चावडीवरच्या गप्पा – बस डे

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
1 Nov 2012 - 8:34 pm

“काय घारुअण्णा, आज काय मग बसने, मंडईत वाहिनीना घेउन?”, चिंतोपंत एकदम थट्टेखोर हसत.

“अरे हो आज बस डे होता नाही का! आज काही बाहेर जायला झालेच नाही. त्यामुळे काय झाले ह्या बस डेचे काही कळलेच नाही”, नारुतात्या.

“अहो कसला डोंबलाचा बस डे अन काय, आमच्या हिला पण भारीच हौस.”, घारुअण्णा भयंकर त्राग्याने.

“काय झाले?”, इति नारुतात्या.

“अरे, चांगले म्हणत होतो की आपली स्कूटर घेउन जाऊ, पण नाही! नवरोबाचे ऐकेल ती बायको कसली.”, घारुअण्णा घुश्श्यात.

“अहो, काय झाले ते नेमके सांगाल का, का उगाच त्रागा करताय एवढा.”, इति नारुतात्या.

“शिंचा बस डे म्हणे! आपण सच्चे पुणेकर आहोत तर बस डे पाळलाच पाहिजे, असे म्हणून चक्क पीएमटीच्या बसने घेउन गेली मला मंडईत.”, घारुअण्णा तणतणत.

“अहो त्यात रागावण्यासारखे काय काय एवढे? बरोबरच म्हणाल्या की वाहिनी, त्यात त्यांचे काय चुकले ?”, इति भुजबळकाका.

“तरी म्हटलेच अजून बहुजानह्रदयसम्राट कसे नाही बोलले. अहो त्या मोडक्या पीएमटी बसने कधी प्रवास केला आहे का तुम्ही ?”, घारुअण्णा अजून घुश्श्यात, “सगळी बस कराकरा वाजत होती, होर्न सोडून सगळ वाजत होते! त्यात पुन्हा शिवाय पत्रे ठिकठिकाणी फाटलेले, त्याने कुठे लागू नये, विजार फाटू नये त्यासाठी कसरत करावी लागली ती वेगळीच.”

“च्यामारी, परवा तर, छॅsss, आपल्या पुण्याची सगळी रया गेली, कसला हा ट्राफिक जॅम होतो आजकाल असे तुम्हीच कोकलत होतात ना!”, भुजबळकाका उपरोधाने.

“अहो बहुजानह्रदयसम्राट, प्रत्येक वेळी वाकड्यांतच शिरायला हवें का?”, घारुअण्णा लालेलाल होऊन.

“खरे आहे हो भुजबळकाका, घारुअण्णा म्हणताहेत ते, बसेसची अवस्था तशीच आहे पुण्यात, मुंबईच्या बेस्ट सारखी काही सेवा नाही पुण्यात.”, इति चिंतोपंत.

“त्या मुंबईकरांना नाही काही असले बस डे वैगरे पाळावे लागत. तिथे बस कशा चकाचक असतात.”, घारुअण्णा रागाने.

“अहो घारुअण्णा, तिकडे मुंबईत सगळे, प्रवास बस नाहीतर लोकलनेच करतात!”, नारुतात्या.

“नाहीतर काय, तुम्हाला तर बुडाखाली गाडी घेतल्याशिवाय बाहेर निघायला नको असते, मग त्या बसेसची सेवा चांगली असावी म्हणून प्रशासनावर दडपण आणणार कोण ?”, शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात उतरत.

“व्वा! ह्याला म्हणतात निष्ठा, ह्यांच्या सकाळ समुहाने आयोजित केला ना हा बस डे, मग तर हे त्याचे गुण गाणारच”, घारुअण्णा उपरोधाने.

“घारुअण्णा, तुम्ही उगाच माझ्या निष्ठेवर घसरू नका. तो विषय काढायचं काम नाही.”, शामराव बारामतीकर जरा तडकून.

“हो ना! घारुअण्णा, तुमचा नेमका राग कशावर आहे? वाहिनी तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध बसने घेउन गेल्या म्हणून की सकाळ समुहाने बस डे आयोजित केला म्हणून खी…खी…खी..”, भुजबळकाकाही आता जरा थट्टेने .

“तुम्हाला नाही कळणार हो बहुजानह्रदयसम्राट. तुम्हाला समजूनच घ्यायचे नाहीयेय तर बोलून काय उपयोग?”, घारुअण्णा हताशपणे.

“पण सांगा की नीट समजावून मग, तुम्हाला काय म्हणायचे ते.”, भुजबळकाका जरा सिरीयस होत.

