प्रिय नाना पाटेकर,

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
29 Apr 2013 - 2:30 pm

अलीकडेच बदलापूरच्या एका कार्यक्रमात नाना पाटेकर बोलत होता..

नाना म्हणतो की मुंबै माझी नाही...मुंबैत मुखवटे घातलेली माणसं वावरतात..ती म्हणे वाचता येत नाहीत म्हणून नाना म्हणतो की खेड्यात रहाणं त्याला आवडतं..

हा नान्यासुद्धा लेकाचा शेफारलाय अलीकडे.. लेका ज्या मुंबैनं, ज्या मुंबैच्या बॉलीवुडनं तुला मोठा केला.. आता चार दमड्या खिशात आल्यावर मुंबै माझी नाही म्हणतोस..? मुंबैतली माणसं वाचता येत नाही म्हणतोस..?

नान्या, खेड्यात कुठेसं फार्महाऊस बांधलंस..त्याकरता पैसा मुंबैतच कमावलास ना..????

नान्या, तू म्हणतोस त्याप्रमाणे नरीमन पॉइंट..कफ परेड.. जळ्ळं तुमचं ते बॉलिवुडवाल्यांचं जुहू..तिथे असतील एक वेळ मुखवटेवाली मंडळी..पण मुंबै फक्त एवढीच काय रे? तुम्ही बॉलीवुडवाले, पैशेवाले..गाड्या उडवता.. अरे जरा मोकळेपणे फिरा मुंबैच्या गल्लीबोळातनं.. बेस्टमधनं..लोकलच्या लगेजच्या डब्यातनं..दाणाबाजार..भातबजार..झालंच तर कुर्ला नेहरूनगर.. आमचा फोरासरोड, फॉकलंड रोड.. खूप खूप चेहरे वाचायला मिळतील रे तुला.. आणि ते तू वाचले आहेस..कारण वेळोवेळी ते तू तुझ्या उत्तम अभिनयातनं दाखवून दिलं आहेस..

nana

मग आताच आमच्या मुंबैबद्दल नाराजी का..?

नाना, 'मुंबै हे रहायचं ठिकाण नाही..' हे किती सहजपणे तू बोलून गेलास..!

अरे लाखो लोकं इथं राहतात...२४ तास रहाटगाडगं सुरू असतं रे त्यांचं..तुझं एक ठीक आहे..आज तुझ्याकडे चार पैशे आले, छानसं फार्महाऊस बांधलंस.. पण आम्हा लाखो मुंबैकरांनी कुठे रहायच रे.. तूच सांग..

एका सवाईगंधर्व महोत्सवात मंडपातल्या एका खोलीत अण्णा आराम करत होते..मी बाहेर रखवालदार म्हणून उभा होतो..तेव्हा तू भेटायला आला होतास.. तेव्हा काहीही ओळख नसताना माझ्या पोटावर गुद्दा मारून "पोट कमी कर साल्या..रोज सकाळी उठून धावायला जात जा.." हे ज्या अधिकाराने सांगितलंस त्याच अधिकाराने आज तुला लिहितो आहे..

खूप चाहता आहे मी तुझा, खूप प्रेम करतो तुझ्यावर..पण नान्या..आमच्या मुंबैला काय नाय बोलायचं..सहन नाही होत ते..!

तुझा,
तात्या.

जीवनमानविचारप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

आता विरोधी बाजूनं कोण दंगा घालायला येतं ते पहायला उत्सुक.

विसोबा खेचर's picture

29 Apr 2013 - 2:35 pm | विसोबा खेचर

विषयाला धरून असेल तर विरोधीबाजूचं स्वागतच आहे.. :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

29 Apr 2013 - 2:36 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

माझ्या माहितीप्रमाणे नाना असं म्हणतो कि, 'सध्याची' मुंबई त्याला आवडत नाही. त्याचे लहानपण जिथे गेले त्या मुंबईशी तो रिलेट करु शकत नाही, म्हणून तो म्हणतो कि 'हि' मुंबई माझी नाही.

