मागच्या लेखांकात एका चित्रगृहाचा उल्ल्लेख राहून गेला ते म्हणजे वेस्टएंड थिएटर.पुणे लश्कर हद्दीतील मेन स्ट्रीट च्या सुरवातीला हे होते. आजही त्या नावाचे मल्टीप्लेक्स इथे आहे. पण जुन्या वेस्ट एंडचा मजा काही औरच.
भानुविलास चित्रगूहात दुपारी १ ला मॅटीनीचे शोज असत. त्यात डीन मार्टीन या गायक नटाने सादर केलेला " मॅट हेल्म" हा जेम्स बोन्डचा अवतार पहायला मिळत असे the scilencers , Murderer's row रो असे काही चित्रपट पाहिल्याचे आठवते. या सायलेन्सर्स या पटाचे टायटल अजूनही लक्षात आहे. एक स्ट्रीप टीज नूत्य करणारी मदनिका वस्त्र उतरविण्यापूर्वी हवेत उडवते व त्यातून श्रेयनामवलीची अक्षरे बाहेर पडतात असा प्रकार होता. याचबरोबर "fantomas" नावाच्या एका पात्राची चित्रपटांची सिरीज चालू झाली होती. त्यात विनोदाची भ्ररमार असे. याच बरोबर भानुविलास| ला याच सुमारास Grand slam नावाचा एक सिनेमा पाहिला होता. त्याची ट्रेलर लाईन भारी होती ." थर्टी ईयर्स ऑफ प्लॅनिंग, थर्टी अवर्स टू एक्झीक्यूट अॅन्ड थर्टी सेकंद्स टू एक्सपायर " एका रक्षित अशा मालावर डल्ला मारायचा बेत एक माणूस करतो . चार जणांचे सहाय्य घेतो त्याना एकमेकाना एकमेकापाअसून दूर ठेऊन. माल मिळतो . एका होटेलच्या कोर्ट मधे तो माल असलेली सूटकेस घेऊन तो बसलेला असतो. वरून विमानातून खोट्या नोटांची बरसात होते. एकच गलका नोटा गोळा करण्यासाठी . तेवढ्यात एक मोटरसायकल येते व चोरावर मोरचा सीन पार पाडत सूटकेस पळविली जाते. या नाटयमय शेवटाने हा पट लक्षात राहिला.
विदेशी चित्रपट तयार करण्याची त्यावेळी काही केंद्रे होती. त्यात गुन्हेगारी चित्रपट इटलीत तयार होत. युद्धपट एकतर ब्रिटनमधे किंवा हॉलीवूड. bandits in Milan , the marseille contract असे गुन्हेगारी वळणाचे चित्रपट पहावयास मिळाले . अशाच प्रकारचे लुटालुटीचे वगैरे चित्रपट इटालीवाले तयार करण्यात वाकबगार होते. त्यात गाजलेला The italian job, seven golden men हे ही येतात. त्याकाळी इटालियन जॉब यातील त्या कशाही पळणार्या मोटारी अगदी ट्रान्स वल्र्ड एअरलाईनच्या घुमटावर चढतात ,ड्रेनेजच्या पाण्यावरून घसरत जातात ह्या गोष्टीनी एक रिपीट व्हल्यू त्या चित्राला दिली होती. सकाळच्या सिनेमांची ही लाईन चालू असताना. अलका चित्रमंदिरात हॅरी साल्झमान व अल्बर्ट ब्रोकोली प्रेझेंट्स चे बोण्डपटाचा रतीब चालू असे.सीन कॉनेरी हा नट तरूणांच्या गळ्यातला ताईत बनलेला .त्यातील टायटल्स , मारामार्या, श्री क्यू यांची जादुई यंत्र सामग्री , मदनिकांचा तांडा आणि साथीला मांजर वाला ब्लोफेल्ड अशी फोडणी असल्यावर थेटर गच्च भरल्यास नवल नाही.
