फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध :

JAGOMOHANPYARE's picture
JAGOMOHANPYARE in जनातलं, मनातलं
5 Nov 2011 - 2:49 pm

फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध :

यावर्षीच्या २०११ मधील एप्रिलमधील गुढी पाडव्याला आमचा 'पाडवा' झाला. म्हणजे मला अ‍ॅक्सिडेंट झाला आणि पाय मोडला. :) डाव्या पायातील पटेला ( गुढग्याची वाटी) , टिबिया, फिब्युला, ( लेग बोन्स) आणि तळपायामधील एक लहान हाड एवढे सगळे मोडले. त्यानंतर ऑपरेशन झाले. प्लेट, मोळे, तारा.. काय काय बसवले. मग हळूहळू वॉकर, काठी घेऊन आणि आता तसेच चालायला लागलो.

गेल्या आठवड्यात सहज नरसोबावाडीला गेलो. तिथे अन्नछत्रात प्रसादाला जात होतो. स्टँडवरुन उतरून अन्नछत्राकडे जात होतो. मी थोडा लंगडत जात होतो. अचानक एक माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, लंगडताय का? पाय फ्रॅक्चर झाला आहे का? मी होय म्हणताच त्याने सांगितले त्यांच्या भावाला फृएक्चर झाले होते, तेंव्हा एका धनगराने एक औषध लावायला सांगितले होते. तुमचा नंबर द्या आम्ही तुम्हाला त्याची माहिती सांगू.

दुसर्‍या दिवशी त्याच्या बहिणीचा फोन आला. त्यानी औषधाची कृती सांगितली. ती खालीलप्रमाणे..

साहित्य :

२ नारळाचे पाणी
११ गुलाबाची फुले
१०० ग्रॅम बदाम
५० ग्रॅम वेलदोडा घेऊन सोलून बिया घेणे.
२ चमचे हळद.
२ मुठी तुळशीचा पाला
सव्वा किलो खोबरेल तेल

प्रथम मिक्सरमधून वेलदोडा आणि बदाम बरीक पूड करावी. मग त्याच्यात गुलाबाच्या पाकळ्या, तुळशीचा पाला चुरुन घालून पुन्हा बारीक करावे. त्यात २ नारळाचे पाणी घालून पुन्हा मिक्सर फिरवून लगदा करुन घेणे.

नंतर तेलामध्ये हा लगदा आणि हळद घालून ढवळावे. आणि १५ मिनिटे उकळू द्यावे. मिश्रण ढवळत रहावे आणि मोठ्या पातेल्यात कृती करावी. कारण हळद घातली की उतू जाते.

नंतर गार करुन फडक्याने गाळून घ्यावे.

आयुर्वेदिक भांडारातून खालील औषधे आणावीत आणि त्यात मिसळावीत.

१. जंगल पपिता तेल ५० मिली
२. रत्नज्योत तेल ५० मिली
३. वातचिंतामणी रस ५ ग्रॅम
४. योगेंद्र रस ५ ग्रॅम
५. कुमार कल्याण रस ५ ग्रॅम
६. पंचरत्न अनमोल रस ५ ग्रॅम
७. सुवर्ण भस्म ५ ग्रॅम
८. हिरा भस्म ५ ग्रॅम

( शेवटची दोन औषधे प्रचंड महाग आहेत. माझ्या सर्जरीलाही इतका खर्च आला नव्हता ! :) )

मिश्रण बाटली हलवून ढवळावे. एक दिवस तसेच ठेवावे. त्यानंतर दररोज रात्री फ्रॅक्चर झालेल्या हाताला/ पायाला चोळून लावून मुरवावे. यामुळे ...

हाड जुळायला मदत होते.
स्नायुंची पुष्टी होते.
दुखावलेल्या शिरा पुन्हा कार्यक्षम होतात.

औषध तीन महिने वापरावे.

हे औषध फक्त इजेमुळे झालेल्या (अपघाती) फ्रॅक्चरला वापरावे. फृएक्चर अन्य कारणाने, उदा कॅन्सर, टीबी वगैरे असेल किंवा त्वचेवर ओली जखम असेल तर हे औषध वापरू नये.

औषध फक्त बाह्योपचारासाठी आहे. पिऊ नये. :)

-------------------------------

या लेखातील मते लेखकाची स्वतःची आहेत. मिसळपाव संस्थळाची अधिकृत मते नाहीत. लेखात दिलेल्या उपायांबद्दल काही शास्त्रशुद्ध आधार असल्यास त्याचा लेखकाने उल्लेख केलेला नाही. तसेच औषधाचा परिणाम काय झाला याबद्दल काही निरीक्षण्/निष्कर्ष यांचाही उल्लेख केलेला नाही. कोणा वाचकाला या लेखातील उपचार करायचे असतील तर आपल्या जबाबदारीवर करावेत. -संपादक मंडळ

औषधोपचारमतशिफारसमाहिती

प्रतिक्रिया

७. सुवर्ण भस्म ५ ग्रॅम
८. हिरा भस्म ५ ग्रॅम

या औषधांची एक मजेशीर आठवण आहे. आमच्या बॉसला एकदा असाच उभ्या टोपीवाल्या जडीबुटी वैद्याने ३५-४० हजारांना लुंगवले होते. बॉसने त्याची 'आंतरिक' पीडा त्या वैद्यासमोर उघड केली होती ;-)

सुवर्ण भस्म, हिरा भस्म आणि बदाम चूर्ण अशी १०-१२ औषधे त्याने आणायला सांगितली. पुण्यात मिळतील म्हणे. पैसे घेऊन मी आणि त्या जडीबुटीवाल्याचा पोरगा पुण्यातील कुठ्ल्या तरी पेठेतल्या एका जुन्या वाड्यात ती औषधे घ्यायला गेलो. सुवर्ण भस्म आणि हिरा भस्माच्या किमती ऐकूनच मी गार पडलो. पण वैद्याने किमतीबद्दल आधीच अंदाज दिल्याने तेवढे पैसे सोबत होते.
सुवर्ण भस्म आणि हिरा भस्माच्या त्या छोट्या पुड्या खूप गार लागत होत्या.
घरी आलो तरी ते भस्म थंड्गार होते एवढे निश्चित.

