' खिडकीमधुन गच्ची तुझी......!'

जेनी...'s picture
जेनी... in जनातलं, मनातलं
14 Jul 2012 - 10:43 am

कटलेल्या पतंगाकडे त्याच्यासोबत नाराज होऊन बघणारी , त्याच्या मदतीने उंच आकाशातले तारे मोजणारी, त्याला भिजवणारी ,त्याच्यासोबत भिजणारी ,त्याच्या मनातली असंख्य गुपितं जपणारी, दारुच्या बाटल्या लपवून घेऊन त्याच्या कटात स्वतःला सामील करुन घेणारी ,रात्रीच्या अंधारात त्याच्यासोबत दिवसभरातला उन्हं सावल्यांचा खेळही थांबवणारी ......गच्ची .
ठाण्याच्या आनंद टॉकिज मागे असणार्‍या तीन ते पाच मजली इमारतीच्या गर्दीत आमच्याही इमारती वसलेल्या .
जागेच्या भयाण, न सुटलेल्या प्रश्नाला जागलेल्या. ह्याच प्रश्नामुळे त्याची तीन मजली इमारत माझ्या पाच मजली इमारतीला अगदी चिकटून उभी होती .अंतर एवढं कमी की त्याच्या गच्चीवर त्याच्या मित्रांची ,त्याची चाललेली खुसूरफुसूरही आरामशीर ऐकू यायची .त्याचं घर तिसर्‍या माळ्यावर होतं. ठाणे,मुंबई शहराचा एक नियम आहे ,जो अगदी वरच्या ,शेवटच्या मजल्यावर राहातो त्याने गच्ची मनसोक्त वापरायची ,जवळ असते आणि तीन ,चार मजली इमारतीना लिफ्ट ची भानगड नसते .
माझ घर पाचव्या मजल्यावर .घरातल्या प्रत्येक खोलीतनं त्याची गच्ची दिसायची . त्याहीपेक्षा त्या गच्चीवर दिसणारा तो .
सकाळी उठल्यापासून ते कॉलेजला जाईपर्यंत ,कॉलेजवरुन आल्यानंतर ,रात्री उशिरा, आणि वीकेंडमध्ये जमेल तेवढ त्याला गच्चीवर पहायचं .सवयच लागून गेली होती .
पावसाळ्यात त्याच्या गच्चीचं रूप अगदीच रोमँटीक असायचं. भिजायचा पावसात तो .कधी एकटा तर कधी बरेच मित्र असायचे . पण तो एकटा भिजत असताना मी बर्‍याचदा पाहिलंय. आभाळाला दोन्ही हात पसरुन कवेत घेतानाही पाहिलंय.केसांतुन निथळणारं पाणी ,निथळू न देता जोरजोरात मान हलवून झटकताना , बरसणार्‍या आभाळाकडे चेहेरा करुन सरींना स्वत:कडे बोलावतांना , भरदार शरीरावर पावसामुळे अंगाला चिकटून गेलेला ट्रान्स्परंट शर्ट मोकळा करताना . गोल चौकोनी चेहेर्‍याचा तो ..चिंब भेजलेल्या अवस्थेत एखाद्या धबधब्यासारखा वाटायचा .खळखळणारा ,
बघणार्‍याला क्षणभर तरी त्याच्यासोबत भिजावसं वाटावं ..त्याच्या भिजलेल्या श्वासात मिसळुन खोलवर ओलावा जपून ठेवावा .
कधी ह्या पावसात त्याच्या मित्रांसोबत पार्ट्या व्हायच्या .गप्पा,मस्ती सगळच चालू असायचं .हेवा वाटायचा त्याचा .लाइफ खर्‍या अर्थाने एन्जोय करायचा .
माझ्या बेडरूमच्या खिडकीतनं तर त्याची गच्ची म्हणजे अगदी 'शेजारच्या फ्लॅटचंच टेरेस ' इतक जवळ वाटायचं .मी शक्यतो तिथूनच सगळ्यांच्या नजरांपासून स्वतःची नजर लपवून घेत त्याला न्याहाळायची .
बर्‍याचदा गच्चीवर त्याचा अभ्यासही चालू असायचा . सगळीकडे अस्ताव्यस्त पसरलेल्या नोट्स ,पुस्तकं, त्यात मध्यभागी बसून , चांदण्यांनी गच्च भरलेल्या आभाळाकडे एकटक बघत सिगारेट्स फुंकत बसायचा .धुरांची वर्तुळं काढत बसायचा .
त्यावेळी त्याला बघायला सगळ्यात जास्त आवडायचं .चेहेर्‍यावर दिसणारं टेन्शन तो त्या वर्तुळात उभं करायचा .
आणि प्रत्येक सेकंदाला निर्विकार चेहेरा करुन बसायचा . निरागस डोळे तात्पुरती साथ द्यायचे त्याला ,मग पुन्हा एक कश
आणि पुन्हा तोच टेन्शन घालवण्याचा निष्फळ प्रयत्न .
