आशु जोग's picture

22 Aug 2013 - 8:32 pm | आशु जोग

>> विचारवंत (अस्सल, आणि खरे अस्सल) हिला "त्या" गल्ली बोळातली असल्यासारखं तुच्छ समजतात, तर अविचारवंत (अस्सल आणि निव्वळ अस्सल) हिच्या नावाने काय वाटेल ते खपवतात.

कूठला मूहूर्त निवडलात हे असले लिहायला.
ज्याची प्रतिक्रिया म्हणून हे लिहिलेत त्या विचारवंताचे नेमके म्हणणे काय होते हे समजून घेतलेत का कधी ?

बादवे

विचारवंतांची हत्या करून विचार संपेल हीदेखील एक अंधश्रद्धाच नाही का !

मनात येईल तो मुहूर्त.

>>ज्याची प्रतिक्रिया म्हणून हे लिहिलेत त्या विचारवंताचे नेमके म्हणणे काय होते हे समजून घेतलेत का कधी ?
-- कुणाची प्रतिक्रिय म्हणुन हे लिहीलय असं वाटतं तुम्हाला?

>>विचारवंतांची हत्या करून विचार संपेल हीदेखील एक अंधश्रद्धाच नाही का !
-- लेख कधि लिहीलाय, त्यातले विचार काय हे व्यवस्थीत न बघता प्रतिक्रिया देणं याला डोळस श्रद्धा म्हणावं काय?

अर्धवटराव

म्हैस's picture

23 Aug 2013 - 12:34 pm | म्हैस

'हे दोन्ही ग्रंथ मी वाचले आहेत. पण मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. ' असं तुम्ही म्हणताय . मग आमच्यासारख्या सामन्यांच बोलना तुम्हाला काय कळणार आणि काय पटणार.
अणुबॉम्ब बनवण्याचं तंत्रज्ञान , आपल्या सुरक्षा यंत्रणेची रहस्य आपण जगजाहीर करतो का? ती करण म्हणजे माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दोन्हीही ग्रंथात हि जगाच्या उद्धारासाठी already जाहीर केली आहेत , तरी तुम्हाला कळली नाहीत.
माफ करा पण ज्या अर्थी वर लिहिलेल तुम्हाला पुड्या सोडल्यासारखा वाटतंय त्यावरून असं वाटतंय तुम्ही फक्त वाद घालण्यासाठी प्रतिक्रिया देत आहात. अध्यात्म ह्या विषयातला तुम्हाला ओ कि ठो माहित नाहीये. आणि असे हजारो लोक ज्यांना ह्या विषयातला काळात नसता उठ सूट देव धर्मावर टीका करण्याची घाई करतात.
असो. माझी विनंती आहे आपण जरूर टीका करावी. पण पूर्ण अभ्यासांती.
हा विषय फार मोठा आणि निवांत बोलण्यासारखा आहे. तेव्हा मी माझ्या प्रतिक्रिया थांबवत आहे.

हे दोन्ही ग्रंथ मी वाचले आहेत. पण मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. ' असं तुम्ही म्हणताय . मग आमच्यासारख्या सामन्यांच बोलना तुम्हाला काय कळणार आणि काय पटणार.

अहो मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत याचा अर्थ मी चुकीच्या ठीकाणी उत्तरे शोधत असेन किंवा उत्तरे मिळूनही कळली नसतील. तुम्ही समजावून सांगा.

अणुबॉम्ब बनवण्याचं तंत्रज्ञान , आपल्या सुरक्षा यंत्रणेची रहस्य आपण जगजाहीर करतो का? ती करण म्हणजे माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखा आहे.

अणू बॉम्ब आणि अध्यात्माची तुलना कशी होऊ शकते?

अध्यात्म ह्या विषयातला तुम्हाला ओ कि ठो माहित नाहीये. आणि असे हजारो लोक ज्यांना ह्या विषयातला काळात नसता उठ सूट देव धर्मावर टीका करण्याची घाई करतात.

