गाथा 'टायटन' ची - Heritage Collection

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
24 Mar 2013 - 10:04 pm

.

टायटन एज् बाजारपेठेमध्ये आले त्याच दरम्यान National Institute of Design मधील एक तरूण 'प्रोजेक्ट वर्क' साठी टायटन मध्ये दाखल झाला. घड्याळांच्या डिझाईन क्षेत्रामध्ये संपूर्णपणे नवीन व अननुभवी असलेल्या या तरूणाने Etikoppaka या आंध्र प्रदेशातील पारंपारिक लाकडी खेळण्यांच्या डिझाईन प्रमाणे भिंतीवरील घड्याळे तयार केली. ही कल्पना यशस्वी ठरली व या घड्याळांची अल्पावधीतच प्रचंड प्रमाणात विक्री झाली.

ही व्यक्ती होती अभिजीत बनसोड.

.

कराड येथे मेकॅनिकल इंजिनीयरींगची पदवी व National Institute of Design मध्ये पुढील पदवी मिळवणार्‍या अभिजीत यांना टायटनने कायमस्वरूपी सामावून घेतले.

टायटनमध्ये काम करण्यास सुरूवात केल्यानंतर तब्बल पाच वर्षे वेगवेगळ्या प्रकाराच्या घड्याळांचा अभ्यास करून, पाश्चिमात्य शैलीप्रमाणे घड्याळे बनवण्याऐवजी 'भारतीय विविधता' घड्याळांमधून टिपण्याचा प्रयत्न म्हणजेच 'हेरीटेज कलेक्शन'. तौफिक कुरेशींच्या एका दिमाखदार कार्यक्रमामध्ये या सुरेख घड्याळांनी बाजारपेठेमध्ये प्रवेश केला.

ऐतिहासीक वारसा आणि कलाकृतीं अत्यंत रेखीवतेने टिपणार्‍या या घड्याळांचे उत्साहात स्वागत झाले.

हेरीटेज कलेक्शनच्या प्रत्येक घड्याळामागे "Designer Abhijit Bansod" हे ठळकपणे कोरून टायटनने अभिजीत बनसोड यांचा केलेला सन्मानही विरळाच!

.

अत्यंत बारकाईने तयार केलेल्या या घड्याळांचे कोरीवकाम व सौंदर्यस्थळे दाद देण्यासारखीच आहेत..

.

.

.

.

.

.

.

.

.

हेरीटेज कलेक्शनच्या लोगो पासून पॅकींग मटेरीयल पर्यंत सर्व बाबींवर खास लक्ष दिले गेले.

.

.

या भागामध्ये इतकेच.
प्रत्येक घड्याळामध्ये अनेक छोट्या गोष्टी कलात्मकतेने सजवल्या आहेत. सहज सापडण्याजोग्या..
तुम्हालाही सापडतीलच!

******************************************************

माहिती व चित्रे http://www.studioabd.in यावरून. माहिती व छायाचित्रांसाठी अभिजीत बनसोड यांचे आभार.

******************************************************

भाग १ - गाथा 'टायटन' ची - टायटन एज्

******************************************************

'गाथा टायटनची' समाप्त.

मांडणीतंत्रअभिनंदनमाहिती

प्रतिक्रिया

लॉरी टांगटूंगकर's picture

24 Mar 2013 - 10:20 pm | लॉरी टांगटूंगकर

फोटो बघूनच राजेशाही फिलिंग येते आहे... कल्पनाशक्तीला सलाम !!! मूळ कलाकृतीला दिलेला सन्मानच म्हणायचा हा..
_/\_

आदूबाळ's picture

25 Mar 2013 - 12:50 am | आदूबाळ

क्या बात, क्या बात!

कवितानागेश's picture

25 Mar 2013 - 12:53 am | कवितानागेश

आहा!
फार सुंदर आहेत घड्याळं..

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Mar 2013 - 1:16 am | डॉ सुहास म्हात्रे

अफलातून !!! अजून काय ? कोणार्कच्या प्रेमात पडलो आहे :)

बॅटमॅन's picture

25 Mar 2013 - 1:53 am | बॅटमॅन

+१११११११११११.

आमचे घड्याळद्वेष्टेपण आता हरपले. :)

सगळी घड्याळे आवडली. अभिजीत बनसोड यांचे कौतुक वाटले. टायटनने त्यांचे नाव प्रत्येक घड्याळामागे कोरावे ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.