“अहो, मला सांगा, हे असले बस डे वैगरे साजरे करून काय साध्य होणार आहे? उद्यापासून येरे माझ्या मागल्याच ना! हे असले पालथे धंदे सांगितलेत कोणी.”, घारुअण्णा.

“ही तुमची टोकाची भूमिका आहे असे नाही तुम्हाला वाटत?”, भुजबळकाका.

“अरें देवा! ह्या भुजबळकाकांना माझे म्हणणे कधी पटणार हे तो विश्वेश्वरच जाणे.”, घारुअण्णा उद्वेगाने.

“घारुअण्णा, अगदी विश्वेश्वरापर्यंत जायची काही गरज नाहीयेय! मलाही तुमचे म्हणणे जरा टोकाचेच वाटत आहे.”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे, सोकाजीनाना?”, घारुअण्णा जरा शांत होत.

“अहो आपल्या देशात इतके डे साजरे होतातच ना? त्यात अजून एक. बाकीचे ते सगळे डे जवळजवळ परदेशीच असतात. आपला हा बस डे तर खास स्वदेशी आहे की नाही? तोही चक्क मराठमोळ्या पुण्यातला. त्याचा आपल्याला अभिनान असला पाहिजे आणि असे काहीतरी अभिनव करण्याची प्रथा पुणेकर कायम ठेवत आहे त्याचाही”, सोकाजीनाना मंद हसत.

“गमतीचा भाग सोडा. पण आज पुण्यात किती वाहने झाली आहेत बघा आणि त्यात पुन्हा हे वाहन म्हणजे स्टेटस सिम्बॉल. अहो सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्यात कसला आलाय कमीपणा. तिकडे जपानमध्ये एका कम्पनीचा सीइओ सुद्धा सब-वेने प्रवास करतो. रस्त्यावरची वाहतूक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तिला पर्यायी विकल्प शोधायला नको का? त्यासाठी जनमानस तयार व्हायला हवे ना. हा सकाळ समुहाचा एक प्रयत्न, त्या दृष्टीने टाकलेले एक पहिले पाउल, म्हणून ह्याकडे सकारात्मक दृष्टीने बघूयात ना. हे जनमानस तयार झाले तर त्या जनमानसाच्या रेट्याने बससेवा सुधारित, चांगली आणि प्रवास करण्यायोग्य करण्यासाठी प्रशासनावर दबावही आणता येईलच की. करायच्या आधीच नुसते, हं, असल्याने काय होणार आहे, पालथे धंदे सगळे, असला निराशावाद आणि नकारात्मक भूमिका का घ्या?”

“काय झाले आहे की आजच्या जमान्यात कशाकडेही शंकास्पद नजरेने आणि नकारात्मक बघायची सवयच, लागलीय आपल्याला. जरा मोकळ्या मनाने विचार करा. एका दिवसात किती इंधन वाचले आज, किती प्रदूषणही कमी झाले असेल? कितीतरी जणांना, किती कमी पैशात ऑफिसला जाता येते ते आज पहिल्यांदाच कळले असेल. कितीतरी जणांच्या शरीराला आज कधी नव्हे तो व्यायाम मिळाला असेल असेल, बसप्रवासात त्रास होउन. त्यातून समजा एखाद्याने जरी नेहमी सार्वजनिक वाहतुकीनेच प्रवास करायचे असे ठरवले तरीही हा बस डे साजरा करण्याच्या प्रयत्नाला यश आले असे म्हणता येईल ना!”

“मी तर म्हणतो की फळाची अपेक्षा कराच का? फक्त कर्म करूयात की. नुसताच अजून एक ‘डे’ साजरा झाला असे समजूयात. काय? तेव्हा सोडा ह्या फुकाच्या बातां आणि चहा मागवा”. सोकाजीनाना हसू कायम ठेवत.

घारुअण्णांनी मान हालवत चहाची आणि हसत ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

धोरणसमाजजीवनमानप्रकटनमाध्यमवेध

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

1 Nov 2012 - 9:07 pm | श्रीरंग_जोशी

उर्जाबचतीचा प्रकल्प यशस्वीपणे राबविल्याबद्दल सर्व पुणेकरांचे हार्दिक अभिनंदन.
काही वर्षांपूर्वी मी बस वर्षच साजरे केलेले आहे. तो काळ भाईंचा होता, काय तो बी आर टी चा तोरा, एकदम विकसित देशात असल्यासारखे वाटायचे.

बाकी सोकाजींनी जनमानसाच्या विविध छटा चपखलपणे टिपल्या आहेत या गप्पांद्वारे.

