ट्रक धिना धिन!!

मोहनराव's picture
मोहनराव in जनातलं, मनातलं
21 Nov 2011 - 12:49 am

आपल्याला सगळ्यांना हे माहीतच असेल कि आपल्याकडे ट्रक चालक स्वताच्या ट्रकमागे काहीना काही लिहित असतात. मी या अशा लिखाणाचे खूप निरीक्षण करायचो. मला ते खूप आवडायचे. एकदा गोव्याला मित्रांबरोबर जाताना रस्त्यात एक ट्रक दिसला. त्यामागे ट्रकमधल्या साहित्यिकाने बरेच काही लिहिले होते. वरती तो फोटो लावला आहे. मला स्वताला हा ट्रक चालक नेहमीच एक भावनिक, विचारवंत आणि एक कवी मनाचा वाटत आला आहे. स्वताच्या भावना तो आपल्या ट्रक मागच्या ब्लॉगद्वारे दुसऱ्यांना सांगत असतो.

त्याला स्वताच्या ट्रकवर खूप प्रेम असते. आपल्या ट्रकला तो एक जीवनाच्या साथीदराप्रमाणे जपत असतो. कारण त्याचा बराचसा जीवनाचा काळ या ट्रकबरोबरच घालवत असतो. जीवनामधील अंतर तो लांब अशा रस्त्यामधून आक्रमित असतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालवाहतूक करणे हे त्याचे मुख्य काम. सजवलेला ट्रक पाहताना खूप मजा वाटते. त्या पुढे लावलेल्या झिरमिळ्या, लायटिंग, ते रियर विव्यू मिररवरचे लाल वैष्णव देवीचे कापड जे वाऱ्याबरोबर हेलकावे खात असते किंवा छोटी कोल्हापुरी चप्पल लटकलेली सारे काही ट्रकच्या सौंदर्यात भर घालतात. पण सगळ्यात भारी काम असते ते ट्रकच्या मागे लिहिलेली ग्राफिटी!!

तर या ग्राफिटीमध्ये नेहमी काहीना काही संदेश, विनोद किंवा मागील येणाऱ्या गाड्यांना उचकवण्याचा प्रयत्न केलेला असतो. मला माहित असलेले काही लिखाण इथे टाकतो, तुम्हीही त्यात भर घाला.

नेहमीची एक विनंती असते " Horn Ok please " ती का असते ते नेहमीच कोडे आहे. कदाचित ट्रकच्या आणि मोठ्याने लावलेल्या गाण्याच्या आवाजात ऐकू यावे म्हणून असेल.
काही ठिकाणी " मेरा भारत महान " असा अभिमानी संदेश नाहीतर अगदी उलटे " सौ मेसे अस्सी बेईमान, फिर भी मेरा देश महान " असा खवचट सल्ला.
बाकी काही उचकावणारे संदेश म्हणजे खालीलप्रमाणे
"बुरी नजर वाले तेरा मु काला"

“बुरी नज़र वाले, तेरे बच्चे जियें,

बड़े होकर, देसी शराब पियें”

"नाद करायचा नाय!!"

"दम है तो क्रॉस कर नही तो बर्दाश्त कर"

“चलती है गाड़ी, उड़ती है धूल,

जलतें हैं दुश्मन, बिखरतें हैं फूल.”

कधी कधी तो रोमांटिक होतो आणि म्हणतो:-

“चल हट, कोई देख लेगा”

“देखो मगर प्यार से”

“दुल्हन वही जो पिया मन भाये,

गाड़ी वही जो नोट कमाए”

वैचारीक संदेश खालीलप्रमाणे :-

"समय से पहले और भाग्य से जादा कभी नही मिलता"

“छोटा परिवार, सुखी परिवार”

“एक या दो, बस”

"कंडोम कब कब, यौन संबंध जब जब"

काहीजण आपली कृतज्ञता व्यक्त करतात.

"आई वडिलांचा आशीर्वाद", "नानांची कृपा", "दादा वहिनींची कृपा"

अशी हि सगळी ग्राफिटी नेहमीच आकर्षक असते. ते वाचण्याचा, एक लांबच्या प्रवास करत असलेल्या प्रवाशाला काही क्षण का असेना विरंगुळा असतो. तुम्हीही कुठे पहिली असेल अशी ग्राफिटी तर या ट्रक साहित्यात भर घाला. ;)

(प्रेरणा आणि संदर्भ:- ट्रकमागील ग्राफिटी)

प्रवाससमाजअनुभव

प्रतिक्रिया

रेवती's picture

21 Nov 2011 - 1:01 am | रेवती

थांब लक्षुमी कुंकू लावते.
नाना, पप्पू, टिल्लू, सोहम, मिणाक्षि, आण्णा.
शिवाय सूरतपे ना जा असलं काहीरती
जय भोलेनाथ

