गुरफटलेली आसवे

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
22 Jan 2012 - 4:34 am

गुरफटलेली आसवे

काळोखात आसवे आपली
दिली-घेतली, गुरफटलेली.
कोणती तुझी? कळलेच नाही.
माझी ओळखलीस का, तूही?

(हुआन रामोन हिमेनेथ याच्या एका स्पॅनिश कवितेवरून)

करुणशांतरसकविता

प्रतिक्रिया

टिप्पणी : प्रत अधिकारमुक्त कविता
मूळ कविता बघण्याकरिता हे गूगलपुस्तक, पृष्ठ ८२, बघावे, शीर्षक : LXIV)

सन्जोप राव's picture

22 Jan 2012 - 6:48 am | सन्जोप राव

फरपटलेली गाढवे
उतारावर चरणारी गाढवे आपली
आपण इकडे जरा...अम्म..अम्म.. गाढवे फरपटली
कोणती तुझी? कळलेच नाही.
माझी ओळखलीस का, तूही?

डिस्क्लेमरः गाढवे चरत असताना मी आणि तू काय केले हे आपण वाचकाच्या कल्पनाशक्तीवर सोडू. कसें?

धनंजय's picture

22 Jan 2012 - 7:09 am | धनंजय

समजले नाही.

परंतु तुमची विडंबने अनेक वाचकांना आवडतात. त्यामुळे हे विडंबनसुद्धा अनेक वाचकांना आवडेल, आणि त्यांच्या प्रतिसादातून मला समजेल अशी खात्री वाटते. समजल्यावर आवडल्याची पावती देईन.

मुळातल्या कवितेतही आसवे मिसळणारे दोघे शरीरसंबंध ठेवणारे असावेत. (कवितासंग्रहाचे नाव "नवविवाहित कवीची रोजनिशी" असे आहे.) परंतु प्रेमिकांच्या प्रत्येक व्यवहारात "ते झ*तात" असा मुद्दाम निर्देश करून दिला, तर प्रेमिकांमधला संबंध पूर्णपणे समजण्यात मर्यादा येते.

नगरीनिरंजन's picture

22 Jan 2012 - 10:28 am | नगरीनिरंजन

गाढवे फरपटली? भरकटली असे लिहीले असते तर किमान थोडा अर्थतरी प्राप्त झाला असता असे वाटले.

गाढवे चरत असताना मी आणि तू काय केले हे आपण वाचकाच्या कल्पनाशक्तीवर सोडू.

झोपा काढल्या, विहीरीत डुंबलो, चिंचा पाडल्या अशा अनेक शक्यता होतात. पण मूळ कवितेत आणि रुपांतरात दोन प्रेमीजीवांच्या अवस्थेचा ठळक अंदाज वाचकाच्या कल्पनाशक्तीतून काढण्याची क्षमता आहे.

मिपावरच्या कविता
रात्रंदिनी सतत प्रसवी
यमकामागे फरफटलेली
कोणती कुणाची? कळतच नाही,
माझी ओळखलीत का, तुम्ही?

राजेश घासकडवी's picture

22 Jan 2012 - 10:30 am | राजेश घासकडवी

या कवितेवरून गुलझारची 'मेरा कुछ सामान' ही कविता आठवली. याच भावनेचा थोडा विस्तार करणारी आहे म्हणून मला जास्त भावली. त्यातल्या काही ओळी.

एक अकेली छत्री में जब
आधे आधे भीग रहे थे
आधे सुखे आधे गीले
सुखा तो मै ले आयी थी
गीला मन शायद बिस्तर के पास पडा हो
वो भिजवा दो
मेरा वो सामान लौटा दो.

थोड्या शब्दात बराच आशय व्यक्त केला आहे. दोन प्रेमिकांना कोणतं तरी कदाचित येणार्‍या वियोगाचं मोठं दु:ख आहे, हे थोडक्यात सूचित केलंय. छान. घासू गुर्जींनी दिलेलं गाणंही समर्पक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jan 2012 - 2:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच रुपांतर आवडले.

-दिलीप बिरुटे

चित्रा's picture

26 Jan 2012 - 8:32 am | चित्रा

थोड्या शब्दात बराच आशय व्यक्त केला आहे.

+१.
कविता आवडली.

>कोणती तुझी? कळलेच नाही.
>माझी ओळखलीस का, तूही?

थोडेसे शरीराबाहेर प्रवेश करून पाहिल्यासारखे वाटले.

धनंजय's picture

24 Jan 2012 - 6:24 am | धनंजय

सर्व प्रतिसादकांचे आभार मानतो.

"मेरा कुछ सामान"ची आठवण एका वेगळ्याच पैलूकडे लक्ष वेधते.

माझ्या मते "मेरा कुछ सामान"चे कथानक फार वेगळे आहे. प्रस्तुत कवितेत गुरफटणे वाढत चालले आहे - प्रेमिकांच्या संमतीने वाढत चालले आहे. अश्रू आहेत त्या दु:खापेक्षाही अश्रूंचाही संगम होत असण्यातला आशावाद... हे प्रस्तुत कवितेचे कथानक आहे.

"मेरा कुछ सामान"मध्ये गुंता आहे, पण गुंता आहे ही निराश बाब वाटते.

विकास's picture

26 Jan 2012 - 11:14 pm | विकास

चारोळी आवडली.

त्यातील आशय लक्षात घेताना (त्यात देखील तुमचे मत समजून घेताना) सुधीर मोघ्यांची खालील चारोळी आठवली:

ना सांगताच तू, मला उमगते सारे
कळतात तुलाही, मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बांध
'कळण्या'चा चाले 'कळण्या'शी संवाद

इन्दुसुता's picture

24 Jan 2012 - 9:11 am | इन्दुसुता

रूपांतर खूप आवडले.
पैसा यांनी म्हटल्या प्रमाणे संभावित/ येणार्‍या वियोगा मुळे आसवे असावित असे वाटत नाही... मला वाटते प्रदीर्घ वियोगानंतर होणार्‍या मीलनातही आसवे असतात प्रेमिकांची ...

प्रस्तुत कवितेत गुरफटणे वाढत चालले आहे - प्रेमिकांच्या संमतीने वाढत चालले आहे. अश्रू आहेत त्या दु:खापेक्षाही अश्रूंचाही संगम होत असण्यातला आशावाद...

हे व्यवस्थित जाणवत आहे. आशावाद आहे तरीही करूण आहे...

श्री. राव यांचे विडंबन अभिरूचीहीन वाटले.

कवितानागेश's picture

27 Jan 2012 - 12:09 am | कवितानागेश

सुंदर...