त्यातच , त्या पुस्तकांच्या , अर्ध्या फुंकून फेकलेल्या सिगारेट्सच्या गर्दीतच त्याची पहाट व्हायची. पहाटेचा सूर्य त्याच्या पापण्यांशी खेळायचा .कुणीतरी अगदी प्रेमाने " उठ ना ..." म्हटल्यावर कशी पुन्हा मखमली झोप येते ,तश्या अर्धवट जाग आलेल्या त्याच्या डोळ्यावर रात्री पडलेल्या गोड स्वप्नाचं सावट असायचं.
फोन आणि गच्ची ह्यांच तर एक अतूट नातं होतं . कित्येकदा गच्चीच्या कठड्यावर आतल्या बाजूला पाय अधांतरी सोडुन तासनतास फोनवर गप्पा मारताना पाहिलंय . बोलता बोलता मध्येच हसणं , मध्येच गंभीर होणं ...मध्येच केसातून हात फिरवणं ...इकडे तिकडे चोरटी नजर मारणं ...कठड्यावरुन खाली उतरुन तिथल्या तिथेच शतपावली करणं ...खालून येणार्‍या जाणार्‍यांकडे बघत आपली फोनवरची प्रतिक्रिया आवाजासकट गडद करणं ..जाम खेळायचा स्वतःशीच. खेळायचा आणि खेळवायचाही .
कित्येकदा रात्रीच्या काळोखात, चांदण्यांच्या मंद प्रकाशात कॉफीच्या घोटागणिक त्याला स्वतःत गुंतलेलं पाहिलंय .
रस्त्यावरच्या लायटींचा प्रकाश त्याच्या गच्चीत पडायचा ...त्यातला काहीसा भाग माझ्या खिडकीच्या वाट्यालाही यायचा .
गच्चीच्या कठड्याला टेकून एक पाय गुढघ्यात वाकवून दुसर्‍या पायाच्या लौनीत फिट करुन उभं राहायचा .वाफाळलेल्या कॉफीकडे बघत बघत विचारात बुडून गेलेला तो मला एखाद्या प्रश्नपत्रिकेसारखा वाटायचा ...जणू शोधा माझी उत्तरं .
उन्हाळ्यात त्याच्या गच्चीवर मित्रांची मैफिल भरायची .माझी नजर मात्र त्याच्यावरच खिळलेली असायची .एका हातात बीअरचा टीन घेऊन मित्रांशी क्रिकेटच्या गप्पा मारायचा ...धुंद शराबी डोळे ,त्याच मस्तीत त्याचं बोलणं ,हसणं ..एखाद्या शब्दावर जोर देऊन वाक्य फेकण ..जबरदस्त तोल सावरायचा स्वतहाचा अन ,त्या शब्दांचाही.
त्याला एक सवय होती ,गच्चीच्या कठड्यावर बसून आभाळाकडे एकटक बघायची ...शहारा आणणारी गुलाबी थंडी अंगावर झेलायची ..उगाचच एखादी चांदणी हेरुन तिच्याकडे बघत गालातल्या गालात हसायची . डोळ्यात रात्रीला संपवायची ..अगदी मध्यरात्रहि व्हायची पण तो हलायचा नाही जागेवरुन . ती हेरलेली चांदणी जोवर प्रेमाची कबुली देत नाहि ,तो उठायचाच नाही ..त्याच्या चेहेर्‍यावरच्या सगळ्याच रंगछटा वाचता वाचता मी कधी त्याची चांदणी बनून जायची ,माझं मलाच कळायचं नाही ...पण तो खरंच मुग्ध करुन टाकायचा .
माझ्यासाठी त्याची गच्ची म्हणजे जणू आमचं भेटायच ठिकाण बनलं होतं . त्याच्या येण्याची वाट बघणं ,माझ्या आवडीचं काम. त्याच्या एका कटाक्षानं मनातलं वादळ आपोआप शांत व्हायचं.
कित्येक वर्षानी पुन्हा त्या निशब्द आठवणीत भिजण्याचं कारण म्हणजे "गच्ची मधून खिडकी तुझी" हे गाणं . हे ऐकलं की अजूनही मनातल्या त्या न छेडलेल्या तारांना साद मिळते .पुन्हा श्रावण बरसायला लागतो ..आठवणींच्या मळ्यात लांबवर घेउन जातो ..मी भिजते ,अगदी चिंब चिंब होऊन निघते .आणि पुन्हा त्या गाण्याच्या ओळीत त्याच्या जपलेल्या आठवणींना गोंजारत राहते .
आज ती गच्ची नाहि . त्या ठिकाणी तेरा माळ्यांचं प्रशस्त टॉवर उभं राहिलंय. आजूबाजूचा सगळाच परीसर सुधरण्यापेक्षा बदलला असं म्हणायला हवं. आता तो नाही दिसत, त्याचं भिजणं नाही दिसत ,सकाळच्या उन्हामुळे चिडलेल्या त्याच्या पापण्या नाही दिसत ,कि त्याच्यासोबत हितगुज करणारी ,आणि माझ्याशी त्याच्याविषयी बोलणारी ती गच्चीही नाही दिसत ...पण त्याचा लांबूनच अनुभवलेला सहवास मात्र मनात अजूनहि तसाच ..अगदी ताजा ..पावसाच्या प्रत्येक थेंबासारखा . हवाहवासा वाटणारा ...

