फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध :
या लेखातील मते लेखकाची स्वतःची आहेत. मिसळपाव संस्थळाची अधिकृत मते नाहीत. लेखात दिलेल्या उपायांबद्दल काही शास्त्रशुद्ध आधार असल्यास त्याचा लेखकाने उल्लेख केलेला नाही. तसेच औषधाचा परिणाम काय झाला याबद्दल काही निरीक्षण्/निष्कर्ष यांचाही उल्लेख केलेला नाही. कोणा वाचकाला या लेखातील उपचार करायचे असतील तर आपल्या जबाबदारीवर करावेत. -संपादक मंडळ
७. सुवर्ण भस्म ५ ग्रॅम ८. हिरा भस्म ५ ग्रॅमया औषधांची एक मजेशीर आठवण आहे. आमच्या बॉसला एकदा असाच उभ्या टोपीवाल्या जडीबुटी वैद्याने ३५-४० हजारांना लुंगवले होते. बॉसने त्याची 'आंतरिक' पीडा त्या वैद्यासमोर उघड केली होती ;-) सुवर्ण भस्म, हिरा भस्म आणि बदाम चूर्ण अशी १०-१२ औषधे त्याने आणायला सांगितली. पुण्यात मिळतील म्हणे. पैसे घेऊन मी आणि त्या जडीबुटीवाल्याचा पोरगा पुण्यातील कुठ्ल्या तरी पेठेतल्या एका जुन्या वाड्यात ती औषधे घ्यायला गेलो. सुवर्ण भस्म आणि हिरा भस्माच्या किमती ऐकूनच मी गार पडलो. पण वैद्याने किमतीबद्दल आधीच अंदाज दिल्याने तेवढे पैसे सोबत होते. सुवर्ण भस्म आणि हिरा भस्माच्या त्या छोट्या पुड्या खूप गार लागत होत्या. घरी आलो तरी ते भस्म थंड्गार होते एवढे निश्चित. पुण्यातील एका अंधार्या वाड्यात चालणार्या आयुर्वेदिक फार्मसीतुन ही औषधे आणली. त्या वैद्याने ही औषधे वापरुन एक पेस्ट आणि दुधासोबत पोटात घ्यायचे एक औषध तयार करुन दिले. २-३ महिने ते औषध खाऊन आणि ती पेस्ट इच्छित ठिकाणी लाऊनही काही परिणाम साधला नाही, नुसता त्या पेस्ट्चा वास सुटतो आणि अंडरपँट खराब होते.. असे बॉसमहाशय सांगत होते. वैद्याने आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली ३५-४० हजारांना चुना लावला आहे हे हळुहळु स्पष्ट झाले. अधिक शोध करता हे सुवर्ण भस्म, हिरा भस्म विकणार्यासोबत वैद्याचे आधीच संधान असते असे कळले. ते लोक आमचा यात काही वाटा नाही असे सांगतात, पण खरेदी झाल्यानंतर त्या दुकानाकडून त्यांना त्यांचे कमिशन मिळते म्हणे. बॉस मला म्हणे.. च्यायला तु पैसे घेऊन तिकडेच पळून तरी जायचे होते ;-) शेवटी त्यांनी ती औषधे अर्ध्या किमतीत विकायला काढल्याचे मित्रमंडळीत जाहीर केले. पण घेतो कोण?
