यांच्या चष्म्यातून - भाग ४ (अ) - काँग्रेसची फाळणी - हिंदूंवर उपकार

राजघराणं's picture
राजघराणं in जनातलं, मनातलं
5 Sep 2012 - 6:28 pm

त्यांच्या चष्म्यातून - भाग १. - कुरुंदकरांचा अकबर - http://www.misalpav.com/node/21602

त्यांच्या चष्म्यातून - भाग २. - मोरेंचा जिहाद - http://www.misalpav.com/node/21729

त्यांच्या चष्म्यातून - भाग ३ - जनतेचा प्यारा अश्फाक - http://www.misalpav.com/node/21758

*******************************************************************************************************

पूर्वपिठीका -

अश्फाक उल्ला खान : मात्रुभूमीच्या चरणांवर रक्त सांडून हसत फाशी जाणारा पहिला मुसलमान

त्याला हुसेन नावच्या ब्रिटिशांच्या नोकर पोलिसाने एक मिलियन डॉलर क्वेश्चन विचारला होता.

एक डाव रडीचा. धर्माच्या सौदेबाजीचा. हुसेन म्हणाला - " अश्फाक नीट विचार कर. तू एक मुसलमान आहेस. या देशात ७ करोड मुसलमान रहातात आणी २२ करोड हिंदू. गांधी लोकशाहीच्या बाता मारतो. या कफिर हिंदूंच्या नादी लागून तू ब्रिटिशांविरूद्ध लढतोयस. ...इंडीयातून ब्रिटीश निघून गेले तर ? २२ कोटी हिंदू लोकशाही मार्गानी हिंदू इंडीया बनवतील...."

अश्फाकने हुसेनच्या धार्मिक आवाहनाला भीक घातली नाही. पण ब्रिटिश इंडियातल्या मुस्लिमांपुढे तो मिलियन डॉलर क्वेश्चन आ वासून उभा होता.

इंडीयातून ब्रिटीश निघून गेले तर ? २२ कोटी हिंदू लोकशाही मार्गानी हिंदू इंडीया बनवतील...."

*******************************************************************************************************

यांच्या चष्म्यातून - भाग ४ - काँग्रेसची फाळणी - हिंदूंवर उपकार
(संदर्भ : काँग्रेस आणी गांधीजींनी अखंड भारत का नाकारला ? प्रा शेषराव मोरे , राजहंस प्रकाशन.)

*******************************************************************************************************

१५ ऑगस्ट १९४७ ला झालेल्या फाळणीला जवाबदार कोण ? हा प्रश्न गेली गेली ६५ वर्षे हिंदुस्थानी विचारवंतांना छळतो आहे. हिंदुत्ववादी अखंड हिंदुस्थानचा जप करत यासाठी गांधींच्या अहिंसक स्वभावाला जवाबदार ठरवतात. तर सेक्यूलर विचारवंत फाळणीसाठी संघाचा आक्रमक हिंदुत्ववाद आणी सावरकरांनी द्वीराष्ट्रवादाला दिलेली मान्यता या गोष्टी दोषपूर्ण मानतात.

प्रा शेषराव मोरेंनी त्यांच्या वास्तववादी चष्म्यातून तब्बल ३२० ग्रंथांचे पुरावे देत - फाळणीचे श्रेय कुणाला द्यायचे ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

सर सय्यदांनी प्रथम १८८७ साली द्विराष्ट्रवादाची तुतारी फुंकली होती त्यावेळी गांधिजी शाळकरी वयाचे होते आणी चार वर्षाचे सावरकर नुकतेच बोलायला शिकले होते. द्विराष्ट्रवादाच्या मागणीसाठी या दोन्ही लहानग्यांना जवाबदार ठरवणे हे बालिशपणाचेच ठरेल.

त्याआधी फाळणी आणी द्विराष्ट्रवाद या एकमेकांच्या संपूर्ण विरोधी मागण्या आहेत हे वास्तव समजवून घेतले पाहिजे.

फाळणी हे हिंदूच्या इतिहासातले एक सोनेरी पान होते आणी द्विराष्ट्रवाद हे हिंदूच्या गुलामिचे बायबल होते हेही समजून घ्यावे लागेल.

ज्यांना वाढ्त्या मुस्लिम लोकसंखेची चिंता आहे. बांग्लादेशींच्या घुसखोरी मुळे जे अस्वस्थ आहेत असे हिंदुत्ववादी..... अखंड भारतवादीही असतात... हा एक विनोदच आहे. अखंड भारतात बांग्लादेश तर येतोच पण पाकिस्तान सकट ची सर्व मुस्लिम लोकसंख्या ही येते. अखंड भारतातली मुस्लिम लोकसंख्या ४०% च्या आसपास जाते. आज १२% मुस्लिमांसमोर हतबल झालेले राजकीय हिंदू नेत्रुत्व अखंड भारतात शिल्लक तरी राहिल का?

सावरकर स्वतः पोथीवादी न्हवते. त्यांच्या अखंड भारताच्या पोथीला देव्हार्‍यात ठेवून पूजा करणारे कधी हिंदूच्या वास्तव परिस्थितीकडे डोळे उघडून बघतील काय ?

फाळणीमुळे अखंड भारताच्या धोक्यापासून हिंदूंचे रक्षण झाले. हे वास्तव समजून घेतले पाहिजे.

द्विराष्ट्रवादाची मागणी फाळणीसाठी न्हवतीच ती अखंड भारतासाठी होती. सर सय्यदांची द्विराष्ट्रवादी भुमिका एकदा समजली की फाळणीची अपरिहार्यता चटकन लक्षात यील.

मुस्लिम अल्पसंख्य आहेत. पण ती एक राज्यकर्ती जमात आहे. भारत स्वतंत्र झाला की लोकशाही आलीच. संख्येच्या बळावर हिंदू ही राज्यकर्ती जमात बनेल. डोक्याचे वजन न मोजता डोक्यांची फक्त संख्या मोजणारी भुक्कड लोकशाही सय्यद अहमदांना मान्य न्हवती. हिंदू आणी मुसलमान हे भारत नावाच्या वधूचे दोन सुंदर डोळे आहेत म्हणून राजकीय सत्तेचे वाटप दोन्ही डोळ्यांना समान झाले पाहिजे. आणी म्हणूनच सर्व सत्ताकेंद्रात (लोकसभा ते ग्रामपंचायत) ५० % राखीव जागा मुस्लिमांसाठी असल्या पाहिजेत असे सय्यदांचे म्हणणे होते. ३०% मुस्लिमांसाठी ५०% जागा आणी हिंदूच्या भावनेसाठी अखंड भारत. असा द्विराष्ट्रवादाच्या मागणीचा आशय आहे.

मोहनदास गांधी नावाच्या बनेल म्हातार्‍याने. द्विराष्ट्रवाद कधीच मान्य केला नाही. फाळणी मात्र देउन टाकली !

सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:!

(अर्थः सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली तर शहाणा माणूस अर्ध्याचा त्याग करतो आणी उरलेल्या अर्ध्या चा स्वीकार करतो ! )

हिंदू लोक शेतकरी. जमिनीला माता मानणारे. भूगोलावर त्यांचे लैच प्रेम. त्यांचा मनात अखंड भारतमाता घर करून बसली आहे. पण अखंड भारत म्हण़जे केवळ भुगोलांची बेरीज न्हवे. त्यात लोकसंख्येची बेरीज आहे. इतिहासाची वजाबाकी आहे आणी धर्माचा भागाकार आहे.

गंम्मत म्हणजे अखंड भारतवादी असलेले सावरकर बोलण्याच्या ओघात; हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरून म्हणाले होते - हिंदू आणी मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्रे आहेत.

परस्पर बंधुभाव आणी परराष्ट्राविषयी राग हे जर राष्ट्राचे प्रमुख गुणधर्म मानले तर राष्ट्र कोण आहेत ? हिंदू की मुसलमान ?

खरे पाहता हिंदू समाजात आणी धर्मात तुलनेने राष्ट्रवादी गोष्टी कमी आहेत. हिंदूधर्माची मूलभूत शिकवण - परधर्म सहिष्णुता विरुद्ध इस्लामी जिहाद आणी उम्मत( कुराणसिद्ध मुस्लिम बंधुभाव) विरुद्ध हिंदू ची जातिव्यवस्था. ही लढाईच विषम आहे. हिंदुंकडची एकमेव जमेची बाजू म्हणजे त्यांची लोकसंख्या. अखंड भारतात त्या एकमेव जमेच्या बाजूचे महत्व झपाट्याने कमी होणार होते.

फाळणी केवळ भूभागांची झाली नाही. फाळणी मुस्लिम लोकसंख्येची झाली. अन भारतातल्या मुस्लिमांचे सांख्यीकी महत्व झटकन उतरले.

पुढे सावरकरांनी एक व्यक्ती एक मत अशा खर्‍या लोकशाहीचा वारंवार पुरस्कार केला. मुस्लिमांची ५० % ची मागणी धुडकावून लावली. पण लोकसंख्येच्या प्रमाणात मुस्लिमांना राखिव मतदारसंघ देण्याची सावरकरांची तयारी होती. जर भारत अखंड राहिला असता तर...... आज मुस्लिमांना त्यांच्या आजच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किती टक्के राखिव मतदारसंघ (सावरकरांच्याच मते) द्यावे लागणार असते ? जवळ जवळ ४० %. इतर अल्पसंख्य आणी हिंदूतले फुटीर गट यांच्या सहाय्याने भारतात लोकशाही मार्गाने इस्लामी राजवट आली असती. आज जर पुन्हा अखंड भारत बनवला तर ते जगातले सर्वात मोठे मुस्लिम राष्ट्र बनेल.

गांधींनी हे ओळखले होते.

मुस्लिमांचे पायचाटे म्हणून गांधींना अहोरात्र शिव्या देणारे हिंदुत्ववादी लोकमान्य टिळकांना मात्र पूजतात. पण टिळकांचा लखनौ करार मात्र विसरतात. काय होता लखनौ करार ?

काँग्रेसच्या मुस्लिम लांगूलचालनाचा पाया टिळकांनी घातला आहे. तो म्हणजे लखनौ करार

(वास्तविक परिस्थिती अशी होती की तत्कालीन हिंदू समाजात लोकमान्य किंवा महात्मा व्हायचे असेल तर वाढीव परधर्म सहिष्णूपणा दाखवणे आवश्यकच होते. अन फाळणीही तत्कालीन राजकीय परिस्थित अपरिहार्य होती कशी ? सावरकरांनी लटका विरोध केला. डॉ. अंबेडकरांनी फाळणीचे उघड समर्थन केले. गांधींनी ती देउन टाकली. का ? ते पुढील भागात)

१) अलिगडचा लखनौ करार आणी देवबंदची सश्स्त्र क्रांती.

क्रमशः

आगामी : यांच्या चष्म्यातून - भाग ४ (ब) - काँग्रेसची फाळणी - हिंदूंवर उपकार

इतिहासविचार

प्रतिक्रिया

लेख पुन्हा वाचला जाईल...हा भाग फारच लहान वाटला,आपल्याकडुन अधिक अपेक्षा आहे.
महत्वपूर्ण + अभ्यासपूर्ण प्रतिसादांच्या प्रतिक्षेत आहे !

तर्री's picture

5 Sep 2012 - 6:49 pm | तर्री

जीना आणि टिळक ह्यांचे अत्यंत मैत्रीचे सम्बध होते. लखनऊ करार झाला तेंव्हा फाळणीची धूसाराही शक्यता नव्हती.

राजघराणं's picture

5 Sep 2012 - 6:55 pm | राजघराणं

जिनांना सुरवातीला फाळणी नकोच होती. त्यांना अखंड भारतातला द्विराष्ट्रवाद (लोकसंखेपेक्षा अधिक जागा) हव्या होत्या. पण असे अखंड हिंदुस्थान - टिळक अन जिनांचे हिंदुंसाठी घातक होते.

हा मुद्दा आहे. पुढच्या लेखांकात कव्हर होईलच

शैलेन्द्र's picture

5 Sep 2012 - 11:42 pm | शैलेन्द्र

" लखनऊ करार झाला तेंव्हा फाळणीची धूसाराही शक्यता नव्हती."

असं तुम्ही कोणत्या आधारावर म्हणता?

कुठलाही न्यून गंड बाळगू नका व प्रत्येक बाबतीत मतभेद व्यक्त करा.

शैलेन्द्र's picture

6 Sep 2012 - 10:19 am | शैलेन्द्र

:)
इतका सरळ प्रश्न जिव्हारी लागायच कारण काय?

माझ्या मते, फाळणीच नव्हे तर संपुर्ण हिंदोस्तान इस्लामी वर्चस्वाखाली आणण्याचा ब्रिटीश काळातील पहिला प्रयत्न, १८५७च्या बंडाबरोबरच घडला. या लढ्याशी संबंधीत ब्रिटीश रेकॉर्ड पाहीले तर त्याला पुष्टी मिळेल. त्यापासुन धडा घेत ब्रिटीशांनी जाणीवपुर्वक मुस्लीमांचे स्वत:वरील लक्ष हिंदुंवर स्थीर केले, मुस्लीम नैतृत्वानेही ब्रिटीशांशी लढत बसण्यापेक्षा ओंजळीत आपसुक गळुन पडणार्‍या फळावर मालकी प्रस्थापीत करण्याचा प्रयत्न केला.

फाळणी घडली ती गांधींनी किंवा काँग्रेसने मुस्लीमांचे लांगुल्चालन केल्यामुळे नाही तर, लखनवु कराराच्या पुढे जावुन मुस्लींमांना काही द्यायला काँग्रेसने नकार दीला म्हणुन..

एकंदर बघता, फाळणी घडली १९४७ ला, पण ज्याक्षणी खैबरखिंडीतुन आलेल्या आक्रमकांनी धर्मांतर करत वायव्येकडील एक एक भाग धार्मीक व सांस्कृतीक दॄष्ट्या अलग पाडत नेला, त्याक्षणीच तिची सुरवात झाली होती. आजची स्थीतीही शेवटची नाही, वरुन काश्मीर व पुर्वेकडुन आसाम, आज त्याच परीस्थीतीत आहेत ज्यात, १००० वर्षापुर्वी त्याकाळचा अफगाणीस्तान(गंधार) होता.

तर्री's picture

6 Sep 2012 - 12:54 pm | तर्री

जिव्हारी कसले काय ?
पण अश्या गोष्टी हे लेखकाचे इनफोर्मड ओपिनिओन असे समजून घ्या.
विदा - पुरावे ची हौस भारीच हो - पण समजून घेतल्यास बरे !