पुण्यातील एका अंधार्‍या वाड्यात चालणार्‍या आयुर्वेदिक फार्मसीतुन ही औषधे आणली. त्या वैद्याने ही औषधे वापरुन एक पेस्ट आणि दुधासोबत पोटात घ्यायचे एक औषध तयार करुन दिले.
२-३ महिने ते औषध खाऊन आणि ती पेस्ट इच्छित ठिकाणी लाऊनही काही परिणाम साधला नाही, नुसता त्या पेस्ट्चा वास सुटतो आणि अंडरपँट खराब होते.. असे बॉसमहाशय सांगत होते.
वैद्याने आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली ३५-४० हजारांना चुना लावला आहे हे हळुहळु स्पष्ट झाले.

अधिक शोध करता हे सुवर्ण भस्म, हिरा भस्म विकणार्‍यासोबत वैद्याचे आधीच संधान असते असे कळले.
ते लोक आमचा यात काही वाटा नाही असे सांगतात, पण खरेदी झाल्यानंतर त्या दुकानाकडून त्यांना त्यांचे कमिशन मिळते म्हणे.

बॉस मला म्हणे.. च्यायला तु पैसे घेऊन तिकडेच पळून तरी जायचे होते ;-)
शेवटी त्यांनी ती औषधे अर्ध्या किमतीत विकायला काढल्याचे मित्रमंडळीत जाहीर केले.
पण घेतो कोण?

परिकथेतील राजकुमार's picture

5 Nov 2011 - 3:25 pm | परिकथेतील राजकुमार

ते सगळे ठिक आहे हो. पण हे औषध वापरुन तुम्हाला काय फायदा झाला का नाय ? का नुसताच अजून एका धाग्यापुरता विषय मिळाला येवढ्या खर्चात ?

बाकी जीभेचे हाड मोडले असेल तर हे औषध चालायचे नाही ना? 'औषध फक्त बाह्योपचारासाठी आहे. पिऊ नये' असे लिहीले आहे म्हणून चौकशी हो.

जंगल पपिता ठीक .. पण....

२. रत्नज्योत तेल ५० मिली
३. वातचिंतामणी रस ५ ग्रॅम
४. योगेंद्र रस ५ ग्रॅम
५. कुमार कल्याण रस ५ ग्रॅम
६. पंचरत्न अनमोल रस ५ ग्रॅम
७. सुवर्ण भस्म ५ ग्रॅम
८. हिरा भस्म ५ ग्रॅम

ही कृती धनगराची आहे?????????

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Nov 2011 - 11:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ही कृती धनगराची आहे ?????????

धनगर फार तर मेंढ्या बकर्‍या रानात बसवायचे पैसे घेईल पण असे उद्योग... कभ्भी नै.
(अपवाद असतात हे मान्य )

-दिलीप बिरुटे

धनगर फार तर मेंढ्या बकर्‍या रानात बसवायचे पैसे घेईल ...

खुप वर्षांनी ऐकलं हे. तुम्ही गावाकडचे दिसता. :)

पिवळा डांबिस's picture

7 Nov 2011 - 4:32 am | पिवळा डांबिस

ही कृती धनगराची आहे?????????
गविंशी सहमत!!!
धनगरांना वातचिंतामणी, पंचरत्न वगैरे माहिती असतील याविषयी साशंक आहे...
असे घातक धागे काढणं टाळावं ही विनंती. एखाद्याचं जन्माचं नुकसान होईल...
धन्यवाद,

युयुत्सु's picture

5 Nov 2011 - 6:17 pm | युयुत्सु

आयुर्वेदात गुग्गुळ हे अतिशय बहुगु णी औषध हाडे लवकर जुळुन येण्यास उपयोगी पडते. पण ते योग्य सल्ल्याने घ्यावे. होमिओपथीवर वि श्वास असेल तर सिंफायटम हे औषध घ्यावे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 Nov 2011 - 5:46 am | निनाद मुक्काम प...

ह्या लेखातील औषधाची सत्यता कितपत असावी ह्याबाबत शंका वाटते.
मात्र ह्या निमित्ताने संभाजी राजे ह्यांच्या जीवनावरील छावा कांदबरीतील एक उतारा आठवला
त्यात एक धनगर संभाजी राजांना एक अंगठी देतो . विष बाधा झालेल्या अन्नावरून ती फिरवल्यास तिचा रंग बदलत असे
ह्याच अंगठी च्या जोरावर संभाजी राजांवरील संभाव्य विषबाधा टळते असा उल्लेख होता.

युयुत्सु's picture

6 Nov 2011 - 11:11 am | युयुत्सु

वरील लेखातील औषधांपैकी योगेन्द्र रस हे औषध मी पोटात घेऊन बघितले आहे. ते पण खूप महाग असते. त्याने हृदयाचे पंपी ग सुधारते आणि भयानक भूक लागते.

धन्या's picture

9 Nov 2011 - 12:40 am | धन्या

त्याने हृदयाचे पंपी ग सुधारते

ही पंपी ग काय भानगड आहे? ;)

वपाडाव's picture

9 Nov 2011 - 12:37 pm | वपाडाव

त्याला मराठीत हार्ट पंपिंग असे म्हणतात....
शिंच्या मेल्या आयाय्टीत नाही तर नाही गेला बाजार सीओईपीच्या गेटवर तरी एखादी चक्कर मारुन ये बे एकदा....

भस्म कसे करावे हि कृती समजली असेल हे पण खुप अशक्य वाटते.तरी देखिल ह्याचा काही उपयोग झाला आहे काय हे तुम्ही सांगा.

कदाचित तो धनगर समाजातून शिकून वर आलेला वैद्य असेल. जामोप्यांनी ते उघड केले नसेल...

इंटरनेटस्नेही's picture

6 Nov 2011 - 2:39 pm | इंटरनेटस्नेही

एवढा खर्च ह्या अस्ल्या औषधावर करण्यापेक्षा तुम्हाला त्याचा बराच सदुपयोग करता आला असता. ;)
अधिक माहिती व्यनितुन सांगेन.

अरे जामोप्या तू हे औषध घेतले आहे का?
का नुसताच प्रचार चालु आहे?

मी तयार केले आहे. औषध. शेवाळी रंगाचे तेल तयार झाले आहे.

एकूणच तेलप्रकरण किती किंमतीला पडले ते तरी जाहीर करा. आम्ही वाटल्यास तेल बनवू, नाहीतर जाऊ दे.

