(हल्ली मी घेतच नाही ...(؟)... )
प्रेषक, गणपा, Fri, 18/11/2011 - 20:02
फिझा यांची माफी मागुन त्यांच्या लिहिण्याला ही आमची पोच.
हल्ली मी काही घेतच नाही ..(؟)...
भांजाळला गाल एकदा
पाठीवर उमटले वळ ...
आणि निघाली कमरेतुनी कळ
त्या कळीची दाहकता कुणा कळतच नाही
हल्ली मी काही घेतच नाही ...
घेण्याची कारणे होती हजार
चढणार प्रेट्रोल,वाढती महागाई वर तुटपुंजा पगार ...
विदेशी 'टाकुन', देशी घेतली तरीसुद्धा .....
कळी माझी खुलतच नाही
हल्ली मी काही घेतच नाही ...
नाही नाही म्हणत परत
बळेच भरला ग्लास ...
पुढ्यातला चखणा आणि माझं मुस्काट
यांची सांगड घालणे मला जमलेच नाही ....
पण हल्ली मी घेतल्या वाचुन रहातच नाही ...
लेखनविषय::
प्रतिक्रिया
पीनेवालोंको
पीने का बहाना चाहिए!!!
गणपाभौ, ही पाकृ पण मस्त. फोटो कुठेय?
o ज्योति कामत o
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नामा म्हणे मज विट्ठल सापडला|म्हणोनी कळिकाळा पाड नाही||
फोटो कुठेय? लै भारी, एक लंबर
लै भारी, एक लंबर !
- (बहाणेबाज) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
मिपावरचे माझे लेखन...
स्वयंपाकघर सोडून गणपा
स्वयंपाकघर सोडून गणपा तिर्थक्षेत्री वळलेला बघून भावना आवरता आल्या नाहीत.

आणि कमरेतुन निघाली कळ
याऐवजी आणि निघाली कमरेतूनी कळ हे कसे वाटेल?
अर्थात कसेही लिहिले तरी कळ काही थांबणार नाही.
रेवतीतै, सहमत! आणि जास्त काळ
रेवतीतै,
सहमत!
आणि जास्त काळ कळ थांबली नाहीच तर मग काळंही थांबणार नाही
- (कळकाढू) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
मिपावरचे माझे लेखन...
बदल आवडल्या गेला आहे.
बदल आवडल्या गेला आहे.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली
वा....
छान आहे.
मस्त !
एक विरोधाभास वाचुन गंमत वाटली मुळ कवितेपेक्षा विडंबन जास्त लोकप्रीय झालं

बाकी गणपा शब्द चपखल बसलेत
सर्वसमावेशक...
मुळ कवितेतील आपली भावना सुंदर आहे पण ती 'कवी' पुरती संकुचित आहे. इतरांना त्याचा 'एहसास' होईलच असे नाही. पण, श्री. गणपा ह्यांनी व्यक्त केलेली भावना सर्वकालीक आणि सर्वसमावेशक असल्याने जास्त 'लोकप्रिय' झाली आहे.
_/\_ भन्नाट. पाककलानिपुण
_/\_
भन्नाट.
पाककलानिपुण तज्ज्ञ श्री श्री गणपा महाराज हे कवितानिपुण पण.
-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।
घेऊनच ईडंबन केलंय का? अगदी
घेऊनच ईडंबन केलंय का?
अगदी पहिल्या धारेचं झालंय म्हणून हो.
-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।
काय हे?
गणपाशेट,
तुम्ही सुध्दा?
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
काय गणपाशेट लई भारी. झिंग
काय गणपाशेट लई भारी.
झिंग आली बरं का.......................................................
झक्कास !
गणपा रं गणपा.. एक नंबर रे.
अवांतर :- 'विडंबन म्हणजे दारू' हे चित्र कधी बदलणार ? हे विडंबन वाचून कवि गणेशा ह्यांच्या मनाला आता किती यातना होतील बरे
आकाशातला बाप त्यांना अजून सहनशीलता देवो.
आमेन !
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...
अवांतर :- 'विडंबन म्हणजे
अवांतर :- 'विडंबन म्हणजे दारू' हे चित्र कधी बदलणार ? हे विडंबन वाचून कवि गणेशा ह्यांच्या मनाला आता किती यातना होतील बरे आकाशातला बाप त्यांना अजून सहनशीलता देवो.
ग्ण्पा भौ क्व्ता छान आहे. क्दाच्ति प रा ( सालं हे टंकताना चुकलं की प रा चा उगाचच प्रा होतो) भौ नी मोकलाया दही दिश्या... ही क्विता वच्ली न्सावी. किवा त्य्ना फ्क्त द्रु च दिस्ते त्य्मुळे त्य्ना विंड्ब्न हे ब्निआ द्रुचे होतस्ते हे ठौक न्ही.त्यत त्यंची च्कू न्सावी
भन्नाट विडंबन
भन्नाट विडंबन
पुरी जाईचिया फुल फाकणे| त्याचि नाम जैसे सुकणे|
तैसे कर्मनिषे न करणे| केले जिद्दी|
व्वा गणपाशेठ.... एकदम जोरदार
व्वा गणपाशेठ.... एकदम जोरदार !!

____________________________________________________
I couldn't wait for success, so I went ahead without it !!!!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
मस्त रे!!
मस्त रे!!
भन्नाट!! आवडल्या गेले आहे.
भन्नाट!! आवडल्या गेले आहे.
...................................
स्वबळ उणे पाहता जालीय बाळ फार गडबडला ।
स्त्रीडूआयडी घेउनि बालिश बहु खरडींतून बडबडला॥
आजचा सुविचारः मिपावर एकाच सदस्याने रोज लेखांचे रतीब घालणं हे त्याच्याकडे भरपूर वेळ असल्याचं लक्षण आहे!
नो कमेन्ट्स !!!
नो कमेन्ट्स !!!
अहो, एवढं का मनाला लावून घेताय ?
चांगल्याच कवितेचे विडंबन येते अन मुख्य म्हणजे लोकप्रिय रचनेचेच
तुमची कविता लोकांना आवडली ही त्याची पावती आहे
~ वाहीदा
एक अप्रतिम सुंदर उर्दू नज्म (कविता) --
अब हम भी नहीं रोते, अब हम भी नहीं सोते... अजीब, मासूम लडकी थी ..
http://www.youtube.com/watch?v=5OjnsZY3Qg0&NR=1
http://www.youtube.com/watch?v=Vg9BHTIGWhY
मस्त !
मस्त !
मदनबाण.....
जलतरंग :- रंजना प्रधान {मी आत्ता पर्यंत ऐकलेले सर्वात सुंदर जलतरंग वादन }