विसोबा खेचर's picture

29 Apr 2013 - 2:41 pm | विसोबा खेचर

माझ्या माहितीप्रमाणे नाना असं म्हणतो कि, 'सध्याची' मुंबई त्याला आवडत नाही.

मिकाप्रेमी साहेब,

असं नानाने म्हटलेलं नाहीये.त्यानं मुंबैचा सरसकट उल्लेख केला आहे.. आणि मुळात मुंबै ....मुंबै आहे.. तिची आपली एक शान आहे, आपली एक चाल आहे.. सध्याची..पूर्वीची असे फरक मला तरी पटत नाहीत..

तात्या.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

29 Apr 2013 - 2:48 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

तात्या, तूनळीवर नानाच्या अनेक मुलाखती आहेत, त्यातील बर्‍याचश्या मुलाखतींमध्ये तो हेच म्हणाला आहे.
बदलापूरचे त्याचे वक्तव्य मी ऐकले नाहिये. तो तुम्ही म्हणत आहात तसे म्हणाला असेल तर नक्कीच निषेधार्य आहे.
पण काही वर्षांपूर्वीची मुंबई आणि आताची मुंबई यात फरक तर नक्कीच आहे, कारण एक पूर्ण पिढी बदलली आहे.
आता त्याला ज्या गोष्टींमध्ये शान दिसते त्या कदाचित आपल्या संकल्पनेपेक्षा वेगळ्या असू शकतात. असो.
मला मुंबई, तुम्ही आणि नाना, तिघांबद्दल प्रेम आणि आदर आहे, हे नम्रपणे नमुद करतो.

गणपा's picture

29 Apr 2013 - 2:40 pm | गणपा

मस्त रे विसोबा.
हे पत्र तू धाडच नानाला. :)

विसोबा खेचर's picture

29 Apr 2013 - 2:45 pm | विसोबा खेचर

आज संध्याकाळपर्यंत तो हे पत्र नक्की वाचेल..तशी व्यवस्था केली आहे.. :)

बंडा मामा's picture

29 Apr 2013 - 10:01 pm | बंडा मामा

आता रात्र झाली..नानाने पत्र वाचले का? उत्तर आले का?

आजानुकर्ण's picture

29 Apr 2013 - 10:02 pm | आजानुकर्ण

:):)

jaypal's picture

29 Apr 2013 - 2:43 pm | jaypal

मुंबईकराने चांगलाच गंडा घातला असणार त्या शिवाय अस बोलायचा नाही तो. वरळी शुटिंग रेंज वर एकदा दोनदा भेट झाली होती. माणुस मोकळा ढाकळा वाटला. "खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे,कामा पुरता मामा ताका पुरती मावशी किंवा ताकाला जाऊन भांड लपवणारा अजीबात वाटला नाही."
अवांतर= "पोट कमी कर साल्या..रोज सकाळी उठून धावायला जात जा.." ....अजिबात दुर्लक्ष करू नका नक्की मनावर घ्या.

मदनबाण's picture

29 Apr 2013 - 9:38 pm | मदनबाण

जयपाल सेठ केम छो ? ;)
बाकी तातुडी च्या धाग्यांवर तुला मुक्त हस्ताने टंकन करताना बघुन लयं आनंद झाला ! ;) तुलाही बराच वेळ मिळतो सध्या ? ;)बाकी लगे रहो... मी वाचतोच आहे बरं... ;)

नाना अगदी सरळ आणि स्पष्ट बोलणार अभिनेता आणि व्यक्ती आहे...नाना कोठेही अवचित पोहचतो,मग ते कारगिल असो वा त्याच आवडीचं शुंटिंग रेंज्.बाकी बाळासाहेबांना देखील नानानी सल्ला दिला होता तेव्हा मच्छराचं म्हणणं मी ऐकतं नाही अशी ठाकरी भाषा गरजली होती...थोडक्यात जे नानाच्या मनात तेच ओठात असल्याने त्याच्या विधानाचा कुठला गैर अर्थ काढण्यात काही हाशिल नाही...
असो... वाचकांसाठी खालील दुवा देत आहे,इच्छुकांनी आस्वाद घ्यावा.
नाना रूपांतील नाना

चौकटराजा's picture

29 Apr 2013 - 2:48 pm | चौकटराजा

तात्या, आमचा फोरासरोड ही काय भान्गड आहे ??