- पिंगू

पाषाणभेद's picture

7 Nov 2011 - 2:04 am | पाषाणभेद

या लेखातील मते लेखकाची स्वतःची आहेत. मिसळपाव संस्थळाची अधिकृत मते नाहीत. लेखात दिलेल्या उपायांबद्दल काही शास्त्रशुद्ध आधार असल्यास त्याचा लेखकाने उल्लेख केलेला नाही. तसेच औषधाचा परिणाम काय झाला याबद्दल काही निरीक्षण्/निष्कर्ष यांचाही उल्लेख केलेला नाही. कोणा वाचकाला या लेखातील उपचार करायचे असतील तर आपल्या जबाबदारीवर करावेत. -संपादक मंडळ

वरील सुचना या लेखाच्या सुरवातीस दिलीत तर फार फार बरे होईल.

राजेश घासकडवी's picture

7 Nov 2011 - 2:43 am | राजेश घासकडवी

फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध

यातल्या औषध या शब्दाला तीव्र आक्षेप. पाककृती म्हणून टाकायला हरकत नाही. पण असल्या काहीतरी भंपक गोष्टी करून त्यासाठी हजारो रुपयांना खिशाला चाट लावण्याच्या प्रकाराला भोंदूगिरी म्हणायला हवी. मिपावर असणाऱ्या डॉक्टर मंडळींनी याविषयी अधिक कणखर भूमिका घ्यावी ही अपेक्षा आहे.

आधीच नाडीचा अनुभव घेऊन बघा असे लेख येतात. आता हे!

एखाद्या पदार्थाचं भस्म म्हणजे जळल्यावर शिल्लक रहाणारा पदार्थ असा माझा अंदाज आहे. तो बरोबर आहे का? तसं असल्यास हिऱ्याचं भस्म म्हणजे कार्बन डाय ऑक्साइड का? मग तो इतका महाग का असतो?

शिल्पा ब's picture

7 Nov 2011 - 3:03 am | शिल्पा ब

हे पहा माझा बिझनेस चालु करायचा म्हंटलं की मराठी लोकंच असे पाय खेचतात!!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

7 Nov 2011 - 12:03 pm | विश्वनाथ मेहेंदळे

गुर्जी, तुमचा आक्षेप केवळ याच औषधावर आहे, एकूण आयुर्वेद या शाखेवर आहे की तथाकथित आयुर्वेदिक औषध हे वैद्याकडून न घेता धनगराकडून घेण्यावर आहे? जरा क्लीअर कराल तर पुढे भांडण.. आपलं... चर्चा करता येईल. ;-)

राजेश घासकडवी's picture

7 Nov 2011 - 6:16 pm | राजेश घासकडवी

ज्या पदार्थाच्या गुणाविषयी काहीही सर्वमान्य अनुभव नाही त्याला औषध म्हणू नये असं माझं मत आहे. मग ते कुठल्याही का शाखेतून आलेलं असो, कितीही मोठ्या तज्ञाने वा अज्ञाने सांगितलेलं असो. (नवीन पदार्थांना औषध म्हणण्यासाठी डबल ब्लाइंड टेस्ट्स पुरेशा आहेत.)

म्हणजे जखमेवर हळद दाबावी या घरगुती सल्ल्यातल्या हळदीसाठी मी औषध हा शब्द स्वीकारेन, कारण ते पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. मात्र कोणी जर एखादं प्रॉडक्ट तयार करून पैशासाठी विकणार असेल तर त्यासाठी डबल ब्लाइंड टेस्ट व्हायला पाहिजेत. म्हणजे सर्वसामान्य वापरतात त्या अघळपघळ अर्थाने तो शब्द वापरणं वेगळं, आणि 'विकण्यास हरकत नाही' अशी सरकारी मान्यता मिळालेलं औषध या अर्थाने तो वापरणं वेगळं. या लेखातल्या पाककृतीला त्या दोन्हीपैकी काहीच पार्श्वभूमी नाही. लेखकाने स्वतःचा अनुभवदेखील सांगितलेला नाही. निव्वळ 'मी तयार करून ठेवलं आहे' असं म्हटलं. त्यातून 'कुणाला हवं असेल तर मी विकायला तयार आहे' असा अर्थ मी काढला.

एखाद्या पदार्थाचं भस्म म्हणजे जळल्यावर शिल्लक रहाणारा पदार्थ असा माझा अंदाज आहे. तो बरोबर आहे का? तसं असल्यास हिऱ्याचं भस्म म्हणजे कार्बन डाय ऑक्साइड का? मग तो इतका महाग का असतो?

आपली माहिती इतर भस्मांबाबत बरोबर असेल.
वर दिलेल्या किश्श्यात त्या दुकानदाराला मी हिरा भस्म कसं तयार करतात? असं विचारलं तेव्हा तो म्हणाला होता हिरा अनेक वर्षे घासतात.. त्यातून जी पूड पडते ते हिराभस्म !
त्यामुळे कार्बन-डायऑक्साईड म्हणजे हिराभस्म असू शकत नाही असे वाटते.

शिल्पा ब's picture

7 Nov 2011 - 9:53 pm | शिल्पा ब

त्या दुकानदाराला हे ज्ञान कोणी दिलं? हीरा हा सगळ्यात कठीण पदार्थ आहे ज्याने काच सुद्धा कापली जाते..मग वर्षानुवर्षे हीरा कशावर घासतात?

मोठ्या प्रमाणावर वाचकसंख्या असलेल्या संस्थळावर अशा प्रकारचे लेख आल्यावर तुम्ही त्याला पाठींबा देताय पण कशाच्या आधारावर? हे फक्त तुम्हालाच नाही तर इतरांना सुद्धा विचारणे आहे.

आधिच आपल्याकडे अंधश्रद्धा कमी नाहीत.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

7 Nov 2011 - 11:24 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>त्या दुकानदाराला हे ज्ञान कोणी दिलं? हीरा हा सगळ्यात कठीण पदार्थ आहे ज्याने काच सुद्धा कापली जाते..मग वर्षानुवर्षे हीरा कशावर घासतात?
हिरा कापलाच जात नाही की काय ? पैलू तर पाडतात त्याला, त्या अर्थी त्याची पावडर पण करता येत असेल. असेलच असे नाही, पण नसेल असे गृहीत धरण्यात काही अर्थ नाही.