ही गर्मी हरामी
स्पर्श तुझा हवा हवा
उन्हातल्या मनातल्या अंधारात या
प्रिया तूच काजवा
फोटो तुझा माझ्या उशाशी
पाहता तुला झाल्या धुंद दिशा कश्या सांग ना ....

कलामांडणीमुक्तकरेखाटनलेख

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

14 Jul 2012 - 10:53 am | मराठमोळा

क्या बात है,

गच्ची (पक्षी: मुक्तक) आवडली.. :) आणि काही गच्च्या आठवून गेल्या. ;)

सुरुवात त्या गाण्याच्या सुरुवातीसारखी वाटली.

आत्मशून्य's picture

14 Jul 2012 - 11:06 am | आत्मशून्य

मजा आली वाचायला.

अर्धवटराव's picture

14 Jul 2012 - 11:37 am | अर्धवटराव

गच्ची सर झालीच पाहिजे :)

अर्धवटराव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jul 2012 - 12:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त....!!!

-दिलीप बिरुटे

अमितसांगली's picture

14 Jul 2012 - 12:36 pm | अमितसांगली

मस्त लिहलय...

मन१'s picture

14 Jul 2012 - 1:54 pm | मन१

सहज गप्पा मारल्यासरखं, कुणाशी थोडस्सं भावनिक होउन बोलल्यासरखं लिहिलेलं वाटलं.
आवडेश.
सिगारेटचं उदात्तीकरण खटकलं.

सगळीकडे अस्ताव्यस्त पसरलेल्या नोट्स ,पुस्तकं, त्यात मध्यभागी बसून , चांदण्यांनी गच्च भरलेल्या आभाळाकडे एकटक बघत सिगारेट्स फुंकत बसायचा .धुरांची वर्तुळं काढत बसायचा .
त्यावेळी त्याला बघायला सगळ्यात जास्त आवडायचं .चेहेर्‍यावर दिसणारं टेन्शन तो त्या वर्तुळात उभं करायचा .
आणि प्रत्येक सेकंदाला निर्विकार चेहेरा करुन बसायचा . निरागस डोळे तात्पुरती साथ द्यायचे त्याला ,मग पुन्हा एक कश
आणि पुन्हा तोच टेन्शन घालवण्याचा निष्फळ प्रयत्न .