मागच्या तीन चार प्रतिसादांमध्ये मी लिहिलं आहे की तुमची अध्यात्माची व्याख्या सांगा. तुम्ही त्या प्रश्नाला पद्धतशीर बगल देत आहात.

माझी विनंती आहे आपण जरूर टीका करावी. पण पूर्ण अभ्यासांती.

माझ्या परीने मी हा विषय अभ्यासलेला आहे. आणि मी पुर्ण विचारांती टीका करतोय. जर माझ्या बोलण्यात काही चूक असेल तर तुम्ही ते दाखवून दया.

हा विषय फार मोठा आणि निवांत बोलण्यासारखा आहे. तेव्हा मी माझ्या प्रतिक्रिया थांबवत आहे.

लिहा की इथेच. आपण जसं जमेल तसे प्रतिसाद देत जाऊ.

पुन्हा एकदा लिहितो, तुमच्या दृष्टीने अध्यात्म म्हणजे काय ते मला जाणून घ्यायचे आहे. तुम्ही "विज्ञानाचे नियम अध्यात्माला लागू होत नाहीत आणि अध्यात्माचे नियम विज्ञाला लागू होत नाहीत" असम लिहिल्यापासून माझं याबाबतीतलं कुतुहल वाढलं आहे.

म्हैस's picture

23 Aug 2013 - 12:38 pm | म्हैस

कुवत नाहीये ह्याचा अर्थ तुम्ही वेगळा घेतलात. मी जो मार्ग निवडलाय त्यावर तुमचा अजून अभ्यास नाहीये. असं अर्थ आहेत. तुम्ही बव्लात आहात आणि तुम्हाला काही समजत नाही असं अर्थ नाहीये त्याचा. मी योगमार्ग (सिद्धामार्ग )निवडला आहे. योगमार्ग म्हणजे योगासनं हा अजून १ मोठा गैरसमज आहे आपल्याकडे.

बाळ सप्रे's picture

23 Aug 2013 - 12:45 pm | बाळ सप्रे

योगमार्ग समजावून सांगणे आणि अणुबाँबची गुपितं सांगणे ही तुलना पाहून अंमळ मौज वाटली..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Aug 2013 - 1:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अध्यात्म, योगमार्ग, आणि योगासनं याच्यात मला कै इंट्रेष्ट नै. पण, तुम्ही अध्यात्म आणि योगमार्गावर लिहिणार असेल तर हा काय प्रकार असतो, हे वाचायला आवडेल...! येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

दादा कोंडके's picture

23 Aug 2013 - 1:33 pm | दादा कोंडके

सहमत.
वरच्या कोपर्‍यातल्या ज्ञानदेवांबरोबर तुकारामदेखिल असल्यामुळे म्हशींच्या लेखणीतून वेद वैग्रे वाचायला मिळतील असं वाटतं.

धन्या's picture

23 Aug 2013 - 1:49 pm | धन्या

मी ही त्यांना केव्हापासून म्हणतोय की तुम्ही या विषयावर लिहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Aug 2013 - 1:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

अहो, तेव्हा रेडे आडनावाचे गृहस्थ होते त्यांना अवघड वळणाचे संस्कृत उच्चार करणे जमत नव्हते, बोबडी वळत होती या अशा अर्थाने समजून घ्या. त्या म्हशी आणि रेड्याच्या गोष्टी.

-दिलीप बिरुटे

दादा कोंडके's picture

26 Aug 2013 - 10:16 am | दादा कोंडके

तेव्हा रेडे आडनावाचे गृहस्थ होते त्यांना अवघड वळणाचे संस्कृत उच्चार करणे जमत नव्हते, बोबडी वळत होती या अशा अर्थाने समजून घ्या.

त्याच अर्थानी समजून घेतलंय.