श्रीरंग_जोशी's picture

25 Mar 2013 - 3:05 am | श्रीरंग_जोशी

या लेखमालिकेबद्दल अनेक धन्यवाद!!

फारच छान माहिती. इतकी सुंदर घड्याळे अन आपल्या इथे तयार झालेली.

५० फक्त's picture

25 Mar 2013 - 8:40 am | ५० फक्त

आवडलं,खुप खुप धन्यवाद.

सध्या जसं शिवाजीमहाराजांच्या सैन्यात मंत्रिमंडळात किती कोण कुठले ह्याचे हिशोब करायची फॅशन आहे तसं काही शतकांनी टाटा ग्रुपच्या साम्राज्याबद्दल केलं जाईल तेंव्हा अशी बरीच मराठी माणसं पुन्हा स्म्रुतीत आणली जातील.

स्पंदना's picture

25 Mar 2013 - 8:45 am | स्पंदना

बनसोड!
व्वा! काय सुरेख कल्पना आहे आपलीच वैशीष्टे नव्याने सामोरी आणायची. अतिशय आवडल लिखाण.
काय एकेक फोटो आहे.

नानबा's picture

25 Mar 2013 - 8:47 am | नानबा

मस्तच... खूप रंजक माहिती मिळाली, सोबत टाटा आणि अभिजीत बनसोडचा अभिमान वाटला..

धमाल मुलगा's picture

25 Mar 2013 - 8:51 am | धमाल मुलगा

च्यायला! फाष्ट्र्याकच्या नादी लागण्याऐवजी हे हेरिटेजच पहायला हवं होतं राव! काय एकाहून एक डिझाईनं आहेत राव. जियो!

दादा कोंडके's picture

25 Mar 2013 - 1:42 pm | दादा कोंडके

च्यायला! फाष्ट्र्याकच्या नादी लागण्याऐवजी हे हेरिटेजच पहायला हवं होतं राव!

पण ही घड्याळं एखाद्या कार्यक्रमात घालायला ठिक आहेत. शेरवानी, पायात करकरणारे जोधपुरी शुज, चंदनाच्या वासाचं अत्तरावर सूट होतात. फास्टट्र्याक स्पोर्ट्स वाच म्हणून ठिक आहे. (खरतर क्याशिओ/शिटीजन अ‍ॅनॅलोग-डीजिटल कॉम्बो विथ १०-बार वाटर प्रूफ आणि स्टॉपवॉच आणि तत्सम स्प्पोर्ट्स फंक्शन असणारी घड्याळं बरी). ऑफीसमध्ये वापरायला मात्रं मेट्यालिक स्ट्राप वाली क्रोनोग्राफ असलेली फ्वासिल, टसेट वगैरे इंप्रेशन पाडायसाठी बरी असतात.

-(ट्रेंडी) दादा

धमाल मुलगा's picture

27 Mar 2013 - 7:16 am | धमाल मुलगा

माझं मत - मेट्यालिक पट्टा अन क्रोनोग्राफ म्हणजे शुक्कीरवारच्या बिझनेस क्याज्युअल्सचा भाग! ऑफिसात वापरायला अस्सल चामडी पट्टा असलेलं, पट्ट्याला म्याच होणारं अ‍ॅनालॉग घड्याळ. ते असं पाहिजे की वेगळं उठून दिसता कामा नये. अन शनिवार रैवारच्या टैमाला टर्रेबाजी करत हिंडताना स्वेटशर्ट/कार्गोशर्ट/टीशर्ट अन कार्गो/थ्री-फोर्थ/रग्ड जिन्स+स्निकर्सवर स्पोर्ट्सवाली घड्याळं!
फाष्ट्रॅकची काही मॉडेलं (तेच ते...वाकडेतिकडे डायल असलेले) तद्दन टवाळ वाटतात, पण काही मॉडेल्स असे आहेत की ते ना धड फॉर्मल्समध्ये येतात ना कॅज्युअल्समध्ये. त्यामुळं ते अंमळ आवडतात.

