✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एक रम्य संध्याकाळ!!

म
मोहनराव यांनी
गुरुवार, 10/20/2011 - 00:00  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकरहो!! मी इथे (संकेतस्थळावर) खुप दिवस असलो तरी आज लिहीता झालो. हा माझा पहिला धागा आहे. तरी कृपया सांभाळुन घेणे ही विनंती. तर एका रम्य परंतु थंड अशा रविवार संध्याकाळी रुमवर आराम करत पडलो होतो. इकडचा (जर्मनी) उन्हाळा संपुन फॉल (मराठीत शब्द माहित नाही... पानगळती का?) चालु झालाय. थंडी चालु झाल्यामुळे बाहेर जास्त पडावेसे वाटत नाही. पण थोडेसे ऊन असल्यामुळे लोक बाहेर पडले होते. तसेही इकडचे लोक थोडेसे जरी सुर्याचे दर्शन झाले की बाहेर पडायला उत्सुक असतात. आपल्याला त्याचे जास्त कौतुक नाही. पण शेवटी लोळण्याचापण कंटाळा आला...मग पडलो बाहेर कॅमेरा काढुन. आमच्या कॉलनीमागे एक मस्त ओल्पर नावाचे तळे आहे. त्याच्या बाजुनेच जॉगिंग ट्रॅकसुद्धा आहे. खुप लोक सकाळ संध्याकाळ जॉगिंग करत असतात. मी सुद्धा जॉगिंगचे प्रयत्न केलेत पण आजतागायत कायमपणा ठेवता आलेला नाही. असो. पण फिरायला जातो. तर जरा या रम्य संध्याकाळचे फोटो काढले आहेत. ते इथे चिकटवतो. ही जाण्याची वाट... कानात मस्त आयपॉड लावुन जगजीत साहेबांच्या गझल ऐकत निघालो होतो... मध्येच आकाशात एक चॅटर प्लेन चाल्ले होते.. एक क्लिक मारला जाता जाता.. एक जोडपे फिरायला निघालेले चिरंजिवांबरोबर... मग दिसला तो राजहंस... याच्याबद्द्ल शब्दात काय वर्णन करणार? बाकी थोडे चालु झालेल्या फॉलचे फोटोज.. हे ते नयनरम्य तळे... सुर्व्या आला तळपुन गेला.. मावळतीच्या खळगालीला...(पण जास्त तळपत नाहीये आजकाल :( .... ) हे जोडपेपण मस्त मजा लुटत आहे.. नंतर काय झाले काय माहित... भांडले कदाचीत... ती त्याला सोडुन पळाली... :( आणि मग आम्हीसुद्धा घराकडे पळालो...काय करणार थंडी वाढत होती... (कॅमेरा साधाच डिजीट्ल आहे.. आणि मी शिकाऊ छायाचित्रकार आहे.. :) एसलआर घ्यायचा इरादा आहे.. कृपया चांगला कॅमेरा जाणकार लोकांनी सुचवणे..)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
19254 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

फोटो आवडले. हे ठिकाण तुमच्या

रेवती
गुरुवार, 10/20/2011 - 00:06 नवीन
फोटो आवडले. हे ठिकाण तुमच्या घरापासून जवळ असेल तर असेच फोटू बर्फ पडल्यावर (याच ठिकाणांचे) घेतले तर फरक लक्षात येईल. सहज गंमत म्हणून एक अ‍ॅक्टीव्हिटी.
  • Log in or register to post comments

हो नक्कीच!!

मोहनराव
गुरुवार, 10/20/2011 - 00:11 नवीन
ही कल्पना आहे माझ्या डोक्यात!! धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मस्त फोटो!

पैसा
गुरुवार, 10/20/2011 - 00:15 नवीन
पहिल्यांदाच लिहिलय म्हणताय , पण सोबत टिप्पण्याही आवडल्या!
  • Log in or register to post comments

छान!! आवडले फोटू!

प्राजु
गुरुवार, 10/20/2011 - 00:21 नवीन
छान!! आवडले फोटू!
  • Log in or register to post comments

अप्रतिम फोटो

बहुगुणी
गुरुवार, 10/20/2011 - 01:23 नवीन
अप्रतिम फोटो आणि तितकीच सुंदर स्थळांची आणी वेळेची निवड. (लिखाणाचा पहिला प्रयत्न वाटला नाही :-)) आणखी येऊ द्यात.
  • Log in or register to post comments

मस्त फटू आहेत.