>>मोठ्या प्रमाणावर वाचकसंख्या असलेल्या संस्थळावर अशा प्रकारचे लेख आल्यावर तुम्ही त्याला पाठींबा देताय पण कशाच्या आधारावर? हे फक्त तुम्हालाच नाही तर इतरांना सुद्धा विचारणे आहे.
एकतर यकुंनी पाठींबा दिला नाही. फक्त हिरा भस्म चा त्यांना माहित असलेला अर्थ सांगितला आहे.
आणि कुणी दिला पाठींबा तर देऊ देत. मते सगळ्यांना असतात. इथे धर्म, जातपात, नाडी, कुटुंब, समाज सर्व विषयांवर सर्व जण आपली मते मांडत असतात की.

>>आधिच आपल्याकडे अंधश्रद्धा कमी नाहीत.
आयुर्वेद ही अंधश्रद्धा आहे ?? सरकारमान्य शिक्षण घेता येते त्यात. हां आता हे औषध आयुर्वेदात बसते की नाही ते त्यातील तज्ञांना सांगू देत. आपण कसे सांगणार ? आपल्याकडे लोक येत जाता एकमेकांना क्रोसिन, ब्रुफेन सुचवत असतात. हे त्याचेच आयुर्वेदिक एक्स्ट्रापोलेशन आहे.

Nile's picture

7 Nov 2011 - 11:36 pm | Nile

सरकारमान्य शिक्षण घेता येते त्यात.

मग? जोतिषात सुद्धा सरकारमान्य शिक्षण घेता येते. म्हणजे लगेच ते शास्त्र होत नाहीत. संस्थळाप्रमाणे सरकारात सुद्धा फार गाढवं असतात.

आयुर्वेदात जितकं डॉक्युमेंटेशन भस्मावरचं आहे त्यात हिरा भस्म प्रकार वाचल्याचे आठवत नाही. चुभुदेघे. सीएसआयआर ने मध्यंतरी आयुर्वेदातील भस्मांचं पेटंट घेण्याच्या उद्देशाने डॉक्युमेंटेंशन सुरु केले होते. त्याचं पुढे काय झालं कोणास ठावूक. (डॉक्युमेंटेशन सबमीट होऊन ५ वर्षं झाली असे ऐकतो.)

आपल्याकडे लोक येत जाता एकमेकांना क्रोसिन, ब्रुफेन सुचवत असतात. हे त्याचेच आयुर्वेदिक एक्स्ट्रापोलेशन आहे.

बरं मग? एकाने चुक केली की तुम्ही दहा चुका करायच्या का?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 Nov 2011 - 2:42 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>मग? जोतिषात सुद्धा सरकारमान्य शिक्षण घेता येते
अच्छा, तुम्ही जोतिष (??) आणि आयुर्वेद एकाच तराजूत मोजता. मोजा मोजा, काही हरकत नाही. चालू द्या.
बाय द वे, ज्योतिषावर सरकारमान्य शिक्षण घेता येते ही माहिती नवीन आहे. कुठे घेता येते सांगा. तेवढीच माझ्या माहितीत भर.

>>बरं मग? एकाने चुक केली की तुम्ही दहा चुका करायच्या का?
असे करणे (अधिकार नसताना उपचार सुचवणे) योग्य आहे असे वर म्हटले आहे का मी ? प्रतिसाद देण्यापूर्वी किमान वरचे संभाषण तरी वाचायचे ना ? जाऊ दे. उगाच फाटे फोडण्यात काही अर्थ नाही. मी गुर्जींना त्यांचा आक्षेप कशावर आहे ते विचारले होते. त्यांनी सांगितले. तुमचा आक्षेप कशावर आहे ते ही कळले, आता मी डोळे मिटायला मोकळा झालो :-)

Nile's picture

8 Nov 2011 - 8:20 pm | Nile

अच्छा, तुम्ही जोतिष (??) आणि आयुर्वेद एकाच तराजूत मोजता. मोजा मोजा, काही हरकत नाही.

अहो मेहेंदळे आजोबा, तुलना मी नाही, तुम्ही केलीत. सरकारमान्य == शास्त्र अशी.

ज्योतिषावर सरकारमान्य शिक्षण घेता येते ही माहिती नवीन आहे

शोधा म्हणजे सापडेल. इथेच किंवा उपक्रमावर, बहुतेक, त्यावर धागाही आला होता.

तुमचा आक्षेप कशावर आहे ते ही कळले, आता मी डोळे मिटायला मोकळा झालो

गंगेचे गडू आहेत की पाठवू? ;-)

Nile's picture

12 Nov 2011 - 9:01 am | Nile

माझ्या वरील प्रतिसादातील माहितीची खात्री करुन घेऊन दुरुस्ती इथे देतो आहे.

आयुर्वेदात जितकं डॉक्युमेंटेशन भस्मावरचं आहे त्यात हिरा भस्म प्रकार वाचल्याचे आठवत नाही. चुभुदेघे. सीएसआयआर ने मध्यंतरी आयुर्वेदातील भस्मांचं पेटंट घेण्याच्या उद्देशाने डॉक्युमेंटेंशन सुरु केले होते.

आयुर्वेदात हिरक भस्म आहे. मी वर उल्लेखलेल्या डॉक्युमेंटेशनमध्ये ते नाही.

नेमकं कोणतं पुस्तक वाचल्याने मत बदललं?

शिल्पा ब's picture

7 Nov 2011 - 3:02 am | शिल्पा ब

मी स्वत: स्वर्ण भस्म अन हिरा भस्म विकते. कॅश, क्रेडीट कार्ड, मनी ट्रांस्फर स्विकारते.
भस्म अस्सल २४ कॅ. सोने अन अस्सल अफ्रीकेतल्या हीर्‍यापासुन बनवलेले आहे.
कृपया व्यनि करावा.

युयुत्सु's picture

7 Nov 2011 - 12:14 pm | युयुत्सु

या "औषधावर" सरसकट टीका करण्या पेक्षा येथे कुणी आयुर्वेद तज्ज्ञ असतील तर त्यांनी मत प्रदर्शन क रणे योग्य होईल.

प्राससाहेब.. कुठे आहात... ??????

गुढी पाडव्याला आमचा 'पाडवा' झाला. म्हणजे मला अ‍ॅक्सिडेंट झाला आणि पाय मोडला.
आरारा... माझं पण हेच झाल होतं...फकस्त तंगड्याच्या जागी हात होता.