आता त माझी खात्रीच पटली ..
सोकाजीनानांची मिशेश घरी चा बनवत नाइ :-/

सोत्रि's picture

1 Nov 2012 - 9:26 pm | सोत्रि

पूजा,

सोकाजीनानांच्या चहाबद्दल असलेली तुझी चाहत भारीच ब्वॉ. :)

- (चहाची चाहत नसणारा) सोकाजी

जेनी...'s picture

1 Nov 2012 - 9:41 pm | जेनी...

खरय नाना :) ,
अख्ख्या लेखात मी पैला च्या शोधते , मग तो सोकाजीनानानी ऑर्डर
केलाय का ते कन्फर्म कर्ते :)
आणि मग लेख वाचते ;)

आता कळलं नं :)
मला च्या ची किती चाहत हय ते ?? =))

अभ्या..'s picture

1 Nov 2012 - 11:57 pm | अभ्या..

सोकाजीनानांची मिशेश घरी चा बनवत नाइ

हेहेहे
तेच तर विशेश आहे पूजा

खूप छान. पण मुंबईची तुलना ती कशाला पुण्याशी ...... हा चावटपणा आहे टी आर पी खेचायचा ;)

सोत्रि's picture

1 Nov 2012 - 9:34 pm | सोत्रि

हा चावटपणा आहे टी आर पी खेचायचा

असहमत, हा समज म्हणजे अन्याय आहे चावडीवरच्या सर्व प्रभुतींवर. टी आर पी ची काळजी चावडीवर नसते.
तिथे फक्त आपल्या मताची पिंक परखडपणे टाकणार्‍या एक से एक इरसाल आणि खंग्री वल्ली येतात गप्पा मारायला.

- (टी.आर.पी. चा फुल्फॉर्मही माहिती नसलेला) सोकाजी

शुचि's picture

1 Nov 2012 - 9:50 pm | शुचि

हाहा. बरं.
टी आर पी चा फुलफॉर्म मलाही माहीत नाही :(

सूड's picture

2 Nov 2012 - 5:04 pm | सूड

तेच रटाळ प्रतिसाद ;)

सोकाजी नाना तुमचे घारु , नारु,चिंतोपंत , बुज्बळ काका हे सगळे त्यांच्या कार्टून चित्रांसहित
दिवाळी अंकात सामिल व्हावेत अशी इच्चा आहे . मग सोकाजीनानाना माझ्याकडू च्या पार्टी ;)

सोत्रि's picture

1 Nov 2012 - 9:38 pm | सोत्रि

धन्स गो पूजे!

आता ह्या वल्लींची अर्कचित्रे काढण्याची जबाबदारी जो घेईल त्याला माझ्याकडून च्या पार्टी.

-(पूजाची कल्पना आवडलेला) सोकाजी

अभ्या..'s picture

1 Nov 2012 - 9:48 pm | अभ्या..

नाना,
म्या उचालतो ह्यो इडा.
आधी लगीन तुमच्या कार्टूनांचं मंग........ (बघू सोताचं बी:))
पण ह्ये आस्लं पार्ट आफ टी पार्टी नाय चलेश.
जोरात काय तर इनाम लावा मंग बगा.

ताना
(येस्वंती दिसंना ग्येली ;))

अब्या , तुझच नाव घेणार होती मी ;)

:)

सोत्रि's picture

1 Nov 2012 - 10:04 pm | सोत्रि

नक्कीच, च्या पार्टीमधला 'च्या' काढून टाकतो मग तर झाले ? :D

- (पार्टीबाज) सोकाजी

अभ्या..'s picture

1 Nov 2012 - 10:19 pm | अभ्या..

तरी म्या मनतच होतो. सोकाजीनानाची पार्टी आन ती बी च्या ची?
येनार येनार तुमचे समदे नग येनार. दिवाळी अंकात जागा मागा लगीच ऊलूसी.
आन पूजे
तू तर घेच गं नाव माझं
पण आत्ता नगं. ;)

भुजबळांचे बुज्बळीकरण पाहून कळायचं बंद झालं!!!!

ज्यांनी ज्यांनी हा 'बस'डे साजरा केला त्यांना आज काय विषेश अनुभव आला हे जाणुन घेण्याची उस्तुकता आहे.
बाकी चावडीच्या गफ्फा नेहमी प्रमाणेच कुरकुरीत. :)

सखारामगटणे's picture

1 Nov 2012 - 9:36 pm | सखारामगटणे

Pune Bus Day

इरसाल's picture

2 Nov 2012 - 2:41 pm | इरसाल

सकाळवाल्यांच चुकलच म्हणायचं इ-सकाळ ऐवजी सकाळ-डे नाव असायला हवं होत.