विसोबा खेचर's picture

29 Apr 2013 - 2:50 pm | विसोबा खेचर

काही वर्षांपूर्वी तिथल्या एका देशीदारूच्या बारमध्ये कामाला होतो साहेब..भानगड काही नाही.. :)

परिकथेतील राजकुमार's picture

29 Apr 2013 - 2:55 pm | परिकथेतील राजकुमार

देशद्रोही आहे हा नाना.

ह्यापुढे ह्या नाना बरोबर काम करणे बंद.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

29 Apr 2013 - 2:59 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

छ्या, गुजरातेत जाऊन राहणार्‍यांना काय माहित, मुबै काय आहे आणि नाना कोण आहे?
उगीच आपली उचलली xxxxx आणि लावली xxxxx..... ;)

परिकथेतील राजकुमार's picture

29 Apr 2013 - 3:01 pm | परिकथेतील राजकुमार

म्हणजे मी आता फोरास रोडला जावे असे तुम्हाला सुचवायचे आहे का?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

29 Apr 2013 - 3:03 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

कोणी काही सुचवले त्याप्रमाणे वागता?
अरे अरे, त्या गुजरातला पण लाज आणणार तुम्ही.. ;)
असो, आता बाकी खरडवहीतून, उगा तात्यांच्या शिव्या बसतील.

jaypal's picture

29 Apr 2013 - 3:04 pm | jaypal

तुझ्या मदती साठी काहीच उरल नसणार. :-)
त्या मुळे आहेस तिथेच बरा आहेस.

विनायक प्रभू's picture

30 Apr 2013 - 4:54 pm | विनायक प्रभू

पराशी सहमत
माझ्या पुढल्या पिच्चर मधला रोल परा ला.
नानाचा सायनिंग अमाउंट फुकट गेला तरी बेहत्तर.

राही's picture

29 Apr 2013 - 3:01 pm | राही

लेख एकदम पटला, पण उतारवयात वानप्रस्थाची ओढ लागणे हेही साहजिकच आहे म्हणा.

(मुंबईप्रेमी)राही

तात्या म्हणतात त्या मुद्द्यात तथ्य आहे. इथे राहणं आवडत नसलं तर न राहण्याचा पर्याय उपलब्ध आहे. फार्महाऊसमधे राहण्याची कल्पना सर्वांनाच आवडते, पण खात्रीने असं म्हणता येईल की (जुन्या वा नव्या) मुंबईला कितीही नावं ठेवली तरी महिनोन महिने वर्षानुवर्षं फार्महाऊसवरच राहणं हे मुंबईपुण्याच्या माणसाला शक्यच नाही. ते चारपाच दिवसांत कंटाळून परत येतात. खेड्यापाड्यात निसर्गात मस्त जागाबिगा घेऊन ठेवलेली असते. उत्तम प्राप्ती असेल तर तिथे खानसामा, माळी वगैरे ठेवून घर / बंगला जागताही ठेवला जातो. कार्यरत काळात तर नाहीच नाही पण अगदी निवृत्तीनंतरही दीर्घकाळ तिथे जाऊन वसणं फार म्हणजे फार थोड्या लोकांना जमत असावं. पाहण्यात उदाहरण एकही नाही.

तेव्हा मुंबई न आवडण्याचा हा तात्कालिक झटका अनेक मुंबईकरांना अधूनमधून येत असतो. त्यातलाच हाही एक असावा. मलाही येतो. अशावेळी मी गोखले उपाहारगृहात जाऊन मिसळ किंवा पॉप टेट्समधे जाऊन आफ्रिकानो फिश चापून येतो. मग परत मुंबई आवडायला लागते. :)

सुज्ञ माणुस's picture

29 Apr 2013 - 4:34 pm | सुज्ञ माणुस

जो पर्यत नाना तुमच्या आरोपांची शिक्षा भोगून येणार नाही ( वा खंडन करणार नाही ) तोपर्यत मी त्याच्याबरोबर काम करणार नाही :)

सावत्या's picture

29 Apr 2013 - 4:43 pm | सावत्या

तेव्हा मुंबई न आवडण्याचा हा तात्कालिक झटका अनेक मुंबईकरांना अधूनमधून येत असतो. त्यातलाच हाही एक असावा. मलाही येतो.

