...उर्फ सुगरणीचा सल्ला!

मेघना भुस्कुटे's picture
मेघना भुस्कुटे in जनातलं, मनातलं
8 Jul 2008 - 5:37 pm

काही कबुल्या:

१) खाण्यापिण्यावर लिहिणं ही काही माझी वरिजनल आयडिया नव्हे. अशीच भटकंती करताना काही झकास फूड ब्लॉग्स मिळाले. अशीही मला 'रुचिरा' टाईपची पुस्तकं वाचायचा छंद आहेच. त्याच चालीवर हे ब्लॉग्स मनापासून वाचले.
'कुठलीही खाद्यसंस्कृती सर्वश्रेष्ठ नसते.
एका खाद्यसंस्कृतीवर प्रेम करताना दुसरीला कदापि कमी लेखायचं नाही.
नीट माहीत करून घ्यायचं, करून पाहायचं, खाऊन पाहायचं आणि जबाबदारीनं - त्या संस्कृतीच्या परंपरेची जाणीव ठेवून - मगच जीभ टाळ्याला लावायची.
खरीखुरी चव हॉटेलात कधीच पुरती गावत नाही, तिच्या पुरतं पोटात शिरायचं असेल - तर कुण्या गृहिणीचा गुरुमंत्र घ्यावा लागतो.
हे 'झट मंगनी पट ब्याह' कामही नव्हे. ही साधना आहे...'
हे तिथले अलिखित संकेत होते - आहेत. ते मला जबराट आवडले.
सुदैवानं-दुर्दैवानं स्वैपाकाच्या प्रांतात हात-पाय हलवण्याचं काम सध्या माझ्या गळ्यात पडलं आहे. तिथले काही अफलातून - काही भीषण अनुभव पोटात खदखदत होतेच. म्हणून मग (मुख्यत्वे नुपूरच्या ब्लॉगमुळे) हिय्या केला. अर्थात ती (आणि इतर बरेच जण. वेळोवेळी त्यांचा सादर उल्लेख करीनच!) या प्रांतात 'दादा' आहे. तिच्याइतकं कौशल्य तर सोडाच, तिच्याइतकं सातत्य जरी मला जमलं, तरी मी धन्य होईन!
खरं तर इथे फोटोची सर्वाधिक गरज. पण माझा क्यामेरा तूर्तास माझ्याजवळ नाही आणि लोकांनी काढलेले फोटू छापण्यात काही मजा नाही. त्यामुळे आमची भिस्त शब्दांवरच. :(

२) हस्ताक्षरावरून म्हणे माणसाची मनःस्थिती, त्याचा स्वभाव, त्याची पार्श्वभूमी कळते. याचाच उपयोग काही चतुर डॉक्टर पेशंटची मनःस्थिती बदलण्यासाठी करून घेतात. हीच थिअरी मी या लिखाणाच्या बाबतीत वापरून पाहणार आहे. (असाही सगळ्या उदासपणावर खाणे-पिणे हा एक अक्सीर इलाज असल्याचं मी मानतेच!) बघू या माझा 'दु:खी-आत्ममग्न-एकसुरी' कंटाळा-मूड बदलता येतो का!
अर्थात हा एक प्रयोग आहे. त्यामुळे तूर्तास तरी त्याला काही ठरावीक साचा नाही, शिस्तही नाही. आकार तर नाहीच नाही. 'उदरभरण' हा एकमात्र रस्ता. त्याच्या काठाकाठानं जमेल तेवढं रानोमाळ भटकायचं. :)

३) 'माझे स्वैपाकाचे प्रयोग' (आहाहा, कसलं नैतिक आणि धाडसी वाटतं!) माझे एकटीचे असले, तरी मला देवानं चांगली दोन (टुणटुणीत, नाठाळ आणि तिखट जीभ असलेली) गिनिपिग्ज दिलेली आहेत. माझ्या या भाग्यवंत रूममेट्सना आपण अ आणि ब म्हणू. त्यांचे उल्लेख इथे येणं अपरिहार्य आहे. म्हणून हा आगाऊ पात्र परिचय. तसाच इथला एक मित्र क्ष. माझ्या आईलाही (किंवा फॉर दॅट मॅटर आजीलाही) नसेल, इतका त्याला लोणची, फोडणीतलं मोहरीचं प्रमाण, गवारीच्या शेंगांचा कोवळेपणा.. या सगळ्या प्रकरणात इंट्रेष्ट आणि गतीही आहे. (शिवाय त्याच्याकडे मिक्सरही आहे! : D) त्याच्या फर्माइशी, त्याचे सल्ले आणि त्याची मुक्ताफळंही इथे नोंदवली जाणार. बी रेडी! :)

शेगडी-सिलिंडरापासून पोळपाटापर्यंत आणि फ्रीजपासून सोलाण्यापर्यंत सगळ्या गोष्टींची जमवाजमव आम्ही इथे येऊन केली. त्याचे तपशील परत कधीतरी.