जोशी 'ले''s picture

21 Nov 2011 - 8:13 am | जोशी 'ले'

Horn ok please तर मला Tested Ok सारख वाटतं , त्याशिवाय RTO परमीशन देत नाही का काय देवलाच ठाउक :-) तसेच जवळपास सर्वच ok खाली एक सीनरी पेंट केली असते ज्याचा ढाचा कन्याकुमारी ते कश्मिर एकच असतो ..दोन्ही बाजुला दोन डोंवर , दोन झाडे मधुन पडनारा एक धबधबा आणि नदित बोटीत बसलेले दोन माणसे.…कदाचित ते ट्रक पेंटर चे qualification असावे

श्री गावसेना प्रमुख's picture

21 Nov 2011 - 8:33 am | श्री गावसेना प्रमुख

,उठ मुर्द्या खीर खा,चलती है गाड़ी, उड़ती है धूल,

जलतें हैं दुश्मन, खिलते(बिखरते नव्हे) हैं फूल.अठ्याण्णव के फुल नब्बे कि माला बुरी नजर वाले तेरा भि हो भला

अन्या दातार's picture

21 Nov 2011 - 9:22 am | अन्या दातार

बघतोस काय, मुजरा कर!

प्रास's picture

21 Nov 2011 - 10:02 am | प्रास

"रस तितलियाँ चूसती हैं, भँवरे बदनाम होते हैं

शरारत लडकियाँ करती हैं, ड्राईवर बदनाम होते हैं"

:-)

एक्झॅक्टली.. हेच लिहायला आलो होतो.. पण मी पाहिलेली व्हर्शन थोडी वेगळी आहे.

तितलियाँ रस चूसती हैं, पर भँवर बदनाम होता हैं
दुनिया रोलिंग फिराती है पर चंद्रमा बदनाम होता हैं..

सुहास झेले's picture

21 Nov 2011 - 6:05 pm | सुहास झेले

लैच भारी :) :)

धमाल मुलगा's picture

21 Nov 2011 - 11:23 am | धमाल मुलगा

गेल्या काही दिवसांपुर्वीच एक ट्रकच्या मागे लिहिलेलं वाक्य पाहिलं आणि ते लिहिणार्‍या दार्शनिकाबद्दल मनात अपार आदर दाटून आला. :)
वाक्य होतं:
"आयुष्यात मांजरापेक्षा माणसंच जास्त आडवी येतात"
आणि त्याखाली :
"खेळ कुनाला दैवाचा कळला"

खलास! आम्ही जागेवर नतमस्तकच. :)

घाटावरचे भट's picture

21 Nov 2011 - 11:08 pm | घाटावरचे भट

"विठ्ठल रखुमाईच्या आशीर्वादाच्या लाटा, म्हणून चालते ही जगदाळेची टाटा"

(आता 'आशीर्वाद' लिहिलं होतं का नेहेमीप्रमाणे 'आर्शीवाद' ते आठवत नाही. पण हिरव्या रंगाची १२१०एसई होती, भोरकडं पाहण्यात आली. बघा कुणाला सापडली तर.)

सविता००१'s picture

21 Nov 2011 - 11:55 am | सविता००१

चला जितने जोर से चला सकता है, हवा में ऊडा दूंगा,
और ज्यादा चाहता है तो खुदा से भी मिलवा दूंगा........

आप्पा कावत्यात
सरकारी नोकरी और भाडे कि छोकरि दोनो का कोई भरोसा नहि.
पप्पा शान्ताराम
जर मोठि Trolly असेल तर त्याच्या पाठिमागे लिहिलेले असते.
माफ करना भाईसाहाब जरा लम्बा हु.

मोहनराव's picture

21 Nov 2011 - 1:42 pm | मोहनराव

रेवती, जोशी 'ले', श्री गावसेना प्रमुख, अन्या दातार, प्रास, गवि, धमाल मुलगा, सविता००१ व राजा तुमचे ट्रक साहित्यात भर टाकण्यासाठी धन्यवाद!!

आदिजोशी's picture

21 Nov 2011 - 2:56 pm | आदिजोशी

ह्या मागचं लॉजिक असं आहे:-

Horn - म्हणजे डाव्या साईडने ओवरटेक करायचा असेल तर हॉर्न वाजवा.
OK - मागून फॉलो करत यायचं असेल तर करा / हरकत नाही.
Please - उजव्या साईडने ओवरटेक करायचं असेल तर खुशाल करा आणि मोकळे व्हा. हॉर्नची गरज नाही.