१००% सहमत

मुंबईची खरी किंमत मुंबई बाहेर पडल्यावरच कळते.(जशी मला कळली)
माज्या ओळखीतले एक काका होते त्यांच्यासमोर कोणी मुंबईला नाव ठेवली तर ते म..भ.. ची बाराखडी सुनवत आणि टिकेट कडून देतो आता आपल्या गावाला जा म्हणून सांगत. तर खरा मुद्दा असा की माज्यासारख्या गिरनगावात बालपण आणि तरूणपण गेलेल्या माणसाला कोणी मुंबईला नाव ठेवलेल आवडत नाही. चरितर्थ चालवण्यासाठी मुंबईला यायच, ईथे कारकीर्द घडवायची आणि नंतर मुंबईला शिव्या द्याच्या म्हणजे आपसूक प्रसिधी पण मिळते. त्यामुळे बरेच जण असले उध्योग करतात. वाईट वाटत ते की नाना ने अशी टीका करायला नको होती. अमराठी माणसंच त्यामुळे आपसूक फावत.

प्रभाकर पेठकर's picture

29 Apr 2013 - 4:45 pm | प्रभाकर पेठकर

लेका ज्या मुंबैनं, ज्या मुंबैच्या बॉलीवुडनं तुला मोठा केला.. आता चार दमड्या खिशात आल्यावर मुंबै माझी नाही म्हणतोस..?

१००% सहमत.

एकदा तुम्ही सेलीब्रेटी झालात की तुमच्या प्रत्येक विधानाला काहीतरी वजन प्राप्त होतं. नाना सेलीब्रेटी झाला आहे.पूर्वीची मुंबई राहिली नाही तसेच पूर्वीचा ('पुरूष' नाटकातला)नाना राहिला नाही. जगापेक्षा वेगळे वागणे, बोलणे हा नानाचा स्वभाव आहे. त्यामुळेच तो कधी आवडतो तर कधी आढ्यताखोर वाटतो. नानाने बोलताना विचार करावा. कितीही त्याच्या मनातलं असलं तरी त्याच्या चाहत्यांना दुखावण्याचं पाप त्याने करू नये. लतादीदींनीही ते अनेकदा केले आहे आणि चाहत्यांनी त्या विरुद्ध ओरड केली आहे.असो. सेलिब्रेटींचं जगच वेगळं. सामान्यांनी त्यांना 'मोठं' करावं, त्यांच्यावर हक्क सांगू नये.

राही's picture

29 Apr 2013 - 5:19 pm | राही

सामान्यांनी त्यांना मोठं करावं, त्यांच्यावर हक्क सांगू नये अगदी अगदी.

आदिजोशी's picture

29 Apr 2013 - 5:36 pm | आदिजोशी

मुंबईला कुणी एक भिकार म्हटलं तर आपण सात भिकार असं सांगून मोकळं व्हावं.
- पु.ल.

प्रकाश घाटपांडे's picture

29 Apr 2013 - 5:58 pm | प्रकाश घाटपांडे

मुंबईच्या गर्दी गोंगाटाला कंटाळून नाना म्हणाला आहे. गवि म्हणतात तस हा न आवडण्याचा झटका येत असतो. पुणेकरांना पुण्याच्या बाबतीत येतो. त्यात एवढ काय विशेष? फार राजकारण करता ब्वॉ! बघा बघा कशा प्रांतिक, भाषिक ,जातीय अस्मिता काम करतात ते! नाना पहिल्यांदा माणुस आहे ते अभिनेता वगैरे सगळे नंतर! अहो हित मानूस सोताला बी कंटाळतोय