दरम्यान पुण्याचे हिंदविजय थेट्रर इतिहासजमा होऊन त्या जागी आलीशान " नटराज" हे नवे ऑडेटोरियम बनत होते. एके दिवशी संध्याकाळी सातचे सुमारास माझा थोरला भाऊ माझ्या होस्टेलवर आला. तो नुकताच ३ ते ६ चा एक शो वेस्टएंड मधे पाहून आला होता .इतका भारावलेला की विचारायची सोय नाही. आम्ही तोच सिनेमा पहाण्यासाठी रात्री ९ ला वेस्टएंडवर पोहोचलो. तिकिटे मिळाली नाहीत . सारे शोज हाउसफुल जात होते. तो चित्रपट दोन दिवसात पहायला मिळाला. व त्यानंतर जवळ जवळ आठवेळा मोठ्या व अनेक वेळा छोट्या पडद्यावर पाहिला. त्याचे नाव Mackenna's Gold . आता पावेतो मी ग्रेगरी पेक या नटाचा कोणताच सिनेमा पाहिला नव्ह्ता . जाएंट ओफ अ मुव्ही अशी जहिरातीत व पोस्ट्रर मधे लाईन असलेल्या या चित्रात भुकंपाचे सीनस त्या काळाच्या उपलब्ध तंत्राच्या मानाने सरस होते.बरोबर उमार शरीफ या इजिप्शियन अभिनेत्याचा " प्य्रारा" खलनायक कोलोराडो..पार्शवभूमीवर मोन्युमेट व्हॅली व स्पायडर रॉक यांचा विटकरी रंग .आजही हा चित्रपट आपल्या मनात त्याचा " नकाशा" उमटवून आहे.
नटराज चालू झाल्यानंतर उदघाटनाचा सिनेमा म्हणून Where eagles dare या बोलपटाची निवड झाली व मेट्रो गोल्डविन मेयर , रिचर्ड बर्टन व क्लिंट ईस्टवूड ही नावे व सर्वात महत्वाचे अॅलिस्ट्रर मॅक्लीन हे नाव माझ्या आयुष्यात आले. जमेनीतील बरर्फाच्छादित प्रदेशात घेतलेले शूटींग. मॅक्लीनच्या साहसपटात नेहमी येणारा सस्पेन्स याने हाही चित्रपट रिपीट व्हॅल्यु असलेला आहे.
इंगजी चित्रपटात रंगभूमी गाजवलेले अनेक अभिनेते व्यावसायिक चित्रपटात ही यशस्वी ठरले. रेक्स हॅरिसन, रिचर्ड बर्टन, मायकेल केन, चार्ल्स हेस्टन, लोरेन्स ऑलीव्हिए डेव्हीड निवेन , सर अलेक गिनिस ई नावे वानगी दाखल.त्यांच्या चित्रपटात पुढे डोकावू.
व्हेअर ईगल्स डेअर " नंतर एम जी एम ची एकसोएक चित्रे नटराज ला पाहयला मिळू लागली. त्यात Dirty dozen हे एक खास. आपल्याकडे गदिमानी " औंधाचा राजा " नावाची कथा लिहिली व त्यावरून शांतारामबापूनी " दो आंखे बारह हाथ" हा अविस्मरणीय चित्रपट हिंदीत बनविला हे सर्वविदित आहे. त्याचाच पश्चिमी अवतार म्हणजे हा डर्टी डझन हा चित्रपट. एक सैनिकी अधिकारी व त्याच्या ताब्यात दिलेले बारा मुडदेफरास .त्यांचा सदुपयोग म्हणजे त्यांचा युद्द्धात आपल्या देशाच्या बाजूने वापर करणे .यासाठी त्याना दिलेले प्रशिक्षण व शेवटी त्यांच्या प्राणाची किंमत देऊन यशस्वी केलेली मोहिम अशी कथा या सिनेमाची होती. त्यात चार्लस ब्रॉन्सन , जिम ब्राउन ई तगडे नट तर अधिकार्याच्या भूमिकेत ली मारविन .
