बृहन्महाराष्ट्र मंडळाची प्रतीक/घोषवाक्य स्पर्धा!

चित्रा's picture
चित्रा in जनातलं, मनातलं
20 Nov 2011 - 10:39 pm

प्रेषक: राधा गुर्जर, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (बीएमएम) २०१३ मधील अधिवेशनाच्या मार्केटिंग कमिटीसाठी.

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (बीएमएम) अधिवेशन म्हटले की अमेरिकेतील मराठी माणसांचा उत्साह अगदी अवर्णनीय असतो. १९७३ पासून दर दोन वर्षांनी बीएमएमचे अधिवेशन ही आता एक परंपराच झाली आहे. यावेळचे हे २०१३ चे अधिवेशन बॉस्टनमध्ये म्हणजे अमेरिकेतील विद्येच्या माहेरघरी भरणार आहे. त्यानिमित्ताने जवळजवळ चार ते पाच हजार मराठी मंडळी अमेरिकेच्या कानाकोपर्‍यांतून बॉस्टनला येणार असा अंदाज आहे. बीएमएमचे अधिवेशन म्हणजे तीन दिवस मजाच मजा, खाण्यापिण्यासाठी चविष्ट पदार्थ, मनोरंजनासाठी विविध लक्षवेधी कार्यक्रम, म्हणजे चोखंदळ मराठी रसिकांसाठी अगदी पर्वणीच म्हणा की! यापूर्वी म्हणजे १९९७ साली हे अधिवेशन बॉस्टनमध्येच झाले होते, आणि त्यावेळीही हे अधिवेशन बॉस्टनमधील मंडळींनी अतिशय उत्साहाने आणि आनंदाने अनेक दर्जेदार कार्यक्रम देऊन पार पाडले होते, तसेच ते २०१३ मध्येही होणार आहे अशी खात्री आहे. शिवाय यावेळी मागचा अनुभव गाठीशी असल्याने ते अधिकच चांगले होईल, कारण नव्या मंडळींना अनुभवी मंडळींची साथ, म्हणजे दुधातच साखर! यावेळीही अमेरिकेतील आणि अमेरिकेबाहेरील आपण सर्व अधिवेशनात सहभागी होऊन आम्हा बॉस्टनवासियांचा आनंद वाढवाल ही आशा आहे. असे २०१३ साली तर आपली भेट होईलच, पण सध्या तरी उत्तर अमेरिकेतील तुम्ही सर्व कागद पेन्सिल, आणि लॅपटॉप जे काही मिळेल ते घेऊन सज्ज व्हा, आणि अधिवेशनाच्या समितीने नुकत्याच जाहीर केलेल्या प्रतीक/घोषवाक्य (लोगो/स्लोगन) स्पर्धेमध्ये भाग घ्या कसे!
------------------------------------------------
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाची प्रतीक/घोषवाक्य स्पर्धा:
(स्पर्धेचे नियम बीएमएम २०१३ च्या http://www.bmm2013boston.com/ या संकेतस्थळावरून साभार. स्पर्धेचा मूळ मसुदा तयार करणार्‍या श्री. श्रीनिवास साने यांचेही आभार. मूळ मसुदा बीएमएम बॉस्टनच्या संकेतस्थळावर बघता येईल.)
बॉस्टन येथे होणार्‍या BMM अधिवेशनाच्या संयोजक समितीने घोषवाक्य आणि प्रतीकचिन्हाची स्पर्धा आयोजित केलेली आहे. विजेत्या स्पर्धकाला २०१३ च्या अधिवेशनात विनामूल्य प्रवेश दिला जाईल. तसेच अधिवेशन स्मरणिकेत विजेत्या स्पर्धकाचे छायाचित्र प्रकाशित केले जाईल.
---------
स्पर्धेविषयी महत्त्वाची सूचना (प्रेषकः चित्रा, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (बीएमएम) २०१३ मधील अधिवेशनाच्या मार्केटिंग कमिटीसाठी. )
स्पर्धेसंबंधी कोणतेही बदल झाल्यास बीएमएम किंवा मार्केटिंग कमिटी प्रत्येक स्पर्धकास हे स्वतंत्रपणे कळवू शकणार नाही, त्यामुळे या बदलांविषयी सूचना आहेत का, हे वेळोवेळी बीएमएमच्या २०१३ च्या अधिवेशनाच्या संकेतस्थळावर (http://www.bmm2013boston.com/) जाऊन पाहण्याची जबाबदारी पूर्णपणे स्पर्धकांची असेल. स्पर्धा मोकळ्या वातावरणात व्हावी यासाठी बीएमएमच्या ज्या समितीतील सदस्य या स्पर्धेसाठी परीक्षक असतील त्यांच्या आप्तांना/नातेवाईकांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही असे जाहीर केले गेले आहे. तसेच प्रवेशिका परीक्षकांकडे पाठवताना स्पर्धक/प्रेषकांबद्दलची कसलीही माहिती परीक्षकांपर्यंत पोचू शकणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल.
--------

ही स्पर्धा उत्तर अमेरिकेतल्या सर्व मराठी/ अमराठी व्यक्तींसाठी खुली आहे.