जेनी...'s picture

29 Apr 2013 - 6:32 pm | जेनी...

खरं सांगायचं तर ज्याचं मुंबैवर जास्त प्रेम असतं तोच सदानकदा
" हॅ .. मुंबैला रहायला आवडत नै , मुंबै र्हायचं ठिकाणच नै " असं म्हणत असतो ..
पण जेव्हा त्याच मुंबैवर कोणतहि संकट येत तेव्हा हीच माणसं जास्त हळहळताना पाहिली आहेत ..
हे माझ्याच पप्पांचं उदाहरण आहे ... ६८ साली पप्पा मुंबैत आले ..४५ वर्ष मुंबैत काढली
तरीहि नानासारखच म्हणतात .. अन गावाला जातात ...
मुंबैतलं धावपळीचं , ओळखीचं , भिनलेलं आयुष्य जगायची सवय झालेले ते तिथं उगाच झाडाझुडपात , शेतात मन
रमवत बसतात .. शेवटी करमेनासं होतं .. मग येतात मुंबैत , फ्रेश व्हायला
त्यांना जमत नाहि मुंबैपासुन जास्त काळ दूर रहाणं .... पण तरीहि म्हणतात ..
" ह्या मुंबैत रहायला अजिबात आवडत नाहि , आपलं गावच बरं ! "

ह्यावरुन तरी असं वाटतं कि नानालाहि उतारवयाच्या झळया लागल्यात .

सुधीर मुतालीक's picture

29 Apr 2013 - 6:36 pm | सुधीर मुतालीक

तुमच्या लिखाणाशी संपूर्ण सहमत आहे. तुमच्या ढेरी बद्दल नानाने काही बोलणे हा तुमचा विनयभंग आहे. नानाला तुम्ही माफ केलं हा तुमचा मोठेपणा आहे. नाना जेवढा माणुसकीचा आणि देशभक्तीचा आव आणतो तेवढा तो पाक नाही हे त्याच्या बोलण्या वागण्यातून त्याने दाखवून दिलंय. प्रश्न असा आहे की हे नानान्धळ्याना कोण समजावणार ? इथे सुद्धा आनन्दिता आणि बाबा पवार प्रभृतींनी हे तुमचे लिखाण वाचल्यावर ते तुम्हाला आता धुणार !!! धु धु धुणार !!!

=))

आवो सुधिर काका त्यांच्याधी तुमीच केवढं धुतलय =))
मजा आला ! :D :P

विसोबा खेचर's picture

29 Apr 2013 - 6:55 pm | विसोबा खेचर

मुतालीक साहेब,

>>इथे सुद्धा आनन्दिता आणि बाबा पवार प्रभृतींनी हे तुमचे लिखाण वाचल्यावर

आनन्दिता आणि बाबा पवार ही मंडळी कोण आहेत?

नाना जेवढा माणुसकीचा आणि देशभक्तीचा आव आणतो तेवढा तो पाक नाही
याचा किस्सा एका मैत्रिणीनं सांगितलाय. आधी माझा विश्वास बसला नाही पण नंतर "सगळ्यांचे पाय मातीचेच!" असे तिने म्हटल्यावर ओक्के वाटले. तसे असेल तर ठीक!