शैलेन्द्र's picture

6 Sep 2012 - 1:01 pm | शैलेन्द्र

:)

विदा आणी पुरावे नकोच आहेत, पण असे ओपीनियन का तयार झाले हे समजुन घ्यायला आवडल असत, कदाचीत तुमच्याकडची मिमांसा ऐकुन माझेही मत बदलेल.

अन्या दातार's picture

5 Sep 2012 - 7:06 pm | अन्या दातार

माफ करा, लेख गंडल्यासारखा वाटतोय.

सर सय्यदांनी प्रथम १८८७ साली द्विराष्ट्रवादाची तुतारी फुंकली होती त्यावेळी गांधिजी शाळकरी वयाचे होते आणी चार वर्षाचे सावरकर नुकतेच बोलायला शिकले होते. द्विराष्ट्रवादाच्या मागणीसाठी या दोन्ही लहानग्यांना जवाबदार ठरवणे हे बालिशपणाचेच ठरेल.

हे वाक्य कहर आहे. फाळणी झाली १९४७ ला. १८८७ ला गांधी व सावरकरांना द्विराष्ट्रवाद म्हणजे काय याची कल्पनाही नसेल. शिवाय जे लोक या दोघांना जबाबदार धरतात/मानतात, ते १९४७ च्या आधारावर, १८८७च्या नव्हे.

राजघराणं's picture

5 Sep 2012 - 7:11 pm | राजघराणं

गांधी किंवा सावरकर द्विराष्ट्रवादाचे जनक न्हवेत एवढेच म्हणायचे आहे.

प्रथम द्विराष्ट्रवाद कोणी मान्य केला हा नेहमीच्या चर्चेतला प्रश्न आहे.

पैसा's picture

5 Sep 2012 - 7:06 pm | पैसा

नेहमी ऐकत आलो त्याहून वेगळा दृष्टिकोन. तुमचं लेखन नेहमी विचार करायला लावतं. यावेळेला मात्र जरा जास्त वाट बघायला लागली.

प्रचेतस's picture

5 Sep 2012 - 7:08 pm | प्रचेतस

लेख उत्कंठावर्धक पण बराच त्रोटक आणि विस्कळीत वाटला. पुढच्या भागात अधिक स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे.

प्राध्यापक's picture

5 Sep 2012 - 7:33 pm | प्राध्यापक

सर सय्यदांनी प्रथम १८८७ साली द्विराष्ट्रवादाची तुतारी फुंकली होती त्यावेळी गांधिजी शाळकरी वयाचे होते आणी चार वर्षाचे सावरकर नुकतेच बोलायला शिकले होते. द्विराष्ट्रवादाच्या मागणीसाठी या दोन्ही लहानग्यांना जवाबदार ठरवणे हे बालिशपणाचेच ठरेल.
सहमत आहे,१८८७ ला जरी द्विराष्ट्रवादाच्या विचारांचे बिजारोपण झाले असले तरी हा आवाज त्या वेळेस अत्यंत क्षीण होता,खर्‍या अर्थाने १९०९ च्या मोर्ले-मिंटॉ कायद्यामुळे द्विराष्ट्रवाद फोफावला,शिवाय भारताच्या राष्ट्रीय राजकारणात गांधींचा उदय झाल्यानंतर जिनांचे महत्व हळुहळु कमी झालेले दिसते,त्यामुळेच स्वातंत्र्य चळवळीत ज्याचे नेत्रुत्व त्याच्याकडे स्वतंत्र भारताच्या राजकारणाची सुत्रे जाणार हे जवळपास स्पष्ट झालेले दिसते.म्हणुनच ज्या वेळी मोतीलाल नेहरुंच्या नेत्रुत्वाखाली सुधारणा कायद्याची रचना करण्या साठी सर्वपक्षीय कमीटी नेमण्यात आली,त्यात मुस्लीम लिग ने सहभाग घेउनही ज्या वेळी नेहरु रिपोर्ट जाहीर झाल्यानंतर मात्र लिग ने त्याला विरोध केलेला दिसतो.

अखंड भारताचा हट्ट कायम ठेवला असता तर अखंड भारताला संघराज्यात्मक लोकशाही स्विकारण्याच्या एवजी घटना समीतीत निम्मे प्रतीनिधित्व असणार्‍या लिग ने त्रिमंत्री योजनेसारखी किंवा वॅव्हेल योजनेसारखी गटाचे महत्व जास्त असणारी घटना स्विकारली असती,आणि यामुळे केंद्रसत्ता दुर्बळ होउन भारताची अनेक शकले झाली असती. आणी म्हणुनच आंबेडकरांनी अत्यंत सुज्ञपणे फाळणीला पाठींबा दिला.

खैबर खिंडीतून पहिले रानटी आक्रमण झाले

तेव्हा सावरकर गांधी या दोघांचे आजोबा शाळकरी वयाचे देखील नव्हते

किंबहुना ते जन्मलेही नव्हते

मन१'s picture

5 Sep 2012 - 8:13 pm | मन१

तुमचे लेख वस्तुनिष्ठ माहितीवर आधारित, कशावरही पुन्हा एकदा विचार करायला लावणारे असतात.
सध्या इतकेच.
अमक्या एकाच गोष्टीनं फाअळणी झाली हे पटत नाही.
अनेकानेक गोष्टींचा परिपाक, हजारो लाखो घटनांच्या प्रैणांची टोटल म्हणजे असे अचाट स्थित्यंतर.
हां, महत्वाचं योगदान कुणाचं, ह्यावर नक्कीच अभ्यास करता येइल.
मला इक्बाल सारख्यांनी फिरवलेली टोपी आणि दुर्बळ भासणारे हिंदु, आणि रानटी मुस्लिम मानसिकता* हे प्राथनिक ड्रायवर वाटतात. अर्थात्,अभ्यास म्हटला तर नगण्यच. पण ऐकिव माहितीवर असू शकते तितके हे मत.
रुमाल टाकतोय.

*सध्याच्या कुठल्याही भारतीय नागरिकाबद्दल त्याच्या वंश,धर्म्,जात ह्यावरून कसलीही तेढ मनात नाही. गैरसमज नसावा.

भडकमकर मास्तर's picture

5 Sep 2012 - 7:51 pm | भडकमकर मास्तर

वाचतोय...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

5 Sep 2012 - 8:29 pm | विश्वनाथ मेहेंदळे

पटकन पुढचा भाग टाका. वाट बघतो आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

5 Sep 2012 - 8:29 pm | विश्वनाथ मेहेंदळे

पटकन पुढचा भाग टाका. वाट बघतो आहे.

हिंदुत्ववादी लोकमान्य टिळकांना मात्र पूजतात हे ही विधान फारसे बरोबर नाही. हिंदुत्ववादी लोकमान्य टिळकांचा (गांधी च्या इतका ) तिटकारा (द्वेष नाही) करत नाहीत एवढेच.

हिंदू महासभा (विज्ञान व सावरकर वाद) व रा.स्व.संघ ( धर्म व संस्कृती वाद ) हया हिंदुत्ववाद्याच्या दोन प्रमुख शाखा तरी लोकमान्य टिळकांना पूजत नाहित. स्वा. सावरकरांना इंग्लंडला शिकायला पाठवण्यासाठी जी शिष्यवृत्ती मिळाली ती देण्यात लोकमान्य टिळकांचा वाटा होता म्हणून सावरकरांच्या मनात लोकमान्य टिळकांविषयी कृतज्ञता होती. पण ती वैचारिक नाही तर वैयक्तिक !

जर तर
तरीही टिळकांचे ( आजच्या हिशोबाने थोडे प्रतिगामी - रूढी प्रिय ) विचार पाहता त्यांनी गांधींचा मुस्लीम अनुनय सहन केला असता असे वाटत नाही. टिळक अजून जगते तर गांधीचा उदय व प्रस्थ कोंग्रेस मध्ये मर्यादित राहिले असते.

ब्राह्मण समाज हा जास्त करून हिंदुत्ववादी असल्याने व (अतीजातीयते मुळे / व्यक्ती पूजे )मुळे ब्राह्मण लोकमान्य टिळकांना पूजतात ही वस्तूस्थिती आहे. एवढा व असा टिळकांचा हिंदुत्व वादाशी सम्बंध आहे.

शिष्यवृत्ती मिळाली ती देण्यात लोकमान्य टिळकांचा वाटा होता म्हणून सावरकरांच्या मनात लोकमान्य टिळकांविषयी कृतज्ञता होती. पण ती वैचारिक नाही तर वैयक्तिक !

थोडे ह.घ्या. पणः मागचे संदर्भ लक्षात न घेता हे विधान वाचले तर वाटेल की सावरकर टिळकांचे क्लासेस घेत होते, अथवा वर्गात पुढच्या बेंचवर बसायचे, नाहीतर त्यांच्या मित्राचे चिरंजीव होते, म्हणून त्यांनी निव्वळ हुषारी सावरकरांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून श्यामजी कृष्ण वर्मांकडे तरफदारी केली. :-)

वास्तव थोडे वेगळे आहे. सावरकरांचे, नाशिकहून महाविद्यालयीन शिक्षणासाठी फर्ग्युसन महाविद्यालयात येण्याचे कारण केवळ शिक्षण इतकेच नव्हते तर टिळक आदींच्या संपर्कात येणे होते. स्वदेशी चळवळीत विदेशी कपड्यांची होळी करताना निव्वळ वैयक्तीक म्हणून ते टिळकांकडे गेले होते का?

टिळक गेले तेंव्हा सावरकर अंदमानात होते. त्यांनी त्यांच्या (त्यावेळच्या) आठवणी लिहीताना, "त्यांच्या मृत्युविषयी आत्मा तळमळू लागला..", असे म्हणले आहे. ती तळमळ व्यक्त करण्यासाठी म्हणून त्यांनी कारागृहातील ("आमच्या संस्थेतील") सर्व राजबंद्यांना कळवले आणि शोक व्यक्त करण्यासाठी उपवास करायचे ठरवले. पण असा उपवास, एका राजकीय व्यक्तीच्या अगदी निधनासाठी करणे म्हणजे पण राजद्रोह होता. म्हणून कारण न सांगता असा हरताळ केला गेला. तरी देखील पोलीसांचा जळफळाट झाला. मात्र पुढे त्यांनी म्हणले आहे, 'असे घडले यात आश्चर्य असे होते की नऊ वर्षांपुर्वी ज्या कारागृहात शेकडा एका व्यक्तीस देखील टिळक माहीत नव्हते तेथे हजारोंच्या संख्येने असलेल्या कैद्यांमधे टिळक निधनाची वार्ता दोन तासात पोचून उपवास करत, कारागृहातील कष्ट करत राष्ट्रीय दु:ख पाळणारे कैदी तयार झाले होते.' पण असे घडण्यासाठी सावरकरांना त्यांच्या बंदीवासातील सहकार्‍यांना टिळकांबद्दल नऊवर्षात सांगावेसे वाटायचे कारण केवळ व्यक्तीगत प्रेम/कृतज्ञता असेल असे वाटते का?

याचा अर्थ असा नाही की टिळकांचे सर्वच विचार सावरकरांना पटले असतील,पण केवळ शिष्यवृत्तीची कृतज्ञता सांभाळत टिळकांना त्यांनी स्मरणात ठेवले असे म्हणणे पटले नाही.

बाकी टिळकांना तेलातांबोळ्यांचे पुढारी म्हणत कारण ते तसे होते. त्यावर नंतर कधीतरी जमल्यास...

बॅटमॅन's picture

5 Sep 2012 - 8:36 pm | बॅटमॅन

हे पुस्तक आजच विकत आणलंय. पाहतो काय काय आहे :)

अप्रतिम's picture

5 Sep 2012 - 8:53 pm | अप्रतिम

नरहर कुरूंदकरांच्या जागर मध्ये अशाच प्रकारचे विचार वाचण्यात आले होते..आणि पटले होते...अखंड भारत असता तर बहुसंख्य हिंदुंनाच अल्पसंख्यसारखे रहावे लागले असते..

सुधीर१३७'s picture

5 Sep 2012 - 10:29 pm | सुधीर१३७

आज स्वतंत्र भारतात याहून काय वेगळी परिस्थिती आहे हिंदुंची??????

केवळ काही हिंदू सत्तेत आहेत आणि ते ही अर्धशिक्षित / अशिक्षित/ धर्मांध मुस्लिमांचे लांगूलचालन करून...........

नुकताच मुंबईत झालेला हिंसाचार व पोलिसांवरील ह्ल्ले काय दर्शवितात ? सत्तेतील किती लोक धर्मांध मुस्लिमांच्या ह्ल्ल्याविरुद्ध बोलले ?

कोळसा उगाळावा तितका.................................

जाऊ द्या....................... चालायचेच.............

गोंधळी's picture

5 Sep 2012 - 9:18 pm | गोंधळी

वाचतो आहे.

अर्धवटराव's picture

6 Sep 2012 - 1:07 am | अर्धवटराव

द्विराष्ट्रवादाची मूळ कल्पना कोणाची, फाळणीला कोण जवाबदार वगैरे मुद्दे चर्चावे तेव्हढे कमीच. लेखातल्या बर्‍याचश्या मुद्द्यांशी सहमत.
एक मात्र खरे कि पुढील १०० वर्षे तरी धर्माला राजकारणापासुन विलग करता येणार नाहि. राज्यकर्त्यांनी जनतेच्या हक्क आणि कर्तव्यांना हात घालताना धर्माधिष्टीत भेदभाव केला नाहि तरी ५०% लढाईच जींकली. आजघडीला आंतरराष्ट्रीय राजकारणात धर्माला अवास्तव महत्व आलं असताना भारत त्यापासुन विलग राहणे शक्य नाहि हे ही तेव्हढेच खरे. हिंदुंनी स्वधर्मप्रेम वगैरेच्या नादी न लागता कितीही मोकळी वाट धरतो म्हटलं तरी परधर्मीय त्याला सुखाने जगु देणार नाहि अशी रास्त शंका आहेच आहे.