अन, शेरवानी+मोजडी+अत्तरासोबत ही नक्कीच भारी दिसतील. पण मला विचारशीला तर शेरवानी वगैरेवर मनगटी घड्याळ घालूच नये. अंमळ टूकार दिसतं. घड्याळ हवंच असेल तर सोनेरी साखळी असलेलं पॉकेटवॉच वापरावं. नाऽऽदखुळा दिसतं मर्दा! :)

-(क्वॉनझर्वेटिव्ह) अशोक सराफ. ;)

शेरवानी - सोनेरी साखळी असलेलं पॉकेटवॉच!

ह्ये जबरा काँबीणेशन!!!!!

अक्षया's picture

25 Mar 2013 - 9:31 am | अक्षया

अफलातून घड्याळे.एका पेक्षा एक सुंदर.

फोटो शेअर केल्या बद्द्ल धन्यवाद.

इनिगोय's picture

25 Mar 2013 - 10:28 am | इनिगोय

अजिंठा.. द बेस्ट!!

अभिजित बनसोड हा एक भन्नाट डिझायनर आहे. नुसती घड्याळंच नाही, तर त्याची इतर डिझाईन्सही एकसे एक आहेत.

त्याने बनवलेल्या एटिकोप्पका घड्याळांपैकी हा एक नमुना..

.

बाकी भलभलते विषय शोधून त्यावर लिहिलेल्या लेखांसाठी आणि त्यासाठी घेतलेल्या मेहनतीसाठी मोदकाचे खास आभार :)!
लगे रहो..

अभिजित बनसोड हा एक भन्नाट डिझायनर आहे. नुसती घड्याळंच नाही, तर त्याची इतर डिझाईन्सही एकसे एक आहेत.

एकदम १००% सहमत.
त्याची घड्याळाव्यतिरिक्त काही इतर डिझाईन्स -
a
BPL Halo हे टेबल लँप्स

h
Hopscotch- बेडसाईड ड्रॉवर्स..

a
s
d
Angara- मला सगळ्यात जास्त आवडलेलं डिझाईन.

c
CANdle- डिझाईनर कँडल होल्डर..

m
Mubhi Tree

d
DIY-a

प्रत्येक घड्याळाचे क्राऊन्स (किल्ली द्यायचे बटण) बघा...

ताजचा क्राऊन हा ताजमहालाचा डोम आहे..
स्तंभाचा क्राऊन हा कलशाकृती आहे...

आणखी काही सापडते आहे का..?

वपाडाव's picture

25 Mar 2013 - 12:07 pm | वपाडाव

जंतर मंतर किंवा अजंता घ्यावेसे वाटत आहे...
असो. माहिती वाचुन छान वाटले...

उत्तम कल्पना आणि कलात्मता...

मैत्र's picture

25 Mar 2013 - 1:00 pm | मैत्र

या कलेक्शनची इतकी चित्रदर्शी माहिती .. सुरेख..
काय एक एक फोटो आहेत आणि अर्थात डिझाइन्स..
अनेक धन्यवाद या लेखमालिकेबद्दल..

अभिजित बनसोडबद्दल वाचलं होतं Connect The Dots या रश्मी बन्सल यांच्या पुस्तकात..
टायटनची यानंतर आणि आत्तपर्यंत अतिशय गाजलेल्या RAGA या मालिकेचे डिझाईन बनसोड यांनीच केले आहे. आणि इथे व्हाईट्फिल्ड, बंगलोर इथे त्यांचा स्टुडिओ आहे.

अवांतरः ५० फक्त यांचा प्रतिसाद आवडला आणि पहिलंच उत्तुंग व्यक्तिमत्व डोळ्यापुढे आलं - सुमंत मूळगांवकर..

गिरीश वाघ - नॅनोचे शिल्पकार. :)

लाल टोपी's picture

25 Mar 2013 - 1:12 pm | लाल टोपी

खूपच नयनरम्य सफर पण आणखी थोडी माहिती दिली असती तर दुधात साखर पडली असती.

सहमत.. हा विषय एवढा रंजक आहे, की अजून तपशीलात शिरून चाललं असतं. अाधीच्या भागात जशी अल्ट्रास्लिम घड्याळांची जन्मकथा वाचायला मिळाली, तसं तुला यावरही लिहिता येईल..

या कलाकृती इतक्या सुंदर आणि आखीवरेखीव आहेत की त्यांचे वर्णन करणे, सौंदर्यस्थळे टिपणे याची खरंच आवश्यकता आहे का..? कोणत्याही शब्दांच्या अडथळ्याशिवाय या कलाकृतींनी वाचकाशी संवाद साधावा अशी अपेक्षा आहे!