उपास's picture

29 Apr 2013 - 7:24 pm | उपास

मुंबईला वैतागलोय असं आपण सुद्धा दहावेळा म्हणतो.. गर्दी, प्रदूषण, अस्वच्छता ह्या संदर्भातच असतं ते. माझी लहानपणची मुंबई राहिली नाही ही हळहळ प्रत्येकालाच जाणवेल.
पण तात्या, नानाच्या ह्या विधानाचा 'नानाने मुंबई विरुद्ध गरळ ओकली' असा सरळसरळ चुकीचा अर्थ लावणार्‍या पीतपत्रिकारीतेचा निषेध करावा तितका कमीच. आता नानासारख्या माणसाने रस्त्यावर फिरावे म्हणजे ह्याच गर्दीचा ससेमिरा त्याच्यामागे लागेल अशी तुझी अपेक्षा असेल तर कमालच, अरे बाबा नानाचे पाय मातीचेच आहेत पण तो मनात आलेलं सरळ बोलणारा आहे, रोखठोक आहे. उगाच गोग्गोड बोलणारा नाही. लोंढ्या पुढे दबलेल्या हतबल मुंबई बद्दलची दुखरी नस नानाने व्यवस्थित पकडलेय एवढचं म्हणेन.
त्या भाषणाचा संदर्भ तोडून विश्लेषण करायचं म्हटलं तर कुठलाही अर्थ काढता येईल. तूर्तास नाना कळण्यासाठी अभ्यास वाढवा इतकचं म्हणेन.
*नानंधळेपणा काय नाय पण बिनधास्तपणा असावा तर नानाकडेच. बॉलीवूडमधल्या मराठी कलाकाराने माज केला तर माफ करायला आपण तयार आहे आणि नानासारखा सामाजिकतेचं भान असलेला असेल तर नक्कीच!
अवांतर -
परवा करण जोहर म्हणाला की बॉलीवूड मधली समव्यावसायिक पूर्वीच्या समव्यावसायिंकासारखे मिळून मिसळून राहात नाहीत, त्याबद्दलही धागा काढणार का आता? :)

विसोबा खेचर's picture

29 Apr 2013 - 7:28 pm | विसोबा खेचर

प्रतिसाद पटला नाही..परंतु आवडला..
धन्यवाद.. :)

ढालगज भवानी's picture

29 Apr 2013 - 7:36 pm | ढालगज भवानी

अवांतर - तात्या फैय्याज यांच्या "चार होत्या पक्षीणी त्या" या गाण्याचे रसग्रहण करा ना प्लीज. कोणत्या रागात आहे हो ते गाणे? कितीही ऐका मनच भरत नाही.

आदिजोशी's picture

29 Apr 2013 - 7:44 pm | आदिजोशी

तूर्तास आम्हाला नाना पेक्षा रोशनी मधे जास्त इंटरेस्ट आहे. सद्ध्या ज्या वेगाने तुमचे लेख येत आहेत त्यावरून तुम्हाला वेळ आहे असा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे, बाकीचं सोडा, रोशनीला धरा :)

सुहास झेले's picture

29 Apr 2013 - 8:16 pm | सुहास झेले

अगदी अगदी.... बोर्डावर अव्वल नंबर हाये गेले काही दिवस ;-)

मी-सौरभ's picture

29 Apr 2013 - 8:17 pm | मी-सौरभ

पूर्णपणे सहमत आहे

किसन शिंदे's picture

29 Apr 2013 - 8:25 pm | किसन शिंदे

अॅड्या, सुझे, सौर्या या तिघांशीही १०० वेळा सहमत!

रोशनी तर टाकाच पण टकल्या बापटही पूर्ण करा.

ढालगज भवानी's picture

29 Apr 2013 - 8:35 pm | ढालगज भवानी

रोशनीच्या वाटेला गेले नाही पण टकल्या बापट मालीका फार आवडलेली.

बंडा मामा's picture

29 Apr 2013 - 9:58 pm | बंडा मामा

हो मीच आधीची "शुचि."

एक अवांतर शंका : हे नाव कसे काय बदललेत?

ढालगज भवानी's picture

29 Apr 2013 - 11:14 pm | ढालगज भवानी

डु आय डी घेतला

टवाळ कार्टा's picture

29 Apr 2013 - 8:38 pm | टवाळ कार्टा

त्या आधी "गुंडा" येउदे ;)

आदिजोशी's picture

30 Apr 2013 - 4:21 pm | आदिजोशी

गुंडावर अवतरलाय एक लेख आधीच.

टवाळ कार्टा's picture

1 May 2013 - 5:12 pm | टवाळ कार्टा

हो पण तो "पाचवी खोली"च्या उंचीवर नाही पोचला :(

प्यारे१'s picture

29 Apr 2013 - 8:27 pm | प्यारे१

जौ द्या तात्या. नानाजी को बक्ष दिजिए.
झमझम बार, रोशनी चे किस्से येऊ दे आणखी.