अर्धवटराव

अत्रुप्त आत्मा's picture

6 Sep 2012 - 1:19 am | अत्रुप्त आत्मा

डॉ. फार बंरं केलत हो ,लिखमामा पुन्हा चालू करून...माझेही मोरेंच्या ग्रंथातले २ भाग झालेत वाचून,,,अता पुढचा भाग पण येऊं द्या काहि दिवसातच. :)

विकास's picture

6 Sep 2012 - 2:04 am | विकास

ओळख म्हणून लेख आवडला. वास्तवीक हे पुस्तक मुळातून वाचून टिपण्णी करायला आवडेल, ते शक्य नाही म्हणू वरील लेखात जे काही मुद्दे आले आहेत त्यावरच प्रतिसाद लिहीत आहे. जर गांधींजींनी आणि काँग्रेसने हिंदूहीताचा विचार करत फाळणी केली असे काही लेखकाला (शेषराव मोरे यांना) म्हणायचे असेल तर उद्या कोणी, "इंदीरांगांधींना ऑपरेशन ब्लू स्टार करायचे होते म्हणून भिन्द्रनवाले तयार केला" असा युक्तीवाद केला तर आश्चर्य वाटायला नको.

सर सय्यदांनी प्रथम १८८७ साली द्विराष्ट्रवादाची तुतारी फुंकली होती ...द्विराष्ट्रवादाची मागणी फाळणीसाठी न्हवतीच ती अखंड भारतासाठी होती.

द्विराष्ट्र हा विषय कायम चघळला जातो. म्हणून वरील वाक्यांशी सहमत असलो तरी थोडे अधिक लिहीत आहे. (हा आपल्या विधानांशी प्रतिवाद नाही!).

सर सय्यद अहम्मद यांचे १८८७ सालातले लखनौचे प्रसिद्ध भाषण हे उर्दू मधे होते. ते १८८८ साली अलाहाबादच्या पायोनियर प्रेस ने इंग्रजीत भाषांतरीत करून प्रसिद्ध केले. त्यात, उर्दूमध्ये जेथे जेथे त्यांनी समाज (कम्युनिटी) या अर्थाने "कौम" हा शब्द वापरला होता, त्याचे भाषांतर प्रत्येक ठिकाणी, "नेशन" असे केले. त्यात अजून एक लफडे म्हणजे नेशन ह्या शब्दाचा मराठी/हिंदीत/संस्कृत मध्ये "राष्ट्र" असा केला जातो, ज्याचा अर्थ पण बर्याचदा "देश" या संकल्पनेपेक्षा वेगळा असतो, पण तुर्तास ते बाजूस ठेवूयात.

आता हे लिहीत असताना सर सय्यद यांच्या भाषणाच्या बाजूने लिहीत नाही कारण त्यात "ते" विरुद्ध "आपण" अशीच भाषा आहे. पण नेशन हा श्ब्द नाही आणि त्या अर्थाने व्दिराष्ट्रवाद नाही. याचे त्यांच्या भाषणातील सुरवातीचे उदाहरण म्हणजे: "Although my own thoughts and desires are towards my own community, yet I shall discuss whether or not this agitation is useful for the country and for the other nations who live in it. " अजून एका ठिकाणी त्यांनी म्हणले आहे: "England and Scotland are a case in point. In the past many wars were waged between those countries, and many acts of bravery were done on both sides; but those times have gone, and they are now like one nation. But this is not the case with our country, which is peopled with different nations. Consider the Hindus alone. The Hindus of our Province, the Bengalis of the East, and the Mahrattas of the Deccan, do not form one nation." थोडक्यात जात-धर्म-भाषा-संकृती यांनी वेगळे झालेल्यांचे त्यांच्या लेखी राष्ट्र होते पण अशा सर्व राष्ट्रांचे एकत्रिकरण हे एका देशात होत होते. ते होताना समान वंश, रहाणीमान आणि समान भौगोलीक कक्षेतील इतिहास हे कारण असावे. पण तात्पर्य एकचः राष्ट्र आणि देश या संकल्पना समान न धरता भिन्न धरल्या गेल्या आहेत.

ज्यांना वाढ्त्या मुस्लिम लोकसंखेची चिंता आहे. बांग्लादेशींच्या घुसखोरी मुळे जे अस्वस्थ आहेत असे हिंदुत्ववादी..... अखंड भारतवादीही असतात... हा एक विनोदच आहे.

ते आजच्या वर्तमानातील भारतीय उपखंडाचा अखंड भारत व्हावा असे म्हणतात असे आपल्याला नक्की वाटते का? कारण मला तसे वाटत नाही. त्यांचा अखंड भारतवाद हा १९४७ सालासाठी असतो आणि त्याच्या मागेपुढे घेतलेल्या राजकीय निर्णय आणि निर्णयक्षमतेविषयी असतो. तो बरोबर का चूक हा येथे मुद्दा नाही, पण तुम्हाला जो विनोद म्हणायचा आहे, तो अस्तित्वात आहे असे मला वाटत नाही.

सावरकर स्वतः पोथीवादी न्हवते. त्यांच्या अखंड भारताच्या पोथीला देव्हार्यात ठेवून पूजा करणारे कधी हिंदूच्या वास्तव परिस्थितीकडे डोळे उघडून बघतील काय ?

सहमत

मोहनदास गांधी नावाच्या बनेल म्हातार्याने. द्विराष्ट्रवाद कधीच मान्य केला नाही. फाळणी मात्र देउन टाकली !

असहमत. वरील विधान वाचताना असे वाटू शकते की गांधीजी हे फक्त हिंदूंच्या बाजूने होते आणि त्यांना मुसलमान जनता नको होती. जे काही केले ते दूरगामी/स्ट्रॅटेजिक होते. पण वास्तव तसे होते असे इतिहासातली पाने चाळताना वाटत नाही. १९२० सालापासून (खिलाफत चळवळीपासून) गांधीजींची धोरणे. तेच १९२१ च्या मोपला दंगलीनंतर... १९४० नंतर विचार बदलला असेलही पण तरी हे काही फार स्ट्रॅटेजिकली कोणीच केले असे वाटत नाही, हिंदूंच्या हिताचा विचार करत केले असा निष्कर्ष काढणे अधिकच अवघड जाते. याचा अर्थ त्यांनी मुद्दामून हिंदूंच्या अहीताचा विचार केला असे अजिबात म्हणायचे नाही.

गंम्मत म्हणजे अखंड भारतवादी असलेले सावरकर बोलण्याच्या ओघात; हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरून म्हणाले होते - हिंदू आणी मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्रे आहेत.

त्यात गंमत काहीच नाही... वर याच प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे एकाच देशात असलेल्या दोन राष्ट्रांची संकल्पना यामधे आहे. चर्चा भरकटू शकेल म्हणून इतकेच येथे म्हणत आहे. :-)

पुढे सावरकरांनी एक व्यक्ती एक मत अशा खर्या लोकशाहीचा वारंवार पुरस्कार केला.

या संदर्भात आंबेडकरांनी त्यांच्या "पाकीस्तान ऑर दी पार्टीशन ऑफ इंडीया" मधे जे म्हणले आहे ते विचार करण्यासारखे आहे :

This alternative of Mr. Savarkar to Pakistan has about it a frankness, boldness and definiteness which distinguishes it from the irregularity, vagueness and indefiniteness which characterizes the Congress declarations about minority rights. Mr. Savarkar's scheme has at least the merit of telling the Muslims, thus far and no further. The Muslims know where they are with regard to the Hindu Maha Sabha. On the other hand, with the Congress the Musalmans find themselves nowhere because the Congress has been treating the Muslims and the minority question as a game in diplomacy, if not in duplicity.

त्याच बरोबर गांधीजींबद्दल याच पुस्तकात आंबेडकर म्हणतातः

This short historical sketch of the part Mr. Gandhi played in bringing about Hindu-Moslem unity may be concluded by a reference to the attitude of Mr. Gandhi in the negotiations about the Communal Settlement. He offered the Muslims a blank cheque. The blank cheque only served to exasperate the Muslims, as they interpreted it as an act of evasion. He opposed the separate electorates at the Round Table Conference. When they were given to the Muslims by the Communal Award, Mr. Gandhi and the Congress did not approve of them. But when it came to voting upon it, they took the strange attitude of neither approving it nor opposing it.

आता आंबेडकर म्हणतात म्हणून हे बरोबर असे म्हणू इच्छित नाही. तसेच ते काही सावरकरांच्या बाजूचे आणि गांधीजींच्या विरोधी होते असे देखील म्हणू इच्छित नाही. ते स्वतंत्र विचारवंत होते हे नक्की आणि त्यातूनच त्यांनी ते ज्या वर्तमानाचा हिस्सा होते त्याचे ऐतिहासीक विश्लेषण केले आहे.

म्हणून मला इतकेच म्हणायचे आहे की आपण दिलेल्या पुस्तक परीचयातून जे चित्र रंगवले गेले आहे ते इतिहासाबद्दलचा आफ्टरथॉट वाटते, असत्य म्हणून सांगायचा उद्देश जरी नसला तरी ऐतिहासीक सत्य वाटत नाही.

सावरकरांच्या अखंड भारताच्या पर्यायाबद्दल आंबेडकर काय म्हणतात ? विकास यांनी त्यातील सुरुवातीचा भाग दिलेला आहेच. कॊंग्रेसने जाहीर केलेल्या अल्पसंख्यांकांच्या हक्कांतील अनिश्चितता, संदिग्धता आणि अनियमितता यापेक्षा सावरकरांच्या हिंदुत्वाचा पर्याय निश्चितच अधिक उघड, धाडसी आणि निश्चित स्वरुपाचा असल्याबद्दल आंबेडकरांनी त्यांचे उपरोधात्मक कौतुक केले आहे. तथापि आंबेडकर पुढे लिहितात -

At the same time, it must be said that Mr. Savarkar's attitude is illogical, if not queer. Mr. Savarkar admits that the Muslims are a separate nation. He concedes that they have a right to cultural autonomy. He allows them to have a national flag. Yet he opposes the demand of the Muslim nation for a separate national home. If he claims a national home for the Hindu nation, how can he refuse the claim of the Muslim nation for a national home?

आंबेडकरांना सावरकरांचा पर्याय "विचित्र नसल्यास अतार्किक" वाटतो. कारण ते मुस्लिमांचे स्वतंत्र राष्ट्रीयत्व मान्य करतात. त्यांना सांस्कृतिक स्वायत्ततेचा आणि स्वतंत्र राष्ट्रध्वजाचा हक्कही बहाल करतात; परंतु त्यांना स्वतंत्र राष्ट्र-राज्य बनण्यास विरोध करतात. म्हणूनच आंबेडकर प्रश्न विचारतात, "जर ते (सावरकर) हिंदूंसाठी राष्ट्रीय भूमीचा दावा करत असतील, तर मुस्लिम राष्ट्राचा राष्ट्रीय भूमीचा दावा कसे नाकारु शकतात?"

It would not have been a matter of much concern if inconsistency was the only fault of Mr. Savarkar. But Mr. Savarkar in advocating his scheme is really creating a most dangerous situation for the safety and security of India. History records two ways as being open to a major nation to deal with a minor nation when they are citizens of the same country and are subject to the same constitution. One way is to destroy the nationality of the minor nation and to assimilate and absorb it into the major nation, so as to make one nation out of two. This is done by denying to the minor nation any right to language, religion or culture and by seeking to enforce upon it the language, religion and culture of the major nation. The other way is to divide the country and to allow the minor nation a separate, autonomous and sovereign existence, independent of the major nation. Both these ways were tried in Austria and Turkey, the second after the failure of the first.

आंबेडकरांच्या मते, सावरकरांच्या भूमिकेत केवळ विसंगतीचाच दोष आहे असे नाही, तर सावरकर भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक परिस्थिती निर्माण करत आहेत.

उर्वरित भाग इथे वाचता येईल ...

विकास's picture

7 Sep 2012 - 5:24 pm | विकास

म्हणूनच माझ्या प्रतिसादात मी पुढे, "तसेच ते काही सावरकरांच्या बाजूचे आणि गांधीजींच्या विरोधी होते असे देखील म्हणू इच्छित नाही." असे म्ह्णले आहे. सावरकर अथवा गांधीजी बरोबर का चूक हा देखील मुद्दा नव्हता. तसेच आंबेडकर म्हणाले म्हणजे बरोबरच असा देखील नाही. प्रत्येकात मतमतांतरे असू शकतात, आहेत आणि तेच योग्य देखील आहे - जीवंतपणाचे लक्षण आहे.

गांधीजींनी जाणिवेने फाळणीस पाठींबा दिला आणि त्यात हिंदूहीत होते या प्रमेयावर हे पुस्तक आहे असे वाटले. जे (प्रमेय) मला पटले नाही. केवळ त्या संदर्भात गांधीजी आणि काँग्रेस यांच्या निर्णय प्रक्रीया आणि उद्देशांबद्दल आंबेडकरांना काय वाटले ह्याचा संदर्भ दिला होता.

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Sep 2012 - 9:42 am | llपुण्याचे पेशवेll

थोडक्यात.
१. हिंदू जमातीकडे डोक्यांची संख्या खूप जास्त आहे पण डोक्याचा अभाव आहे.
२. मुसलमान हीच एकमेव जमात राज्य करण्याला लायक आहे
३. हिंदू केवळ शेतकरी म्हणूनच कामास यायचे.
४. हिंदूंच्या वृत्तीत भरलेला सहिष्णुता हा मोठा दोष असून (हिंदू समाजात लोकमान्य किंवा महात्मा व्हायचे असेल तर वाढीव परधर्म सहिष्णूपणा दाखवणे आवश्यकच होते) इस्लामी जिहाद आणी उम्मत हा एक उत्तम आणि घेण्यासारखा गुण आहे.
५. अखंड भारत हवा असेल तर नुसता बांग्लादेश आणि पाकीस्तानचा भूप्रदेश हस्तगत करून होणार नाही तर तिथला इस्लाम देखील संपवावा लागेल.

राजघराणं's picture

6 Sep 2012 - 12:08 pm | राजघराणं

कै च्या कै

पुप्याशी आणि राजघराण्याशी एकाचवेळी सहमत

क्लिंटन's picture

6 Sep 2012 - 1:53 pm | क्लिंटन

लेख आवडला.

सध्या पाकिस्तान आणि बांगलादेश असलेल्या प्रदेशात मुस्लिम बहुसंख्या झाल्यानंतर तो भाग भारतात राहणे कठिणच होते. म्हणजे एका अर्थी फाळणीची प्रक्रिया अनेक शतके आधीपासून सुरू झाली होती.पण त्यावेळी भारत हे एक "राष्ट्र" नसल्यामुळे फाळणीचा प्रश्न उभा राहिला नाही.