गेल्या आठवड्यात सहज नरसोबावाडीला गेलो.
आहाहा... वाडी गावावर आपलं प्रेम हाय. :)

अजुन सुद्धा माझ हाड थोडसं दुखतयं ! गुग्गुळ ट्राय मारुन पहावे म्हणतो.

वरती एका प्रतिसादात संभाजी महाराजांचे उदा. दिले आहे, ते वाचुन आठवले की जुन्या राजा-महाराजांच्या काळी एक दिवा असे, तो दिवा अन्नाच्या जवळ नेत... अन्नात विष असल्यास ज्योतीचा रंग बदलत असे असे कुठेसे वाचल्याचे आठवतय.

आनंदी गोपाळ's picture

7 Nov 2011 - 2:27 pm | आनंदी गोपाळ

जामोप्या
हे काय अस्सल धनगरी औशिद न्हाय.

त्यात हाडसांधीचा पाला आन निर्गूडीचं तेल आस्तय. शिवाय घोरपड खाल्ली की लवकर बरा होतो माणूस अस म्हणत्यात. कुनीतरी येडी घातली तुम्हाला.

आता उरलेलं तेल -आय मीन- औशिद इकायला त्या ज्याकी श्राफ ला बलावा, अन ५-५ हजारात टीवी वर विका. मधून मधून चीप ग्येष्ट म्हनून रोहिनी हात-तंगडी बाई. ४-२ फिरंगी म्हातारे पन घेऊ बलावून.

तिच्या मारी. आप्रेशन क्कशापाई केलं म्हंतो मी? डायरेक्ट हाडवैद्याकडून चोळून घेऊन शिंप्याकडच्या चिंध्यांनी बांधून लवकर बरं झालं असतं..

-(आनंदाने फुकटात चोळून देणार!) गोपाळ

पैसा's picture

7 Nov 2011 - 2:35 pm | पैसा

ही धनगरी पाककृती हाय व्हंय?

विनायक प्रभू's picture

7 Nov 2011 - 6:30 pm | विनायक प्रभू

जागो ग्राहक जागो.
असो.
प्यारे तुम्ही कधी जागे होणार?

प्यारे१'s picture

9 Nov 2011 - 10:36 am | प्यारे१

>>>प्यारे तुम्ही कधी जागे होणार?

मेरकु कोई पूछा क्या? साला कभी नाय त्ये अब्बी अब्बी निन्द आ रेली थी.

मास्तर, क्या कामा? कायकु याद किया?

रेवती's picture

8 Nov 2011 - 12:15 am | रेवती

पुराने जमानेमे ऋषीमुनी एखाद्याला रागावून नजरेने भस्म करीत.
भस्म मिळवण्याची ही सर्वात स्वस्त मेथड आहे असे वाटते.
बाकी हातपाय मोडल्यावर पळत (आपल्या पायाने नव्हे) डागदरबाबूंकडे जाणे योग्य!

इंटरनेटस्नेही's picture

8 Nov 2011 - 1:54 am | इंटरनेटस्नेही

पुराने जमानेमे ऋषीमुनी एखाद्याला रागावून नजरेने भस्म करीत.
भस्म मिळवण्याची ही सर्वात स्वस्त मेथड आहे असे वाटते.

रेवती ताई! सिक्सर हाणलात एकदम! =)) =))

वपाडाव's picture

9 Nov 2011 - 12:45 pm | वपाडाव

रेवती ताई! सिक्सर हाणलात एकदम !!

इंट्याचा प्रौढ झालोय हे दाखवण्याचा एक क्षीण प्रयत्न....

स्पंदना's picture

8 Nov 2011 - 6:58 am | स्पंदना

हाड्सांधिचा पाला मिळतो तो वापरुन पाहा, एव्हढा महाग पण नाही पडणार, अन बराचसा उपयोग ही होतो अस माझे सासरे म्हणतात. अर्थात घरात कुणाच काही मोडल की माझे सासरे अगदी स्वखर्चान हा पाला घेउन जातात अन चार दिवस रोज त्या गरिब बिचार्‍या मोडक्याला आणी मोडुन परत येतात. फार जबरदस्तीन हा रस गऴ्याखाली उतरतो, अन तो पुरा प्यायला की नाही हे माझे सासरे अगदी डोळ्यात तेल घालुन पहातात.

स्वगत : पंडित पुरे मुर्ख ठरले आता सही बदलावी का?

आयुर्हित's picture

8 Jan 2014 - 4:52 pm | आयुर्हित

अपर्णाजी व आपल्या सासरेबुवांनाही,
धन्यवाद.

अतिशय मोलाची माहिती पुरवली आपण.
गुगलकाका काहीच दाखवत नाहीत!
हाड्सांधि ह्या झाडाची ची अधिक माहिती,फोटो पोस्ट करा.
कसे व किती दिवस वापरले जाते हेही सविस्तर लिहाल तर बरे होईल.
हाड्सांधिचा पाला, झाडाचे रोप/बिया/कलम कुठे मिळेल ते सांगा.
कोणा कोणाला, किती दिवसात याचा फायदा झाला त्याचे अनुभव हि धाग्यावर टाका.
जास्तीत जास्त माहिती मिळाल्यास फार उपकार होतील आपले.
उरलेली माहिती शोधून काढायला आम्ही आहोतच.

कळावे, लोभ असावा.
आपला मिपास्नेही : आयुर्हीत

प्रास's picture

8 Nov 2011 - 4:48 pm | प्रास

हा धागा काही कारणांमुळे दृष्टीतून निसटला होता, आज दिसलाय. एकूणच इथले प्रतिसाद बघता (आणि गविभाऊंची साद ऐकता) काही लिहिणे आवश्यक वाटल्यामुळे हा प्रतिसाद प्रपंच.

जामोप्यांना समजलेलं 'औषध' हा आयुर्वेदाच्या नावाखाली घडणारा अशास्त्रीय भंपकपणाचा नमुना आहे. अशा गोष्टींमुळे आयुर्वेद शास्त्र बदनाम होत असल्याने काही गोष्टी नमूद करणं आवश्यक वाटलं.