In reply to जंगल पपिता ठीक .. पण.... २. by गवि
In reply to धनगर कशाला असा उद्योग करतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धनगर फार तर मेंढ्या बकर्या रानात बसवायचे पैसे घेईल ...खुप वर्षांनी ऐकलं हे. तुम्ही गावाकडचे दिसता. :)
In reply to जंगल पपिता ठीक .. पण.... २. by गवि
In reply to वरील लेखातील औषधांपैकी by युयुत्सु
त्याने हृदयाचे पंपी ग सुधारतेही पंपी ग काय भानगड आहे? ;)
In reply to त्याने हृदयाचे पंपी ग by धन्या
In reply to धनगराना हिर्याचे व सोन्याचे by वेताळ
In reply to मी तयार केले आहे. औषध. शेवाळी by JAGOMOHANPYARE
In reply to औषध (?) by राजेश घासकडवी
In reply to औषध (?) by राजेश घासकडवी
In reply to गुर्जी, तुमचा आक्षेप केवळ याच by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to आक्षेप by राजेश घासकडवी
एखाद्या पदार्थाचं भस्म म्हणजे जळल्यावर शिल्लक रहाणारा पदार्थ असा माझा अंदाज आहे. तो बरोबर आहे का? तसं असल्यास हिऱ्याचं भस्म म्हणजे कार्बन डाय ऑक्साइड का? मग तो इतका महाग का असतो?आपली माहिती इतर भस्मांबाबत बरोबर असेल. वर दिलेल्या किश्श्यात त्या दुकानदाराला मी हिरा भस्म कसं तयार करतात? असं विचारलं तेव्हा तो म्हणाला होता हिरा अनेक वर्षे घासतात.. त्यातून जी पूड पडते ते हिराभस्म ! त्यामुळे कार्बन-डायऑक्साईड म्हणजे हिराभस्म असू शकत नाही असे वाटते.
In reply to एखाद्या पदार्थाचं भस्म म्हणजे by यकु
In reply to त्या दुकानदाराला हे ज्ञान by शिल्पा ब
In reply to >>त्या दुकानदाराला हे ज्ञान by विश्वनाथ मेहेंदळे
सरकारमान्य शिक्षण घेता येते त्यात.मग? जोतिषात सुद्धा सरकारमान्य शिक्षण घेता येते. म्हणजे लगेच ते शास्त्र होत नाहीत. संस्थळाप्रमाणे सरकारात सुद्धा फार गाढवं असतात. आयुर्वेदात जितकं डॉक्युमेंटेशन भस्मावरचं आहे त्यात हिरा भस्म प्रकार वाचल्याचे आठवत नाही. चुभुदेघे. सीएसआयआर ने मध्यंतरी आयुर्वेदातील भस्मांचं पेटंट घेण्याच्या उद्देशाने डॉक्युमेंटेंशन सुरु केले होते. त्याचं पुढे काय झालं कोणास ठावूक. (डॉक्युमेंटेशन सबमीट होऊन ५ वर्षं झाली असे ऐकतो.)
आपल्याकडे लोक येत जाता एकमेकांना क्रोसिन, ब्रुफेन सुचवत असतात. हे त्याचेच आयुर्वेदिक एक्स्ट्रापोलेशन आहे.बरं मग? एकाने चुक केली की तुम्ही दहा चुका करायच्या का?
In reply to सरकारमान्य! by Nile
In reply to >>मग? जोतिषात सुद्धा by विश्वनाथ मेहेंदळे
अच्छा, तुम्ही जोतिष (??) आणि आयुर्वेद एकाच तराजूत मोजता. मोजा मोजा, काही हरकत नाही.अहो मेहेंदळे आजोबा, तुलना मी नाही, तुम्ही केलीत. सरकारमान्य == शास्त्र अशी.
ज्योतिषावर सरकारमान्य शिक्षण घेता येते ही माहिती नवीन आहेशोधा म्हणजे सापडेल. इथेच किंवा उपक्रमावर, बहुतेक, त्यावर धागाही आला होता.
तुमचा आक्षेप कशावर आहे ते ही कळले, आता मी डोळे मिटायला मोकळा झालोगंगेचे गडू आहेत की पाठवू? ;-)
In reply to हाहाहा.. by Nile
आयुर्वेदात जितकं डॉक्युमेंटेशन भस्मावरचं आहे त्यात हिरा भस्म प्रकार वाचल्याचे आठवत नाही. चुभुदेघे. सीएसआयआर ने मध्यंतरी आयुर्वेदातील भस्मांचं पेटंट घेण्याच्या उद्देशाने डॉक्युमेंटेंशन सुरु केले होते.आयुर्वेदात हिरक भस्म आहे. मी वर उल्लेखलेल्या डॉक्युमेंटेशनमध्ये ते नाही.