१९४७ मध्ये इंग्रज गेल्यानंतर भारताने यादवी युद्धाचा धोका पत्करूनही फाळणी टाळायला हवी होती असे म्हणणारे लोक असतात. पण ती गोष्ट प्रत्यक्ष करण्यापेक्षा बोलणेच सोपे होते. शेषराव मोरे यांचा त्यांच्या पुस्तकावर लोकसत्ता मध्ये एक लेख वाचला होता. त्यात ते म्हणतात की अखंड भारत म्हणजे केवळ भूप्रदेशांची बेरीज नाही तर त्यात तिथे राहणारे लोकही आले. १९४७ मध्येही पाकिस्तानात गेलेल्या प्रदेशांमधील मुस्लिम लोकसंख्या १०+ कोटी होतीच. इतक्या मोठ्या लोकसमूहाला त्यांच्या इच्छेविरूध्द आपण भारतात कसे एकत्र ठेवणार होतो?बलाढ्य अमेरिकेला लष्करी सामर्थ्याच्या जोरावर इराकी लोकांना त्यांच्या इच्छेविरूध्द ताब्यात ठेवता आले नाही आणि तितक्याच बलाढ्य रशियन सैन्याची प्रथम अफगाणिस्तानात आणि नंतर चेचेन्यात ससेहोलपट झाली यावरून कोणत्याही लोकसमूहाला त्यांच्या इच्छेविरूध्द नियंत्रणात ठेवता येत नाही ही गोष्ट स्पष्ट होईल.

अगदी काही करून आपण १९४७ मध्ये फाळणी टाळली असतीच तर ती नंतरच्या काळात झालीच असती. आणि मधल्या काळात नक्की काय झाले असते याची कल्पना करवते का?आज काहीही म्हटले तरी भारत आणि पाकिस्तान दरम्यान एक सीमा आहे त्यामुळे तिकडल्या नको असलेल्या तत्वांचा भारतात १००% मुक्त संचार नाही (जे काही घुसखोर येतात त्यांना लपतछपत किंवा काही क्लुप्त्या लढवतच यावे लागते). ती सीमाच जर का नसती तर नक्की काय झाले असते याची कल्पनाच करवत नाही. आज अफगाणिस्तानात अमेरिकेचे सैन्य आहे आणि अमेरिकेकडून डॉलर उकळायला आपले सरकार आणि सैन्य आपल्याच लोकांना मारत आहे (स्वात खोरे आणि अफगाणिस्तान सीमेनजीकचा भाग) या कारणामुळे आत्मघाती हल्लेखोर आपल्याच देशबांधवांना ठार मारायला मागेपुढे बघत नाहीत ही सत्य परिस्थिती आहे. ते मुळात आपल्याला "आपले" समजतच नसतील तर असे किती हल्ले "अखंड" भारतात झाले असते?आणि मग त्याला बहुसंख्यांकांचे प्रत्युत्तर मिळाले असते. यादवी युध्द म्हणतात हे यापेक्षा वेगळे असते का? अनेकांना वाटते की यादवी युध्द म्हणजे एक घाव आणि दोन तुकडे अशी परिस्थिती आणि जे काही व्हायचे ते एकदाच झाले असते.पण सत्य परिस्थिती आहे की ते यादवी युध्द भारताची फाळणी होईपर्यंत चालूच राहिले असते.

तेव्हा १९४७ मध्ये पाकिस्तानात आपला कमितकमी भाग जाईल हे बघणे हे सोडून आपल्या हातात फारसे काही होते असे वाटत नाही. त्यातही पाकिस्तानात पूर्ण पंजाब आणि बंगालचा समावेश होईल अशी मुस्लिम लीगच्या नेत्यांची अपेक्षा होती.पण काँग्रेसने खमकेपणाने या दोन प्रांतांमधील हिंदुबहुल भाग भारतात ठेऊन घेतला. इतकेच नव्हे तर थोडा मुस्लिमबहुल असलेला गुरदासपूर जिल्हा (शक्करगढ तालुका वगळता) पण भारतात ठेवला आणि काश्मीरात जाणारा खुष्कीचा मार्ग भारतातच राहिल हे बघितले. गुरदासपूर भारतात ठेवल्याबद्दल आजही नेहरू-रॅडक्लिफ आणि माऊंटबॅटन यांच्याविरूध्द पाकिस्तानी लेखकांच्या पुस्तकांमध्ये/लेखांमध्ये राग व्यक्त केलेला असतो. जो काही पाकिस्तान मिळाला त्यालाही नंतरच्या काळात "Moth eaten Pakistan " असेच म्हटले गेले होते.

आता यापुढे आसामात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही आणि अजून एक फाळणी होणार नाही यासाठी मात्र आपण पाहिजे ती पावले उचललीच पाहिजेत.

तेव्हा खरोखरच जे काही झाले ते एका अर्थी चांगलेच झाले.आणि त्यासाठी गांधी-नेहरूंना दोष न देता त्याचे श्रेय द्यायला पाहिजे असे मलाही वाटते.

शैलेन्द्र's picture

6 Sep 2012 - 2:25 pm | शैलेन्द्र

+१,

मलाही नक्की हेच म्हणायचे होते.

+२
क्लिँटनशी सहमत

पुभाप्र

इष्टुर फाकडा's picture

6 Sep 2012 - 2:45 pm | इष्टुर फाकडा

आज अफगाणिस्तानात अमेरिकेचे सैन्य आहे आणि अमेरिकेकडून डॉलर उकळायला आपले सरकार आणि सैन्य आपल्याच लोकांना मारत आहे (स्वात खोरे आणि अफगाणिस्तान सीमेनजीकचा भाग) या कारणामुळे आत्मघाती हल्लेखोर आपल्याच देशबांधवांना ठार मारायला मागेपुढे बघत नाहीत ही सत्य परिस्थिती आहे.

नक्की काय म्हणायचे सांगाल काय?

क्लिंटन's picture

6 Sep 2012 - 3:35 pm | क्लिंटन

नक्की काय म्हणायचे सांगाल काय?

हे पाकिस्तानला लागू होते. पाकिस्तानच्या सरकारने अमेरिकेकडून डॉलर उकळायला स्वात खोरे आणि अफगाणिस्तानच्या सीमेजवळच्या प्रदेशात लष्करी कारवाई केली आणि त्यात पाकिस्तानी लोकांचाच बळी गेला. त्याविरूध्द तिथे असंतोष आहे आणि म्हणूनच पाकिस्तानी आत्मघाती हल्लेखोरांनी लाहोर/पेशावर/रावळपिंडी/कराची इत्यादी अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणले आहेत आणि शेवटी पाकिस्तान्यांचाच त्यात बळी गेला आहे/जात आहे हे तुम्हालाही माहित आहेच.

अप्पा जोगळेकर's picture

8 Sep 2012 - 1:24 pm | अप्पा जोगळेकर

सविस्तर प्रतिसाद आवडला.

पण काँग्रेसने खमकेपणाने या दोन प्रांतांमधील हिंदुबहुल भाग भारतात ठेऊन घेतला. इतकेच नव्हे तर थोडा मुस्लिमबहुल असलेला गुरदासपूर जिल्हा (शक्करगढ तालुका वगळता) पण भारतात ठेवला आणि काश्मीरात जाणारा खुष्कीचा मार्ग भारतातच राहिल हे बघितले.
असे जर होते तर मुस्लिम बहुसंख्य असणारे काश्मीर हरिसिंगाकडून ताब्यात घेण्याचा अट्टहास करुन आणि त्यासाठी भारतीय सैनिकांचे रक्त सांडून काँग्रेजी लोकांनी काय मिळवले ?
जिथे मुस्लिम बहुसंख्य असतात तो भाग मग तो कोणत्याही देशात का असेना मुस्लिम धर्माप्रमाणेच होउन जातो हे मात्र खरे.

क्लिंटन's picture

8 Sep 2012 - 6:18 pm | क्लिंटन

असे जर होते तर मुस्लिम बहुसंख्य असणारे काश्मीर हरिसिंगाकडून ताब्यात घेण्याचा अट्टहास करुन आणि त्यासाठी भारतीय सैनिकांचे रक्त सांडून काँग्रेजी लोकांनी काय मिळवले ?

कमाल आहे.जर आज काश्मीर पाकिस्तानला देऊन टाका असे म्हटले तर (माझ्यासकट) इथले अर्ध्याहून जास्त लोक खवळून उठतील आणि अशी मागणी करत असलेल्यावर तुटून पडतील असे वाटत असतानाच हे मत कुठून आले?

असो. जगमोहन यांच्या My frozen turbulence in Kashmir या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे की काश्मीरातील असंतोष वरवरचा होता.जर काश्मीरी युवकांना योग्य रोजगाराच्या संधी दिल्या गेल्या असत्या तर ते सोडून धर्माच्या नावावर चिथावले जाण्याइतके काश्मीरी युवक माथेफिरू नव्हते.पण काश्मीरातील राज्यकर्त्यांनी आपला स्वार्थ साधायचे काम केले-- भ्रष्टाचारातून आपले खिसे तर भरलेच पण सत्तेबाहेर असताना स्वतःच या फुटिर तत्वांना फूस लावली. १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी दंगलींच्या आगींमध्ये पंजाब आणि उत्तर भारताचा मोठा भाग होरपळत होता, अगदी जम्मूमध्ये दंगली झाल्या तरीही काश्मीर खोरे मात्र शांतच राहिले.इतकेच नव्हे तर स्वातंत्र्योत्तर काळात देशात इतर ठिकाणी धर्मावरून मोठ्या दंगली झाल्या तरी काश्मीर खोरे मात्र त्यापासून दूर राहिले.काश्मीरात सुफी संप्रदायाचा मोठा प्रभाव आहे म्हणून कदाचित असेल. या सगळ्या गोष्टींना पुण्यातील सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेन्ट मध्ये प्राध्यापक असलेल्या (आणि लष्करातून मेजर म्हणून निवृत्त झालेल्या) आणि मला गुरूस्थानी असलेल्या एका मुळातल्या काश्मीरी व्यक्तीने दुजोरा दिला आहे.

तेव्हा माझ्या मते काश्मीर खोरे आणि इतर भारतातील परिस्थिती वेगळी होती. याविषयी अधिक लिहायची काळे काकांना विनंती करतो.

अप्पा जोगळेकर's picture

8 Sep 2012 - 10:42 pm | अप्पा जोगळेकर

फुटीर तत्वांना फूस लावली याचा अर्थ काय ? एखाद्याला चिथावणी दिली गेली म्हणून त्याने दंगल केली असे म्हटले म्हणजे तो दंगलखोर निर्दोष कसा ठरतो ?

इतकेच नव्हे तर स्वातंत्र्योत्तर काळात देशात इतर ठिकाणी धर्मावरून मोठ्या दंगली झाल्या तरी काश्मीर खोरे मात्र त्यापासून दूर राहिले.काश्मीरात सुफी संप्रदायाचा मोठा प्रभाव आहे म्हणून कदाचित असेल.
सूफी संप्रदायाचा शांततावादाशी काहीएक संबंध नाही तो एक भ्रम आहे असे नुकतेच 'विजयनगर' संबंधित धाग्यावर कोणीतरी संदर्भासहित दाखवून दिले आहेच.

काश्मीरातील असंतोष वरवरचा होता.
म्हणजे काय ?

जर काश्मीरी युवकांना योग्य रोजगाराच्या संधी दिल्या गेल्या असत्या तर ते सोडून धर्माच्या नावावर चिथावले जाण्याइतके काश्मीरी युवक माथेफिरू नव्हते.
ह्यात वेगळे काय सांगितले ? ज्यांच्याकडे रोजगार असतो असे लोक दंगली करत नाहीत (फारतर धागे काढतात) हे सर्वसाधारण सत्य आहेच. त्याचा आधार घेउन मुळात काश्मीरी युवक माथेफिरु नव्हतेच असे म्हणण्यात काय हंशील आहे ?
मुसलमान धर्म अनुयायी जुनाट कल्पना घेऊन आधुनिक काळात वावरतात. अशी माणसे असलेला भूप्रदेश देशातून त्या प्रदेशातल्या माणसांसकट आपल्या देशातून वजा व्हावा अशी इच्छा असण्यात गैर काय आहे ते मला कळत नाही.

नाठाळाला नाठाळ म्हणायला इतके का घाबरायचे ते मला कळत नाही.

क्लिंटन's picture

8 Sep 2012 - 11:20 pm | क्लिंटन

इतकेच नव्हे तर स्वातंत्र्योत्तर काळात देशात इतर ठिकाणी धर्मावरून मोठ्या दंगली झाल्या तरी काश्मीर खोरे मात्र त्यापासून दूर राहिले.काश्मीरात सुफी संप्रदायाचा मोठा प्रभाव आहे म्हणून कदाचित असेल.

सूफी संप्रदायाचा शांततावादाशी काहीएक संबंध नाही तो एक भ्रम आहे असे नुकतेच 'विजयनगर' संबंधित धाग्यावर जयंत कुलकर्णी किंवा मन१ यांच्यापैकी कोणीतरी संदर्भासहित दाखवून दिले आहेच.

बरं सुफींचा शांततावादाशी काहीही संबंध नाही हा तुमचा मुद्दा क्षणभर मान्य केला तरी काश्मीर खोरे दंगलींपासून दूर राहिले याविषयी तुमचे काय म्हणणे आहे?आज जम्मू विभाग हा हिंदू बहुसंख्य असलेला प्रदेश आहे. सर्वसाधारपणे असा समज असतो की १९४७ मध्येही जम्मूमध्ये हिंदूंचीच बहुसंख्या होती. पण वस्तुस्थिती अशी आहे की १९४७ मध्ये जम्मूमध्ये एकूण लोकसंख्येच्या ६१% मुस्लिम होते. जम्मूमधल्या हिंदू-शीखांनी भरपूर टगेगिरी दाखवून अन्य धर्मीयांच्या कत्तली केल्या आणि नंतरच्या काळात जम्मू हा हिंदू बहुसंख्येचा प्रदेश बनला. महात्मा गांधींनीही जम्मूमधल्या कत्तलींना इतर ठिकाणांमधील कत्तलीइतकी प्रसिध्दी मिळाली नाही असे म्ह्टले होते. एकाच संस्थानाचा भाग असलेल्या जम्मूमध्ये इतके होऊनही आणि काश्मीर खोऱ्यात हिंदू अत्यल्पमतात असूनही काश्मीर खोरे दंगलीपासून मुक्त राहत असेल तर मुळातल्या काश्मीरियतमध्ये हिंसाचार नाही असे म्हटले तर त्यात काय चुकले?

एखाद्याला चिथावणी दिली गेली म्हणून त्याने दंगल केली असे म्हटले म्हणजे तो दंगलखोर निर्दोष कसा ठरतो ?

दंगलखोर निर्दोष होता असे मी कुठे म्हटले आहे?तो निर्दोष नाहीच पण दंगल करणे हा त्याचा मुळातला स्वभाव नव्हता पण तो चिथावला गेल्यामुळे डोके भडकून हिंसेला उतरला असे म्हटले तर त्यात काय चुकले?