माताय हे माहितच नव्हतं हो.

कपिलमुनी's picture

21 Nov 2011 - 3:29 pm | कपिलमुनी

या पूर्वी येउन गेलेले असे http://www.misalpav.com/node/8574 अनेक धागे सापडतील ..
पण धागा प्रसवण्याची हौस ( खाज लिहायची इच्छा मारली) कशी टाळणार हा प्रश्न आहे..
धागा टाकण्यापूर्वी गूगल शोध / मि पा शोध वापरण्याचे कष्ट सुद्धा मोहनराव घेत नाहित..
बाकी साहित्यिक मुल्याच्या नावाने ठणठण आहेच ..स्वे तचे असे नवीन / अभिनव काहिही नाही..

बाकी पुढच्या धाग्यासाठी "संत गाडगे बाबा स्वच्छता अभियाना मधील पाट्या" हा विषय सुचवतो

या पूर्वी येउन गेलेले असे http://www.misalpav.com/node/8574 अनेक धागे सापडतील ..

मान्य.

बाकी साहित्यिक मुल्याच्या नावाने ठणठण आहेच ..स्वे तचे असे नवीन / अभिनव काहिही नाही..

मोहन्रावांची वाटचाल पहाता त्यांच्या नावावर २ धागे दिसले. एक हा आणि दुसरा हा
पण दुसर्‍याला नावं ठेवणार्‍या कपिलमुनींची पाटी मात्र कोरी आहे. :)

मोहनराव's picture

21 Nov 2011 - 4:29 pm | मोहनराव

मला आधीचे धागे सापडले नव्हते. कोणाला या धाग्यावर आक्षेप असेल तर तो संपादकांनी उडवुन टाकावा ही विनंती!!

कपिलमुनी's picture

21 Nov 2011 - 4:43 pm | कपिलमुनी

अगदी अजित पवार थाटात विचारलत कि "यांना शेतीमधला काय कळता" तसा "यांना लेखामधला काय कळता ..."

उत्तम कळायला , उत्तम लिहावच लागता असे नाही ..
समिक्षक आणि लेखक यांमधे हा फरक असतोच ..

हर्ष भोगले म्हणाला , रैनाचा पूल चुकतो तर त्याला लगेच बॅट देउन सांगायचा का दाखव बघु मारुन ??

आम्ही रसिक . लेखनाची दैवी देणगी आम्हांस लाभली नाही . परंतु तीचा स्वाद आणि समीक्षा आम्हांस आवडते..

असो ..कोर्‍या पाटीवर रेघोट्या ओढायचा प्रयत्न केला जाइल

* मि पा धोरणा मधे "जिनके खुद के धागे नहि होते , वो दुसरोके धागेपर पत्थर नही फेका करते" असे लिहावे का ??

( ह. घ्या.)

व्यनीला उत्तर दिले आहेच..
पण इथे प्रतिसाद दिसला म्हणुन....

बाकी साहित्यिक मुल्याच्या नावाने ठणठण आहेच ..स्वे तचे असे नवीन / अभिनव काहिही नाही..

असं कस म्हणता आपण?
त्यांनी पहिल्या धाग्यात स्वत:ची कल्पकता दाखवली आहेच ना. तिथे सोईस्करपणेदुर्लक्ष झालं आहे.
येवढेच म्हणतो.

आम्ही रसिक . लेखनाची दैवी देणगी आम्हांस लाभली नाही . परंतु तीचा स्वाद आणि समीक्षा आम्हांस आवडते..

सर्वांनाच लिहिता येत नाही. मान्य. (याच उत्तम उदाहरण म्हणजे मीच. :))

असो ..कोर्‍या पाटीवर रेघोट्या ओढायचा प्रयत्न केला जाइल

जरुर प्रयत्न करा.
कुणी सांगावे आपल्या आत एखादा उद्याचा नामवंत लेखक्/कवी/कलाकार दडलेला असावा. :)

बाकी या धाग्याबद्दलचा आक्षेप समजु शकतो. मी वर तस मान्य केलेलं ही आहेच.

मोहनराव's picture

21 Nov 2011 - 5:50 pm | मोहनराव

गणपा आपला आभारी आहे समजुन घेतल्याबद्दल!! जुन्या जाणत्या लो़कांनी प्रोत्साहन दिले तरच नवोदित लेखकांना उत्साह येईल!! नाहीतर रिकामे लोक बसलेच आहेत खडे मारायला.. चला पळा कप्या लागतय आता मागं धोंडा घेउन!! ;)

प्रास's picture

21 Nov 2011 - 4:54 pm | प्रास

संपादक झाल्यापासून गणपा शेठांचा नवा पैलू प्रकाशात येऊ लागलाय. आधी ते लोकांना पाकृ करण्याला उद्युक्त करायचे.