ह्या स्पर्धेत भाग घेण्यास उत्सुक आणि इच्छुक असलेल्यांनी आपले घोषवाक्य आणि/ अथवा प्रतीकचिन्ह, ३१ डिसेंबर २०११ पर्यंत श्रीनिवास साने यांना shriniwas.sane@bmm2013boston.com या इमेलवर पाठवावे. फेब्रुवारी २९, २०१२ ला विजेत्या स्पर्धकाचे नाव जाहीर केले जाईल.

या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. एका व्यक्तीला दोन्हीतही भाग घेता येईल.

या स्पर्धेचे नियम असे आहेत:

१. सुचविलेले घोषवाक्य/ प्रतीकचिन्ह connections\नाते\ऋणानुबंध या विषयाशी संबंधित असावे.

२. विजेत्या घोषवाक्यास व प्रतीकचिन्हास प्रत्येकी एक BMM2013 च्या अधिवेशनाचे तिकीट विनामूल्य दिले जाईल.

३. एकाच प्रकारच्या, एक सारख्या २ अथवा अधिक आलेल्या सुचनांचा "lottery" स्वरूपाने निर्णय होईल.

४. अंतिम निर्णय BMM २०१३ अधिवेशनाची कार्यकारी समिती घेईल.

५. सादर केलेली प्रवेशिका ही पूर्णपणे स्वतःची असावी व कुठल्याही व्यक्तिगत अथवा उद्योगाच्या प्रताधिकाराचे उल्लंघन केलेले नसावे.

६. एका स्पर्धकाला, एका स्पर्धेसाठी जास्तीत जास्त ३ प्रवेशिका पाठवता येतील.

७. एकदा प्रवेशिका पाठवल्यावर, निकाल जाहीर होईपर्यंत स्पर्धकाने आपली प्रवेशिका कुठल्याही माध्यमात प्रसिद्ध करू नये.

८. विजेत्या घोषवाक्याचे आणि प्रतीकचिन्हाचे सर्व मालकीहक्क BMM 2013 अधिवेशनाच्या कार्यकारी समितीकडे राहतील.

काही कारणास्तव या तारखेत बदल झाल्यास website वर नमूद केले जाईल.
--------------------------------------------------------------------------------------------
इंग्रजी मसुदा:

FREE TICKET TO 2013 BMM Convention in BOSTON

The BMM2013 Executive Committee has organized a Slogan and a Logo contest. The contest is divided into two categories, the slogan contest and the logo contest. One winner of each of these categories will receive a free ticket to the BMM 2013 Convention. Each winner will also have their photograph published in the Convention Souvenir.

Eligibility: Any person residing in North America is eligible to participate in this competition.

Theme: The theme for the slogan/logo is Connections\नाते\ऋणानुबंध

Deadline: Slogan and/or Logo entries must be submitted to Mr. Shriniwas Sane on or before 31st December 2011 at this email address shriniwas.sane@bmm2013boston.com. The winners will be notified by 29th February 2012. Prizes: One winning entry in each category will receive a free ticket to the BMM 2013 Convention in Boston. The prize must be taken as stated. There will be no cash alternate. Judging Criteria: Entries will be judged on originality, creativity, and relevance to the theme.

Rules:

In case there are two or more similar winning entries, a winner will be selected by drawing a lottery. The judges decision will be final. The entry must be an original work of the contestant and must not be copyrighted, trademarked or previously used by any person, company, or organization. BMM is not liable for any copyright infringement on the part of the contestant and will not become involved in copyright disputes.

Each contestant may submit up to three (3) entries in each category totaling not more than six entries.

Upon submission, all entries will become the property of BMM. Competitors may not publish their entries to any other media or else the entry will be disqualified. The winning entry as well as all copyrights thereto, will become the sole property of BMM. The changes to the deadline for the submission of entries if any, will be posted on the BMM 2013 web site.

कलासंस्कृतीसमाजबातमीमाहिती

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

20 Nov 2011 - 11:22 pm | श्रावण मोडक

केवळ (अन)अकॅडेमिक शंका -

स्पर्धा मोकळ्या वातावरणात व्हावी यासाठी बीएमएमच्या ज्या समितीतील सदस्य या स्पर्धेसाठी परीक्षक असतील त्यांच्या आप्तांना/नातेवाईकांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही असे जाहीर केले गेले आहे.

म्हणजे? त्या समितीच्या आप्तांना/नातेवाईकांना, की त्या समितीच्या सर्व सदस्यांच्या आप्तांना/नातेवाईकांना, की त्या परिक्षकांच्या आप्तांना/नातेवाईकांना? मला कसं कळणार की माझा कोणी आप्त/नातेवाईक परीक्षक/समितीसदस्य/समिती आहे किंवा कसे?

ही स्पर्धा उत्तर अमेरिकेतल्या सर्व मराठी/ अमराठी व्यक्तींसाठी खुली आहे.