काश्मीरातील असंतोष वरवरचा होता.

म्हणजे काय ?

हे मी जगमोहन यांच्या My Frozen Turbulence In Kashmir या पुस्तकात पान क्रमांक १६३-१६४ वर वाचले आहे.ते मी इथे जसेच्या तसे देतो. जम्मू-काश्मीर विधानसभेतील अपक्ष आमदार मीर मुस्तफा म्हणतो:

"During Governor's rule, the state didn't take an extra paisa from the Centre and yet schools, roads, hospitals, drinking water were made available, and justice was on the roadside. Within a few months, the Governor had shown results. What became apparent during the Jagmohan period was that, given an atmosphere of an efficient and people-oriented administration, the Valley's fundamentalism is only skin-deep. The people's demand then was not for Nizam-e-Mustafa or for Pakistan, but for jobs, more representation in Central Government and fair recruitment policies"

शक्यता आहे की जगमोहन त्यांच्या पुस्तकात त्यांच्याविषयीची चांगलीच मते देतील.पण १९९० मध्ये काश्मीरातून परागंदा झालेले किमान दोन मित्र माझ्या कॉलेजात होते (आमच्या कॉलेजात काश्मीरी निर्वासितांसाठी प्रत्येक स्ट्रीमम्ध्ये एक जागा राखीव होती). त्यांच्या बोलण्यातून काश्मीरी पंडितांना जगमोहन यांच्याविषयी बराच आदर आहे असे जाणवते.माझे सॅम्पल फार मोठे नाही पण ते त्या दु:खाला स्वतः सामोरे गेलेल्यांचे अनुभव आहेत.

ज्यांच्याकडे रोजगार असतो असे लोक दंगली करत नाहीत (फारतर धागे काढतात) हे सर्वसाधारण सत्य आहेच.

म्हणजे ओसामा बिन लादेन हा रोजगार नसलेला हताश तरूण होता असे म्हणायचे आहे का तुम्हाला?स्वतः कोट्याधीश असूनही तो जगातला सगळ्यात वॉन्टेड दहशतवादी होताच ना?डॅनिअल पर्लची गळा चिरून हत्या झाली त्याचा आरोपी होता ओमार शेख. तो एकेकाळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी होता असे वाचल्याचे आठवते. त्या संस्थेची फी लक्षात घेता तिथे विद्यार्थी असायला भरपूर पैसे त्याच्या गाठी असलेच पाहिजे असे म्हणायला नक्कीच वाव आहे. असे इतर अनेकांविषयी लिहिता येईल. तेव्हा दहशतवादी होण्यासाठी रोजगार असण्या/नसण्यापेक्षा तसा मुळातला स्वभाव असणे हा अधिक मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे.आणि इतिहास दाखवितो की काश्मीरी समाजाचा तो मुळातला स्वभाव नव्हता.

मुसलमान धर्म टाकाऊ आहे. खुळ्या धर्माच्या खुळ्या कल्पना घेऊन आधुनिक काळात ते वावरतात. अशी माणसे असलेला भूप्रदेश देशातून त्या प्रदेशातल्या माणसांसकट आपल्या देशातून वजा व्हावा अशी इच्छा असण्यात गैर काय आहे ते मला कळत नाही.

धर्म या भानगडीविषयी मला काही लिहायचे नाही आणि तो माझा इंटरेस्टही नाही.तरी जाताजाता एक सांगतो. नुकतेच इमरान खानचे Pakistan:A personal history हे पुस्तक वाचनात आले.त्यात त्याने अनेक मुद्द्यांबरोबरच इस्लामविषयीही लिहिले आहे. हे पुस्तक वाचल्यावर माझ्या लक्षात आले की त्या पुस्तकातील काही प्रकरणांमध्ये पाकिस्तान ऐवजी भारत असे आणि मुस्लिम/इस्लाम ऐवजी हिंदू/हिंदुत्व असे वाचले तर ती प्रकरणे म्हणजे भारतातल्या एखाद्या उजव्या गटाच्या हिंदुत्ववादी नेत्याने लिहिलेल्या एखाद्या पुस्तकाचा भाग वाटतील. तेव्हा काय टाकाऊ आहे आणि काय वजा करायला हवे याविषयी मला काही लिहायचे नाही. पण एक गोष्ट नक्कीच सांगतो की आपल्याकडे मुळातला हिंदू धर्म किती चांगला आणि नंतर मुस्लिम/इंग्रज आक्रमणांमुळे सगळे बदलले आणि मुळातल्या हिंदू धर्माकडे परत जायला हवे असे म्हणणारे लोक असतात त्याचप्रमाणे मुळातला इस्लाम किती चांगला आणि नंतर मंगोल/इंग्रज आक्रमणामुळे सगळे बदलले आणि मुळातल्या इस्लामकडे परत जायला हवे असे म्हणणारे लोक तिकडेही असतात.तेव्हा काय टाकाऊ आणि काय टिकाऊ हे पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष झाले. याविषयी अधिक मी इमरान खानच्या पुस्तकाचे परिक्षण लिहेन तेव्हा.

अप्पा जोगळेकर's picture

9 Sep 2012 - 9:24 am | अप्पा जोगळेकर

मूळ धाग्यापासून विषय भरकटत आहे. खरडवहीत उत्तर देत आहे.

लेख आणि प्रतिक्रिया एका दमात वाचून काढल्या खूप रोचक माहिती मिळाली .

पण तरीही यामध्ये अनेकदा उल्लेख आलेला व कायमच वाचनात येत असलेला
तो "द्विराष्ट्रवादाचा " सिद्धांत नेमका काय होता याची व्याख्या व आशय आणि त्याचे फायदे किंवा तोटे
काय होते यावर आपण जाणकार विस्तृत पणे प्रकाश टाकाल का ?

तर्री's picture

6 Sep 2012 - 2:33 pm | तर्री

(क्लिंटन यांच्या अभ्यासाचा आदर राखून )
१. जर गांधी नसते तर भारत अखंड राहिला असता.
२. जर गांधी नसते तर नेहरू कदापि पंतप्रधान झाले नसते. सरदार पटेल / सुभाष बाबू पंतप्रधान होते तर ? हा विचार ही एकदा करा. आज आपण जे भिकेचे डोहाळे आपल्याला लागले आहेत ते नक्की लागले नसते.
३. मग हिदू - मुस्लीम एकत्र सहज राहिले असते.
४. मुस्लिमांचा केवळ मतांसाठी अनुनय आणि त्यामुळे त्या समाजाला कायद्याचे अभय ही प्रक्रिया केवळ नेहरू - गांधी मुळे सुरु आहे. ही त्याम्चीच देणगी आहे.
५. जर सरदार पटेल / राजाजी प्रधानमंत्री झाले असते तर आज भारत - अखंड अथवा विभक्त अधिक सक्षम झाला असता. आपला राष्ट्र म्हणून दिसणारा "नेभळटपणा" हे केवळ आणि केवळ गांधी वादाचे फलित आहे.
६. विचार करून भयगंड निर्माण करणारे हया समजात खूप आहेत.
७. घाबरवले नाही तर ह्यांचे विचार ऐकणार कोण ?
८. फाळणी चे समर्थक फक्त भारतात आणि भारत्तात असु शकतात.
९. जगातला कोणताही इतर देश हे विचार सहन करणार नाही.
१०. जर तर च्या गोष्टीतून "फाळणीचे " समर्थन करणारे उद्या काश्मीर ही घ्या पण आम्हाला सुखात राहू द्या म्हणतील.
११. देवा ह्यांच्या पासून देशाला वाचव . शत्रूशी सामना करायला आपले सैन्य आहे. पण हया अती विचारवंताना कोण आवरणार ?

क्लिंटन's picture

6 Sep 2012 - 3:47 pm | क्लिंटन

हे कसे आहे की यात अनेक गोष्टी मुळातच गृहित धरल्या गेल्या आहेत. म्हणजे गांधी-नेहरू नेभळटच होते.त्यांच्यामुळे देशाचे नुकसानच झाले.आणि इतर त्यांच्याऐवजी इतर कोणी नेता असता तर सरकार "कणखरपणे" वागले असते इत्यादी इत्यादी. महात्मा गांधींनी राष्ट्रपिता म्हटले सुभाषचंद्र बोसांनी आणि वल्लभभाई पटेल नेहरूंच्याच मंत्रीमंडळात त्यांच्या मृत्यूपर्यंत मंत्री होते (जर नेहरू इतके नेभळट होते असे त्यांना वाटत होते तर पटेलांनी राजीनामा का दिला नाही?) या गोष्टींकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करायचे आणि तरीही गांधी-नेहरू नेभळट आणि बोस-पटेल मोठे कणखर!!

या असल्या एका विचारसरणीच्या लोकांच्या अपप्रचाराला उत्तरे द्यायला माझ्याकडे वेळ तर नाहीच आणि इच्छा तर त्याहून नाही.या असल्या लोकांमध्येच मी लहानाचा मोठा झालो आहे तेव्हा यांचा गोबेल्सियन प्रचार मला पूर्णपणे माहित आहे. आणि म्हणूनच म्हणतो: देवा ह्यांच्यापासून देशाला वाचव. शत्रूशी सामना करायला आपले सैन्य आहे पण गोबेल्सियन प्रचार करून बुध्दीभेद करणार्यांना कोण आवरणार?

तर्री's picture

6 Sep 2012 - 4:16 pm | तर्री

गांधी नेभळट ?पक्का कणखर माणूस. पण त्यांच्या कणखर पणाचा फायदा भारता ऐवजी पाकिस्तान ला झाला.
नेहरूंच्या मंत्री-मंडळात पटेल होते म्हणून संस्थाने व्यवस्थित विलीन झाली. नाही तर निझामाने नाकावर टिच्चून "आखातातून " मदत घेतली होती. पटेलांनी हा प्रश्न अत्यंत धूर्त पणे / कणखर पणे हाताळला.नेहरू- पटेल संबंध अत्यंत विकोपाला गेले होते. त्यांनी राजीनामा दिला नाही एवढेच.

आपला वेळ व इच्छा नाही. तथास्तु.

क्लिंटन's picture

7 Sep 2012 - 10:44 am | क्लिंटन

नेहरू- पटेल संबंध अत्यंत विकोपाला गेले होते. त्यांनी राजीनामा दिला नाही एवढेच.

एकूणच काय तर नेहरू नेभळट होते असे पटेलांना वाटत होते असे (प्रत्यक्ष पटेलांना तसे वाटत नसले तरी) इथल्या अनेकांना कसे काय वाटते याचेच आश्चर्य वाटते.

आदिजोशी's picture

2 Feb 2016 - 2:59 pm | आदिजोशी

(जर नेहरू इतके नेभळट होते असे त्यांना वाटत होते तर पटेलांनी राजीनामा का दिला नाही?)

पटेल देशप्रेमामुळे राजकारणात होते, नेहरूंवरील प्रेमामुळे नाही. त्यामुळे नेहरू कसेही वागले तरी पटेलांनी राजिनामा आपले काम सुरूच ठेवले. अशी उदाहरणं आपल्याला आत्ताच्या आयुष्यातही अनेक ठिकाणी दिसतातच की.

त.टि.: हे फक्त ह्या वाक्यावर प्रदर्शीत केलेले मत आहे. माझा इतिहासाचा इतका अभ्यास नसल्याने इतर ठिकाणी पास.

गॅरी ट्रुमन's picture

2 Feb 2016 - 7:36 pm | गॅरी ट्रुमन

पटेल देशप्रेमामुळे राजकारणात होते, नेहरूंवरील प्रेमामुळे नाही. त्यामुळे नेहरू कसेही वागले तरी पटेलांनी राजिनामा आपले काम सुरूच ठेवले.

३० जानेवारी १९४८ रोजी गांधींजींची हत्या झाली त्याच्या तास-दीडतास आधी पटेल गांधीजींना भेटायला गेले होते आणि त्यांनी राजीनामा द्यायची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी गांधीजींच्या सांगण्यावरून पटेलांनी राजीनामा द्यायचा निर्णय रद्द केला होता (संदर्भ: थॉमस पेन यांनी लिहिलेले गांधीजींचे चरित्र). तेव्हा सांगायचा उद्देश हा की पटेलांच्या मनात राजीनामा द्यायचे विचार येत नव्हते असे नक्कीच नाही. आणि जानेवारी १९४८ मध्ये म्हणजे काश्मीरातील युध्द चालूच होते, देशात दंगली चालूच होत्या आणि हैद्राबादचा कटकटा प्रश्नही सुटलेला नव्हता. तेव्हा जानेवारी १९४८ मध्ये पटेल कमी देशप्रेमी होते आणि पण नंतर मात्र ते देशप्रेमी झाले असे नक्कीच म्हणता येणार नाही.

दुसरे म्हणजे इथे २ जानेवारी १९४९ च्या इंडिअन एक्सप्रेसमध्ये म्हटल्याप्रमाणे आदल्या दिवसापासून काश्मीरात युध्दबंदी लागू करण्यात आली आणि निदान ही बातमी पाठविणाऱ्या बातमीदाराच्या मते "it seems Pandit Nehru took his Cabinet colleagues into confidence yesterday afternoon..." आणि या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांमध्ये सरदार पटेल होते तसेच शामाप्रसाद मुखर्जीही होते.शामाप्रसाद मुखर्जींनीही काश्मीरातील युद्धबंदीविरोधात राजीनामा दिला नव्हता तर पुढे १९५० मध्ये नेहरू-लियाकत अली खान यांच्यातील कराराविरोधात राजीनामा दिला होता. म्हणजे युध्दबंदीच्या निर्णयाविरोधात शामाप्रसादांनीही राजीनामा दिला नव्हता.याचा अर्थ या निर्णयाला त्यांचे समर्थन होते असा का घेऊ नये?

(पूर्वाश्रमीचा क्लिंटन) गॅरी ट्रुमन

शैलेन्द्र's picture

6 Sep 2012 - 3:52 pm | शैलेन्द्र

तर्री,
विनोद म्हणुन लिहीलय की सिरीयस आहात? विनोद असल्यास, चांगला विनोद आहे.

अप्पा जोगळेकर's picture

8 Sep 2012 - 1:28 pm | अप्पा जोगळेकर

. जर तर च्या गोष्टीतून "फाळणीचे " समर्थन करणारे उद्या काश्मीर ही घ्या पण आम्हाला सुखात राहू द्या म्हणतील.
मुळात भिकारडे काश्मीर भारतात हवेच कशाला ? गँगरिन झालेला पाय कापून टाकतातच ना.