कोर्‍या पाटीवर रेघोट्या ओढायचा प्रयत्न केला जाइल

आज काल गणपाभौ लोकांना लिहितेही करू लागलेत.

वा! वा! लगे रहो गणपा!

:-)

मी-सौरभ's picture

21 Nov 2011 - 5:29 pm | मी-सौरभ

गणपा भौ!!

नवोदित लेखकांना उत्तेजन देण्याचे कार्य असेच चालू दे पण तेवढ पोटापाण्याकडच लक्ष कमी करु नका ;)

बाकी
मोहनराव : तुमच्या धाग्यावर अजून एक ऐकीव माहिती
आणिबाणी च्या काळात ट्रकवर 'मेरा भारत महान' लिहीण अनिवार्य होत म्हणे.
काका काकू यावर अधिक प्रकाश टाकून आम्हा मुलांना या वर अधिक माहिती देऊ शकतील का??

सर्व वाक्ये साभारः गुगल बझ

' मेरा भारत महान '

" बघतोस काय ? मुजरा कर .....! "

बघतोस काय रागाने , ओव्हरटेक केलंय वाघाने!

" बघ माझी आठवण येते का ?"

" पाहतेस काय प्रेमात पडशील "

"साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस."

अं हं. घाई करायची नाही.

तुमच्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही

" गपगुमान माझ्या मागं मागं सांग-लीला येतीस का ?"

" तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार.. "

" अहो , इकडे पण बघा ना... "

" हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर".

"थांब लक्ष्मी कुंकू लावते!"

"तुमचे लक्ष आमच्याकडे का ?"

" लायनीत घे ना भाऊ"

"चिटके तो फटके!"

"राजे तुम्ही पुन्हा जन्माला या"

"अयोध्या , बेळगाव , कारवार् , निपाणि , इंदौर् , गुलबर्गा , न्यू जर्सी , ह्युस्टन , सॅन्टा क्लारा , सनिव्हेल , फ्रिमॉन्ट् , हेवर्ड , बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे."

"१३ १३ १३ सुरूर !"

" नाद खुळा"

" हाय हे असं हाय बग"

"आई तुझा आशिर्वाद."

" सासरेबुवांची कृपा " -----

" आबा कावत्यात!"

पाहा पन प्रेमाणे

नवतीचा नखरा , गुलजार पाखरा , खरा न धरा , भैरोबा-भैरोबा स्मरा.

" हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात!"

"अच्छा , टाटा , फिर मिलेंगे."

"हरी ओम हरी , श्रीदेवी मेरी..."

"योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये.."

"वाट पाहिन पण एस टी नेच जाईन."

"गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी"

"हेही दिवस जातील"

"नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा"

"घर कब आओगे ?"

"१ १३ ६ रा"

"सायकल सोडून बोला"

"हॉर्न . ओके. प्लीज"

"नानाचा जोर...पप्पु , पिंकी , छोटी , चिंटु , ताई , अमोल , बबलु"

एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून)

"तुमच्या वाहनात ऊस , कापूस , कणसं माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा "

बाकईच्या मागे सापडलेली काही वाक्ये--

सुसाईड मशिन

मिसगाईडेड मिसाईल

मॉम सेज नो गल्स

बाई(क) च्या मागे नका लागु...माझ्याशी गाठ आहे...

एका ट्रक च्या मागे लिहले होते: राजू , चिंटू , सोनू ....!

अणि खाली लिहले होते .....

बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !

एका टेम्पोच्या मागे लिहिलेले: "माझ्याशी पैज लावू नका लय भरी पडेल " आणि खाली लिहिले होते....

" ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)

अजस्त्र डंपरच्या पाठीमागे

उगीच हॉर्न वाजवू नये

तुला चिरडायला एक सेकंद पुरेल

एका टेम्पोच्या मागे..

आलात आनंद , बसलात अत्यानंद , उतरलात परमानंद!

आत्ता एक आठवलं.
आमच्या कॉलनीत एक सॅन्ट्रो पार्क केलेली असते.
तिच्या मागच्या काचेवर एक विमानाचं चित्र आणि लिहीलेलं आहे -
Pilots are just plane peoples!
( मिपाच्या भाषेत कारमालक पायलट आहे हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न ;-) )

दादा कोंडके's picture

21 Nov 2011 - 11:27 pm | दादा कोंडके

पुण्यात एका सँत्रोच्या मागे "intelligent engineer inside" असं लिहिलं होतं!