हे गेल्या काही महिन्यांत मला उमगलेलं एक सत्य उर्फ सुगरणीचा सल्ला:-

स्वैपाघरात खालील गोष्टी कायम बाळगाव्यातः:

मॅगी नूडल्स.
एक मोठा सँडविच ब्रेड (फॉर गॉड्स सेक - गोड नसलेला).
उकडलेले बटाटे.
दही आणि दूध.
लोणी आणि चीज.
टोमॅटो सॉस.
फ्री होम डिलिव्हरी देणार्‍या एक-दोन हॉटेलांचे फोन नंबर आणि मेन्यूकार्डस्.

खरं तर याहून वेगळ्या आणि अधिक बर्‍याच गोष्टी लागतात, असं माझ्या हळूहळू लक्षात यायला लागलं आहे. पण तरीही - यांचं महत्त्व काही कमी होत नाही. एखादी न फसलेली पाककृती पुढच्या वेळी.

तूर्तास अच्छा!

हे ठिकाणअनुभव

प्रतिक्रिया

वरदा's picture

8 Jul 2008 - 6:34 pm | वरदा

सुरुवात छान आहे...मी इथे आल्यावर पहिले २ महिने असलेच उद्योग करुन स्वयंपाक शिकले....आणि गिनिपिग एकच होता.. नवरा...बिचार्‍यानं काय काय खाल्लंय....:))
बरं त्या ब्लॉग्स च्या लिंक दे ना एक्दा वाचून पाहिन म्हणते....
तुझ्या पा.क्रु वाचायला उत्सुक....
वरदा
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

II राजे II's picture

8 Jul 2008 - 7:05 pm | II राजे II (not verified)

वा ! सुरवात एकदम झाक झाली आहे...

लिहा आम्ही वाचत आहोत.. एकदम नवा विषय... नवीन पध्दतीने वा !!!!
शब्द रचना देखील मस्त जमली आहे..... !

राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

मुक्तसुनीत's picture

8 Jul 2008 - 7:23 pm | मुक्तसुनीत

"प्रोमो"ज् खतरनाक होते. शिणेमा कधी सुरू होतोय वाट बघतो ! लय् भारी मजा येणार आहे !

अवांतर : आमच्या सैपाकगृहात ....सॉरी , म्हणजे मी जेव्हा आमच्या सैपाकगृहात असतो तेव्हा - हे आवश्यक असते :

ajay

चित्रा's picture

8 Jul 2008 - 8:35 pm | चित्रा

शिवाय त्याच्याकडे मिक्सरही आहे!

हाहा!

पुरुषांसाठी आणि बायकांसाठी "सोपे" असे वेगवेगळे काही असते याचा आजच शोध लागला!
अजय वढावकरला बरेच दिवसांनी पाहिले..

मुक्तसुनीत's picture

8 Jul 2008 - 8:35 pm | मुक्तसुनीत

कुकबुक्स फॉर डमीज् चे हे भाषांतर असावे ;-)

प्राजु's picture

8 Jul 2008 - 7:43 pm | प्राजु

मीही इथे आल्या आल्या बरेच प्रयोग केले. लिहिन सवडिने.. सध्या तुझे प्रयोग वाचायचे आहेत. लवकर लिहि.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

8 Jul 2008 - 10:43 pm | धनंजय

सुगरणीच्या अनुभवाच्या युक्त्यांची मागणी सदैव तेजीत असते.

(करायला सोप्या पण दिसायला भारी पाकृंचा भोक्ता.)
धनंजय

विसोबा खेचर's picture

8 Jul 2008 - 10:48 pm | विसोबा खेचर

मस्तच!

मेघनाताई, येऊ द्या अजूनही. छानच लिहिता तुम्ही..

आपला,
(खादाड) तात्या.

चतुरंग's picture

9 Jul 2008 - 2:34 am | चतुरंग

'पाक' आणि 'नापाक' दोन्ही कृती द्याव्यात ही विनंती ;)!

चतुरंग

बेसनलाडू's picture

9 Jul 2008 - 2:37 am | बेसनलाडू

आणखी खायला आवडेल.
(हावरट)बेसनलाडू

अनिरुध्द's picture

19 Aug 2008 - 9:47 am | अनिरुध्द

माझ्या आईलाही (किंवा फॉर दॅट मॅटर आजीलाही) नसेल, इतका त्याला लोणची, फोडणीतलं मोहरीचं प्रमाण, गवारीच्या शेंगांचा कोवळेपणा.. या सगळ्या प्रकरणात इंट्रेष्ट आणि गतीही आहे. (शिवाय त्याच्याकडे मिक्सरही आहे! : D) त्याच्या फर्माइशी, त्याचे सल्ले आणि त्याची मुक्ताफळंही इथे नोंदवली जाणार. बी रेडी

छे! हे म्हणजे अतीच झालं. बिच्चारा. कायम गिनीपिग म्हणून रहाणारसा दिसतोय.