अप्पा जोगळेकर's picture

8 Sep 2012 - 1:28 pm | अप्पा जोगळेकर

. जर तर च्या गोष्टीतून "फाळणीचे " समर्थन करणारे उद्या काश्मीर ही घ्या पण आम्हाला सुखात राहू द्या म्हणतील.
मुळात भिकारडे काश्मीर भारतात हवेच कशाला ? गँगरिन झालेला पाय कापून टाकतातच ना.

मन१'s picture

8 Sep 2012 - 1:36 pm | मन१

आज काश्मीर, उद्या खाली सरकत जम्मू. मग केंद्रव्यवस्था दुबळी झाल्यानं स्वतंत्र खलिस्तान.
पूर्वेकडून असेच अनेक "गँगरिन " बनत आहेतच. सगळेच कापा.
मग बस पुणे नावाच्या देशात.

तर्री's picture

10 Sep 2012 - 2:17 pm | तर्री

संपादक मंडल : हा प्रतिसाद माझ्या मते अती आक्षेपार्ह आहे. त्वरित सदस्यास सूचना ध्यावी वा प्रतिसाद काढावा.

-हा प्रतिसाद वाचताना अतीव दुःख झाले आहे ! ज्यांनी काश्मीर च्या सीमेवर शून्य अम्शाखाली , कमी ऑक्सिजन मध्ये ,अती प्रतिकूल परिस्थितीत प्राण दिले , त्यांना काय वाटेल ?

*गँगरिन झाले का ? का गँगरिन झाले ? ह्याचा विचार नाही . परत होवू नये म्हणून खबरदारी नाही. सरळ कापून टाका !

धन्य ते विचार !

मला आक्षेपार्ह वाटला नाही; आणि पटलाही नाही.(म्हणूनच त्याला तिथेच उपप्रतिसाद दिलाय.)

विकास's picture

10 Sep 2012 - 6:40 pm | विकास

मला वाटते आक्षेपार्ह प्रतिसाद आणि उपरोधीक प्रतिसादात फरक असतो. :-) असो.

प्रतिसाद आक्षेपार्ह !

समजून घ्या हो . (सिरीअस्लीच आहे ते )

चिगो's picture

6 Sep 2012 - 4:47 pm | चिगो

वाचतोय.. येऊ द्यात..

चिगो's picture

6 Sep 2012 - 4:47 pm | चिगो

वाचतोय.. येऊ द्यात..

जयंत कुलकर्णी's picture

6 Sep 2012 - 5:35 pm | जयंत कुलकर्णी

गांधीजींनी हिंदुस्थानात हिंदू हे बहुसंख्य रहावेत यासाठी फाळणीला मान्यता दिली असे आपल्याला सुचित करायचे आहे काय ? तसे असल्यास, बरेच प्रश्न उपस्थित करता येण्यासारखे आहेत......

ऋषिकेश's picture

6 Sep 2012 - 5:59 pm | ऋषिकेश

लेख अपेक्षेपेक्षा वेगळ्या मार्गाने गेला.. तर्क फारसा पटला नाही

गांधीजींना फाळणीसाठी जबाबदार धरले जावे (चांगले अथवा वाईट अर्थाने) हेच मुळात दुर्दैवी आहे. त्यामुळे बाकी तर्क गैरलागू वाटतो.

बाकी वेगळी बाजु मांडणे हेच मुळात चांगले काम आहे.. ते तुम्ही करताय त्याबद्द्ल कौतूक

हारुन शेख's picture

6 Sep 2012 - 6:51 pm | हारुन शेख

फाळणीचा जनमानसावर आघात इतका जबरदस्त होता की तेंव्हा आणि आजही गांधीना जबाबदार ठरवल्याशिवाय त्या आघातातून बाहेर येणं बर्याच जनांना शक्य होत नाही. जितकं पातक महान तितकं पातक करणारही महान असावा असं काहीसं प्रमेय असावं.

खरं तर गान्धींना फाळणीसाठी जबाबदार ठरवणे योग्य की अयोग्य हे मला माहीत नाही, पण गांधीना दोन गोष्टींचा दोष नक्कीच जातो..
१. ५५ कोटी :) (एव्हढेच बास )
२. निर्वासितांचा प्रश्न नीट न हातळल्याबद्दल.

फाळणीची जबाबदारी कोणाचीही असली तरी स्वतंत्र भारताचे सर्वमान्य नेते म्हणून याची जबाबदारी गांधींवरच येते. तोपर्यन्त घटना समिती आणि निवडणूका व्हायच्या होत्या.

मिसळपाववर ५५ कोटींची चर्चा अत्यंत मुद्देसुदपणे झाली आहे म्हणून खंडन करण्यासाठी द्वीरूक्ती करत नाही..
ती चर्चा इथे वाचता येईल

निर्वासितांचा प्रश्न नीट न हातळल्याबद्दल.

हा आक्षेप गांधींवर का ते कळले नाहीच अणि असा आक्षेप (ज्यांनी दंगलग्रस्त भागंत जाऊन दंगली थांबण्यासाठी सर्वाधिक व कदाचित एकट्याने प्रयत्न केले) त्यांच्यावर घेतल्याबद्दद्ल अतिशय खेद वाटला इतकेच म्हणतो.

फाळणीची जबाबदारी कोणाचीही असली तरी स्वतंत्र भारताचे सर्वमान्य नेते म्हणून याची जबाबदारी गांधींवरच येते.

किमान जबाबदारी ढकलण्याच्या निमित्ताने का होईना गांधींना सर्वमान्य असल्याचे सांगितल्याबद्दल आभार! :)

अर्धवटराव's picture

6 Sep 2012 - 8:05 pm | अर्धवटराव

५५ कोटींवरची एक चर्चा आवडली. धन्यवाद.

अशीच एक चर्चा इतरत्र झाली होती (बहुतेक सावरकरांच्या कुठल्यातरी धाग्यावर ). नितीन जी आणि पवार साहेबांनी फार मुद्देसुद प्रतिसाद मांडले होते. त्याचा निश्कर्ष बहुतेक "गांधींनी ५५ कोटी करताच उपोषण केले" असा निघाला होता. असो.

अर्धवटराव

सुनील's picture

7 Sep 2012 - 2:08 am | सुनील

त्याचा निश्कर्ष .......

आंजावरील चर्चा कधीही निष्कर्ष काढून संपत नसतात! त्या कायमच ओपन एन्डेड असतात (म्हणूनच धागे अधून-मधून वर येत असतात).

चर्चा ह्या आपापली मते ठसविण्यासाठीच असतात, असा आम्हाला उमगलेला निष्कर्ष ! ;)

अर्थात, त्यातून (कधी कधी) उद्बोधक माहितीदेखिल मिळते, हा फायदाच!

अर्धवटराव's picture

7 Sep 2012 - 3:59 am | अर्धवटराव

माझ्या प्रतिसादातला "बहुतेक" शब्द निश्कर्षा संबंधीच आहे :P

अर्धवटराव

दंगलग्रस्त भागात जाऊन बसणे म्हणजे "प्रश्न हाताळणे नव्हे"... दंगल थांबविण्यासाठी जी ठोस उपाययोजना करायला हवी होती ती करण्यात ते कमी पडले हा आक्षेप आहे.. गांधींनी इच्छा दाखवली असती तर सूत्रे नक्की हलली असती.

आणि "सर्वमान्य" बद्दल म्हणाल तर ज्या माणसाच्या एका शब्दावरून १९२१ ची चळवळ मागे घेतली गेली, आणि ज्यानी आपल्या उपोषणावर सगळा देश नाचवला, त्याना सर्वमान्य म्हटलेच पाहिजे, नाही का?

प्रश्न सर्वमान्य म्हणण्याचा नाही. त्या सर्वमान्यतेसोबत येणार्‍या जबाबदारीला त्यांनी योग्य न्याय दिला का हा आहे.

महात्मा गांधी आणि ५५ कोटी हे तुणतुणे परत वाजू लागल्यामुळे त्या तुणतुण्याची तार एकदाची कायमची तोडायला हवी (शब्दप्रयोग श्रेयः थत्तेचाचा) या उद्देशाने पुढील चित्र डकवित आहे. १८ जानेवारी १९४८ रोजीच्या इंडिअन एक्सप्रेस मध्ये भारत सरकारने पाकिस्तानला ५५ कोटी रूपये द्यायची मागणी मान्य केली आणि त्याबद्दल महात्मा गांधींनी समाधान व्यक्त केले असे म्हटले आहे.

तसेच या बातमीत पुढे म्हटले आहे: "Gandhiji added, however, that he did not want anyone to come and tell him that things had been set right while the process was incomplete. He was in no hurry to break the fast as he had no desire to live unless peace reigned in the two Dominions".

गांधीजींनी उपोषण सोडल्याची बातमी दुसऱ्या दिवशीच्या म्हणजे १९ जानेवारीच्या वर्तमानपत्रातली आहे. शांतता समितीने गांधीजींच्या ७ मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण सोडले असे त्या बातमीत स्पष्टपणे म्हटले आहे . पाकिस्तानात हिंदूंच्या कत्तली झाल्या तरी दिल्लीतील मुसलमानांनी त्या केलेल्या नव्हत्या म्हणून पाकिस्तानातल्या कत्तलींची शिक्षा दिल्लीतील मुसलमानांना देऊ नये असा गांधीजींचा उद्देश होता.

तेव्हा गांधीजींचे उपोषण हे दंगली संपून शांतता नांदावी म्हणून केले होते. पाकिस्तानला ५५ कोटी द्यावेत असे गांधीजींचे मत असले तरी त्यांच्या उपोषणाचा ५५ कोटीशी काहीही संबंध नाही हे स्पष्ट होते. नाहीतर गांधीजींनी ५५ कोटी दिल्यानंतर लगेच उपोषण सोडले असते.

तेव्हा गांधीजींचे उपोषण आणि ५५ कोटींचा प्रश्न या सर्वसाधारणपणे एकाच काळात घडलेल्या घडामोडींची सांगड घालून गांधीजींना बदनाम करायचे गोबेल्सियन प्रचारतंत्र या उजव्या गटाच्या मंडळींनी अगदी प्रभावीपणे पार पाडले. या अपप्रचाराला उत्तर द्यायलाच हवे असे वाटून हा प्रतिसाद लिहिला.

दीपक साळुंके's picture

7 Sep 2012 - 12:02 pm | दीपक साळुंके

उत्तम !!!

क्लिंटनराव! उत्तम काम केले आहेत! (गेल्या वेळच्या चर्चेतच - दुवा वरच्या प्रतिसादात हा पुरावा आणला असतात तर तिथेच ५५ कोटीचे तुणतुणे थआंबले असते ;) )

असो.. यानंतर माझे बनलेले मत (उपोषण ५५ कोटींसाठी नव्हते) ते अधिकच ठाम झाले आहे

मन१'s picture

7 Sep 2012 - 12:30 pm | मन१

बिरबलची खिचडी अशी एका झटक्यात संपून्/बनून कसं चालेल?
शेकडो प्रतिक्रियांचा(त्यातल्या बहुतांशी असंबद्ध) पाउस पडल्याशिवाय मजा काय?
आता चावून चोथा करायला विषय दुसरा शोधावा का काय सर्वांनी.

क्लिंटन's picture

7 Sep 2012 - 3:18 pm | क्लिंटन

आणखी काही पुरावे:

१७ जानेवारी १९४८ च्या इंडिअन एक्सप्रेस मध्ये दोन महत्वाच्या बातम्या आहेत आणि त्यावरून गांधीजींचे उपोषण आणि ५५ कोटींचा संबंध नव्हता हे सिध्द होईल (मुळातल्या बातम्या इंग्रजी वर्तमानपत्रातील असल्यामुळे भाषांतर न करता त्या जशाच्या तशा इंग्रजीतच देत आहे. इच्छुकांना या बातम्या वर दिलेल्या दुव्यावर त्या दिवशीच्या वर्तमानपत्रात वाचता येतील):

१. The Prime Minister, Pandit Jawaharlal Nehru told a "peace rally" today that "the loss of Mahatma Gandhi's life would mean the loss of India's soul because he is the embodiment of India's spiritual power." Pandit Nehru, who was addressing about 10,000 people--Hindus, Muslims and Sikhs--appealed to them to maintain communal harmony and save Mahatma Gandhi's life.

२. Sardar Patel, who left for Bhavnagar this morning in a statement said:" I am leaving with a heavy heart at a time when Gandhiji is fasting. I cannot but fulfill my previous commitments and I am sure Gandhiji would like me to do so and therefore I must go. Besides, I know that my physical presence would not be of any help in relieving his agony. The only thing that can hasten the breaking of the fast and relieve Gandhiji of his mental and physical torture is for us all to do all that is possible to create an atmosphere to remove as far as possible distrust and bitterness. May I appeal to the people of Delhi to help the authorities in doing so. Let it not be said that we do not deserve the leadership of the greatest man of the world".

म्हणजेच पंडित नेहरू आणि सरदार पटेल या दोघांनीही गांधीजींचे उपोषण संपवायला लोकांनी दंगली थांबवून शांतता पाळावी असेच आवाहन केले आहे.जर ५५ कोटी देऊन उपोषण थांबणाऱ्यातले असते तर ते सरकारने आधीच दिले असते.लोकांना शांततेचे आवाहन करायची गरज का पडली असती?

तेव्हा ५५ कोटी आणि गांधीजींचे उपोषण या गोष्टींचे तुणतुणे कायमचे बंद होईल अशी अपेक्षा आहे.

पिअर्स वाल्यांनी मद्रासच्या रवि ( द न्यु स्टार अँड कंपनी), ट्रांसपरंट ग्लिसरीन सोपची आयडिया चोरली असे म्हणायला वाव आहे.