आज आयुर्वेद शास्त्र हे घरकी मुर्गी बनलेलं आहे. कुणीही उठावं आणि परंपरागत ज्ञानाचं लेबल लाऊन त्यासंदर्भात आपले तारे तोडावेत असं दृष्य सगळीकडेच दिसतं. मग त्यात जो उठतो तो तज्ञ बनतो. त्याने रीतसर या शास्त्राचं शिक्षण घेतलं असो वा नसो, आयुर्वेदावर बोलण्याचा त्यांना जणु परवानाच मिळालेला असतो. पुन्हा आयुर्वेदाच्या नावाखाली काहीही खपवता येतं असाही लोकांचा एक ग्रह झालेला असतो आणि म्हणूनच यातून वर सांगितलेल्यासारखी औषधी कृति पसरवली जाते. परिणामी आयुर्वेदातल्या चांगल्या औषधांनाही टिकेचे धनी व्हावं लागतं. पुढे संपूर्ण आयुर्वेदालाच चौकशीच्या पिंजर्‍यात उभं रहावं लागतं.

कोणतंही औषध वाईट नसतं. "योजकस्तत्र दुर्लभः।" हाच अडचणीचा भाग आहे. जामोप्यांनी नंतर मिसळायला सांगितलेली

वातचिंतामणी रस ५ ग्रॅम
योगेंद्र रस ५ ग्रॅम
कुमार कल्याण रस ५ ग्रॅम
पंचरत्न अनमोल रस ५ ग्रॅम
सुवर्ण भस्म ५ ग्रॅम
हिरा भस्म ५ ग्रॅम

ही औषधे वैयक्तिक रीत्या अत्यंत महत्त्वाची औषधं आहेत आणि त्यांचं कार्यकारित्वही वादातीत आहे. प्रॉब्लेम कुठे आहे, तर ही औषधं आभ्यंतर प्रयोगांची म्हणजे पोटात घ्यायची आहेत. बाह्योपचारांमध्ये निदान मला तरी त्यांची उपयुक्तता शून्य अभिप्रेत आहे. पुन्हा हे प्रमाणही तसं का आहे याचा काहीही पत्ता लागत नाही. महत्त्वाचं म्हणजे यातलं एकही औषध तैलविद्राव्य नसल्यामुळे कुणी कितीही त्वचेवरून चोळलं तरी हे घटक शरीरात काहीही परिणाम दाखवू शकतील असं मला अजिबात वाटत नाही. यामुळे सदर तैल औषधाचा वापर करण्याचा सल्ला मी तरी देणार नाही. अर्थात जामोप्यांनी रुपडे खर्च करून ते बनवलेलंच आहे तर त्यांनी त्याचा प्रयोग जरूर करावा कारण खर्च केलेल्या प्रत्येक रुपयाचा उपभोग घेतलाच पाहिजे असंही मी समजतो मग बनवलेलं औषध फेकून देण्यापेक्षा वापरलेलं काय वाईट? औषधाचं कार्यकारित्व हे ते वापरणार्‍याच्या मनोभूमिकेवरही अवलंबून असतं तेव्हा त्यांनी निश्चिंतपणे नि अत्यंत विश्वासाने त्याचा उपयोग करावा मात्र इतर कुणी मुद्दामून सदर महाग प्रयोग करण्याच्या भानगडीत पडू नये असंच मी म्हणेन.

वरती घासकडवींनी

ज्या पदार्थाच्या गुणाविषयी काहीही सर्वमान्य अनुभव नाही त्याला औषध म्हणू नये असं माझं मत आहे.

असं मत व्यक्त केलेलं आहे. हे मत एखाद्या विशिष्ट वैयक्तिक औषधी मिश्रणाच्या बाबतीत (Proprietary Medicine) मान्य होण्यासारखंच आहे मात्र त्यात पुढे ते हळदीला औषध मानतात कारण हे पिढ्यांपिढ्या आलेलं (परंपरागत) ज्ञान आहे. याच वेळेला हे देखिल लक्षात घ्यायला हवंय की वर उल्लेखलेली औषधंसुद्धा पिढ्यांपिढ्या चालत आलेली औषधं आहेत. हळद घरगुती आहे म्हणून तुम्ही जाणता आणि बाकीच्यांची नावं वैद्यवर्गापुरतीच मर्यादित राहतात. तुम्हाला माहिती नाहीत म्हणून ती औषधं नाहीत असं म्हणणं चुकीचं होईल. मात्र अशा औषधांचं योग्य मिश्रण कोणालाही करता येतं हा निव्वळ गैरसमज आहे. चरकाचार्यांनीच म्हण्टलंय, "योगसंयोगजं फलं ऋषयः खलु जानन्ति।" अर्थात औषधांच्या मिश्रणांचा काय परिणाम होईल ते समजणं सामान्यांचं काम नाहीच आहे. खरंतर खूपदा तज्ञांनाही ते समजणं कठीण असतं पण अभ्यासांति समजू शकतं. म्हणूनच माहिती असलेल्या औषधांची सरसकट मिश्रणं उपयोगी पडतीलंच असं म्हणता येत नाही. त्यांनीच वर म्हण्टलंय की अशा नव्या औषधांसाठी 'डबल ब्लाईण्ड टेस्ट' केल्यावरच त्यांच्या औषधित्वावर शिक्कामोर्तब होईल. खरंय, हा एक मार्ग आहे पण तो 'नव्या' मिश्रणांसाठी मानावा लागेल. ग्रंथोक्त अर्थात 'जनरीक' मिश्रणांसाठी त्याची आवश्यकता नसते कारण अनेक वर्षांच्या पारखण्यातूनच त्यांचा अन्तर्भाव अशा मान्यताप्राप्त प्राचीन ग्रंथांमध्ये झालेला असतो. जामोप्यांच्या औषधि कृतिबद्दल इतकंच म्हणेन की ही कृति माझ्या तरी ग्रांथिक म्हणजे 'जनरीक' कृति म्हणून कुठे वाचनात आलेली नाही.

जामोप्यांनी सांगितल्याप्रमाणे आयुर्वेदाच्या नावाखाली गरजवंत व्यक्तिंना नाडून पैसे कमवण्याचा धंदा सरसकट अनेक ठीकाणी होताना दिसतो. हा लबाड व्यक्तिंच्या लबाडीचा भाग आहे. योग्य माहितीने अशा गोष्टींना आळा घालता येतो मात्र बरेचदा आपली फसवणूक झालेली समजूनही त्याबद्दल लोकं योग्य तो बोध घेत नाहीत आणि म्हणून पर्यायाने आयुर्वेदाच्या नावाखाली अशा गोष्टी सुरूच राहतात.