In reply to दुरुस्ती. by Nile
In reply to या "औषधावर" सरसकट टीका करण्या by युयुत्सु
In reply to आरारा! by आनंदी गोपाळ
In reply to जागो by विनायक प्रभू
In reply to पुराने जमानेमे ऋषीमुनी by रेवती
In reply to हाड्सांधिचा पाला मिळतो तो by स्पंदना
ज्या पदार्थाच्या गुणाविषयी काहीही सर्वमान्य अनुभव नाही त्याला औषध म्हणू नये असं माझं मत आहे.असं मत व्यक्त केलेलं आहे. हे मत एखाद्या विशिष्ट वैयक्तिक औषधी मिश्रणाच्या बाबतीत (Proprietary Medicine) मान्य होण्यासारखंच आहे मात्र त्यात पुढे ते हळदीला औषध मानतात कारण हे पिढ्यांपिढ्या आलेलं (परंपरागत) ज्ञान आहे. याच वेळेला हे देखिल लक्षात घ्यायला हवंय की वर उल्लेखलेली औषधंसुद्धा पिढ्यांपिढ्या चालत आलेली औषधं आहेत. हळद घरगुती आहे म्हणून तुम्ही जाणता आणि बाकीच्यांची नावं वैद्यवर्गापुरतीच मर्यादित राहतात. तुम्हाला माहिती नाहीत म्हणून ती औषधं नाहीत असं म्हणणं चुकीचं होईल. मात्र अशा औषधांचं योग्य मिश्रण कोणालाही करता येतं हा निव्वळ गैरसमज आहे. चरकाचार्यांनीच म्हण्टलंय, "योगसंयोगजं फलं ऋषयः खलु जानन्ति।" अर्थात औषधांच्या मिश्रणांचा काय परिणाम होईल ते समजणं सामान्यांचं काम नाहीच आहे. खरंतर खूपदा तज्ञांनाही ते समजणं कठीण असतं पण अभ्यासांति समजू शकतं. म्हणूनच माहिती असलेल्या औषधांची सरसकट मिश्रणं उपयोगी पडतीलंच असं म्हणता येत नाही. त्यांनीच वर म्हण्टलंय की अशा नव्या औषधांसाठी 'डबल ब्लाईण्ड टेस्ट' केल्यावरच त्यांच्या औषधित्वावर शिक्कामोर्तब होईल. खरंय, हा एक मार्ग आहे पण तो 'नव्या' मिश्रणांसाठी मानावा लागेल. ग्रंथोक्त अर्थात 'जनरीक' मिश्रणांसाठी त्याची आवश्यकता नसते कारण अनेक वर्षांच्या पारखण्यातूनच त्यांचा अन्तर्भाव अशा मान्यताप्राप्त प्राचीन ग्रंथांमध्ये झालेला असतो. जामोप्यांच्या औषधि कृतिबद्दल इतकंच म्हणेन की ही कृति माझ्या तरी ग्रांथिक म्हणजे 'जनरीक' कृति म्हणून कुठे वाचनात आलेली नाही. जामोप्यांनी सांगितल्याप्रमाणे आयुर्वेदाच्या नावाखाली गरजवंत व्यक्तिंना नाडून पैसे कमवण्याचा धंदा सरसकट अनेक ठीकाणी होताना दिसतो. हा लबाड व्यक्तिंच्या लबाडीचा भाग आहे. योग्य माहितीने अशा गोष्टींना आळा घालता येतो मात्र बरेचदा आपली फसवणूक झालेली समजूनही त्याबद्दल लोकं योग्य तो बोध घेत नाहीत आणि म्हणून पर्यायाने आयुर्वेदाच्या नावाखाली अशा गोष्टी सुरूच राहतात. चुकतात ती माणसं पण दोष दिला जातो आयुर्वेदाला! पुढे अशी फसलेली माणसं याचं पर्यवसान 'आयुर्वेद हे शास्त्रच नव्हे' यात करतात आणि हे फार वाईट आहे. असो. जामोप्या आणि मदनबाण, तुमच्या दु:खात सहभागी आहे. गुग्गुळ आणि हाडमोडी या त्रासात उपयुक्त आहेतच पण त्यातही गुग्गुळाचा प्रयोग तुम्ही जरूर करा. मांसपेशी आणि हाडांच्या दुखण्यांवर त्याचा चांगला परिणाम होतो याची खात्री बाळगा. :-)