हारुन शेख's picture

6 Sep 2012 - 6:33 pm | हारुन शेख

मनुष्यसमूहाला एकत्र बांधून ठेवणारा संस्कृती हा धर्मापेक्षाही प्रभावी घटक आहे. धर्म वैयक्तिक श्रद्धांमधून विकास पावतो. पण 'संस्कृती' ज्या गोष्टीतून विकसित होते त्या अधिक व्यापक प्रभाव पाडतात. क्षेत्रीय भूगोल, निसर्ग, भाषा, मानववंश...इत्यादी. मुस्लीम जेव्हा भारतात आले ते धर्मवेड घेऊन पण त्यांनी एकदा इथे वसल्यावर इथल्या संस्कृतीशी जुळवून घेतलेच. धार्मिक कटकटी, लढाया अगदी सुरवातीपासून झाल्या, होत आहेत पण ह्या प्रासंगिक घटना घडल्यावर पुन्हा एकत्र मिळून राहणेही झाले आहेच. धार्मिक दंगली/ लढाया कधी मुस्लीम राज्यकर्त्यांच्या पाठींब्याने घडल्या कधी हिंदू राज्यकर्त्यांच्या. पण काही काळानंतर हिंदू आणि मुस्लीम ह्यांचे सांस्कृतिक सहजीवन पूर्ववत सुरु झाले. त्यामुळेच धर्माधिष्ठीत फाळणीला होकार देणे माझ्या मते सर्वात मोठी चूक होती. तसे करतांना संस्कृती हा घटक पूर्णपणे दुर्लक्षिला गेला. मुळातच मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीतून तयार झालेली आणि पुढे इंग्लंडात जाऊन शिकून पूर्णपणे ब्रिटीश दृष्टीकोनातून विचार करणारी हि नेत्यांची पिढी होती. 'महात्मा गांधी' वगळता इतर नेते मंडळींची इथल्या संस्कृतीशी नाळ तुटलेलीच होती. त्यामुळे धर्माधिष्ठीत फाळणीचा विचार अश्या नेत्यांना रुचला. शिवाय काही नेत्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा या लोकांच्या हितामध्ये निर्णय घेण्याच्या भावनेपेक्षाही प्रबळ होत्या.

फाळणी झाली नसती तर हिंदू मुसलमान लोकसंख्येचे प्रमाण ६५-३५ राहिले असते.आणि जशी भीती व्यक्त केली जाते तशा जातीय दंगलीही झाल्या असत्या पण त्यांचे स्वरूप अंतर्गत प्रश्न म्हणून राहिले असते. पुन्हा त्या मिटल्यावर एक राष्ट्र म्हणून एकसंधता अधिक बळकटपणे पुढे आली असतीच. कुणी सांगावे ६५-३५ हे लोकसंख्येचे प्रमाण कदाचित शांती राखण्याच्या दृष्टीने अधिक समतोल दाखवणारे हि ठरले असते. शिवाय ज्या जातीय दंगलींच्या भीतीमुळे फाळणीच्या मागणीला दोन्हीकडच्या नेत्यांनी उचलून धरले त्या तशाही अत्यंत उग्र स्वरुपात घडल्याच. अगदी ज्या दिवशी फाळणी जाहीर झाली त्या दिवसापासून. फाळणीतल्या विस्थापनांमध्ये 20 लाख लोकं मेली त्यात स्त्रिया,लहान मुलेपण होती, १ लाख स्त्रियांची अब्रू लुटली गेली, दीड कोटी लोक बेघर झाले, अगणित लोकं बेपत्ता झाली. या सगळ्याचे दूरगामी परिणाम झालेले आहेत. जनमानसावर कधीही भरून न येणाऱ्या विखारी जखमा , दहशतवाद , अण्वस्त्रधारी शेजारी शत्रूराष्ट्र, असुरक्षित वायव्य सीमा , त्यामुळे होणारा संरक्षणावरचा प्रचंड खर्च ह्या सगळ्या परिणामांचे आकलन त्या काळच्या नेते म्हणवणाऱ्या मंडळींना झाले होते का हि शंका कायम वाटत आलेली आहे.

तसाही फाळणीचा तथाकथीत उद्देश साध्य झाला नाहीच. इथल्या १५ कोटी मुस्लिमांनी पाकिस्तानात न जाणेच पसंत केले. मुख्यतः त्यात दक्षिण आणि पश्चिम भारतीय मुस्लीम जास्त होते. पण फाळणीमुळे ते कायमचे बॅकफूटवर गेले. कुठल्याही प्रश्नामध्ये काही बोलण्याचा नैतिक हक्क उरला नाही.त्यांच्याकडे कायम पाकिस्तानचे इथे राहिलेले नागरिक असे बघितले जाऊ लागले. कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या राजकीय पार्ट्या सत्तेत आल्यानंतर तर सामुहिक कत्तलही घडलीय. पण तरीही भारतीय संविधानाने स्वीकारलेल्या मार्गदर्शक तत्वांमुळे मुस्लिमांची भारतात सुरक्षितता टिकून आहे. त्यांना राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घेणारं दमदार राजकीय नेतृत्व ज्यावेळी देशाला मिळेल तो सुदिन.

मनुष्यसमूहाला एकत्र बांधून ठेवणारा संस्कृती हा धर्मापेक्षाही प्रभावी घटक आहे.
मग काश्मीर मध्ये काय झाले ? तेथे तर संस्कृती सारखी होती. मग काश्मिरी पंडित निर्वासित का झाले ?
कुणी सांगावे ६५-३५ हे लोकसंख्येचे प्रमाण कदाचित शांती राखण्याच्या दृष्टीने अधिक समतोल दाखवणारे हि ठरले असते.
जेथे ३५ % व ६५ % असे मुस्लीम व हिंदूंचे प्रमाण आहे तेथे (भिवंडी / मालेगाब ) काय परिस्थिती आहे ? आपण म्हणता तो हाच का समतोल ?
कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या राजकीय पार्ट्या सत्तेत आल्यानंतर तर सामुहिक कत्तलही घडलीय.
तद्दन खोटारडेपणा.

त्यांना राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घेणारं दमदार राजकीय नेतृत्व ज्यावेळी देशाला मिळेल तो सुदिन.

विचार करायला भाग पाडणारे : मुस्लिमांना मुख्य प्रवाहात यायचे आहे का ? की एक गठ्ठा मते हीच त्यांची ओळख ? किती समाज सुधारक भारत्तात झाले आणि त्यामुळे कोणता समाज सुधारला ? हमीद दलवाई चे विचार का नाही प्रसारित होत ? मुस्लीम मुलींचे शिक्षण होणे गरजेचे आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Sep 2012 - 10:42 pm | अत्रुप्त आत्मा

तर्री ...आपले प्रश्न प्रामाणिक आणी खरे असल्यामुळे(च),,, त्याला उत्तरं न देणं ही(पण) आपली संस्कृती आहे... हे आपलं लक्षात ठेवा हो!
कारण,उत्तरं दिली तर असं व्हायचं...ना उगाच

तर्री's picture

7 Sep 2012 - 7:17 am | तर्री

क्लिंटन यांना वेळ तथा इच्छा नाही.
शेख साहेब उत्तर देतील ही अपेक्षा.
मी ही माझे पुच्छ म्यान करतो.

हारुन शेख's picture

7 Sep 2012 - 10:48 am | हारुन शेख

मनुष्यसमूहाला एकत्र बांधून ठेवणारा संस्कृती हा धर्मापेक्षाही प्रभावी घटक आहे.
मग काश्मीर मध्ये काय झाले ? तेथे तर संस्कृती सारखी होती. मग काश्मिरी पंडित निर्वासित का झाले ?
----- ९० च्या दशकात पाकिस्तानने काश्मीरमधील युवकांना रॅडीकलाइज करून दहशतवादी समूह निर्माण होण्याआधी काश्मीर शांत होतं. पंडितही निर्वासित नव्हते. एकप्रकारे हे फाळणीचेच फलित म्हणता येईल.

कुणी सांगावे ६५-३५ हे लोकसंख्येचे प्रमाण कदाचित शांती राखण्याच्या दृष्टीने अधिक समतोल दाखवणारे हि ठरले असते.
जेथे ३५ % व ६५ % असे मुस्लीम व हिंदूंचे प्रमाण आहे तेथे (भिवंडी / मालेगाब ) काय परिस्थिती आहे ? आपण म्हणता तो हाच का समतोल ?
---- असे असण्यामागे फाळणीच्या कटू आठवणी आणि इतिहास आहे हे तुम्ही विसरताहात. फाळणीचा क्लेशकारक इतिहास नसता तर कदाचित परिस्थिती अशी राहिली नसती.

कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या राजकीय पार्ट्या सत्तेत आल्यानंतर तर सामुहिक कत्तलही घडलीय.
तद्दन खोटारडेपणा.
--- काय खोटारडेपणा केला ते सांगाल काय ? गुजरात मध्ये काय झाले ते सगळ्यांना ठाऊक आहेच. फाळणीदरम्यानचा पुरावा हवा असल्यास हा घ्या "In bihar for example after anti - muslim riots broke out in october 1946 the province's hindu premier refused to allow british troops to fire on hindu rioters,ignored congress leader's complicity in the riots, held no official inquiry, and made only a few token arrests of those who had participated in anti muslim pogroms that killed 7000 to 8000 people " संदर्भ हवा असल्यास व्यनि करा.

त्यांना राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घेणारं दमदार राजकीय नेतृत्व ज्यावेळी देशाला मिळेल तो सुदिन.
विचार करायला भाग पाडणारे :
मुस्लिमांना मुख्य प्रवाहात यायचे आहे का ? ----- नक्कीच

की एक गठ्ठा मते हीच त्यांची ओळख ? ----- मुस्लिमांकडे आपल्या राजकीय नेतृत्वाने नेहमीच त्या दृष्टीतून पाहिल्यामुळे ती ओळख तयार झाली आहे. कॉंग्रेसने सोयीस्करपणे आणि भाजपने असूयेने ती ओळख टिकवून ठेवली आहे.

किती समाज सुधारक भारत्तात झाले आणि त्यामुळे कोणता समाज सुधारला ? ----- तुम्ही थोडं बघाल तर बरीच सुधारणा झालेली दिसेल. पण कायम हट्टाने समाज सुधारलेला नाहीच अशी भूमिका घ्यायची झाल्यास काय म्हणणार. किती समाज सुधारक झालेय या संख्येवर समाज किती सुधारला हे ठरवणे म्हणजे अतीच.

हमीद दलवाई चे विचार का नाही प्रसारित होत ? मुस्लीम मुलींचे शिक्षण होणे गरजेचे आहे. ----- प्रसारित झालेत. मुस्लीम मुलीही शिकताय. पडदा पद्धत फारच कमी मुस्लीम मुली पाळतात, पारंपारिक तलाक ची किती उदाहरणं एवढ्यात तुम्ही ऐकलीत.

इष्टुर फाकडा's picture

7 Sep 2012 - 2:35 pm | इष्टुर फाकडा

९० च्या दशकात पाकिस्तानने काश्मीरमधील युवकांना रॅडीकलाइज करून दहशतवादी समूह निर्माण होण्याआधी काश्मीर शांत होतं. पंडितही निर्वासित नव्हते. एकप्रकारे हे फाळणीचेच फलित म्हणता येईल.
गुजरात मध्ये काय झाले ते सगळ्यांना ठाऊक आहेच. फाळणीदरम्यानचा पुरावा हवा असल्यास हा घ्या "In bihar for example after anti - muslim riots broke out in october 1946 the province's hindu premier refused to allow british troops to fire on hindu rioters,ignored congress leader's complicity in the riots, held no official inquiry, and made only a few token arrests of those who had participated in anti muslim pogroms that killed 7000 to 8000 people "

सगळा दोष फाळणीवर टाकला कि सगळ्या प्रश्नांचे समाधान होत नाही. आणि फाळणीचे म्हणाल तर बहुतांश ठिकाणी हिंदूंनी दिलेल्या त्या प्रतिक्रिया होत्या. १६ ओगस्ट १९४६ ला जीनांनी थेट 'कार्यवाही' जाहीर केलेली होती हे ध्यानात घ्यायला हवे. कटू आठवणी दोन्ही बाजूला आहेत. आणि तरी भारतात मुस्लिमांचे प्रमाण वाढले आहे हे लक्षात घ्या याउलट पाक मध्ये २०% वरून हिंदू आता नगण्य उरले आहेत.
गोष्टी सोडून देवून पुढे चालण्याला गती बहुतांश मुस्लीम देत नाहीत हे सध्या उजेडात येणाऱ्या घटनांवरून कोणालाही समजण्यास अवघड नाही. सगळे रॅडीकल विचारांचे नाहीत हेहि कोणीही सांगेल. पण रॅडीकलाइज होणारेही कमी नाहीत हे कसे नाकारणार?
कसं आहे...रॅडीकलाइज्ड हिंदूंना टप्पू हिंदूच लगावतात, त्यांचे जगणे या देशात सोपे नाही. तशी परिस्थिती मुस्लीम समाजात दिसत नाही. मध्ये एक देवबंद चा इमाम या दिशेने काही बोलला तर त्याची उचलबांगडी झाली.
काही गोष्टी मान्य कराना मी म्हणतो...त्याने कमीपणा येणार नाही. जोपर्यंत हे प्रयत्न दिसत नाहीत तोपर्यंत हा वेगळेपणा राहणार त्याला काय पर्याय.

मन१'s picture

7 Sep 2012 - 2:58 pm | मन१

...रॅडीकलाइज्ड हिंदूंना टप्पू हिंदूच लगावतात, त्यांचे जगणे या देशात सोपे नाही.
हे ही खरेच.

बॅटमॅन's picture

7 Sep 2012 - 3:05 pm | बॅटमॅन

आंगाश्शी!!!!!!!!!!

याचा कौंटरपार्ट मुस्लिम समाजात असावा अशी इच्छा व्यक्त केली तर चुकले कुठे? आणि अशी स्थिती सध्याच्या मुस्लिम समाजात नाही हे मान्य करायला आणि मग सुधारायला तरी काय होतं काय माहिती?