चुकतात ती माणसं पण दोष दिला जातो आयुर्वेदाला! पुढे अशी फसलेली माणसं याचं पर्यवसान 'आयुर्वेद हे शास्त्रच नव्हे' यात करतात आणि हे फार वाईट आहे.

असो.

जामोप्या आणि मदनबाण,

तुमच्या दु:खात सहभागी आहे. गुग्गुळ आणि हाडमोडी या त्रासात उपयुक्त आहेतच पण त्यातही गुग्गुळाचा प्रयोग तुम्ही जरूर करा. मांसपेशी आणि हाडांच्या दुखण्यांवर त्याचा चांगला परिणाम होतो याची खात्री बाळगा.

:-)

अवांतरः गुगलचा उगम आयुर्वेदात आहे तर!

राजेश घासकडवी's picture

9 Nov 2011 - 6:12 am | राजेश घासकडवी

खुलाशाबद्दल धन्यवाद. आपल्या अंदाजाला अधिकारवाणीचं पाठबळ दिलं की बरं वाटतं.

माझं विधान 'मी औषध हा शब्द कुठच्या पदार्थांसाठी वापरतो' याचं स्पष्टीकरण देणारं होतं. माझी व्याख्या 'आजारी पडल्यावर जे घेतो ते औषध' अशी नसून 'ज्याने गुण येतो ते औषध'. लेखात तो पहिल्या अर्थाने वापरला आहे, व त्यातून काही दुसरा अर्थ घेतील अशी भीती वाटल्याने मी आक्षेप घेतला. माझी व्याख्या कोती नाही हे सांगण्यासाठी हळदीचं उदाहरण दिलं.

वर उल्लेखलेली औषधंसुद्धा पिढ्यांपिढ्या चालत आलेली औषधं आहेत.

तुम्ही म्हणता ते १००% बरोबर आहे हे माझ्या अज्ञानापोटी मी गृहित धरतो. पण तशीच आयबुप्रोफेन व ऍस्पिरिन ही उपयुक्त औषधं आहेत. मला जर कोणा बड्या फार्मास्युटिकल कंपनीच्या मार्केटिंग एक्झेक्यूटिव्हने सांगितलं की यांचं चूर्ण करून नखांना लावलं तर दातकीड निघून जाते तर माझा विश्वास का बसावा? मी डबल ब्लाइंड टेस्ट मागणारच.

आयुर्वेद या बाबतीत मला काडीचंही ज्ञान नाही. त्यामुळे त्या शास्त्राविषयी मी काही बोललो तर चुकीचं बोलण्याचा धोकाच जास्त आहे. म्हणून शास्त्राचं नाव काही का असेना, कुठच्या पुराव्यांवर मी विश्वास ठेवेन एवढंच बोलू शकतो. कोणीही काहीही मिश्रण करून वाटेल त्याला आयुर्वेदिक म्हणून विकण्याच्या प्रवृत्तीबद्दल तुमच्या विचारांशी सहानुभूती आहे.

युयुत्सु's picture

9 Nov 2011 - 9:58 am | युयुत्सु

खरंय, हा एक मार्ग आहे पण तो 'नव्या' मिश्रणांसाठी मानावा लागेल. ग्रंथोक्त अर्थात 'जनरीक' मिश्रणांसाठी त्याची आवश्यकता नसते कारण अनेक वर्षांच्या पारखण्यातूनच त्यांचा अन्तर्भाव अशा मान्यताप्राप्त प्राचीन ग्रंथांमध्ये झालेला असतो.

हा युक्तीवाद आयुर्वेदाचा चाहता म्हणून मनापासून आवडला!

५० फक्त's picture

9 Nov 2011 - 10:28 am | ५० फक्त

प्रासभौ, या प्रतिसादाची सुरुवात ; ऑर्डर ऑर्डर असं म्हणुन, टेबलावर हातोडा आपटणा-या स्माइलीनं व्ह्यायला हवि होती.

प्रास's picture

9 Nov 2011 - 12:16 pm | प्रास

भाऊ,

आयड्या भारी आहे. :-D

कृपया स.मं. आणि मालकांनी नोंद घेऊन तशा स्मायलीचा पुरवठा करावा ही विनंती.

:-)

गवि's picture

9 Nov 2011 - 12:23 pm | गवि

ही औषधं आभ्यंतर प्रयोगांची म्हणजे पोटात घ्यायची आहेत. बाह्योपचारांमध्ये निदान मला तरी त्यांची उपयुक्तता शून्य अभिप्रेत आहे. पुन्हा हे प्रमाणही तसं का आहे याचा काहीही पत्ता लागत नाही. महत्त्वाचं म्हणजे यातलं एकही औषध तैलविद्राव्य नसल्यामुळे कुणी कितीही त्वचेवरून चोळलं तरी हे घटक शरीरात काहीही परिणाम दाखवू शकतील असं मला अजिबात वाटत नाही. यामुळे सदर तैल औषधाचा वापर करण्याचा सल्ला मी तरी देणार नाही.

या पिनपॉईंट आणि ठाम भूमिकेमागोमाग ................

अर्थात जामोप्यांनी रुपडे खर्च करून ते बनवलेलंच आहे तर त्यांनी त्याचा प्रयोग जरूर करावा कारण खर्च केलेल्या प्रत्येक रुपयाचा उपभोग घेतलाच पाहिजे असंही मी समजतो मग बनवलेलं औषध फेकून देण्यापेक्षा वापरलेलं काय वाईट? औषधाचं कार्यकारित्व हे ते वापरणार्‍याच्या मनोभूमिकेवरही अवलंबून असतं तेव्हा त्यांनी निश्चिंतपणे नि अत्यंत विश्वासाने त्याचा उपयोग करावा

हे काय पटलं नाही प्रासबुवा..

सगळ्या प्रतिसादातला हातारिटीचा दणकाच गेला ना उगीच..