बॅटमॅन's picture

14 Jul 2012 - 3:01 pm | बॅटमॅन

यात उदात्तीकरण कुठेय?

मन१'s picture

14 Jul 2012 - 3:46 pm | मन१

सगळीकडे अस्ताव्यस्त पसरलेल्या नोट्स ,पुस्तकं, त्यात मध्यभागी बसून , चांदण्यांनी गच्च भरलेल्या आभाळाकडे एकटक बघत सिगारेट्स फुंकत बसायचा .धुरांची वर्तुळं काढत बसायचा .
त्यावेळी त्याला बघायला सगळ्यात जास्त आवडायचं .

त्यावेळी त्याला बघायला सगळ्यात जास्त आवडायचं
इटॅलिक्स मध्ये दिलेल्या भागासारखे वर्णन नवतरुणांना सिगारेटकडे आकर्षित करण्याचे एक कारण ठरु शकतात.
मुळींवर इंप्रेशन मारायला, स्मार्ट व्हायला म्हणून पौगंडावस्थेतील, टीनएजमधील बरीच पोरे अशी उदाहरणे समोर ठेवतात.
अर्थात लेख्नातला एवढा भाग म्हणजे फार मोठ्ठा इश्यू आहे असे मलाही वाटत नाही, पण होता होइल तितके हे टाळावे ह्या मताचा मी आहे.

शेवटच्या २ वाक्यांशी सहमत.

पप्पु अंकल's picture

14 Jul 2012 - 2:39 pm | पप्पु अंकल

कोण हा भाग्यवान ?

आम्हालाही जाणून घ्यायला आवडेल कोण तो? बाकी लेख एकदम मस्तच

एमी's picture

14 Jul 2012 - 3:18 pm | एमी

छान लिहिलयं!

नितिन थत्ते's picture

14 Jul 2012 - 7:40 pm | नितिन थत्ते

लेखन आवडले.

आजपासून ९० वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींनी खिडकीतून शेजारच्या गच्चीत पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे.- हुकुमावरून (ठाणे पूर्व खाप पंचायत) ;)

जेनी...'s picture

14 Jul 2012 - 7:49 pm | जेनी...

:D

पक पक पक's picture

14 Jul 2012 - 11:07 pm | पक पक पक

आम्हाला पण आवड्ले ,परत हसा.... :bigsmile:
त्या बिल्डींग मध्ये एखादा फ्लॅट आहे काय हो भाड्याने... ;) ठाण्यात बरेच बॅचलर मिपाकर आहेत म्हणे.. :)

स्मिता.'s picture

14 Jul 2012 - 8:09 pm | स्मिता.

एका नवतरूणीचे मुक्तक आवडले.

शिल्पा ब's picture

14 Jul 2012 - 9:42 pm | शिल्पा ब

गोल का चौकोनी चेहर्‍याचा हे आधी ठरवा..बाकी मुलांच्या ट्रांस्परंट शर्टातुन पाहणे याचे उदात्तीकरण बरे नव्हे. उद्या सगळेच जण पातळ शर्ट घालुन फिरायला लागले तर ती तुमची जबाबदारी हे लक्षात असु द्या.

पक पक पक's picture

14 Jul 2012 - 10:57 pm | पक पक पक

उद्या सगळेच जण पातळ शर्ट घालुन फिरायला लागले तर ती तुमची जबाबदारी हे लक्षात असु द्या.

:bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
ओ लिहीतायत चांगल तर लिहु द्या की ,का उगाच धमक्या देउन राह्यलात...? ;)

शिल्पा ब's picture

15 Jul 2012 - 4:31 am | शिल्पा ब

धमकी कसली डोंबलाची!! सावध केलं म्हणा. नैतर उद्या युयुत्सु त्यांच्या घरासमोर मोर्चा घेउन आले तर म्हणायच्या नविन मेंबर असल्यानेच सांगितलं नै म्हणुन.