मन१'s picture

7 Sep 2012 - 6:30 pm | मन१

गृहितक :- देशातल्या प्रमुख लोकसंख्येपैकी मुस्लिम हे मागास मनोवृत्तीचे आहेत. मध्ययुगीन मानसिकतेत जगणारा एक अतिप्रचंड समाज त्यात आहे. कित्येक अशिक्षित आहेत. जे शिक्षित आहेत, त्यांचे विचार, राहणी आधुनिक नाहित.
शिक्षित असले तरी कित्येकजण तिकडे आक्रमक, धर्मवेडे व स्वतःच्या संकल्पनांना संविधानाच्या वर मानणारे आहेत.
.
थोडक्यात :- धर्म ही वैयक्तिक वर्तन चौकट न मानता , सामाजिक संघटनेचे रुप घेउन तिकडे येते. असे इतर धर्मियांनी केले तर त्यांना रोखणारे त्यांच्याच धर्मातील इतर घटाक आहेत.
.
गृहितकात काही दुरुस्ती हवी का अजून?
.
माझे म्हणणे:-
"हिंदुंच्या भल्यासाठी तुम्ही सेक्युलर्/चांगले निदान निरुपद्रवी व्हा. आधुनिक विचारसरणीचा अंगिकार करा." असा जितका बाहेरून दबाव समाजावर येइल; तितकाच हा(किंवा कुठलाही अन्य) समाज "आपण (वैचारिक दृष्ट्या)संपू की काय" ह्या भीतीने जुन्या संकल्पना अधिकच घट्ट पकडून ठेवील. सूर्य आणी वारा ह्यांची एका माण्साचे घोंगडे उडवायची शर्यत सगळ्यांना ठाउक असेलच. वार्‍याने बाहेरून जोर लावल्यानं माणसानं ते ब्लँकेट्/घोंगडी अधिकच घट्ट धरुन ठेवली.
.
मग काय करता येइल?
दुर्दैवाने तत्काळ उपाय असा काहीच नाही. दीर्घकालीन उपाययोजना नक्कीच कायमस्वरुपी उत्तर ठरेल.
जेव्हा खास मुस्लिमांत, निदान उपखंडातील/ भारतीय मुस्लिमात प्रबोधन,renaissance घडून यायला सुरुवात होइल तेव्हाच काही आशा आहे. किंवा भारतीय उदाहरणे घेउन बोलायचं तर जेव्हा काही मुस्लिम सुधारक जीवावर उदार होउन सुधारणा घडावतील; जेव्हा त्यांच्यात राममोहन रॉय, आगरकर, रानडे,र धो व धोंडो केशव कर्वे, आंबेडकर, फुले (व अशीच इतर थोर शेकडो मंडळी, जागा कमी आहे भावना लक्षात घ्या) बनतील. त्यांचा पाठिंबा वाढू लागेल; तेव्हाच त्याम्ची स्वतःची प्रगती होइल.एकदा ते घडू लागल्यावर इतरांना त्यांचे व त्यांना इतरांचे वाटणारे भय कमी होइल. अधिक पुढची पायरी म्हणजे "इतर" आणी "ते" असा भेद राहणार नाही. जर प्रबोधन झाले तर......
..ते एक खड्ड्यात चाल्ले म्हणून आपण सात खड्ड्यात जायचे हा तोगडिया -सिंघल ह्यांचा मार्गच बरोबर आहे, असे वाटत असेल, तर मी उत्तर देण्यास असमर्थ आहे....

अप्पा जोगळेकर's picture

8 Sep 2012 - 1:57 pm | अप्पा जोगळेकर

१००० % सहमत.

हारुन शेख's picture

7 Sep 2012 - 6:11 pm | हारुन शेख

सगळा दोष फाळणीवर टाकला कि सगळ्या प्रश्नांचे समाधान होत नाही.
---- मी काश्मीरमध्ये जे होतंय याचा दोष फाळणीवर टाकला याच्यात काही चूक केली असे मला वाटत नाही. फाळणीपूर्वी काश्मीर संस्थानाचा राजा हिंदू होता आणि त्याची प्रजा बहुसंख्य मुस्लीम असूनही हिंदू-मुसलमान तेथे गुण्यागोविंदाने राहत होते. काश्मीर पेटले ते ९० च्या दशकात. खलिस्तान चळवळ (जी पाकिस्तानच्या पाठींब्याने सुरु होती) ती अयशस्वी झाल्यावर.

आणि फाळणीचे म्हणाल तर बहुतांश ठिकाणी हिंदूंनी दिलेल्या त्या प्रतिक्रिया होत्या. १६ ओगस्ट १९४६ ला जीनांनी थेट 'कार्यवाही' जाहीर केलेली होती हे ध्यानात घ्यायला हवे.
---- क्रिया म्हणा वा प्रतिक्रिया म्हणा. हिंसा दोन्हीकडून झाली हे मान्य आहे कि नाही ? माझे मूळ म्हणणे तेच होते. वरती 'तर्री' यांनी चक्क खोटारडेपणाचा आरोप केला म्हणून ती उदाहरणं दिली होती.

कटू आठवणी दोन्ही बाजूला आहेत. आणि तरी भारतात मुस्लिमांचे प्रमाण वाढले आहे हे लक्षात घ्या याउलट पाक मध्ये २०% वरून हिंदू आता नगण्य उरले आहेत.
---- माझा प्रतिसादात मी कोठेही पाकिस्तानची बाजू मांडली काय? तरी मी पाकिस्तानची बाजू घेऊन बोलतोय असे गृहीत धरून तुम्ही वरचं वाक्य लिहिलंय. प्रवाहात सामील करून घेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न म्हणायचा का ? ;)

गोष्टी सोडून देवून पुढे चालण्याला गती बहुतांश मुस्लीम देत नाहीत हे सध्या उजेडात येणाऱ्या घटनांवरून कोणालाही समजण्यास अवघड नाही. सगळे रॅडीकल विचारांचे नाहीत हेहि कोणीही सांगेल. पण रॅडीकलाइज होणारेही कमी नाहीत हे कसे नाकारणार?
---- आतंकवादी बनवण्यासाठी अथवा रॅडीकलाइज करण्यासाठी फक्त धर्म पुरेसा असत नाही. त्यासाठी विकृतीकरण केलेला इतिहास, सहन केलेल्या जखमांच्या कहाण्या, दुर्लक्षिलेल्या तक्रारी, ज्याच्यासाठी लढणे आणि मरणेही श्रेयस्कर आहे अश्या आदर्श जगाची दाखवलेली स्वप्ने, ज्या कारणासाठी लढायचं आहे त्याच कारणासाठी आधीच्या लोकांनी दिलेल्या बलिदानाच्या प्रेरक कथा. अश्या अगणित गोष्टी वापरल्या जातात. इथे आतंकवाद्यांच उदात्तीकरण करत नसून फक्त 'धर्माच्याच संदर्भात' आतंकवादाचा विचार करणाऱ्या दृष्टिकोनाबद्दल बोलायचे आहे..

कसं आहे...रॅडीकलाइज्ड हिंदूंना टप्पू हिंदूच लगावतात, त्यांचे जगणे या देशात सोपे नाही. तशी परिस्थिती मुस्लीम समाजात दिसत नाही.
---- त्याचं कारण असुरक्षिततेची भावना आहे. असुरक्षित वाटत असेल तर बर्याच वेळेस सारासार विचार नीट होऊ शकत नाही. निर्णय चुकतात. विचार भरकटतात. शिवाय बहुसंख्य शिक्षित नसल्यामुळेही तसे होते.

मध्ये एक देवबंद चा इमाम या दिशेने काही बोलला तर त्याची उचलबांगडी झाली.
---- मोदींवर स्तुतिसुमने उधळल्यामुळे ती उचलबांगडी झाली.

काही गोष्टी मान्य कराना मी म्हणतो...त्याने कमीपणा येणार नाही. जोपर्यंत हे प्रयत्न दिसत नाहीत तोपर्यंत हा वेगळेपणा राहणार त्याला काय पर्याय.
---- जे चूक ते चूक असे मान्य करण्यात निदान मी तरी कमीपणा मानत नाहीच. पण असे असतांनाही मी खूप वेळेस वेगळेपणाची वागणूक अनुभवली आहे.

वाहीदा's picture

7 Sep 2012 - 7:41 pm | वाहीदा

बट वन फाईन डे आय एम शुअर ईवन यु विल डिसाईड टु लीव धिस फोरम .
एनीवेज गुडवन बडी :-)

इष्टुर फाकडा's picture

7 Sep 2012 - 7:58 pm | इष्टुर फाकडा

मी काश्मीरमध्ये जे होतंय याचा दोष फाळणीवर टाकला याच्यात काही चूक केली असे मला वाटत नाही. फाळणीपूर्वी काश्मीर संस्थानाचा राजा हिंदू होता आणि त्याची प्रजा बहुसंख्य मुस्लीम असूनही हिंदू-मुसलमान तेथे गुण्यागोविंदाने राहत होते. काश्मीर पेटले ते ९० च्या दशकात. खलिस्तान चळवळ (जी पाकिस्तानच्या पाठींब्याने सुरु होती) ती अयशस्वी झाल्यावर.
तुम्ही मालेगाव आणि भिवंडी साठीही फाळणीचे सांगितलेत फक्त काश्मीरसाठी नाही.
आणि अगदी खोटारडेपणा नाही पण भडक विधान केलेत न ! गुजरात मध्येसुद्धा डबा जळाला (तुमच्यानुसार 'कट्टर हिंदुत्ववादी' सरकार असताना !) त्यानंतर सगळ्यांना ठावूक आहेच. क्रिया आणि प्रतिक्रिया जर सारखी आहे असे म्हणत असलात तर न्यूटन वरून तुमच्या डोक्यावर सफरचंद मारल्याशिवाय राहणार नाही :)
माझा प्रतिसादात मी कोठेही पाकिस्तानची बाजू मांडली काय? तरी मी पाकिस्तानची बाजू घेऊन बोलतोय असे गृहीत धरून तुम्ही वरचं वाक्य लिहिलंय. प्रवाहात सामील करून घेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न म्हणायचा का ?
काका मी तुम्हाला पाकिस्तानचा समर्थक मानतोय हा ग्रह तुमचा ! मी तुम्हाला हिंदुबहुलतेमुळे मुस्लिमांना समस्या येत नाहीत पण याउलट परिस्थितीमध्ये असेच होताना दिसत नाही कारण आजचा पाकिस्तानी मुसलमान काही वर्षांपूर्वी हिंदुस्थानीच होता हे सांगायचा प्रयत्न करत होतो. आणि प्रवाहात सामील करण्याबाबत सांगतो, माझे दोन सहकारी पाकिस्तानी आहेत, एक विद्यार्थी पाकिस्तानी आहे :)
आतंकवादी बनवण्यासाठी अथवा रॅडीकलाइज करण्यासाठी फक्त धर्म पुरेसा असत नाही. त्यासाठी विकृतीकरण केलेला इतिहास, सहन केलेल्या जखमांच्या कहाण्या, दुर्लक्षिलेल्या तक्रारी, ज्याच्यासाठी लढणे आणि मरणेही श्रेयस्कर आहे अश्या आदर्श जगाची दाखवलेली स्वप्ने, ज्या कारणासाठी लढायचं आहे त्याच कारणासाठी आधीच्या लोकांनी दिलेल्या बलिदानाच्या प्रेरक कथा. अश्या अगणित गोष्टी वापरल्या जातात. इथे आतंकवाद्यांच उदात्तीकरण करत नसून फक्त 'धर्माच्याच संदर्भात' आतंकवादाचा विचार करणाऱ्या दृष्टिकोनाबद्दल बोलायचे आहे..
गम्मत अशी आहे हरुनसाहेब भडकावू मटेरियल आणि माणसे दोन्हीकडे आहेतच. मग एकाच बाजुकडची इतक्या संख्येने कशी बळी पडतात असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्यांना पडतो ज्याचं उत्तर देणं सोडा, हे मान्य करणारेही कोणी नाहीत हि माझीतरी व्यथा आहे. आणि या संख्येमुळे आतंकवादाचा विचार 'धर्माच्याच संदर्भात' झाला तर त्यासाठी तुम्ही तसा विचार करणाऱ्यांची डोकी धरणार आहात का? तसा होणे हे जरी चुकीचे असले तरी !
मोदींवर स्तुतिसुमने उधळल्यामुळे ती उचलबांगडी झाली.
मलातरी त्याचे म्हणणे पटते...गुजरात मधील प्रगतीचा फायदा धर्माधिष्ठित नाही. असो माणसाला वैयक्तिक मते असायला तरी हरकत नसावी.
जे चूक ते चूक असे मान्य करण्यात निदान मी तरी कमीपणा मानत नाहीच. पण असे असतांनाही मी खूप वेळेस वेगळेपणाची वागणूक अनुभवली आहे.
तुमच्या प्रतिसादांमधून तसे दिसले नाही म्हणून लिहू धजावलो :) उदाहरणार्थ हा प्रतिसाद -
पण फाळणीमुळे ते कायमचे बॅकफूटवर गेले. कुठल्याही प्रश्नामध्ये काही बोलण्याचा नैतिक हक्क उरला नाही.त्यांच्याकडे कायम पाकिस्तानचे इथे राहिलेले नागरिक असे बघितले जाऊ लागले. कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या राजकीय पार्ट्या सत्तेत आल्यानंतर तर सामुहिक कत्तलही घडलीय. पण तरीही भारतीय संविधानाने स्वीकारलेल्या मार्गदर्शक तत्वांमुळे मुस्लिमांची भारतात सुरक्षितता टिकून आहे.
आणि ते वाक्य तुमच्या एकट्यासाठी न्हवते हो...एकटे अब्दुल कलाम मलाही वंदनीय आहेतच कि :)

हारुन शेख's picture

7 Sep 2012 - 8:29 pm | हारुन शेख

भावना पोचल्या. पण तरी धाग्यावर अवांतर होतेय म्हणून प्रतिवाद करत नाही. वाटल्यास खरडवहीत बोलू. मुद्दे संपलेले नाहीत.

बिलकुल नाहि. गुजरात मध्ये कत्तली झाल्या नाहित तर दंगे झाले. त्यांची तत्कालीन सुरुवात मुस्लीमांनीच केली. हिंदुंची प्रतिक्रीया फार तीव्र होती हे खरय... पण अन्यथा मुस्लीम क्रियी तेव्हढीच तीव असती हे ही वास्तव आहे. मूळात गुजरात सारख्या शांत प्रदेशात अशा दंगली का व्ह्याव्या याचे उत्तर मी शोधायचा प्रयत्न केला. तेंव्हा असं कळलं कि या पुर्वीही गुजतार मध्ये लहान मोठ्या झटापटी झाल्यात आणि प्रत्येक वेळी हिंदुंनी भरपूर मार खाल्ला. शेवटच्या दंगलीत सरकारने हिंदुंचा कैवार घेतला आणि "सौ सोनार कि एक लोहार कि" म्हणत हिंदुंनी तिखट वार केले. इतर कुठल्याही राज्यापेक्षा गुजरातमध्ये दंगलींच्या जखमा भरायची स्पीड जास्त आहे... कारण तेथील माणुस स्वभावत: रक्तपात वगैरे भानगडीत पडणारा नाहि.. त्याला पैसा अधीक महत्वाचा.
गुजराती माणुस, हिंदु आणि मुस्लीम दोघेही, आपापल्यापरीने स्थिरस्थावर होण्याचा, प्रगतीचा प्रयत्न करताहेत. पण हे गुजरात कांडाचे भूत उर्वरीत भारताच्या आणि जगाच्या मानगुटीवरुन सहजासहजी उतरणार नाहि हे ही खरेच. इट हॅज ह्युज न्युसेन्स पोटेन्शीअल.

अर्धवटराव