म्हैस तै, संपादकांचा निषेध करा बघू...

बॅटमॅन's picture

23 Aug 2013 - 2:11 pm | बॅटमॅन

मेलो =)) =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Aug 2013 - 7:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

अहो वेद म्हशीने नाही रेड्याने... आणि तो सुद्धा लिहिला नाही पठण करून सांगीतला... असे ऐकून/वाचून आहोत.

आता "नविन ज्ञानदेव चरित्र" छापून आले अस्ले तर कै म्हैत नाय बाँ :) ;)

म्हैस's picture

23 Aug 2013 - 2:32 pm | म्हैस

नक्कीच. पण तो विषय इथे लिहिण्याचा नाही. karan इथे ह्या विषयाची टिंगल करणारेच बरेच दिसतायेत. त्या बद्दल ज्ञान मिळवायला उत्सुक असलेले तुमच्यासारखे फार कमी लोक आहेत .आपण personal email id दिलात आणि ह्या विषयावरचं लेखन अध्यात्मावर श्रद्धा असणार्यांच्या पुरता मर्यादित ठेवला तर नक्कीच. अनेक धागे , अनेक links , अनेक पुस्तके मी तुम्हाला सांगू शकेल. मला समजलेला अध्यात्म ह्या विषयावर पण बोलता येईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Aug 2013 - 6:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोकांना काय टींगल करायची ती करु द्या.. आपण स्थितप्रज्ञाप्रमाणे आपले विचार मांडा. .माझ्या एकट्याचे अध्यात्मिक प्रबोधनाबरोबर इतरांचीही अध्यात्माची भूक वाढली पाहिजे. अध्यात्माला मर्यादा घालु नये असे वाटते. अध्यात्माच्या लिंका वगैरे देऊ नका. वाचायला लागलो की डोळे जड पडायला लागतात. पेक्षा, इथेच एक नवा धागा काढा आणि आपण आपल्याकडं असलेलं ज्ञान खुलं करा. अधुन मधुन आपले विचार वाचत जाईन. मला प्रचंड उत्सुकता लागली आहे की आपल्या समजलेलं अध्यात्म कशा स्वरुपाचं आहे म्हणुन....

-दिलीप बिरुटे
(ज्ञानोत्सुक)

अध्यात्माच्या लिंका वगैरे देऊ नका. वाचायला लागलो की डोळे जड पडायला लागतात. पेक्षा, इथेच एक नवा धागा काढा आणि आपण आपल्याकडं असलेलं ज्ञान खुलं करा. अधुन मधुन आपले विचार वाचत जाईन. मला प्रचंड उत्सुकता लागली आहे की आपल्या समजलेलं अध्यात्म कशा स्वरुपाचं आहे म्हणुन....

प्रा. डॉ. दिलीप बिरुटे यांच्याशी सहमत आहे. पुस्तकं तर आम्हीही खुप वाचली आहेत. तुम्हाला समजलेलं अध्यात्म तुमच्याच शब्दांत वाचायला आवडेल.

पैसा's picture

24 Aug 2013 - 6:11 pm | पैसा

श्रद्धेची व्याख्या आवडली. http://www.misalpav.com/node/24879 इथे विश्वास, श्रद्धा, अंधश्रद्धा आणि जबरदस्ती याबद्दल बराच कीस पाडला होता. त्यामुळे आता त्या भानगडीत पडत नाही.

अनेक ठिकाणी एकाच प्रतिक्रिया देण्यापेक्षा मी माझ्या प्रतिक्रिया 'सचिदानंद बाबांची गोष्ट' ह्या लेखावर दिल्या आहेत. कृपया तिथे वाचावे.

नामस्मरणाने मनासारख्या गोष्टी घडत नसतात.घडणाऱ्या गोष्टी मनासारख्या वाटतात.

हे बाकी रोचक वाटलं. म्हणजे बेशर्त स्वीकृतीच झाली की काय ही ;)