ते ठीक. पण इतरत्रच्या व्यक्तींना बंद आहे का? नसेल, आणि त्यातील कोणी विजेता/ती ठरल्यास त्या/तिच्या बक्षीस प्रत्यक्षात येण्यासाठीच्या बोस्टनपर्यंतच्या प्रवासाचे काय? कितीत जायची ही स्पर्धा त्या/तिला?
;) एरवी, स्पर्धेचे नियम समजले आहेत.

चित्रा's picture

20 Nov 2011 - 11:46 pm | चित्रा

>म्हणजे? त्या समितीच्या आप्तांना/नातेवाईकांना, की त्या समितीच्या सर्व सदस्यांच्या आप्तांना/नातेवाईकांना, की त्या परिक्षकांच्या आप्तांना/नातेवाईकांना? मला कसं कळणार की माझा कोणी आप्त/नातेवाईक परीक्षक/समितीसदस्य/समिती आहे किंवा कसे?

योग्य प्रश्न आहे. समितीतील जे सदस्य परीक्षक आहेत त्यांना, तसेच त्यांच्या आप्तस्वकियांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. परिक्षकांची नावे गुप्त नाहीत, पण त्यांना त्रास होऊ नये म्हणून ती जाहीरही केली नाही आहेत. परिक्षकांनी आपल्या नातेवाईकांना भाग घेण्यापासून परावृत्त करावे इ. अपेक्षा आहेतच. परिक्षक नसलेल्यांखेरीज इतर समितीच्या सदस्यांना (बीएमएमच्या अनेक समित्या आहेत) त्यातील तसेच त्यांच्या नातेवाईकांना स्पर्धेत भाग घेता येईल. पण हा मुद्दा केवळ स्पर्धा खुली आहे, मोकळ्या वातावरणात होत आहे हे स्पष्ट करण्यासाठी घातला होता. त्याचप्रमाणे परिक्षक आणि स्पर्धक यांच्यामध्ये पडदा असेल आणि त्याची काळजी अधिवेशनाचे आयोजक घेत आहेत हे स्पष्ट करावेसे वाटते.

>ते ठीक. पण इतरत्रच्या व्यक्तींना बंद आहे का? नसेल, आणि त्यातील कोणी विजेता/ती ठरल्यास त्या/तिच्या बक्षीस प्रत्यक्षात येण्यासाठीच्या बोस्टनपर्यंतच्या प्रवासाचे काय? कितीत जायची ही स्पर्धा त्या/तिला?

फक्त उत्तर अमेरिकेतील लोकांना स्पर्धा खुली आहे. कारण तुम्ही म्हटले आहे त्याप्रमाणेच. अधिवेशनाचे तिकीट नुसते मिळाले आणि अधिवेशनास खर्चाच्या कारणाने येता आले नाही असे होऊ नये म्हणून असा निर्णय घेण्यात आला आहे.

आप्त नातेवाईक नाही पण तुम्ही आणि आणखी वर आलेली नावे हे तर आमचे मित्रमंडळ आहे.
तरी चालेल का भाग घेतलेला?
आम्ही तिथून गेल्यावरच अधिवेशन तिथे व्हायचं होतं ना!:(

चित्रा's picture

21 Nov 2011 - 12:44 am | चित्रा

होय, चालेल चालेल!
मित्रांवर बंधन नाही. शिवाय वर म्हटल्याप्रमाणे परिक्षकांना स्पर्धकांची नावे कळणार नाहीत.

>आम्ही तिथून गेल्यावरच अधिवेशन तिथे व्हायचं होतं ना.

हो, ना. पण त्यानिमित्ताने परत या.

कुंदन's picture

21 Nov 2011 - 1:10 am | कुंदन

>>आम्ही तिथून गेल्यावरच अधिवेशन तिथे व्हायचं होतं ना!

भारतात येताय ना , ठाणे/पुणे येथे आपण विद्रोही अधिवेशन भरवु ; त्यात काये.

चित्रा's picture

21 Nov 2011 - 6:27 am | चित्रा

एक महत्त्वाचे म्हणजे यंदाच्या अधिवेशनाची थीम किंवा सूत्र आहे ते connections\नाते\ऋणानुबंध असे आहे. त्याचा नियमांप्रमाणे वापर करावा.
शिवाय वर द्यायचे राहिले आहे परंतु प्रतीक पाठवण्याचा फॉर्मॅट पीएनजी (.png) असावा.

ज्यांना स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांना अजूनही काही प्रश्न असल्यास (विशेषतः हा धागा काही काळानंतर खाली गेल्यास) मला chitra.deshpande@bmm2013boston.com येथे जरूर कळवावे.

अन्या दातार's picture

21 Nov 2011 - 9:39 am | अन्या दातार

>>प्रतीक पाठवण्याचा फॉर्मॅट पीएनजी (.png) असावा.

प्रतीकाचे प्रायोजक पु. ना. गाडगीळ आहेत का? ;)

चित्रा's picture

21 Nov 2011 - 6:49 pm | चित्रा

लक्षातच नाही आले! पण छान निरीक्षण.

पण नाही, प्रतिकाचे प्रायोजक सध्यातरी बीएमएमखेरीज कोणीही नाही. :)