अर्धवटराव's picture

29 Apr 2013 - 9:01 pm | अर्धवटराव

मुंबईला कावलेल्या मुंबैप्रेमी नान्याला सलाम, त्याच्या रोकठोक जबानीला सलाम.
नान्याच्या जबानीला कावलेल्या मुंबैप्रेमी तात्याला सलाम, त्याच्या रोकठोक लेखणीला सलाम.
तात्याच्या अपूर्ण रोशनीला कावलेल्या मिपाकरांना सलाम, त्यांच्या जीवंत मराठी प्रेमाला सलाम.
"पुर्वीची" न राहिलेल्या मराठी मुंबईला सलाम, त्या मुंबईला कावलेल्या मुंबैप्रेमी नान्याला सलाम.

हुश्श... झाले वर्तुळ पूर्ण.

अर्धवटराव

पिवळा डांबिस's picture

29 Apr 2013 - 9:47 pm | पिवळा डांबिस

आम्हाला नाना आवडतो, एक निराळा अभिनय करणारा मराठी कलावंत म्हणून!
आम्हाला तात्या आवडतो, मनात आलं की तिच्यायला रोखठोख लिहून टाकणारा म्हणून!!
आम्हाला मुंबईही आवडते, जरी सध्या तिथे रहात नसलो तरी माय मुंबादेवी म्हणून!!!

आता नाना म्हणे बदलला, पूर्वीसारखा साधा नाही राहिला..
तात्याही म्हणे बदलला, पूर्वीसारखं लिहिनासा झाला..
आणि मुंबईही म्हणे बदलली, गर्दी आणि घाण वाढली...

गुजर गया जमाना,
बस अब बाकी रहा ही क्या है?
:(

बंडा मामा's picture

29 Apr 2013 - 10:00 pm | बंडा मामा

एका सवाईगंधर्व महोत्सवात मंडपातल्या एका खोलीत अण्णा आराम करत होते..मी बाहेर रखवालदार म्हणून उभा होतो..तेव्हा तू भेटायला आला होतास.. तेव्हा काहीही ओळख नसताना माझ्या पोटावर गुद्दा मारून "पोट कमी कर साल्या..रोज सकाळी उठून धावायला जात जा.." हे ज्या अधिकाराने सांगितलंस त्याच अधिकाराने आज तुला लिहितो आहे..

ह्यावर एक स्वतंत्र लेख न लिहिल्याबद्दल आभारी आहे.

आजानुकर्ण's picture

29 Apr 2013 - 10:13 pm | आजानुकर्ण

वरील लेख हा सदर परिच्छेदासंदर्भातच आहे असे मानण्यास जागा आहे.

सामान्य वाचक's picture

29 Apr 2013 - 10:27 pm | सामान्य वाचक

मोठ्या प्रसंगांची बीजे असतात

उगाच लहान तोंडी मोठा घास घेऊ नका

श्रीरंग_जोशी's picture

29 Apr 2013 - 10:09 pm | श्रीरंग_जोशी

तात्या, भावना पोचल्या.

एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिने मनमोकळेपणाने काही म्हंटले तर लगेच तो कसा कृतघ्न आहे अशा आशयाचे विचार मांडणे मला पटत नाही.

बाकी नानाचा पहिला मराठी चित्रपट कोणता? मी असे ऐकले होते की स्व. डॅडी देशमुखांनी सर्वप्रथम नानाला त्यांच्या चित्रपटात घेतले होते (थांब टकल्या भांग काढतो - या शीर्षकाचा). जालावर शोधले तर काहीच मिळाले नाही. कदाचित तो चित्रपट अपूर्ण राहिला असावा...

माफीचा साक्षीदार पहिलमराठी चित्रपट असावा नानाचा.पण खात्री नाही..

आशु जोग's picture

29 Apr 2013 - 10:53 pm | आशु जोग

वा वा वा

आज म्हणजे काकांनी कौतुकच मांडलय 'नाना पाटेकर'चं
आता काकांच्या शब्दांवर जाऊ नका. भाव पहा. ते आहे ओसंडून जाणारे कौतुक.