आत्मशून्य
गुरुवार, 10/20/2011 - 01:44 नवीन
.
  • Log in or register to post comments

+१

मी-सौरभ
गुरुवार, 10/20/2011 - 16:26 नवीन
या मलिकेचा पुढचा भाग बघण्यास उत्सुक आहे... पु.फो.शु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

मस्त फोटो आहेत. पण काय हो, ती

शिल्पा ब
गुरुवार, 10/20/2011 - 03:21 नवीन
छान लिहिलंय आणि फोटोही मस्त आहेत. पण काय हो, ती सोडुन गेलेली बदकीणच कशावरुन?
  • Log in or register to post comments

बदकीणच

शाहिर
गुरुवार, 10/20/2011 - 12:37 नवीन
मोहन रावांचे अनुभवाचे बोल असतील ते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

पण काय हो, ती सोडुन गेलेली

यकु
गुरुवार, 10/20/2011 - 22:17 नवीन
पण काय हो, ती सोडुन गेलेली बदकीणच कशावरुन? ढिश्कँव्व!!!!!! ==== >!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

बदक असावे...

प्रभाकर पेठकर
Fri, 10/21/2011 - 13:04 नवीन
बदक असावे (मान खाली, खांदे पडलेले). बहुतेक, भाजी आणायला निघाले असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

सुंदर फोटो. असे ठिकाण आपल्या

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 10/20/2011 - 06:46 नवीन
सुंदर फोटो. असे ठिकाण आपल्या घराच्या मागे आहे हे बघून आपला हेवा वाटला आणि आपण तेथे दररोज चालायला जात नाही हे वाचून वाईट वाटले.
  • Log in or register to post comments

फोटो अतिशय छान.

प्रचेतस
गुरुवार, 10/20/2011 - 09:09 नवीन
फोटो अतिशय छान.
  • Log in or register to post comments

छान आलेत फोटो

जाई.
गुरुवार, 10/20/2011 - 09:14 नवीन
छान आलेत फोटो
  • Log in or register to post comments

सुंदर फोटु.

मदनबाण
गुरुवार, 10/20/2011 - 09:44 नवीन
सुंदर फोटु. :)
  • Log in or register to post comments

छान!! विशेषतः वरून ४था आणी तो

किसन शिंदे
गुरुवार, 10/20/2011 - 09:57 नवीन
छान!! विशेषतः वरून ४था आणी तो एक राजहंस...हे दोन जास्त आवडले. सुर्व्या आला तळपुन गेला.. मावळतीच्या खळगालीला... ते खळगालीला नाहीये हो, मावळतीचा खळगा ल्याला... असं आहे.
  • Log in or register to post comments

मस्त फोटो

हुप्प्या
गुरुवार, 10/20/2011 - 10:40 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments

मस्त रे !!

दीप्स
गुरुवार, 10/20/2011 - 11:16 नवीन
पहिलाच प्रयत्न आहे म्हणताय पण छानच लिहिलेकी तुम्ही. फोटो पण छान आहेत आणि रेवती ताई बोलल्याना त्या प्रमाणे फोटो काढा मस्त आणि टाका पुन्हा या धाग्यावर. काय हो एक विचारू का ?? जाऊ द्या विचारते लगेच कारण तुमचे उत्तर यायला बराच अवकाश जाणार ना ?? तो पर्यंत खूप उशीर होईल हो म्हणून विचारते आहे - तुमच्या कॉलनीमागेच आहे ना हि सुंदर जागा मग जात का नाही तुम्ही जॉगिंगला?? अहो एवढे सुंदर, निसर्गरम्य ठिकाण असतांना तुमचे पाय घरात राहतात तरी कसे ??
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!

मोहनराव
गुरुवार, 10/20/2011 - 12:58 नवीन
तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!! जयंत कुलकर्णी आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे मी जातो हो कधीकधी फिरायला.. माझे ते सर्वात आवडते ठिकाण आहे. पण कामाच्या रगाड्यातुन व कधीकधी आळसामुळे नाही जमत... या जर्मन लोकांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो..उन पाऊस थंडी काहीही असुदे रोज जॉगिंग करतात. तो जॉगिंग ट्रॅक साधारण १.५ किमीचा वर्तुळाकार पट्टा आहे. एक फेरी मी कशीबशी जॉगिंग करत पुरी करतो. हे लोक ४-४ फेर्‍या (न थांबता) आरामात मारतात. आणि आपण कसे जरा तब्येतीबद्दल जागरुक झालो की व्यायाम चालु करतो. पण इथे फिट लोकसुद्धा रोज व्यायाम करुन घाम गाळतात. ( पाश्चात्यांचे म्हणुन कौतुक करत नाही पण शिकण्यासारखे जरुर आहे..) मी नियमितपणे जाण्याचे प्रयत्न चालु ठेवलेत.. (अवांतर: आळसावरुन आठवले..माझा एक आळशी मित्र नेहमी म्हणायचा.. "आळस हा माणसाचा शत्रु आहे, म्हणुन मी त्याला मित्र बनवला आहे.. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीप्स

होका ??