(या घड्याळांकडे पाहता यांचे योग्य शब्दात वर्णन करणे हे खूप अवघड वाटले! मला तरी!!)

टायटन च्या रागा, झायलस आणि लाईटवर चालणार्‍या एच.टी.एस.ई. घड्याळांबद्दल अशी रोचक माहिती तुझ्या लिखाणशैलीत वाचायला आवडेल...

धनुअमिता's picture

25 Mar 2013 - 1:44 pm | धनुअमिता

फार सुंदर आहेत घड्याळं..

प्यारे१'s picture

25 Mar 2013 - 2:19 pm | प्यारे१

मस्त डिझाईन्स.
अ-च-प्रतिम एकदम!

बाकी माणसाच्या कर्तृत्वाला सलाम करताना/मारताना त्याचा जन्म, जात, लिंग, प्रदेश, भाषा आणि इतर काही असेल तर ह्यांचा विचार करण्याची गरज असू नये असं वैयक्तिक मत आहे.

खबो जाप's picture

25 Mar 2013 - 3:43 pm | खबो जाप

कधी घड्याळ वापरण्याची आवड नव्हती, मागच्यावेळी अमेरिकेला गेलो तेव्हा SEIKO चे एक घड्याळ आवडले म्हणून २००$ खर्चून घेतले( स्वताचे ). पण आता हा लेख वाचून आणि 'हेरीटेज कलेक्शन' तेव्हा बघून मोठी चूक केली असे वाटते आहे.
चला आता पुढच्यावेळी पहिली पसंती 'हेरीटेज कलेक्शन' लाच ..............

मदनबाण's picture

25 Mar 2013 - 4:17 pm | मदनबाण

हा भाग देखील आवडला ! :)
मला कोणार्क आणि लक्ष्मी विलास पॅलेस ही दोन मॉडेल्स फार आवडली.
अभिजित बनसोड यांच कौतुक करावे तितके कमीच वाटते.

चिगो's picture

26 Mar 2013 - 12:32 am | चिगो

घड्याळे सुंदर.. टायटन आणि अभिजीतचेही कौतूकच वाटले.. आर्टपिस म्हणून उत्तम.. पण 'प्युर युटीलिटी'च्या दृष्टीने बघायची झाल्यास जरा कीचकट वाटली, हे स्पष्ट मत आहे.

अभ्या..'s picture

26 Mar 2013 - 12:51 am | अभ्या..

मोदकराव थोडासा अपेक्षाभंग झाला खरा. :(
'एज' चा लेख वाचून बरीचशी पडद्यामागची कहाणी समजली होती. :)
इथेही तसेच वाचायला मिळेल असे वाटले पण तुम्ही एकतर फार थोडक्यात आटपले आणि कॅटलॉगचे रसग्रहण आम्हालाच करायला सांगितले. ;) तुमच्या नजरेतून वाचायला जास्त आवडले असते.
कोणार्क आणि लक्ष्मीविलास पॅलेस डिझाइनमधील बेल्टला पकडणारे दोन हत्तीची शीर्षे मात्र अप्रतिम.
(गितांजली च्या ज्वेलरी डिझाइन कॉम्पीटिशनमधले विनर डिझाइन आठवले. :) )

मन१'s picture

26 Mar 2013 - 8:29 am | मन१

मस्त रे कांबळे.....

प्रचेतस's picture

26 Mar 2013 - 8:39 am | प्रचेतस

किंमत काय आहे रे या घड्याळ्यांची?

मन१'s picture

26 Mar 2013 - 8:45 am | मन१

तुम्हालाही आमच्यासारखीच मध्यमवर्गीय सवय साली .
तुम्हाला मारिया शारापोव्हा भेटली बोलायला तरी "इराण्याच्या हाटलित च्या प्यायला येतिस" का म्हणून इचाराल.
.
(सात जन्माचा निम्नमध्यमवर्गीय)

इनिगोय's picture

26 Mar 2013 - 5:50 pm | इनिगोय

पुण्यात इराण्याचे हाटेल कुठंसे अाहे?