त्यामुळेच छानसा फोटोबिटो टाकलाय नानाचा. तो काय तक्रार आहे म्हणून की काय.
बाकी
विसोबाच्या मेल्स आम्हाला नवीन नाहीत. किमान नऊ वर्षे झाली.

अमोल केळकर's picture

30 Apr 2013 - 10:22 am | अमोल केळकर

खल्लास. सुपर लाईक :)

अमोल केळकर

विसोबा खेचर's picture

30 Apr 2013 - 10:36 am | विसोबा खेचर

कौतुक करणा-या, टीका करणा-या, प्रोत्साहनपर, सकारात्मक, नकारात्मक, समिक्षणात्मक, अवांतर/विषयाला सोडून लिहिणा-या अशा सर्व प्रतिसादकर्त्यांचा मी आभारी आहे.. :)

तुमचा अभिषेक's picture

30 Apr 2013 - 12:29 pm | तुमचा अभिषेक

नुकतेच संजय दत्तबद्दलचे विधान, आता हे मुंबईबद्दल विधान.. साधीच विधाने पण त्यांना देण्यात येणारी प्रसिद्धी.. नवीन शिनेमा येऊ घातलाय काय??

सामना च्या ऑफिसमध्ये कामा निमित्त मित्रासोबत गेलो होतो.गॅलरीत उभा असताना मागच्या एका गल्लीत नाना कोणाला तरी भेटायला आला होता. माझा मित्र एकदम आरे नाना बघ असे म्हणाला. त्यावर नाना रागाने त्याला म्हणाला" इथे काय मला बघता तिकिट काढुन थेटरात बघा".व गाडीत जावुन बसला.त्यामुळे टिव्हीवर देखिल त्याला बघताना ति़कीट न काढल्याची मनाला चुट्पुट लागुन राहते.

आज संध्याकाळपर्यंत तो हे पत्र नक्की वाचेल..तशी व्यवस्था केली आहे..
काय म्हणाला नाना ? वाचले का पत्र ? काही फिडबॅक वगरै काय म्हणतात तो दिला का ?
मी त्याला हॅलो म्हणालो आहे आणि या धाग्यावर त्याच्या बद्धल एक प्रतिसाद देखील दिला आहे असे जमल्यास कळव हो...

आशु जोग's picture

30 Apr 2013 - 10:43 pm | आशु जोग

>चीनी आपल्या देशात १९ किमी आत येउन तंबु ठोकुन बसले आहेत,सरकार घोटाळे निस्तारण्यात व्यस्त आणि जनता IPL बघण्यात !

घोटाळे निस्तारण्यात ? ? ?

शिल्पा ब's picture

3 May 2013 - 10:21 am | शिल्पा ब

बोर्डावर कोणी दणादणा उड्या मारायला लागलं की लोकं (उदा. परीकथेतील राजकुमार इ.)लग्गेच जिलेबीचे ताटं नैतर डायर्‍या भेट देतात. संस्थापक म्हणुन लगेच वेगळा न्याय का? शोभतं नै हो !!

बाकी लेख म्हणजे मोठ्या लोकांच्या गोष्टी.

कुंदन's picture

3 May 2013 - 10:25 am | कुंदन

अम्रिकन डायरी पाठवाल का तुम्ही?

शिल्पा ब's picture

3 May 2013 - 10:32 am | शिल्पा ब

आमच्या हाम्रीकेत डायर्‍या नसतात ना भो!! सगळं क्यॅंपुटरवरच असतंय.

बॅटमॅन's picture

3 May 2013 - 12:58 pm | बॅटमॅन

सगळं क्यॅंपुटरवरच असतंय.

क्यँपुटर शब्द काळजाला भिडला. एकदम मिरजेतल्या शाळेतील कँपुटर वर्गाची आठवण झाली.

आशु जोग's picture

3 May 2013 - 1:20 pm | आशु जोग

छान आहे आयडीया

काहीच नाहीतर नाना पाटेकर इ. विषय घेऊन धागा टाकायचा !

टी आर पी पण बरा मिळतो