अगं गोल चौकोणी म्हणजे धड गोलही नै अन धड चौकोणीही नै , गोबर्‍या
गालांची मुलं असतात ना तसा चेहेरा :)
बाकी जबाबदारी घ्यायला तयार आहे ;)

ज्यानी हे मुक्तक म्हणुन वाचुन आनंद मिळवला त्यांचे आभार :)

पक पक पक's picture

14 Jul 2012 - 10:58 pm | पक पक पक

अगं गोल चौकोणी म्हणजे धड गोलही नै अन धड चौकोणीही नै ,
हां! म्हण्जे त्या आर .माधवन सारख्या का..?

सोत्रि's picture

14 Jul 2012 - 10:17 pm | सोत्रि

सुंदर! खुपचं छान!!

चला, कोणालातरी, 'सिगारेट ओढणारे कोणीतरी 'बघायला आवडायचे हे वाचून बरें वाटले.
(मनराव हे उदात्तीकरण नव्हे, जस्ट मनातील एक भावना) ;)

- ('गच्चीचा असा वापर करायचा राहून गेला' अशी हळहळ वाटणारा) सोकाजी

किसन शिंदे's picture

15 Jul 2012 - 12:18 am | किसन शिंदे

'गच्ची' आवडली.

टवाळ कार्टा's picture

15 Jul 2012 - 12:20 pm | टवाळ कार्टा

आवडेश
माझ्याकडे गच्चीकडे बघणारी मुलगी आणि सिगरेट सोडुन (कारण पीत नाही) बाकी सगळे आहे :(

मनोज श्रीनिवास जोशी's picture

15 Jul 2012 - 12:39 pm | मनोज श्रीनिवास जोशी

पूजा : आपले मुक्तक आवडले.

व्वाह! पुजा. अगदी स्वतःभोवती गरगर फिरणारी तूच आलीस डोळ्यासमोर.
बाकि अस चोरुन पहायला मिळण, अन ज्या कुणाला पहातोय तो पहाणेबल असण या दोन्ही गोष्टी जुळण म्हणजे अहो भाग्यम म्हणाय्ला पाहिजे.
लिखाण सुरेख.

जेनी...'s picture

15 Jul 2012 - 5:44 pm | जेनी...

:)

५० फक्त's picture

16 Jul 2012 - 8:22 am | ५० फक्त

मस्त लिहिलंय,

आमच्या आतापर्यंतच्या आयुष्यात आलेल्या गच्च्यांबद्द्ल लिहायचं म्हणलं तर घर किंवा लिहिणं काहीतरी एक सोडावं लागेल,... असो.

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Jul 2012 - 10:31 am | ज्ञानोबाचे पैजार

अग लबाडे तू होतीस का ती? तेव्हाच बोलायचना.... फार वेळ घेतलास सांगायला.
पुला खालुन बरेच पाणी वाहुन गेले आहे मागच्या पन्नास वर्षात.
पण अजुन एवढा काही उशीर झाला नाही.
(अवघे पाउणशे वयमान असलेला)

जेनी...'s picture

16 Jul 2012 - 8:33 pm | जेनी...

:-o

जेनी...'s picture

30 Aug 2015 - 12:33 pm | जेनी...

=))

स्मायली कश्या टाकायच्या :-/

जव्हेरगंज's picture

30 Aug 2015 - 2:20 pm | जव्हेरगंज

लेख वर आणायचा तर असले 'हासरे' प्रश्न विचारत चला लोकहो..