५० फक्त's picture

26 Mar 2013 - 6:49 pm | ५० फक्त

काय पण प्रश्न आहे, या एकदा पुण्यात असली नसलेली,बंद पडलेली सगळी इराणी हॉटेलं फिरु.

प्रचेतस's picture

26 Mar 2013 - 11:01 pm | प्रचेतस

=))
इराण्याचा च्या तर लै लांबची गोष्ट झाली राव.
आमची धाव कोपर्‍यातल्या अण्णाच्या टपरीपर्यंतच आणि तो पण कटिंग.

मोदक's picture

26 Mar 2013 - 5:23 pm | मोदक

किंमत काय आहे रे या घड्याळ्यांची?

या घड्याळांची किंमत ३५०० ते ८००० होती.

पुणे शहरात यांपैकी झरोका हेच एकमेव घड्याळ उपलब्ध होते... जे बहुदा काल / आज कंपनीकडे परत पाठवले गेले असावे. (वर दिलेला बॅक कव्हरचा फोटो मला खूप मुश्किलीने मिळाला - अनेक ठिकाणी फिरावे लागले!)

आता लवकरच हेरीटेज कलेक्शन II मार्केटमध्ये येईल.

ते अजिंठ्याचं बघ ना मिळालं तर कुठे.
लै भारीय रे.

मोदक's picture

27 Mar 2013 - 6:00 am | मोदक

बघतो नक्की...

माताय यातलं एखादतरी मनगटावर मिरवावं असं वाटुन राहिलय.

पैसा's picture

26 Mar 2013 - 5:55 pm | पैसा

एकेक खास कलाकृतीच! आता पुढचा विषय नॅनो तयार होईपर्यंतच्या अडथळ्यांच्या शर्यतीवर घेतलास तरी चालेल!

आनन्दिता's picture

26 Mar 2013 - 7:55 pm | आनन्दिता

आवडला लेख!! पुलेशु

पिलीयन रायडर's picture

26 Mar 2013 - 8:22 pm | पिलीयन रायडर

काय घड्याळं आहेत .... वा!!!!!

मोदका... तु धन्य आहेस बाबा...

धन्य रे मोदका.. घड्याळांचे कलेक्शन लय भारी आहे.

नाखु's picture

27 Mar 2013 - 9:34 am | नाखु

"काटा" किर्र लेख...
कुणी "भेट" म्हणून दिलं तर अशी घड्याळ वापरायला नक्की आवडेल.

सध्या "टायटन"चं " (अति निम्नमध्यमवर्गीय) घड्याळ वापरणारा..

सही.... काय सुंदर आहेत हि घड्याळे... अप्रतिम डिझाईन्स.

सुमीत भातखंडे's picture

28 Mar 2013 - 1:22 pm | सुमीत भातखंडे

सुरेख डिझाईन्स.

सस्नेह's picture

28 Mar 2013 - 6:00 pm | सस्नेह

एका भारतीय कंपनीकडेही इतका Quality conciousness आहे हे पाहून साश्चर्य समाधान वाटले.

वपाडाव's picture

28 Mar 2013 - 6:13 pm | वपाडाव

झायलसची घड्याळं टाटांसाठी बनतात तीही स्वित्झर्लँड मध्ये. जरा एकदा नजर टाकुन पहा.
http://helioswatchstore.com/brand.php?id=xylys

पुंबा's picture

2 Nov 2016 - 12:25 pm | पुंबा

कराड येथे मेकॅनिकल इंजिनीयरींगची पदवी व National Institute of Design मध्ये पुढील पदवी मिळवणार्‍या अभिजीत यांना टायटनने कायमस्वरूपी सामावून घेतले.

माझ्या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत बनसोड सर. खूप अभिमान वाटला. :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Nov 2016 - 4:07 pm | कैलासवासी सोन्याबापु

आयला ते जंतरमंतर इंस्पायर्ड घड्याळ कसले सोबर अन डिग्निफाईड वाटते आहे राव! लैच कळस

मला अजंठा आणि कोणार्क आवडले. नेमके पोटापाण्यला लागून असले घड्याळ घेणे शक्य झाले तेंव्हा ही सिरीज बंद झाली. :(

अजंठाचे खांब बघा राव... भारी एकदम..!!

पाटीलभाऊ's picture

2 Nov 2016 - 4:37 pm | पाटीलभाऊ

अप्रतिम घड्याळं आहेत