ह भ प's picture

1 Nov 2012 - 10:28 pm | ह भ प

इच्छा असुनही प्रवास नाही करता आला.. शेवटी बाइक काढावीच लागली.. :-( पण एक फायदा झाला, बाईक चालवताना ट्राफिक जामचा त्रास नाही झाला..

अभ्या..'s picture

1 Nov 2012 - 11:55 pm | अभ्या..

नाइलाजास्तव बाईक डे

हायला काय तरी वेगळेच वाचल्यासारखे वाटले.
बरोबर आहे. स्पेस बरोबर आहे. ;)

मराठी रॉक्स बगा हो, काय त्या कोट्या आहाहाहा.........;)

ह भ प's picture

2 Nov 2012 - 12:34 pm | ह भ प

मी हसुन हसुन मरेश..

ह्म्म्म... चीन ने या आधीच या विषयावर पाउल उचलले आहे !
बस डे चा गवगवा होण्या आधीच ही बातमी माझ्या वाचनात आली होती...
१० ऑक्टोबर २०१२ ते ३० जुन २०१३ या कालावधीत साउथवेस्ट चायना मधे बस प्रवास अगदी चकटफू असणार आहे !
अधिक माहिती इथे :- SW China City Waives Bus Fares to Ease Traffic Woes
मजा आहे की नाही चायनीज प्रवासी लोकांची. ;) नाहीतर आम्ही रि़क्षावाल्यांचा माज आणि लुट दोन्ही सहन करतो ! कारण बस सेवा एकदम डब्बा क्वालिटी !
इतकच कशाला ? उत्सवाच्या काळात चीनी लोकांना टोल फ्री प्रवासाची सुविधा देखील मिळणार आहे.
Road tolls waived for national holidays
अन् आपल्याकडे सगळे टोळ भैरव बसलेत सामान्य जनतेला लुटायला ! टोल सुरु कधी झाला आणि संपणार कधी याचा काय बी पत्ता लागत नाय व्हो ! फक्स्त पावत्या फाडत बसत रहायच बस्स ! रस्ता / पुल बांधण्याचा खर्च किती आणि वसुली किती यांचा काय बी ताळमेळ नाय लागत ! कोन करणार आपल्या देशाला महासत्ता ? सगळे तर लुटाया बसले हायेत !
असो... मी माझा मौनमोहन सिंग मोड ऑन करावा म्हणतो ! ;)

सोत्रिअण्णा ते पार्टीत दुस्रं कैतरी मागवा की हो, दर्रोज चहा कायें म्हणोन? कधीतरी समस्त पात्रें हाटलांत नैतर कुणाच्या घरी खाताना दाखवा की हो :)

जेनी...'s picture

1 Nov 2012 - 11:05 pm | जेनी...

का?? कुणाच्या घरी का??

आपापल्या घरी जेवा म्हणावं :-/

च्या मिळतो ना चावडीवर फुक्कट ???

भागत नाय का तेवड्याव ?? :-/

का ओ पूजाज्जी मंदलि कुनच्य घरि जेव्लि तर तुल क बर पोतात दुख्तय आँ ?

मस्त आहे हो तुमची चावडी. उगा च्याव च्याव करत बरच मुद्द्याच बोलुन जाते.

५० फक्त's picture

2 Nov 2012 - 8:06 am | ५० फक्त

मस्त ओ सोत्रि, मजा आली.

सोत्रि साहेब, कथेतुन प्रबोधन एकदम मस्त.
मी जरी पक्का ठाणेकर असलो तरी पुण्यासाठी मनामध्ये विशेष प्रेम आहे म्हणुन बस डे बद्दल वाचुन नक्कीच आनंद झाला.

पुण्यासाठी मनामध्ये विशेष प्रेम आहे

कोण आपलं काय विशेष ;)

बॅटमॅन साहेब, अहो माझ पुण्यात घर आहे म्हणुन म्हटल तस.
मी महिन्यातुन ३ दिवस तरी पुण्यात असतोच असतो रहायला.
तसही पुण्यात माझे नातलगही खुप आहेत.

चावडीवरच्या गप्पा ऐकायला/वाचायला मजा येते..

अवांतर : त्या पुजाला एकदा बोलवा हो तुमच्या चावडीवर ... 'च्या' प्यायला :)

छान...सदर आवडले आहे ( ही फकत नोंद :) )

पैसा's picture

2 Nov 2012 - 5:49 pm | पैसा

नेहमीप्रमाणेच खमंग!