:):-(:-$:So_O^_^^﹏^O_o:O:-\:'(;-):-D:-):-[:-O^O^^m^^/^-.-B-):-!:-*:P~_~-_--_-||>_<*-*#_#>﹏<><(^^)(^_^)(^.^)(';')(^'^)(^m^)(^J^)(^!^)(^_-)(^O^)(^o^)(^q^)(^Q^)(^m^;)(^O^;)(^○^)('∀')!(^^)!T_T(ToT)=.=!=.=@_@(T_T)=_=╰_╯-_-z^_-←_←→_→Orz囧rz≧◇≦(x_x)('o')('ェ')(@@)(*_*)('θ')(?_?)⊙▽⊙⊙△⊙⊙_⊙⊙﹏⊙∩__∩◑__◐◑︿◐◑﹏◐∩﹏∩(ˇˍˇ)('▽'〃)('0ノ'*)('・ω・')(*^^*)(@_@)(^_^;)(=θωθ=)(°ο°)^(oo)^(#^.^#)('~';)>"<|||(¯(●●)¯)(*^_^*)(='?'=)(○'ω'○)(*^0^*)└(^o^)┘(⊙﹏⊙)(⊙o⊙)(*>.<*)(︶^︶)=^_^=::>_<::~w_w~\^o^/︽⊙_⊙︽↖(^ω^)↗o(≧o≦)o(*@?@*)(●^o^●)((^ω^))(=^・・^=)( ̄(工) ̄)↖( ̄▽ ̄")ㄟ( ̄▽ ̄ㄟ)o(︶︿︶)o//(ㄒoㄒ)//

जेनी...'s picture

30 Aug 2015 - 7:11 pm | जेनी...

हिहिहि

गंजु काका एकदम मनकवडे आहात हो तुम्ही ! =))

मी नवीने इथे ... मला खरच स्मायली कश्या टाकाय्च्या
ते कळेना :(

जव्हेरगंज's picture

30 Aug 2015 - 8:11 pm | जव्हेरगंज

गंजु नाही हो आम्ही..
चांगली केसं हाइत 'डोक्यावरती'.

काका तर अजिब्बात नाही.

मांत्रिक's picture

30 Aug 2015 - 4:58 pm | मांत्रिक

इमोटिकाॅन म्हणून नेटवर शोध मारा. पण मला देखील ते जमत नाही. अत्रुप्त बुवांना विचारा. ते खूप वापरतात.

जव्हेरगंज's picture

30 Aug 2015 - 5:12 pm | जव्हेरगंज

स्माय्लि कश्य ताकायच्या इथे ..सान्गाल का कुनि?

पक पक पक - Mon, 13/02/ 2012 - 17: 04
http://www.misalpav.com/filter/tips/1#filter-smileys-0
हे अस्स हेच्यात बघुन टाकायच... :)
प्रतिसाद द्या

हाय्ला भारिये
जेनी ... - Mon , 13/ 02/2012 - 17: 12
हाय्ला भारिये ;-)

>>>>>

नाखु's picture

2 Sep 2015 - 6:42 pm | नाखु

शी आय डी एसीपी ज्व्हेरगंज !!!!

लगता है ये पुराना खिलाडी है!!!

चौथा कोनाडा's picture

30 Aug 2015 - 4:45 pm | चौथा कोनाडा

मस्त मुक्तक ! लेखन आवडले.

एक एकटा एकटाच's picture

30 Aug 2015 - 9:04 pm | एक एकटा एकटाच

मस्त लिहिलय

आवडलं

SAY band च

"गच्ची"
हे गाणं ही झक्कास आहे.
आजही कॉलेजचे मित्र भेटलो की गाडीत हे गाणं वाजतच वाजत.
मजा येते आजही हे गाणं एकत्र मोठ्याने म्हणायला.

माझिया मना's picture

30 Aug 2015 - 10:08 pm | माझिया मना

अापली आवड जमली .. गच्ची गाण्याबद्दल

रातराणी's picture

31 Aug 2015 - 12:16 am | रातराणी

तिच्या नजरेतून पाहिलेला तो आवडला :)

क्रेझी's picture

2 Sep 2015 - 4:52 pm | क्रेझी

क्लास वर्णन केलंय:)

पद्मावति's picture

2 Sep 2015 - 5:32 pm | पद्मावति

मजा आली वाचून.

मांत्रिक's picture

2 Sep 2015 - 6:52 pm | मांत्रिक

अगदी झक्कास मात्र लिहिलंय.

हर्मायनी's picture

2 Sep 2015 - 7:09 pm | हर्मायनी

श्या!!! आमच्या घराला नाहीये गच्ची!! :( :(