प्रास's picture

9 Nov 2011 - 12:38 pm | प्रास

कसं आहे गविभाऊ,

कोणताही शास्त्रीय संदर्भ नसलेलं औषध जामोप्यांनी बनवलेलं तर आहेच. त्यासाठी पैसेही खर्च केलेत. मग

युयुत्सुरावांच्या

यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

या स्वाक्षरीनुसार हवा तो परिणाम होणार नाही पण हात-पाय तेलकट होणे, आपण आपले पैसे खर्चून बनवलेलं औषध आपल्याच अंगाला लागल्याचे समाधान मिळणे इ. इ. काहीतरी परिणाम होतीलच की! त्याचहेतुने सदर वाक्ये आलेली आहेत.

सोप्या भाषेत, बनवलेलंच आहे औषध तर निश्चिंत मनाने रगडा शरीराला, येवढंच.

:-)

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

यात पहिला कृत्यक्रम पाळला तर शेवटी काहीतरी नक्की होईल पेक्षा काहीच्याकाही होईल असं म्हणावंसं वाटतं..

उदा रामेठा झाडाचे मूळ ठेचले आणि कुणाला दिले तर काही होणार नाही पण त्याने ते कुठेसे चोळले तर सुजण्याची शक्यता जास्त.. म्हणजे "काहीतरी" तरी झाले असंच ना?

शिवाय यापैकी काहीही घेतले / ठेचले नाही आणि बाजेवर शांत बसून राहिले तरी श्रीहरीकृपेने तसेही "काहीतरी" नक्की होईलच..

"काहीतरी" व्हावे हाच एवढाच उद्देश असेल तरसाठी म्हणतोय..

म्हणूनच जामोप्यांनी केलेल्या कृतिसंदर्भात काहीतरी म्हणण्याऐवजी

हात-पाय तेलकट होणे, आपण आपले पैसे खर्चून बनवलेलं औषध आपल्याच अंगाला लागल्याचे समाधान मिळणे इ. इ. काहीतरी परिणाम

अशी स्पेसिफिक परिणामांची जंत्री देण्याचा प्रयत्न केलाय.

:-)

समजलेय हो.. :)

आमचा असाच टाईम्पास चाललाय..

दादरला मामा काणे किंवा सुजाता कट्टा कधी?? बोला..

केव्हाही बोला, दादरात आम्ही एव्हररेडी......

:-)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Nov 2011 - 6:39 pm | विश्वनाथ मेहेंदळे

नेकी और पुछ पुछ ??
दादरात कधीपण चालतंय बघा.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Nov 2011 - 12:39 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आज प्रतिसाद दिला नसतात तर मी फोनच करणार होतो :-)

परिकथेतील राजकुमार's picture

12 Nov 2011 - 11:54 am | परिकथेतील राजकुमार

प्रासभौंचा संतुलीत प्रतिसाद आवडेश.

आयुर्हित's picture

7 Jan 2014 - 3:55 pm | आयुर्हित

अशी महाग औषधे घ्यायची वेळ येऊ म्हणून दररोजच्या जेवणात भरपूर कॅल्शीयम पोटात जाईल याची काळजी आधीच घ्यावी.

आपला लाडका: आयुर्हीत

श्रीमान कपिलमुनीच्या शोधसहकार्याने पाया सूप

कळावे, लोभ असावा.
आपला लाडका: आयुर्हीत

सांगणारा एकपट वाय झेड आणी ते एकुन तशी कृती करणारा दहापट वाय झेड.....
यापेक्षा दुसरे शब्दच नाहीत माझ्याकडे.

सुबोध खरे's picture

8 Jan 2014 - 9:51 am | सुबोध खरे

BBM बेवकूफ बनाने का मशीन
बढीया है
*ऑ़़*

भ ट क्या खे ड वा ला's picture

8 Jan 2014 - 11:17 am | भ ट क्या खे ड वा ला

या झाडाच्या साली ठेचून त्याचा लगदा मोडलेल्या हाडावर बांधत असत.
जेव्हा आधुनिक उपचार उपलब्ध नव्हते तेव्हा हे सर्व उपाय करून धड धाकट राहणाऱ्या पूर्वजांना सलाम
पण आजच्या जगात असे काही करणे म्हणजे ....... जाऊदे
आयुर्वेदाला उगाच बदनाम करण्याचा प्रकार आहे हा

कोणत्याही पथीचा आग्रह /दुराग्रह न बाळगता आरोग्यपूर्ण जीवन जगू इच्छिणारा

आयुर्हित's picture

8 Jan 2014 - 1:36 pm | आयुर्हित

भटक्या खेडवालाजी, नमस्कार.

अतिशय मोलाची माहिती पुरवली आपण.
आयुर्वेदालाच काय/कुठल्याही चिकित्सा विज्ञानाला कोणी(मुर्खान्नी)उगाच बदनाम केले म्हणून मुळीच नाराज होऊ नका. तूम्हीच व्हा शिल्पकार आधुनिक आयुर्वेदाचे/चिकित्सा विज्ञानाचे.आम्ही सर्व मिपाकार आहोतच आपल्या बरोबर.
काय मिपाकार हो, बरोबर ना!

०रुख पु. एक झाड . अस्थिभंगावर औषधी . याचें लाकूड चिरलें तरी पुन्हां सांधलें जातें. अव्वल प्रकारच्या झाडाला लवंगी सांधरुख म्हणतात.

"सांधरुख ह्या झाडाची ची अधिक माहिती,फोटो पोस्ट करा.
कसे व किती दिवस वापरले जाते हेही महत्त्वाचे.
सालीचे sample किंवा झाडाचे रोप/बिया/कलम कुठे मिळेल ते हि सांगा.
कोणा कोणाला याचा फायदा झाला त्याचे अनुभव हि धाग्यावर टाका.
जास्तीत जास्त माहिती मिळाल्यास फार उपकार होतील आपले.
उरलेली माहिती शोधून काढायला आपण सर्व मिपाकार आहोतच.

आजच्या जगात काय काय केले जाते, आपणास ठाऊक नाही!!!
भारतात जर्मन लोक येऊन "बिब्बा/भिलावा आणि बिब्बा/भिलावा_इंग्लिश
पासून कर्करोगावर औषधं बनवतील व १००/-चा माल १० लाखाचा होइल, तेव्हाच आपली सुज्ञ व तज्ञ ते वापरायचा सल्ला देतील.

"कोणत्याही पथीचा आग्रह /दुराग्रह न बाळगता आरोग्यपूर्ण जीवन जगू इच्छिणारा" हे वाक्य खूप काही सांगून जाते.
१००% सहमत.

कळावे, लोभ असावा
आपला लाडका, आयुर्हीत