(ढिस्क्लेमर : डोक्याचं भजं झाल्यावर आलेल्या विचार-कुंथनातून स्त्रवलेली ही कविता आहे. विचार-मंथन नाही.. हाणा.)
अध्यात्म दर्शन पुराण-बिराण
अतिंद्रीय अनुभवांचा सध्या पूर आहे.
ऊर्ध्वरेतन, डावा उजवा मेंदु जडबंबाळ शब्द प्रकट
मागे फक्त गांजाचा धूर आहे..
"हरवलेल्या" कविता सापडल्या
काय च्यामारी त्रास आहे.
आमंत्रण नव्हतं दिलं वाचायला
वर ह्यांचीच मिजास आहे..
देशाची किती चिंता मला, बघा
तुम्ही साले तत्त्व-संवेदनाविहीन,
खोदून खोदून विषय काढतो
पाडतो कविता त्यांवर निश-दिन..
डायर्या हरवल्या हो माझ्या
पण मिपावर लिहण्याची खाज आहे,
तपापुर्वी नाकारलेल्या कर्जावर
अजुनही चढत व्याज आहे..
माझी चर्चा तेवढी वस्तु-प्रश्ननिष्ठ
तुमची बकवास बात आहे,
अर्धउष्ट्या करपट वैचारीक ढेकरा
ह्यांचा आता आला वात आहे..
जाऊ दे ना भोकात सगळं, चिन्म्या
कशाला घासत बसलाय फुकाची,
बुड वर करुन झोप की साल्या
म्हणे "चिंता करतो मिपाची"...
प्रतिक्रिया
10 Jun 2012 - 9:32 pm | जयंत कुलकर्णी
:-)
मजा घ्या..........:-)
10 Jun 2012 - 10:43 pm | पक पक पक
छान च्छान्न कुंथला आहात... ;) आता बर वाट्तय का.. ? :bigsmile:
10 Jun 2012 - 10:57 pm | चिगो
हो की.. तसंही आजकाल मिपावर "मानसिक स्खलनाने मिळणार्या अनुभूती" वर बरेच काही लिहीले जातेय.. म्हटलं, अनुभव घेऊन पहावा.. :-D
10 Jun 2012 - 10:54 pm | अत्रुप्त आत्मा
@बुड वर करुन झोप की साल्या
मेलो...मेलो... फाट फुट फट्याक 
म्हणे "चिंता करतो मिपाची"... >>>
11 Jun 2012 - 8:08 am | लीलाधर
ओ बुवा सांगा हो त्याला...... चिता चिंता समानास्ती बिंदूमात्र.... कशाला करुन राहीलाय ओ चिंता...... जे चाललंय ते चालुद्या बघुन घेऊ..... :) :-D
10 Jun 2012 - 11:17 pm | पैसा
सुप्परलाईक!
11 Jun 2012 - 8:14 am | श्रीरंग_जोशी
मानले बुवा तुम्हाला....
11 Jun 2012 - 9:03 am | प्रचेतस
लै भारी.
11 Jun 2012 - 9:45 am | पियुशा
जमलिये झकास !!!
11 Jun 2012 - 9:52 am | ५० फक्त
उत्तम असा आरसा दाखवणारं कोणितरी हवंच होतं आपल्याला.
11 Jun 2012 - 10:26 am | अन्या दातार
मस्तच रे! लई आवडेश
11 Jun 2012 - 11:22 am | पिंगू
हाहाहा... साला फुटलो की रे...
- पिंगू
11 Jun 2012 - 11:43 am | जाई.
=)) =)) =))
11 Jun 2012 - 12:00 pm | निश
चिगो साहेब, मस्त, लय, भारी , भन्नाट ,एकदम सही.
11 Jun 2012 - 3:34 pm | गणेशा
आवडेश
11 Jun 2012 - 8:05 pm | चिगो
धन्यवाद दोस्तहो.. :-)
12 Jun 2012 - 9:19 am | स्पंदना
फंडु!!