यानंतर याच चित्रगगृहात |Five man army हा वेस्टर्न चित्रपट आला. मी अनेक वेस्टर्न चित्रपट १९७२ ते १९८० या काळात पाहिले .नेवाडा, अरिझोना, उटा या अमेरिकन राज्यातील भूप्रदेशाची पार्श्वभूमी घेऊन बनलेले हे एक मोठे हॉलीवूड चित्रपटातील " पर्व " आहे. त्यात जॉन वेन, क्लिंट इस्टवूड, जॅक पॉलान्स, अॅलन डेलान, टेरेन्स हील बड स्पेन्सर,एली वालाच ई ई नटांपासून ते मॅकेन्नाज गोल्ड वाल्या ग्रेगरी पेकचा हातभार लागलेला आहे पण त्याविषयी पुढल्या भागात.
प्रतिक्रिया
5 Dec 2012 - 9:05 pm | अत्रुप्त आत्मा
दुसरे रीळंही भरपूर अवडल्या गेले आहे... :-)
5 Dec 2012 - 9:56 pm | तर्री
जब्री लेखन कम अनुभव कथन...
5 Dec 2012 - 10:00 pm | मदनबाण
Mackenna's Gold आणि Where eagles dare हे दोन्ही चित्रपट लहानपणी पाहिल्याचे स्मरते... कधी तरी वेळ काढुन परत पहावयास हवे.
लेखन आवडले...
5 Dec 2012 - 10:23 pm | चित्रगुप्त
छान, वाचायला खूप छान वाटते आहे.

त्याकाळी गाजलेला आणखी एक चित्रपट म्हणजे: 'The Bridge on the River Kwai' यातील शिटीवर वाजवलेले संगीत आजही कानात गुणगुणते.१९५८-५९ चे सुमारास वयाच्या सात-आठव्या वर्षी मी हे संगीत शिटीवर वाजवत इन्दुरातील त्याकाळच्या एकमेव 'ओव्हर ब्रिज' वरून चालत जातो आहे, हे द्रॄष्य आज मला अचानक आठवले. हे संगीत सोडून सिनेमातील इतर सर्व विसरलो आहे.
या सिनेमाच्या फ्रेंच प्रतीचे पोस्टर:
6 Dec 2012 - 7:12 am | चौकटराजा
या ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय च्या अलेक गिनेस यांचा उल्लेख आलेला आहे वर ! हा चित्रपट मी पाहिला. त्याचे बरोचसे
शुटींग श्रीलंकेत झाले होते. व आपण ज्या व्हिसल चा उल्लेख केला ती लाजवाबच !
6 Dec 2012 - 8:57 am | प्रचेतस
खूप छान लिहिलंत.
२/३ वर्षांपूर्वी टीव्ही वर हे जुने चित्रपट लागले होते. त्यात मॅकेन्नाज् गोल्ड बरोबरच गन्स ऑफ नेवरॉन पण पाहिला गेला.
1 Feb 2013 - 8:20 am | चित्रगुप्त
औंधचे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या विषयी आहे का ही कथा ? जालावर उपलब्ध आहे का?
2 Feb 2013 - 7:31 am | श्रीनिवास टिळक
हिंदविजयचे नटराज झाल्याचे आपण लिहिले त्यावरून आठवण झाली. ५५ किवा ५६ साली हिंदविजय बांधून तयार झाले तेव्हा उदघाटन म्हणून दिग्दर्शक राजा नवाथे यांचा संत रामदास हा चित्रपट लावला होता. मी तेव्हा modern high school मध्ये ९वीत किंवा १०वीत असेन.
2 Feb 2013 - 4:11 pm | अमोल केळकर
छान माहिती
अमोल केळकर
मला इथे भेटा