In reply to माझं मत - by प्रास
In reply to माझं मत - by प्रास
वर उल्लेखलेली औषधंसुद्धा पिढ्यांपिढ्या चालत आलेली औषधं आहेत.तुम्ही म्हणता ते १००% बरोबर आहे हे माझ्या अज्ञानापोटी मी गृहित धरतो. पण तशीच आयबुप्रोफेन व ऍस्पिरिन ही उपयुक्त औषधं आहेत. मला जर कोणा बड्या फार्मास्युटिकल कंपनीच्या मार्केटिंग एक्झेक्यूटिव्हने सांगितलं की यांचं चूर्ण करून नखांना लावलं तर दातकीड निघून जाते तर माझा विश्वास का बसावा? मी डबल ब्लाइंड टेस्ट मागणारच. आयुर्वेद या बाबतीत मला काडीचंही ज्ञान नाही. त्यामुळे त्या शास्त्राविषयी मी काही बोललो तर चुकीचं बोलण्याचा धोकाच जास्त आहे. म्हणून शास्त्राचं नाव काही का असेना, कुठच्या पुराव्यांवर मी विश्वास ठेवेन एवढंच बोलू शकतो. कोणीही काहीही मिश्रण करून वाटेल त्याला आयुर्वेदिक म्हणून विकण्याच्या प्रवृत्तीबद्दल तुमच्या विचारांशी सहानुभूती आहे.
In reply to माझं मत - by प्रास
खरंय, हा एक मार्ग आहे पण तो 'नव्या' मिश्रणांसाठी मानावा लागेल. ग्रंथोक्त अर्थात 'जनरीक' मिश्रणांसाठी त्याची आवश्यकता नसते कारण अनेक वर्षांच्या पारखण्यातूनच त्यांचा अन्तर्भाव अशा मान्यताप्राप्त प्राचीन ग्रंथांमध्ये झालेला असतो.हा युक्तीवाद आयुर्वेदाचा चाहता म्हणून मनापासून आवडला!
In reply to माझं मत - by प्रास
In reply to प्रासभौ, या प्रतिसादाची by ५० फक्त
In reply to माझं मत - by प्रास
In reply to हे काय पटलं नाही.. by गवि
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.या स्वाक्षरीनुसार हवा तो परिणाम होणार नाही पण हात-पाय तेलकट होणे, आपण आपले पैसे खर्चून बनवलेलं औषध आपल्याच अंगाला लागल्याचे समाधान मिळणे इ. इ. काहीतरी परिणाम होतीलच की! त्याचहेतुने सदर वाक्ये आलेली आहेत. सोप्या भाषेत, बनवलेलंच आहे औषध तर निश्चिंत मनाने रगडा शरीराला, येवढंच. :-)
In reply to आता बघा by प्रास
In reply to - कोणत्यातरी झाडाची मुळे by गवि
हात-पाय तेलकट होणे, आपण आपले पैसे खर्चून बनवलेलं औषध आपल्याच अंगाला लागल्याचे समाधान मिळणे इ. इ. काहीतरी परिणामअशी स्पेसिफिक परिणामांची जंत्री देण्याचा प्रयत्न केलाय. :-)
In reply to म्हणूनच जामोप्यांनी केलेल्या by प्रास
In reply to समजलेय हो.. आमचा असाच by गवि
In reply to केव्हाही बोला, दादरात आम्ही by प्रास
In reply to माझं मत - by प्रास
In reply to माझं मत - by प्रास
In reply to औषधे घ्यायची वेळ येऊ म्हणून by आयुर्हित
In reply to "सांधरुख" नावाचे एक झाड आहे by भ ट क्या खे ड वा ला
७. सुवर्ण भस्म ५ ग्रॅम ८.