दीप्स
गुरुवार, 10/20/2011 - 13:32 नवीन
होका ?? मग छान छान लगे रहो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

"आळस हा माणसाचा शत्रु आहे,

वपाडाव
गुरुवार, 10/20/2011 - 14:05 नवीन
"आळस हा माणसाचा शत्रु आहे, म्हणुन मी त्याला मित्र बनवला आहे..
तसेच, गरज ही शोधाची जननी आहे अन आळस हा त्याचा बाप आहे हे वाक्य आम्ही म्हणायचो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

जर्मनीचे? जर्मनीचे असूनही

Nile
गुरुवार, 10/20/2011 - 12:45 नवीन
जर्मनीचे? जर्मनीचे असूनही एकाही फोटोत तुमचे दर्शन नसल्याने फाऊल धरण्यात येत आहे. ;-)
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

शिल्पा ब
गुरुवार, 10/20/2011 - 12:48 नवीन
हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

हम्म.. !!

मोहनराव
गुरुवार, 10/20/2011 - 13:22 नवीन
स्वताचे फोटु काय काढायचे हो.. ते तर नेहमी काढतोच की!! आता त्या राजहंसासमोर आमचं ते ध्यान म्हणजे काय दिसणार? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

सुंदर

सुधांशुनूलकर
गुरुवार, 10/20/2011 - 13:34 नवीन
फार मस्त. असेच लिहित रहा.
  • Log in or register to post comments

प्रत्येक फटु डेस्कटॉपवर

वपाडाव
गुरुवार, 10/20/2011 - 14:07 नवीन
प्रत्येक फटु डेस्कटॉपवर लावण्याजोगा आलाय..... किसन म्हणतोय त्या प्रमाणे ४ था अन राजहंस यांचा ब्येष्ट..... कौशल्य हे क्यामेरात नाही तर तर चित्र बंदिस्त करणाराच्या हाता-डोळ्यात असते...... एनिवेज.... कॅरी ऑन....
  • Log in or register to post comments

अप्रतिम फोटो आहेत सगळे

गणेशा
गुरुवार, 10/20/2011 - 16:31 नवीन
अप्रतिम फोटो आहेत सगळे ... मस्त एकदम ... जोडप्याचा अआणि त्यांच्या सायकल वरील मुलाचा फोटो अप्रतिम .... तुमच्या घरा जवळ इतकी सुंदर जागा आहे याचा हेवा वाटला...
  • Log in or register to post comments

उत्तम चित्रे

सर्वसाक्षी
गुरुवार, 10/20/2011 - 16:47 नवीन
निसर्ग चित्रण आवडले. काही चित्रांत सावल्यांचा वापर सुरेख केला आहे.
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख!

स्मिता.
गुरुवार, 10/20/2011 - 17:01 नवीन
मोहनराव, रम्य संध्याकाळीचे फोटो खूपच सुरेख आहेत. तुमच्या घराच्या मागेच एवढी सुंदर जागा आहे म्हणजे तुम्ही खरंच फार नशिबवान आहात! रेवतीताईंनी दिलेली आयडिया मस्तच आहे.
  • Log in or register to post comments

सगळेच फोटो सुरेख

गणपा
गुरुवार, 10/20/2011 - 17:01 नवीन
सगळेच फोटो सुरेख 'काढलेत'. लिहायचा पहिलाच प्रयत्न असला तरी मिपावर मुरलेले वाचक दिसताय. :) पुलेशु. :)
  • Log in or register to post comments

अप्रतिम

सचिन राव
गुरुवार, 10/20/2011 - 17:28 नवीन
अप्रतिम फोटो आहेत सगळे ...छान मस्त....................
  • Log in or register to post comments

जबरदस्त फोटो काढलेत, कालच

५० फक्त
गुरुवार, 10/20/2011 - 17:31 नवीन
जबरदस्त फोटो काढलेत, कालच प्रभोच्या धाग्यातुन एक फोटो उचलला होता वॉलपेपरसाठि आता इथुन पण एक दोन उचलतो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मस्तच....फोटो झकास..

निवेदिता-ताई
गुरुवार, 10/20/2011 - 20:35 नवीन
मस्तच....फोटो झकास..
  • Log in or register to post comments

मस्त फोटो..

प्रभो
गुरुवार, 10/20/2011 - 20:43 नवीन
मस्त फोटो..
  • Log in or register to post comments

मोहनराव, मस्त फोटो आले

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 10/20/2011 - 20:46 नवीन
मोहनराव, मस्त फोटो आले आहेत. और भी आने दो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मस्तं....

प्रभाकर पेठकर
Fri, 10/21/2011 - 13:01 नवीन
सर्व छायाचित्रे मस्त आहेत. छायाचित्र शास्त्रातील एक मुलभूत विधान वाचलं आहे की Nature never deceives. अर्थात, निसर्ग कधी फसवत नाही. त्या मुळे हे शास्त्र शिकताना निसर्गाची छायाचित्रे काढत सुरुवात केली की उत्साह वाढत जातो. शुभेच्छा..!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा